savitalote2021@bolgger.com

बुधवार, २८ जून, २०२३

त्याच्या काळाभोर गालावर पावसाचे चिंब भिजणे पावसात..!!" प्रेमळ आठवणींचा संच...!

**** त्याचा माझा पाऊस  💕****


" त्याच्या काळाभोर गालावर पावसाचे चिंब भिजणे पावसात..!!"
  प्रेमळ आठवणींचा संच...!

✍️ सविता सूर्यकांता तुकाराम लोटे  

     आज राहून राहून एक आठवण मनात येतच आहे. पहिला पाऊस आणि त्याची माझी भेट ही नकळत झालेली.
       ....... पण पहिला पावसाच्या आगमनाने ती आठवण ताजी होते. स्वप्नाच्या मागे धावता धावता विसावा चा क्षण म्हणजे ती आठवण.
         पाऊस ओला चिंब झालेला. पाऊस त्याच्या अंगावर ओला चिंब झालेला. छत्रीचा झालेला चित्र विचित्र आकार आणि तो त्याच हसू..!! हातातली चप्पल शक्य तर आपण पायात घालतो पण ती त्याच्या हातात होती.
      आताही ते सर्व आठवले की ओठांवर हसू मात्र येते.😄😄😄🤣 आत्ताही बाहेर पाऊस चालू आहे. तसाच माझ्या मनातही.
               आठवणींचा पाऊस चालू आहे. पावसासोबतच्या खूप आठवणी मनात येत आहे पण पावसात भिजावे असे मात्र वाटत नाही. पावसाळी वातावरण खूप छान आहे. वातावरणातला गारवा मनाला आठवणींच्या पावसात घेऊन जात आहे. पण त्या आठवणीवर मर्यादा मात्र ढगाळलेल्या वातावरणात मीच माझी आवर घालत आहे.
       असो, ही आठवण काल-परवाची नाही तर कित्येक वर्षाची आहे. कदाचित तेव्हा प्रेम नावाच्या शब्दाशी संपर्कही आला नव्हता. तेव्हा तो आलेला अनुभव आणि पाऊस आणि आणि तो !!
       फक्त त्या क्षणाला प्रेम म्हणावे असे आज वाटून जाते. हातातली चप्पल पायात जाते, क्षणात.पण आत असलेले बालपण साचलेल्या पाण्याबरोबर चालूच असते.
           मातीने नाही; चिखलाने माखलेले कपडे आणि त्याच्या काळाभोर गालावर पावसाचे थेंब. 'आई मारेल',  या विचारात असलेली मी पण तो बिनधास्त होता मी हसत होते त्याच्या या बालपणावर बालपणातच बालपणावर हसणारे कदाचित मीच असेल..!
      आता मात्रा हसू येत आहे. ती आठवण आजही मनाला हसू आवरत नाही. ज्युनियर कॉलेजचे दिवस काहीशी मोठी झालेली पण बालपण न संपलेले ते दिवस पण तेव्हा वाटायचे आपण फार मोठे झालो. कारण कधी तसे न भिजलेली मी आणि तो मात्र त्या पावसात चिंब भिजून साचलेल्या पाण्याचा आस्वाद घेत.
        आई ओरडेल रागवेल याची तमा न बाळगता बिनधास्त बालपणाची मर्यादित रेषा ओलांडत मोठे झालेल्या भावनेसोबत आपल बालपण enjoy  करत होता.
       तसे कधीही करता आले नाही हा अनुभव घेताच आला नाही. हा अनुभव फक्त बघता आला. त्याची माझी पहिली भेट❤❤ त्याचे मोठे झालेल्या बालपणात आणि माझे बालपण कधी संपले कळलेच नाही आणि आजही कळत नाही.
       पाऊस "तो आणि मी"हा अनुभव फक्त आम्ही एक एकट्याने घेतला. तो पावसात भिजायचा मी फक्त बघत राहायचे. मी छत्रीच्या छायेमध्ये आणि तो खुल्या आकाशाच्या पाऊस भरल्या छायेमध्ये. तरी आम्ही पाऊस enjo6 करत होतो. मी न  भिजता आणि तो  भिजून..!!💔😄🤣

        माझ पहिल प्रेम पाऊस. दुसर प्रेम पुस्तक. तिसर प्रेम कदाचित तो!!........ आणि त्यानंतर कधीच कोणत्याच प्रेमात न पडलेली मी??
        पण अनुभव ती आठवण मनात इतक्या वर्षानंतरही तशीच ताजी टवटवीत आहे. आता जावे वाटत होते त्याच्यामागे. त्या पावसात भिजण्यासाठी. मी भिजले असते. मी माझे बालपण हरवले नसते. मी माझे मोठेपण हरवले नसते.
          पण म्हणतात, स्त्री म्हणजे अशी व्यक्ती ती कधीही तिच स्त्री पण हरवत नाही. निसर्गाने त्यासाठी तिला इतरांपासून थोडे वेगळे केले आहे. बालपण हरवलेले मोठ्यांची मोठेपणा आलेले तरीही मोठे झालेले आम्ही मुली. आठवणी खूप सुंदर असतात आणि अशा आठवणी तर खूपच सुंदर असतात.
          पाऊस तो आणि मी हे शब्द त्याच्या माझ्या नात्याला ओलावा देऊन जातो. माझे हसू त्याचे हसू त्याचे पुस्तके माझ्या हातात माझ्या छत्रीच्या छायेमध्ये आणि तो ओलाचिंब पावसात चिंब झालेला.
      आता वाटून जाते,तेही दिवस खूप सुंदर होते. मर्यादा होत्या. साधने कमी होते. आधुनिकतेची सुर लय नसलेले ते दिवस फक्त स्वप्नांच्या मागे धावणारे होते. आणि असे काही अनुभव, अशा काही आठवणी असे काही मित्र न झालेले कधीच.
         फक्त छत्रीत पुस्तके तेवढी सुरक्षित राहावी म्हणून. तोंड ओळख असलेले पण ते मित्र मैत्रिणी हे खूप सुंदर होत्या. कारण त्या मैत्रीत स्वार्थीपणा नव्हता. होती फक्त आपुलकी जिव्हाळा.
       प्रेम माझे त्याचे नाते असेच. कुणालाही माहीत नसलेले पण नात मात्र होते.
      माझ मोठेपणाच आणि त्याचे बालपणाचा.❤ हे नाते हे खूप विचित्र होते. खूप दिवस हे नात आमच्यात होत. पण एक दिवस हे नाते बदलले.
          मी लहान झाले आणि तो मोठा. मोठेपणाचे काय दुष्परिणाम असतात त्यानेही अनुभवले. मी अनुभवले होते तसेच आणि मी लहान झाले लहानपणाचे काय फायदे आणि नुकसान असतात तेही मी अनुभवले.
        गोरीपान असलेले मी, काळाभोर असलेला तो!! दोघांच्याही स्वभावात असलेला जमीन आभाळा एवढा फरक. तरीही आम्ही एक होते. कारण पाऊस मी आणि तो हे कॉम्बिनेशन आमच्या होते. 
         तो अनुभव आहे एकत्र अनुभवला होता. मी कोरडे राहून आणि तो ओला होऊन. पण भावना मात्र एकच होत्या. एकमेकाबद्दल आदर ....एकमेकाबद्दल अबोल प्रेम..... एकमेकाबद्दल सुरक्षिततेचे भावना. असे कितीतरी वाईट प्रसंगात तो दुरूनच का होईना एक आधार द्यायचा.
