पायवाटेवरून चालताना आपण सर्व मागे सोडत जातो. पायाखाली रस्ता आजूबाजूची झाडेझुडपे घरे तसेच काहीसे आयुष्याचे ही असतात.आयुष्य जगताना प्रत्येक क्षण काळ वेळ सामोर जात असतं.
प्रत्येकाला आयुष्यात एक वळण येते. सुखाचं असते... कधी दुःखाचं ....या विषयावरची ही कविता....
कविता स्वलिखित आहे आवडल्यास नक्की शेअर करा.
*** चालताना मग ***
समोर जाताना
पावलेही समोर जातील
वेदनाही समोर जातील
सुखही समोर जातील
पायवाट ही समोर जाईल
तसे वळणावरील वळून
आले की मागे सुटतील
सर्व समोर जाणारे
सोबत फक्त चालेल
एक सत्य
जीवन गाण्यातील मंजूळ
सुरांच्या सप्त....
सुरासोबत
जगण्याचे
चालताना मग !!!!
✍️🏻©️सविता तुकाराम लोटे
©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- ** चालताना मग ***
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा
Thank you
----------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा