savitalote2021@bolgger.com

रविवार, १६ मे, २०२१

सावलीत

 ------सावलीत----

फुलायचं आहे
पण फुलू देत 
नाही झाडावरील काटे 
माहित नाही; 
का?
फुलणे अधिकार 
आहे तरी 
वेदनेच्या वादळात 
फुलाचे राहूनच जाते 
दवबिंदू बरोबर 
हसू असते गोड 
पण? 
हसू येतच नाही 
मनातूनच! 
मनातील काटे फुलूच 
देत नाही मनसोक्त 
काट्यांची सोबत  
सततच्या  जोडीला 
आणि आलेला फुलांचा 
बहर वादळी.... 
नसणाऱ्या फुलांबरोबर....
मनसोक्त वेदनेच्या 
काट्यांच्या सावलीत!


 

शुक्रवार, १४ मे, २०२१

छत्रपती शिवाजी महाराज इतिहास जमा झाले नाही इतिहासकार झाले......

छत्रपती शिवाजी महाराज इतिहास जमा झाले नाही इतिहासकार झाले......

      हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता सहिष्णू राजा स्वराज्य स्थापनेचा जनक आणि महाराष्ट्राच्या इतिहासावर महत्वपूर्ण योगदान देणारे आणि त्यांच्या धडाडीच्या युद्ध कौशल्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासावर नव्हे तर भारतीय इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उमटवलेला आहे. 

                मराठा राज्याचे संस्थापक आणि पहिले अभिषेक छत्रपती नावलौकिक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० मध्ये शिवनेरी दुर्ग येथे झाला. मराठी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी राजे भोसले एक सर्वसमावेशक सहिष्णू राजा म्हणून ओळखले जातात. छत्रपती यांनी त्यांच्या शिस्तबद्ध सैन्यांच्या आणि सुव्यवस्थित प्रशासकीय तुकड्यांच्या मदतीने एक पात्र व पूर्व आणि प्रशासन पुरवले. 

           छत्रपती महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी एक नवीन युद्धनीती विकसित  केली. गनिमी कावाची! शिवाजी महाराजांनी अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून अतिशय संयमाने स्वराज्य स्थापन केले. त्यांच्या संघर्षशील जीवनामुळे त्यांना कुशल योद्धा मानले जातात. त्यांनी समाजातील सर्व जातीमधील लोकांना घेऊन त्यांचे नाव मावळ ठेवले त्यांच्या आई जिजाबाई मार्गदर्शक प्रेरणास्थान होत्या. त्यांचे संपूर्ण आयुष्य त्यागाने परिपूर्ण होते. कोणत्याही परिस्थितीत आई जिजाबाई यांनी संयम गमावला नाही त्यांनी आपल्या लहान मुलाला शिवाजीला चांगले संस्कार दिले. 

              जिजामाता यांनी आपल्या आयुष्यात आलेल्या खडतर प्रवासातून एक विलक्षण प्रतिभा त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती आणि त्या प्रतिभेचा सर्वतोपरी उपयोग त्यांनी शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज बनविण्यासाठी मोठे योगदान दिलेले आहे .   

          शिवाजी महाराजांच्या चरित्रावर त्यांचे आई-वडिलांचा मोठा प्रभाव आहे त्या काळातील सामाजिक संरचना आणि वातावरण बाल शिवाजींना योग्य पद्धतीने समजून सांगण्याचे काम त्यांनी केले. युद्ध अभ्यास राजनीति युद्धकौशल्य शिवाजी महाराजांना प्राथमिक मार्गदर्शन त्यांचे वडील शहाजीराजांकडून मिळाले तर परकीय सत्ता विरुद्ध योग्य पद्धतीने लढा करण्याकरिता आवश्यक असलेले शिस्तबद्ध शिक्षण माता जिजाबाई यांच्याकडून मिळाले.         

               आई जिजाबाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या आद्यगुरू होत्या. शहाजी महाराजांनी पुणे येथील जहागिरीचे कारभारी दादोजी कोंडदेव यांनी शिवाजींना युद्धकला राजनीति शास्त्र शिक्षण दिले.  

             स्वराज्य स्थापने मध्ये आई-वडिलांचे मार्गदर्शन आणि दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनामुळे योग्य दिशा छत्रपती शिवाजी महाराजांना मिळाले. संत तुकाराम महाराज यांचे महत्त्वपूर्ण अध्यात्मिक मार्गदर्शन शिवाजी महाराजांना लाभलेले आहे. शिवाजी महाराजांनी त्या काळात अनेक विद्वान साधुसंत पंडित यांचे उपदेश घेतले असे म्हटले जात असले तरी समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज यांचे गुरू-शिष्याचे नाते हे वेगळेच होते.

               संत तुकाराम महाराजांनी शिवाजीराजांना कर्मयोगाचे पुरस्कर्ता समर्थ रामदास यांच्याकडे पाठविले असेही मानले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभारामध्ये दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदास यांच्या मार्गदर्शनाला मानाचे स्थान दिलेले आहे.

           शिवाजी महाराजांनी आदिलशहाच्या ताब्यात असलेला तोरणगड इ स  सोळाशे सत्तेचाळीस मध्ये जिंकला आणि खऱ्या अर्थाने स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. पुणे प्रांतावर आपले नियंत्रण मिळावे यासाठी त्यांनी कोंढाणा सिंहगड पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून घेतले. सोबत तोरणगड सामोरे मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याचे नाव रायगड असे ठेवले. शिवाजी महाराजांच्या विजय माळ्याला आळा घालण्यासाठी आदिलशहाने शहाजीराजांना अटक केली आणि सोबतच फत्तेखान सरदाराला शिवाजी महाराजांवर हल्ला करण्यास पाठविले. 

           शिवाजीराजांनी पुरंदरवर फत्तेखानचा पराभव करून बाजी पासलकर पळून जाणाऱ्या फत्तेखानच्या पाठलागावर पाठविले बाजी पासलकर यांनी सासवड पर्यत नेले आणि सासवडजवळ झालेल्या त्या लढाईत पासलकर यांचा मृत्यू झाला

       शिवाजीराजांनी मुघल बादशहा शाहाजहान यास त्यांच्या दख्खनचा सुभेदारकरवि पत्र पाठवून शहाजीराजा सकट त्यांच्या चाकरीत जाण्याची इच्छा प्रकट केली. त्याचा परिणाम म्हणून शाहाजहानाने आदिलशहावर  दबाव आणला आणि शहाजीराजांची सुटका झाली परंतु त्यासाठी शिवाजीराजांना कोंढाणा किल्ला सोबत शहाजीराजांना बंगळूर शहर आणि कंदर्पीचा किल्ला आदिलशहाला द्यावा लागला

    १६५६ मध्ये शिवाजी महाराजांनी रायरीचा किल्ला जिंकला आणि कोकण भागात स्वराज्याचा विस्तार झाला.१६५६ ते १६५९ या कालावधीत पश्चिम घाट आणि कोकणातील ४० किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांनी विजय मिळविला.

   वडिलांकडून २००० सैनिकांच्या छोटा तुकडी पासून एक लाख सैनिकांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले होते. महाराजांनी किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक नवीन किल्ले ही उभारले.

अफजल खानचा प्रकरण

              आदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले शिवाजी महाराज जिंकत  आल्यामुळे त्यांना थांबविण्यासाठी आदिलशहाने आपला एका सरदार अफजलखानाला मोठ्या सैन्यासह मोहिमेला पाठविले अफजलखान वाईजवळ आला तेव्हा शिवाजी महाराजांनी प्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरवले तहाची बोलणी सुरू झाली.  

            अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी निशस्त्र मोजक्याच सैन्यासोबत बोलणीसाठी यावे असा आग्रह होता महाराजांनी त्याच्या या मागणीला समर्थन देऊन भेटण्यास तयार झाले शिवाजी महाराजांना कल्पना होती की यात काही दगाफटका होऊ शकतो म्हणून त्यांनी सावधानी म्हणून बिचवाचिलखात दडविला... या प्रसंगाचे खूप सुंदर वर्णन पोवाडा मध्ये शाहीर अदन्यातदास यांनी केले आहे.

प्रतापगडाच्या पायथ्याशी खान... 

आला बेगुमान नाही त्याला जाण 

शिवाजी राजाच्या करामतिची 

त्याशी नाही जाणीव शक्तिची 

करील काय कल्पना युक्तीची हा जी .... 

महाराजानी निरोप घेतला...

