आयुष्यात काही प्रसंग काही क्षण असे येतात की आपलेच आपल्यापासून दूर होत जातात... आपण त्यांना समजून घेत नाही रंगांनी भरलेले जीवन बेरंग होत जातात. जखमा सुगंधी होत जातं त्यात रमले की नयन सर्व सांगून जातात....“ का कोण जाणे‛, नयनांना आधीच माहीत असते; अश्रू कुठे यावे म्हणून!! काय झाले ते सांगून जावे नयनातील भाव.
आयुष्य बदलून टाकतात सर्व सृष्टीला नयनांचा गडद मखमली अश्रू मध्ये वाहून नेतात. विहरनाच्या लहरी बहुदा नयनामुळे पुढचे आयुष्य सोपे करून देत असतात.
नजरेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत असलेल्या स्वप्नाला आकाशातून टपकावे तसे वाहू लाग ते नयना त राहत नाही. पाहणारी नयन दृष्य वाहती राहते त्यापलीकडे काहीच दिसत नाही.
नयनातील पाने तिला दुःख होते की आनंद कळत नाही. मंदावलेल्या नयनांमधून चेहऱ्यावरून अश्रु वाहु लागते. आकाशातून पहिल्या पावसाचे आगमन व्हावे ; जीवन मायेच्या प्रत्येक शब्दाला नयन साथ देत असते. जुन्या आठवणीची माळही अश्रू भरल्या नयनात
दिसत रहाते “आठवणीचा एक मात्र खरा साक्षीदार म्हणजे नयन.”
चिमुटभर आठवणीने नयन कसे आपले मन सहज सांगून जातात. मनाचा थांगपत्ता लागू न देणारी मानवी प्रवृत्ती असते पण नयन त्याला खोटे ठरवून मनातील चलबिचल सांगून जातात. जेवढी आपली नयन शक्ती असेल तेवढच मनशक्ती असतात.
म्हणतात, नयन आपल्याला थेट समोर असणाऱ्या व्यक्ती कडील भाव समजावून सांगतो. आपल्यातील अभिमानाचे क्षणात नाहीसे होतात जेव्हा आपलेच मुले आपल्या समोर मनमुराद हसत असते त्याला बोलता येत नसले तरी त्याचे बोबडे बोल कळत नसले तरी, त्याचे नवीन शब्द कळत असते आपल्याला आलिंगन देताना सांगतो हसा.... खळखळून हसा!! मग ते नयन फसवते आपल्याला.
हळवे झालेले नयन मग फसवत जाते जमिनीकडे आपले नयन अलगद जातात... त्यांच्या पायातील पैंजणाचे सूर नाद नयनातील भाषा सांगून जाते... त्याला खेळायचे असते त्याला नाचायच असते.... त्याला सर्व भाव सांगायचे असते.... त्यावेळी नयनांचे संदर्भ कळलेले नसते,'बालमन’ असावे लागते. आपण पाहतो खेळतो जाणून घेते पण खरच निस्वार्थ मन होत असते प्रश्नांचे उत्तर शोधताना स्वतः च सामावून जातो. नयनांचे अश्रुचे संदर्भ चटकन मनाला लागतात... असेच नयन आपल्याला आपल्यात समजावून घेतात.
नयनांचे संदर्भ कळले नाही तर जीवनात काहीच शिल्लक नसते. नयनात पाणी साठवले की काहीच दिसेनासे होतात. गहिवरला मनाला नयन अश्रू चिंब भिजवून टाकतात. स्वप्न हि नयनात दिसत नाही धुंद मनाला नयन बंदिस्त करीत असतात. सप्तपदी चालताना नयनाला सांगू नये थांब... राहू द्यावे तसेच विरहाने मननयन आपले भाव सांगून जातात, असे का? ज्या नयनात मायेने साठवून ठेवलेली क्षणात वाहून जाते पण अश्रू मध्ये दुहेरी भावना असते. पहिली म्हणजे सुखाची दुसरी भावना विरहाची असावी विरह म्हणजे आज तक जपून ठेवलेल्या मायला सोडून जायचे. सुख म्हणजे जीवनाची नवी सुरुवात स्त्रीधन मिळाले असते; स्त्री म्हणून संपूर्ण होण्याची तयारी झालेली असते. ती आता फक्त मुलगी बहीण नसून कुणाची तरी पत्नी, सौ ,सून इतर सर्व नाती आलेली असते. नयन सर्व विचार ठेवू शकत नाही. फक्त वाहात राहते अलींगण देताना. नयनात आभाळ दाटलेलं असतं कुणीच कुणाला न सांगता सर्व सांगून जातात. प्रीतीचे फूल उमलत असतात. नयन अश्रू गाणे गात असतात नयन केविलवाणी झालेली असते. जीवनाची नवीन रंग ,गंध ,स्वप्न नवीन वाटत असते.नयनात क्षणाक्षणाला आभाळ दाटून जाते.
