savitalote2021@bolgger.com

सोमवार, १२ जुलै, २०२१

सूप

   स्त्री स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आजही सुशिक्षित समजल्या जाणार्‍या समाजामध्ये नवीन प्रकारचे स्त्रियांना बंदिस्त केले जाते.              कधी कर्तव्याच्या नावाने तर कधी सुसंस्काराच्या नावाने....  स्त्रियांच्या याच भावनिक विचारांवर लिहिलेली ही कविता.

            कविता स्वलिखित आहे.


           *** सूप ***





बांगड्यांच्या आवाजात 
नाचत होते धान्य सुपासोबत 
आणि समोर जात होते
बारीक दाणे आणि कचऱ्यातील पाने 

मी उभी हातात
स्वच्छ धान्याची टोपली 
नजरेत भरेल इतकी 
स्वच्छ दानेदार...  

मग उचलले; पाऊल, 
स्वच्छ माझ्यासाठी....
स्वतःला दाणेदार बनविण्यासाठी 
संघर्षाची माळ हातापायात 

पण फेकले गेले पुन्हा 
त्याच सुपात...
स्वच्छतेसाठी पीठात 
विचारसंस्काराच्या दळलेल्या 

मी अजून आत सुपाचा 
स्वच्छतेसाठी त्यांच्या माणुसकीच्या 
मी अजूनही आत 
सुखाच्या बाहेर दळलेल्या 

पीठासारखे बाहेर
मग काय 
सुखातही पातळ कणिक 
दुःखातही पातळ कणिक 

मस्त चाललया आता 
सुपात आत -बाहेर करत 
बांगड्यांच्या सुरेल आवाजात 
सुगंधी मोगरासोबत 

मी उभी! 
स्वच्छ धान्याची टोपली ...


                ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  ** सूप ***

          आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

**************************************************************************

** पाऊस आताचा **

             निसर्गचक्रातील एक सुंदर ऋतु पावसाळा कुणाला हवा असतो तर कुणाला नको असतं पाउस आणि आठवणी यांचा रम्य सोहळा चालू असतो कधी हवा हवा वाटतो कधी नको नको वाटतं त्या भावनेतून लिहिलेली ही कविता कविता स्वलखित आहे. 
   आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.


*** पाऊस आताचा ***

चिंब भिजलेले थेंबगुच्छ 
झेलताना रेंगाळत राहती 
ओला स्पर्श...
गारवांच्या आणि क्षणात 
आपलेसे करून जातो 
नको नकोसा वाटणारा 
यंदाचा पाऊस 
आठवणीच्या थेंब आठवणीमध्ये 
रेंगाळतो ओल्या 
आतुर मनात 
ऋणानुबंध ....
पाऊस यंदाचा !!

         ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  *** पाऊस आताचा ***


अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका
Thank you

----------------------------------

शनिवार, १० जुलै, २०२१

पाऊलखुणा

      *****  पाऊलखुणा   ******


मंद पावसाच्या सरी सोबत आलास 
उनाड वारासारखा मनात दाटलेला 
उधाणलेला सागरलाटा 
बेभान होऊन गारव्यात सारखा 

मंद पावसाच्या सरीसोबत आलास 
सूर्य आणि सावलीच्या खेळात मनात
श्रावण सरीला सोबत घेऊन बरसायला 

मंद पावसाचा सरीसोबत आलास 
आठवांच्या बासरीसोबत सुरेल 
सुरेल आवाजात दाटून आले परत 
नयन धारेच्या दाटलेल्या सुरासोबत 

परत जाताना परत सरीसोबत 
ठेवून गेला श्रावणधारा मनातील आठवात  उरतात मागे पाऊलखुणा
मंद पावसाच्या सरीसोबत घेऊन 
जाताना  


                    ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-    पाऊलखुणा   

अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका
        Thank you!




**************************************************************************

**** अंधार ****

  




****   अंधार   ******

अंधार फार झाला सुगंध शोधताना 
हरवलेले क्षण गेलेली वेळ आणि 
हातातून सुटलेले जपून ठेवलेला श्वास
आत्मा नाही परत... जडवलेल्या श्वासाचा

अंधार फार झाला वणवातील वास्तव शोधताना ..करपलेली जमीन त्यावरील गवत नष्ट झालेली सोबत जगण्याचे स्वप्नही इवल्याश्या रोपट्याची संघर्ष आता फक्त मनातील करपलेल्या काळा पडलेल्या स्वप्नातील डोळस वास्तवाशी 
हातात आणि अनवाणी पायासोबत 

अंधार फार झाला दिशा शोधताना विकासाच्या ठेवा जपलेला वर्षानुवर्ष संस्कृतीच्या नावे वास्तवात माती झाली मानवतेची पावलो - पावली जपून ठेवली शौर्य आपले.. माझ्या अस्तित्वाचे गणिते दिशाहीन अवास्तव- वास्तव जगात 

अंधार फार झाला आता 
उजेडाच्या दिशेने.... 
अंधार फार झाला आता !!


                ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- अंधार
आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद !!

शुक्रवार, ९ जुलै, २०२१

वारी आनंदाचा सोहळा.... वारी आत्म्याचा उत्सव.....

  वारी आनंदाचा सोहळा.... 
             वारी आत्म्याचा उत्सव.....

             विठ्ठल हे युगे अठ्ठावीस पंढरपूर विटेवर उभे आहे असे म्हटले जाते.पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत पंढरपूरचे विठ्ठल मंदिर आहे. महाराष्ट्राचे एक चिरंतन स्फूर्तिस्थान आहे. गोरगरिबांचा देव म्हणून प्रसिद्ध आहे.

      वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ आहे.वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढीवारी. अनेक जाती धर्माचे लोक अतिशय श्रद्धेने वारी करतात. वारी हा एक आनंदाचा सोहळा असतो. श्रद्धेचा सोहळा असतो. वारी आत्म्याचा उत्सव असतो. 

      डोळ्यातील श्रद्धेला विठ्ठल डोळ्यांचे दर्शन म्हणजे एक अभूतपूर्व अलौकिक,अकल्पनीय आत्मिक आनंदाचा सोहळा असतो. 

वारी विठ्ठलाची 
वारी पंढरपूरची 
वारी परंपरेची
वारी श्रद्धेची 
वारी अभंगवाणीची 
वारी निसर्गरम्य वातावरणात 
स्वतःला हरवून जाण्याची 
वारी मुक्तीची 
वारी आस्थेची
वारी विटेवर उभा 
असलेल्या विठ्ठलाची  
वारी आनंद सोहळ्याची
वारी तत्वज्ञानाची
वारी आत्मिक सुखाची 
वारी वैश्विकविचार समृद्धीची



        महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये वारकरी संप्रदायाचे खूप महत्त्वाचे योगदान आहे. भक्तिमार्गातून उपेक्षितांच्या प्रश्नांना वाचा देण्याचे स्त्रियांच्या अंतकरणात निर्माण करण्याचे कार्य वारकरी संप्रदाय यांनी केलेले आहे. 


             महाराष्ट्राची अस्मिता जागृत ठेवण्याचे थोर कार्य वारकरी संप्रदायातील संतांनी केलेली आहे. तत्वज्ञानाची विवेक परवा योग्याची निरामयता संतांचे भूतदया आणि साहित्याची सौंदर्यदृष्टी हे गुण त्यांच्या ठिकाणी एकरूप झालेले आहे.


            संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे आपले मत मांडताना म्हणतात,"पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाच्या मुख्य आचारधर्म होय ज्ञानदेव पूर्वकालीन प्रथा आहे किंबहुना वारकरी नावाच वारी मुळे पडले आहे वारीतून या संप्रदायाची सामाजिकता आणि  समाजभिमुखता स्पष्ट होते वारीची परंपरा सर्व संतांनी जतन केलेली आहे".

          भारतीय परंपरेमध्ये बुद्धिप्रामाण्य बाजूला जाऊन ग्रंथप्रामाण्य मानले जाऊ लागले. कर्मकांड अंधश्रद्धा जातीपातीच्या नावाखाली भेदाभेद या सर्वाचा परिणाम म्हणजे कर्माधिष्ठीत समाज व्यवस्थेऐवजी वर्णव्यवस्था समाजामध्ये वाढीस लागली.

        तेराव्या शतकामध्ये वारीची सुरुवात झालेली आहे. संशोधक म्हणतात वारी मध्ययुगातील प्रारंभ काळा सुरुवात झालेली आहे. पायी केल्या जाणार वारीला अतिशय महत्व आहे. ज्ञानेश्वर यांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातीच्या समाजाला एकत्रितपणे सामील करून घेतले वारीचे स्वरूप व्यापक केले. संत एकनाथ संत तुकाराम महाराज यांनी संतांनीही ही परंपरा पुढील पिढीपर्यंत आणणे जनसामान्य जनतेपर्यंत महाराष्ट्रव्यापी केली.

         वारी या शब्दाचा अर्थ यात्रा नियमित फेरी व्रत येरझारा असा होत. वारकरी संप्रदायाचा आचारधर्मनुसार संप्रदाय अनुयायांनी प्रतिवर्षी दोन वेळा वारी करणे आवश्यकता आहे. एक म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीस व कार्तिक शुद्ध एकादशीस श्री विठ्ठलाची वारी पंढरपूर क्षेत्री जाऊन केली पाहिजे. प्रतिवर्षी किमान एकदा तरी वारी करणे ही वारकर्‍यांची मुख्य साधना होय.




             आधुनिक तंत्रज्ञान युगातही वारीला अतिशय महत्त्व आहे.ज्ञानेश्वरांनी वारीचे जे रोपटे लावलेले आहे ते आज वटवृक्ष झालेली आहे. परिस्थिती कोणतीही असो वारकरी संप्रदाय वारी करतो. आज जागतिक महामारीच्या काळात वारीला थोडी विश्रांती आहे. पारंपारिक वारीतील नियमांना थोडे बाजूला करून आजही वारकरी पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेत आहे.
 " पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय", हे घोषवाक्य ऐकू येत आहे.
  



           वारकरी संप्रदायामध्ये तुळशीच्या माळेला अतिशय महत्व आहे . गोपीचंदाच्या टिळा कपाळी असतो. वारकरी संप्रदायातील वारकरी नित्यनेमाने हरिपाठ करीत विविध संतांच्या ग्रंथाचे वाचन करीत असतात. अभंग किर्तन भजन अशा विविध स्वरूपात श्री विठ्ठलाचे गुणगान करीत आणि सामाजिक प्रबोधन करीत पंढरपूर वारी करतात.

      
             वारकरी संप्रदायाची दीक्षा म्हणजे 108 मण्यांची तुळशीची माळ घेऊन दीक्षा देणारे प्रमुखाकडे घेऊन जायची ती माळ ज्ञानेश्वरी बरोबर ठेवून प्रतिवर्षी पंढरीची वारी करण्याचे वचन दीक्षा घेऊ इच्छिणाऱ्या कडून घेतो. वर्षातून एकदा तरी वारी केलीच पाहिजे असे वचन घेतो आणि काही नियम आचरणात सांगितले जातात.
. सत्य बोलावे.
२. परस्त्रीला मातेसमान मानावे.
३. कांदा लसून व मांसाहार करू नये.
४. मद्यपान वर्ज्य करावे.
५. रोज हरिपाठ करावा तसेच रामकृष्णहरी या        मंत्राचा जप करावा.
६. प्रपंचातील कर्म श्री विठ्ठल स्मरण करीत पार।      पाडावी.

             हे सर्व नियम पाळण्याची कबुली करून ज्ञानेश्वरी वर ठेवलेली तुळशीच्या मण्यांची माळ तो भक्त उचलतो आणि पुंडलिक वरदा हरी विठ्ठल या गजरात गळ्यात घालतात. वारकरी संप्रदायामध्ये गळ्यात माळ घालने म्हणजे एक नवा अध्यात्मिक जन्म घेणे असे मानले जाते. 


पालखी सोहळा




          वारकरी संप्रदायाने साधा सरळ डोळस परमार्थ सांगितलेला आहे. गळ्यात तुळशीची माळ घालून हळूहळू सांसारिक सुखातून बाजूला होऊन विठ्ठल भक्तीने एकरूप होतात. पंढरपूरची वारी आणि पालखी सोहळा आपल्या संस्कृतीला एक महत्त्वाचे अंग आहे.

        ज्ञानोबा आणि तुकाराम दोघांच्याही पालखी निघत असतात. निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताबाई जनार्दन एकनाथ सावतामाळी रामदास स्वामी या साधूंच्या पालकही दर्शनासाठी पंढरपुरात येतात.




 पालखी रथ

         पालखी सोहळा पंढरपूरला घेऊन जाण्याचे काम खिल्लारी बैलांकडे असते. ही  खिल्लार बैल आपल्या खांद्यावर रथ ओढत नेऊन हा प्रवास करतात.

      पंढरीची वारी व पालखी सोहळा आपले विचार मांडताना ,'विश्वनाथ कराड म्हणतात,"   आषाढ कार्तिकीच्या वेळी पंढरीच्या वारीला केवळ महाराष्ट्रारातच नव्हे तर इतर अनेक प्रांतातून लाखोच्या संख्येने आलेला हा जो भक्तिरसात डुंबलेला निष्ठावंत श्रद्धाळू वारकर्‍यचा प्रवाह दिसतो तो पाहिल्यावर मला असे वाटते की खऱ्या अर्थाने सर्व्व जाती-धर्माच्या पुढे जाऊन समाजातील सर्व घटकांनाा यारे यारे लहान थोर ।याती भलते नारी नर।। करावा विचार नलगे ।चिंताा कोणासी।। असेेे आवाहन करणारा मानवधर्मी वारकऱ्यांची ही परंपरा खरोखरच संपूर्ण मानव जातीला कल्याणचा सुख समाधान व शांतीचा मार्ग दाखविणारी आहे".


