savitalote2021@bolgger.com

मंगळवार, २९ जून, २०२१

विचार मनस्वी *****

              आधुनिक जगामध्ये रोज नवीन बदल होत आहे. माहितीच्या महास्फोटामध्ये आपल्याला सतत बदलावे लागत आहे. जुन्याला सोबत घेऊन नवीन संस्कृतीला सांभाळत जगावे लागते.कधी कधी जुनेस्वप्न आपले पूर्ण होत नाही तरी आपण त्या स्वप्नाच्या मागे धावत असतो. आणि कुठेतरी थांबण्याची प्रक्रिया सुरू होते. आणि आपण या आधुनिक जगात मागे पडत जातात .या भावनेतून निर्माण झालेल्या भावविश्वावर ही कविता आहे. 
      कविता स्वरचित आहे. आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा.



***** विचार मनस्वी *****

मनातील विचार ऐकता ऐकता 
मनाने प्रश्न केला एक 
बदलत चाललेल्या जगात 
आपणही बदलायचे काय? 
मनाला प्रश्न पडतात हेच 
आश्चर्य होते... बदलण्याचे !
अजून काय बदलायचे? हाच प्रश्न 
घेऊन उभासमोर ....

तुझ्यातील जुनाट विचार 
आपण रमू नवीन आधुनिक 
विद्रोही चंगळवाद पिढीमध्ये 
कुठल्याही अटी नियम मान्य न 
करणाऱ्या संस्कृतीत आपण धाव
नवीन स्वप्नांच्या मागे; जुने स्वप्न सोडून 
हाताबाहेर करून...
नवीन संस्कृती आत्मसात करू
भांडू जुन्यासोबत वर डोके काढली की 

स्वप्नानसोबत बदल अटळ नक्कीच 
बदलू ..बदलू आपण मग 
...विचार करता- करता 
मी ही बोलून गेले!  बदलू 
आपण आपल्यातील प्रश्नांना 
उत्तराची अपेक्षा न ठेवता 
नवीन संस्कृतीबरोबर चंगळवादी मनातील 
मन प्रश्नांनाही आणि मनाला 

विचार करतो कसे बदलायचे 
पण बदलू नव्या स्वप्नांसाठी 
नव्या विचारांची थोडी तडजोड करू 
करू जुने  झालेले स्वप्नमागे सोडत 
नवीन बदलाच्या वाऱ्याबरोबर 
मनातील विचार ऐकताना


               ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-***** विचार मनस्वी *****
आपला अभिप्राय खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
      *** धन्यवाद ***

----------------------------------



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...