savitalote2021@bolgger.com

रविवार, १७ जुलै, २०२२

* जखम * Wounds

            जीवनामध्ये काही गोष्टी परिस्थितीमुळे किंवा आयुष्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने न झाल्यामुळे अपयशाची एक साखळीच आयुष्यात येते. अपयशाची जखम हे नेहमी थांबलेली असते.
        यशाच्या मार्गावर चालताना तिला सोडावे या भावविश्वातून ही कविता आहे. कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद...!❤

*** जखम ****

थांबल्याने काही गोष्टी मागे पडतात 
पण सहज काही प्रश्न सुटत सुद्धा जात 
असतात  फार झाले आता 
थांबणे, नव्या जुन्याचा मेळ घालने 
जखमावर मलम लावले आता 
चालायचे त्या जखमे बरोबर 
जखमआपली असेल तर 
आपल्याच समजूतदारपणाने बरी करायची 
आतली नवीन कोरी जागा खुली करायची 
नवीन डाव मांडण्यासाठी 
नवीन डाव थांबल्यामुळे चालू करायचा 
जखमेला घाव करूनच घ्यायचा 
नाही तो सुटतो चालल्याने 
चालत राहायचे नवीन 
डावामध्ये जुन्या घावच
मागे ठेवतच...!!!


     ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया.  आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .



          In the middle of life, the situation is not manageable, but it is not possible to do ayushachi.  The bad luck is nehmi thambaleli aste.
        Yashachya Margavar Chaltana Tila Sodave or Bhava Vishwatun only poetry ahe.  Poems are self written and composed.  Thank you for liking and sharing Karayla Visru...!❤

 *** Wounds ****

 Thamblyane Kahi Goshti Mage Padatat
 Pan easy questions
 aata far jhale aata
 Thambane, in Navya Junyacha
 Wounded ointment lavale aata
 Chalayeche ya hurt me
 Injured
 Aaplyach Samjutdarpanane acquitted
 Aatli Naveen Kori woke up open Karaichi
 Naveen Daw Mandanyasathi
 Naveen dow thambalyamule started
 wound wound
 Nahi to suto challyane
 Chalet Rahaiche Naveen
 davamedhe junya gavach
 Ask for...!!!


 ️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

 Apalya yanyachi janiv apalya reaction.  Please don't forget to like and share your feedback in the comment box.


शनिवार, १६ जुलै, २०२२

** हरवलेले **

       बालपण विषय आपल्या जिव्हाळ्याचा असतो. बालपण जगून गेलेले असतो पण त्याची खरी किंमत आपण या धकाधकीच्या व्यवहारवादी जगात स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आठवते. 
        लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा असे संत म्हणून गेले. बालपण आयुष्याच्या अस्मरणीय क्षण आहे.
        कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. 
आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका...!!💕

     ***  हरवलेले ***

आयुष्याच्या फुललेला वळणावर 
हरवलेले वळण म्हणजे बालपण 

उभ्या असलेल्या सुखासमोर 
गेलेले सुख म्हणजे बालपण 

वाट बदलली शब्द बदलले 
नैतिकतेची भाषा ही बदलली 

पण आठवणीचे बालपण तसेच 
खेळकर हसरे निरागस हलते 

मनाच्या कोपऱ्यात माझे 
बालपण ....!!💕

     ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

     आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका...!! 



Childhood subject apalya jivnyacha asato.  Balpan Jagoon Gelele Asto Pan Tyachi Khari Kimat Apan or Dhakadhakichya Behaviorist Jagat Swatala Siddha Karanyachya Prayayatat Athavate.
 Deva Mungi Sakhrecha Rava will give the Lahanpan as Saint Mahnoon Gele.  Childhood Ayushachya memorable moments come.
 Poetry is self-written and self-written.
 Avadalyas Like and Share Karayla Visru Naka...!!💕

 ***  Harvale***

 Ayushachya Phullela Vannavar
 Harvale Vana Mhanje Balpan

 Ubhaya Aslelya Sukhasmore
 Gelele Sukh Mhanje Childhood

 wat changed words
 ethical language changed

 Pan Athavaniche Balpan Tsech
 I laughed and laughed

 Manachya koplyat me
 Childhood....!!💕

 ️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

 Aaplya yanyachi janiv apalya reaction.  Please don't forget to like and share your feedback in the comment box..!!




ग्रहण Eclipse

     


       आयुष्याच्या रंगमंचावर कधी असेही प्रसंग येऊन जातात की कधीही आपण विचार केलेला नसतो. स्वप्नातही कल्पना नसते दूर दूर पर्यंत त्याचा काहीही संबंध नसतो. असे प्रसंग आयुष्यात येऊन जातात आणि सर्वस्व घेऊन जातात.
        समाजामध्ये अशावेळी एक अकाल्पनिक असे नवनवीन अनुभव आपल्याला येतात. त्या प्रसंगातून ही कविता रचलेली आहे. ''ग्रहण", ही कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद...!


....ग्रहण ....

कर्म झाकले गेले 
सुखाला ग्रहण लागले 
म्हणून सर्वस्व घेऊन गेले 
माझे आहे म्हणून 
उभे मी स्तब्ध 
सावलीची सोबतही नाही 
तेही घेऊन गेली 
सर्वस्व सोबत 
अश्रूंचा पूरही नाही आणि 
बांधही नाही 
नको ते देऊन गेली 
असलेले घेऊन गेली 
ओठांवर शब्दांचा वर्षावही नाही 
शब्दांची चाहूलही नाही 
उजेडात नकळत येऊन गेली 
अंधारात घेऊन गेली 
कळलेच नाही शब्दांना 
काय बोलावे कारण
तीच उभी होती हसरी 
माझे सुख घेऊ 
दुःख नव्हतेच त्यावेळी 
फक्त सुखाला ग्रहण लागले 
कर्माने दुःख दाखवून दिले 
अंधारी पायवाट 
तेवढी स्तब्ध ठेवून गेली 
कर्माने झाकले गेले 
सुखाला ग्रहण लागले...!!!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

        आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका....!!



Ayushayachya theatervar kadhi asehi context yeun jaat ki kadhi apana thought ke lela naso.  Dreams don't have any kind of relationship until far away.  In such a context, Ayushayat Yeon Jaat and everything was Gheun Jaat.
 Ashaveli in the society is an unimaginable such novel experience.  That's the context, only poetry has come.  "Eclipse", this poem is self-written and self-written. Thank you for liking and sharing Karayla Visru...!


.......Eclipse ........
 
 karma jhakle gele
 dry eclipse
 manoon sarvasva gheoon gele
 my aah manoon
 I am shocked
 Savalichi sobhi nahi
 tehi gheun gelee
 everything sobat
 No tears and no tears
 not bound
 Nako Te Deoon Geli
 aslele gheun gelee
 slang syllable rainwahi nahi
 don't care for words
 Ujedat Nakat Yeun Geli
 Andharaat Gheun Geli
 kalech nahi shabda
 what reason to say
 Titch Ubhi Hota Husri
 wish me happiness
 sad navtech tyveli
 Instant dry eclipse
 Karmane brings sorrow to wine
 Andhari Pivot
 Tevdi stunned Thevoon Geely
 Karmane Jhakle Gele
 Dry eclipse lagle...!!!!


✍️️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

 Apalya yanyachi janiv apalya reaction.  Please don't forget to like and share your feedback in the comment box....!!



🌹 ️.....🌹🌹🌹.....🌹🌹🌹🌹..........🌹

शुक्रवार, १५ जुलै, २०२२

जुन्या आठवणी गंधाळलेल्या

     


  कविता स्वलिखित स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका...💕

***जुन्या आठवणी गंधाळलेल्या***

गंधाळलेल्या क्षणांना श्वासांनी 

हळवे केले 

भावनांसोबत ...

ओंजळीत माझ्याच प्रेमाच्या 

भावना हळव्या देऊन गेली 

पापण्यातील स्वप्न 

अनेक हळव्या हळव्या क्षणांच्या 

आपण आपले आपले असणे 

श्वासांनी भरलेले 

गंधाळलेल्या भावना ओल्या ओल्या 

क्षणांचे भिजलेल्या पूर्णत्वाने 

तरीही अबोल सारेच गंधाळलेले 

क्षण जणू ओल्या मातीचा 

आकारही गोळा गंधाळलेल्या क्षणांना 

श्वासाने हळवे केले 

जुन्या आठवणीना 

जुन्या आठवणीना....!!!


✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

           आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका ...!



***JUNYA ATHAVANI GANDHALALEYA***

 Gandhallelya khsthanana breathing

 Have bananas

 Emotions...

 onjheet majhyach love

 Bhavna Havya Deoon Geely

 sinful dreams

 many havya havya momentanchaya

 Aapne aaple aaple asne

 breathless

 Gandhallelya feeling olya olya

 Kshananche Bhijalelya Poornatvane

 Tarihi Abol Sarech Gandhallele

 moment janu olya maticha

 Aakarhi goda gandhaळlelya khsanna

 Bananas to breathe

 Junya Athavanina

 Junya Athavanina.....!!!

 ️✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote


 Aaplya yanyachi janiv apalya reaction.  Please don't forget to like and share your feedback in the comment box...!


💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕❤❤❤❤❤❤❤❤💕💕💕

तुझ्यासाठीच

       एकतर्फी प्रेमाची ही गोष्ट... प्रियसी आपल्या प्रियकर खूप प्रेम करते पण ते त्याला सांगू शकत नाही. तरी तिचे शब्द विचार हे सतत त्याच्यासाठीच असतात. त्याच्याशी बोलणे ही त्याच्यासाठीच असते... ती तिच्या भावना या शब्दात व्यक्त करतात.
       ही या भावविश्वातून घेतलेली आहे. ही कविता स्वलिखित व स्वरचित आहे. कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

***तुझ्यासाठीच***

तुझ्यासाठीच माझे शब्द 
सतत तुझ्यासाठीच असतात 
पण ते शब्द तुझापर्यंत 
पोहोचत असेल का? 

माझे शब्द विचार कविता 
अंतर्मनातील शब्द बोलत राहते 
मी सतत, कुणाजवळ तरी 
ते शब्द विचार कविता 
तुझ्यापर्यंत पोहोचत असेल का? 

शब्दविना खूप बोलते मी 
तुझ्यावरील प्रेमासाठी 
ते समजत असेल का? 
कदाचित ते तुझ्यापर्यंत 
पोहोचत असेल का ??

माझे शब्द तुझे प्रेम होईल का 
एकतर्फी प्रेमाची एक अर्धवट 
कथा होईल, सांग ना! 
तुझापर्यंत हे तरी 
पोहोचत असेल का ????

माझा तुझ्यावर प्रेम आहे 
हे ही तुला समजत असेल का 
की नाही हेच उत्तर असेल 
तुझे ही माझे शब्द 
सतत तुझ्यासाठी....!!!

        ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

   आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका 
Ektarfi Premachi hi gosht... Priyasi aaplya priyakar khoop karte karte paan te tyala sangu shakt nahi.  Tari tiche shabd thoughts o continous tyachyasathich ineat.  Speaking tyachyashi hi tyachyasathich asate... ti tichya expresses emotion or words.
 Hey or Bhavvishvtun Gheteli has come.  This poem is self written and composed.  Kavita Avadalyas Like and Share Karayla Visru Naka.

**Tuzhyasathiach***

 my words to you
 continuous you
 Pan te word till you
 What is the purpose of Pohochat Asel?

 my word thought poem
 Introspective words utter rahate
 I am continuous, kunajav tari
 te word thought poem
 What about you?

 I speak without words
 tujyavaril love sathi
 Why do you understand?
 maybe till you
 Pohochat Asel ka??

 my words love you
 one-sided lover
 Katha Hoil, Song Na!
 You are here
 Pohochat Asel ka????

 my love for you
 Hey Tula Samjat Ka
 ki nahi hech north asel
 my words to you
 Continuing tujyasathi....!!!

✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

 Aaplya yanyachi janiv apalya reaction.  Please don't forget to like and share your feedback in the comment box.



🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹@🌹@@🌹@@@@@@💔💔

मंगळवार, १२ जुलै, २०२२

** इच्छा **

*** इच्छा ***

तुझी माझी होती इच्छा 
एकत्र पावसात भिजण्याची 
पण तिच्या इच्छा राहिली 
नात्यात दुरावाला आला म्हणून 

आपल नात जितक महत्त्वाचं होत
इतक बहुत त्यापेक्षा जास्त 
महत्त्वाचे ते क्षण होते 
एकत्र घालविलेले 

जखम झाली तुझ्या इच्छेने 
जखम झाली त्याला न केलेले 
पूर्णत्वाने, माझ्याकडून 

आपल्या एकत्र काही इच्छा 
होत्या त्या पूर्ण झालाच नाही 
तुझ्या त्या इच्छेपुढे 
माझ्या मर्यादित आयुष्यामुळे 

तुझी - माझी दोन्ही इच्छा 
अपूर्णच.... आपल्या इच्छांपुढे 
एकत्र पावसात छत्रीविना 
भिजण्याचा....!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. 



💕💕💕💕💕💔💔💔💔💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕



सकारात्मक चारोळी आयुष्य चारोळी प्रसिद्ध चारोळी Marathi images in positive charolya motivation charolya 








Marathi kavita aayushavar kavita positive thoughts poem Marathi kavita collection Marathi

चारोळी  motivational charolya 
 kavita aayushavar kavita Inspirational kavita 

life on charolya Marathi love poem charolya with Images 

सोमवार, ११ जुलै, २०२२

माझे गुरु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्री विषयक विचार..!!



               माझे गुरु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्री विषयक विचार

                        डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानव विश्वरत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार राजकारणी, तत्वज्ञ, न्यायशास्त्रज्ञ, बहुजनाचे उद्धारकरता, भारताचे भाग्यविधाता, समानतेचा पुरस्कार करणारे होते.  त्यांनी देशाच्या विविध क्षेत्रात आपले योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार आणि आधुनिक भारताचे निर्माता असे संबोधले जाते. "शिक्षण जितके पुरुषांसाठी आवश्यकता आहे. तितकेच महत्त्वाचे स्त्रियांना सुद्धा आहे ''.  हेे बाबासाहेबांचे विचार आज समाजामध्येेे तंतोतंत जुळत आहे. डॉ. बाबासाहेब म्हणतात,"ज्या समाजात स्त्रिया पुढे तो समाज ज्या देशात महिलांची प्रगती होते तोच देश प्रगतिशील असू शकतो."

                   डॉ.  बाबासाहेब आंबेडकर स्त्रीमुक्तीचे  समर्थक होते. डॉ. बाबासाहेब यांच्या कार्यावर महात्मा ज्योतिराव फुले यांचा अतिशय महत्त्वाचा प्रभाव होता. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा ध्यास घेऊन समाजातील अंधाऱ्या वाटेवर असणाऱ्या स्त्रियांना उजेडात आणले.  त्यांना अक्षर ओळख देऊन प्रगतीचा पहिले किरण त्यांनी दाखविले.  ती आत्मनिर्भर राहावी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या स्त्रीला कायदेशीर हक्क मिळवून दिले.  

                त्यांच्या मते बुद्ध हेच स्त्री स्वातंत्र्याची आद्य पुरस्कार होते तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे कार्य स्त्रियांसाठी केले ते अलौकिक आहे. समाजाचे मूल्यमापन त्या समाजातल्या स्त्रियांची परिस्थिती कशी आहे यावरून ठरविता येते. समाजाने स्त्रियांच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी आग्रही भूमिका घेतली.

      डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून तिथे मुलींना सुद्धा प्रवेश दिला.


                डॉ. बाबासाहेब म्हणतात," समाजाची प्रगती ही फक्त पुरुषप्रधान संस्कृतीवर आधारित नसून त्या समाजातील स्त्रियांची महत्त्वाची भूमिका असते. समाजाचे मूल्यमापन केवळ पुरुष प्रगतीवर अवलंबून असते. स्त्रियांची देखील होणे गरजेचे असते. याचे भान ठेवणे आवश्यक आहे."

                       डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी,"स्त्री एक स्वातंत्र्य व्यक्तिमत्व आहे आणि तिला स्वातंत्र्य मिळाला हवे".  

                 सर्व क्षेत्रात म्हणून त्यांनी स्त्री वर्गांसाठी भरपूर सुविधा केल्या. जसे मजुरांनी कष्टेकरी स्त्रियांसाठी 21 दिवसाची किरकोळ रजा, दुखापत झाल्यास नुकसान भरपाई, कोळसा खाण कामगार स्त्रियांना प्रसूती भत्ता व रजा मिळावा यासाठी आग्रही भूमिका असणारे पहिले व्यक्ती म्हणजे बाबासाहेब होते.  कामगार पुरुष कामगारांना जितकं वेतन दिल जात तितकेच वेतन स्त्रियांना सुद्धा मिळावे, वीस वर्षाची सेवा संपल्यानंतर सेवानिवृत्ती वेतन यासारखे महत्त्वाचे निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांसाठी दिले.


                भारतीय जातीव्यवस्था आणि भारतीय पुरुष प्रधान संस्कृतीला आळा बसावा यासाठी सतत बाबासाहेबांच्या विचारांमध्ये स्त्री ही अग्रेसर राहिलेली आहे.  कारण स्त्री आणि शूद्र यांच्या वर सतत अन्याय होत राहिला आहे.  हे दोन्ही घटक शोषित आहे. त्यांना स्वातंत्र्य मिळायला हवे, म्हणून जठर विवाह पद्धती, केशवपन पद्धती, बालविवाह पद्धती, सती पद्धती अशा विविध समाजमान्य पद्धती कायद्याने नष्ट व्हाव्या अशी आगरी भूमिका बाबासाहेबांची होती.

        स्त्री पिढ्याने- पिढ्या शिक्षणापासून वंचित राहिली. आर्थिक स्वावलंबन संपत्तीवरील समान मालकी हक्क निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य प्रगतीच्या वाटा बंद असलेल्या स्त्रियांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1947 मध्ये कायदामंत्री असताना हिंदू संहिता विधेयक अर्थात हिंदू कोड बिल प्रस्ताव लोकसभेत सादर केला.

                     अस्पृश्यतेचे उच्चाटन स्त्रियांना घटस्फोट घेण्याचा अधिकार, स्त्री - पुरुष समानता, वारसा हक्क स्त्रियांना देण्याची तरतूद होती. त्यांच्या मध्ये सामाजिक न्यायाचा लढा यशस्वी होण्यासाठी हिंदू समाजाच्या वैयक्तिक कायद्यामध्ये जातिव्यवस्था आणि पुरुषप्रधानता यांना नकार देऊन समान वैयक्तिक संबंधाची पायाभरणी करणे आवश्यक आहे.

                 हिंदू कोड बिल बाबासाहेबांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. डॉ. बाबासाहेब म्हणतात ,"हिंदू कोड बिल हा देशातील विधिमंडळाद्वारे घेतलेला सर्वात मोठा सामाजिक सुधारण्याचा निर्णय आहे. असा कायदा जो  याआधी झाला नाही आणि नजीकच्या भविष्यकाळात देखील. येणाऱ्या कुठल्याही कायद्याची त्याची तुलना होणे शक्य नाही.  वर्ग वर्गात असलेली विषमता आणि वर्ग अंतर्गत सुद्धा स्त्री पुरुष असा असणारा लिंगभेद हाच हिंदू समाजाचा आत्मा राहिलेला आहे. हा भेद ही विषमता मिटविल्याशिवाय आर्थिक सुधारणेबाबत कायदे करणे म्हणजे शेणाच्या ढिगार्‍यावर भारतीय संविधानाचा अवाढव्य महाल बांधण्याचा खोटा दिखावा करण्याइतका दांभिक प्रकार आहे."

                डॉ. बाबासाहेब म्हणतात," समाज व्यवस्था ही एका विशिष्ट समाजापुरते निगडित नसून ती संपूर्ण समाजातील घटकांवर अवलंबून असते. त्यांच्या प्रगतीवर अवलंबून असते.  स्त्री हा त्या समाजाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. म्हणून जातीय अन्याय आणि स्त्रियांवर होणारे अन्याय हे दोन्ही एकमेकांमध्ये गुंतलेले आहे.  स्त्री ही आपल्या कुटुंबाचे योग्य पद्धतीने नियोजन करू शकते तसेच स्त्री समाजातही त्या ज्ञानाचा उपयोग करून आपले योगदान देऊ शकते.

                 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला. कारण भारतीय स्त्री-पुरुषांना मतदानाचा अधिकार द्यावा हा त्याकाळी वादग्रस्त मुद्दा होता. कारण एका विशिष्ट समाज व्यवस्थेमध्ये समाज रचना असल्यामुळे समाजातील काही वर्ग प्रगती आणि विकासापासून वेगळी होते आणि हीच गोष्ट त्याकाळी असलेल्या समाज व्यवस्थेला अभिमानाची वाटत असावी. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हा हक्क सहज समाजातील प्रत्येक व्यक्तीला मिळावा म्हणून मतदानाचा अधिकार दिला. भारतीय संविधानाने आर्टिकल 326 नुसार वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक स्त्री-पुरुषांना मतदानाचा अधिकार दिला. तो स्वातंत्र्यपूर्वे आपल्याला नव्हता.

