savitalote2021@bolgger.com

सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१

* वेदनेचे गाणे *

   *** वेदनेचे गाणे  ***

पुरे आता झाले 
वेदनेचे गाणे 
मेंदूला मुंग्या येतात 
वेदना सहन करता - करता 
नयनातील अश्रू.. 
विरहामुळे कि वेदनेमुळे 
मनाला कळतच नाही 
आठवणीने माखलेल्या जखमेला 
कळतच नाही!!! 
शब्दांच्या कल्पकतेला 
वास्तव वा स्वप्न आहे हे 
वेदनेची...?
वादळ पुरे आता 
विरहाचा कल्लोळ शांत 
करून घे 
वेदनेची वेदना 
अंतर्मनात जपुन ठेव 
पुरे आता झाले 
वेदनेचे गाणे...!!

               ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-    *** वेदनेचे गाणे  ***

      अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!


==========================

रविवार, ८ ऑगस्ट, २०२१

//// श्रावणमास /////

/////   श्रावणमास /////

श्रावण मास हिरवा शालू 
नेसून हसतमुखाने स्वागत 
करते सृष्टी नवनिर्मितीची 
फुले झाडे फुलले नवचैतन्य 
फुलले नभ, पंखामध्ये बळ 
येती भरारी उंच आकाशी 
श्रावण मास हिरवीगार सावली 
हिरवेगार पावले, हिरवेगार स्वप्न 
श्रावण मास ऊन-पावसाचा खेळ 
मजेत सोनेरी किरण हर्षउल्हास 
दारोदारी श्रावणमास 
हिरवळ चोहिकडे दाटे 
हसतमुखाने 
हसतमुखाने..!!

          ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  ////   श्रावणमास /////

        अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!



===============!!!!==========

/// प्रतिभा काव्यमिलन ///

///  प्रतिभा काव्यमिलन ///


           माझी तुझी भेट कदाचित जन्मानेच झाली असावी.  तु माझ्यात रुचत गेला आणि  मी तुला माझ्यात रुजविता गेली.  माझ्या- तुझ्या सागर प्रेमात शब्द एक एक पायरीने !! तू माझा मी तुझी म्हटले तर अबोल प्रेम आपल्या सोबत.  शब्द वाहते, लाजत  - मुरडत रंगीबिरंगी शब्दांसोबत..!!


साथ माझे दे तू 

माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत 

झरा वाहू दे प्रेमाच्या 

असाच काव्यप्रतिभेने 

समर्थ बनव मला तुझ्या 

सोबत राहण्यासाठी 

सदैव तुझ्या ..

अंतर्मनात.......!!


        सुंदरतेने नटलेले काव्य फुलवीत.... मिलन शब्द स्पर्शाने.  प्रेम भावनेने फुललेल्या भावमनाला नव्याने ओळखत होत होती.  तुझे माझे मिलन प्रेम कवितेने.  प्रेमाचा बंधनला लाजूनच पानावर उमटत असे. 

         फुलवित असे बंद दाराआड एकटेपणात.आपले मिलन नवीन काव्यरूपात.  नवनिर्मितीची नवीन काव्य मनाला प्रफुल्लित करीत असे. त्यातून फुललेले काव्य आनंद मनाच्या खोल नवीन  नात्यात रुजविता असे.  तुझे माझे मिलन नवकाव्याची... रम्यदुनिया.  

       आपण आपलेच असतो त्यावेळी गोंधळ फक्त अवेळी आलेल्या शब्दांचा.काव्य प्रवाह चालू... स्वतः स्वतःच्या मनाशी आणि स्वतःच्या भावनेवर आवर घालत  प्रीत मिलनाचा नवीन काव्य शब्दांवर. मला तुझ्या मिठीत घेत नवीन सहवासात भूतकाळातील चित्रीकरण अंधुक करीत जातो; वर्तमानात जगण्यासाठी!!! 

      नवीन सहवासात नवीन मिलनात घट्ट नवाप्रकाशासारखे.  गुंजत राहते ते शब्द तुझ्या माझ्या मिलन काव्याचे.  तू सांगतो, बघ स्मृतीच्या आठवणीतील कविता फक्त मनोरंजनासाठी मन समाधानाचे रंजकवादी सौंदर्यशास्त्राने नटलेले आता सोडते वाट थोडीतरी बाजूला ठेवून ती वाट जुन्या मिलनाची... 


माझी तुझी शब्दमैत्री 

आनंदाने फुलवत राहू 

मूके शब्दही बोलते करू 

मिलनाने जपू सुगंध 

आपल्यातील शुद्ध प्रतिभेचा 

स्पर्श मखमली डायरीतील 

पानांचा... 

भान ठेवून चिंब भिजून 

आपल्याच मिलनात 

रोजच भेटीने..!!

       हरवलेल्या क्षणांना हातात पकडून ठेव पण सहज काव्यासाठी.  तुझी  - माझी भेट प्रेमकाव्य फुलली.  आता हरव ती वाट. सामाजिक बांधिलकी जपत फुलवू नवीन मिलन काव्यरूपात नवीन शब्दात नवीन काव्य शैलीत नवीन विषयांना काव्यप्रतिभेला नवनिर्मिती करू तुझ्या-माझ्या मिलनाने. 

        नको वाट बघू कोणाचीही, मनाचा झरा वाहू देऊ.... आपल्या मिलनाने.  प्रीत फुलं फुलवून नवीन काव्य मिलनात. थोड्या वेगळ्या स्वरूपात..!! माझ्या तुझ्यातील प्रेमाने.  मी तुझी प्रतिभा तू माझे शब्द...  करून.

        नवीन इंद्रधनुष्याच्या रंगाप्रमाणे नवनिर्मिती काव्यमिलनाने. भाष्य करू प्रश्नांवर समस्यांवर अन्यायांवर विकासाच्या नावाने चाललेल्या भ्रष्टाचारानंवर आणि सामाजिक असंतोषवर. 

           काव्य शब्द मिलन करून माझ्या तुझ्या प्रतिभेने तुझ्या-माझ्या सोबतीने शब्दाच्या साक्षीने डायरीच्या पानाच्या फुलवू आपले मिलन घट्ट मिठीत तुझे असणे माझे असणे म्हणजे तुझ्या माझ्या मनस्पर्शाने शब्द स्पर्शाने आत्म्याला मंत्रमुग्ध करू काव्य नवनिर्मितीच्या घट्ट मिलन स्पर्शाने..!!

माझा आत्मा तू 

तुझी आत्मा मी 

विश्वासघाताचे मिलन न मिळो 

आपल्यास आपल्याच काव्यप्रतिभेने 

तन मनावर राज्य करू 

माझ्या तुझ्या शब्द मिलनाने 

सोबतीला आपले मित्र 

घट्ट मिलनमिठीत.... 

पेन पेन्सिल डायरी 

पुस्तके..!!!!



                    ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- ///  प्रतिभा काव्यमिलन ///

            अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!

************************************

शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

गुरुकिल्ली

चुकांमधून शिकत राहतो माघार 
न घेता पराभवातील अनुभव 
यशाच्या मार्गावर चालताना चुकांचे 
योग्य नियोजन आत्मसात करणारी गुरुकिल्ली

          ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-**गुरुकिल्ली**

           अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ...आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!

संघर्ष न संपणारा आपलाच आपल्याशी संघर्ष

       कधी कधी आजूबाजूची परिस्थिती सकारात्मक नकारात्मक दोन्ही पद्धतीचे नसते. त्यावेळी संघर्ष हा कुणाकुणाशी असतो. या प्रश्नांच्या अनुषंगाने लिहिलेली.... ही स्वरचित स्वलिखित कविता!!! आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

***  संघर्ष न संपणारा 
                 आपलाच आपल्याशी संघर्ष***

संघर्ष आपला आपल्याशी 
सतत न संपणारा 
आयुष्याच्या पोथीमध्ये संघर्षगाथा 
न संपणारा मनाच्या वेदनेला 
शांत करण्यासाठी संघर्षमोठा 
आशेवर जगताना आपल्याच 
मनाशी संघर्ष, नजरेआड...
करता येत नाही;
परिस्थिती आपल्यास आजूबाजूची 
अन चालू होतो नवीन परिस्थितीशी 
अन्यायाशी स्वतःला आणि इतरांना 
जागृत करण्यासाठी... 
एक नवीन संघर्ष!! 
आपलाच व्यक्तींशी व
स्वतः आपल्याशी सुध्दा 
संघर्ष.....!!!!

         ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे 

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- ** संघर्ष न संपणारा 
                 आपलाच आपल्याशी संघर्ष **


           आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. 




*************************************

संघर्ष....

          आयुष्यातील संघर्ष हा हा अनेक वाटांनी अनेक पायवाटांनी अनुभवांनी आलेली असते. संघर्षाची महत्व सांगण्याचा छोटासा प्रयत्न..!!


///// संघर्ष....////

संघर्ष....
आयुष्यातील टप्प्याटप्प्यावर 
मिळालेला अनुभव 

संघर्ष... 
अंतर्मनातून परिपक्व 
बनविणारे साधना 

संघर्ष ...
यशाच्या पायरीवरून 
शिखर गाठणारी 
अनाकलनीय पायवाट 

संघर्ष....
स्मृतीच्या पानांची 
शक्तिशाली परिपक्व 
बनविणारी जीवनगाथा

              ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  //// संघर्ष....////

        अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!


----------------------------------


प्रकाश सत्यसारखे.....!!!!

माझे मन विचार बेधुन्द बेभान 
वाऱ्यासारखे वावरणारे आणि माझे 
मन खिडकीसारखे खुल्या 
प्रकाश सत्यसारखे.....!!!!!

           ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-*** प्रकाश सत्यसारखे.....!!!!  **

       अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!

/ परतीचा प्रवास /

/// परतीचा प्रवास ///

जीवघेणी होता परतीचा 
प्रवास माझा एकटीचाच 
निघता निघता शक्तीच 
पायातील पुन्हा 
पायवाटेकडे जातात... तुझ्याच 
नकोसा वाटतो 
ती परतीच्या प्रवासाची आठवण 
जगण्याच्या प्रवासामध्ये 
उदासवाणी करून जाते 
जागेपणी... गाढ झोपेतही 
परतीचा प्रवास 
आठवणी...!!
              ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- /// परतीचा प्रवास ///


           आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका ..!!

शुक्रवार, ६ ऑगस्ट, २०२१

आयुष्य जगताना

// आयुष्य जगताना //

आयुष्य जगताना 
फक्त आयुष्यच असावे 
आपल्या वाटेला त्यात 
कुणाचे रुसवे नको 
फुगणे नको 

आयुष्य जगताना 
फक्त असाव्यात आठवणी 
सुखद हसऱ्या फुलासारखे 
टवटवीत...

आयुष्य जगताना 
फक्त तळपायाखाली वेदनेचे 
काटे नसावे त्यात काही 
सुगंधाही असावा 
मोगऱ्याच्या फुलांचा !!

आयुष्य जगताना 
फक्त संघर्ष नको  
यावे मावळतीच्या सूर्याबरोबर 
उदयाच्या सूर्याची 
पहाट.....!! 
आयुष्य जगताना


       ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-**आयुष्य जगताना**

            अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!

गुरुवार, ५ ऑगस्ट, २०२१

खुपते मला

खुपते मला
माझ्या तुझ्यातील दुरावा 
खुपते मला 
तुझ्या नयनातील अश्रू
खुपते मला
माझ्या डोळ्यातील स्वप्न
तुझ्यासाठी असलेले
खुपते मला
माझ्या पायातील पैंजण
तू दिलेले
खुपते मला तुझ्याशिवाय 
आलेला दुरावा
खुपते मला ...!!


           ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-///  खुपते मला //

     अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा .आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you...!!!

************************************

पळसाला पाने तीनच



पळसाला पाने तीनच 

        जीवनातील सत्य समोर आली की कळते निसर्गाने सर्व गोष्टी कशा का निर्माण केले असेल. ऋतुचक्रनुसार फुले फुलतात, फळे येतात, पानगळ होते, परत पालवी येते.... श्रावण फुलते , चोहीकडे. हिरवेगार आणि हिरवेगार ....ऊन पाऊस थंडी निसर्ग नियम कसे तयार केले असेल; हे न समजणारे कोडे आहे.

          म्हणतात नियम हा न बदलण्यासाठी असते. कधीकधी तो बदलावा लागतो. निसर्ग आपला नियम बदलतो आणि मानवी स्वभाव मात्र न बदलणारा!! ' व्यक्ती तितक्या प्रवृत्ती',या म्हणण्यानुसार समाधिस्त होत राहते. वाट पाहत राहावे लागते... वेडी आशा मनाला असते.

        बदलेल... बदलेल कधीतरी बदलले पण तो ना बदलणार असतो. म्हणतात," पळसाला पाने तीनच", म्हणी नुसार..!!!

        मानवी प्रवृत्ती वेगवेगळे असते. भावना कल्पना विचार मनस्थिती भिन्न असतात. अभिव्यक्ती वेगळी असते... मानवी स्वभाव कधी न बदलणार असतो .सुखदुःखाच्या स्मृतीच्या गाभा प्रत्येक वेळी त्यांच्या सोबत असते. नव्या पालवे अंकुरतात तसे विचार मेंदूतून अंकुरित असतात. श्रावणात माळरानावर जसे फुले फूलता आणि वाऱ्यासोबत ते डोलत रहतात ते बहरलेले रान नवनवीन कल्पना निर्माण करीत असतात अगणित!!

          क्षण सृष्टीचे आपल्या समाजात आपल्या आयुष्यात ते देऊन जाते. घेणेदेणे या दोनही गोष्टी एकाच वेळी चालू असतं. प्रत्येक वेळी त्यांच्यासोबत असते... नव्याने शोध घेता घेता डोळे पापणीआड करून सत्य लपविले जाते. अचानक आलेल्या परिस्थितीकडे हळव्या क्षणाला स्वतःचे सामर्थ्य निर्माण करू पाहतात. अशी माणसे म्हणतातना ,"पळसाला पाने तीनच", !!

        मानसिकता कधीच बदलत नाही. सुखदुःखांच्या इतरांच्या मनाचा पालापाचोळा करीत असतो.  एरवी आपण चालून घेतो ....ही मानसिकता!  पण कधीकधी या अंधारलेल्या मानसिकतेमुळे कितीतरी लोकांचे स्वप्न विचार कल्पना नष्ट होतात. मनाचा कोंडवाडा होते... बोलता येत नाही आणि सांगताही येत नाही. शरीराला हळूहळू स्पर्शातून निघून जातात त्यांच्या बद्दलच्या हळूवार असलेल्या भावना विश्वास. पात्र नसलेली व्यक्ती होऊन जाते त्यावेळी आणि सामोरे ते एक सत्य ,'पळसाला पाने तीनच' असतात.

   मनाला यातना होत असताना माणूस स्वार्थी का होतो कळत नाही. सतत सतत तेच उगाळले जाते. मौन असले तरी गोजिरवाणे केले जाते. आवरताही  येत नाही सावरताही येत नाही. निवांत शांतता. उन्हाचा चटका मनाला नाही तर मेंदूला लागत असतो. सोसवते तेवढे सोसत राहायचे आणि पवित्र म्हणायचे हे ठरवले तरी कुठपर्यंत???

       प्रश्नांची उत्तरे मात्र मिळतच नाही. पळसाच्या पानासारखे. कडूलिंबू स्वभावाने कडू....त्याला गोड आंबट कोणत्याही प्रकारात शरीरात घेतले तरी कडूच. स्वभाव गुण बदलत नाही तसेच काही व्यक्तींचे!!!
                     स्वभावाला औषध नसते!!

          आयुष्य ही जवळपास तसेच आहे आयुष्यात ज्या झाडांवर कितीही फुले फळे पाने आली तरी पानगळ सहन करावेच लागते. आयुष्य आनंदी असावे असे सतत वाटत राहते. पण आयुष्यात अनुभव येत राहतात. अनुभव देत  राहतात... आनंद लुटत राहतात. सुखदुःखाच्या पळसाच्या पानातील सत्यसारखे.


सतत वाटत राहते 
इच्छा-आकांक्षा नको 
पण त्याच आडवे येतात 
क्षणभंगुर सत्यसोबत 
अनगणित... 
लाल पिवळ्या फुलांनी फुललेल्या 
फुलांसोबत आणि नष्ट होतात 
मानवी प्रवृत्ती 
पळसाला पाने तीनच 
स्वभावासारखे 
लाखमोलाची शिकवण 
मानवी प्रवृत्तीची...


           कधी आनंद कधी दुःख कधी निराशेच्या वाटेवर चालताना एकटेपणाची भीती वाटली नाही... संघर्ष होता. प्रत्येकांच्या जीवनात असते. माहीत नसते तो कोणत्या वाटेवर आपल्याला घेऊन जात असतो. मनासारखे काही होत असते काही होत नाही... शब्दांना आपण आपले करतो पण इतरांच्या शब्दांचे काय?  सगळे कसे अचानक नवनवीन विरोधाभास असलेले शब्द कसे आले आयुष्यात.

          ऊन सावली झेलता झेलता अचानक महावादळ यावे चिखलासोबत तसे झाले. काही क्षणासाठी आयुष्य.... शब्दांचे नाते... शब्दांचे गाव... शब्दांचेच व्यक्तिमत्व... सुंदर अविचारी मानवी स्वभाव.... कदाचीत मानवी स्वभावाला पुसायला निघालेली पिढीजात जात !!! उत्तर सरळ असतात पण सरळपणा नसतो त्यांच्यामध्ये; पळस म्हणी जणू!! सहजच पण सहजतेल्या आपल्या स्वभावाने गुंतागुंत करीत राहतात.

         असंख्य शब्दांची माळा गुंफत शक्य नसलेल्या गोष्टी शक्य करत. त्या बदल्यात नाही, पळसाच्या पानासारख्या. सतत एकाच भूमिकेत कपाळावरील रेषाच्या भाग्यरेषा सोबत सुखद आणि इतरांसाठी दुखद. पळसाच्या पानासारखे! अलगद हातातून निसटून जातात इतरांची किमती लाखमोलाचे क्षण शब्द. ते कवडीमोल केले जातात.निर्णयाची अंमलबजावणी फक्त त्यांच्या वाटेवर कारण ते बदलू शकत नाही कुणासाठी.

           त्यांचे रक्त काळी झालेली असते जीभ. हृदयात पाणी आणि मेंदूत किडे सोयीनुसार. याच वणव्यात पेटविली जाते मनातील स्वप्न इतरांची.
 
    सैरभैर होते मन त्यावेळी हरवून जाते. विचारांची वाट आटले जातात. सर्व शब्द जागे असतात. फक्त हरवलेली वाट सुकलेली फुलपाकळी चिंब भिजलेले आसवे... वाळवंटाचे  जीवसृष्टी. कारण ते असतात पळसाचे पाने तीनच या स्वभाव धर्माची...!!!

       
         
           ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-***  पळसाला पाने तीनच ***

        अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!






************************************

बुधवार, ४ ऑगस्ट, २०२१

आठवते मला

.
//// आठवते मला ////

आठवते मला 
तुझे हसणे 
माझे हसणे 
कातरवेळी झालेली 
ती भेट 
आठवते मला 
निसर्गरम्य वातावरणामध्ये 
घालविलेले मनसोक्त 
क्षण 
आठवते मला 
ढगाळलेल्या मावळतीच्या 
सावलीसोबत 
विरह मतभेदाचे 
आठवते मला 
माझ्या तुझ्यातील रेशीमबंध 
आठवणींसोबत
            ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-***   आठवते मला ***

        अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!

////.....आठवते मला...////

                प्रेमाची व्याख्या करता येत नाही की तिला कोणत्याही शब्दात बांधूनी हि ठेवता येत नाही प्रेमात जगायला शिकत असतो जपायला शिकत असतो पण कधीकधी ते अंदाज चुकीचे ठरतात आणि सामोरे ते एक सत्य विरहाची या भावनेतून लिहिली गेलेली ही स्वरचित लिखित रचना आहे .आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

** आठवते मला...**

आठवते मला 
क्षणाक्षणाला 
वेळी-अवेळी आलेली 
तुझी आठवण 

आठवते मला 
अजूनही लपून छपून ते भेटणे 
तुझा हात माझ्या हातात 
तुझ्याही नकळत घेणे 

आठवते मला ...
तुझे ते हसणे  
माझ्या गालावरील लाली 
कोंडलेल्या मन भावनेशी 
संघर्ष करताना स्वतःला 
दूर करीत हसणे

आठवते मला ...
तुझ्या मिठीत न येता 
मिठीत असल्याचे भास 
गुलमोहरासारखे सदाफुलीसारखे 
टवटवीत असणे 
तुझे ते निखळ हसणे 

आठवते मला 
तुझ्या आठवणीत 
रातराणीसारखी सुगंधित फुलणे 
जसेच्या तसे तुझ्या शब्दांवर 
प्रेम करणे 
नयनात प्रेमअश्रू आणि तुझ्या सोबत 
असलेला क्षणांचे बांधलेले 
सुखाचे आलेख 

आठवते मला  
अजूनही नवीन काही लिहिण्यासाठी 
तू सांगत असायचा  
बेभान होऊन ऐकत असायचे 
ते शब्द... आत्मविश्वास होते  
निखळ प्रेमाचे
माझे -तुझे प्रेम सकाळच्या 
रम्य सुर्योदयासारखे  

आठवते मला...
पावलोपावली तुझ्या शब्दांच्या 
शब्दसाखळी सोबत मनसोक्त 
रमताना ..अंधार दाटून येतो 
ढगाळलेल्या वातावरणासारखा  
प्रत्येक स्तरावर आठवणींच्या 
उत्तर शोधत असते देणा-घेण्याचे
तुझ्या माझ्या प्रेमातील दुराव्याचे
आठवते मला...

             ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे 


©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- **** आठवते मला...****

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका ...!!!


*************************************

प्रयत्न

*** प्रयत्न ***

पुन्हा नवीन 
पहाट येण्यासाठी 
प्रयत्न सोडू नको 
उगाच डोळ्यात 
पाणी आले 
तरी 
वळून पाहू नको 
प्रयत्न सोडू नकोच 
जीवन प्रवासाचे..!!

       ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- **** प्रयत्न ****

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका!!! 

धमाल ऑलिंपिकची

*** धमाल ऑलिंपिकची ***

नजर रोखून पाहू 
आपल्या ध्येयांच्या 
कठोर अडचणींकडे... 
प्रवास आहे त्याच 
पावलांनावर!! 

सुवर्ण पदक जिंकण्याचे 
तिरंगा फडकविण्याचे 
स्वाभीमानाने खडतर प्रवासासाठी 
लढाई जिंकण्याची 
नजर रोखून !!!

         ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-***  धमाल ऑलिंपिकची **

             अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!!

*************************************

मंगळवार, ३ ऑगस्ट, २०२१

** आरसा मनाचा **

              मनाचा आरसा आपल्याला सकारात्मक शैलीमध्ये जगण्याचे सामर्थ्य देते. आरसा मानचा !!! कविता स्वलिखित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

*** आरसा मनाचा ***

आरसा मनाचा 
सांगतो मला 
आरसा मनाचा 
हे ही दिवस जातील 
प्रतिबिंब येईल 
सुखद सावलीचे  
हसऱ्या नयनाचे 

आरसा मनाचा 
सांगतो मला 
झाले गेले विसरून 
जाऊ अंतर्मन परत 
प्रफुल्लित करू 
सांगतो मला 

आरसा मनाचा
सकारात्मक शब्दांचा 
सकारात्मक भावनेचा 
स्पष्ट प्रतिबिंब 
माझ्याच मनाचा
आरसा मनाचा...!!!


             ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-*** आरसा मनाचा ***


       अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you!!!


*************************************

सोमवार, २ ऑगस्ट, २०२१

खरंच कुठे चुकतंय का...

*** खरंच कुठे चुकतंय का...***

स्वतःला विचारता विचारता 
प्रश्न पडतात 
खरंच कुठे चुकतंय का 
नम्रतेने प्रश्न करते 

मी स्वतः आत्मपरीक्षण 
करावे का? की सोडून 
द्यावे नशिबाच्या हवाली..!!
उत्तरांच्या अपेक्षेने; 

खटकते मला 
खरंच कुठे चुकतंय का 
फक्त आभास आहे 
चुकण्याचा 

आभास आहे 
प्रश्नांचा की... 
आभास आहे 
सत्याचा स्वतः स्वतःला 

विचारते 
खरंच कुठे चुकतंय का 
आपण आपल्याकडून जास्तच 
अपेक्षा करतो का?

बहुतेक हेच 
खरंच चुकतया..!!

                    ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- *** खरंच कुठे चुकतंय का...****

        आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका..!!!


---------------------------------- 

मी तुझ्यावर प्रेम करते

   ***  मी तुझ्यावर प्रेम करते ****

मी तुझ्यावर प्रेम करते 
कारण आठवणीच्या 
महापुरात स्वतःला सावरता 
सावरता माझ प्रेम...
माझ्या आयुष्याच्या प्रत्येक 
वेळी वरचढ होत 
जाते... 
म्हणून मी 
तुझ्यावर प्रेम करते 
आयुष्याच्या शेवटच्या 
क्षणापर्यंत... आणि त्यानंतरही !!

          ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-*** मी तुझ्यावर प्रेम करते ***

          अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!



*************************************

संस्काराचे


जुन्या संस्काराचे पायेमुळे 
खोल असतात 
ते दिसायला कुरूप होते 
स्वार्थी माणसांना... 
असे असले तरी 
संस्कार असतात 
ते ...
खानदानीपणाचे !!!

                ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-*** संस्काराचे ***

       अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you...!!

*************************************

रुपी

सांभाळणारे हदय 
रक्ताळलेले स्वप्न एकटेच 
असतात... न समजलेल्या 
भावना रुपी व्यक्तीला !!

                  
                    ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-*** रुपी***

        अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!


----------------------------------

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...