savitalote2021@bolgger.com

सोमवार, १४ सप्टेंबर, २०२६

** शब्दांची पायवाट **

आयुष्याचा प्रवास अबोल शांत झाला आहे आता मंदिराची सकारात्मक आहे मनाला शांतता देत नाही मनाला एक प्रकारची नकारात्मकतेने फेरी घातली आहे असे वाटते.
    त्याच भावविश्वातून भावसंवेदनेतून ही कविता. प्रत्येकाच्या मनाला कधी ना कधी स्पर्शून जाते.
     कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा...! धन्यवाद!💞

** शब्दांची पायवाट **

वाटेच्या वाटेवर आता शब्दांची
पायवाट आहे पण ती अबोल 
प्रवासाचा टप्पा एका टप्प्यानंतर 
शांत झाला आहे 

प्रवास आता शांत होण्याचा 
पावसाच्या सरी सरी बरोबरच 
ओले चिंब होण्याचा 
मंदिराची घंटी आता शांतता देत नाही
 
रस्त्यावरचे वादळ आता 
मुगजळ झाले आहे 
हिरवळ आता 
उन्हाची दाहकता देऊन जाते 

मनाला आकाशात बेधुंद उडणारे पक्षी 
केविलवाणी वाटायला लागते 
आपल्याच मनासारखे 
वाटेवरच्या वाटेवरील शब्दांसारखे 

तरीही निसर्ग नियम लागू आहे 
जगण्याला सरते शेवटी 
प्रत्येक वाटेवरचा प्रवास 
प्रत्येकांचा आप आपला असतो 

कागदी फुलांना सुगंध येत नाही
हे तितकच खरे आहे 
रस्त्यावरील मातीसारखे
आकाशातल्या उडणाऱ्या पक्षासारखे 

वाटेवरच्या वाटेवर 
आता 
शब्दांची पायवाट आहे 
आता शब्दांची पायवाट आहे...!!🌹💞

 ©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------

रविवार, १३ सप्टेंबर, २०२६

** राग **

एका प्रेयसीला तिच्या प्रियकराचा राग येतो. 
.... पण माहित नाही, विषय हा थोडा खेळकर आपुलकीचा आहे. प्रेमात इतकी गुंतून गेलेली प्रेयसी शेवटी त्याच्या आठवणीत रमण्यासाठी नवीन आठवणी मागते. 
     याच भाव विश्वातील ही कविता!❤ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. काही सुधारणा असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा .धन्यवाद...💞!!

*** राग ***

आता मला तुझा राग आला आहे 
का? तू ते विचारणार नाही 
मी म्हटले तू गुंतू नको माझ्यात 
तर तू सोडून दिले 
म्हणून राग  

आता वाटते 
तुझ्याकडे मागून घ्यावे 
मी दिलेल्या सर्व वस्तू  
माझ्या मनातल्या गोड भावना 
तुझ्याही मनात आहे 
त्या गोड भावना तेवढ्या 
मलाच परत कर 

शांत होईल राग माझा
पण तू ते करणार नाही 
म्हणून म्हणते 
थोडा वेळ देत जा 
जास्तीत जास्त 30-40 सेकंद 
दिला तरी चालेल 

हसण्या बोलण्यासाठी 
आठवणींचा हिंदोळ्यावर
काही आठवणी तर असाव्या लागतात 
त्या तरी तू देत जा 
वेळ नाही दिला तरी चालेल 

रागाला किंमत नाही 
माहित असले तरी  
मनाच्या समाधानासाठी रागवण 
हे आता औषध झाले आहे 
माझ्यासाठी तुझ्यातल्या त्या गोड 
भावनेसाठी 

आपण करतोय एकमेकाला copy paste 
आणि बरच काही 
म्हणून आपण एक होऊ शकत नाही 
तू - तू आहे 
मी  - मी आहे 
माझ रागवण माझ आहे 
तुझ रागवण तूच आहे 
हरवले काहीच नाही 
अजूनही तसच आहे 
रागाच्या पडद्याआड खूप प्रेम आहे 
माझ माझ आहे 
त्यात तुझ असे काहीच नाही 

राग काही शांत होत नाही 
तुझ्यावरच प्रेम काही कमी होत नाही 
सगळं कस माझ  - माझ 
सगळं कसं माझ - तुझ
तिजोरीत बंद लपलेले 
गुलाबाचं फुल
सुगंधी🌴🤣💞

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------

रविवार, ८ मार्च, २०२६

स्त्री महिला दिनविशेष

स्त्री स्वातंत्र्याच्या गोष्टी करता करता स्त्री बंदिस्त होत चालली आहे स्वखुशीने !! हे आता प्रकर्षाने जाणून येत आहे. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराची बलात्काराचे आणि अशा कितीतरी गोष्टींना तिला रोज समोर जावे लागत आहे  त्या पार्श्वभूमीवर ही कविता.
    स्त्री भावसंवेदनेवर लिहिताना शब्द कमी पडतात पण हळुवारपणे काहीतरी लिहिण्याचा या भाविश्वातील या भावनेवर ही कविता. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यावर संशोधन केले जाईल. धन्यवाद💐!!

** स्त्री ***

संघर्षाने थकलेली आता तिला 
स्वखुशीने चौकटीत स्वतःला 
बंदिस्त करायचे आहे 
तिलाही व्हायचे आहे 
आता सोन्याच्या पिंजऱ्यातला पक्षी 
जबाबदारहीन अधिकाऱ्यांनी माखलेला 

संघर्षाने थकलेली आता तिला 
चालायची आहे 
अस्तित्वहीन आयुष्याचे व्यक्तिमत्व 
दाराच्या उंबरठ्यावर चौकटीची 
नवीन साखळी 
स्वतःला गुंडाळून 

संघर्षाने थकलेली आता तिला 
बंदिस्त व्हायचे आहे 
सरणावर जातपर्यंतच्या प्रवासात 
इच्छा मरणाची इच्छा आकांक्षा 
मनात बाळगून 

संघर्षाने थकलेल्या आता
तिने संघर्ष सोडला आहे 
स्व आनंदाने 
गुलामगिरीची पायरी चढली आहे 
स्त्री स्वातंत्र्य  हे आता घडणाऱ्या 
स्त्री गुन्हेगारीची 
कहाणी झाली आहे म्हणून

संघर्षाने थकलेली आता तिला 
स्वखुशीने चौकटीत 
बंदिस्त व्हायचे आहे

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
============================

शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०२५

राहूनच गेले ( प्रेम कविता )

एक प्रेयसी आपल्या प्रियकराच्या मेसेज साठी वाट बघते आहे पण तो मेसेज आल्यानंतर त्याच्याकडून नात्यात मर्यादा आहे याची आठवण करून देणारी ही कविता...!💞
     एक प्रियकर प्रियसीला त्या नात्यात काय मर्यादा आहे हे सांगत आहे शब्दांमध्ये आपल्या भावसंवेदना व्यक्त करतो. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित की स्वरचित आहे. काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद. 

*****राहूनच गेले *****

राहूनच गेले
तुझ्याकडील शुभेच्छा चा मेसेज येणे 
मला माहित आहे तू दौऱ्यावर आहे 
खूप बिझी आहे 
या सर्वात फक्त 
मनातल्या भावना तेवढ्यासोबत  
पण खरंच वाट बघत होते  
असो तू म्हणशील 
आता मी काय करू?
तू काय कराव यापेक्षा ...
मी काय करावे!!?
याला जास्त महत्त्व देणार 💕
तुझी चिडचिड तुझा राग राग 
तुझे शब्द शब्द आणि तुझीच चिडचिड 
पानावलेले डोळे तुझाच अबोला 
💞आणि तुझच मिठीत येणे 
सर्व काही तुझच 
त्यात मी कुठे आहेच नाही...!🤣
म्हणून मी रागावले नाही 
समजूतदारपणा कदाचित हा दोष आहे 
माझा इतक म्हणून सोडून द्यायच 
पण या सर्वांत एक गोष्ट मात्र 
मनात येऊन गेली 
ती म्हणजे मी आनंदात आहे का?
हे तुझ न विचारने
काल एक गिफ्ट आले पोस्टाने 
मनाच्या 
कदाचित तुझच असावे ते 
त्यात लिहिले होते 
माझा मी 😀💕 
तुझी तू आहे 😂💞
पण तुझ्या डोळ्यातले अश्रु मात्र माझे आहे 
तुझ्या ओठांवरचे हसू मात्र माझे आहे 
तुझ्या सौंदर्याची परिभाषा .....🌹🌴😎
ती सुद्धा माझीच आहे 
फक्त माझ्यासाठी 
Happy birthday....
My dear sweet friend 💞🌴
भावनेत इतका पोहोचल्या पण 
शब्द जरा वेगळे होते 
नात्याची मर्यादा तुझ्या माझ्यात आहे 
हे मात्र जरा वेळ मी विसरूनच गेले होते 
पण ते तू विसरत नाही हे मात्र खरे 
खऱ्या प्रेमासारखे💕🌴💞🌴🌴

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------

तुझ - माझ( प्रेम कविता )

       एक प्रेयसी आपल्या प्रियकराला आपल्या मनातल्या भावना पुढील प्रमाणे व्यक्त करत आहे. हळूहळू दुःखाच्या पायवाटेकडे जाणे हे आपल्या नात्याला न शोभणारी गोष्ट आहे म्हणून आपण आता सुखद प्रवासाकडे वाटचाल करूया. या शब्दात आपल्या भाव संवेदना सांगत आहे.
       कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद...!!

         ** तुझा -माझा **

तुझ माझ - माझ तुझ आता करायच नाही 
हळव मन आता हळव होऊ द्यायच नाही 

तू तुझ्या ठिकाणी सुखी रहा 
मी माझ्या ठिकाणी सुखी राहील 

यातच आपल  सुख आहे डोळ्यातल्या डोळ्यात 
हलणार पाणी आता मला नको आहे

तुझ्या माझ्या सुखाची पायवाट आहे 
तुझ्या माझ्या दुराव्यात आहे 

तुझ्या माझ्या मनातला भावना माझ्या तुझ्या आहे 
प्रेम समर्पित आहे तुझ्यासाठी तुझ माझ्यासाठी

तुझ्या प्रेमासाठी तुझ्या हसऱ्या डोळ्यांच्या 
त्या हसरा भावनेसाठी आयुष्याच्या सुखद प्रवासासाठी

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
--------------------------------------------------------------------------

माघार

बाबासाहेबांच्या विचारावर चालणारी प्रियसी, तिच्या प्रियकराला हे सांगत आहे कारण आम्ही नवा आरंभा नवयुगाच्या या तत्त्वानुसार आम्ही चालत आहे गावक...