savitalote2021@bolgger.com

शनिवार, २४ जुलै, २०२१

विणलेला धागा

                देह व्यापार करणाऱ्या बाजाराच्या स्त्रियांच्या हतबल झालेल्या, पोटासाठी  व्यभिचारांचा बाजारात बसलेल्या शोषित स्त्रियांच्या भावविश्वातून घेतलेली ही भावना. कविता स्वरचित आहे.

******   विणलेला धागा    ******
माणसांच्या चेहऱ्यावरील 
अनोळखी भाव 
अनोळख्या हसूबरोबर 
अनोळख्या बाजारात 
विणलेल्या धाग्यात 

रंग बदले भाव बदले 
सावली मात्र एकच 
मुखवट्याआड चढवलेली 
अदृश्य भावना 
प्रतिबिंब त्यात जपलेली 

उत्तरांशिवाय 
अनोळख्या बाजारात 
विणलेल्या धाग्यात 

जुनीच ओळखीची माणसे 
नवीन गिफ्ट पेपर  परिधान
व्यभिचारांचा  बाजारात
सुगंध देहबोलींचा 
पांढराशुभ्र रातराणी 
दरवळत, दिशाहीन 
भावनेच्या ...दिशाहीन बाजार 
टिचभर पोटासाठी 
सौंदर्य चढविलेल्या 
अनोळखी बाजारात 
विणलेल्या धाग्यात 

सुटलेला भटकत चाललेला 
जीवनाचा तुटलेला धागा 
अनोळखी बाजारात 
विणलेला धागा 

            ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे


 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- विणलेला धागा    


             आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. 

*************************************

गुरुवार, २२ जुलै, २०२१

बोधिसत्व झाला तुम्ही !!!!

          गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारित स्वरचित स्वलिखित कविता आहे.

*****  बोधिसत्व झाला तुम्ही *****

जीवनातील सर्व चढ-उतार 
पार करीत जगविजेता🏆
झालास मार्गदाता झालास 
मानवी संसारात 

पाण्यातून जहाज प्रवास करते 
वळसा घालते किनारा गाठते 
तसे तुमचे जीवन 
मोहमायातून मुक्त 

तुम्ही झालास शांतिदूत 
क्षणभंगुर मानवी स्वार्थी 
व्यवहारवादी जगात 
मानव कल्याणासाठी 

सोडले सर्व सुख संपत्ती 
क्षणभंगुर झालेले सर्व नाते 
मार्गदाता मोक्षदाता होण्याचा 
प्रवासात ...✍️🏻

मानवी संसारात झालास 
तुम्ही माणुसकीच्या भाग्यविधाता 
सोसले तुम्ही मनावर अखंडवार 
वाट चुकलेला माणसांच्या व्यवहारात 

जन्म,दुःख,मृत्यू यातना
चिंतामुक्ती त्यातून वाट 
काढणाऱ्या तत्वज्ञान अंगीकार 
करून दिली आम्हास 
✍️🏻शिकवण  समानतेची

अमर्यादित संघर्ष यात्रेतून 
चालताना न थकता न दमता 
शांती अहिंसेची आचारसहिता घेऊन
बोधिसत्व झालास तुम्ही ....
बोधिसत्व झाला तुम्ही !!!!


                ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-***बोधिसत्व झाला तुम्ही  ***

        अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका 
Thank you !!!

*************************************
 


// बाबाबासाहेब तुम्ही //

       

   /////   बाबासाहेब  /////

बाबासाहेब तुम्ही क्रांती 
समानतेची सदैव 
सूर्य तेजाच्या किरणांची 

बाबासाहेब तुम्ही वादळ 
विषमतेच्या ✍️लढाईत प्रेरणास्त्रोत 
क्रांतीची मशाल 
जीवन कला शिकविणारी 

बाबासाहेब तुम्ही बीजे 
पेरली शिक्षणाची 
अंधश्रद्धेच्या गाण्यात 
श्रद्धेचे गाणे ✍️🏻सुरासहित 
आदर्श विकासाचा 
अवघड परिस्थितीत 
दिले आम्हा प्रोत्साहन 
ताठ मानेने जगण्याची 

