विरह
नेहमी विचारायचा अथांग सागराएवढे
प्रेम आहे का तुझ्यावर
पण कधी न बोलले पण आज बोलते
माझं प्रेम आहे तुझ्यावर सागरापेक्षाही अथांग प्रेम होते तुझ्यावर नभाएवढे
माझे प्रेम होते तुझ्या...श्वासाएवढे
श्रृंगारलेल्या माझ्या देहावर नसलेले
तुझे प्रेम माझे होते उफानलेला लाटेसारखे नयनातील आसवांना लपविताना
प्रेम लपविले...पण आता नको
चंद्र गारवा लाटा श्वासही
नकोसा वाटतो...
तुझ्या विरहात!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा