savitalote2021@bolgger.com

मंगळवार, ८ एप्रिल, २०२५

शेवटच्या श्वासाच्या पूर्णविरामानेच **

** शेवटच्या श्वासाच्या पूर्णविरामानेच **

  365 दिवसा मधून एखादा दिवस एखाद्या महिन्याची एखादी तारीख वर्षातला एखाद्या महिन्यातल्या एखादा दिवस हा त्रासदायक असतो. प्रत्येक वेळी हे नव्याने अनुभवायला येत आहे. तो दिवस आपल्यासाठी त्या दिवसापेक्षाही तो दिवस तारीख तो क्षण डिलीट झालेला असतो तरीही अलगद आपल्या डोळ्यासमोर येऊन जातो. कदाचित तोच दिवस दुःखाचा असेल...! दुःखाची पहिली ठिणगी असेल...! तो दिवस शब्दातही व्यक्त होत नाही. भावनेमध्येही व्यक्त होत नाही, आणि कोणत्याच दुःखालाही तो अभिप्रेत असू शकत नाही. इतका तो दुःखद क्षण... ती तारीख ....ती वेळ ....त्या दिवसाठी फक्त एवढेच शब्दात लिहावेसे वाटते कवितेच्या माध्यमातून....💔,

दुसऱ्याच्या वेदनेच्या पहिल्या पुस्तकाचे 
पहिले पान, पहिला धडा
 तो दिवस असतो
 आयुष्याच्या स्वप्नांच्या शेवटच्या 
पानासाठी 
यातना कमी होत नाही 
दुःख कमी होत नाही 
सुखाची चाहूल दिसत नाही 
पण क्षणात झालेल्या यातना 
कदाचित अश्रूंसोबत वाहत जातो 
गालावर आणि सर्व काही संपते
संपेल शेवटच्या श्वासाच्या 
पूर्णविरामानेच त्या दिवसाच्या 
सोहळ्यानंतर...!! 

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

==========================================================

एकदा येऊन सांगून जा

*** एकदा येऊन सांगून जा ***

तू काही सांग ना 
तसे फार कठीण आहे 
तरी पण तुला सर्व काही सांगते 
असे वाटत राहणे 
हेच आता समस्याचे मूळ कारण 
सांग त्याला कसं सोडू 
प्रत्यक्ष भेटू की स्वप्नात भेटून 
एकदा येऊन जा 
स्वप्नात आणि सांगून जा 
तुझ्या कोरड्या पाषाण झालेल्या 
नयनांचा अर्थ 
दिवस जुईसारख आधाराने कुठेतरी फुले 
पण या मनाचं काय करायच 
तू काही सांग ना 
माझ्या ओला झालेल्या मनाला 
माझ्यातील तुझ्यासाठी असलेल्या भावनेला 
माझ्या तुझ्यातील अपष्ट अशा रेषाना 
तस फार कठीण झाल आहे 
तुझ्याविनाच स्वप्नात की वास्तवात 
हे माहित नाही एकदा येऊन
सांगून जा..!!💕

✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

रविवार, ६ एप्रिल, २०२५

नियम

*** नियम ***

सुकलेल्या फुलांची जागा 
आता नवीन ताजे टवटवीत 
फुल घेतील 
पण सुकलेल्या 
फुलांचा काय? 
 तेही आदल्या दिवशी तसेच होते..!
 असो हा निसर्ग नियम 
तरीपण कधी कधी हा नियम 
कुणासाठी लागूच होत नाही 
कदाचित हेच कर्म आहे 
कदाचित हाच निसर्ग 
नियमाचा कर्माचा हिशोब आहे
आयुष्याच्या रंगमंचावर 
वर्तुळाच्या चक्रासारखा

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

      आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

============================

बहरले मी

*** बहरले मी ***

रंगात रंगले मी 
मुक्त बहरले मी 
मुक्त बरसले मी 
त्याच्या रंगात रंगूनी मी 

क्षितिजा पलीकडे मन हलके 
जणू मिळाले नवेच पंख 
सोबत त्यांच्या रंगात रंगले 
त्याच्या स्वप्नाच्या वाटेवर
 
अपूले स्वप्न पाहिले 
हसत खेळत नकळत 
चालत राहिले सूर जूळवूनी 
प्रतिबिंब तोच माझा 

हृदयस्पंदने तेच माझे
नयनातील स्वप्नांसोबत 
विसरूनी भान आता 
 परतावे, परत वाटत नाही 

स्वतःच्या रंगविलेल्या स्वप्नांकडे 
आता पाऊलखुणा दिसत नाही 
मुक्त बहरलेला माझ्याच 
मला...💕💕

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

          ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------

मी आहे

*** मी आहे ***

स्वातंत्र्याच्या वादळाबरोबर 
लढलेली मी आहे 
अस्तित्वाच्या प्रश्नांचे 
उत्तर मी आहे 
उजळून माझ्या आयुष्याच्या 
भाग्यरेषा 
तरी लढा ही सुरू आहे 
नियतीच्या खेळाबरोबर 
चौकटीचा राजासोबत 
पण जिंकणार हे अस्तित्वाचा 
वादळ आहे 
थकलेले वाटत असेल 
कधीतरी तरी 
सुगंधित अत्तराचा फुललेला 
प्रवास आहे 
स्वातंत्र्याच्या वादळाबरोबर 
लढलेली  मी आहे

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

          ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------

शनिवार, ५ एप्रिल, २०२५

अबोली मीच माझी

** अबोल मीच माझी **

 अबोल मीच माझी 
माझ्या शब्दांच्या शब्दांशी 
नयन त्याचे कठोर 
भास सावलीचा 
अबोल प्रेमाचा 
बोल प्रवास हा 

कधी शब्दांचा प्रवास 
निशब्द आता 
सर्वस्वाने रिकामा हा 
बोल - अबोल प्रेमाचा 
प्रवास हा रिकाम्या 

समोरील दारातल्या वाऱ्यासारखा 
बेभान काळोखाच्या साक्षीने 
अबोल प्रेम हे 
बोल शब्दाने निशब्द होत आहे
काळोखाच्या साक्षीने 

बोल प्रवास हा कधीचा 
आता अबोल प्रेमाचा

✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

गुरुवार, ३ एप्रिल, २०२५

सुकलेला गुलाब

*** सुकलेला गुलाब ***

प्रत्येक सकाळ ही 
घाई गडबडीचीच 
असेल असे नाही 
कधीतरी कंटाळा  
कधीतरी आळस 
हा असावाच आयुष्य जगताना 

कधीतरी सहजतेने 
तू दिलेला सुकलेला गुलाब 
मनाला आठवणींच्या 
पावसात घेऊन जातो 
त्यावेळी 

परत कंटाळावाना शब्दांसोबत 
सुकलेला गुलाब डायरीत ठेवत 
मनफुलते
फुललेल्या रात्रराणीच्या
सुगंधासारखे...!!💕
 
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

          ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------

बुधवार, २ एप्रिल, २०२५

भावना नसलेला

      कविता प्रेमभंग न झालेल्या प्रेयसीची आहे ते फक्त एकमेकांना टाळतात पण प्रेम आहे याच भाव संवेदनेतून ही भावना, "भावना नसलेला,, ही कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका..! धन्यवाद❤❤

*** भावना नसलेला ***

तुला आठवते का?
असाच पाऊस होता 
छत्री नसलेली मी  
छत्री नसलेला तू 

चिंब भिजलेल्या मनाने  शरीराने 
भावनेच्या फुललेल्या अप्रतिम 
भावनेवर अलगद मनात 
अबोल सुगंधित मोगरा फुलला 

पण एक सांगू 
आता तसाच पाऊस आहे
 पण भावना मोगऱ्याच्या नाही 
आडोशाला चिंब भिजलेल्या 
झाडाखाली न भिजण्यासाठी 

आणि तू न दिसावा यासाठी 
धडपड चालू आहे 
तू ही तसाच कोरडा 
छत्री मात्र हातात बंद आहे 
भावना नसलेल्या 
मनासारखा...!❤

✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

          ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------

शुक्रवार, ७ मार्च, २०२५

* संघर्षाच्या प्रवासात *( महिला दिनविशेष कविता)

स्त्री म्हणजे संघर्षाची कहाणी आहे. स्त्री या शब्द सर्व विश्व सामावलेले आहे. याच पार्श्वभूमीवर ही कविता ......याच भाव संवेदनेतून ही कविता.
        स्त्रीची कहाणी शब्दात थोड्याफार प्रमाणात लिहिण्याचा प्रयत्न. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.✍️ धन्यवाद...!🤣💕

** संघर्षाच्या प्रवासात **

बाई तू संघर्षाची महाजत्रा आहे 
नव्या जमिनीवर जुनीच ओळख आहे 
पतंग काढली जाते 
तू स्त्री आहे म्हणून 
तुला कुठेही निवांत झोप नाही 
आशेचे दार नेहमी बंदच 
शोषण हा तुझा मूलभूत अधिकार 
असावा असे वाटते 
बाई तू संघर्षाची महाजत्रा आहेस 

माणूस म्हणून जगण्याचा 
तुला अधिकार आहे 
हे निसर्गाने सिद्ध केले आहे 
तरी तू गर्भातच मारली जाते 
जुन्या सर्व रूढी प्रथांवर आता 
नांगर फिरवले असले तरी 
बाई तू संघर्षाची महाजत्रा आहेस 
आशेचा दीप लावून फिरविला तरी 
 आशेचे किरण मात्र बंदच आहे 
 तुझ्या जन्माने आनंदाचा सोहळा 
नाही होत कुठेही 
तुझ्या प्रगतीचा उदोउदोत 
फक्त मोहरतात बाईच बाईपण 
बाईतील चिंब भिजलेल्या केसांच बाईपण 
सुगंध मात्र तिथेच थांबतो यशाचा 
बाई तू संघर्षाची महाजत्रा आहेस 

बदलत्या जगाचा तू 
आता एक भाग आहे 
तरीही ज्वालामुखी मनात असतोच 
असुरक्षिततेचा पावलोपावली 
अग्निज्वालाने पेटलेल्या विचारांचा 
गुलाम की स्वातंत्र्य या प्रश्नात 
प्रवास चालू आहे 
प्रवासाचा निखारा घर अंगण करीत 
बंदिस्त स्वप्नांच्या मागे फिरत 
एक युग चालत आहे 
बाई तू संघर्षाची महाजत्रा आहेस 

तरी संघर्षाच्या प्रवासात गुढतेने 
तुझा प्रवास विश्वासाने चालूच  
पायातील शक्ति मात्र अजून 
घट्ट करीत आहे 
प्रवासाच्या संघर्षाची यात्रा 
स्वप्नाने पूर्ण करत आहे 
संघर्षाच्या प्रवासात आशेची 
किरण बाईच्या मनात रुजवत आहे 
रंगलेले सर्व स्वप्न आपले असतात 
हे बहरलेल्या यशासोबत सांगते आहे 
स्वप्नाची नवीन पायवाट उभी करते आहेस 
दिखाव्याच्या जगात बाई म्हणून 
जगते आहे 
बाई तू संघर्षाची महाजत्रा आहेस

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

          ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

-------------------------------------

शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२५

!! होईलच इथपासून चालू झालेला प्रवास राहू दे !!( लेख )

!!होईलच इथपासून चालू झालेला प्रवास राहू दे !!

