savitalote2021@bolgger.com

गुरुवार, ९ मे, २०२४

ध्येय आपले असते

         *** ध्येय आपले असते ***

सोपा मार्ग निवडून आयुष्य पूर्ण होत नाही, त्यासाठी पायवाट संघर्षाचीच निवडावी लागते. ध्येय तर आपलेच असते. फक्त आपल्यासाठी असते. जिंकायचे की हरायचे हे वेळ ठरवते तरी पण आपण आपल्या ध्येयाच्या पाठीमागे हात धुऊन लागायचे. कारण ध्येय तर आपलेच असते. फरक पडत नाही तेव्हा जेव्हा आपण शिखरावर असतो किंवा तेव्हा आपण पायरीच्या सगळ्या खालच्या पायरीवर असतो. परत ध्येयच्या दिशेने जाण्यासाठी म्हणून ध्येय  आपले असते आपल्यासाठी असते. आपल्या भविष्यासाठी असते. आपल्या स्व जाणिवेसाठी असते. सोप काहीच नाही.... सोप काही असाव असे वाटत नाही.... सोप असेल ते आपल्या वाटेला येत नाही. हाच तर कर्माचा आणि नियतीचा खेळ आहे. तो मांडला जातो... लिहिल्या जातो ....नशिबाच्या रेषांवर..... हाताच्या तळहातावर.... म्हणून सोप काहीच नसते. ध्येय तितके आपले असते म्हणून प्रयत्न करत राहायचे. सोपा मार्ग आपला नाही या परिकल्पनेने!! कारण त्यासाठी आपण बनलेलेच नसतो. ध्येयाची किंमत मोठी मोजावी लागते. ध्येयाची किंमत मोठी असते म्हणून आरशातले प्रतिबिंब आपलेच असते.... इतरांचे नाही!! ध्येय आपलेच आहे म्हणून मार्गही आपलाच आहे. यश ही आपलेच आहे. यशोगाथाच्या कहाणीचा प्रत्येक शब्द आपलाच आहे.मार्ग सोपा कोणताच नाही म्हणून ध्येय आपले आहे..!❤

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...