savitalote2021@bolgger.com

मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२६

तू दिसावे मी हसावे

*** तू दिसावे मी हसावे ***

तू दिसावे मी हसावे 
हसण्या हसण्यातस सारे कळावे 
तुझ्या हसू वर माझे हसू माझे नसावे 
तुझ्या हसणात स्वप्नाची लाट असावी 
पण ती माझी असावी 
तू दिसावे मी हसावे 
नभातले चंद्र तारे फक्त 
तो सोहळा बघावा 
सोबत कातर वेळची 
ती वेळही असावी 
तू दिसावे मी हसावे
समुद्राच्या काठी स्वप्नाची 
नवीन गाठ बांधावी 
त्याला साक्षी असावे 
रेताळलेली जमीन 
आकृतीने माखलेली 
अफाट सागरांच्या लाटा 
तू दिसावे मी हसावे🌴💕


©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माघार

बाबासाहेबांच्या विचारावर चालणारी प्रियसी, तिच्या प्रियकराला हे सांगत आहे कारण आम्ही नवा आरंभा नवयुगाच्या या तत्त्वानुसार आम्ही चालत आहे गावक...