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामध्ये स्त्रियांच्या प्रगतीला विकासाला अत्यंत महत्त्वाचे स्थान होते. एखाद्या समाजाची प्रगती मोजायची असेल तर त्या समाजातील स्त्रियांची प्रगती किती झाली आहे; हे मी मोजतो.''

                    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 1927 चा महाड चवदारतळ सत्याग्रह, 1930 चा नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह आणि 1942 च्या नागपुरातल्या महिला परिषदेत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.  बाबासाहेब म्हणतात ,''मुलींच्या प्रगतीमध्ये लग्न हे अडचणीचे कारण होऊ नये म्हणून मुलांसारखेच मुलींच्याही मताला महत्त्व द्यावे. जेणेकरून लग्नानंतर स्त्रियांना समान अधिकार मिळेल. त्यांच्या आवडीनिवडी त्यांना जपता येईल. पुरुषप्रधान संस्कृतीला कुठेतरी त्या कारणाने आळा बसेल आणि नवीन पिढी नवीन संस्कृतीमध्ये स्वतःला नवीन पद्धतीने समाजापुढे मांडेल.''

                    आजची स्त्री सुशिक्षित आहे. शिक्षित आहे. स्वतंत्र विचारसरणीची आहे. स्वावलंबी आहे. त्यांचे संपूर्ण श्रेय सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांना जाते तसेच आजची स्त्री स्वतःच्या हक्कासाठी जागरूक आहे तिला तिचे अधिकार माहित आहे. तिला तिचे हक्क माहित आहे. तिला तिच्या जबाबदाऱ्या माहित आहे म्हणून तिला कुठल्याही क्षेत्रात आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचा आणि योग्य न्याय मागण्याचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेशीर रित्या दिला. डॉ. आंबेडकरांनी स्त्री पुरुष समानतेला स्थान दिले. हिंदू कोड बिल हे सर्वोत्तम उदाहरण आहे. स्त्रीमुक्तीचा ध्यास हा डॉ आंबेडकर यांनी त्यांच्या संपूर्ण कार्यामध्ये दिसतो तसेच त्यांनी त्यांच्या विचारांमध्ये स्त्री पुरुष समानतेला महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. 

                 ती सक्षम आणि साक्षर बनविण्याचे सर्वोत्तम कार्य बाबासाहेबांनी स्त्रियांना दिले. आज स्त्री स्वातंत्र्य विचारसरणीची आहे. ती समाजातील कुठल्याही परिस्थितीला समोर जाण्याची ताकद तिच्यामध्ये निर्माण केलेली आहे हे सर्व फक्त बाबासाहेबांनी दिलेल्या कायदेशीर रित्या संरक्षणामुळे होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व चळवळी समाजातील महिलांच्या नेतृत्वाचा पाय भक्कम करण्यासाठीच होत्या.


             डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1924 - 25 पासून सर्व आंदोलनांमध्ये स्त्रियांना समाविष्ट करून घेतले. यामुळे बाबासाहेबांना कट्टर समाजाकडून विरोध होत होता. महिलांचे प्रश्न, दलित महिलांचे प्रश्न, समाजातील सर्व स्त्रियांचे प्रश्न, दलितांचे अधिकार आणि हक्क, दलित व स्त्रियांना मंदिर प्रवेश यासारखा प्रश्नांवर बाबासाहेबांनी समाजाचे लक्ष वळविले. पण कधीही या प्रश्नांसाठी सनातनी लोकांनी मदत केलेली नाही.

       डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 जुलै 1942 रोजी नागपूर येथे आयोजित, ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस वुमन्स कॉन्फरन्स मध्ये 25 हजार स्त्रियांना उद्देशून केलेला भाषणात म्हणतात," स्त्रीची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून समाजाची प्रगती मी मोजीत असतो.  म्हणून मला खात्री वाटते व  आनंद होतो की आम्ही प्रगती केली आहे .कारण त्या सभेला प्रचंड महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला होता 


        आजही समाजातील काही त्याच विचारसरणीचे लोक मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश महिलांना नाकारतात. हे भारतीय समाजाचे सत्य आहे. कारण बाबासाहेबांनी कायदेशीर रित्या कितीही स्वातंत्र्य स्त्रियांना दिली असले तरी,जोपर्यंत सामाजिक स्वातंत्र्य स्त्रियांना मिळत नाही तोपर्यंत कायद्याची कितीही स्वातंत्र्य दिले तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही.हे भारतीय समाज व्यवस्थेने सिद्ध केलेले आहे. ही एक शोकांतिकाच आहे.

        कारण आजही कायद्यासमोर विशिष्ट विचारसरणीला इतके महत्त्व का दिले जाते. हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्नच आहे.

               स्त्रीला जातिव्यवस्था रूढी, प्रथा, परंपर, संस्कृती या मध्ये अडकविले आणि आजही अडकू पाहत आहे. स्त्री कुटुंबवत्सल आहे. पण आज ती स्त्री पुरुषप्रधान संस्कृतीच्या वेदना सोडून आज उच्च पदावर कार्यरत आहे. आज स्त्री पुरुष समानतेचे स्वप्न सत्यात उतरत आहे. जगाच्या इतिहासात स्त्रियांचे योगदान अमूल्य आहे.

               आधुनिक स्त्रीची वाटचाल सकारात्मक आणि आशादायक आहे. बाबासाहेबांनी लावलेले या रोपट्याला आता फुले- फळे येत आहे. स्त्रीचे योगदान हे कुणीही कानाडोळा करू शकत नाही. कारण बाबासाहेबांनी आधुनिक समाजाचे जे चित्र रेखाटले होते ते चित्र आपल्या चारही बाजूने दिसत आहे. आज स्त्री शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा, संरक्षण इत्यादी क्षेत्रात सक्षम झालेली आहे. सक्षमीकरणाचा नारा काय असतो हे दाखवून दिले आहे. हे सर्व फक्त बाबासाहेबांमुळे स्त्रियांच्या मिळाले आहे. 

            बाबासाहेबांनी बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात असे न करता त्यांनी स्वतःही रमाबाईंना या चळवळीत येण्यास प्रोत्साहन दिले. रमाबाईंनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत या कार्यामध्ये योगदान दिले. बाबासाहेब हे केवळ बोलते समाज सुधारक नव्हते तर ते करून दाखविणारे समाज सुधारक होते.  आज स्त्री फक्त पुरुषाच्या पाठीमागे यशस्वी पुरुषप्रधान संस्कृतीचे प्रतीक न राहता स्वातंत्र्य यशस्वी स्त्री झालेली आहे. याचे सर्व श्रेय बाबासाहेबांना द्यावे लागेल.

          कारण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो .पण आधुनिक भारताच्या स्त्रियांच्या मागे त्यांच्या प्रगती मागे त्यांच्या आजच्या यशोगाथा मागे फक्त एकाच महापुरुषाचा हात आहे तो म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय.

             बाबासाहेबांनी ज्या सुविधा सामाजिक स्तरावर स्त्रियांना मिळाव्या असे वाटत होते त्या सर्व सुविधा त्यांनी कायदेशीर रित्या भारतीय संविधानात दिला. आज स्त्री काही प्रमाणात असुरक्षित वाटत असली तरी बाबासाहेबांनी दिलेले कायदेशीर हक्क जर तंतोतंत लागू झाले तर समाजामध्ये असलेली विषमता आणि असुरक्षित भावना कमी होईल. 

                 स्त्री समाजामध्ये सुरक्षित राहील.   कारण स्त्री सुरक्षित राहिली तर समाज सुरक्षित राहील आणि समाज सुरक्षित राहील तर प्रगतीच्या नवनवीन वाटा सर्वांसाठी खुल्या होते. आपण महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच बाबासाहेब म्हणतात, शोषितांच्या वेदनांची जाणीव होऊ द्या स्वातंत्र्य,  समता,   बंधुता ,सामाजिक न्याय या मूल्यांचा उपयोग करा. यावरच आजच्या समाजाची प्रगती आहे आणि उद्याचे भविष्य आहे."

                          डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांच्या हक्काप्रती असलेले विचार आजही समाजासाठी दिशादर्शक आहे.

भारतीय स्त्रियांना हक्क मिळवून देण्यात सर्वात मोठे योगदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे. आज समाजातील सर्व क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देत आहे. ज्या स्त्रीला फक्त गुलामासारखे आणि उपभोग वस्तू म्हणून वापरले जात होते. ती स्त्री समाजात अर्थ, धर्म ,राज्य, सुरक्षा इत्यादी क्षेत्रात आपला ठसा उमटवीत आहे.  हे सर्व बाबासाहेबांनी त्यांना संविधानात्मक दर्जा प्राप्त करून दिला. त्यांच्या हक्कासाठी म्हणून पूर्णत्वास येत आहे. समाजात मान सन्मान मिळत आहे. स्त्री म्हणजे पायाची दासी नसून विविध क्षेत्रात पुरुषांबरोबर आपलं योगदान देत आहे.

            चूल आणि मूल ही संकल्पनेला आळा देत घराचा उंबरठा ओलांडून जगभरात आपले कर्तव्य गाजवीत आहे आणि हे सर्व फक्त बाबासाहेबांमुळे स्त्रियांच्या वाटेला आलेले आहे.  स्त्रियांना मिळालेली आहे जर बाबासाहेब नसते तर कदाचित हा प्रश्नच अंगाला काटे आणणार आहे.  कारण स्त्री कुठे सुरक्षित असती.

        महिलांना पुरुष समान अधिकार मिळाली नसते तर? 

स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला नसता तर ?हिंदू कोड बिल मध्ये सुविधा मिळाल्या नसत्या तर??? 

तिला घटस्फोटाचा अधिकार मिळाला नसता तर? 

स्वातंत्र्य विचारसरणीचे अधिकार मिळाले नसते तर? 

रूढी प्रथा परंपरा मान्यच करा असे कायदेशीर गुलामगिरी लादली असती तर? 

        अशी कितीतरी प्रश्न स्त्रियांसमोर असते. पण आज हे प्रश्न स्त्रिया समोर नाही याचे सर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाते. महिलांना नैसर्गिक मानवी हक्क बाबासाहेबांनी मिळून दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण समाज व्यवस्थेला जी गुलाम बंदिस्त परंपरा रूढी प्रथा परंपरा ब्राह्मण संस्कृतीने तेही स्वार्थी यात बंदिस्त होती ती स्वातंत्र्य करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या संपूर्ण कार्यामध्ये केले 


     भारतीय विषमतेच्या प्रश्नाला  जसे वर्णव्यवस्था जातिव्यवस्था अवलंबून होते तेच सर्व स्त्रियांसाठी सुद्धा होते. अशा स्त्रियांना मुक्त करण्याचे काम बाबासाहेबांनी केले त्यांच्या या कार्याला शब्दात मांडावे इतके शब्दही माझ्याकडे नाही कारण एक स्त्री म्हणून मी आज आशावादी आहे एक स्त्री म्हणून प्रगतीच्या प्रत्येक वाटेवर एक एक पावले चालत आहे. सुरक्षितता हा माझा कायदेशीर अधिकार आहे हे मला बाबासाहेबांमुळे कळले नैसर्गिक रित्या मी स्वातंत्र्य व्यक्तिमत्व आहे हे मला बाबासाहेबांमुळे कळले. मी एक स्त्री इतिहासाच्या पुस्तकात गुलाम होती वर्णव्यवस्था जातिव्यवस्थेत  बंदिस्त होती आज मी स्वातंत्र आहे हे मला बाबासाहेबांमुळे कळले.

        मी मुक्त विचारसरणीने मी आपले मत मांडू शकते हे मला बाबासाहेबांमुळे कळले आणि स्त्री मुक्त सुद्धा आहे हे सुद्धा बाबासाहेबांमुळे कळले. बाबासाहेबांनी लावलेले हे रोपटे आज गोड फळांनी बहरलेले आहे आणि ते फळ खाण्यासाठी मला संघर्ष करावा लागतो यातच कुठेतरी समाजव्यवस्था अजूनही वर्णव्यवस्थेतले जात आहे का? हा प्रश्न महिलांना पडत आहे.

     अजूनही आम्ही गुलामच होऊ का? हाही प्रश्न कधी कधी मनात येऊन जातो पण या प्रश्नाचे सर्व उत्तरे नकारात्मक असतात. कारण बाबासाहेबांनी जे कार्य संपूर्ण समाज व्यवस्थेसाठी करून ठेवले ते कोणीही नष्ट करू शकत नाही किंवा त्यांचे योगदान कमी लेखू शकत नाही. बाबासाहेब म्हणजे एक स्वातंत्र्य विद्यापीठ आहे. विचारांचे समानतेचे प्रतिष्ठेचे शिक्षणाचे राजकारणाचे अर्थकारणाचे शैक्षणिक करण्याचे आणि जातीय व्यवस्थेचे सुद्धा म्हणून बाबासाहेब माझे गुरु आहे.

        कारण मला जे अधिकार मिळाले एक स्त्री म्हणून ते सर्व फक्त फक्त बाबासाहेबांमुळे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित समाजाचे दुःख समजून घेतले नाही तर महिलांचे सुद्धा दुःख त्यांनी समजून घेतले आणि स्त्री नैसर्गिक दृष्ट्या स्वातंत्र्य व्यक्तिमत्व आहे हे जगापुढे पहिल्यांदा मांडले आणि त्यांच्यासाठी संविधानात्मकरीत्या खूप काही देऊन गेले लिहून गेले आणि समाजात ठेवून गेले.

     डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेले चळवळ जगाच्या इतिहासात मानवी मुक्तीचा लढा ठरला आहे. भारतीय समाज व्यवस्थेला मुळापासून नष्ट करण्याचे काम बाबासाहेबांच्या चळवळीमुळे झाले.

         शिक्षणाचे अखंड ज्योत बाबासाहेबांनी पेटवली. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र दिला. आपल्या हक्कासाठी संघर्ष करा कारण समाजात सर्व एकच आहे इथे कोणीही मोठा किंवा कोणीही लहान नाही. समता बंधुत्वा न्याय स्वातंत्र्य  संपूर्ण समाजाला दिली.         ...........राज्यघटनेचा खरा शिल्पकार महामानव माझे गुरु माझे मार्गदर्शक मला स्त्री म्हणून जगण्याचे स्वातंत्र्य मिळवून देणारे स्वातंत्र्य व्यक्तिमत्व स्त्रियांना मानवी हक्क देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा मानाचा मुजरा.


              नव्हती आम्हा जगण्याची मुभा नव्हती आम्हा चालण्याची मुभा नव्हती आम्हा शिक्षणाची मुभा बाबासाहेबांमुळे आज सर्वोच्च पदावर जाण्याची मुभा सुरक्षितता प्रदान करण्याची मुभा सुरक्षा देण्याची मुभा शिक्षण घेण्याची मुभा आणि स्वातंत्र्य उपभोगण्याची मुभा...!!!

✍️©️®️सविता सूर्यकांत तुकाराम लोटे 

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. 



❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤



शनिवार, ९ जुलै, २०२२

* विठ्ठल ***

*** विठ्ठल ***

वारी भक्तीची समाधानच्या 
प्रत्येक पावलांवर  चालणारी 
वारी भक्तीची विश्वासाच्या पावला 
पावले समाधानी मनी 
होऊन चालणारी 
वारी जन्माचे सार्थक 
समाधानच्या रोपट्याला 
पानाफुलांची बहर 
विठ्ठलाच्या दर्शनाने 
वारी भक्तीची 
समाधानाच्या पावलांवर...!!!

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

          आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. 





**** रूप विठ्ठलाचे****

    

      आषाढ एकादशी म्हणजे भक्तीचा सोहळा. भक्तीला कुठेच मर्यादा नसते ही सांगणारी संत परंपरा आणि ती शिकवण वारीच्या स्वरूपात पंढरपूरला विठ्ठल दर्शनापर्यंत संपते.  चालू होतो एक नवीन प्रवास वर्षानी वर्ष पिढ्यांनी पिढ्या जन्मोजन्मी ..म्हणून आषाढ एकादशी विशिष्ट महत्त्व आहे.
       वारी म्हणजे सर्वस्व, वारी म्हणजे भक्तीचे अलौकिक असे स्वरूप होय. आषाढ एकादशी निमित्त लिहिलेली ही कविता विठ्ठल रुक्माई चरणी ...!!
  आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.. धन्यवाद!!

 
**** रूप विठ्ठलाचे****

विठ्ठल भेटी जाई 
टिळा गोपीचंदन गळ्यात तुळशीची माळ 
हाती पताका भगवी 
भक्तीचा सोहळा सजे 
पंढरपुरी...

प्रेमाचा वर्षाव सोहळा भक्तीचा 
विश्वासाचा.... 
नाचत गाजत जाती 
वारी संगे....

दर्शनाची भूक विठ्ठलाची 
भक्तीचे रूप अनेक...
विठ्ठल श्वासा आम्हा
आम्ही जीव तुझे विसरून 
देहभान मग्न होऊन 
भक्तीच्या रूपात 

शांत हृदयाशी मज ठेव 
आता माझा मी न राहीले 
आता फक्त तुझाच 
जन्मोजन्मी .....

अर्पण हा देह माझा 
विठ्ठल - रुक्माई संगे 
आता रोजच आषाढी एकादशी 
मुखी मनी जयघोष 
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 
विठ्ठल भेटी जाई गोपीचंदनाचा 
टिळा कपाळी...!!!

✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 
       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका ...!!
  

बुधवार, ६ जुलै, २०२२

भिजण्याची तुझ्यासोबत .....

     प्रेमामध्ये अखंड बुडालेले प्रियकर प्रियसी एका अशा वळणावर येतात की त्यामध्ये एक स्त्री म्हणून ती तिच्या मर्यादा सोडायला तयार नसते आणि न सोडल्यामुळे तिला प्रेम विरहाचे दुःख तिची इच्छा नसतानाही तिच्या वाटेला येते आणि पाहिलेले सर्व स्वप्न अर्धवटच अपूर्णच राहते... अशा एका स्त्रीची इच्छा काय असावे हे शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
        कविता स्वरचित व स्वलिखित आहे.
आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमची येण्याची पावती तुमचे कमेंट!  तुमचे मत ते जरूर नोंदवा धन्यवाद....!!💔💕❤🌹



..... भिजण्याची .....

तुझी माझी होती इच्छा 
एकत्र पावसात भिजण्याची 
पण ती इच्छा राहिली 
नातच दुरावले म्हणून 

आपल नात जितक 
महत्त्वाच होत तितक बहुधा  
त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे 
ते क्षण होते 
एकत्र घालविलेला....

जखम झाली तुझ्या इच्छेने 
जखम झाली त्याला न केलेल्या 
पूर्णत्वाने माझ्याकडून 

आपल्या एकत्र काही इच्छा 
होत्या त्या पूर्ण झाल्या नाही 
तुझ्या त्या इच्छेपुढे 
माझ्या मर्यादित विचारांमुळे 

तुझी माझी दोन्ही इच्छा 
अपूर्णच...
आपल्या इच्छांपुढे 
एकत्र पावसात छत्री विना 
भिजण्याची...!!💔💕

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 
   
          आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका ...!!💔💕❤🌹

          Premamedhe Akhand Budalele Priyakar Priyasi Eka Asha Vannavar Yetat ki Tyaadhe one woman Mahnoon ti tichya maryada sodayala tayar nasaate aani na sodlyamule tila love virhache sorrow tichi desire nastanahi tichya vatela yate incomplete relief aani pahele ek ek sarva svapne ardhavat aani pahele ye achale ek sarva dreami ardhavat...  The word mandanyacha try banana aaye.
           Poetry is composed and self written.
 Avadalyas Like and Share Karayla Visru Naka.  You comment!  Thank you for sure thank you....!!💔💕❤🌹



.... Bhijanyachi.....

 you would have liked me
 Collected Paisat Dispenser
 pan ti wish rahili
 Natach Durawale Mahnoon

 Aapal Naat Jittak
 Most likely
 more important than
 those moments were
 Collected Ghalvilela....

 You want to hurt
 Wounded
 Perfectionemajhyakdoon

 you have no desire to collect
 Hotya tya full jhalya nahi
 you want to
 my limited thoughts

 I wish you both
 incomplete...
 you wish
 without umbrella
 Bhijanyachi...!!💔💕

 ️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

 Aaplya yanyachi janiv apalya reaction.  Please don't forget to like and share your feedback in the comment box...!!💔💕❤🌹

शनिवार, २ जुलै, २०२२

सोबत नसण्याची

       जीवनात आठवणी जगण्याचा नवीन मार्ग दाखवीतात.   कारण ह्याच आठवणी आपल्या अनुभवावर अवलंबून असतात. म्हणून अनुभव आणि आठवणी ह्या दोन्ही सोबतच असतात.
        
