savitalote2021@bolgger.com

सोमवार, ७ फेब्रुवारी, २०२२

प्रकाशाची प्रकाश झाली

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला मोलाची सोबत देणारी माऊली म्हणजे, 'रमाई'.  रमाई त्यांची सोबत मिळाली नसती तर बाबासाहेबांच्या कार्याला शून्यातून जग निर्माण करता आले नसते.
             त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम. रमाई यांच्या संघर्षाला शब्दात मांडता येत नाही... तरी हा थोडाफार प्रयत्न मी केलेला आहे.

         ही कविता त्यांच्या संघर्षाला समर्पित करीत आहे. चुकल्यास माफी असावी.
          कविता स्वरचित व स्वलिखित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

*** प्रकाशाची प्रकाश झाली ***

भिमाच्या संघर्ष लढाईला 
रमाईने सोबत दिली 
जळत्या दिव्यासारखी 
वात होऊन 
बाबासाहेबांच्या कार्याला 
प्रकाश दिला
अंधार असला तरी 
वाती खाली 
प्रकाशाची प्रकाश झाली 
रमाई माझी 
त्याग तुझा अफाट 
तुझ्या जीवनगाथेतील 
चांगुलपणा तोच होता 
तुझ्या आयुष्याच्या 
संघर्षगाथेचा... 
प्रणाम रमाई माता 
तुझ्या त्या संघर्ष जीवनाला 
प्रणाम रमाई माता 
तुझ्या त्या कोवळ्या 
बालमनातील संस्काराला 
प्रणाम रमाई माता 
आई झालीस तू 
दीनदलितांच्या विजय गाथेची 
दीनदलितांच्या विजयगाथेची.....

            ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे 


©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- प्रकाशाची प्रकाश झाली

              आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

----------------------------------



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...