savitalote2021@bolgger.com

गुरुवार, १७ जून, २०२१

शब्द



         शब्द ही कविता माझ्या मनातील शब्दांबद्दल असलेल्या प्रेमावर स्वलिखित लिहिलेली आहे शब्द माझ्यासाठी काय आहे हे शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.


*****  शब्द *****

माझ्या शब्दांना साद
देत चालत राहा 
माझ्यासोबत 
शब्दांची माळ गुंफेपर्यंत 

बोलत राहा माझ्याशी 
माझ्यातील भावस्वप्नांसोबत
तू माझी प्रीत आहे 
तू माझा भावरंग आहे 

प्रतिमा तुझीच मनाला 
प्रतिभा तुझीच विचारांना 
लेखणी माझे प्रेम आणि 
तू माझा आरशा

छंद तुझ्या सोबत भिजण्याचे 
गंध माझ्या मनाला तुझाच ...
नियती ...तू 
स्वाभिमान... तू 
कुंभमेळा... तू 
आशावाद ...तू 
संपत्ती ...तूच माझी!! 

शब्दमाळेत गुंफल्यानंतर 
मौनालाच अर्थ तुझ्याच
वाचतोया भिजतांना 
रुजावे शब्दरूपी जीवनाला 

सोबतशब्द असावे 
माझ्या शब्दांनाही शब्दांनी 
साथ देताना माझ्या जीवनाला!!!


             ✍️©️सविता तुकाराम लोटे 


©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- शब्द 
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you


----------------------------------

*अबोली हसली *

*****    अबोली हसली *****

अंगणात फुलता फुलता 
आज कुंडीतही फुलली 
हसली उगवता सूर्यसोबत 
हसली पानांवरील दवबिंदुसोबत 
मनाच्या आत अबोल झाली 
तरी स्वप्न रंगविली 
तेज सूर्यकिरण्यांसोबत 
झाली सांजवेळ... परत हसली 
गोड ...मावळतीच्या 
उधाणलेल्या रंगासोबत 
रुसून बसली अंधारात 
अबोल होऊनी रात्रकिडण्यांसोबत 
नव पहाटेच्या सप्तसुरांची 
रंग उधाळणीसोबत
बोल होतास 
परत फुलली अंगणात...
कुंडीत...
अबोल नजरेने सूर्यासोबत 
अबोल होऊन 
अबोल हसली !!


         ©️✍️सविता तुकाराम लोटे 



✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- अबोली हसली 
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you

   

           ************************************

वेळ ( Coronavirus poem )

    
             जागतिक महामारी कोरोना व्हायरस Coronavirus)  कधीही कुणालाही गर्दीच्या ठिकाणी किंवा सोशल डिस्टंसिंगचा वापर न केल्यास होतो त्यावर सुचलेली कविता ,"वेळ".

       *** वेळ ***

कधीच कुणासाठी थांबत नाही 
वेळेचे चक्र आणि वेळ, वेळेनुसार 
चला. पण परिस्थिती समजून - उमजून 
काळ वैऱ्याची आहे 
दिवसाही ...रात्रीही...गर्दीचा 
कोणत्याही स्थितीत....
कधी घाव घालेल माहित नाही 
म्हणून जपून चला 
आत्ताच 
या क्षणाक्षणाला 
विचार करा नियतीघाव घालेल 
तर !!
आपआपली जपून पावले टाका 
आयुष्याच्या परिस्थितीनुसार 
वेळेनुसार जिंका वेळेला 
आत्ताच ...
श्वास चालू ठेवण्यासाठी...
सूर्योदय बघण्यासाठी....
आपली माणस आपल्या डोळ्यांनी बघण्यासाठी!!!


            ✍️©️सविता तुकाराम लोटे 


©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- वेळ (Coronavirus Poem)  
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you





----------------------------------







बुधवार, १६ जून, २०२१

हायकू





                        1

                     2
                     3


                        4

         
                   5

         
                       6



©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- हायकू
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you



-----------@@@@@@@-----------



फुंकार ****

***  फुंकार  ****

वाट बघता- बघता वाटत 
होते मनस्वी फुंकार मारावी 
पुन्हा कदाचित येईल 
सुखद जगायचे क्षण 

          गेलेले दिवस येणारी वाट 
         जखमांना फुंकर घालेल वाटत
         अर्धवट रस्त्याच्या कडेला 
        आयुष्याच्या ...