        एक अभिमानाची थाप द्यायचा. एक स्वाभिमानाची ओळख निर्माण करायचा. जेणेकरून तो माझ्यासोबत होता. ते दिवस एकटीच होते. ते दिवस फक्त त्याच्या सोबतीने त्याच्या अबोल प्रेमाने त्याच्या सुरक्षित देहबोलीने केलेला तो प्रवास आयुष्याच्या प्रत्येक एकटीच्या प्रवासात आजही आत्मविश्वास देत असतो.
         त्याचे एक शब्द आजही मला तितकाच गंभीर आणि शांत करून जातो. तो म्हणजे आयुष्यात आपण आहोत आपले आहे यापेक्षा ,"मी सर्वांसाठी आहे सर्व माझ्यासाठी आहे." हे वाक्य मनाला बळ देऊन जाते. 
       हे शब्द घाबरट आणि प्रत्येक समस्येपासून पळ काढणाऱ्या एका मुलीला सांगत होता. अबोल होऊन कधीच कुणाला हे प्रेम कळले  नाही, हेच विशेष. पण तो इतका मोठा प्रवास फक्त अबोल होऊन आम्ही अनुभवला होता.
         माझा प्रवास अभ्यासासोबत चालू झाला आणि त्याचा प्रवास जबाबदारीने. जबाबदारी काय असते हे त्याच्याकडून शिकले पण अभ्यास काय असतो हे मात्र तो शिकलाच नाही.
         प्रत्येक वेळी प्रत्येक प्रसंगात त्याने त्याचे बालपण मात्र सोडले नाही. मोठ्याची लहान झाली. मी एका क्षणानंतर लहान असलेली मी वयाने मोठीही झाले, मी एका काळानंतर.
        पण तो मात्र तसाच बालपणात रमणारा. इतके वर्ष झाल्यानंतर सुद्धा काही वर्षा आधीची आठवण ताजीच आहे. असाच बस स्टॉप वर  भिजताना परत पाहिले. तशीच हातात चप्पल तशीच छत्री तसेच चिखलाने माखलेले कपडे आणि तसाच काळाभोर गालावर पावसाचे  थेंब हसाव की रडावे  हेच कळत नव्हते. 
       कारण माझ पहिल प्रेम पाऊस असला तरी त्या पावसात भिजलेला तो व्यक्ती माझे पहिले प्रेम होते. त्याने त्याचं बालपण अजूनही जिवंत ठेवला आहे. आयुष्याच्या या रंगमंचावर कितीतरी अनुभवाला समोरे गेल्यानंतरही त्याने त्याच लहानपण जिवंत ठेवला आहे. आणि मी आजही तसेच कोरडे बालपण कधी निघून गेले कळलेच नाही.
         त्याच्यासाठी कधीतरी लहान झाले. कधीतरी मोठे झाले पण एकही शब्द न बोलता. तो मात्र बोलून गेला. मी लहान आहे अजूनही. मी रमतो माझ्या त्या आठवणींसोबत. कारण 
माझे पहिले प्रेम त्या छत्रीत असलेली कोरडे माझ्याच पुस्तकांचे ओझे घेऊन उभी असलेली ती माझ्याच वयाची पण काहीशी मोठी झालेली विचाराने.

       त्या मुलीच्या अबोल प्रेमाची साक्ष हा पाऊस देत असतो. खूप वेळ निघून गेला, त्या आठवणीत आता मन जास्तच रमते.कारण ते दिवस आता परत येणे नाही आणि तो अनुभव आहे.
       कारण मला भिजायचे आहे त्याच्यासोबत!! त्या पावसात चिखलाने माखायचे आहे. पांढरा शुभ्र घातलेला ड्रेस मध्ये मला भिजायचे आहे. माझ्या पहिल्या प्रेमासोबत.त्याच्या पहिल्या प्रेमासोबत ..!!       त्याच्या- माझ्या त्या प्रत्येक अबोल क्षणांसोबत त्या काळा छत्रीच्या आत असलेली सुकलेली ड्रेसची त्या इस्त्रीच्या ड्रेस ला आता त्या पावसात त्याच्या त्या बालपणात भिजायचे आहे. 
        आता बालपण नाही. आता मोठेपण नाही. आता संघर्ष नाही. आता समस्या नाही. आता मर्यादा नाही.आता ते प्रेमही नाही.आता तो जिव्हाळाही नाही. आता तो आत्मविश्वासही नाही आणि आता ते हातात पुस्तके ही नाही.
         आता फक्त प्रवास आहे,उरला सुरलेला. आता फक्त प्रवास आहे येणाऱ्या प्रत्येक क्षणांसोबत. हसून जगायचे की रडून जगायचे हे ठरवणारा. आता फक्त आठवणी बालपणाच्या त्या कोरड्या वाटेवरच्या तरीही त्याने या सर्वांमध्ये त्याचे बालपण टिकून ठेवले.
       अजूनही हे मात्र आश्चर्यच आहे कारण असे बालपण टिकवणे ही एक कसरत असते. आयुष्याच्या जीवन प्रवासात. पण असो,.....!
         पाऊस आला की आठवण मात्र येते. पावसात सोबत मात्र असायचे कधीही एकटीचा प्रवास झाला नाही. अबोल का होईना त्या वयात मनाने प्रेम मात्र करून घेतले. पावसात भिजले. तो नसताना मनसोक्त रडून घेतले. त्या पावसात भिजून तो नसताना पावसाच्या प्रत्येक सरी सोबत मी त्याच्या प्रेमाची कबुली मात्र त्या पावसाला दिली.                एकट्या गुलाबाचे फुल फुलले पण वाळवंटात ते कधीही कुणाला दिसले नाही आणि कधीही कुणाला दिसू दिले नाही हे मात्र नक्की. हा प्रवास दोन्ही बाजूने होता. वाळवंटात फुललेल्या गुलाबासारखा कोरडा तो भिजला असला तरीही.                कोरडा आणि मी न भिजता ही कोरडी.ही आठवण प्रत्येक वेळी पहिला पाऊस पडला की येतो.  ह्या आठवणी सोबत पाऊस मनात रेंगाळत राहतो. आता पाऊस खिडकीतूनच बघते पण आकाशातील इंद्रधनुष्य सांगून जाते, तू कुठेही राहा कशी ही राहा काहीही कर तू खिडकीच्या आत रहा की तू खिडकीच्या बाहेर रहा तरीपण मी तुझ्यासोबत आहे.
          तुझ्यातील तुझ्या मधला पहिल्या प्रेमासोबत. कारण तो मी आहे. ही आठवण शब्द स्वरूपात कागदावर लिहिताना मनात एक गोष्ट सहज येऊन गेली.
     जर ही आठवण नसती तर आज हे शब्द कागदावर लिहिताना तो माझ्यासोबत असता. मी त्याच्या बालपणासोबत माझे हे बालपण अंगणातल्या त्या पावसाबरोबर अनुभवला असते. ओले चिंब होत..!
  सोबत ❤❤❤❤💕
         पण हा फक्त आलेला विचार होता. एक आठवण परत येऊन गेली. मी न भिजलेली तो भिजलेला तरीही मैत्रिणीचा बोलण्याचा सूर नेहमी माझ्याकडे असायचा. कारण तो सर्वांचा लाडका होता आणि मी मात्र त्याचे पुस्तक हातात घेऊन तो कधीही कुणालाही तो देत नव्हता. असा सर्वांचा लाडका नेहमी अबोल राहून दुरूनच त्यांच्या बोलण्याला प्रतिसाद देणारा. मात्र माझ्या- त्याच्या संवाद अबोलच राहिला. आत्मविश्वास मात्र त्याने भरभरून निर्माण करून दिला.
         पाऊस मी आणि तो आजही खिडकीबाहेरच्या पहिल्या पावसाच्या आगमनाचे स्वागत करताना त्या आठवणी ताज्या करत असाव्यात. कारण आता बालपण उरले नाही. मोठेपण उरले नाही. आता उरल्या फक्त आठवणी ओल्या चिंब नयनातला त्या अश्रूं सोबत.
         कधीतरी कुठेतरी तो भेटेल,मी भेटेल या आश्वासनासोबत. पहिल प्रेम पाऊस, दुसर प्रेम त्यात भिजणे तिसर प्रेम त्यात त्याला भिजताना बघणे, चौथे प्रेम त्यात आपण नसूनही त्याच्यासोबत भिजणे, पाचव प्रेम आता त्याच्या आठवणीत भिजणे आणि स्वतःला स्वतःच्या स्वतःसाठी त्याच्या प्रेमाची कबुली देऊन भिजणे.❤❤💕💕
        आठवणी खूप छान असतात अशा काही आठवणी जपून ठेवाव्या लागतात आणि अशा आठवणी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असतात. कधी त्या बोल असतात शब्दांसोबत असतात तर त्या कधी आठवणी अबोल असतात शब्द विना अव्यक्त प्रेमाच्या प्रेमामध्ये भिजलेला...!!❤❤💕🤣😄

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

      आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

******************************************************************************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...