भजन

            वारकरी संप्रदायात वारीतील  भजन कीर्तन अतिशय महत्व दिले गेले आहे. टाळविणा पखवाज तबला मृदंग या वाद्यांसह भोजन मोठ्या उत्साहाने केले जाते. भजन म्हणजे आनंदाची पर्वणीच असते.  






 कीर्तन 

         कीर्तन समाज प्रबोधन घडवून आणण्याचे वारकरी संप्रदाय मध्ये किर्तनाची सुरुवात झाली. वारकरी कीर्तन हे सांस्कृतिक लोकशाहीची पायाभरणी ठरली."नामदेव कीर्तन करी पुढे देव देवांचे पांडुरंग। जनी म्हणे बोला ज्ञानदेव अभंग।। " संत नामदेवांनी पासून या परंपरेला सुरुवात केलेली आहे.विठ्ठल भक्ती च्या माध्यमातून तळागाळातील समाजाला जागृत करण्याचे काम या माध्यमातून केले जाते. 

          कीर्तन भजन हे अशी दोन माध्यमे आहे. त्यामुळे मनाचा आत्मविश्वास तर वाढतोच आत्मीयता ही वाढते आणि सोबत पारंपारिक साहित्य कलेचा वापर करून नवीन सामाजिक व्यवस्थेचे प्रश्न समाजापुढे मांडली जाते. त्यातून उत्तर शोधले जातात. पारंपारिक साहित्याचा ठेवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहज दिले जाते. 



रिंगण /गोलरिंगण 




            वारीचे मुख्य केंद्र वारीतील रिंगण असते. रिंगण ही एक पवित्र संकल्पना आहे. कडूस,फाटा,वेळापूर, वाखरीत रिंगण होते. ठरविल्याप्रमाणे मैदानात वारकरी एकमेकांचे हात धरून गोलाकार उभे असतात. यातील मोकळ्या जागेतून माऊलींचा अश्व धावतो .या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ होतात. अशी धारणा वारकरी संप्रदायामध्ये आहे. डोळ्यांचे पारणे फेडले जातात; इतका सुंदर रिंगण सोहळा पूर्ण होतो.  रिंगण सोहळ्यानंतर रिंगण मार्गाची माती माथी लावण्यासाठी भाविकांची गर्दी उसळते.

 रिंगण 
अश्व धावतो रिंगणात 
भक्त धावतो भक्तीत 
पावलांचे ठसे उमटते आत्मशक्ती 
खांद्यावर यशाची पताका घेत 
युगानुयुगे चालती 
पंढरपूरी श्री विठ्ठलभक्त 
आपल्याच मग्न धुंदीत
ताल, मृदुंग, टाळ वाजवीत 
अभंगवाणी सोबत... 
पंढरीचा विठ्ठलसोबत असती 
भक्त सख्यासोबती 
बाहेरील रिंगणासोबत 
अंतरंगी परमात्म्याच्या रिंगणात 
विठ्ठलभक्त!!



धावा

             वारकरी संप्रदायाचे वारकरी वेळापूर पासून पंढरपूरपर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात. धावा म्हणजे धावणे असा होतो. संत तुकाराम महाराज पंढरपूरला पायी जात असताना वेळापूर येथील छोट्याशा टेकडीवरून विठ्ठलाचे दर्शन झाले आणि विठ्ठल दर्शनासाठी वेळापूर पासून पंढरपूरपर्यंत धावत गेले. संत तुकाराम महाराज यांचे स्मरण करीत वेळापूरपासून पंढरपूर पर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात.


               वारकरी संप्रदायाने परमेश्वराचे अस्तित्व आपल्या घरात माजघरात आणि शेवटी मनाच्या गाभाऱ्यात शोधत असतानाच विश्वव्यापक चराचर सृष्टीचा मंगलमय जीवनाचे तत्वज्ञान सहजपणे सांगून जाते. हे विश्वची माझे घर ही संकल्पना मनामध्ये रुजविली जाते. हा वैश्विक विचार जगापुढे मांडला जातो तोही अगदी साध्या सरळ आणि व्यापक स्वरूपात मानला जातो. वारकरी संप्रदाय भक्ती पंथ आहे. कुठलाही तत्वज्ञानात पांडित्याचा प्रपंच नाही.

          भक्तिरसात संत परंपरा अनुभव हेच त्या तत्त्वज्ञानाचे अंतिम प्रमाण आहे. वारकरी संप्रदाय यांनी भक्तीला कुठल्याही रंगरूपात बंदिस्त करून ठेवली नाही. अध्यात्मिक धुरा समर्थपणे खांद्यावरून घेऊन पुढे नेली. महाराष्ट्राची अस्मिता जागृत करण्याचे थोर कार्य वारकरी संप्रदायातील संतांनी केले संत एकनाथ यांनी साहित्यातील लोकशिक्षकाची भूमिका पार पाडली. तर संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून तळागाळातील सामान्य माणसापर्यंत वारकरी संप्रदायाचा प्रचार केला.

              संत ज्ञानेश्वर संत नामदेव त्यांच्या पूर्वी वारकरी संप्रदाय अस्तित्वात होता.  संशोधकांच्या मते वारकरी संप्रदायाचा उगम भक्त पुंडलिकापासून मानला जातो. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांचा कालखंड वारकरी संप्रदायासाठी  सुवर्ण काळ होता. 


संत ज्ञानेश्वर



             संत ज्ञानेश्वरांनी वसुधैव कुटुंबकम या भारतीय वेद परंपरेशी जोडणारा ज्ञानेश्वरांनी  मंदिराच्या बंदिस्त गाभार्‍यात नव्हे तर शेताच्या बांधावर बसून द्वैत अद्वैत सिद्धांत कुट तत्वज्ञान सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत समजावून सांगितले. 
           साध्या सरळ सोप्या मराठी भाषेत पारंपारिक शिक्षण जनतेला सांगितला आहे. त्यांचे तत्वज्ञान विचार संपूर्ण महाराष्ट्राला आपलेसे वाटला आणि मग श्री ज्ञानोबाच्या दिंडीत अवघा समाज एकत्र लोटला. यातून वारकरी संप्रदाय उदयाला आला आणि पुढे नामदेवांपासून ते तुकारामांपर्यंत वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान रुजविण्यासाठी योगदान दिले.
       ज्येष्ठ संशोधक डॉ. रा. चि. ढेरे म्हणतात," संत ज्ञानदेव हे सर्वार्थानी मराठी अस्मितेचे आद्य शिल्पकार आहेत आणि त्याच वेळी ते प्रदेशाच्या भाषांचा जातीच्या-धर्माच्या सीमा सहजपणे ओलांडून जाणारे विश्वात्मभाव उरी वागविणारे महामानव आहेत." 
             डॉ. रा. चि. ढेरे यांनी ,"मराठी अस्मितेचे आद्य शिल्पकार संत ज्ञानेश्वर असून विश्वाच्या भल्याचे  हित जाणणारे ते महामानव आहेत असा संत ज्ञानेश्वरांचा उचित गौरव केला आहे".


संत नामदेव



             सगुण भक्तीत रमणाऱ्या व समाजाला
मानवतेची शिकवण देणाऱ्या भाववेड्या संत नामदेवांनी भागवत धर्माची पताका पंजाब पर्यंत मानाने फडकविली. त्यांची अभंगवाणी म्हणजे त्यांच्या भाव वेड्या उदात्त प्रसन्न निष्पाप सोज्वळ अशा व्यक्तीमत्वाचे आविष्कार होय. संत नामदेवाने विविध जातीपाती गरीब-श्रीमंत भक्तांना पंढरीत एकत्र आणले. आपण सर्व एकच आहोत. असा एक आत्मविश्वास विठ्ठलाच्या भक्तांना दिला.


             हे वि इनामदार म्हणतात," नामदेव हे थोर भक्त होते तसेच ते कुशल संघटकही होते वारकरी संप्रदायाच्या संघटनेचे कार्य त्यांनी 
ज्ञानेश्वराच्या हयातीत तर केलेच पण ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यानंतरही पन्नास वर्ष महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर नामदेवाने विठ्ठल भक्तीचा ध्वज फडकविला." 
     नामदेवांच्या अभंगात नाद लय तालाचा अपूर्व संगम आहे.


संत एकनाथ



          संत जनाबाई यांनी भागवत मंदिराचे चित्र रेखाटताना जनार्दनी एकनाथ खाब दिला. भागवता असे एकनाथाचे कार्य गौरविले आहे.

       संत एकनाथांच्या काळात ,"ज्ञानेश्वरी हा ग्रंथ दुर्मिळ झाला होता. त्यांनी संशोधन करून शुद्ध प्रत तयार केली. प्रपंच आणि परमार्थ संस्कृत आणि प्राकृत सुशिक्षित आणि अशिक्षित भक्तिप्रधान सात्विक कविता व शृंगार वीर हास्य प्रधान आख्यान कविता केवळ तत्वज्ञानावर ग्रंथ व सर्व सामान्य जनांच्या भाव-भावना रंगविणाऱ्या लोककथा या सार्‍यांची सुंदर  सांगड संत एकनाथांनी घातली".



 संत तुकाराम



         
            तुका झालासे कळस असा तुकोबांचा महिमा संत बहिणाबाईंनी गायिला आहे. संत तुकाराम महाराजांचे अभंग महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता जागतिक पातळीपर्यंत पोहचलेला आहे.  संत तुकाराम यांच्या इतका उंचीचा थोर पुरुष वारकरी संप्रदायात झाला नाही.  म्हणून त्यांना कळसाची उपमा दिली जाते.

            वैयक्तिक आपत्तीमुळे विरक्त वृत्तीने संत तुकाराम महाराज राहत असे आणि त्यातच त्यांनी संत नामदेव यापासून प्रेरणा घेऊन रचना करण्यास सुरुवात केली. त्यांची अभंगरचना सरळ सोपी रसाळ ओघवती भाषा होती. 


           अशिक्षित वारकऱ्यांच्या मुखातून ती अव्याहत पणे ओसंडून वाहत असे. त्यांची अपार भक्ती श्री विठ्ठलावर होती. विशाल सागराप्रमाणे त्यांचे अभंग वाणी रचना आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ त्यांचा वारसा संत तुकाराम महाराज यांना मिळालेला आहे. 

           पंढरीची वारी जनसामान्यांपर्यंत लोकप्रिय करण्याचे काम तुकाराम महाराजांनी केले आहे. तुकोबा नंतर त्यांचे शिष्य निळोबा यांनी वारकरी संप्रदायाची धुरा समर्थपणे सांभाळली.


         एकनाथ, गोराकुंभार,जनाबाई,चोखामेळा तुकाराम,दामाजी,नरहरी,सोनार,नामदेव निवृत्तीनाथ, बंका,भागू,मुक्ताबाई, राका,कुंभार सखु,सावतामाळी,सोपानदेव, सोयरा, कान्होपात्रा जनाबाई,वेणाबाई आणि आक्काबाई आदी यांनी वारकरी संप्रदायाचा समर्थपणे आपल्या भक्तिमार्गाने  समोर नेली.

परतवारी

         वारी ही महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरु होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक पदयात्रा होय. विठ्ठलाचे दर्शन झाले की वारी परतवारी मध्ये रुपांतरीत होते. वारी सगळ्यांनाच माहीत आहे; परतवारी ही खूप लोक खूप कमी लोकांना माहित आहे. कारण वारी करताना एक शिस्तबद्ध पद्धतीने त्यांचे आयोजन केले जाते. उत्स्फूर्तपणे प्रतिसाद पावलापावलांवर जागोजागी मिळत असते.  सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. मात्र परतवारी मध्ये अतिशय कष्टमय प्रवास असतो. विठ्ठल दर्शनाच्या ओढीने जाणाऱ्या वारीला प्रसिद्धीचे झालर आहे;  पण 
त्याच परतवारीला मात्र लाट ओसरून गेल्यानंतरचे वातावरण मिळते.  तरीही भक्तवारी करतात.  वारीसोबत विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आणि परतवारी सोबत विठ्ठल दर्शनाने तृप्त झालेला आत्मा समाधान सुखदआनंद दुःखाचे कुठेही गराने न मांडता वारकरी आपला परतवारीचा प्रवास करतो. त्याच उत्साहाने त्याच श्रद्धेने परतवारी चालू होते.

विठ्ठला तुझे दर्शन झाले
थकलेला विठ्ठल भक्त क्षणात 
आकाश संचार करीत असतो 
विठ्ठल दर्शनाने आणि परत चालू होतो परतीचा प्रवास...
विठ्ठल दर्शनाने जड अंतकरणाने 
जडपावलांनी निरोपाचा दिवस 
आणि परत एक वचन 
गळ्यात तुळशीची माळ 
हातात टाळ मृदुंग घेतो 
वारी करण्याचे ...
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल....


         विठ्ठल भक्तीचा प्रसाद म्हणजे प्रेम श्रद्धा आपुलकी आणि आपलेपण होय. विठ्ठल भक्तीची शिदोरी घेऊन वारकरी परतवारीचा प्रवास चालू करतात. वारकरी संप्रदायाला लोकप्रियता मिळाली. त्याचे मुख्य कारण म्हणजे सर्वसामान्य जनतेपर्यंत त्यांच्या भाषेत पोहोचलेलं अध्यात्मिक मार्ग होय. यातूनच समाजामध्ये वारकरी संप्रदायाबद्दल जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. प्रेम भक्ती सदाचार नीति श्रद्धा आणि कुठल्याही कर्मकांडाचा वापर न करता फक्त एकच नियम वारकरी संप्रदायाने आपल्यामध्ये निर्माण केला. तो म्हणजे विठ्ठल भक्ती!

          वारकरी संप्रदायामध्ये संकुचित विचारसरणीला जागा दिले गेले नाही.  त्यांची श्रीमंती फक्त विठ्ठलभक्ती मध्ये आहे. यांचे विचार त्यांच्या भावना श्रद्धा यामधील श्रीमंती आहे.
वारकरी संप्रदायाने एक विशेष महत्व दिले. ती म्हणजे स्थानिक भाषा विठ्ठल भक्ती ही श्रद्धा श्रद्धा आणि श्रद्धा श्रद्धेची बारीक रेषा कुठेही ओलांडली नाही. त्यांनी अंधश्रद्धेला धारा दिले नाही. बौद्ध,जैन,महानुभाव पंथ  यांनी ज्याप्रमाणे स्थानिक भाषेला अधिक महत्त्व दिले.त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायांनी दिला.

               बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाचे केलेले वर्णन वारकरी संप्रदायाचा पारंपारिक इतिहास सुबक शब्दात मांडलेला आहे.  वारकरी संप्रदाय हा सर्वसामान्यांचा आत्मा आहे.  विठ्ठल त्या आत्माचा केंद्रबिंदू आहे.  त्या केंद्रबिंदूची शिकवण ही मानवतेवर आधारीत आहे. म्हणून आजही त्याच भक्तिभावाने, त्या जल्लोषाने आणि त्याच श्रद्धेने नियमांचे पालन करीत वारी केली जाते. वारीचे रूप पाहता मनात येऊन जाते...           .....वारी आनंदाचा सोहळा...
           ...वारी आत्म्याचा उत्सव....!!


                    ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे


©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- वारी आनंदाचा सोहळा.... 
             वारी आत्म्याचा उत्सव.....

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका 


**************************************************************************






   


मंगळवार, ६ जुलै, २०२१

***प्रवास आठवणीचे रूपे विविध स्वरूपातील रूपे आठवणी**

***प्रवास आठवणीचे रूपे 
विविध स्वरूपातील रूपे आठवणी**




          थंडीच्या गोडवा अनुभवताना मनाला एक सुखद आनंद पण मिळतो खरा! पण खरंच का आनंद अनुभवताना मनात एक दुःख सतत मनात राहून जाते तो म्हणजे आपण दूर होत असलेल्या आपल्या काव्य प्रवासापासून नव्याने गंध आनंदाने भरत आहे नव्या रूपात नव्या शब्द ढंगाने नव्या कल्पनांना आणि संवेदनेतील सहवासातील तरंगत भावविश्वाचा! कधी आशा तर कधी निराशेच्या या दिशा वेदनांचे उमललेली परिपूर्ण  क्षणिक भावना. वेगळं पण आपलेपणाने....संवेदना. विविध रंग... विविध रूपात ....विविध हिशोब छटांनी उमटलेली! 

हिरव्यागार रानामध्ये हिरवे रुप 
हलके  रूप हलके स्वरूप 
नव्या रूपातील नवी स्वरूप 
उमटलेले क्षणी वेगळ्या
.... वैभवाचे गाणे !!



       वेदना जन्म घेतात. पाखरांच्या भरारी पेक्षाही वेगवान स्वरूपात आणि उमटलेल्या संवेदनांना शब्द स्वरूप देतात. काळोखातील काळोखाला प्रकाश किरणाच्या आनंदमयी खळखळत स्वरूपात जिव्हारी लागेल. असे शब्द प्रतिसाद संवेदनांचा रचनात्मक विश्व नको असलेल्या प्रतिसादाबद्दल  वावरण खरंच आयुष्याच्या या प्रवासाच्या मुळात संवेदना अति महत्त्वाच्या असतात असे वाटत राहते. पण दोष कुणाला द्यायचा कळत नाही..... विचारांची देवाण-घेवाण मनातील देवाण-घेवाण.... ऋणांची देवाण-घेवाण.... आपलेपणाची देवाण घेवाण आणि समजदारीची देवाण-घेवाण... जिव्हाळा पलीकडील मानसिकता असलेली माया ....मागे खुणा सोडत असलेली कदाचित!! उमटलेल्या खुणा काल्पनिक असल्या तरी मागे सोडवत नाही.



       असे स्वरूप स्वप्नामागील विश्वात....उद्देशहीन. चिखलाने बरबटलेल्या  प्रतिसाद शून्य विचार थेट रचनापलीकडे.
    असो अपेक्षा खूप असतात. प्रतिसाद मात्र कमी असतो. वर्तमान आपले असतात. विश्व आपले असतात. भविष्य आपले असतात. नवे रूप आपले असतात. 

            रिता आयुष्यातील चाललेला सागरी अश्रूंवर प्रतिबिंबित होत असलेला आठवणींवर नयनातील दरवळते रूप. नवीन रोपंचे!  नवीन रूपासोबत... वेदनांची व्यथा... विस्मरणाची वाट पाहत मागे सोडवीत. वेगळे रूप आणि वेगळे आव्हाने !


काहीतरी सुचतानां काहीतरी वेगळे स्वरूप विचारांची क्षितिजे  सुखाची  किनार रूपे 
भोवती असती वैभवातील स्वरूपे 
सुखावतील मनाला सुखाचे रूपे 
घेती दिशासागरांचे 
प्रवास आठवणीचे रूपे !!

                दिनांक - 19.12.2014

                   ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-***प्रवास आठवणीचे रूपे 
        विविध स्वरूपातील रूपे आठवणी**

अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू


*************************************

 

आपल्यासोबत दिशेने भिजवणारा

** आपल्यासोबत 
       ... दिशेने भिजविणारे **



       जीवनात किती वळणे येतात की आपण त्या वळणावर आडोशाला नको असते. पण तो भिजवितो असतो आणि ते आपणच असतो. आपल्या होऊन सावली मधील दिशेने भिजवणारे कोवळ्या उन्हात नकोच असतात ते सर्व पण येत राहते. समोरील दिशेने रोखून .... एका वळणावर!


       अचानक एक वळण उदासवाणे हसरा चिंब आनंदाने, भिजलेले! तरी सोबत किती इंद्रधनुष्याच्या दिशेने जाणारे अलगद एकटेपणाला सुवासिक सुगंधासोबत भिजवत वातावरणातील गारवा मनाला भिजवित नाही असे होत नाही. पण दूर मनाच्या सोबतीला आपण किती जवळ घेऊन जातो ...दूर मनाच्या क्षितिजाला समाधानाच्या सोबत तिची सोबत हवी असते पण ती बाहेरच्या वळणावर शोधली जात नाही. आता  भिजवित जाते उभ्या असलेल्या आडोशाला.

अर्थ असावे अर्थहीन नसलेले 
हळवे क्षण आणि हळव्या वाटेले 
मोल जीवनाचे स्व वाटेतले



           झाले असेल तरी अचानक हळवे होणे किती समोर धुके डोळ्यासमोर देऊन जातात आणि शोधू पाहता नको असलेल्या नाजुक रेषा तळपावले कुठे घेऊन जातात कळत नाही.  नजरेसमोर कोवळे ऊन बसलेल्या जागी  रोज पाहात असतो. 

         रोखून धुकांच्या छायेमध्ये आणि धुकांच्या ऊन सावलीमध्ये. असेच झाले , "सांगा वाटा कुठे आहे परतण्याच्या", वेगवेगळ्या रांगामध्ये... वेगवेगळे स्वरूप... परतण्याच्या सर्व वाटा सोप्या?

       सर्व सोपे असेल तर ढगांचा पाऊस कुठे आणि कुठे पडत असतो माहित नाही. घडणारे घडत असते असे म्हणे सोपे असते... पण पाऊस त्यात सर्वच भिजून जातात आणि हाती शिल्लक राहतो. 

        फक्त पाऊलखुणा आणि ओला चिंब झालेली दिशा... दिशेने ओली पावले... हिरवेगार अंदाज ठामपणे  पोकळीत उगवत्या सूर्याच्या किरण घेऊन असे अंदाजे !!!

    सतत विचारी ओल्या पाऊस 
    कधी हसरा तर कधी नकोसा 
    वाटेत कोडे सोबत


      प्रति शब्दांच्या साखळीमध्ये कधी नको असे वाटत नाही...  आपण अशा वातावरणात जगत असतो की, नवीन रोज नवीन.. सतत नवीन ...नाळ कुणाबरोबर जोडत असतो. आणि विविध स्वरूपात जीवनशैलीमध्ये वेळोवेळी आत्मसात करीत असतो.  मनमोकळे करीत असतांना निवांत चेहऱ्याने भिजवणारा विचारांना प्रभात वेळी शांतचित्ताने हसरी सकाळ मनाला वेड लावून जातात. रानमोळी पायवाट आणि रानोमाळी हसरे पायवाट.



      कितीतरी वळणे येत असतात. उगवता सूर्य प्रकाशाबरोबर आणि मावळता सूर्य प्रकाशाबरोबर.  कितीतरी वळणे येतात. वळणावरून वळताना समोर येऊन सहज म्हणतात... बघ माझ्याकडे वेळोवेळी तसे करायचे पण जीवनाच्या भिजवणारा वाटांना वाटेवर चालू द्यायचे नाही... घट्ट धरून ठेवावे. जीवन वाटेवर हसरा भिजवीणाऱ्या वळणदार समोर असलेल्या वेदनेची चाहूल न देता वळणावर सतत पुढे चालायचे सदा हसत... हसत आणि हसत. पुढे आल्यावर त्या जीवनाला संधीचे स्वरूप द्यावे ; ओळखून.


     अनेक रस्ते गुंफतात येतात. गुंफावे लागते ते!! अडचणींनी फुललेल्या दिशा भिजवीणारी सावली न भिजवता सोडवीत जावे लागते. आपल्या समोरील आपल्यासोबत उलगडत असते .दिशेने ओलाचिंब मायने फुललेल्या मायेने... कोरडे होऊन.... ओल्यागार प्रीतीचा निवांत उत्साहित भिजवणारा.... 


थकलेल्या पायवाटेवर रस्ते अनेक
अशांती आणि अशांतीचे रूप अनेक 
अनंत प्रयत्नांची साखळी अनेक 
तरी पायवाटेवर जागोजागी अनेक 
मायेने फुललेले क्षण अनेक 
आपल्यासोबत ...
दिशेने ...
भिजवणारे ...
उत्साहित आणि हसविणारे !!

       फुलत... फुलत...धावल्यानंतर, निवांत शांत मनस्वी मायवाणीने भिजविणारे !!
                  
                          दिनांक -१५.१.२०१५

                 ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- * आपल्यासोबत 
                  ... दिशेने भिजविणारे **

      अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you

----------------------------------

नको प्रतिक्रीया रिमझिम

*** नको प्रतिक्रीया रिमझिम ***




       रोज नियमितपणे एवढी मात्र गोष्ट केली जाते ती म्हणजे प्रतिक्रिया देणे.  कुणाला ती बोलकी घ्यावीशी वाटते तर कुणी ती मूक देत असते. अंतरंगाच्या वळणावर पाहणे जरी वेगळे असले तरी संवेदना मात्र वेगवेगळ्या होतात. सोबतीच्या नात्याला सुवास उडून जातो... सफलतेचे शिखरावर असताना जीवनावर मात्र वेगळीच !

    त्याच नवीन वाटेवर जाताना जुन्या संस्कारांना मात्र मागे सोडवित नाही. आपल्या मधील नवनिर्मितीचे गाव मागे पडत आहे. हे त्याच्या लक्षात सुद्धा येत नाही. चित्तातील संवेदना वेगळ्या असल्या तरी छत्रीत भिजण्याचा मोह मात्र सुटत नाही. समजून घेतले तर समजून घ्यायचे आणि नव्या वाटा संग्रह बरोबर मनात नवीन फुगडीचा खेळ चालू होतो. 


               नव्या क्षणीपरत आता दुसऱ्या क्षणी जुन्या संस्कारांना प्रभावित करीत असते. तेव्हाच तर मनावरील भाबडे भाव मात्र प्रती क्षणी वेगवेगळी होत जातात. मन स्वभाव वेगवेगळी असतात जीवनातील अशांतता वेगवेगळी असतात. मन कधीही अर्धा वाटेवर आपली प्रतिक्रिया देत नाही. 




                     काही ते इतक्या कोवळ्या रूपात देतात की त्यांचे शब्द मात्र त्यांनाच हवे असते. कुणाला मात्र ते नको असते. त्यांचे डोळे... त्यांचे शब्द... त्यांचे चेहऱ्यावरील भाव... आशा-आकांक्षा... घाबरट पण अतिआत्मविश्वास... ते लक्षात सुद्धा येत असेल तरी समोर एक धुकं पांघरुन कोवळ्या ऊन धारेबरोबर वादळी होतात आणि सांगत राहतात.  
              मनाला अतितीव्रपणे," मी असा आहे... "रोखून धरलेल्या नजरेने विचारत उरलेल्या शब्दांची धारदार कात्रीशब्दमाळेबरोबर विसरलेल्या प्रत्येक क्रियांबरोबर शांतीपूर्वक निर्मळ मनाचा एक रहस्यमय विसरलेल्या क्षणासोबत!




    नयनातील भावा हे मुक्तपणे प्रतिक्रिया व्यक्त करत असले तरी संग्रहाची वेळ... संग्रह करण्याची वेळ... संग्रह शब्द देण्याची, वेळभाव...चुकले की ते नकोच असते पण ती रिमझिम देऊन जातात समजून आणि नसमजून. प्रति क्षणी आपली प्रगतीक्षणी.  


           काही क्षणी  ओलावून जातात आणि काही शन अनोळखी होत जातात.नवीन- जुन्या साखळीमध्ये फुलांचे क्षण फुलतात पण कितीही नको असलेल्या प्रतिक्रिया इतका सहज आणि इतक्या खुलेपणाने देऊन जातात. त्यांना नको असलेले शब्दही आपल्याला देत राहतात. 

लालबुंद झालेल्या चेहऱ्यावरील 
हसू मात्र गोड असतील 
असे नव्हे !!!


       वाटेचे गणित काय असावे कळत नाही. इतके बोलके नयन हे सतत भिजवणारे..... भावनेतील... मूक वेदना आणि वेदना नसलेल्या नात्याला परत वेदना असल्यासारखे भासत राहणे हे वेगळे स्वरूप!  

          आल्या वेदना त्यांना समोर जावे लागते पण खरंच, त्या वेदना नको असतात. त्या नको असलेल्या वेदना मुक प्रतिक्रिया देत राहते.



     संवेदना खूप असतात. परिसंवाद खूप असते. घटत जाणारे... वाढत जाणारे.. सुखद दुःखद...अलिप्त... अनंत अडचणीचे... झपाट्याने गेलेल्या त्या वेळेला आपण साक्षीभावाने बदलत जात असतो. त्याला आपल्या गरजेनुसार बंधनमुक करीत राहावे लागतेच. प्रयत्नांना नकोच असतात. दुःखद संवेदना दुः खद प्रति प्रतिक्रिया आणि जाणिवा. चमत्कार स्वाभविक असतो की आंधळा समर्थ थोडा वेळ रचनात्मक शक्य असलेल्या जंगलात मन रमत नाही नकळत रमणारे मन आणि परिसंवाद वाचविला जातो .

            येतील तेवढ्या संख्येवर स्वाभाविक दुष्टीने नजर मंगलमय आणि कल्याणकारी होत राहते. जीवनातील सशक्त विचार प्रतिक्रिया मनाला बळ देत असते. जीवनातील विवेकाला बळ देत असते. खोल असते वाद-विवाद वेगवेगळे असते..... आणि नकोच असलेले भाव अति क्षणभंगुर असते.



        जीवन सुखमय संवेदना कधी दुःखमय संवेदना सुख संवेदनाचा मोह तिरस्कार तटस्थपणा प्रगतीचे भाव देत असतात.


 जीवन वाटेवरील संघर्षमय वाट 
 सुखदुःखाच्या वाटेवरील प्रगत वाट 
 असावी लागते वाटेवरील जीवनधारा 
 आणि तसे नकोच असावे वाटे 
 मधील अडचणी..... अलिप्ततेच्या


..... या विचार सागरात आणि प्रतिक्रियांच्या 
मोहमायेत विसरूया; नको असलेले विचारधारेला आणि स्वमुक्ताने... स्वमायेने ...स्वविचारधारेने.... शब्दांचा योग्य फुललेल्या मायरानामध्ये !!!!!
                 
                          दिनांक -१६.२.२०१५


                   ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- नको प्रतिक्रिया रिमझिम 
         आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा. 
     आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
Thank you!! 

*************************************

अनोळखी चेहर्‍यांसोबत जागोजागी!!!

*** अनोळखी चेहर्‍यांसोबत जागोजागी!!!
                      ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

            आयुष्याच्या साध्या आणि सरळ सोप्या वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा इतक्या अटीतटीच्या का होतात हेवा दादांच्या या गणितामध्ये  रमणाऱ्या आयुष्याला आपण समजून किती वेळ घेतो गुंता सतत वाढत जात राहतो सुगंधाच्या दरवळा मध्ये आपला श्वास प्रतिसाद देत राहतो नेहमीच आपण अनोळखी चेहऱ्यांची सवय होत राहते आणि तीच सवय म्हणजे नेहमीच्या प्रतिसादाला सहजता आणत राहते.




           वेगवेगळे चेहरे वेगवेगळ्या प्रश्नांची साखळी वेगवेगळ्या उत्तरांची सोडवणूक आणि वेगवेगळे स्वरूप! गळणाऱ्या पानांवर निसर्गनियम ठरलेला नव्या शब्दाची नवी माळ आणि नवी विश्वाची नवी चाल सोबतीला नव्या ऋतूंची नव्या फुलांची बहरलेल्या विश्वाची हिरवेगार रानातील पांढऱ्याशुभ्र संपत्ती विश्वाची नवीनच पण जुन्या जाणीवेची उगवत्या सूर्याची लखलखता प्रकाशाची नव्या जाणिवेने सोबत घेत रोज किती तरी पावले अलगद गोड आठवणी देऊन जातात.

जाणीव आपली नवीन पहाटेची 
जागोजागी गंध फुललेलेच 
क्षणांच्या सावल्यांमध्ये ठेवलेली 
आणि सरळ साध्या पाय रानातल्या 
हिरव्या गालीच्याची साज चढवलेली


            वेचावेस वाटत राहते ते आयुष्याचे ते क्षण आणि निर्माण करावेसे वाटत राहते ते  क्षण या शांततेसाठी किती प्रयत्न असतो प्रत्येक क्षणांच्या आणि गोड उंच भरारीच्या! 



धावपळ असते पण सुखद 
धावपळ असते पण गोड 
धावपळ असते पण मायेची 
धावपळ असते पण उंच भरारीची


              गोड आठवणीचे तरंग अलगत ओंजळीत देत राहते आकाशातील रंगीबिरंगी चित्रातील   धावपळांयाचे वेचणारे निरागसता आणि काळ्याभोर कोकिळे सारखं उत्साहाने गात रहावे.       
                मनाला फुलवीत रहावे सतत धावपळीच्या या प्रवास वाटेवर आयुष्याच्या वाटा साऱ्या भिजलेल्या असतात.


         वर वर पाहता सारे कसे सुकलेले पण आतून भिजलेले क्षणभर गारठलेल्या पण चिंब भिजलेल्या पानावरती क्षणभर थांबविता आणि जागोजागी वाटेवरती एक सुखद शुभ्र मोत्याची माळ रानफुलांच्या पायवाटेवर जोडून हिरवीगार गालीच्या मध्ये स्वतःचे अस्तित्व देऊन जातात.    
                ओली माती खरंच सुगंधी झाली की वैभवाचे क्षण आपल्याजवळ देऊन जातात. पांढरे सोने सुखात प्रफुल्लित मन करून जातात कुठेतरी पावसाचे अंगावर देऊन जातात. झाडांच्या पाना फुलांवर चिंब आपलेपण भिजवून ठेवतात .




        सांगावेसे वाटते आयुष्याच्या साध्या-सरळ आणि वाटेवर वळणदार थोडा पाऊस अंगणात  वेचतांना माती ओली होत असते. तसे संघर्ष... क्षण भरलेल्या येत असतात मोती देउन सारे कोरडी नाते चिंब भिजून जातात. 

         आकाशातील काळे ढग ले जातात आणि फक्त स्वच्छ आभाळ सामोर डोळसपणे निळ्याशुभ्रपणे आपले रूप दाखवून जातात साधे सरळ वाटणारे अधिक सरळ वाटतात स्वच्छ दिशेने पाऊल ठेवताना.


वेचलेले क्षण साधे असावे 
साध्या असलेल्या क्षणांना 
सोबत हसून ठेवावे 
आणि वेचत रहावे 
कोणत्याही क्षणाला सोडवित 
साधे ठेवावे सुगंधित ठेव ठेवून 
आयुष्याच्या दरवळलेल्या 
अनोळखी चेहऱ्यांसोबत 



   दिनांक - १४.१.२०१५

  
                 ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- अनोळखी चेहर्‍यांसोबत जागोजागी!!!

      अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you


*************************************

हसविणारे हसरे बालपण 😀😀😀😀😀 life......

  ** हसविणारे हसरे बालपण **
      
        आयुष्याचा प्रवास चालता- चालता चालू राहतो.  किती प्रवास तो. लहान वयातील गोंडस खेळकर प्रवास... मनाला आनंद देऊन जातो... आज मनाला अगदी हलकेच पण मनाला अतिआत आनंद झाला.

          त्याचे बोबडे बोल... त्याचे नकळत आनंदाची लयलूट.. त्याचे हसणे... त्याचे डोळे पाणीदार... स्वप्नांची लय नसलेली सुंदरता... स्वप्नांची सुखद झलक... स्वप्नांची असलेली जिद्द आणि जिद्दीने स्वप्नांची दिशा अनुभवत उजेडाला आपल्या कवेत घेत एकंदर दिशा असलेली सुखी प्रवास.



          प्रवासामध्ये खूप शिखर गाठायचे असतात. वाटचालीतील अभिनव वाट शोधावी लागते हे त्यांच्या बालपणाला माहीत नसते. तरीच तो आनंद निर्माण करीत रहातो. नव्या गोष्टी आनंदाने शोधत राहतो. 

         दिशाहीन व अनुभवहिन! निराळे वादळवारे मागे सोडवत.. त्यावर मात करत... आपल्या इवल्याशा ओंजळीत आशेची आणि सुसाटवाऱ्याची भयमय दिशा घट्ट मुठीत ठेवून जिद्दीने आपल्या आनंदमय स्वप्न प्रेमाने आपल्यात आणि इतरांनामध्ये पेरत असतो.





       लढण्याची जिद्द, उत्तेजन दरवळत असते. ठेचा कितीही प्रवासात आला तरी, दिशेनेच चालायचे असते सुसाट वारा आपल्याला आपल्या कवेत घेणार नाही. हवी असलेली आपली ओढ दरवळत असलेली आपल्या हृदयाचा ओलावा प्रेमाने भरलेला. 

               लहान पण असंच असतं निरागस आनंदाने भरभरून वाहत असतो. प्रवासातील आनंदामध्ये रमताना मग चित्र अतिशय सुखद वाटत असते. प्रकाशाची वाट शोधावी लागत नाही मित्रत्वाचे हेवेदावे त्याला कधीच हवे असतात... हरवून गेलेले आपले बालपण प्रवासाच्या आनंदाला भावनेचे मोजून चढवलेले साज. 

         मनात दाटून आलेले मनात कृतज्ञतेचा प्रवास आणि मनाला हसू देणारी पण आनंदित करणारे. हसरे लहानपण खरच सुखद मन शांत करणारे होते... हसू मनाला हसविणारे होते. आपल्या विचारांना वाट आधाराची व्हावी असते.


             आपल्या विचारांना अवांतर गप्पानी भरलेली असते. पण त्यांचे विचार म्हणजे निर्मळ ओंजळीत फुलांचे भरघोस हसूने भरलेले असते. प्रवास रस्त्याने जातांना कौतुकाची बीज पेरत जातो. जमेल तेवढे हसू देऊन जातो. 

            प्रेमळ मायाच्या  झरा शब्दांच्या रुपाने देऊन जातो. नेहमी वाटत राहते की; आपले प्रवास संदर्भ आणि त्यांचे प्रवास संदर्भ इतके निराळे का? ओंजळीत भरलेले.. विचारांनी भरलेले... काटेरी झुडपांचे व्यवहारी सावली आणि हसूने भरलेले मायेचे हसूसिद्धांत.


              मोल असते त्या हसरा हसूला. बळ देत असतो ते हसरे हसू. आनंदित करीत राहते. त्यांचे हसून आपल्यालाच आपल्या बालपणामध्ये आणि हरवून जातो. 

            त्या हसू सोबत ...समजले ...हसून आपल्या सावलीमध्ये अजून आपलेसे करीत असते. हसू अजून ओंजळीत घेत घेत आपण इतके आनंदित होत जातो. आयुष्याचा सुखद आणि दुःखद भावनेला मित्रत्वाचे मोल मायने घेत असते. 

          इतरांच्या फुललेल्या हसूच्या आवाजाने... अटीतटीच्या.. वादाचा व्यर्थ भावनेने... सोपे पण अतिशय सुखद भावनेने मनाचा प्रवास चालू  राहतो... आणि थोडातरी हसूभरला प्रवास आपल्या वाटेला येते.


 ......... गोंडस हसविणारे बालपण सुखात आणि दुःखात.आठवणीना प्रवासासोबत घेत !!!
"फक्त हसरे बालपण".

                ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- हसविणारे हसरे बालपण 
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you
  

(माझ्या डायरीतून घेतलेला ललित लेख  १३.१.२०१५ मध्ये माझ्या प्रवासात आलेला मला हा एक खूप सुंदर अनुभव )
आवडल्यास नक्की शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद
----------------------------------

    


     

शनिवार, ३ जुलै, २०२१

चारोळी मराठी


वसंत फुलला की फुले फुलतात 
फुले फुलले की वसंत फुलतो 
हृदय फुलले की गालावरील कळी फुलते 
टवटवीत फुलांच्या रूपा संगे


              ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- चारोळी 
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you


----------------------------------

**** जाणे *****

 

               झाडांला फुले फुलतात आणि आपल्या जीवनातील त्यांच्या वाट्याला आलेले सर्व कर्तव्य पार पाडतात. निसर्गाने प्रत्येकाला आपली काही जबाबदारी दिली आहे. तसेच फुलांनाही.... मला फुले जिथे-जिथे दिसले त्या मनविश्‍वातून सुचलेल्या ह्या ओळी.
           ही कविता स्वरचितआहे आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.


*****  जाणे *****

फुलांना माहित असत 
त्यांचे जाणे 
कुणी देवाच्या पायाशी 
तर कुणी 
सरणावरील व्यक्तीच्या पायाशी 
तर कुणी 
मंदिराच्या सजावटीसाठी 
तर कुणी 
आवडत्या व्यक्तीच्या हातातून 
आवडत्या व्यक्तीच्या हातात 
तर कुणी 
त्या झाडांच्या पायाशी 
स्वतःचे अस्तित्वनष्ट करतात 
दुसरे फुलावे म्हणून 
स्वतःच्या निरोपाच्या वेळी
निसर्गाच्या नवनिर्मितीच्या चक्रव्यूहासाठी
समर्पण स्वतःचे करीत !



              ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- ***  जाणे ***
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you


----------------------------------

विसावायला


पानांच्या देखाव्यात 
पाखरांचे घर आणि 
फक्त पानांचा  
आभास.... विसावायला 

           ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-   विसावायला 
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you


----------------------------------

हायकु

हायकु 

पदर माय माऊलीचा 
जसा सुगंध मोगर्‍याचा
पानावरील दवबिंदूूच्या 

         ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- ** हायकु **
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you




----------------------------------




माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...