बाबासाहेब तुम्ही प्रकाशाची 
ज्योत आशा-आकांक्षा 
इच्छा पूर्ण करणारे वटवृक्ष 

बाबासाहेब तुम्ही 
शिक्षणाची,समानतेची✍️🏻,न्यायाची 
संघर्षाची यशोगाथा 
भारतीय संविधानापर्यंत आणि 
आजपर्यंतच्या प्रवासाची 

बाबासाहेब तुम्ही दाखविला 
मार्ग बुद्ध धम्माचा... 
बुद्ध शिकवण झाली 
मार्गदाता आयुष्याची !!!


             ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  ///   बाबासाहेब  /////

             अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you!!!




*************************************

सोमवार, १९ जुलै, २०२१

ओरखडा




            ** ओरखडा **

आयुष्यात कितीही ओरखडे झेलायचे 
कुठे थांबेल का, हे सर्वच

अंत आहे का याला 
मर्यादेच्या अविरत साखळीमध्ये 

पोहताना लहान बदकाचा तंरग
लहान असेल पण खरंच 

त्याला त्या तरंगाशी काही 
संबंध असतो 

शर्यत फक्त  जाण्याची 
अडथळ्यांच्या मार्गातील मार्ग 

होण्याचा ओरखडा तर असेलच 
गुणधर्माचा मन  बदलण्यांचा 

आसुसलेल्या माणुसकीची 
प्रखरता।   शीतलतेची  

रेखाटताना हळुवार जपली 
जाणार ओरखडांचा जखमा 

वात्सल्याच्या मायने भरेल का 
बदललेल्या दृष्टीला 

आनंदाच्या ओरखडा मिळेल का !!
आयुष्यात आनंद ओरखडा 

तयार होईल कधीतरी 
मनाच्या  ओरखडाला औषध 

मिळेल का 
समानतेची न्यायाची .....

माणुसकीच्या भिंतीच्या 
ओरखडांची !!


     ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-***   ओरखडा ***

       अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा .आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you!!

----------------------------------

** मौन **

         आपल्या आजूबाजूने अशा कितीतरी घटना घडत असतात.  त्या घडू नये अस वाटत राहते. एक घटना पावसामुळे कोसळलेल्या इमारती... त्यात झालेले नुकसान ... त्यावर सुचलेली ही कविता,
"मौन".


*****  मौन *****

मौन राहावे असे सतत 
वाटत राहते पण राहताच 
येत नाही मनात अनेक 
प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी 

वाहत्या पाण्यासारखे व्हावे 
खोल दरीसारखे व्हावे
घडलेल्या चुकांना शोधत 
बाळगावी शांतता मनात 
अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी 

आश्वासनाची जाहिरनामे आठवतात खोदलेल्या खोल विहिरीसारखी
ताजेपणाने गर्दींच्या माणसात 
हरवलेल्या माणुसकीची 
शांत व्हावे मौन व्हावे 
असे सतत वाटते 
पण 

चोहीकडे अशांतता पसरलेली 
नव्याकोऱ्या संघर्षाची गाथा 
दैनंदिन उघडझाप पापण्यांची 
अश्रूंचा... मृत्यूचा आणि भ्रष्टाचाराच्या तांडवात...
 
गुढ साखळीमध्ये गुंफलेला 
तरी मौन बाळगावे वाटते 
पण माणूसकीचा हदयाला  
मौन बाळगताच येत नाही 
विकासाच्या वटवृक्षाला 
मुळापासून घाव घालतांना 
बघून मौन !


           ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-***  मौन ***

       अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका!!
Thank you.


----------------------------------

आशा


जिथे आशा संपते 
त्या क्षणापासून चालू होतो 
सकारात्मकतेचा प्रवास परत 
हृदयापासून !!!






✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-***   आशा ***

     अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.  आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you!!


