एक प्रवास ....नसलेल्या नात्यांचा
गणित नव्हते त्या क्षणाला
सहजता आणि सहजता शब्दसाखळीला
डोळेझाक लखलखता प्रकाशातील
हिरव्या स्वप्नांची अपुला मधुर शब्दसुराला
सोनेरी किरण आणि एक अद्भुत शांतता मनाला एक नवीन नाते जुळून जाते आणि त्या सहज भाग घेताना वाट सुद्धा नाही की ती सहजता एक शब्दांमध्ये जाऊन पोहचेल पण झर्याला
पाण्याची कमतरता नसते तशी चांगल्या व्यक्तीला सुद्धा नसते
आपले सौंदर्य आपल्या व्यक्तिमत्त्वात असते त्याला किती शांत आणि वास्तविक ठेवायचे हे आपण ठरवीत असतो पण त्या काल्पनिक व्यक्तिमत्वाला खरेपणा पाहणारा दिसत नस तो पण त्या सहज शब्दांमध्ये कितीतरी गोष्टी सहज सांगून जातात ते व्यक्तिमत्त्व खरे असते.
आकाशाला भिडलेले व्यक्तिमत्व आणि पर्वताच्या शिखरावर जाऊन पहाणार्या व्यक्तिमत्त्वाच्या पायात तिथे जाण्याचे स्वप्न सहज आणि सहज शब्द संगतीने सांगून जाणे ही कला त्या सहज पाणीदार सावळ्या रूपामध्ये दिसले ती सहजता त्या क्षणांमध्ये आपल्या मध्ये असावी असे वाटत राहते
ती शांतता मनातील असावी वा नवीन पायवाट शोधणाऱ्या व्यक्ती साठी असावी हे त्यावेळी जरी कळत नसले तरी ती वाट योग्य दिशेने साठी निर्मिती केलेली होती हे नक्की
नयनांच्या स्वप्नाला इतरांच्या स्वप्नाचा
संगतीने सौंदर्य चढविले
सोनेरी किरणांनी आणि हळव्या शब्दांनी
नवीन पायवाट नवीन दिशा नवीन सुर
पूर्णत्वाचे लावून लखलखत
शब्दांची माळ दिली इतरांना
हळव्या पावलाने मावळतीचे क्षण जवळ न देता उगवत्या शन्नांची पावले देताना शब्द जरी खूप वेगळे असले तरी कोमल भावविश्व कणखर आणि दिशा घेऊन असलेली ती दिशा स्वतः किती वर्षे लागली असेल त्यात वैताग नाही त्यात गळणारी स्वप्न कल्पना नाही वाळलले
पण आवाजाची साद नाही ते सर्व .
दाटलेल्या त्याहून पावलांनी देऊन दिलेले दिशा असावी एखाद्या स्वप्नांची त्या दिशेला कणखरपणा असावा वाऱ्याच्या वेगाने जावे पण त्या दिशेसोबत!
कोरड्या शब्दांची माळ नको त्याला ओलावा असावा सांजवेळी च्या हिवाळी दवबिंदू त्या क्षणाला फक्त आपण - आपले आणि फक्त आपल्यात असले तरी एक नवीन दिशा होती नवीन स्वप्नाचा हळुवार स्वप्नातील मधुर पांघरून होते नवीन पहाट स्वप्न देताना.
स्वप्न सुरेल ...हळवे शब्द संगती सोबत
स्वप्न सुरेल ...तळ्याकाठी पावलंसोबत
स्वप्न सुरेल...गुलमोहराच्या हसता रूपासोबत
स्वप्न सुरेल... गुणगुणत शब्दांसोबत
स्वप्न सुरेल...नवीन पाय वाटते सोबत
क्षितिज असावे पण ते मृगजळ नसावे स्वप्न असावे पण कोमेजलेली नसावे व्याकूळ
नसावे पण उगवत्या सूर्यासारखे कोमल असावे स्वप्नाच्या मागे जायचे पण त्याला एक प्रवाह तयार करून एक प्रवास तयार करून नाजूक आणि मधुर शब्दांमध्ये.
मैत्री असावी शब्दमधुरतेने
कोणत्याही वाटेवर सहज होणारी
उगवत्या किरणा सोबत आणि
पाण्यातील प्रतिबिंब सारखे स्वच्छ
सविता तुकाराम लोटे
(मी आणि मी या ब्लॉग वरिलसर्व चित्र गुगल वरून घेण्यात आलेली आहे)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा