अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा आणि चालना देणारे ठरले आहे अण्णाभाऊ साठे मानवतावादी लेखक होते. मुक्ती हा त्यांचा ध्यास होता. दलित शोषित पीडितांच्या शोषण संपविण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला त्यांचे साहित्य परिवर्तनवादी होते.
मराठी साहित्य रूपवादी रंजनपर आधारलेले होते.आर्थिक-सामाजिक बांधिलकी मानणारे समाजपरिवर्तनाचे शस्त्र हाती घेऊन लेखन करणारे साहित्य सर्वसामान्य माणसा विषयीचे आंतरिक तळमळ त्यांच्या सुख-दुःखाचे चित्रण करणारी ओढ, वाचकाच्या मनाला भुरळ घालत असे अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य होते.
वाचनीयता हे त्यांच्या साहित्याचे महत्त्वपूर्ण अंग आहे. कामगार कष्टकऱ्यांच्या चळवळीचे लोकशाहीर होते. 1960 च्या दशकापर्यंत म्हणजेच दलित आंबेडकरी प्रगत साहित्याच्या उगमापर्यंत उपेक्षाच आली. दलित शोषित कष्टकरी जीवन वास्तव आपल्या लेखणीतून त्यांनी मांडले. प्रस्थापित समाज व्यवस्थेवर संस्कृतीवर त्यांनी त्यांचे लेखन गाण्यातून मांडले.
साहित्य हे परिवर्तनाचे महत्वपूर्ण अंग आहे आणि या साहित्याचा उपयोग करून शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सर्वसामान्यांपर्यंत रुजविण्याचे महत्वपूर्ण काम त्यांनी केले. त्यांनी "लालबावटा", कला पथकाचे कार्यक्रम सादर केले. विशिष्ट पद्धतीने सादर केलेला पद्धतीमुळे लोक त्यांच्याकडे प्रेरित झाले.
अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. हे गाव सांगली जिल्ह्यात आहे. त्यांच्या आईचे नाव "वालुबाई "वडिलांचे नाव "भाऊराव" होते. एक अस्पृश्य मांग समाजात जन्म झालेला होता . त्यावेळी या जातीला गुन्हेगारांचे जात म्हणून ओळखले जात असे. गावात कुठेही चोरी झाली की सर्वप्रथम यांच्या वस्तीवर हल्लाबोल केला जात असे.
अण्णाभाऊ साठे यांचे प्राथमिक शिक्षण दीड दिवसाचे होते. कारण त्याकाळात सामाजिक व्यवस्था जातीभेदावर आधारित होती. ते शाळेत गेल्यानंतर तेथे सवर्णद्वारे होणाऱ्या भेद भावामुळे त्यांना शाळा सोडावी लागली. या कारणाने त्यांचे शिक्षण अक्षर ओळख सुद्धा नसणारी होती. त्याच अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मध्ये मोलाचे योगदान दिले.
अण्णाभाऊ साठे यांच्या डोळ्यात एक चमक होती. आवाजात उबदारपणा होता; थेट हृदयापर्यंत त्यांचा आवाज भिडत असे. अण्णाभाऊ साठे यांनी कामगार चळवळीमध्ये भाग घेऊन त्यांचे मुद्दे मांडले ते मांडण्यासाठी त्यांनी लिहिणे, गाणे, नाटक करणे इत्यादी आधार घेतला. अण्णाभाऊ साठे जेव्हा बोलण्यासाठी उभे राहत तेव्हा अगदी मोठ्या गर्दीतही शांतता पसरत असे. त्यांची लोकप्रियता जनमाणसात खूप होती.
अण्णाभाऊ साठे मार्क्सवादी दृष्टिकोनातून श्रीमंत आणि गरीब यांच्यातला मोठा फरक त्यांनी पहायला. जातीवादाने अस्पृश्यतेच्या स्पष्टीकरण करताना त्यांनी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण येते. सामाजिक न्यायासाठी सामाजिक क्रांती होणे आवश्यक आहे असे मानतात.
