savitalote2021@bolgger.com

मंगळवार, २९ जून, २०२१

** सार आता कस थांबला आहे **

***  सार आता कस थांबला आहे ****

सार आता कसा थांबला आहे 
शांतता चौहीकडे आणि भयान 
वास्तव मनात अंधारलेल्या जाणिवेत
प्रश्न पडतात नसलेला मार्ग शोधतांना 

मेंदूला,  उठतो काहूर... हातात 
काम नसलेल्या..... श्वासांना 
वेडावती मन प्रकाश धारेकडे पण 
शांतता नांदत आहे चौहीकडे 

भुकेल्या पोटाने वास्तव जगात 
सारे अवयव निकामी झाले ढसाढसा 
रडायला....
पण नाही नयनात अश्रूच नाही

डोळेझाक केलेल्या जिवंत माणसाच्या 
पांघरून घेतले त्यानेही कारण तो 
हतबल आहे शांतता चौहीकडे 
नांदावी यासाठी... 

अर्ध भुकेल्या पोटी 
मनाने खचलेल्या भावनाशून्य झालेल्या
फेसाळलेल्या जगात,  वास्तव करीत  
केविलवाणी स्वरात बोलतो आहे 

निकामी झालेले सारे अवयव 
आता तरी पणती द्या 
उजेडासाठी.... उघडे डोळे आणि 
कोसळतात धारा जड पापणीसोबत 
ओलावून ....

सार आता कस थांबला आहे 
सार आता कस थांबला आहे !!!

                 ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे


 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- ** सार आता कस थांबला आहे**

आवडली असल्यास कविता तर नक्की
              लाईक व शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.
         Thank you  !!


----------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...