कितीतरी क्षण जपून ठेवलेले नये आपल्याला मदत करीत असतात सुखात पाहणारे नयन दुःखात सर्व सीमारेषा तोडून वाहत राहते काही वेगळेच असतात दिवसाचे सर्व गणित मागे पडत जाते. मेघ नयनात वाहू लागते. निळानभी जसे आपलेच मन असावे. सतत वाहत असते. मनातील भाव हृदयातील भाषा सहज इतरांना कळते नयनाला पूर आलेला असतो. मनातील भावनेचा वारा सतत वाहत असतो. मेंदी भरलेल्या हात जेव्हा कुणाच्या येण्याची वाट पाहत असते; पण काळोखच आला तर जीवनाचे फुल उमलतच नाही मनाला पूर येत राहतो आणि नयनावाटे वाहात रहाते.
अंधार दाटला की नयनातून अश्रू हरवले जातात. शब्दही बोलविले जात नाही. मन उदास होतात... मन चंदनासारखे जळत राहते. सुगंध देऊन! इंद्रधनुष्याचे रंग नयनातील जळलेल्या स्वप्नामध्ये राख होऊन जातत. हदयाचे हुंकार नयनाला कळत नाही असे नव्हे? पण पण ते हुंकार नयन दाखवीत नाही. प्रीतीची हिरवेपण कोपलेले असते. लाभलेल्या प्रीतीला दीप नष्टच करीत नाही. नयन सतत सांगत असते... छाये प्रमाणे नियती सर्व नयनात सांगत असतात. तिथे फुला-फुलात क्षण मेघ करून टाकतात. निवांत पण कुठेच नसते. ना नयनात... ना अश्रू... ना नयनशब्दात ! दूर ठेवून आपण नयनाला वाहू देते त्याला काहीच अर्थ नसतो, वाटत हे उगीच येतात. सुखात आणि दुःखात! काहीच नसतानाही वाहत राहते. तेव्हा नयनाला विचारावे,“ का बाबा वाहतो उगाच !”
मनातील वेदना नयनालाच कळत असते.
मनपंखावर नव काही फुलत असते.निष्पाप जीव नयनाने सांगू जाते. कळत नसते ,नयनाला कळते कळत नसतं. हिरव्या मनाला हिरवेपण देत असते. मुक्तीचे गीतेही गात राहते. मनअंगणात फक्त फिगंरीसारखे फिरत राहते. नयन फुलात फुलून जाते. नयनात आभाळ साठले तरी त्याला अर्थ संदर्भ असतो.
नयन...
नयन मनातील भाव
नयन हृदयातील शब्द
नयन सागर पाणी...
नयन प्रीतीचे फुल
नयन दुःखाची सीमारेषा
नयन काटेरी मुकुट
नयन शौर्याची गाथा...
नयन विरहाचे गाणे
नयन शक्तीचे प्रेरणास्थान...
नयन निष्पाप मोती
नयन स्वप्नाची साक्षीदार
नयन केशर गंध...
नयन पंखरुपी मनशब्द
नयन चिंब भिजलेले हदय
नयन जिवंतपणा...
नयन चांदणी रात्र
नयन प्राणप्रिय ज्योत...
नयन पावसाची पहिली सर
नयन... नयन आणि नयन फक्त नयन!!!
22.3.2008
( कॉफीराईट )
सविता तुकाराम लोटे
(सर्व चित्र गुगल वरून घेण्यात आलेली आहे)
----------------------------------