savitalote2021@bolgger.com

शुक्रवार, ११ एप्रिल, २०२५

जयंती

 ****** जयंती *****

गाण भिमाचा लाव
माझ्या बापाच्या जयंतीच लाव
 गुणगान कर माझ्या बापाच्या लेखणीच 
आयुष्याच्या आनंदाच 
नाच बेधुंद होऊन 
कधी शब्दांसोबत 
कधी विद्रोहासोबत 
कधी न्यायासाठी लढ 
 तर कधी स्वाभिमानासाठी 
एक ग्लासाच्या पाण्यासाठी चक्क 
चळवळ उभी व्हावी माझ्या भिमाचा
 इतिहास आहे संविधानापर्यंतचा...
 गड्या भावा भावड्या 
काय तू फुलला चिखलात 
शेवाळ्यात डबक्यात
कधीच नाही 
तू फुलला माझ्या बापामुळे 
निळ्या आसमंतात 
 तू फुलला माझ्या युगंधरामुळे 
तू फुलला शिल्पकाराच्या विचारांनी 
तू फुलला बहिष्कृत असूनही 
बोधिसत्वाच्या तत्वाने 
तहानलेल्या विचाराने 
त्या विचाराचं
 गाणं लाव 
या बाप्पाच्या जयंतीचे गाणे लावा
 समानतेच्या चळवळीतला माणसाच्या 
मनातल गाणं लाव

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

      आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
============================

गुरुवार, १० एप्रिल, २०२५

ज्योतिबा( विद्रोही साहित्य)

*** ज्योतिबा***
 शिक्षणाची शिदोरी आम्हाला देऊ 
स्वातंत्र्याचे महत्त्व समजून दिले 
तीच मी एक स्त्री आहे 
हे मी आज लोकांना दाखवून दिले 
दोन लुगड्याची माझी माय 
शेणा मातीचे गोळा घेऊन अंगावर 
स्वतःला सुरक्षित कशी ठेवत असेल 
विचाराने अंगावर काटा येतो 
पण तू  होता ज्योतिबा 
म्हणून सर्व काही सहन करत गेली 
ज्योतिबाची साऊ झाली
तुझ्या या कार्याला मानाचा मुजरा..!!

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

सवय

*** सवय ***

 सवय नव्हती मला कूणाची 
पण तो सवय लावून गेला 
हसण्याची स्वप्न बघण्याची सजण्याची 
मी चालले होते माझ्या सरळ रस्त्याने 
त्याने मला वळणदार रस्ते 
दाखवून दिले आनंदाचे 
आडोशाचे आणि सोडून गेला 
अर्ध्या रस्त्यावर आडोशाच्या वळणदार 
सवय आता सुटत नाही 
काय करायचे त्याचे 
आता सुचत नाही 
मग त्याची सुटली असेल का?
माझी सवय...!
हे प्रश्नचिन्ह आहे 
काळाभोर चेहऱ्याच्या त्या कृष्णाला 
राधेची सवय सुटली होती का रे ?
आणि राधेलाही तुझी सवय सुटली होती का रे ?
सवय लावून गेला 
सवय नसलेल्या मनाला!!

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

=============================

बुधवार, ९ एप्रिल, २०२५

गुलाब

*** गुलाब ***
कळलं का कुणाला 
हा गुलाब कुणाचा होता 
टवटवीत फुललेला सुगंधाने 
मंत्रमुग्ध करणारा 
हृदयाच्या स्पंदनाना 
शांत निर्मळ पवित्र अशा 
आसमंतात घेऊन जाणारा 

कळल का कुणाला 
हा गुलाब कुणाचा होता 
रात्रीच्या अंधारात कुणी ठेवला 
असेल दाराजवळ यामागचा 
काय प्रयोजन असेल 
कवितेत असेल की शब्दात 
असे की बस सहज 
कुणीतरी कुणाच्यातरी 
मर्जीनुसार मस्तीखोर 
स्वभावात असेल 

कळल का कुणाला 
हा गुलाब कुणाचा होता 
हसणे हसण्यातच दिवस गेला 
गुलाबाचे रहस्य तसेच होते 
पण आमच्या गालावरची लाली मात्र
...... गुलाबासारखीच होती 
कळल असेलच, कुणाला तरी??
 तो गुलाब कुणाचा असेल! 
आता तो गुलाब माझ्याच 
पुस्तकांच्या सोबत आहे 
पण कळलेच नाही कुणाला 
तो गुलाब कूणासाठी होता 
म्हणून गालावर स्मित हसू येते 
माझच मला गुलाबासारखे 
लाल झालेल्या माझ्या 
गालावरील रंगाच्या...!!❤🤣

✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

मंगळवार, ८ एप्रिल, २०२५

तुझ्या मिठीत

** तुझ्या मिठीत **

हे खरे आहे अजूनही 
तू आयुष्यात आला नाहीस 
म्हणून आयुष्य संपल नाही 

तुझ्याविना काही गोष्टी 
जमल्या नाही हे खरे 
पण अजूनही वाट आहेच 

तुझ्या येण्याची 
अगदी मनापासून 
आनंदाच्या सोहळासोबत 

रखरखता  उन्हाच्या दाहकतेसोबत 
पावसाचा पहिल्या थेंबापर्यंत 
गुलाबी थंडीचा आस्वाद येईपर्यंत 

फुललेल्या मनाला 
अधिक फुलविण्यासाठी 
तुझ्या मिठीत

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

============================

मासिक बाई पण

*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात  आधार फक्त वेदनेचाच असतो  पूर्णत्वाच्या विचाराने  बाईपण जगत असते  वेदनेचा काय घेऊन बसले  मासिक धर्म...