आठवणी ...
"मनपटलावर ऋणानुबंध आपलेच आपल्यासोबत"
ओंजळीत आठवणी फक्त शिल्लक राहतात कधी फोटोध्दारे ... तर कधी मनःपटलावर...कधी स्मृतीमध्ये..!!! आठवणीचे थेम झेलत नकळत नयनातील पाणी तळहातावर... तुटून पडलेले मन आणि जगण्याची आशा संपलेली विसरता येत नाही ओढ आपुलकी जिव्हाळा ममत्व प्रेम मायेची विरासत!! आतुर झालेले मन एकदा तरी भेटण्यासाठी.
हरवलेल्या मनाला आधार त्यावेळी आठवणींची अंधारमय जिवंत गोंधळात फक्त सोबत असतात मन आठवणींचा दास बनून जाते. मंतरलेले जातात क्षण त्या
आठवणीक्षणमध्ये.
आठवणी ठळक असतात शब्द जरी तंतोतंत जुळली नाही तरी पुसला जात नाही. आठवणी मनाला जोडला जातात. गतस्मृतीवर उमटवून राहतात... रिधममध्ये!!! आयुष्याकडे नवीन पद्धतीने जगायला शिकविते कारण गेलेला क्षण नवीन आठवणी तयार करीत असते.
आठवणींचे धागे उसवले जातात. मनाच्या व्यथे बरोबर कधी सुखद कधी दुखत फक्त त्या वेळी कोसळत असलेल्या नयन भरायच्या दुःख सतत मनाला होत राहतात. जवळ किती ही सुखद वातावरण असले तरी जखमा वर डोके करतात. आठवणी स्वरूपात...
मनातील सांजेची रडवेली होते भेटीसाठी निरागस हवे होते ते व्याकूळ झालेला मनाला पावसासारखे मनसोक्त कुठेही पडावे वाटते पण तसे होतच नाही. मन डोंगरावर फक्त आठवणींचा पाऊस साठविला जातो. मनाला कसतरी समजावून आपण आपल्या आठवणीत रमतो पुन्हा पण आठवणींच्या सावल्या इतक्या गडद असतात की त्या क्षणांना त्या क्षणांच्या आठवणी निरर्थक करता येत नाही.
आठवणींच्या कणाकणात... मन प्रतिबिंब फक्त गुरफडत राहते. आठवणी खूप
दुखद- सुखद तरी मनात त्या गतकाळातील आठवणी उमटत राहतात उन्हाळ्याची दाहकता आयुष्यभर सहन केल्यानंतर सुखद पावसाळी थेंब मनाला हळुवार फुलविण्यासाठी मदत करतात... याच आठवणी..!!
मन भिजविता भिजविता नयन भिजवून जातात... बदलेले वारे आपले नसल्याची जाणीव करून देतात याच आठवणी सगळे बदलून जाते अगदी मनातील फुलपाखरू सुद्धा पुढच्या क्षणाला परत मनात दाटून येतात.
आठवणी थरथरत्या हातांनी ओलावलेले डोळ्यांनी आनंदासाठी आसुसलेल्या क्षणानी सोबतच हवी असते या क्षणासाठी निशब्द क्षणांनी रमणाऱ्या वेगवेगळ्या वाटेनी भलत्याच दुःखद रडवले अशा क्षणांसाठी रडवत असलेल्या आपल्या आताच्या क्षणांसाठी.
खरंतर आठवणीन काढावे लागत नाही त्या येतात ....सहज आतुर झालेल्या मनाला मुक्कामी असलेल्या आठवणी स्वप्नसाखळी प्रमाणे नात्यात नात्यात घट्ट बांधलेली असते. विचारांची माळ मनसागरामध्ये तहानलेल्या मनाला आत्मविश्वास निर्माण करून देतात. कितीही वादळे आले तरी आठवणी...!!!!!
आठवणींच्या महापुरात
फक्त नयन ओले
आठवणी साठवत साठवत
फक्त शब्द ओले
आठवणीत पुरविले जातात
फक्त अडखळ शब्द
आठवणीत फक्त प्रश्न
उगाच त्रासदायक
आठवणीत अनोखीसोबत
फक्त विचलित
आठवण नटलेली फुललेली
फक्त मनात
आठवण लपविणारी
फक्त हुरहुर सहवासाची
आठवणी आठवणी आणि आठवणी पहाटेच्या उगवता सूर्यकिरणासारखी मनोमन बळ देणारी.... रमणारी..!!
आठवणी रेखाटतातच
सगळे रंग क्षणांच्या
उमललेल्या पावलांची
भिजलेल्या नयनांची
फोटेंसोबत आठवणींच्या
चिरकाल राज्य मनावर सततच
नयन थेंबासोबत गीत म्हणतात. शांता- अशांत मनात आठवणी व्याकुळ करीत राहतात.... आठवणीसोबत !!
न उमललेले क्षण आठवणी
न समजलेले क्षण आठवणी
न रमलेले क्षण आठवणी
न झालेल्या क्षण आठवणी
न आलेले आताचे क्षण आठवणी
येऊ पाहणारे क्षण आठवणी
आठवणी आठवणी फक्त आठवणी मनसोक्त म्हणाला मनाला फुलविणारा आणि रडविणार या दोन्ही आठवणीच.!!!!
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- आठवणी ...
"मनपटलावर ऋणानुबंध आपलेच आपल्यासोबत"
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!
Memories ...
"Debt bond with you is on your mind"
Only memories remain in the palm of the hand, sometimes through photos ... sometimes on the mind ... sometimes in memory .. !!! Without knowing the theme of remembrance, the water in the eyes is on the palm of the hand ... The broken heart and the hope of survival are gone, it cannot be forgotten. The anxious mind to meet at least once.
The support of the lost mind is only accompanied in the dark living confusion of memories at that time. The mind becomes a slave of memories. Those are the moments that are enchanted
In remembrance.
Memories are bold. Words are not erased even if they are not exactly matched. Memories are attached to the mind. They live on past memories ... in rhythm !!! Teaches to live life in a new way because the past moment creates new memories.
The threads of memories are unraveled. The pain of the mind, sometimes pleasant, sometimes painful, only the pain of filling the eyes that are falling at that time, is constantly happening to the mind. No matter how pleasant the atmosphere is, the wounds are still on the head. In memory ...
The evening was crying in my mind. I wanted innocence for the visit. The anxious mind wants to fall anywhere like rain, but it doesn't happen. Only a rain of memories is stored on the mind mountain. We play with our memories again by explaining to the mind but the shadows of memories are so dark that the memories of those moments cannot be made meaningless.
In the particle of memories ... the reflection of the mind just keeps gurgling. Lots of memories
Sad- pleasant but the memories of the past keep lingering in the mind. After enduring the scorching heat of summer for a lifetime, pleasant raindrops help to soften the mind ... the same memories .. !!
When the mind gets wet, the eyes get wet ... The changed winds make you realize that you are not yours. The same memories change everything.
Memories need to be accompanied by moments of joy with eyes wet with trembling hands.
In fact, memories do not have to be taken away. A string of thoughts builds confidence in the thirsty mind in the ocean. No matter how many storms come, memories ... !!!!!
In a flood of memories
Just wet eyes
Storing memories
Just the words wet
Memories are provided
Just stumbling words
Just questions to remember
Just annoying
With a unique memory
Just distracted
Blooming memories
Just in mind
Hiding memories
Just a flurry of companionship
Memories, memories and memories that give mental strength like the rays of the rising sun in the morning .... rejoicing .. !!
Memories are drawn
All color moments
Of boiled steps
Of wet eyes
Memories with photos
The state of mind forever
Says the song with Nayan Themba. Shanta- Memories keep disturbing the restless mind .... with memories !!
Memories of unfulfilled moments
Memories of unexplained moments
Memories of unplayable moments
Memories of unfulfilled moments
Memories of the present moment that did not come
Memories of moments to come
Memories, memories are just memories, both heart-warming and crying memories. !!!!
✍️🏻©️®️Savita Tukaram Lote
✍️🏻©️®️Savita Tukaramji Lote
Title: - Memories ...
"Debt bond with you is on your mind"
Feel free to leave a comment in the comment box and don't forget to like and share.
Thank you .. !!
----------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा