"लेक सावित्रीची "
***मराठी काव्यसंग्रह***
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
# सावित्री #सावित्रीबाई फुले #सावित्री ज्योतिराव फुले #महात्मा ज्योतिराव फुले# फुले
#Marathi poetry anthology
#savitalote#Kavya Sangraha #kavitasangraha#Lake Savitri'
#Savitri #Savitribai Phule #Savitri Jyotirao Phule #Mahatma Jyotirao Phule# Phule# मराठी काव्यसंग्रह #काव्यसंग्रह #कवितासंग्रह #मराठी कविता
=============================
#सावित्रीबाई फुले मातेस अर्पण
#Savitribai offering flowers to mother
=============================
*** #प्रस्तावना ***
*** #Preface ***
"लेक सावित्रीची", या विषयावर काव्य तुमच्या हाती देताना समाधान वाटत आहे. काव्य /कविता या भावविश्वावर आधारित असतात. कधी ही शास्त्रीय पद्धतीने लिहिली जात नाही. त्यांना भावनेची जोड असते. "काव्य ही कला नसून प्रतिभा आहे", ती जोपासावी लागते. ती रुजवावी लागते. नवनवीन शब्द ...नवनवीन पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे मनाला उत्तेजना मिळते. शक्ती मिळते. अलौकिक प्रफुल्लित आनंद मिळतो. सर्जनशील शक्तीला नवीन उगम मिळतो.
("Poetry is not an art but a talent", it has to be cultivated. It has to be inculcated. New words...are tried in new ways. It stimulates the mind.)
कवितेमधून सामाजिक,राजकीय,आर्थिक इत्वियादी षयावर लिहिले जाते. कविता हे विश्व फार व्यापक आहे. या विश्वात एखादा तरी मोती मिळावा इतकीच अपेक्षा असते.
काव्य/ कविता शब्दात मांडताना नेहमी लक्षात ठेवावे लागते," शब्द हे तलवारी सारखे आहे".
शब्दांना एका विशिष्ट कवितेमध्ये आणि काव्यसंग्रहात संग्रहित करताना सुद्धा खूपदा गणिते शब्दांचे चुकतात तरीही शब्द प्रेरणा देत असतात. आणि नवीन कवितेच्या स्वरूपात ते कागदावर उमटतात नवीन प्रतिभेने...!🌹
नवीन शब्दरुपी माळे मध्ये गुंफण्यासाठी प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी शब्द अलौकिक स्वरूपात आपल्याकडून लिहिले जाते.
लेखक समाजाच्या भावभावनांना, आशा - आकांक्षांना आणि सुखदुःखांना शब्दरूप देत असतो.
(The writer gives expression to the feelings, hopes and aspirations of the society.)
काव्य /कविता लेखन निर्मिती हे वाचकांसाठीच असते. किंबहुना वाचकांसाठीच लिहिलेले असते. काव्य प्रोत्साहित करीत असते. नवीन यशोशिखर गाठण्यासाठी प्रेरणा देत असते.
✍️सविता....
=============================
****#दोन शब्द ***
**#Two words***
"लेक सावित्रीची, या काव्यसंग्रहाच्या भूमिकेबद्दल"
(About the role of #Lake Savitri, in this anthology".)
समाजातील विविध विषयावर अधोरेखित करीत असते. बदलत्या जगाच्या आणि इतिहासाच्या इतिहास शब्दांमध्ये मांडला जातो. साहित्य सामाजिक घडामोडी शब्दांच्या स्वरूपात संग्रहित करून ठेवतात आणि हे शब्द समोरच्या पिढीला सुवर्ण इतिहास असतो
साहित्य म्हणजे एक अशी चौकट त्यामध्ये विविध प्रकारचे अभ्यास घटक परिचित येतात. त्या चौकटीतला एक भाग म्हणजे कवितासंग्रह/ काव्यसंग्रह.
सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित हा काव्यसंग्रह त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना दिलेला मानाचा मुजरा.
काव्यसंग्रह तयार करणे यामागे एकाच उद्देश तो म्हणजे,"सावित्रीबाई फुले" यांचे कार्य नवीन पिढी पर्यंत संग्रहित पद्धतीने पोहोचविणे होय.
(#The only purpose behind creating an anthology is to convey the work of "Savitribai Phule" to the new generation in a collected manner.)
सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून आपल्याला भेटतात. सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी जो पाया रचना त्याची प्रचिती म्हणजे आज भारताच्या स्त्री राष्ट्रपती आणि विविध प्रमुख पदांवर असलेले स्त्रियांचे वर्चस्व!
ही क्रांती फक्त सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या अथक प्रयत्नाने व संघर्षाने झाली. त्यांच्या या संघर्षाला काव्याच्या स्वरूपात मांडण्याचा माझा थोडाफार प्रयत्न.
चुकलाच माफी असावी. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कारण ,"सावित्रीचा इतिहास म्हणजे आजच्या स्त्रीचे अस्तित्व आणि आजच्या स्त्रीचे अस्तित्व म्हणजे उद्याच्या स्त्रीचा इतिहास." उद्याच्या स्त्रीला इतिहासातील सावित्री माहीत असावी. जी मला माहित आहे ती सावित्री त्या स्त्रीलाही माहीत असावी तिच्या मुक्त स्वातंत्र्याच्या परिभाषेत....!!❤
✍️सविता ....
=============================
*** #अनुक्रमाणिका ***
#index
1.वात
2.सावित्री माझी
3.लाट
4.ती जळत होती
5.उंच झोका आम्हाचा
6.क्रांती
7.ज्ञानामृत
8.आधुनिक समाजव्यवस्थेसाठी
9.परिवर्तन
10.प्रकाशवाट
11.सावित्री आहे
12.ओझे कमी झाले
13.मानाचा मुजरा
14.तेव्हा सावित्री
*** #index ***
1. #Vata
2. #Savitri my
3. #Wave
4. #She was burning
5. #High tilt ours
6. #Revolution
7. #Knowledge
8. #For modern social order
9. #Transformation
10. #Prakashwat
11. #Savitri is
12. #Burden reduced
13. #Mujra of honor
14. #Then Savitri
========================================================#1
*** वात ***
ज्ञानाची वात पेटविली
अज्ञानाच्या काळोखात
ज्ञानगंगा वाहिली समाजमनात
शिक्षणाच्या विरोधी मतप्रवाहाला
दगड माती अंगावर घेत
पेटविल्या मशाली अंधकारमय
आंधळा समाजात
ज्ञानवात होऊनी
अक्षरांच्या ज्ञानगंगोत्रीला समाजमान्य
केले देह झिजवून, आत्मसन्मानाने
ज्योतिबाच्या साक्षीने
नवीन विज्ञान युगाची वात पेटविली
नवविचार प्रवाहात
सावित्री तू वात झाली ज्योतिबांची
सावित्री तू वात झाली स्त्रियांची
सावित्री तू वात झाली नवयुगाची
सावित्री तू वात झाली त्यागप्रेरणेची मानवतेची सावित्री तू वात झाली आधुनिकपिढीची
सावित्री तू वात झाली आधुनिक पिढी
ज्ञानाची वात पेटविली
अज्ञानाच्या काळोखात !!
✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
===========================2
***सावित्री माझी***
माझी सावित्री
अंगावर झेलली
शेण माती दगड सोबत
विचारांची गुलाम असलेला
समाजव्यवस्थेच्या परंपरा
तरी खचली नाही हार मानली नाही
डगमगली नाही
नवीन शिक्षणाची ज्योत लावीत
केशवपण बालविवाह विधवाप्रश्न
नवीन जाणीव करून काळोख
उजेडात परिवर्तन करून
खुले विचारांचे व्यासपीठ दिले
माझ्या सावित्रीने ज्योतिबाच्या संग
नूतन विचारांची माळ घरोघरी
लावीत...!
✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
===========================3
**** लाट ****
सावित्री लाट होती
अज्ञानाच्या पायऱ्यावर नवीन
दिवा होती
तोडणारे खूप होते पण ती
जोडणारी होती
नवीन आधुनिक जग
हवेहवेसे वाटणारे
समाजव्यवस्थेच्या खडतड
प्रवासात उजेडात करून दिला
प्रकाश ज्योतीने शिक्षणाच्या
सावित्रीने नवीन छंद दिला
शब्दांच्या सोबतीने
नवीन ज्ञानाची नवीन ओळख
शिक्षण प्रवाहात आणून दिले
टवटवीत फुलांचा सुगंधासारखे
स्वातंत्र्याच्या या खुल्या दारात
सावित्री लाट होती
अज्ञानाच्या पायरीवरती...!
✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
===========================4
*** ती जळत होती ***
ती रोजच जळत होती
नवीन उजेडासाठी आम्हाचा
आम्ही स्वतंत्र जगावे म्हणून
शेण-माती झेलत होती आम्हासाठी
रोज नवीन दिवस मोकळा
होत - होता सुगंधी चंदनासारखा
वाट स्वप्नांना दाखवीत झिजवित होती
लढत होती हिंसेला प्रतिउत्तर देत होती
संयमाने एक एक पाऊल चालत
रोजच जळत होती
पण नवीन पद्धतीने उगवित होती
ज्ञानाचे दार खुले करून देत होती
स्त्री उजेडात आणत होती
स्वतंत्र विचारांची...!
✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
===========================5
***उंच झोका आम्हाचा***
मुली शिकला शिक्षणाच्या जोरावर
उंच झोका घेत
समाजव्यवस्थेच्या पायावर नवीन
प्रश्न निर्माण करत केली
उत्तर देत गेली
आम्ही लेकी सावित्रीच्या
आधुनिक समाजाचा झोका आम्हाचा
समानतेचा .....
फुलांच्या घरातील एक स्त्री
शिकली सावित्री
त्यांनी समाजातील इतर स्त्रिया शिकविला
चित्र बदलले वारे बदलले
सर्वोच्च पदाचा मान मिळविला
उंच झोका अजून उंच गेला
बांधलेल्या सावित्रीने
वही पुस्तकाच्या साक्षीने!!!!!!
✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
============================6
*** क्रांती ***
ज्योत शिक्षणाची दारोदारी
पेटविली नवीन क्रांती झाली
स्त्री शिक्षणाची
ज्ञानाचे गीत गात
दाही दिशा फिरविली
नवक्रांतीची ज्योत
आकाशालाही ठेंगणे केले
गगन भरारी ने हातात हात
घेत पेन्सिलच्या पेनाच्या साह्याने
माझी साऊ माझी सावित्री
तिच्या जन्माची यशोगाथा
क्रांती माझी माझ्या स्वातंत्र्याची
ज्योत शिक्षणाची दारोदारी..!
✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
===========================7
**** ज्ञानामृत ****
ज्ञानाचे अमृत देऊन आयुष्याची
नवीन वाट दिली नवीन पायवाट दिली
अंगावर दगड माती झेलत
नवीन क्रांतीची माळ दिली
ज्ञानज्योती पेटवित नवीन दिशा दिली.
स्त्रीला स्त्रियात्वाची जाणीव दिली
स्त्रीला स्त्रियांचे हक्क दिले
सावित्री माझी आहे सावित्री तुमची आहे
सावित्री ज्ञानगंगोत्री आहे
ना तिला जात ना तिला धर्म
फक्त ती सावित्री आहे
ज्ञानाने दूर अंधार करीत
उजेडाचा प्रकाश आहे
खुला विचारांचे मंच आहे
खुल्या स्त्री स्वतंत्र समाजाचे
आद्यबीज आहे, सावित्री क्षितिज्याचे
पंख भरारी घेतलेली
नवीन रान वाटेवर नवीन बहर
हिरवत्वाची खाण आहे
खुला विचारांचे नवे सूर आहे
सावित्री माझी ज्ञानामृत आहे!
✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
===========================8
**** आधुनिक समाजव्यवस्थेसाठी ***
ज्ञानाची ज्ञानगंगा घरोघरी
देऊन सावित्रींनी घडविला नवीन
इतिहास ब्राह्मणवादी समाजव्यवस्थेत
खुले केले दारे
आचार विचारांची नवी पहाट
ज्ञान विद्या खुले करून
दाविली नवीन चाहुलवाट
मानवास मानवासारखे समजून
पाणी दिले खुले करून
ब्राह्मणवादी समाजव्यवस्थेत
सेवा त्याग समर्पण विश्वास
या शब्दांना ओळख दिली
नरकवासना झेलणाऱ्या शूद्र समाजाला पशुपक्षांच्याही खाली वागणूक
त्यांना असे; त्यांना ज्ञान दिले
पारतंत्र्याची ओळख, मनुष्य जगण्याची
वाट दिली ब्राह्मणवादी समाजव्यवस्थेत
सावित्री होती ती आम्हासाठी
शिक्षणाची दारे खुले करून
अनिष्ट प्रथांवर कुऱ्हाड चालविली
नवीन स्वातंत्र्य खुल्या समाजव्यवस्थेच्या आधुनिक समाजव्यवस्थेसाठी
ज्ञानााची ज्ञानगंगा घरोघरी देऊन
सावित्रीने घडविला
नवीन इतिहास..!!
✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
===========================9
*** परिवर्तन ***
चुल-मुल या जग वास्तवात
सावित्रीने परिवर्तन घडविले
विचारांची आग घेऊन
विटाळ सावलीला नवीन
मान दिला
जग बदलविण्याच्या स्वप्नामागे
ताठ मानेने उभी होती
ज्योतीसंग ती मशाल होती
अनिष्ट चालीवर
संरक्षणाची ढाल होती
ध्येय पूर्ण केलेस संघर्षाच्या वाटेवर नवपरिवर्तनाची लाट घेऊन
बदलविली व्यवस्था, हातात
पेनाला तलवारीसारखी धार देऊ
ढालीसारखे वापरून माळ गुंफली
नवरत्नांची विटाळ सावलीला
क्रांतीची ज्योत दिली चुलमूल
जगवास्तवात सावित्रीने परिवर्तन
घडविले...!
✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
===========================10
*** प्रकाश वाट***
तू आयुष्य दिले
अंधाराला प्रकाशाची वाट दिली
मोडलेला समाजरचनेला
नवीन आधार दिला
शिक्षणाची दारे उघडी करीत
नवीन पालवी दिलीत
पेरलेले सर्वच उगवीत गेली
ज्ञानाच्या जोरावरती
मायेचा हात देत- देत
स्वतःचे आयुष्य दिलेत
तू माणूस झाली माणसासाठी माणसात
तू नरकवासनेत फुल सुगंधित
करीत सुगंधित उजेड दिलात
आयुष्यातील गणिते सोडविता सोडविता
नवीन गणिते दिलीस
नवीन आयुष्य दिले
प्रकाशवाटेवर ...!
✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
===========================11
*****साऊ ***
साऊ
अक्षराचे ज्ञान देत साऊने
नवीन घडविला शब्द येथे
स्वातंत्र्याचा, दिले शब्द माझ्या
मूकशब्दांना इथला संस्कृतीला तडे दिले
तू दिशा नवीन गुलामव्यवस्थेची
साऊ
तू माझ्या मुका शब्दांना आवाज
देत इथल्या संस्कृतीच्या नावावर
चालविलेली गढूळ पायवाट
प्रकाशात न्हाऊन
अमावस्येच्या काळोखाला
पौर्णिमेचा प्रकाश दिला
साऊ
जगणे काय असते
हे समजविण्यासाठी
तू जळत राहिली पण
आत्मविश्वासाने
दगड धोंडे शेलत
स्वच्छ लुगड्याची स्वच्छ घडी
अंगावर चढवत शिकवित राहिली
साऊ
ज्योतिबांच्या स्वप्नांना
सत्यात उतरविण्यासाठी झिजत राहीली
पण पेटवित राहिली
एक एक मशाल अनिष्ट
चालीरीतीन विरुद्ध राखरांगोळी
करण्यासाठी ...
तू वात झाली पण प्रकाश देण्यासाठी
तो प्रकाश आज माझ्यापर्यंत आहे
स्वप्नातील समाज सत्यात आहे
साऊ
तुझी पुण्याई म्हणून आज
माझे शब्द त्याच पेनाने आहे
जे कधी धूळपाटीवर गिरविले होते
अक्षराच्या ज्ञानाने
तू दिलेल्या...!!
✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
===========================12
*** सावित्री आहे ***
मानसन्मानाने स्त्री जगत आहे
ती ज्ञानज्योती देणारी
सावित्री आहे
भाग्यविधाता ती
आम्हा मुलींची समाजात
मानाचे स्थान देणारी
सावित्री आहे
रूढी परंपरा यांच्यावर
घाव घालणारी माझी
सावित्री आहे
महिलांना अंधारा
जीवनातून ....
प्रकाश देणारी
सावित्री आहे..!
✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
===========================13
**** ओझे कमी झाले ****
सावित्री तू उभा केला
जनसमूह शिक्षण परंपरेचा
तू अनिष्ट चालीरीतीवर भाष्य केले
स्त्रियांच्या समस्यांना
वाचा दिली
केशव पण बंद करण्यासाठी
संघर्ष केला तर विधवा स्त्रियांना
बळजबरीच्या बळीने नऊ महिन्याच्या
कैदेतून जीवनदान दिले
किती संघर्ष तो कल्पनाही
न करता येणारी
तू ते सत्यात आणले
तू करू शकली असती
हिंसक क्रांती संघर्ष पण
ज्योतीच्या मार्गाने
क्रांती घडविले कारण
तुला उगवायचे होते फुले
सुगंधी आणि समाजमाळा
फुलवायचा होता नवीन मानवतेचा
मुक्तीच्या जीवन जगण्याचा मार्गाचा
आणि विजय झाला
इथला स्त्रीशक्तीचा फक्त तुझ्या
प्रयत्नाने ओझे कमी केले
सावित्रीने
स्त्रियात्वाचे ती सावित्री होती..!
✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
===========================14
*** मानाचा मुजरा ***
सावित्री शाळेत शिकवायला निघाली
की समाजातील प्रतिष्ठित समाजवर्ग
गोळा होऊन शेण-धोंडे मारायचे
तरी ती हरली नाही
डगमगली नाही
शिक्षणाचा गुरुमंत्र दिलाच
आम्हा ...!
स्त्री समाज मुक्त केला कर्मठ
जाती समाजापासून
बंध तोडले गुलामगिरीचे
बंध तोडले अपमानचे
बंध तोडले अनिष्ट-चालीरीतीचे
अर्धांगिनी ज्योतिबाची होती
प्रकाशाची नवीन चाहूल
मुजरा मानाचा
माझ्या सावित्रीला
स्त्री प्रगतीच्या पहिल्या महिला
शिक्षित स्त्रीला
माझ्या सावित्रीला
मानाचा मुजरा
✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
===========================15
*** तेव्हा सावित्री ***
उंबरठा ओलांडून
शिक्षणाची दोर हाती घेतली
तेव्हा तू इथल्या वेद समाज संस्कृतीला समाजविरोधी वाटलीस
पण तू हरली नाही
या सनातन लोकांसमोर
तू प्रतिनिधी केलेस
गुलामगिरीतील स्त्री वर्गाचे
तू प्रतिनिधित्व केलेस
इथल्या गरीब गरजू शूद्र -अतिशूद्र
समाजव्यवस्थेचे
तू सावित्री होती
खरकटे उष्टे झेलत
फुलविले मळे
कधीही न हिरमुसणारे
कधीही न सुगंधी होणारे
पहिला पावसाचा दरवळ
कायमस्वरूपी
समाजात देऊन
गेलीस प्रगतीच्या वाटा
हिरवागार करून
गेलीस स्त्रीना स्त्रीयत्वाची
जाणीव करून
दिलीस फक्त शिक्षणाच्या
जोरावर मोठमोठ्या लढाया
जिंकून विजयपथावर
उंबरठा ओलांडून ...!
✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
============================
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
काव्यसंग्रह स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आपल्या सूचना गोड- कडू दोन्हीही शब्दात नक्की कळवा आणि मनातील विचारांना शब्द द्या..!❤
******************************************************************************