        पूर्णविराम द्यावा लागतो काही स्वप्नांना मी नेहमी इथून जात असताना वाटायच की त्या गेटच्या आत मी जाईल... मी माझा  स्वप्नाची वाट पूर्ण करेल... जिद्दीने ...मेहनतीने.... पण पूर्णविराम द्यावाच लागला त्या स्वप्नांना...?
       त्या गेटच्या आता कधीच जाता येणार नाही. स्वाभिमानाने होईलच या शब्दापासून चालू झालेला प्रवास आता थांबावा लागला आहे. बाबाच्या शब्दात सांगायच तर "आता राहू दे!", 
   "होईलच", या शब्दापासून चालू झालेला प्रवासात ,"राहू दे..", इथपर्यंत मेहनत ही आता संपलेली आहे आणि अचानक त्या गेट समोरून जाताना मागचे सर्व स्वप्न जागे झाले. उघड्या डोळ्यांनी पाहिलेले स्वप्न त्यासाठी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र कोणतीही किंमत चुकवायला तयार असलेले ( MPSC)  एमपीएससीचे सर्वच विद्यार्थी पण ते स्वप्न एका वेळेनंतर पूर्णविराम कडे जाते आणि ते होत नाही त्यावेळी ते शब्द शब्दात मांडता येत नाही.
      त्या भावना शब्दात मांडता येत नाही. देवळातला देव त्यावेळी पाठीशी नसतो 0.01% साठी चालू असलेला हा प्रवास कधीतरी थांबतो. अयशस्वीतेकडे गेलेला त्यावेळी त्या विद्यार्थ्यांची का स्थिती असेल हे मी लिहिताना अनुभवत त्या सर्वच विद्यार्थ्यांच्या मनातले ही भावना माझ्याही मनात आहे. डोळ्यात पापणी आड होतात परत नवीन स्वप्नांचा प्रवास चालू करावा लागेल. अपयश कुणासाठी थांबत नाही आणि यश हे कुणासाठी धावत नाही. जे स्वप्न होते ते त्या सोबत मागे पडले पण बसचा प्रवास तसाच चालू आहे. त्या गेटच्या आत जाण्याचा प्रवास कुठेतरी थांबला .... ती स्वप्न थांबली  पण ती जिद्द मेहनत अनुभव तू कुठेही थांबणार नाही.                   डोळ्यातले अश्रू गालावर येतात दुसऱ्या हाताने आपण पुसून टाकतो पण ती भावना आपल्या मनात तसेच ओलावून राहते. कोपरा शब्दांच्या लटपट त्या हातानासोबत कागदावर उतरत राहते. पूर्णविरामचा आलेख पूर्ण होतो.           असो, मागे वळून पाहताना आपण जी मेहनत केली तिला कोणीही शून्यात पाहिल पण आपल्याला माहित आहे आपली मेहनत ....आपली  जिद्द आपण कशासाठी आणि का?? यासाठी या स्पर्धेत उतरले. यश प्रत्येकाच्या हाताला लागते असे नाही पण ते हाताला लागावी म्हणून केलेली मेहनत ही कधीही वाया जात नाही. ही एक सामाजिक बांधिलकी आपल्या वाटेला या मेहनतीमुळे या जिद्दीमुळे आलेली असते. कुणाला आपल्याकडे शून्य आहे अस वाटत असले तरी होईलच हा जो शब्द आहे तो सत्यात उतरविण्यासाठी जी मेहनत  रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करण्याचा जो अट्टाहास आहे त्याने माणूस प्रगत होत जातो.
        जगात बोट दाखविणारे खूप आहे कारण सर्व आयत मिळाल्यावर ते बोट सहज कुणाकडेही फिरतात. तो समाज ....ही व्यक्ती ....ती मानसिकता ....सगळी आयत खाऊ असते म्हणून अपयशाने खचायच नाही. " हे मी त्या गेट कडून शिकले." स्वप्न होत पण ते कुठेतरी मागे पडले कारण कोणतेही असो पण मी कमी पडले हे मात्र नक्की.
    म्हणून माझ्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्या मित्र-मैत्रिणींना एकच सांगणार आहे .अपयश हे घेऊनच स्पर्धा परीक्षांमध्ये उतरायचे असतो. यश हे आपण स्वतःसाठी कमवत असतो त्यासाठी खूप स्वप्न खूप इच्छा एक एन्जॉयमेंटच्या वयामध्ये किंवा बेधुंद जगण्याच्या वयामध्ये आपण या स्पर्धेकडे वळतो हेच खऱ्या अर्थाने आपण जिंकलेले असते म्हणून जिद्द कोणी सोडू नका. 
             होय ते होईल आणि," होईलच", या शब्दाच्या पाठीमागे शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहा. संघर्ष करत राहा. ते गेट आपल्या स्वागतासाठी कधीही तयार आहे. कारण त्या आज जाण्याचे स्वप्न म्हणजे तुम्ही माणूस म्हणून जगण्याच्या त्या प्रत्येक पायरीवर यशस्वी होण्याच्या मार्गाकडे जाणाऱ्या तो मार्ग आहे. ते वळण आहे... बसमधून जाताना त्या मार्गाने प्रवास करताना ते गेट दिसले की सर्व स्वप्न जागे होता. लावलेल्या मनाने परत स्वप्नाची नवीन पायवाट तयार करावी लागणार आहे. या वळणावर स्वबळावर हो इच्छेने जिद्दीने आणि मेहनतीने पण नवीन पायवाटेवर होईलच या शब्दाने आणि पूर्णविराम हा कोणत्या स्वप्नांना नसते हे मला लिहिताना परत अनुभवाला आले.           कारण जी मेहनत जो विश्वास जो एकोपा त्या अभ्यासाने निर्माण केला त्यामुळे कोणत्याही अनुभवासाठी हे मन तयार असते कारण जिद्दीने उभा केलेला विद्यार्थ्यांचा हा प्रवास तो स्वतः तयार केलेला असतो. स्वखुशीने तयार केलेला असतो.  म्हणून होईलच आणि शेवटपर्यंत होईलच या शब्दांवरच चालत राहा.
         स्पर्धा परीक्षा हे खचवणारी गोष्ट नाही... खच्चीकरण करणारी गोष्ट नाही तर स्पर्धा परीक्षा ही एका विद्यार्थ्याला स्वयंपूर्ण बनवणारी गोष्ट आहे. ती व्यक्ती मेहनती...ती व्यक्ती स्वयंभू व्यक्ती बनवणारी गोष्ट आहे म्हणून ज्यांनी पूर्णविराम दिला आहे त्यांनी सुद्धा आपण काहीतरी करत होतो हे नेहमी लक्षात ठेवा. पूर्णविराम फक्त त्या स्पर्धेसाठी आहे. आतल्या विद्यार्थ्यांसाठी नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ,"मी आयुष्यभर विद्यार्थी म्हणून राहील." हे वाक्य आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वतःच्या मेंदूत आणि मनात कोरून ठेवा. कारण दुसरी पायवाट परत आपली वाट बघणार आहे. आपण केलेली मेहनत त्यासाठी केलेले कष्ट हे तिथे वापरू या...!
         यश अपयशाच्या या शिदोरी मध्ये स्वतःला कुठेही कमी लेखू नका. पूर्णविराम हा त्या स्पर्धेसाठी आहे. हसत्या खेळत्या आनंदी  आयुष्यसाठी वाहत्या पाण्याला खळखळाट फार असते तसाच आपल्या आजूबाजूच्या जगाला आपल्यावर हसण्यासाठी खूप वेळ आहे आणि आपण सुद्धा त्यांसोबत हसण्याचा सराव करू या..!!  पण इतरांवर नाही तर स्वतःवर हसण्याचा त्यांच्यासोबतच नवीन पायवाट तिला जिद्दीने आणि मेहनतीने यशाच्या मार्गावर नेण्यासाठी..!💕
       ✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