*************************************




चाबी


हृदयाची चाबी 
कुणाजवळही देऊ नये 
ती आपल्या स्वाभिमानाची 
गुरुकिल्ली असते !!


               ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-***  चाबी  ***

     अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.  आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका...
Thank you.



----------------------------------

शांतता


चुकीच्या गोष्टीचे समर्थन 
करता करता चिखल कधी होतो 
माहित नाही आनंदाचा शांततेचा 
आणि समाधानाचा टाकाऊ शब्दांनी !!


           ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- ***  शांतता ***

   अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you!!


===========================

शनिवार, १७ जुलै, २०२१

अखंड









हृदयातील Life line चालूच 
          असते तिथे....प्रेमाचा झरा 
          वाहू द्या! अखंड.


       ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-***  अखंड  **

अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका
Thank you

शक्तीशाली


समोरचा कितीही
शक्तिशाली असो
लहानपण आपलेसे करतात 
त्या शक्तीला !!!

         ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-***   शक्तीशाली **

   अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you!!

शुक्रवार, १६ जुलै, २०२१

माझे रस्ते

////   माझे रस्ते  ////

रोज नव्याने हा पाऊस 
मला नव्याने भेटतो 
चिंब भिजलेल्या शब्दांसोबत 
नव्याने शब्द भिजलेले देतो 
कागदावर ✍️उतरतांना 

नव्याने लिहितो गारवा शब्दांचा 
भाव भावनांचा सरबत्तीमध्ये 
पाऊस भरे नवीन अक्षरे 
कोऱ्या कागदांवर✍️🏻

आठवणीचे चित्र सोबत धारा 
बाहेरील पाऊस💚 झाडा-पानांवर 
हसते मी नव्याने नयनातील 
पावसासोबत कोसळणार्‍या 
धारेसोबत... 

माझे रस्ते हुंदके होतात 
शुभ्र दुःखांच्या सरीवर चालताना 
पाणी पाणी झालेल्या वातावरण 
पहाटेच्या शुभ्र गावा पोहोचेपर्यंत 
...हा पाऊस💦 हसूनच म्हणतो 

माझे रस्ते तुझे रस्ते एकच 
होतात रोज नव्याने 
चिंब भिजताना....
शुभ्र सकाळच्या सुखाद 
गारव्यात💕💕💕!!!!!!

             ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- ***   माझे रस्ते  ***

           अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you !!

** प्रश्नचिन्ह **




       ***  प्रश्नचिन्ह ****

उमजले प्रश्न 
एक-एक शांत होऊन 
अनेक दिवसांनी 

      दिवस शांत जातात 
      मनातील प्रश्नांसोबत 
      अंदाज बदलले जातात 

इंद्रधनुष्यासारखे बदलत 
होरपळलेली उत्तरे प्रश्नांची 
जपत जावे कुठवर 

       कळत नाही 
       खेळ चालूच; परत 
       प्रश्नचिन्हांचा ????

निखारे उत्तरांची 
आवासूनच शांत
प्रश्नचिन्हांसोबतच

                ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  *** प्रश्नचिन्ह ***

       अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you  !!!!


*************************************

** थांबलेला किनारा **

**** थांबलेला किनारा ****

शब्दही थांबलेले आहे 
मन ही थांबलेले आहे 
विचार फक्त चालूच 

अबोल संवादसोबतच
दिशाहीन शब्दांनाही 
थांबवावे लागत असते 

कधी कधी बेभान न होण्यासाठी 
आतुर झालेल्या विचार भावनेला 
फक्त आवर घालायचे आहे 

संवाद अबोल करीत 
शब्दही थांबलेले आहे  
म्हणूनच
 
मन ही थांबलेले आहे 
आणि शब्दही..... 
थांबलेल्या किनाऱ्यासारखे !!


              ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-**  थांबलेला किनारा **

      आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका 



===========================

कृती

        विपरीत परिस्थिती असली की आपल्यालाच आपल्य आत्मविश्वासावर मार्ग काढायचे असतात या भाव विश्वातून लिहिलेली ही स्वरचित कविता....



        *****  कृती ******

कितीही मागे टाकत गेले तरी 
कृती मात्र आत्ताच करावी लागते 

यातून काढण्यासाठी मात्र 
त्याच क्षणी करावी लागते 

डोईवर अनेक ओझी
पायातला बळाला बळ देत नाही 

पण ते देण्यासाठी आत्ताच 
करावी लागते...!!

स्पष्टीकरण आपलेच आपल्याला 
कारण कृतीही आपलीच 

आपल्यासाठी गरज फक्त 
पाऊल उचलण्याची

स्वतःची 
कृती करण्यासाठी  !!


            ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-*** कृती ***

अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you !!!!!


**========================**

बुधवार, १४ जुलै, २०२१

थेंब

         पावसाचा थेंब असो वा नयनाचा प्रत्येक  थेंब  मनाला सुखद व दुःखद दोन्ही भावना देऊन जातात या भावविश्वात लिहिली गेलेली स्वरचित कविता.


 ***  थेंब ***

थेंब पानांवर

थेंब गवतांवर 

थेंब फुलांवर

थेंब तुळशीवर 

थेंब अळवीच्या पानांवर

थेंब निशिगंधाच्या फुलांवर ...

थेंब कळ्यांच्या शुभ्र सदाफुलीवर 

थेंब नयनातील कडेला  

थेंब सुखाच्या फांदीवर 

थेंब दुःखाच्या वाळवंटात 

थेंब आपल्या सर्वांसोबत

थेंब हसऱ्या रूपात...

पावसासोबत !!!!

             ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे


©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  ***  थेंब  ***

  अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you!!


----------------------------------

विचारसंस्काराच्या पायथ्याशी आणि शिखराशी!!

विचार 
     विचारसंस्काराच्या पायथ्याशी आणि  शिखराशी!!

           वणवण भटकत चाललेले विचार... एकाच ताटातून ...एकाच काचेतून... एकाच आकडातून चालत आहे; का? माहित नाही. धिंगाणा सारा विचारांचा. घालमेल झालेल्या विचारात अडकलेले विचार... जगण्याच्या सावलीमध्ये विचार गोतावळ्याच्या शृंखला  मध्ये सगळे विचार बंदिस्त झालेले आहे.


          विचार हदयाला कमकुवत बनत जाते.  काही न उमटलेले भाव हृदयाला अधिकच मनातून. शब्दातून लगबगीने कचरा सारखे साचलेली दुर्गंध पसरवीत. मेंदूला निष्क्रिय करीत सोडते. मायेने शब्द मनात येतात. विचार त्या मायेला भीती दाखविते. रागवतो,ओरडतो... अंधारलेल्या वाटेवर चालण्यासाठी सतत प्रवृत्त करीत असतो.

      वात्सल्याचा भरात घेतलेले निर्णय आता विचार पातळीवर नको वाटते. अवतीभवती फक्त भेटीला नकारात्मक विचार. नकारविचार साठविलेल्या नकारआठवणी आणि भेटलेले नकार शब्द... कठोर भाव निर्मिती, न समजलेले क्षण, न उमजलेली वेळ... वळणावळणावर रस्त्यावर  खोदलेले नकारात्मक हसू; तग धरून !

शब्दांनाही वाट दिसेनाशी होते 
विचार वादळात सावली 
आपलीच आपल्या विचारांना 
स्वप्नाळू करीत
 
           कधी विचार खुराडामध्ये बांधलेली माणसे पाहिली की वाटतं खरंच माणूस असा असतो. बदल मात्र सतत शब्दांचा. खरंच माणूस बदलला आहे ?   का इतका माणुसकीची बदलत चाललेली मोकाट स्वार्थ विचारसरणी माणसाला विचारशून्य बनविते.

           विचार मनाला कमकुवत बनवीत जाते. विचार मनाला कदाचित शक्तिशाली ही बनवीत असेल पण ते सर्व आपल्या विचार पातळीवर. आपण कोणते विचार करतो, यावर अवलंबून असावे कदाचित?

        विचार सकारात्मक वा नकारात्मक असते. विचार म्हणजे अंतर्मनातल्या परिस्थितीचे वर्णनात्मक रूप!! पण खरंच विचार विश्वासावर अवलंबून असते. विचाराचे असे वर्गीकरण करता येते का? चांगले काय... वाईट काय... सत्य असत्य काय ? या सर्व गोष्टी एकाच कसोटीवर अवलंबून असते. असे वाटून जाते.

       या प्रवासात विनाकारण आपण आपल्या विचारधारेला बंदिस्त करून ठेवतो. विचारा समोर आपले विचार नतमस्तक  होतात. विचार वाटेवर चालताना कोण जिंकणार आहे माहित नसते. पण प्रत्येक विचारामागे काहीतरी कारणे असतात. विचार पावसाळ्यात भावनेवर आधारित असते विचार आपले!!  विचार वादळ आपले असतात. पण ते विचार संस्कारावर अवलंबून असते.

       विचार अनेक प्रकारची असतात. विचार श्रद्धेवर, विचार अंधश्रद्धेवर, विचार स्वार्थावर, विचार विश्वासावर... विचार अपशब्दांच्या साखळी सोबत विचार सत्याच्या वाटेवर चालणारे विचार. विचार पूर्णता आपल्या भावनेवर आणि संस्कारावर  अवलंबून असतात.  हे खरे. कारण विचारसंस्कार हे आपल्यातील संस्काराची भावना असते. 

           विचार चांगले की वाईट असे नसावे. बहुतेक विचारशृंखला ही आपली असली तरी त्यावर अनेक बाजू असतात. अवतीभवती असलेल्या व्यक्ती व त्यांचे विचार संस्कार शब्द यांचे पडसाद उमटत असतात. विचारावर आपले आयुष्य अवलंबून असते; आयुष्य रेखा असते विचार !    

        विचार संस्कारावर इतरांचेही विचार अवलंबून असते.हे असले तरी ते चांगले असावे. चांगला विचारसरणीतून असावे. चांगल्या प्रतिक्रियेचे असणारे फक्त विचार शब्द चांगले असावे. विचार उंबरठा आपल्या असला तरी तो उंबरठा इतरांवर सुद्धा परिणामकारक असतो.

विचार शब्दांतून 
विचार अबोल भावनेतून 
विचार अनियमित मानसिकतेत 
विचार प्रक्रियेच्या जडण- घडणीतून 
विचार शक्तिस्थान मनशांतीचे 
समाधानाचे आत्मकेंद्रित 
वास्तववादी ...
माणसांची.!!

           विचार नवजात बाळासारखे असते. विचार खेळकर खोडकर मुलासारखे असते. विचार मस्तीखोर मुलांसारखे असते. दुःखद विचार दुःख झाल्यावर वेदना झाल्यावरच येईल असे नाही ते कधीही कोणत्याही परिस्थितीत कोणताही मनप्रवृत्ती मध्ये येऊन जातात.

       विचार अंतर्मनातल्या भावनेवर अवलंबून असते. ते कधी सुजनशील नवनिर्मित प्रतिभावंत असते. कधी आत्मकेंद्रित असते. विचार अफाट शब्दांची सांगड घालणारी असते. तर कधी हळूच झोप उडविणारी प्रेमळ असते.

      प्रत्येक विचार नाण्याच्या दोन बाजू असतात. प्रामाणिक आपोआपच मनोवृत्ती बदलत जाते आणि ताव मारतो. आपल्या पर्यायी प्रश्नासमोर. वाजत-गाजत तर कधी शांत अबोल होऊन मोघमपणे। !!

          विचार जीवनात रंग भरते वास्तविकतेचे !!सरतेशेवटी आपल्या हातात शिल्लक राहते ते फक्त सत्य त्रिकालसत्य. त्याला कुणीही बाधित करू शकत नाही. मागे सोडू शकत नाही.  भाषा वेगवेगळी असते.. मखमली नात्यांचे विचार...वेगळे गोधडीचे विचार! वेगळे पण एकाच विषयावरील विचार शब्द वेगवेगळ्या रूपात.
      
          सुखातील विचार मधुर गोड तर दुखते विचार मेंदूला मुंग्या येईल इतक्या ढगाळ. कवेत घेऊन गेली तरी  त्या क्षणी ते विचार थांबेल का? हा प्रश्न मागे शिल्लक राहतो.

      अंतर्मनातल्या स्थितीवर शेवटी विचार शिखर गाठले जातात विसरणे अवघड असते. थांबविणे अवघड असते. ते विचार थांबविणे... अवघड असते. सगळे क्षण अशक्य असते. विचार भावना थांबविणे  घनदाट रानासारखे; शब्दात मांडणी न करता येणारी. 

           सूर्याचा प्रकाश चिरंतन टिकणारे तसे काही विचार असतात. प्रामाणिक असते.. प्रेमळ असते ...थकलेल्या हरलेल्या मनाला बळ देत असते. साथ देत असते. एकमेकाच्या सोबतीला सतत सकारात्मक लय तयार करीत असते.  हदय फुललेले असते. पाठीवर एक थाप सकारात्मक विचारांचे खूप काही देऊन जाते.त्या क्षणसावलीमध्ये कधी कधी अती चांगलेपणा हा गुण सुद्धा नकारात्मक भावनेकडे घेऊन जाते. इतरांच्या विचारांमध्ये माणसाला आळशी करीत असते.


             घट्टा नाते आपल्या नकारात्मक विचाराबरोबर असते.  एक भावना.. विचार दोन सकारात्मक-नकारात्मक...एक क्षण... एक प्रश्न.. विचार मात्र दोन जपणारी वा न जपणारी.
      
नकळत जुळली जातात 
दोन ध्रुववर विचारधारा 
ओढ मात्र नेहमी एकीची 
घट्ट गुंफलेल्या विचार संस्कारांबरोबर 
हसत-खेळत नवचैतन्य 
नव सावली नवसुगंध देणारी 
दोन्ही ध्रुवांवरील 
अतूट विचारसरणी
आत्मकेंद्रित !!!

          विचार आयुष्याच्या पत्त्यांचा खेळ चांगले आले तर जिंकणे. पण ते येणे आपल्या हातात नसते. कारण अवतीभवती नेहमी बदलत जाणारी मानसिकता असते. वरच्या पायरीवर असलेला खालच्या पाय ओढतो मग त्या वेळी विचार सतत आपले काम करीत राहते.

        विचार वादळे मने हलवितात भयवह स्थितीत... आवाज वाढवून वा शांत - अबोल होऊन. कारण थांबू शकत नाही समोर असलेल्या प्रवृत्तीला. विचार निराशेला...अविश्वासू वृत्तीला... काळा रंगापेक्षाही काळवटलेल्या मनाला; सोडावी लागते संगत मग.. यशाच्या पायरीची!! नाखुशीने कारण आपली  झेप त्या प्रवृत्ती ऐवढी नसते उंच अमाणुसकीची!

           ठरवलेल्या गुंतलेल्या खोटा अहंकारापेक्षा आपला चांगुलपणा बरा...! प्रामाणिकपणा बरा कदाचित हाच विचार एक एक पावले  यशापासून कितीतरी मागे करीत असते.

           ऊन झेलण्याची संघर्ष करण्याची उपाशीपोटी राहण्याची मनस्थिती असते पण अहंकाराला प्रेमाने जिंकणे ....चांगुलपणाने जिंकणे ...हे अशक्य गोष्ट  असते.  कारण अहंकार विचार हा फक्त स्वविचारांच्या गणितातून विचारसरणीतून येत असतो. तिथे थांबले नाही तर एकेक करून सर्व चांगले विचार अनोळखी होत जातात. अतोनात यातना सहन करूनही हाती फक्त शिल्लक असते; अहंकाराने दिलेले अहंकारी फालतू विचारांनी दिलेले अखंड जखमाशब्द. 

             विचारांच्या हाती राहते फक्त अपयशाची माळ आणि अनेक विचार सावलीची माळ.  थांबलेली अडचणी कुठून येतात माहित नसते पण अहंकार प्रवृत्ती विचार शेवटपर्यंत सोबत असते. उपाशीपोटी पाहिलेले सर्व स्वप्न अहंकार प्रवृत्ती विचार पायाखाली तुडवीत.  असो, या विचार प्रवृत्तीला वेळीच ओळखून त्यात त्यांच्या विचार प्रवृत्त करता येईल का हे एकदा तरी न झाल्यास प्रारंभ करावा आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग.  नवीन विचारसरणीने गरुड झेप नवे सौंदर्य निर्माण करीत.

         आत बाहेर अंतर्मनात वा अति आत स्वतःल बदलायचे आणि नंतर अहंकारी प्रवृत्तीला... बदलली तर .आपला चांगुलपणा, विचारसरणीने फक्त स्वतःसाठी अनादर न करता फक्त दुर्लक्ष करीत स्वतः राहायचे. आपले प्रेरणादायी विचार घेऊन आपल्या भविष्याच्या पुढील मुक्तमय स्वतंत्र जीवनासाठी!! 

          कारण कालचा क्षण आज नाही उद्याचा क्षण नंतरच्या दिवसासाठी नाही आणि आत्ताचा क्षण फक्त आतासाठी आहे. दुसऱ्या क्षणासाठी नाही. अखंड यश अपयशाच्या गणितात फक्त जिंकली जाता सकारात्मक विचार प्रवृत्ती न की अहंकारी.

       स्वार्थी व्यवहारवादी कल्पनावादी कारण जिंकतो तोच आणि तीच विचारसरणी जो दयाळू,  सहानुभूती,  आत्मकेंद्री,  प्रामाणिक, वास्तववादी असते.


जिंकण्यासाठी शर्यत लावावी लागत 
नाही कुणाबरोबरही कारण तोच 
जिंकत असतो 
शर्यत असेल स्वतःसोबत
उघडली जाते दारे, त्यांचीच 
जिद्दीने आणि चांगल्या माणुसकीच्या 
त्या विजयाच्या पराभवाला मागे 
सोडवीत हरवत...उंच झेप वेडावलेल्या 
पायऱ्या तयार होतात परत 
प्रामाणिकपणे चालण्यासाठी इतरांसाठी
कोणत्याही शर्यतीशिवाय 
अहंकाराशिवाय आणि निष्पाप गोड 
फळांच्या आशेने 
विचारसंस्काराच्या ...
पायथ्याशी आणि शिखराशी 
हसरा विचार भाव प्रवृत्तीने !!!

                    ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  ** विचार 
     विचारसंस्काराच्या पायथ्याशी आणि  शिखराशी!! **

अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका
Thank you

----------------------------------

        


सोमवार, १२ जुलै, २०२१

सूप

   स्त्री स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आजही सुशिक्षित समजल्या जाणार्‍या समाजामध्ये नवीन प्रकारचे स्त्रियांना बंदिस्त केले जाते.              कधी कर्तव्याच्या नावाने तर कधी सुसंस्काराच्या नावाने....  स्त्रियांच्या याच भावनिक विचारांवर लिहिलेली ही कविता.

            कविता स्वलिखित आहे.


           *** सूप ***





बांगड्यांच्या आवाजात 
नाचत होते धान्य सुपासोबत 
आणि समोर जात होते
बारीक दाणे आणि कचऱ्यातील पाने 

मी उभी हातात
स्वच्छ धान्याची टोपली 
नजरेत भरेल इतकी 
स्वच्छ दानेदार...  

मग उचलले; पाऊल, 
स्वच्छ माझ्यासाठी....
स्वतःला दाणेदार बनविण्यासाठी 
संघर्षाची माळ हातापायात 

पण फेकले गेले पुन्हा 
त्याच सुपात...
स्वच्छतेसाठी पीठात 
विचारसंस्काराच्या दळलेल्या 

मी अजून आत सुपाचा 
स्वच्छतेसाठी त्यांच्या माणुसकीच्या 
मी अजूनही आत 
सुखाच्या बाहेर दळलेल्या 

पीठासारखे बाहेर
मग काय 
सुखातही पातळ कणिक 
दुःखातही पातळ कणिक 

मस्त चाललया आता 
सुपात आत -बाहेर करत 
बांगड्यांच्या सुरेल आवाजात 
सुगंधी मोगरासोबत 

मी उभी! 
स्वच्छ धान्याची टोपली ...


                ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  ** सूप ***

          आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

**************************************************************************

** पाऊस आताचा **

             निसर्गचक्रातील एक सुंदर ऋतु पावसाळा कुणाला हवा असतो तर कुणाला नको असतं पाउस आणि आठवणी यांचा रम्य सोहळा चालू असतो कधी हवा हवा वाटतो कधी नको नको वाटतं त्या भावनेतून लिहिलेली ही कविता कविता स्वलखित आहे. 
   आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.


*** पाऊस आताचा ***

चिंब भिजलेले थेंबगुच्छ 
झेलताना रेंगाळत राहती 
ओला स्पर्श...
गारवांच्या आणि क्षणात 
आपलेसे करून जातो 
नको नकोसा वाटणारा 
यंदाचा पाऊस 
आठवणीच्या थेंब आठवणीमध्ये 
रेंगाळतो ओल्या 
आतुर मनात 
ऋणानुबंध ....
पाऊस यंदाचा !!

         ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  *** पाऊस आताचा ***


अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका
Thank you

----------------------------------

शनिवार, १० जुलै, २०२१

पाऊलखुणा

      *****  पाऊलखुणा   ******


मंद पावसाच्या सरी सोबत आलास 
उनाड वारासारखा मनात दाटलेला 
उधाणलेला सागरलाटा 
बेभान होऊन गारव्यात सारखा 

मंद पावसाच्या सरीसोबत आलास 
सूर्य आणि सावलीच्या खेळात मनात
श्रावण सरीला सोबत घेऊन बरसायला 

मंद पावसाचा सरीसोबत आलास 
आठवांच्या बासरीसोबत सुरेल 
सुरेल आवाजात दाटून आले परत 
नयन धारेच्या दाटलेल्या सुरासोबत 

परत जाताना परत सरीसोबत 
ठेवून गेला श्रावणधारा मनातील आठवात  उरतात मागे पाऊलखुणा
मंद पावसाच्या सरीसोबत घेऊन 
जाताना  


                    ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-    पाऊलखुणा   

अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका
        Thank you!




**************************************************************************

**** अंधार ****

  




****   अंधार   ******

अंधार फार झाला सुगंध शोधताना 
हरवलेले क्षण गेलेली वेळ आणि 
हातातून सुटलेले जपून ठेवलेला श्वास
आत्मा नाही परत... जडवलेल्या श्वासाचा

अंधार फार झाला वणवातील वास्तव शोधताना ..करपलेली जमीन त्यावरील गवत नष्ट झालेली सोबत जगण्याचे स्वप्नही इवल्याश्या रोपट्याची संघर्ष आता फक्त मनातील करपलेल्या काळा पडलेल्या स्वप्नातील डोळस वास्तवाशी 
हातात आणि अनवाणी पायासोबत 

अंधार फार झाला दिशा शोधताना विकासाच्या ठेवा जपलेला वर्षानुवर्ष संस्कृतीच्या नावे वास्तवात माती झाली मानवतेची पावलो - पावली जपून ठेवली शौर्य आपले.. माझ्या अस्तित्वाचे गणिते दिशाहीन अवास्तव- वास्तव जगात 

अंधार फार झाला आता 
उजेडाच्या दिशेने.... 
अंधार फार झाला आता !!


                ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- अंधार
आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद !!

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...