मिटून जाईल तो क्षण 
कोणत्याही क्षणी नव फुंकराने
जपले जाईल स्पर्श अलवार 
स्वर्गसुखाचा ...नवभेटीने !

             फुंकर बंधनाने 
            सुखद जगायचे क्षण 
           अर्थशून्य; वाटेल गेलेले 
          दिवस ...

सुखद क्षण पावलेने
फुंकार मनस्वी फुलो-याच्या
सुखद क्षणाने... 
सुखद क्षणाने...

                 ©️✍️🏻सविता तुकाराम लोटे 


©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  फुंकार
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you


----------------------------------

ती आली

 *** ती आली ***

तू आल्यावर 
मनात दाटे
सप्तसुरांची ज्योत 
वाऱ्यासंगे...
गवतफुले बोले 
निरागस गाणे 
ती आली...ती आली
हसूनच..!😃😃😃

         ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे **


©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- ती आली
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you

----------------------------------


       

हायकू



©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- हायकू
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you

----------------------------------


       

हायकू



©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- हायकू
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you

----------------------------------


       


हायकू



©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- हायकू 
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you

----------------------------------


       

हायकू सकारात्मक



©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-हायकू
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you

----------------------------------


       

हायकू

©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- हायकू
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you


----------------------------------


       

हायकू

©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- हायकू 
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you



----------------------------------


       

मंगळवार, १५ जून, २०२१

आपुलकीने


©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- आपुलकीने
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you

----------------------------------


       

आपुलकीने



©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- एक  अनामिक ओढ आपुलकीने
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you

----------------------------------


       


आत्मसन्मान

*****  आत्मसन्मान  *****

पायात अजूनही ताकत नाही 
या पुरुषी समाजव्यवस्थेला पायाखाली 
चिरडून टाकण्याची
मनात प्रश्न येतो खरंच आपण 
21 व्या शतकात  
प्रश्नालाही प्रश्न पडतो खरंच 
शून्यवत आहे का हे 
जग अजूनही त्याच समाजव्यवस्थेत? 
उत्तराची माळ गुंफत 
प्रश्नाच्या प्रश्नालाही उत्तर 
आहे ....!
बाबासाहेबांच्या संविधानाने 
दिली शक्ती, पायात... 
फुलांच्या शाळेने स्वाभिमान!! 
वेचीत आहो आम्ही स्वप्नाचेफुले 
अभिमानाने उच्चपदस्थ होऊनी...
सन्मानाची चाल चालती 
समाजव्यवस्थेच्या उंच झोका होऊनी 
हिरकणी कालची गुलामव्यवस्थेचे 
हिरकणी आजची...
मुक्त समाजव्यवस्थेची.... संविधानाने 
मानसन्मान उंचावती 
क्षणोक्षणी....
स्त्रीयांच्या आत्मसन्मानाची !!!


                      ✍️©️सविता तुकाराम लोटे 

©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- आत्मसन्मान
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you

----------------------------------


       





शनिवार, १२ जून, २०२१

आपुलकी




*****   आपुलकी ********

          रुसवे-फुगवे ,प्रेम विश्वास -अविश्वास , प्रामाणिकपणा ...नकळत अश्रुंसोबत अनेक भाव विश्व निर्माण झालेले शब्द.  त्यातील भावना त्या सर्व भावनेला कुठेतरी अर्थ असतो .भावना असते... शब्द असतात.... त्या आपल्याला सहजतेने समजू शकते.  पण आपुलकी ही भावना खरंच मनात रुजविली जाते आणि ते रोपटे सहज निर्माण होत नाही; तर त्याला मनातून रुजवावे लागते. आपुलकी साठी कायमची ओढ निर्माण करावी लागते.आपुलकी ही प्रेम या शब्दाच्या अलीकडे आणि प्रेम या शब्दाच्या पलीकडे असलेले नाते.

             आपुलकीसाठी सहवास हवा असे नाही.  ओढ  निर्माण झाली की ती मनातल्या कोणत्याही भावनेला आपलीशी करून ठेवते. खडतर प्रवास ओळखीच्या क्षणाला ....सुखाच्या दुःखाच्या  क्षणाला...मनातलं खोल डोहात... आपुलकी असली की ती जाणवते न सांगताही. शब्दांचा खेळ चालू राहत नाही .तरी ती पोहोचते दुसऱ्या पर्यंत सहज ;आपल्या देहबोलीने खोल  गर्तेत ...उधाणलेल्या मनात साठविण्यासाठी !!!
 ती मातीची असली तरी आणि मातीविना असलेल्या सर्व रेशीमबंधात.


           ओळखी अनोळखी क्षणांचा साक्षीदार असते .'आपुलकी, मनातल्या आतल्या कप्प्यात साठवून ठेवलेली. आयुष्यात की मौल्यवान गोष्ट आपुलकी आपल्याजवळ असेल तर..आनंद,सुख,महत्वकांक्षा,उगवणाऱ्या दिवसाला सोबत आणि मावळतीच्या क्षणापर्यंत विनामूल्य मिळत राहते. 

               समाधानाचे गणित आपुलकीवर अवलंबून असते .अशी कितीतरी वेळ वाटून जाते . अलगद पाठलाग करावा असे वाटते. मग आपुलकीचा नाटकीय प्रसंग स्वतः होता तयार करून आणि फुलपाखरासारखे फिरावे असेही वाटून जाते पण संस्कार आडवे येतात.  

          संस्कारमय मनाला पण तसे आपलपोटे आणि स्वार्थी विश्वासघाती व्यक्तींसाठी मनुष्य प्रवृत्तीचे नियम लागू नाही . नाटकीय पद्धतीने ते आपल्यासाठी आपुलकी निर्माण करतात; इतरांच्या खांद्यावर नकारात्मक तिची रेष निर्माण करून, सरड्यासारखे रंग बदलत फिरत राहतात. उगवत्या मावळत्या क्षणाला आणि कोणत्याही क्षणाला!!

            क्षणभंगुर मृगजळामागे ही नाटकीय प्रवृत्ती धावत राहते... सतत धावत राहते. सुखाच्या राशीवर लोळण घेणे यासाठी खळखळून इतरांवर हसण्यासाठी... जीवन माझे इतरांना खेळविण्याची या प्रवृत्तीनुसार आणि अशा व्यक्तीने आपुलकी दाखविणारा ला माहीत नसते की ते त्यांच्या हाताचे त्यांच्या नाटकीय भावनेचे कृत्रिम अश्रुंचे खेळणे आहे . त्यांच्या मनातील स्वार्थी भावना पूर्ण करण्याचे आपल्याकडील आपुलकीने!

          स्वप्नाचे डोंगर चढत राहतात कृत्रिम भाव भावनेवर इतरांच्या आपुलकीने आणि आपुलकी दाखविणारा फक्त हसत राहतो. आपल्या सहज प्रवृत्तीने आपल्या चांगल्या संस्कारांनी जीवन जगण्याच्या चांगल्या प्रवृत्तीने आतला माणूस जागा करून बसतो त्याला हरवू देत नाही.  कोणत्याही नाटकीय व्यक्तीसाठी सुद्धा आपुलकीने.
       असो, आपुलकी मध्ये संवाद हा आपलाच आपल्याशी असतो. जोडलेली नाती आपली असते. रक्ताच्या नात्यात कुणीही काही नाती आपुलकीने अधिक जवळ वाटतात. आपुलकी ही आपलाच सभोवताली असलेल्या विश्‍वासाची असते. 
से काही ती सहज मिळू शकतो. कोणतेही नाते नसली तरी... त्यांना कुठल्याही गिफ्ट पेपरची म्हणजे नात्यांची याची जोड लागत नाही.  

          तर काही व्यक्ती असतात की त्यांना काहीतरी ना ते लागतात तर त्यांच्यामध्ये आपुलकी निर्माण होते. कधी स्वार्थी प्रवृत्तीची ...कधी प्रेमळ प्रवृत्तीचे ...तर काही मित्र मैत्रीण जिवलग .... मानलेले मामा काका जिवलग ...मैत्रिणी एका तालातील ही ही आपुलकीच!!


आपुलकी निर्माण होत राहते 
आपल्यात आपल्यातील नात्यांमध्ये 
अशा व्यक्ती प्रवृत्तीने 
त्याला अर्थ द्यावा...
इतरही व्यक्ती असतात हे गृहीत 
धरूनच मोकळे सोडावे...
कोणत्याही स्थितीत आपुलकीवीणा 
त्यांच्या सुखदुःखाच्या छायेसोबत !!!
     


        आपुलकी अनेक भूमिके मधून आपल्यापर्यंत पोहोचत राहते. आपुलकी चा खरा चेहरा ओळखावा न चुकता आयुष्यात कधी कधी असे शरण येतात की वाटत राहते खरंच स्वप्न किती वेड्या अशा दाखवीत असतात.   

        आभाळापर्यंत नेताना...त्यापलीकडे नेताना... जगणे सुखकारक करतात... नव स्वप्न.. नवी उमेद..नवीन श्वास... नवीन आधारस्तंभ नवीन शांतता नवीन चेहरा मागील भावना नवीन चेहरे सांभाळताना किती समजून घ्यावे लागते. जगण्यातील त्यांच्या चैत्र श्रावण शब्द - निशब्द भावना मूकवाणी आणि बोलते डोळे नवीन निर्माण होते.

           नवीन जुन्या सावल्यांच्या खेळात सोबत असलेली आपुलकी त्यावेळी आपल्या पदरात पडत राहते त्यावेळी वाटून जाते खरंच आपण आपल्यापुरतं जगत असताना या प्रेम रुपी आपुलकीला किती महत्व द्यायचे. पुन्हा त्यात ....काटयांचा संवाद निर्माण झाला तर? परत त्याच प्रेमळ आपुलकीने स्वतः स्वतःचे भांडण भांडणे चालू होतात. 

        हरवलेली आपुलकी असे वाटत राहते . पण त्या क्षणाला ती जीवंत ही वाटत राहते . नको नको वाटते टाळणे अशावेळी त्या तरी टाळत असतो वैतागत असतं सतत माघार घेत असतो पावलोपावली सतत तोच विचार तेच शब्द आणि वादविवादाचे ( भांडणे)  शब्द पण त्यातील आपलेपणाची आपुलकी सतत जाणवत राहते पण का विकोपाला गेली नाती... नाही? ....नाते नसलेली!! जपून का  ठेवावी वाटते; वर्षानुवर्ष झाली तरी. आंधळा आपुलकीने त्यांच्या मनातील ओलाव्याने निर्माण झालेली!

 
 मन ओले होते त्याच आठवणी        आठवणींच्या हिंदोळ्यावर 
झुलताना मनमोकळे होत राहते 
त्याच फांदीवरील शब्दांनी 
मनातील निर्माण झालेल्या 
आपुलकीने। !!!!



        शेवटी आठवणी उरतात आपुलकीनेच भावना कोरड्या होत नाही शब्द मागे रहात नाही आपुलकीने आयुष्यात अशी नाती खूप कमी असतात आपुलकीची नाते नसलेली -असलेली मनातील ओलावा निर्माण झालेला असतो पण शब्द विरोधी सतत विरोधी आपुलकीचे बीज मनात रुजलेले असतात. 

            सर्व शब्द... भावना ...आशा.... झुरणे...आनंद ...गोड शब्द... निस्वार्थ भावना ...अगदी सहज शब्दविना... अपूर्ण विचारशक्तीला... पूर्णत्वाकडे निरंतर थांबवत असलेली आपली प्रवृत्ती... सवय ...तीही आपुलकीनेच निर्माण होते .त्यावेळी कळत नसते त्या व्यक्तीला.... ती ओढ प्रेम असावे असे नाही.... ती ओढ मित्र मैत्रीण या नात्यात गुंफावे इतकीही नसते. ती सवय नसते.... ती निरंतर आपल्याला आपल्या पर्यंत आणि समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविणारी.



              आपल्यातील आपुलकीचे बीज रोपटे असते ती थांबत नाही.... ती जडत नाही... ती वाढत नाही... ती जोडत नाही... ती  इच्छा  नसते...  ती मनामधून फुललेली खूप पवित्र भावना असते. तिला Delete करता येत नाही  एक्झिट करता येत नाही की तिला Save ही करता येत नाही .आपण जपत राहतो, मने एकमेकांची वाद स्वरूपात... कळले तर इतरांना या भावनेने!! जपत रहातो स्वतः स्वतःला आणि समोरच्या व्यक्तीलाही त्याच अबोल आपुलकीने . परिस्थितीच्या विरोधाभास आता नवीन माळ गुंफत संघर्षाची... नवीन अनुभव सांगत... व्याकुळ नयन भावनिक आपुलकीने!!
         
        रिक्त झालेली... आपली मने !रिक्त झालेली... आपली शब्द सावली! रिक्त झालेली... डोळ्यातील आसवे! रिक्त झालेली... वेदनेची गोष्ट आपआपली! रिक्त झालेली... विचारांची लाट! रिक्त झालेली... अधुरी नाते.... पण ते रिक्तपण आपल्यातील आपुलकीला जोडून ठेवते.

             अधुऱ्या नात्यांना परक्यापणाकडे सोडून देतो. कारण ही आपुलकी आपल्या मनातील आत आपलेपणा मुळे निर्माण झालेली असते. आपल्याही नकळत फुललेली ही आपुलकी आयुष्यात सर्व किमती गोष्टी सर्वात मागे असते. पण सर्वात जवळ मनात साचलेली असते. ओळखते  ती आपल्यातील प्रेमळ आपुलकीला शोधावे लागत नाही. त्यांच्यातील आपल्या आपलेपणाला. 

            मलम लावावा लागत नाही. हसण्याचा... मलम लावावा लागत नाही लपवलेपणाचा... मलम लावावा लागत नाही ओळखीतील शब्दांचा... मलम लावावा लागत नाही पुन्हा फांदीला नवपालवीच्या... मलम लावावा लागत नाही फितूर झालेल्या श्वासांना !!  मलम लावावा लागत नाही शेवटचे कधी हसू आले ...आपल्याही निरोपाचे!! हे सर्व त्या मनातील आपुलकीच्या रोपटाने होत राहते.

           कोणत्याही नात्यांशिवाय कोणत्याही खऱ्या प्रेमाची चाहूल नसलेल्या भावने शिवाय कोणत्याही विचित्र हावभावे शिवाय...फक्त आपुलकी या निर्मळ नात्यांवर ते नाते निर्माण झालेले असते.       
     
         विचित्र पण मजेदार....आधारस्तंभ....रंगहीन आयुष्यात गडद रंग पण नव्या नात्याची फिकी झालेली शब्द.... त्यांच्या आठवांच्या सोबत मनात फक्त संवाद आपलाच आपल्याशी विसंवाद असे नाही. हा फक्त विचारांच्या शब्द गुंतलेली आपुलकी की दाखविता येत नाही आणि लपविताही येत नाही. 

          आठवणींचा तो प्रसंग अजूनही मनाला विचित्र भावनेने हसण्यासाठी प्रेरित करते .आपल्या हातातल्या बांगड्यांचा  आवाज नकळत  आकर्षणाचा बिंदू त्या क्षणाला होत असतो आणि क्षणात 
हातातून निघालेली बांगडी टेबलवर!!! शंभर विचारांच्या प्रश्नांची रांगोळी सामोरी व्यक्तीच्या चेहऱ्यावर ? किती अन प्रोफेशनल स्वभाव. त्यावेळीही वाटून गेले आणि आजही वाटतं खरंच ते अन प्रोफेशनल स्वभाव होता का ?  

            एक स्त्री .... हातातील बांगड्या काम करताना आवाज तर होणार ..... त्यात काहीच विशेष नाही पण विशेष हे की चेहऱ्यावर आलेले ते हसू समोरच्या व्यक्तीच्या हे रागवलेल्या चेहऱ्यावर आलेले आणि एक आपुलकीचा शब्द;   असू द्या!!  हसायला येत अशा आठवणींचा लिहितानां येत असतो तेव्हा . शब्द किती आठवणींना उजाळा देत असते. आपुलकीने ! किंवा तोही प्रसंग 'निरोपाचा शेवटचा', निरोप...शेवटचा क्षण. 

            निरोपाचे शब्द नकोसे वाटते आणि उठून जाणारी आपली आपुलकी नकळत  निर्माण झालेली, शब्दाविना अर्थविना. शब्द कमी पडतात त्या  आपुलकीच्या नात्याला शब्द देण्यासाठी .त्या क्षणाला निरोपाला त्या आपुलकीला शब्दबंध करताना. निरोप कधीही दिला नाही त्या व्यक्तीच्या त्या आपुलकीला.

                    कोणतीही नाते  हे  आपुलकी वर निर्माण झाले तर  ते कधीही  कोणत्याही  शब्दांमुळे  कटूतेमुळे  दुःखामुळे  आनंदाच्या सुखाचा सोहळा, निरोपाच्या सोहळा,  कधीही कमी  होत नाही.  तो सोहळा झाला की  फक्त होते चिडचिड.... शब्दांची ! भावनेची  !संवादाची.  न दिसणाऱ्या  त्या व्यक्तीच्या आपुलकीच्या प्रश्नार्थक चिन्ह यांची  शब्द माळेची;  एकटेपणा जाणवत राहतो. सतत आपुलकी  दूर गेल्यामुळे. त्या व्यक्तीची  ती जागा कोणीही भरून काढू शकत नाही . कारण तो कप्पा  रिकामा होत राहतो वेळोवेळी . त्या रिकाम्या जागेला  मग समजावीत असते ,'जाने दो यार ' पण  ती जागा  मोकळी असते.  ...आठवणींसोबत.

        विचित्र वाटणाऱ्या या स्वभाव दर्शनाचे  दर्शन  विचित्र  नात्यामुळे निर्माण झालेले असते. मानवी स्वभाव.  नात्यात ओढ असते. आपुलकी असते . नात्याला रंग असते. रंगाला अर्थ असतं . ते सर्व आपुलकीमुळेच !!खरच असा काही निरोप असतो का आपुलकीला. नकळत आपुलकीतून निर्माण झालेल्या नात्यांना... समोरच्या व्यक्तीला माहित नसते रंग रंगाचे प्रकार आपुलकीच्या. पण आपल्या स्वभाव संस्कारामुळे आपण किती तुटक प्रश्नार्थक चिन्ह घेऊन समोरच्या व्यक्तीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असतो. आपुलकी ...आपुलकी या नात्यातील ओढीमुळे!! 

              ओढ एक अनामिक ... ओढ आपुलकीच्या नात्यातील गुढ रेषा. आपुलकीने समोरच्या व्यक्तीला हे सर्व माहीत असते. हे त्या व्यक्तीला माहीत नसते! गृहीत धरून फक्त इतरांसाठी स्वतःचे शब्द वापरले जातात. त्यावेळी आपुलकी असते कुठेतरी मनातल्या आत.  आपुलकीच्या रोपटे ओलावलेल्या .....!असो.

          एक असाच प्रसंग प्रवासातल्या आयुष्याच्या आपुलकी ही कशी निर्माण होते फक्त संवादाने आयुष्याच्या प्रवासात कितीतरी व्यक्ती भेटतात अनोळखी अनोळखी आपुलकी ही खऱ्या अर्थाने आपुलकी असते. असं वाटून जातं संघर्षाच्या त्यावेळेला फक्त दोन शब्द कितीतरी बळ देऊन जाते. अशी कितीतरी व्यक्ती माझ्या आयुष्याच्या या प्रवासात मला मिळाले.    


               संघर्षाला दोन हात करावे लागते असे सांगणारे प्रवासातील मित्र मैत्रिणी आयुष्याच्या प्रवासात मित्र झालेले एका संघर्ष वाटेवरून चालत असलो तरी पाय वाट एकच असली तरी आपल्या सोबत असलेली व्यक्ती कुठे थांबू नये आपल्याला आलेले अनुभव समोरच्या व्यक्तीला येऊ नये यासाठी सतत धावपळ करत असलेली आपुलकी. खरच प्रवास खूप सुंदर आहे आयुष्याचा.

           मावळतीच्या क्षणालाही आपुलकीने उगवत्या सूर्याचे दर्शन घडविले आहे. आजही वाटतं आपुलकी खरच ते रोपटे आहे तिथे कोणतेही बियाणे खते वापरावे लागत नाही. ते फक्त आपल्या संस्कारमय स्वभावाने निर्माण होते. आपुलकीने कितीतरी रेशीम बंध निर्माण होतात... निर्माण झाले आहे आणि भविष्यातही होत राहील.


             समजून घेणे हे जर व्यवहार शून्य समजले जात असले तरी त्यातूनच आपुलकी निर्माण होते. व्यवहार शून्य तर त्या वेळी होते जेव्हा आपुलकी नाटकी पद्धतीने प्रेझेंट केले जातात. तेव्हा नाटकीय संवाद आम्ही सांभाळतो मनाला इतरांच्या . 

     आपुलकीचे शब्द शब्दाशिवाय सतत सतत बोलले जात असेल तेव्हा आपुलकी ही मनात रेंगाळत असते. ओल्या स्पर्शाने अस्मरणीय ... अबोल ...संयमी ...सरळ सोपी भाषेत... आणि न बोलताही फक्त डोळ्यातील भाषेने.

          दुःखाचे सावट आले की अधिकार वाणी सुखाचे शब्द मिळाले की अधिकारवाणीने सांगणे आणि अंधार सावलीच्या मनातील खेळ चालूच आपुलकीने आपलाच आपल्याशी त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी. अजूनही आठवते ,जांभळी  रंगाचा खेळ . रंग  न आवडणाऱ्या रंगाचा तो खेळ न आवडणाऱ्या रंगाचा वापर दैनंदिन जीवनशैलीत करताना किती त्रास होतो मनाला. तो रंगाचा खेळ फक्त रंगाचा खेळ नसते ; तर तो खेळ असतो, आपुलकीचा अनामिक आपुलकीमध्ये.


            कोणतेही नाते नसते. फक्त असते एक अनामिक ओढ!  मनातील आणि तीही आपुलकीमुळे निर्माण झालेली. तोच खेळ समोरचा व्यक्ती ही त्याच आपुलकीने खेळत असतो . समोरच्या व्यक्तीसाठी जांभळी रंगाचा त्याच्यासाठी सतत बदल करत असतो . त्याच्याही नकळत स्वतःमध्ये बदल नाही त्या जिव्हाळामुळे आपुलकीमुळे विश्वासामुळे आणि त्या अनामिक संस्कारमय मनाला अधिक सुसंस्कारित करण्याच्या सतत करत असलेल्या प्रयत्नामुळे. स्वतःबद्दल करीत असते त्याच्याही नकळत समोरच्या व्यक्ती तील आपुलकीमुळे!!! या आपुलकी ला हसावे की मनात जपून ठेवावे हे कळत नाही.

          आपुलकीचे रोपटे खूप सुंदर आहे. मायेचे संघर्षाचे शब्दविना नात्यांचे अश्रू
शिवाय नयनाचे आणि प्रेमाशिवाय सर्व भावनेला जवळ आणणारे आपुलकीचे नाते. असेच नाते नवीन नाते निर्माण करीत नाही, पण नव पालवी देतात. जिव्हाळ्याच्या व्यक्तींना आपल्या स्वभाव दर्शनाने आपल्यातील एक  होऊन. नाण्याच्या दोन बाजू असतात. इतरांसाठी पण त्यांच्यासाठी हे नाते एकच बाजू असते.      



अर्थ नसे प्रेमाला 
आपुलकीच्या... नात्यांसमोर 
उंच भरारी जिव्हाळ्याची 
प्रेमाच्या पलीकडे-अलीकडे !

         
            समाज व्यवस्थेसमोर फक्त वाद विवाद हेवेदावे समजून न समजून घेण्याच्या गणितावर चाललेले. गणिते मनात रुजलेली असते. आपुलकीचे रोप हिरवेगार प्रेमाविना फक्त हसण्यासाठी बोलण्यासाठी नाहीतर आधारस्तंभ म्हणून. त्या व्यक्तीचा त्याच्याही नकळत भविष्याची जोड देण्यासाठी. प्रेमळ दोन शब्द कधीतरी कानी यावे यासाठी असावे. त्याच्यासाठी स्वतःमध्ये बदल त्या समोरच्या व्यक्तीच्या मनासारखे करताना त्याला ही यातना होत असते. पण ओलावा आपुलकीमुळे निर्माण झालेला तो त्रास कमी करत असतो.  

          प्रत्येकांच्या आयुष्यात  एक हळवा कोपरा  असतो  गुंतलेल्या मनाचा  ते प्रेम नसते  जिव्हाळा नसत त्यांना त्यात काहीच नसते.  तरीपण खूप काही असते. मनातले शब्द विचार भावना  इंद्रधनुष्यासारखे  असते. मनाला वाटतं आपण प्रेमात नाही तरीपण प्रेम रुपी भावना नव्हे त्यासारखे भावना निर्माण होतात.  

            आपुलकीला कोणतेही नाव देता येत नाही. आपुलकी खूप सुंदर आहे ते मग जांभळ्या रंगाच्या खेळाचा खेळ असो की न बोलताही सर्व काही भावना हतबल होऊन सांगणे असो की आजूबाजूला नसताना ती आजुबाजू असल्याचा भास असो. हे सर्व अनुभव घेताना वाटत राहते; आपुलकी ही सर्व भावनांमध्ये एक अशी ओढ.... आहे ती तुम्हाला जगायला शिकवते ती तुम्हाला खेळायला शिकते. विश्वास ठेवायला शिकवते... जिव्हाळा निर्माण करायला शिकविते आणि आयुष्य सकारात्मक नकारात्मकते कडे न जाता आयुष्य जगण्याच्या जीवनकलेकडे एक पाऊल समोर येत असते.