          प्रियसी किंवा प्रियकर प्रेमविरहा विरहाच्या दुःखातून जात असतो. त्या भाव विश्वातून ही कविता लिहिली गेलेली आहे. कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपले मत नक्की कळवा आणि माझ्या ब्लॉग भेट द्या...!!!

       **** सोबत नसण्याची*****

अंगण ओलावून गेले तुझ्या 
आठवणींच्या पावसाने 
पावलोपावली सोबत होती 
ओला तळपायांच्या 
आकृतीसारखी 

आठवण आणि आठवणी आता 
फक्त सोबत असण्याच्या  
आता सोबत नसण्याच्या 
दुःखाच्या...!!
चालावे वाटते अजूनही 
शिल्लक राहावे वाटते 
दवबिंदूसारखे 

नवीन रूप पांघरावे वाटते 
सोबत घालविलेले क्षण 
विसरून ....
बेधुंद ओलेचिंब भिजावे आता 
सोबत असलेल्या माझ्याच 
माझ्यातील आत्मविश्वासाबरोबरच 

नको ती सोबत आठवणींची 
नको ती सोबत नसलेल्या स्पर्शाची 
नको ती सोबत तुझ्यातील अहंकाराची 
नको ती सोबत माझ्यातील आठवणींची 

सोबत फक्त 
माझी माझ्याशी 
आतातरी.... 
सोबतीचा स्पर्श फक्त 
माझ्याच पावलांच्या 
आकृतीसोबत....!!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
              आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका...!! 

भाग्यरेषा प्रश्नांची

जीवन डायरीमध्ये काही प्रश्न असे असतात. ते प्रत्येक वेळी अनुत्तरीतच असतात.... उत्तर मिळाले तरी ते प्रश्न परत नवीन प्रश्नांना जन्म देतात; वाटत भाग्यरेषाच प्रश्नांची असावे.

        या भावनेतून ही कविता लिहिली गेली आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

.......भाग्यरेषा प्रश्नांची ......

अडगळीत टाकलेले प्रश्न 
जेव्हा उत्तरांची अपेक्षा करते 
तेव्हाच कळते 
समजून न समजण्याचे दुःख 

सुखाचे प्रश्न अनुत्तरीत 
सांगावे वाटते 
या पावसाच्या सोबतीने 
सुख तर इथेही आहे 
पण प्रश्न तसेच असतात 
ओलावलेले 

तळहातातील रेषांवर कदाचित  
असावी प्रश्नांचीच भाग्यरेषा 
म्हणून तर प्रत्येक प्रश्न 
अनुत्तरीत असतात 
अडगळीत टाकलेल्या 
वस्तूंसारखेच.... 
बिनकामाची !!!

        ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका...!! 

शुक्रवार, १ जुलै, २०२२

... जगून बघ ...

कविता स्वलिखित व स्वरचित आहे. कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका..!
       तुमच्या येण्याची जाणीव आपले मत विचार आहे. कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद...!!

... जगून बघ ...

माझ्यासारख जगून बघ 
हसतानाही डोळ्यात पाणी 
येऊ न देता हसून बघ 
दुःख मनात ठेवून 

शब्द मांडाव्या अशा भावना 
मनातील चोर कप्प्यात ठेवून बघ 
स्वप्नाच्या जगात एकदा 
वास्तव बघून बघ 

कधी एकटेपणाला सावरून 
स्वतः स्वतःची अपेक्षा ठेवून बघ 
आणि त्या सुखद आठवणींच्या 
क्षणी माझ्या दुःखासोबत स्वतःशी 
बोलून बघ...!

कधी कधी वास्तव परिस्थितीत 
मलाही घेऊन बघ आठवणीसोबत 
आठवते का? म्हणून एकदा 
रडून बघ

माझ्यासारखेच मागे सोडलेल्या 
आठवणी सोबत माझ्यासारखं 
जगून बघ 
एकदा हसतानांही डोळ्यात 
पाणी येऊ न देता हसून बघ !!❤

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

        आपल्या येण्याची जाणीव आपले कमेंट्स आहे. कविता कशी वाटली हे नक्की कळवा....धन्यवाद ❤!!


******************************************************************************

मंगळवार, २८ जून, २०२२

** झरा भक्तीचा **

** झरा भक्तीचा **

तुझाच ध्यास 
माझ्या विठ्ठला 
हदयात वाहे झरा 
अखंड भक्तीचा 
रूप तुझे मनात  
मन अनंतात 
झरा भक्तीचा 
विठू माऊली....!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

         आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका...❤!! 




*Jhara Bhakticha**

 your attention
 majhya vithala
 Hadayat Wahe Jhara
 unbroken devotion
 Roop celebrates you
 mind infinite
 Jhara Bhakticha
 Vithu Mauli....!!

 ️✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

 Aaplya yanyachi janiv apalya reaction.  Do not give your feedback in the comment box and like and share Karayla Visru Naka...❤!!

शनिवार, २५ जून, २०२२

** माझा राजा ****


26 जून सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा.....
            
     सदर कविता स्वरचित आणि स्वलिखित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. छत्रपती शाहू महाराज यांनी जे कार्य केले ते आधुनिक महाराष्ट्र घडविणारा होता. म्हणून त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणतात. दीन दलितांचे कैवारी... रयतेचे राज्य निर्माण करणारे.... माणसाचा राजा.... छत्रपती शाहू महाराज यांना मानाचा मुजरा माझ्या या कवितेमधून...! 
      चुकल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चुका झाल्यास माफ सुद्धा करा धन्यवाद...!!


**** माझा राजा ****


माणसातला..... 
माणूसपणा ओळखणारा 
माझा राजा.... 
समाजव्यवस्था परिवर्तनाचा 
माझा राजा.... 
नवीन प्रयोगाची वाटचाल 
करणारा 
माझा राजा..... 

पंख देणारा गरीब 
शोषित जनतेला 
माझा राजा...
न्याय समता बंधुता देणारा 
माझा राजा....
वादळ समाज क्रांतीचे 
माझा राजा.....

जातीयतेचे बंधन तोडणारा 
माझा राजा.... 
नव प्रयोगाची खाण  
माझा राजा.....
वास्तवाची जाण असणारा 
माझा राजा.....

दूरदृष्टी त्यांची आजची असणारा 
माझा राजा....
सामाजिक न्याय व्यवस्था 
निर्माण करणारा 
माझा राजा....
 
दीन दलितांचा आवाज असणारा 
माझा राजा... 
दुःखी आणि दुःख समजणारा 
माझा राजा....
वंचितांच्या मनाचा 
माझा राजा.... 
 
आधुनिकतेचा पुढारी 
माझा राजा.... 
जातीभेद नष्ट करणारा 
माझा राजा..... 
स्त्रियांना हक्क देणारा 
माझ्या राजा ....
सक्तीचे शिक्षण देणारा 
माझा राजा.....

रयतेचा राजा 
माझा राजा.... 
वतनदारी रद्द करणारा 
माझा राजा... 
गरिबांना पंख देणारा 
माझा राजा.... 
दीनदुबळ्यांचा आधार 
माझा राजा.... 

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार 
माझा राजा... 
माझा माय बाप 
माझा राजा...
माझा माय बाप 
माझा राजा.....❤!!

         ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका..!!❤ 


===========❤❤❤❤==========

26th June is social justice day Mahnoon sajra banana jato.  Lokraja Chhatrapati Shahu Maharaj Yanchya Jayanti Nimit Manacha Mujra.....

 Sadar poetry is self-written and self-written.  Avadalyas Like and Share Karayla Visru Naka.  Chhatrapati Shahu Maharaj means that the modern Maharashtra would have been ghadvinara for the banana.  Mahnoon Tyanna Modern Maharashtrian architect Mahnat.  Deen Dalitanche Kaivari... Ryteche to build the state.
 Chukalyas forgive me in the comment box.



 **** My King ****


 Mansatala.....
 Manusapana Okhnara
 My king....
 social order change
 My king....
 new experimental watch
 Karanara
 My king.....

 feather denara poor
 exploited public
 My king...
 Justice Equality Brotherhood Denara
 My king....
 debate social revolution
 My king.....

 to break the ties of ethnicity
 My king....
 new mine
 My king.....
 real life asanara
 My king.....

farsightedness tyanchi aajchi asanara
 My king....
 social justice system
 construction agent
 My king....

 Deen Dalitancha Awaaz Asanara
 My king...
 sad and sad understanding
 My king....
 deprived mancha
 My king....

 modern old lady
 My king....
 destroying racism
 My king.....
 Striana Haq Denara
 My king....
 direct teaching
 My king.....

 Ritecha Raja
 My king....
 revoke cancellation
 My king...
 garibanna feather denara
 My king....
 Deendubyancha Aadhar
 My king....

 Modern Maharashtrian Craftsman
 My king...
 my father
 My king...
 my father
 My king.....❤!!

 ️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

 Aaplya yanyachi janiv apalya reaction.  Do not give your feedback in the comment box and like and share Karayla Visru Naka..!!❤

=============================


असा माझा शाहू होता ****

26 जून सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा.....
            सदर कविता स्वरचित आहे,' असा माझा शाहू होता'.

**** असा माझा शाहू होता  ****

समाजातील वास्तवतेचे गणित मांडली 
जातीपातीच्या युद्धामध्ये शिक्षणाची शस्त्रे 
वापरली सर्वप्रथम  सक्तीचे शिक्षण दिले 
न घेतल्यास दंडही एक रुपया... 
असा माझा शाहू  होता 

फुलविले सुंदर नंदनवन प्रगतीचे
एकाच शाळेत स्पृश्य - अस्पृश्यांची पोरे 
पुसली जातीचे वर्चस्व श्वासाच्या शेवटच्या
क्षणापर्यंत ... व्यवस्था परिवर्तनाची
असा माझा शाहू होता

जगणे सोपे केले जातीपातीच्या प्रहारमध्ये ठावठिकाणा न ठेवला गुरफटलेल्या
संस्काराचे स्त्रीमुक्त झाली बंधनाच्या किनाऱ्यापासून प्रगतीच्या अलगद काठावर उभी राहुन दारे उघडी करून, 
...जगायला शिकवणारा 
असा माझा शाहू होता

नवा प्रयोगाची लाट उभी केली 
मनुवादी ब्राह्मणसंस्कृती समोर राजश्रय
दिला पारंपरिक कलेला आणि कास धरली संशोधनाची विकासाच्या वाटेने तहानलेल्या
गोरगरीब शेतकऱ्यांची ...पंख दिले खुशाल
जीवनाचे ....
असा माझा शाहू होता

गुलाम वतनदारी रद्द केली प्रकाश दावीला 
उजेडाचा पंख बळावर चालविण्यासाठी
देवदासी ही झाली बंद आयुष्याच्या 
सागराला बंधनमुक्त... केले जगतांना 
पुनर्विवाहची वाट मोकळी करणारा 
असा माझा शाहू होता

न्याय समता बंधुता स्वातंत्र्याचे प्रणेते
आरक्षणाची पायवाट दिली बहिष्कृत
समाजाला, संघर्षाची गाथा संपविणारा 
सगळ्यांना एकाच नाण्यात तोलणारा 
शब्दाला जागविणारे.... जीवनाचा प्रवास
दीनदलित-बहुजनांसाठी आयुष्यखर्च करणारा 
सामाजिक क्रांतीचे वादळच जणू...
असा माझा शाहू होता

कालानुरूप बदल हक्क सामाजिकव्यवस्थेचा
सांभाळ खुर्चीचा तरी विकास आत्मकेंद्रित
सर्वांगीन विकासाचा संस्काराची धार चेतवीत मनात मायेचीगोधडी गुंफलेली 
माया घेऊन
दूरदृष्टी जनतेचा कल्याण करणारे 
सामाजिक न्याय व्यवस्था निर्माण करणारे 
असा माझा शाहू होता

           ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

 ✍️©️®️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  ** असा माझा शाहू होता  **
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you

------------------------------

शुक्रवार, २४ जून, २०२२

मनाच्या व्यथा

*** मनाच्या व्यथा ***


मनाच्या व्यथा शेवटी 
मनात राहिल्या की 
शिल्लक राहते 
बंदिस्तपणा....
आपलाच मनात 
रक्ताळलेली जखम म्हणून 
वेदनेला पंख नसते 
त्यावेळी 
सांत्वनाला शब्द नसते 
त्या वेळेला  
उरतात फक्त 
मनाच्या व्यथा 
मनाच्या व्यथा...!!!

       ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

         आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया.आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.


*** Manachya agony ***


 Manachya distress shevty
 Manat Rahilya Ki
 shillak rahate
 closure....
 Manaach Manat
 bloodletting
 vendella wings naste
 tyveli
 words of consolation
 tha valela
 Urtat Fakt
 maniac pain
 Manachya agony...!!!

    ️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

 Aaplya yenyachi janiv aaplya response.Your response must be nondva and like and share karayala visru in the comment box.



अच्छा सुनो ना

अच्छा सुनो ना
तुमसे मिलना है मेरी जान 
बिछडे हुए कितना वक्त हो गया
🍫🌹 तुम्हारे लिये...।।



✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

        आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

=============================













गुरुवार, १६ जून, २०२२

मनसोक्त

बेधुंद मनसोक्त जगण्याच्या या  सुखद क्षणासाठी।    संघर्ष आहे जुन्या रूपाचे !!

      ✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 


✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.....!!🌹🌹 

===========!!!==!!!!!=============







सकारात्मक चारोळी आयुष्य चारोळी प्रसिद्ध चारोळी Marathi images in positive charolya motivation charolya 




Marathi kavita aayushavar kavita positive thoughts poem Marathi kavita collection Marathi

चारोळी  motivational charolya 
 kavita aayushavar kavita Inspirational kavita 

life on charolya Marathi love poem charolya with Images 

कमी...

शब्द कमी असावे असे वाटत राहते 
            मनातील...!!!



          ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका...🌹🌹
------------------------------------ 




सकारात्मक चारोळी आयुष्य चारोळी प्रसिद्ध चारोळी Marathi images in positive charolya motivation charolya 




Marathi kavita aayushavar kavita positive thoughts poem Marathi kavita collection Marathi

चारोळी  motivational charolya 
 kavita aayushavar kavita Inspirational kavita 

life on charolya Marathi love poem charolya with Images 

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...