--------------------------------------------------------------------------

माणूसपण ( विद्रोही कविता )

      मी मानतो माझ्या खरा इतिहास , कारण त्या इतिहासामुळे भाग्यविधाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उन्हाची दाहकता सावलीमध्ये परिवर्तित केली दीक्षांतरानंतर नव आरंग नवयुगाचा आत्मसन्मानाने जगण्यासाठी. सामान्य माणसाला समानतेची  पायवाट  आत्मसन्मान आत्मविश्वास ....!!❤
      कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद..💕💕

**माणूसपण**

मी मानतो माझा 
खरा इतिहास विचारांचा 
जळलेल्या वर्णव्यवस्थेचा 
चालीरीतींना मूठमाती देणारा 
धर्मनिरपेक्षतेकडे नेणारा 

मी मानतो माझा 
खरा इतिहास संघर्षाचा ज्वालांचा 
जळजळीत इंजन देणार 
अंधश्रद्धेला पायदळी तुडविणारा  
विषमतेला खोल दरीत फेकणारा 
समानतेच्या वाटेवर चालणारा 

मी मानतो माझा 
खरा इतिहास मुळासकट वर्णव्यवस्थेला 
जाळून टाकणारा 
प्रश्नांच्या प्रत्येक प्रश्नांना 
उत्तर देणारा 
माणसातील माणसाला सजीव करणारा 
पंचशीलाच्या शब्दानी जग जिंकणारा 
म्हणून लिहिते आहे सविता
नवा आरंभ नवयुगाचा 
नवा धम्म क्रांतीचा 
माणुसकीचा माणसातल्या 
माणसातील अस्तित्वाचा 

मी मानतो माझा 
खरा इतिहास इतिहासातील 
पानांमध्ये शूरवीरांच्या पिढ्यांचा 
आरंभ नवयुगाचा 
आरंभ नव्या महास्फोटाचा 
आधुनिकतेच्या विचारांचा 
आधुनिकतेच्या महाज्योतीचा

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

          ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------

मासिक बाई पण

*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात  आधार फक्त वेदनेचाच असतो  पूर्णत्वाच्या विचाराने  बाईपण जगत असते  वेदनेचा काय घेऊन बसले  मासिक धर्म...