savitalote2021@bolgger.com

शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०२२

प्रॉमिस माझे ऐकण्याच्या भूमिकेत...Happy promise Day

 .....प्रॉमिस माझे 
      ऐकण्याच्या भूमिकेत...

      सांगतो तो, ऐकते मी, बोलतो तो, ऐकण्याच्या भूमिकेत असते मी सतत...!!

सांग वेड्या मना 
असे का व्हावे 
शब्दमाझ्या जवळी आहे 
तरी भूमिका का ?
अबोल होते....!!


         पण मला सतत वाटून जाते, हीच भूमिका का घेतली असेल; मनात परत प्रश्नांची चाहूल सुरू होते आणि एक प्रवास उत्तरांचा मनातच..! पण प्रत्यक्षात मात्र ऐकण्याच्या भूमिकेत असते.

         कधी कधी ही चलबिचल आईचाही लक्षात आपल्याही नकळत येऊन जाते  आणि आई बोलून जाते, प्रश्न नकोत पण प्रश्न येतात तिच्यासमोर आणि असे प्रश्न विचारले जातात.

       आपण प्रत्येक वेळी ऐकण्याच्या भूमिकेत का असायचे?  कारण आपल्या समोरच्या व्यक्तीवर आपल्यापेक्षाही जास्त प्रेम करीत असतो. आपले अस्तित्व..  आपले शब्द... आपले राहणे.... आपली विचारशैली,आपली भावशैली आणि आपली बोलशैली त्याची असते. 

     आपले अस्तित्व म्हणजे,"तो स्वतः ,असतो .म्हणूनच त्याच भूमिकेत दैनंदिन जीवन मार्ग समोर जावे लागते.

           खरंच असे असते का. माहित नाही? पण आई याच गोष्टीवर अधिक लक्ष केंद्रित करीत असते. जीवन इतके सोपे असते... आपले अस्तित्व त्याचे असते. आई सहज बोलून जाते, हो!! प्रेम आपल्याकडून सर्व काही करून घेते आणि त्यासाठी तो सुद्धा आपल्याकडून आपल्यालाही हवी तेसुद्धा सर्व करुन घेत असते. 

      माहित असते, आपली मर्यादा, आपल्या सर्व भावना ,भावविश्व आणि आपले अस्तित्व. फक्त आपल्या प्रेमामुळे. मग त्यात त्याचे प्रेम नसते का? उत्तर प्रत्येक वेळी नाही किंवा असू ही शकते. हे मग प्रेम कुठे असते माहित नाही?

        सर्वच गोष्टी अधांतरी.तसेच तर आपली भूमिका नेहमीच ऐकण्याची का असावी आणि ती का असू नये. हा प्रश्न या प्रश्नाचे उत्तर मात्र नखशिखांत प्रश्नचिन्ह समोरच असते. कारण आपण ऐकण्याच्या भूमिकेत असतो.

शब्द माझे आहे 
शब्द त्याचेही आहे 
जडत्व मात्र त्याच्या शब्दांना 
कोमलता मात्र ऐकणाऱ्याच्या भूमिकेला   
वाट कोणतीही असो 
सुखाची आनंदाची 
वा.. ...
दुःखाची यशस्वितेची...!!!


            आईचे हे शब्द नेहमी तिने तिच्या संस्कारांमध्ये माझ्यामध्ये घातले. आपण कितीही मोठे झालो तरी, ते संस्कार आपल्यातून उणे करू शकत नाही आणि परंपरा, संस्कृती कुठेतरी मागे पडतात. संस्कारांसमोर!

          कारण हेच संस्कार आपल्याला उडण्याची शक्ती देतात. आपल्या हातात विश्व समावून घेण्याची शक्ती देतात. आत्मविश्वास एकवटतात. पंखाना आकाशी उडण्यासाठी बळ देतात आणि जिंकण्याच्या मार्गावर एक एक पाऊल समोर जात जात, आपले स्वप्न आपल्या इच्छा आपल्यातील आपलेपणा जागृत ठेवून ते मिळवीत असतो.

       एक चांगले व्यक्तिमत्व घडत असते आणि  हीच आपली शक्ती असते... यशस्विता असते. 

पंखांना बळ मिळाले संस्कारांचे 
संस्कारांना बळ मिळाले स्वाभिमानाचे 
स्वाभिमानाला बळ मिळाले संघर्षाचे 
संघर्षला बळ मिळाले यशस्वीतेचे 
चांगल्या व्यक्तिमत्वाचे 
चांगल्या संस्काराचे 

        म्हणूनच चांगले संस्कार कधीही हरत नाही. आणि कधी जिंकत नाही. तर ते आपल्यासोबत असतात... यशस्वी व्यक्तिमत्व बनून..! (व्यक्तिपरत्वे यशस्वितेची व्याख्या वेगवेगळी असते ) म्हणून प्रत्येकाने स्वतः स्वतःची प्रॉमिस करा.

       मी एक चांगली व्यक्ती म्हणून या समाजात मानसन्मान मिळेल. यश-अपयश यामधील गणितात न राहता येणाऱ्या संघर्षाला समोर जात... स्वतः स्वतःचे एक विश्व तयार करील. पण चांगल्या संस्काराच्या साक्षीने आणि एक प्रेमळ मायाळू मनाने.!!!!

       संघर्ष कितीही असला तरी, यशस्विता कितीही असली तरी आणि पैसा कितीही असला तरी. "चांगले व्यक्तिमत्व, आपल्या आयुष्यातील शिदोरी आहे." ती कोणतीही घटना प्रसंगांमध्ये ती आपल्या सोबत असते आणि आपल्या त्या संस्कारांची पोचपावती असते आपले व्यक्तिमत्व. प्रॉमिस (promise)  करा स्वतः स्वतःसाठी....Happy promise Day...!!! 

        आपण कोणत्याही भूमिकेत असलो तरी. ती भूमिका ऐकण्याची असो... बोलण्याची असो.... ती कुणावर जीवापाड प्रेम करणाऱ्या भूमिकेत असो.... कारण चांगले व्यक्तिमत्व हे कधीही कोणत्याही भूमिकेत यशस्वी होत असतात. कारण आपण स्वतः स्वतःशी प्रॉमिस केलेले असते. आपल्या संस्कारांना!! 

जगण्याची आशा माझी तू 
स्वप्नाची माळ माझी तू 
आणि प्रेमळ नात्याची  सुरुवात 
माझ्या तुझ्या रेशीमगाठीत 
फक्त मी सोबत तुझ्या 
आणि तू सोबत माझ्या 

      मी ऐकण्याच्या भूमिकेत असले तरी निर्णायक भूमिकेत असते. तुझ्यासोबत; सदासर्वदा. माझ्या सोबत ..! माझ्या शब्दांच्या पलीकडे आणि अलीकडे तुझे अस्तित्व असले तरी माझ्या त्या भूमिकेला जोड मात्र नेहमी माझ्यावर झालेला माझ्या आईचे त्या शब्दांशी केलेले मी प्रॉमिस असते.

        एक चांगली व्यक्ती घडविण्यासाठी तिने केलेले सततचे प्रयत्न असते ते. मी तुझ्यासोबत कोणत्याही भूमिकेत असले... तरी एक स्त्री म्हणून स्वतःच स्वतःशी केलेले प्रॉमिस असते.  प्रत्येक व्यक्ती हा कोणत्या ना कोणत्या भूमकेत असतो.
म्हणून स्वतः स्वतःसाठी प्रॉमिस करा...

        मी कोणत्याही भूमिकेत असले तरी, मी माझे प्रदर्शन हे संस्कारित व्यक्तिमत्त्वाचे असेल. जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत मी माझे व्यक्तिमत्व यशस्वीतेच्या त्या पायवाटेवर कायम कोरून ...पेरून ठेवेल.
 
हॅपी प्रॉमिस डे ऑल माय फ्रेंड्स..!!



©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-     प्रॉमिस माझे 
                      ऐकण्याच्या भूमिकेत...

             आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका ....!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...