हा विरोधाभास आहे आणि याच विरोधाभासाचा संदर्भ घेऊन ही कविता लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे.
ही कविता स्वरचित आणि स्वलिखित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद...!!!
**** लेक सावित्रीची ****
माझ्यात तुझ्यात फरक इतकाच
की तू वटाला पुजते मी पुस्तकांना वाचते
मी शिकते त्यांच्या शब्दांपासून
तू फक्त झाडाच्या खोडाला धागा गुंफते आयुष्यातील एका एका क्षणांचा हिशोब
माहित नसतानाही तू साताजन्माचे
भविष्य मांडून ठेवते... बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सर्व काही
श्रद्धेने,विश्वासाने आणि आपलेपणाने
माझ्या तुझ्यात फरक एवढाच
माझ्या मर्यादा या क्षणापुरता
तर तुझ्या जन्मोजन्मीच्या
श्रद्धा ठेव नशिबावर त्यातील
विज्ञान ओळखून....
कारण आयुष्याचा थांगपत्ता कुणालाही
माहीत नाही... पण तू !!
शेवटी माझ्या तुझा श्वास एकच
जशी तू सजते श्रद्धेने तशीच
मीही सजते शब्दअलंकाराने
कोणतीही अपेक्षा न करता आतासाठी उद्यासाठी नाही;येणाऱ्या भविष्यासाठी नाही शेवटचा श्वास घेतल्यानंतर येणाऱ्या
सुखात काल्पनिक जीवनासाठी नाही
माझ्या तुझ्यात फक्त फरक इतकाच
फक्त फरक इतकाच इतकाच .....!!!
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका ...!!
=========❤❤❤❤❤==========
सकारात्मक चारोळी आयुष्य चारोळी प्रसिद्ध चारोळी Marathi images in positive charolya motivation charolya
*Marathi kavita aayushavar kavita positive thoughts poem Marathi kavita collection Marathi
चारोळी motivational charolya
kavita aayushavar kavita Inspirational kavita
kavita aayushavar kavita Inspirational kavita