...त्यांचा जन्म किती अडचणींना ,अडचणींना, संघर्षाला सामोर जाऊन होतो. त्याला नवरूप हे त्याच्या त्या संघर्षाची जन्म कहाणी असते. आयुष्य सुद्धा प्रत्येक व्यक्तीला त्या संघर्ष मधून जावे लागते. प्रत्येक वेळी अडचणीवर मात करून नवीन उमेदीने झालेले सर्वच मागे सारून त्याला आपला आयुष्यातील एक नवीन अनुभव म्हणून घ्यावा लागतो.
फुलपाखरू नवीन जन्माने मनसोक्त संचार करतो तसेच आपल्या आयुष्यातील दिवस हा नवीन मनसोक्त आपल्या स्वप्ना वरील साचलेली धूळ नष्ट करीत हसत संचार करावे फुलपाखरू म्हणजे नवीन जीवन प्रवास ज्या जीवन प्रवासात नवीन रंग नवीन रूप नवीन क्षणाक्षणाला आलेला अनुभव स्वतःच्या स्वबळावर काहीतरी निर्माण करण्याची शक्ती ताकत फुलपाखरू म्हणजे नाजूक निसर्ग रूपामध्ये शक्तिशाली होऊन स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारे .
संचार असती चोहीकडे
फुललेल्या फुलात नवचैतन्य
रंगीबिरंगी फुलाच्या सानिध्यात
हिरवळीत असती मैत्रीबंध
जीवन हे असेच रोज नवीन अनुभव घेताना फुलपाखरासारखी शक्तिशाली व्हावे मनातील स्वप्नांना शक्तीशाली विचारांनी पूर्ण करावे. जीवनात अडचणी येणारच पण त्यांना मात करून त्यावर आपल्या विचारांनी आपल्या स्वप्नातील स्वप्नावर मात करावी.
आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला आपण आपले अस्तित्व कायम ठेवायचे पण त्यामुळे इतर दुखावले जाणार नाही याची दक्षता सुद्धा आपल्यालाच करावे लागेल फुलपाखरासारखे नवरुप घेऊन नवनिर्मिती करायचे स्वतःच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनसोक्त करावे.
दर्पण आपली
वलय आपली
कलाकृती ही आपली
मनमोहकताही आपलीच
रंगीबिरंगी रंगांमध्ये सजले
मुक्त स्वतंत्रही!!
सविता तुकाराम लोटे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा