माझी-तुझी प्रेममिठी
.....एक बंध असलेले!!
स्पर्श हळवा...
तुझ्या माझ्या प्रेमाचा
श्वास हळवा....
तुझ्या माझ्या प्रीतीचा
गंध हळवा .....
तुझ्या माझ्या बावऱ्या मनाचा
ओंजळ हळवी .....
तुझ्या माझ्या सांज प्रितीची
प्रेम असच फुलत गेले आणि गळ्यात एक मंतरलेले वळण मिळाले. सुखाच्या वाटेवर चालताना नयनांच्या पापण्यांच्या किनार्याला ओलावा आलाच नाही. मनाच्या गाभार्यात रेखाटलेले तुझ्या- माझ्या प्रीतीचे चित्र पूर्णपणे मनासारखी होते. माझ्या नित्य हरवून असलेले मन उस्फूर्तपणे तुझ्यासोबत चालत होते.
उमललेली कळी नवीन अस्तित्वाची नवीन कहाणी असते.... नवीन कथा असते... नवीन श्वास असतो. तसेच तुझ्या माझ्या प्रेमाचे आनंदित गेलेले ते क्षण अजूनही त्याच रंगरूपात रेंगाळत असते. गळ्यातल्या जिवलग दागिन यासारखे नव्हे तो दागिना माझाच आहे, अजूनही..!!!
तुझ्या माझ्या मिठीतील हळुवारपणे मंद प्रकाशात तुझ्या हाताने घातलेला तो क्षण आठवला की अजूनही तो क्षण माझ्याच हातात आहे. माझ्याजवळ आहे असे वाटते.
फुललेल्या प्रीतीला अधिकच, फुललेली मंतरलेली रात्र आणि अलगद दोघांचे अस्तित्व एक झालेले "ती मिठी," म्हणजे अर्ध पूर्ण असलेल्या मनाला पूर्णत्वाला देणारी.
उमललेल्या कळ्या पानाफुलात लपून छपून नव अस्तित्वाची जाणीव देऊन जाणारी पण तो सुगंध तो श्वास ती प्रतिमा ते अक्षरे ते शब्द ते बंध तो सुखाचा क्षण त्या उमललेल्या रात्र ते चढलेले रंग त्या क्षणाला मन गाभाऱ्यातील आनंदित पाने त्या रेखाटलेली आकृती सर्व काय आता असून नसलेले....!!
...... असे का व्हावे की आता त्या मिठीत माझे अस्तित्वच मिळत नाही. उमललेल्या भावना क्षणात हरवून जातात. अलगद हळुवार प्रेम मिठी दुराव्याच्या खोल दरीत दुःख सरकत जाते. असते.., अजूनही उमललेली पूर्णपणे मिठीत येण्यासाठी पण हरवून गेलेले मन आता अस्तित्वाची जाणीव लपून छपून का होईना देऊन जाते,त्याच्या मिठीत.
आठवणींच्या पाणावलेल्या डोळ्यांनी
मिठीत अजूनही विरहाचे
सोंग न करिता रित्या-रित्या
शब्दांची मंदमिठी जाणिवेची
खरंच प्रत्यक्षात कठीण वाटणारी गोष्ट आता अस्तित्वात येऊ पाहते आहे. हरवलेले ते सुगंधित क्षण इथे संपेल का??? त्या प्रेमाचा सार्थकी अनुभव फक्त निरोपाची वाटत असेल का?????? कोमेजलेल्या रेंगाळलेल्या दुराव्याचा आता त्या कठीण प्रसंगात जावे लागेल का ??????
अगणित भावना, निष्पाप प्रेमभावना, अग्निदिव्य नसावे. माझ्या त्याच्या अंतर्मनात असावे चैतन्य!! गाभाऱ्यात. उगाच अस्तित्वाच्या जाणिवेने नव्या भावना इच्छा-आकांक्षा यांचा सोहळा होईल का. नात्याला नवीन मुलायम अत्तराचा सुगंधित शब्द श्वासांचा येईल का ?परत त्याच टपोर चांदण्यात..!!
तुझीच मिठी माझी
अखेरचा श्वास
अवेळी आली तरी
एक बंध असलेले
तुझी माझी प्रेममिठी
अक्षरांना मिटवावे तर अस्तित्व मिळते आणि अस्तित्वाला मिटवावे तर जाणिवा मिटतात व जाणिवेला मिटवावे तर भावनाशून्य आयुष्य पदरी येते. तर मग कशाला मिटवावे... संपवावे..!!
सैरभैर भावनेने तर कधी शांत स्थिर भावनेने अंतर्मनात प्रश्नांचा गुंता असतो. स्मृतिगंध मनात बिलगून असतो. तो स्मृतिगंध मनाला दुराव्यात रूपांतर करू देत नाही. तो दरवळ फक्त प्राजक्तांच्या फुलासारखा मिळावा की टवटवीत फुललेल्या गुलाबाच्यासारखा मिळावा माहित नाही.
पण ती आस मनाला अस्तित्वाच्या प्रश्नचिन्ह येऊन जाते. त्यावेळी नको असते ती प्रेममिठी नको असते. तो सुगंधी वारा नको असतो.... हळुवार स्पर्श तुझ्या माझ्या प्रितीचा. हरवलेले क्षण असावी असे सतत वाटुन जाते. पण प्रेम ही एक भावना नसून आयुष्या आहे. जीवन आहे. त्यात कितीही अस्तित्वाचे धागे दोरे येत असले तरी ती प्रेम मिठी माझी तुझेच अस्तित्व नाही तर आयुष्याच्या ओल्याचिंब टपोर चांदण्यात खळखळणारा झरा आहे.
अस्तित्वाचे नवीन नाव तुझी ती मिठी आहे पण स्वतःच्या जाणिवेने तीही प्रत्येक अग्निदिव्यातून पार करत. स्वतःच्या जाणिवेला एक बंध असलेली प्रेम मिठी आहे. माझ्या तुझ्या अस्तित्वाची..!!
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- माझी-तुझी प्रेममिठी
.....एक बंध असलेले!!
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!
🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा