savitalote2021@bolgger.com

रविवार, २७ जून, २०२१

धुंद

धुंद मनाला बेधुंद करा 
जगा वाऱ्यासारखे वाऱ्याबरोबर 
हसा खळखळून निसर्गाबरोबर 
आयुष्य एकच आहे जगण्यासाठी 

                ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  धुंद 
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you



----------------------------------

सकारात्मकतेचे

नकारात्मकतेला खतपाणी घालू नको 
वाईट गोष्टी विचारात घालू नका 
सुरुवात आत्ताच करा नवविचारांची 
नवे झाड लावा मेंदू सकारात्मकतेचे

                 ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  सकारात्मकतेचे
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you


वेळेला

वेळेनुसार चला वा वेळेला 
बदला आपल्यानुसार वेळ 
आपली असेल प्रत्येक वेळ 
क्षणाक्षणाला जीवनातील !!!

             ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  वेळेला
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you



----------------------------------

धुक्यातून वाट काढत चालावे



धुक्यातून वाट काढत चालावे 
चालतो आयुष्याचे गणित सोडवितांना 
घेऊन जाते सहज आपल्यातील 
माणसाला आपलाच माणसाजवळ

                  ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  धुक्यातून वाट काढत 
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you





******************///////*************

भेटण्यासाठी


तुला सांगतो स्पर्धा माझी 
तुझ्याशी तु ही ये असाच 
माझ्या कवेत असा मी आलो 
तुझ्या कवेत तुला भेटण्यासाठी

              ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  भेटण्यासाठी
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you



*************************************

प्रकाशाची तू !!!



वेदनाही तू सुखही तू 
शब्दांची शब्द प्रतिमा ही तू 
पेटलेले विचार ही तू 
प्रेमाची ज्योतही प्रकाशाची तू !!!

       ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  प्रकाशाची तू !!!
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you





----------------------------------

सोपी नसावी कदाचित


सोपी नसावी कदाचित 
दुखाची परिभाषा मात्र 
समजत जाते वेदनेच्या 
काट्यांचे रक्ताळलेले नाते

            ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  सोपी नसावी कदाचित 
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you




----------------------------------


परिस्थितीवर मात करता येत नाही 
म्हणूनच संयम ठेवा हेच 
एकच औषध आहे 
जीवन धारेतील सत्याला 


            ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  जीवन धारेतील सत्याला 
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you


----------------------------------

मागे वळून पाहताना


मागे वळून पाहताना वाटतं 
खूप समोर आले 
मात्र मग त्याच हिंदोळ्यावर 
झुलते  तिथेच वळून बघताना

          ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  मागे वळून पाहताना
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you





*************************************



जीवनात


टीका करणे सोपे असते 
कदाचित खुप सोपे असते 
स्वतःला सिद्धकरणे तितकेच 
कठीण सदैव जीवनात

                 ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  जीवनात
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you




----------------------------------

विश्वासाचे


एकाच आकृतीमध्ये राहण्यापेक्षा 
त्यापासून  दूर राहा... 
थकलो तरी चालेल 
येईल पायवाट विश्वासाचे

         ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  विश्वासाचे
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you






/////////////////////////////////////////////






उगाच


रोज  झुरते मी 
त्याच वाटेवर 
हरवलेल्या क्षणांसोबत 
नव्याने उगाच

        ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  उगाच 
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you





*************************************

चालताना


कोणत्याही वाटेवर चालताना 
चालाविच लागते ...
पायाखाली काय आहे त्यापेक्षा 
त्यातून सुखरूप निघणे महत्वाचे

         ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  चालताना 
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you



----------------------------------

गोड

जगासाठी गोड राहायचे 
असेल तर प्रत्येक गोष्टीसाठी 
होय म्हणा नाही म्हणताच 
सगळे जग वाईट म्हणतात

          ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  गोड 
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you




/////////////////////////////

...गजरा


तुझ्या माझ्या नात्यात हे
सत्य हातात आहे नव्याने 
त्या रंगात रंगायचे आहे 
माळायचा आहे प्रीतीचा गजरा

✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  गजरा
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you


 

*************************************

हसूने

** हसूने...!! **

आपलेपणाचे नाते निर्माण 
होण्यासाठी रक्ताची नाती 
असावी असे नाही 
आपलेपणा तर मनातील 
भावनेपासून तयार होऊन 
हृदयापर्यंत...
हसत येते  
मनमोकळा...

हसूने...!!

         ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  * हसूने...!! *
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you


*************************************

शब्दरूपी लेखणी


** शब्दरूपी लेखणी **

काहीतरी हरवल 
अस सतत 
वाटत राहते पण 
काय हरवल हे 
माहीत सुद्धा नाही 

       फक्त शिल्लक राहिले 
       हरवल्यातून माझे मन 
       वेदना... तुझ्या आठवणी 
                 आणि गुंतलेली 
                 शब्दरूपी लेखणी

                      ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  शब्दरूपी लेखणी
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you




----------------------------------

शनिवार, २६ जून, २०२१

***समर्पण***


          


              राधाकृष्ण त्यांचे प्रेम अलौकिक राधे शिवाय कृष्ण आणि कृष्ण शिवाय राधा अपूर्ण प्रेम विरहाच्या अग्नित समर्पणाचे प्रेम या भावनेवर आधारित एक कविता...

******समर्पण*******

राधा कृष्ण जळता दिवा 
प्रेमाच्या निखाऱ्यावर 
प्रेमळ भावनेच्या आधीन 

अनामिक एक ओढ 
जन्मांतरी नात्याची 
प्रेम शब्द एक भावना 

राधा-कृष्णाच्या मनातील 
विरहासोबत जोडलेला 
जन्मांतरीच्या नात्यांचे

प्रेम अंतरंगाच्या
विरहाच्या अग्नीमध्ये 
समर्पणाचे

          ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  ***समर्पण***
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you


--------/----------/-------/-------

प्रकाश अस्तित्वचा !!



या क्षणाला घेऊ 
आनंद वाटून 
त्या क्षणाला जाण्याआधी 
जगणं मला 
माहित आहे माझ्या 
प्रकाशाचे 
संपणार आहे तरी 
उरणार आहे 
अस्तित्वाचे कण 
मागे सोडत
प्रकाश अस्तित्वाचा !!

             ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  प्रकाश अस्तित्वाचा !!
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you


---------------------------------

शुक्रवार, २५ जून, २०२१

** असा माझा शाहू होता **

          26 जून सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा.....
            सदर कविता स्वरचित आहे,' असा माझा शाहू होता'.

**** असा माझा शाहू होता  ****

समाजातील वास्तवतेचे गणित मांडली 
जातीपातीच्या युद्धामध्ये शिक्षणाची शस्त्रे 
वापरली सर्वप्रथम  सक्तीचे शिक्षण दिले 
न घेतल्यास दंडही एक रुपया... 
असा माझा शाहू  होता 

फुलविले सुंदर नंदनवन प्रगतीचे
एकाच शाळेत स्पृश्य - अस्पृश्यांची पोरे 
पुसली जातीचे वर्चस्व श्वासाच्या शेवटच्या
क्षणापर्यंत ... व्यवस्था परिवर्तनाची
असा माझा शाहू होता

जगणे सोपे केले जातीपातीच्या प्रहारमध्ये ठावठिकाणा न ठेवला गुरफटलेल्या
संस्काराचे स्त्रीमुक्त झाली बंधनाच्या किनाऱ्यापासून प्रगतीच्या अलगद काठावर उभी राहुन दारे उघडी करून, 
...जगायला शिकवणारा 
असा माझा शाहू होता

नवा प्रयोगाची लाट उभी केली 
मनुवादी ब्राह्मणसंस्कृती समोर राजश्रय
दिला पारंपरिक कलेला आणि कास धरली संशोधनाची विकासाच्या वाटेने तहानलेल्या
गोरगरीब शेतकऱ्यांची ...पंख दिले खुशाल
जीवनाचे ....
असा माझा शाहू होता

गुलाम वतनदारी रद्द केली प्रकाश दावीला 
उजेडाचा पंख बळावर चालविण्यासाठी
देवदासी ही झाली बंद आयुष्याच्या 
सागराला बंधनमुक्त... केले जगतांना 
पुनर्विवाहची वाट मोकळी करणारा 
असा माझा शाहू होता

न्याय समता बंधुता स्वातंत्र्याचे प्रणेते
आरक्षणाची पायवाट दिली बहिष्कृत
समाजाला, संघर्षाची गाथा संपविणारा 
सगळ्यांना एकाच नाण्यात तोलणारा 
शब्दाला जागविणारे.... जीवनाचा प्रवास
दीनदलित-बहुजनांसाठी आयुष्यखर्च करणारा 
सामाजिक क्रांतीचे वादळच जणू...
असा माझा शाहू होता

कालानुरूप बदल हक्क सामाजिकव्यवस्थेचा
सांभाळ खुर्चीचा तरी विकास आत्मकेंद्रित
सर्वांगीन विकासाचा संस्काराची धार चेतवीत मनात मायेचीगोधडी गुंफलेली 
माया घेऊन
दूरदृष्टी जनतेचा कल्याण करणारे 
सामाजिक न्याय व्यवस्था निर्माण करणारे 
असा माझा शाहू होता

              ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  **** असा माझा शाहू होता  ****
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you





माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...