          आपुलकी  जीवनातील दोन टोके आहे .एक आयुष्याला वळण देण्यासाठी आणि दुसरे आयुष्याला  नागमोडी  वळणावरून परत  वळणावर आणण्यासाठी. आपुलकी मिळाली ....मिळते आणि मिळत राहील.

शब्दांचा खेळ नसलेला 
शब्दांची जादू नसलेली 
शब्दांचा  जिव्हाळा नसलेला 
आयुष्याच्या सापसीडी मधील 
हिरवगार पालवीला...
उन्हाळ्यातील ऊनेला...
हिवाळ्यातील थंडीला ...
फक्त आधारस्तंभ आपुलकीला!
   


           ©️✍️ Savita Tukaram Lote  


©️✍️सविता तुकाराम लोटे 
 


----------------------------------

            


       
          

शुक्रवार, ११ जून, २०२१

शेवटचा किनाराही तूच **❤**

    **शेवटचा किनाराही तूच **❤**

विरहाच्या शेवटचा किनाराही तूच 
गालावरी खळीच्या हसूचे 
शेवटचे ❤❤हसूही तूच 
कोंदण सुखाचे हळूचं हृदयाचा 
आतल्या आत तूच 
उरलेल्या विरहाचे वादळ तूच 
आठवांच्या सावल्यांच्या हसूचे 
नाव तूच....❤
माझा पापण्यात ओलावा तूच 
व्याकुळतेने भावनेला वावर तूच 
नयनात साठविलेले 💔आसवे तूच  
जीवनाचा श्वासही तूच 
पूर्णत्वाच्या परीकल्पनेचा भास अजूनही तूच अंधाराने ग्रासलेला 💔💔घायाळ नजर तूच 
आनंदाच्या शेवटचा किनाराही तूच ❤❤
विरहाचा शेवटचा किनारही तूच!!!

           ©️✍️🏻सविता तुकाराम लोटे 

✍️©️savita Tukaram Lote
----------------------------------

गुरुवार, १० जून, २०२१

** पाऊस सुगंधा धारेवर **

***** पाऊस सुगंधा धारेवर ****

मातीचा सुगंध 
घेऊन आला 
चिंब भिजवाया  
मनाला !

स्पर्श होतास 
शहारे मनाला  
नजर अजूनही 
तुझ्या रूपावर रंगावर 

निशब्द झाले 
भांबावलेले शब्द सारे 
लाटेवर हलकासा स्पर्शाने 
झेलावे वाटते 

परत ...अंगावरी 
ओलाचिंब शिथिल
भावना  करुन... चिंब 
मनसोक्त उजेडात 

मातीचा सुगंध  
दरवळे चोहीकडे 
उजेड लाटेवरती 
मनातील सुगंध धारेवर 

      ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे




****×*****×*****×*****×*****×*****×

*** त्यानंतरचा,मधला प्रवास ***




       *** त्यानंतरचा,मधला प्रवास***


आयुष्यातील सुंदर क्षणापासून 
चालू झालेला प्रवास 
आयुष्याच्या अंतिम प्रवासापर्यंत;
मधला प्रवास सुखाचा 
त्यानंतरचा प्रवास यशाचा 
परत मधला प्रवास 
र्सौदर्याचा ऐश्वर्याचा, त्यानंतरचा 
प्रवास सुख-दुःखाच्या वाटाघाटीच्या 
त्यानंतरचा प्रवास शांत संयमाने 
चालण्याचा ...परत मधला प्रवास 
देऊन जाण्याचा !!
आयुष्य चक्र संपले की 
अंतिम प्रवास...
आठवणींचा फुलांचा!!!

    ©️✍️🏻 सविता तुकाराम लोटे 

    ©️✍️🏻Savita Tukaram Lote
------------------@@@@----------

Marathi Charolya poem in सकारात्मक चारोळी

Marathi  Charolya poem in सकारात्मक चारोळी 

माझे दोन मित्र 
पुस्तक....
.....ग्रीन टी



        ✍️🏻©️ सविता तुकाराम लोटे 

*************××××******************


माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...