मराठी साहित्य विश्वाची शिखर अस्पृश्य आणि देशातील चातुर्य वर्णव्यवस्थेतील सर्वात गरीब समजल्या जाणाऱ्या जातींपैकी एका जातीमध्ये ( मातंग )त्यांचा जन्म झाला होता. कायमचा व्यवसाय नव्हता पोट भरण्यासाठी त्यांना सणाच्या वेळी ड्रम वाजवणे नृत्य करणे गाणे गाऊन लोकांचे मनोरंजन करणे विणकाम करणे यातून आर्थिक उत्पन्न मिळत असे. कोणतेही कष्टाचे काम करून पैसे मिळवावे लागत असे. जातीने अस्पृश्य असल्यामुळे त्यांना गावात राहण्यास मनाई होती म्हणून गावाबाहेर राहत होते.
शहरी समाजव्यवस्था आणि उच्चभ्रू लोकांमध्ये असणाऱ्या साहित्यात ग्रामीण भागातील दलित शोषित कष्टकरी महिला जातिभेद इत्यादी साहित्य लिहिले. समाजातील अशा प्रश्नांवर भाष्य केले त्यावर कुणीही काहीही लिहिले गेले नव्हते.
अण्णाभाऊ साठे यांनी ग्रामीण भागातील झोपडपट्टीतील एखाद्या विशिष्ट भागातील दीनदलित शोषित आदिवासी व गुन्हेगार स्तरावरील जनतेच्या जीवनाचे चित्र त्यांनी त्यांच्या साहित्यात होऊ लागले. मराठी कादंबरीचा केंद्र नागरी समाज होता. त्यांच्या साहित्यामुळे ती जागा ग्रामीण भागातील निम्मेवर्गाकडे सरकू लागली . त्यांचे साहित्य हे सखोल अध्ययनातून आणि सखोल आकलन होत असे.
अण्णाभाऊ साठे यांचे लेखन विनोदी नव्हते ते गंभीर लेखक होते त्यांनी जे अनुभवले ते शब्दबद्ध करीत. जीवनातील अतिशय क्रूर सत्य त्यांनी त्यांच्या साहित्यामध्ये मांडले ते सत्य त्यांच्या साहित्याचा आत्मा होता. तेच साहित्याचे वैशिष्ट्ये सुद्धा आहे. म्हणून त्यावेळी साहित्य क्षेत्रात त्यांना एक वेगळी ओळख निर्माण झाली. त्यांच्या प्रतिभेला नवीन ओळख प्राप्त झाली. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य म्हणजे एक प्रकारे अन्यायाविरुद्ध बंड करणारा नायक आणि नायिका यांचे दर्शन... त्यांच्या साहित्यातून समाजापुढे मांडले जाते.
अण्णाभाऊ साठे यांनी आपली प्रतिभा तमाशाद्वारे दाखविण्याची संधी मिळाली. तमाशामध्ये कोणतेही वाद्य ते वाजवीत असे. सतत नवनवीन शिकण्याच्या जिद्दीमुळे एका रात्री तमाशाचे नायक बनतात आणि तिथूनच त्यांच्या जीवनाला एक नवीन कलाटणी मिळते.काही दिवसानंतर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या दोन तमाशातील मित्रांसोबत १९४४ मध्ये लाल बटवा कलापथक सुरू केले. क्रांतिकारी कार्यक्रम सादर केले जाता. त्याच काळात देश स्वातंत्र्याची चळवळ मोठ्या जागृत झालेली होती.
तमाशा हे जनतेसोबत संवाद साधण्याचे महत्वपूर्ण माध्यम होते. अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या कलामंचद्वारे समाजातील शोषित कष्टकरी मजूर कामगार सामाजिक जाती भेद यातील प्रश्न इत्यादी समाज व्यवस्थेवरील वर्णन यांचे दुःख जगासमोर आणले. लोकांना त्यांनी स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून दिले. त्यासाठी जनजागृती केली. कामगारांचे प्रश्न त्यांनी चर्चेचे केले. त्या कारणाने कामगारांमध्ये अधिकच लोकप्रिय झाले. त्यांना त्यांच्या हक्कासाठी लढण्यासाठी प्रेरित केले.
अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्रातील गावा गावात पोहोचले. त्यांच्या कलामंच याद्वारे सादर केलेली कला म्हणजे समाजातील दुर्लक्षित झालेल्या समाजाचे प्रतिनिधित्व होते म्हणून लोक त्यांना लोक शाहीर अण्णा भाऊ साठे आणि लोकशाहीर म्हणू लागले. अशातच तमाशा वर बंदी घालण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांनी हार न मानता लोकगीतातून सामाजिक प्रश्न कामगारांचे प्रश्न मांडण्याचे काम अविरत चालू ठेवले
कामगार कष्टकऱ्यांच्या चळवळीचे लोकशाहीर झाले त्यांचे साहित्य वाचकाच्या मनाला भुरळ घालणारे होते. 1960 च्या दशकापर्यंत म्हणजेच दलित आंबेडकरी प्रगत साहित्याच्या चळवळीच्या उगमापर्यंत उपेक्षाच आली दलित शोषित कष्टकरी जीवन वास्तव आपल्या लेखनातून मांडले आणि प्रस्थापित समाज व्यवस्थेवर संस्कृतीवर लेखन गाण्यातून आसूड ओढले.
जग बदल घालुनी घाव या मधून अण्णाभाऊ साठे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या बद्दल आपले मत व्यक्त केले. गुलामगिरीच्या चिखलात आम्हाला काढले आणि नवीन महाराष्ट्र निर्माण केला. बाबासाहेबांचे लढाऊ विचारच अस्पृश्य समाजाला अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतात. अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा ही कादंबरी आपल्या समुदायाला पूर्णपणे भूकमारी पासून वाचविण्यासाठी ग्रामीण रूढीवादी प्रणाली व ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध विद्रोह करणाऱ्या नायक फकीरा मधून चित्रीत केले.
अण्णाभाऊ साठे यांनी माझी मैना गावावर राहिली यामधून तात्कालीन राजकारण समाजकारण कृषी जीवन संस्कृती अलंकार दंतकथा अर्थकारण अशा सार्यांचे प्रतिबिंब त्यामधून रेखाटले आहे. म्हणून आजही अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य सदाहरित आणि कलातीत बनलेले आहे. अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मध्ये मोलाचे योगदान दिले. त्यांची लेखणी जितके दलित श्रमिक कष्टकरी समाजासाठी चालली तितकीच ती महाराष्ट्रातील संयुक्त चळवळीच्या लढ्यासाठी सुद्धा चालली. त्या काळातील परिस्थिती त्यांनी 'माझी मैना गावाराहिली', यामधून रेखाटलेली आहे...
वैजयंता या कादंबरीच्या प्रस्तावनेत अण्णाभाऊ साठे म्हणतात ,"जो कलावंत जनतेची कदर करतो त्याचीच कदर जनता करते हे मी प्रथम शिकून नंतर लेखन करीत असतो माझा माझ्या देशावर जनतेवर नि तिच्या संघर्षावर आढळ विश्वास आहे."
जे मी स्वतः जगलो आहे पाहिले आहे. व अनुभवले आहे तेच मी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सामाजिक,राजकीय आर्थिक,धार्मिक, कौटुंबिक समस्यांना वाचा देण्याचे कामे माझ्या साहित्यातून करिता आहो तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील आंबेडकरी जलसाची जन प्रबोधनाची क्रांतिकारी परंपरा नव्या लोकनाटकातून पुढे नेली.
अण्णाभाऊ साठे यांच्या अंगी जन्मजात प्रतिभा होते. त्यामुळे त्यांना एखाद्या भूमिकेचे ताबडतोब अचूक व सखोल आकलन होत असे. त्यांचे संवाद तर्कसंगत व ओघवते असत. अण्णाभाऊ साठे नि तमाशा कलेला लोकनाटकात रूपांतरित करून नवजीवन दिले. लोकप्रियता आदर मिळवून दिला... समृद्धी मिळवून देले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बेळगाव कारवार सीमावाद आणि गोवा मुक्ती आंदोलन या आंदोलनात हिरारीने भाग घेणाऱ्या समितीमध्ये त्यांनी त्यांचे महत्वपूर्ण योगदान दिले.
अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबऱ्या त्यांचे गुणात्मक दृष्ट्या विचार करत साहसाचे
चित्रण करणारा कादंबऱ्या करणारा होता महिलांच्या समस्या पर्यंत कादंबऱ्याचा क्रम लागतो.
अण्णाभाऊ साठे यांनी मराठी भाषेत 35 कादंबऱ्या लिहिला. 1959 मध्ये फकीरा, गुलाम, चंदन, चिखलातील कमळ, 1945 मध्ये चित्रा, रूपा, वारणेचा वाघ, वैजयंता, पाझर, मथुरा, 1963 मध्ये माकडीचा माळ, रत्ना, रानगंगा, वैर ,टिळा लावतो मी रक्ताचा (आवडी) इत्यादी कादंबऱ्या लिहिल्या.
अण्णाभाऊ साठे यांनी कथासंग्रह चिरानगरची भुतं, नवती, निखारा,तारा, जिवंत काडतूस, देशभक्त घोटाळे फरारी इत्यादी लिहिल्या गेल्या आहे. अण्णाभाऊ साठे यांनी कादंबरी आणि लघुकथा यांच्या व्यतिरिक्त नाटक, पटकथा ,मराठी पोवाडे, रशियातील भ्रमंती आणि गाणी लिहिलेली आहे. 1961 मध्ये राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळला. लघुकथा संग्रह 15 आहे त्यांच्या कादंबऱ्यांचे अनेक भारतीय भाषांमध्ये भाषांतरित केल्या गेले आहे.
अण्णाभाऊ साठे रशियाच्या इंडो सोव्हिएत कल्चरल सोसायटीच्या निमंत्रणावरुन ते 1961 गेले तेथील अनुभवावर आधारित माझा रशियाचा प्रवास हे पुस्तक लिहिले.
अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य जनसामान्यांच्या भाषेत होते. बोलीभाषेत होते. त्यामुळे त्यांचे लेखन जनसामान्यांच्या हृदयापर्यंत पोहोचले. वैशिष्ट्यपूर्ण मांडणी सुंदर व आकर्षक कलाकृती त्यांच्या साहित्याला लाभलेला अपार लोकप्रियतेचे गणित आहे. त्यांच्या या भाषाशैली मध्ये आहे कारण त्यांनी सर्वसामान्य लोकांचे प्रश्न त्यांच्याच भाषेत लेखन केल्यामुळे ते अधिकच आपलेसे वाटले.
अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य खऱ्या अर्थाने एक इतिहास आहे ती कोणतेही काल्पनिक गोष्ट नसून त्या काळातील लोकांचे प्रश्न आहे. विकासातील अडथळे समस्या आहे. उपाशीपोटी जगण्याचे दुःख आणि त्यातही गुलाम समाजव्यवस्थेतील आपलपोटी जातीयवादी स्वार्थी माणुसकीला काळीमा फासणाऱ्या संस्कृती परंपरेच्या नावाखाली अन्याय अत्याचार करणाऱ्या माणसाविरुद्धची लढाई आहे. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्याचे सामर्थ त्यांच्यातील अन्यायाविरुद्ध आवाज समर्थपणे मांडण्याची एक कला आहे. एक व्यासपीठ आहे आणि या व्यासपीठाचे समर्थपणे योग्य पद्धतीने उपयोग करून सामाजिक प्रश्न मांडले.
अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या एकूण कादंबऱ्या पैकी पूर्णपणे कादंबऱ्या ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या, कादंबऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. ग्रामीण जीवनाचे त्यांच्या विविध पैलूंचा सह अतिशय समर्थ व प्रामाणिक चित्रण हे या कादंबऱ्यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. तसेच त्यांच्या साहित्यामध्ये व्यक्तिरेखा सामाजिक मूल्य देशाचे स्वातंत्र्य महिलांचे शील पुरुषांचा स्वाभिमान हे मूल्य जपणारी आहे.
अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीला अनुसरून दलित कार्याकडे वळले. त्यांचे साहित्य दलित व कामगारांच्या जीवनातील अनुभवांना लिहिण्यासाठी वापरले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे लढाऊ आणि विमोचक विचारांचे संस्कार त्यांच्या मनावर खोलवर रुजले होते. अण्णाभाऊ साठे यांनी अनेक सामाजिक प्रश्नांना शब्द दिले. एका विशिष्ट वर्तुळात राहून त्यांनी त्या समाजाचे जीवन चित्रण रेखाटले. श्रद्धा अंधश्रद्धेच्या पलीकडेही एक जग आहे आणि ते आम्ही जगतो आहे.
माणूस म्हणून नाकारलेल्या समाजाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. त्या अधिकारासाठी त्यांनी बंडखोरी करून लेखणीला धारधार तलवारीसारखी वापरली. समाज परिवर्तन हे फक्त हातात तलवार घेऊन होऊ शकत नाही हे सत्य त्यांनी जाणले आणि त्यासाठी एकच शस्त्र हाती घेतले ते म्हणजे लेखणी !!!
अक्षर ओळख नसणारे अण्णाभाऊ साठे यांनी मानवतावादी लेखन करून समाजाला एक नवीन शिकवण दिली. प्रतिभा कोणत्याही चाकोरीबद्ध समाजव्यवस्थेचा भाग असू शकत नाही. रूपवादी रंजकवादी साहित्याला त्यांनी अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या नायकाच्या भूमिकेत मांडणी करून साहित्याला नवीन वळण दिले. खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ साठे यांचे लिखाण मानवतावादी आहे. त्यांचे साहित्य दुःखी पिडीत शोषित समाज महिला स्वातंत्र्य आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे हे सांगणारे आहे.
१९५८ मध्ये बॉम्बे मध्ये स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात आपल्या उद्घाटन भाषणात ,'अण्णाभासाठे' म्हणतात," पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे."
अण्णाभाऊ साठे दलित समाजाचे
प्रतीक बनलेले आहेत. १ ऑगस्ट 2001 रोजी भारतीय पोस्टाने ४ ₹ च्या खास टपाल तिकिटावर अण्णाभाऊ साठे यांचे चित्र ठेवलेले आहे. शताब्दी वर्षाच्या निमित्ताने १ ऑगस्ट २०१९ रोजी हे टपाल तिकीट वितरित करण्यात आले. पुण्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाने कुर्ला मध्ये एका उड्डाणपूल यास अनेक इमारतींना त्यांचे नाव देण्यात आलेले आहे.
अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य सर्वसामान्य लोकांपासून ते सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक धार्मिक श्रद्धा अंधश्रद्धा महिला स्वातंत्र्य कष्टकरी दलित सामाजिक प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या अन्यायकारक प्रवृत्तीविरुद्ध आणि अस्पृश्य समाजातील जिवंतपणा हा नरकयातने पेक्षाही नरक आहे. हे सांगणारे वाटते त्यांनी जे भोगले ते लिहिले जे दिसले ते लिहिले त्यांच्या वाटेला जे आले ते लिहिले त्यांची लेखणी तलवार होती.अन्यायाविरूद्धची अण्णाभाऊ साठे सर्वसामान्य माणूस विषयीची आंतरिक तळमळ त्यांनी त्यांच्या भाषेत जगासमोर मांडला.
जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव.... या शब्दातून अण्णाभाऊ साठे यांच्या चळवळी बद्दलचे विचार समाजापुढे मांडतात अशा या थोर देशभक्त, समाजसेवक मानवतावादी लेखक साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे निधन १८ जुलै १९६९ रोजी मुंबई येथे झाले.
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-**लोकशाहीर अण्णाभाऊ साठे **
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you !!!!!
*************************************