savitalote2021@bolgger.com

सोमवार, ४ एप्रिल, २०२२

स्पर्श

 प्रेम ही संकल्पना कुठल्याही बंधनामध्ये बांधली जाऊ शकत नाही. हे नातं फुलत असताना असलेल्या आकर्षण मनालाही आणि भावनेला सुद्धा काही वेळी बंधन घालू शकत नाही.
         अशाच प्रेमाची गोष्ट जे फुलत आहे. पण अचानक भावनेने आकर्षण निर्माण केले. फुलत असलेले नाते, संवादाविना अर्धवट राहिले.
        या भावविश्वातून ही कविता स्वलिखित व स्वरचित लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया जरूर नोंदवा.धन्यवाद...!!!

......स्पर्श.....

ती रात्र काही वेगळीच होती 
त्याची माझी सोबत होती 
रातराणी सुगंधी झाली होती 
मोगरा फुलत होता 
गुलाब टवटवीत झालेला होता 
रस्ताच्या कडेवरी केशरी गुलमोहर चांदण्यांबरोबर हसत होता 
बाल्कनीत मी आणि तो 
शांततेबरोबर,सहज उभे होतो 
तो चोरनजरेने पाहात 
मी ही त्याच नजरेने 
पण संवाद मनमोकळा 
चालूच होता;
ती शांतता काही क्षणात अधिकच 
शांत झालेली 
नजरानजर झाली मनात 
चलबिचल चालूच 
क्षणात.... 
त्याचे ओठ माझ्या ओठांवर 
माझे ओठ त्याच्या ओठांवर 
कधी आले कळलेच नाही 
मलाही माहित नसलेली 
त्यालाही माहीत नसलेली 
स्पर्शाची भाषा शिकविली 
त्या रात्रीने आणि त्यानंतरच्या 
भेटी टाळाटाळीत 
नंतर संवाद संपला 
चोरनजर संपली 
बोलणेही संपले 
आणि भेटणे ही!
संपले त्या रात्रीनंतर फुलत 
असलेले एक नाते 
संपुष्टात आले 
ती रात्र काही वेगळीच होती 
त्याच्या माझ्या प्रेमाला 
स्पर्शाची भाषा देऊन 
अर्धवट ठेवून गेले 
अर्धवट ठेवून गेले 
फुलत असलेल्या नात्याला 
फुलत असलेल्या 
नात्याला स्पर्शाची भाषा 
देऊन.....!!
        ©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
        शीर्षक :- *****  स्पर्श *****

           आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

----------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...