अन दंडवत घातला भवानीला 

तसाच आई जिजाऊला

वकुत ह्यो वंगळ त्यों कसला 

पाणी आल आईच्या डोळ्याला 

अन लागला रडायला 

अहो हे हे हे सरदार तर रडतीलच  

पण हत्ती घोडे शिव ना चार्याला

अन गाई बघा लागल्या हम्बराया 

असला बेहुद वकुत आला 

दुश्मनाच्या गोटामधी चालला मराठ्याचा राजा 

अहो राजा हो दाजी र जी जी 

खानाच्या भेटीसाठी...

महाराजानी एक शानदार शामियाना उभारला होता 

भेटीसाठी छान उभारीला

नक्षीदार शामियान्याला  

अन अशा ह्या शामियान्यात 

खान डौलत डुलत आला 

सय्यद बंडा त्याच्या संगतीला 

शिवबाच्या संगतील महाला 

म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा 

राजाला पाहून खान म्हणतो 

आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग 

शामियान्याला  

खान हाक मारितो हसरी 

रोखून नजर गहिरी 

जी र जी... 

पण आपला राजा 

काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता 

राजा गोर पहात त्याची न्यारी

चाल चित्याची सावध भारी 

जी र जी जी 

खानाला राजाला आलिंगन दिल

अन दगा केला  

खान दाबी मानी मान्याला

कट्यारीचा वार त्यान केला

गर खरा आवाज झाला 

चिलाखत व्हत अंगाला   

खानाचा वार फुका गेला 

खान यडबडला

इतक्यात महाराजांनी 

पोटामधी पिसवा ढकलला 

वाघनखांचा मारा केला 

हे टरटरा फाडल पोटाला 

 हे तडा गेला खानाचा कोथळा माहेराला 

जी र जी 

जी बाहिर आला जी र

प्रतापगडाचे युद्ध जाहले 

रक्त सांडले पाप सारे गेले 

पावन केला कृष्णेचा घाट 

लावली गुलामीची हो वाट 

मराठे शाहीचा मांडला थाट हो जी जी.....

वर्णन या शब्दात केलेले आहे. 
            शिवरायांचा इतिहास इतका आहे; आपण तो फक्त आपल्याला उपलब्ध असलेला वाचू शकतो. अंगाला काटा यावा इतका संघर्षमय आहे.... स्वराज्यसाठी महाराज झटले... उपाशीपोटी राहिले...छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य दिले त्यामुळे आज आपण सर्वजण ताठ मानेने चालतो आहे. 

छत्रपती मुळे आम्ही पाहिली नाही; 
गुलामगिरी ....
राहिलो नाही उपाशीपोटी ...
स्वराज्य म्हणजे कणा ताठ....
मर्द मावळा...वादळे झेलती 
रक्ताचा सडा.... बलिदानाचा 
माय मातीवरील
स्वराज्यासाठी!
          फत्तेखान वडिलांच्या सुटकेसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांना एक प्रश्न करतात बोल पोरा स्वराज्य हवे की वडील? शहाजीला आम्ही कोणत्याही क्षणी ठार मारू शकतो. तुझ्या जवळ असलेले स्वराज्य आमच्या स्वाधीन कर माफी माग तर तुझे वडील सुटेल..... वडील की स्वराज्य यामध्ये त्यांनी वडिलांना निवडले कारण जीवन असेल तर स्वराज्य कधी ही मिळवता येईल .

         २८ डिसेंबर १६५९ मध्ये शिवाजी महाराजांनी कोल्हापूर नजीक पन्हाळाला कुठे पोहोचले आणि या सुमारास अदिलशाही सरदार रुस्तमजान मिरजेपाशी पोहोचला. शिवाजी  महाराजांच्या ५००० सैनिकांनी १०,००० सैनिकांबरोबर लढा दिला आणि कोल्हापूरचा सारा प्रदेश महाराजांच्या ताब्यात आला.            अफझलखानच्या मृत्यूमुळे चिडलेल्या आदिलशहाने त्याचा सेनापती सिद्दी जौहर याला इ. स. १६६० हल्ला करण्यासाठी पाठविले ही बातमी कळताच राजे पन्हाळगडावर गेले त्यांनी गडाला वेढा घातला. 

          खूप दिवस झाले तरी कधी वेढा  उठण्याचे कोणती लक्षणे दिसत नव्हती. म्हणून शिवाजी महाराजांचे विश्वासू पराक्रमी सरदार बाजी प्रभू देशपांडे यांच्या आग्रही  विनंतीला  मान देऊन  छत्रपती महाराज विशाल गडावर रवाना झाले. पण त्यामध्ये सरदार बाजी यांनी प्राणांची बाजी मारली.

              छत्रपती शिवाजी महाराजांनी ही बातमी मनाला चटका लावून गेली ज्या घोडखिंडीत लढले स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले त्या घोडखिंडीचे नाव शिवरायांनी पावनखिंड केले. बाजीप्रभूंच्या बलिदानाने पावन झालेली ती पावनखिंड अशा शब्दात छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजीप्रभूंच्या बलिदानाला स्वराज्याच्या इतिहासात अजरामर केले.

       मुगल साम्राज्य बलाढ्य होते औरंगजेब हा अतिशय कठोर आणि कडवा मुघल बादशहा होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य विस्ताराला वेसण घालण्यासाठी शाहिस्तेखानाला  इ. स. १६६३ मुघल साम्राज्याच्या नर्मदा नदी पलीकडे राज्यविस्तार थांबविण्यासाठी मोहिमेस पाठवेल त्यावेळी सुद्धा महाराजांनी स्वतःच्या चातुर्य कौशल्याने कमीतकमी सैनिकांमध्ये त्याला धूळ चाखली. 

          इ. स. १६६५ औरंगजेबाने सेनापती मिर्झाराजे जयसिंह याला प्रचंड सैन्यासह शिवाजी महाराजांच्या सैन्यावर आक्रमण करण्यात आले शिवाजीराजांचा प्रतिकार थिटा पडला आणि निर्णायक लढाई नंतर पुरंदराचा तह झाला तहानुसार तेवीस किल्ले द्यावे लागले बरोबर स्वतः आग्रा तेथे पुत्र संभाजी या सह हजर होण्याची कबुली करावे लागेल.

     इ. स १६६६ मध्ये औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आग्रा येथे नजरकैदेत ठेवले त्यातूनही आपल्या हुशारीने आणि चातुर्याने आपली सुटका करून घेतली. 

          छत्रपती शिवाजी महाराजांकडे असंख्य सैनिक होते. जमिनी होत्या धन धन दौलत होते. लष्कर नौदल होते. महाराज अनेक गोष्टींवर स्वामित्व गाजवत असले तरी त्या काळातील मुगल साम्राज्यसाठी ते फक्त जमीदार होते. राजा छत्रपती किंवा सम्राट नव्हते त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोर जावे लागले. 

           कायदेशीर मान्यता नसल्यामुळे अनेक पेचप्रसंग निर्माण होत असे. अशातच भर म्हणजे काही मराठा सरदारांमध्ये महाराजांविषयी मत्सराची भावना निर्माण होत. त्यांनाही आळा घालावा लागत असे.          

           स्वराज्याला कायदेशीर मान्यता मिळवून देण्यासाठी राज्यभिषेक आवश्यकता होता पण त्यातही खूप अडचणी होत्या कारण प्राचीन काळात क्षत्रिय वर्णातील व्यक्तीचा राजा वा अभिषेक केला जात असे पण शिवाजी हे भोसले होते म्हणून क्षत्रिय गणले जात नव्हते हे कारण समोर ठेवून त्या काळातील काही समाजकंटकांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला बंडखोरी केली अनेक समस्या निर्माण केल्या आणि सामाजिक परिस्थिती त्यांच्याविरुद्ध नेण्याचे परिपूर्ण प्रयत्न त्यांनी केला अशा सर्व अडचणींवर मात करत अखेर गागाभट्ट यांनी पुरोहित म्हणून जबाबदारी स्वीकारले.

        ६ जून १६७४ रोजी शिवाजीराजांना रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला .सोहळ्यासाठी 32 मण सोन्याचे सिंहासन बनवले गेले होते. 11000 ब्राम्हण व्यतिरिक्त एक लाख लोक रायगडावर उपस्थित होते. चार महिने राहण्याची व्यवस्था पाहुण्यांची केले गेले होते. देश-विदेशातील साडेचार हजार राजांना निमंत्रणे गेले होते. सव्वा मण सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण केली. 

            राज्याभिषेकाच्या दिवशी पहाटे उठून मंत्रोच्चार सुरू झाला आणि संपूर्ण परिसर या अलौकिक सोहळ्याचा साक्षीदार बनला. शिवराज की जय... शिवराज की जय .....शिवराज की जय.... या घोषणा आसमंत भरून गेला. मुख्य पुरोहितांनी राजांच्या डोक्यावर मोत्यांचे झालर ठेवत; शिवछत्रपती म्हणून आशीर्वाद दिला. शिवाजी, "छत्रपती शिवाजी महाराज झाले". छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवराई चलन जाहीर केले. 

          शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर समज-गैरसमज निर्माण झाले एकामागे एक संकटांना सामोरे जावे लागत होते. त्यातील सर्वात मोठी घटना म्हणजे आई जिजाबाई यांचा मृत्यू होय म्हणून काही पुरोहिताने छत्रपती शिवाजी महाराजांना राज्यभिषेकामध्ये उणिवा असू शकतात म्हणून दुसरा राज्याभिषेक करून घेतला अगदी साध्या पद्धतीने.

पहाटेच्या पहिल्या सुर्यकिरणांचे तेज 

वटवृक्षा सारखी विशालता

सह्याद्री सारखे कणखर 

आंब्याच्या मोहरासारखा 

नव सुगंध... लढाऊ कीर्तीचा 

साक्षीदार झाला रायगड

कीर्ती मोठी लोकी तीनही 

संकटे  तळपायातील धूळ समान  

स्वाभिमानाचा ...पराक्रमाची

विजय यात्रा .... वाघाच्या छव्याला!!!

     छत्रपती शिवाजी महाराजांच्या कठोर ध्येयनिष्ठा आणि आत्मविश्वासाच्या बळावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी कधी ही श्रद्धेला अंधश्रद्धेची जोड दिली नाही. 

     त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासामध्ये आजच्या भाषेत ( विज्ञान )  नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे शब्द मंतरलेले होते पण ते कोणत्याही तंत्रविद्येच्या उपयोग न करता तर आत्मविश्वासाच्या बळावर! स्वराज्य हे स्वप्न साकार करण्यासाठीच.

             परिस्थितीचे योग्य नियोजन आणि चातुर्य कौशल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राज्यव्याप्ती पश्चिम महाराष्ट्र कोकण सह्याद्रीच्या डोंगर रांगा पासून नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र खानदेशापासून दक्षिण भारतात तंजावर पर्यंत केली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सामान्य रयतेची व्यवस्था केली. 

            राज्यातला शेतकरी सुखी तरच स्वराज्य सुखी म्हणून शेतकऱ्यांनी शेतीचे  योग्य नियोजन करावे  यासाठी  महाराजांनी  शेतकऱ्यांना  नवीन शेती कल्पना दिल्या. राजाश्रय दिला. योग्य नियोजन करून घेतले .शूर सरदारांची फौजा उभी केली.  सामाजिक, राजकीय ,शैक्षणिक,  सांस्कृतिक ,धार्मिक ,आर्थिक अशा अनेक व्यवस्थांना पाठिंबा दिला. स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ता छत्रपती शिवाजी महाराज होते. खचलेला रयतेला त्यांनी स्वाभिमानाचा स्वराज्य निष्ठेचा स्वतःच्या पराक्रम जागृत केला. 

                छत्रपती शिवाजी महाराजांच्या संघर्षशील जीवनशैलीमुळे कुशल योद्धा होते. त्यांनी सर्व जाती धर्मातील लोकांना घेऊन स्वराज्य स्थापन केले. 

           मावळा स्थापन केला. संघटित केले. सह्याद्रीला नवजात बाळासारखे कुशीत घेतले..... नवीन किल्ले बांधले. नवीन युद्धकौशल्य युद्धअभ्यास नवीन राजकारण राजनीति निर्माण केली.  मराठीला राजभाषा केली सोबत संस्कृतला स्थान दिले.

    छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजा झाले "स्वयंघोषित राजा न होता लोक घोषित छत्रपती बनले."

       शौर्य पराक्रम ,उत्कृष्ट योद्धा, सहिष्णू राजा उत्कृष्ट शासनकर्ते, शिस्तबद्ध, सुनियोजित प्रशासकीय आराखडा तयार करणारा गमीनी कावाची शैली निर्माण करणारा भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा नायक ...मावळ निर्माण करणारा युद्धअभ्यास.....हिंदवी स्वराज्याचे संस्थापक.....बुद्धिनिष्ठ, आत्मविश्वास ,ध्येयवादी, आदर्श शासन निर्माता 3 एप्रिल 1680 या रोजी विषबाधेमुळे आपल्याला या जगातून सोडून गेले .

     छत्रपती शिवाजी महाराजांनी खचलेल्या मनाला नवचैतन्य निर्माण केले. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून जनतेच्या मनात जागृती निर्माण केली. या सर्व गोष्टी त्यांनी अवघ्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा हाच स्वाभिमान आत्मविश्वास आजही महाराष्ट्राला मराठी माणसाला प्रेरणा देते. 

               सर्व संकटांना अडचणींना सामोर जाण्यासाठी आणि संकटावर मात करण्यासाठी एक पाऊल सतत सामोरे जाण्याची उर्मी मनामध्ये निर्माण करते .....छत्रपती शिवाजी महाराज!!!!

छत्रपती इतिहास जमा झाले नाही 

छत्रपती इतिहासकार झाले... 

जय भवानीची हाक 

आणि जय शिवराय

जय शिवराय ....जय शिवराय!!!!

                   सविता तुकाराम लोटे 

 -------------@@@@@@@------

 



 

              

    

सत्य


     सत्य
दुःखच वेदना... 
वेदनाच भविष्य... 
भविष्य दुःखच... 
हे चक्र आहे... 
अंतिम सत्य.... 
आयुष्यातील.


       सविता तुकाराम लोटे 
-------------------------@-/-----
     

रविवार, ९ मे, २०२१

नकोच प्रतिक्रिया रिमझिम

------नकोच प्रतिक्रिया रिमझिम-----
 
      रोज नियमितपणे एवढी मात्र गोष्ट केली जाते. ती म्हणजे प्रतिक्रिया देणे. कुणाला ती बोलकी द्यावीशी वाटते तर कुणी ती मुख देत असते. अंतरंगाच्या वळणावर पाहणे जरी वेगळे असले तरी संवेदना मात्र वेगवेगळ्या होतात. सोबतीच्या नात्याला सुवास उडून जातो ...सफलतेच्या शिखरावर असतानां जीवनातील प्रवास मात्र वेगळीच!
        त्याच नवीन वाटेवर जाताना जुन्या संस्कारांना मात्र मागे सोडवीत नाही... आपल्यामधील नवनिर्मितीचा गाव मागे पडत आहे हे त्यांच्या लक्षात सुद्धा येत नाही... चित्तातील संवेदना वेगळा असला तरी छत्रीत भिजण्याचा मोह सुटत नाही समजून घेतले तर समजून घ्यायचे आणि नवा वाट संग्रहबरोबर मनात नवीन फुगडीचा खेळ चालू होतो. नव्या क्षणी परत आता दुसऱ्या क्षणी जुन्या संस्कारांना  प्रवाहित करीत असते. तेव्हाच तर मनावरील भाबडे भाव मात्र प्रति क्षणी  वेगवेगळी होत जातात.
        मन स्वभाव वेगवेगळे असतात. जीवनातील अशांतता वेगवेगळी असते. मात्र कधीच अर्ध्या वाटेवर आपली प्रतिक्रिया देत नाही. 
         काही तर ती इतका कोवळ्या रूपात देतात की त्यांचे शब्द मात्र त्यांनाच  व्हवे असते.... कुणाला मात्र ते नको असते त्यांचे डोळे त्यांचे शब्द त्यांचे चेहऱ्यावरील भाव आशा-आकांक्षा घाबरड पण अति आत्मविश्वास ते लक्ष सुद्धा येत असते तरी समोर एक धुंक पांघरून कोवळ्या  ऊनधारे बरोबर वादळी होतात ...आणि सांगत राहतात...  
                मनाला अतितीव्र पणे मी असा आहे रोखून धरलेल्या नजरेने विचारात... उरलेल्या शब्दांची धारदार कात्रीशब्दमाळीबरोबर... विसरलेला प्रत्येक क्रियांबरोबर ...शांतीपूर्वक निर्मळ मनाचा एक रहस्यमय विसरलेल्या क्षणासोबत !
            नयनातील भाव हे मुक्तपणे प्रतिक्रिया व्यक्त करत असले तरी संग्रहाची वेळ... संग्रह करण्याची वेळ.... संग्रह शब्द देण्याची वेळभाव...चुकले की ते नकोच असते पण ती रिमझिम देऊन जातात... समजून आणि असमजून !! प्रती क्षणी आणि प्रगती क्षणी काही क्षणी ओलावून जातात आणि काही क्षणी अनोळखी होत जातात.  
           जुन्या नवीन साखळीमध्ये फुलांचे क्षण फुलतात पण कितीही नको असलेल्या प्रतिक्रिया इतक्या सहज आणि इतक्या खुलेपणाने देऊन जातात... की त्यांना नको असलेले शब्दही आपल्याला देत राहतात. 

          लालबुंद झालेल्या चेहऱ्यावरी
               हसू मात्र गोड असतील 
                    असे व्हावे....
        वाटेचे गणित काय असावे कळत नाही... इतके बोलके नयन हे सतत भिजवणारे ...भावनेतील... मूक वेदना आणि वेदना नसलेल्या ना त्याला परत वेदना असल्यासारखे भासत राहणे हे वेगळे स्वरूप! आल्या वेदना त्यांना सामोरे जावे लागते ...पण खरच त्या वेदना नकोच असतात त्या नको असलेला वेदना मूक प्रतिक्रिया देत राहते संवेदना खूप असतात                परिसंवाद मूक परिसंवाद खूप असते घटत जाणारे... वाढत जाणारी सुखद... दुःखद... अलिप्त ... अनंत अडचणीचे झपाट्याने गेलेल्या त्यावेळेला आपण साक्षीभावाने... बदलत जात असतो. त्याला आपल्या गरजेनुसार बंधनमुक्त करीत राहावे  लागतेच.
            प्रयत्नांना नको असतात दुःखद संवेदना... दुःखद प्रतिक्रिया आणि जाणिवा चमत्कार स्वाभाविक असते. आंधळा थोडा वेळ रचनात्मक शक्य असलेल्या जंगलात मन रमत नाही. नकळत रमणारे मन गोष्टीकडे सारा वेळ गुंतून राहते आणि परिसंवाद वाचविला जातो. येतील तेवढ्या संख्येवर स्वाभाविक दृष्टीने नजर मंगलमय आणि कल्याणकारी होत राहते.         जीवनातील सशक्त विचार प्रतिक्रिया मनाला बळ देत असते जीवनातील विवेकाला बळ देत असते. बंधन खोल असते. वाद-विवाद वेगवेगळे असते... आणि नकोत असलेले भाव अति क्षणभंगुर असते.
      जीवनात सुखमय संवेदना कधी दुःखमय संवेदना सुखसंवेदनाचा मोह तिरस्कार समतोल तटस्थपणे प्रगतीचे भाव देत असतात. 

       जीवन वाटेवरील संघर्षमय वाट 
     सुखदुःखांच्या वाटेवरती प्रगत वाट 
     असावी लागते वाटेवरील जीवनधारा 
     आणि तसे नकोच असावे वाटे 
     मधील ...अडचणी... अलिप्ततेच्या

        ..... या विचार सागरात आणि प्रतिक्रियांच्या या मोहमायेत.  विसरूया  नको असलेल्या विचारधारेला आणि स्वमुक्ताने ... स्व मायने... स्व विचारधारेनेच. शब्दांचा योग्य फुललेल्या मायरानामध्ये!!!
            
 Copyright - सविता तुकाराम लोटे 
-----------------------------

माझी रमाई

------माझी रमाई ------
अपार कष्ट करुनी झिजली 
माय रमाई आम्हासाठीच
भिमाचा संसार प्रवास ओढीत
बौद्धिक- मानसिक शक्तीप्रतिमा... 
भिमाची!!!
आयुष्याचा प्रवास 
खडतर 
एका वस्त्रानिशी... सोबत; उपाशीपोटी 
काटेवरती चालती....
सुसंस्कृत माझी माय माऊली रमाई
सौभाग्य हाच तिचा दागिना 
ना शालुत नटली ना सोन्यात नटली 
हातात क्रांतीची मशाल घेऊन 
ज्ञानाची प्रकाशवाट दाविली 
संघर्षाची... जळती मशाल 
माझी माय माऊली रमाई
भुकेल्या वस्तीगृहातील खंबीर... 
प्रेरणाशक्ती तूच !
आणि भीमाची हृदय संवेदनाही तूच 
आम्हा सर्वांची कीर्तिवान माय माऊली 
माझी रमाई!!!
           ----सविता तुकाराम लोटे ---- 

शुक्रवार, ७ मे, २०२१

चारोळी कविता नजर रोखून

इथे थांबणार नाही विचार मंथन अनुत्तरीत 
किंचाळताही येत नाही फितूर झालेल्या 
क्षणांसाठी, एक वेगळीच लाट 
नजर रोखून ...आयुष्यातील!!
                           सविता तुकाराम लोटे

गुरुवार, ६ मे, २०२१

विसावा नाहीच

विसावा नाहीच 
पायांना आणि हातांना 
थांबवले; जरी दोन क्षण 
विसाव्यासाठी
मुक्त नाही, मेंदू...  
दिवसाचे तास जरी
पिंजऱ्याचे आयुष्य झाले 
मानवी वसाहतीचे 
तरी ...
विसावा नाहीच... कुठेच!
तरी चालले 
धुंदीत अपुला अभिमानाने 
वर्दीच्या रुबाबात 
विझलो तरी चालले 
....बेसावधपणे तरी 
विसावा नाहीस पावलांना 
ऑन ड्युटीतील
वर्दीतल्या माणुसकीला!!!
            सविता तुकाराम लोटे 
---------------/////////------------

फक्त चालत राहायचे

-----फक्त चालत राहायचे------
फक्त चालत राहायचे 
आपले घरटे सोडून 
आपल्या जीवनाचा 
श्वास वाचण्यासाठी 
मानव निर्मित तुफानी 
वादळाबरोबर संघर्ष 
करीत... 
येईल आपले घर 
मायेचे !
पावलांना 
सवय नसली तरी 
थांबणे नाही 
आता.... 
पुन्हा 
मुक्त उडण्यासाठी 
आनंदाने!
कदाचित 
अंगात शक्ती नसेल 
तरी 
नवीन आलेल्या 
संकटाला सामोर जाऊ 
पुन्हा... घरटे बांधू 
नवीन उमेदीने 
मौन होऊन जाऊ 
आपले घरटे सोडून 
परतीच्या सुखद 
आठवणींच्या स्वप्नहिंदोळ्यावर 
फक्त चालत राहायचे!!!
                सविता तुकाराम लोटे 
----------------------------------


मंगळवार, ४ मे, २०२१

तुझी सोबत हवी

----------तुझी सोबत हवी -
तुझी सोबत हवी 
भावनेच्या मोहरलेल्या 
स्तब्ध पावलांना 
चालविण्यासाठी..... 
अफाट सागर किनारी 
अडथळ्यांना मात करी 
ओळखीच्या खुणा रस्त्यावरी 
चाललेला; 
हातात हात 
बरोबर वळणावरील 
पाऊलठसावरी शांत!
अभिमानाने....
रेतीतील नाजूकपणाने
सुखद 
स्थिर.... 
फुललेल्या 
मनशांत
भरलेला शब्द साखळीने
तुझ्या पावलांची सोबत 
माझ्या पावलांच्या सोबतीला 
श्वास रोखून 
हात हातात ठेवून 
तुझी सोबत हवी
पाऊलखुणांवर !!!!
      सविता तुकाराम लोटे 
-------------------------

सोमवार, ३ मे, २०२१

एक रात्र

----------एक रात्र ----------

           संध्याकाळच्या कातरवेळी मधून रात्र हळूहळू उलगडत असते. जन्मापासून प्रत्येक व्यक्ती ही रात्र अनुभवत असते. त्या अनुभवातून आपले नाते साखळीसारखे गुंफत जात असते... जणू सुखदुःखांच्या नात्यात बरोबर आयुष्यात वेगवेगळ्या रूपाने आपल्याला भेटत असली तरी सावली प्रमाणे सोबत राहते. आपण जगत असतो; आपल्या आयुष्यातील जाळ्यामध्ये...
           सुकलेल्या फुलातून जसा सुगंध शोधता येत नाही पण हळुवार येणाऱ्या रात्र मधून स्मृतीची आठवणी मात्र सुगंधित होऊन जाते. रात्र जगायला शिकविते सूर्य ती तिच्या पलीकडे जाताना सांगत असतो. आयुष्याचे स्वप्नक्षितीचे... सोनेरी संध्याकाळ रात्री तू उलगडत जाते. कधी कधी रात्र आपला अनोळखी सुद्धा करून जाते. तेव्हा आपण आपल्याला शोधत असतो.                          काळ्याभोर रात्रीमध्ये असंख्य कल्पना जन्माला येतात; तेव्हा पण साथ देत असते. रात्र रात्रीच्या पावलांनी हळूहळू काळ्याभोर आभाळात उठलेल्या कल्पनांच्या वादळे मध्ये स्वतः गुंफत जात असते.
           रात्र होतांना निळा आभाळाला सोनेरी गडद तांबूस रंग सोडून जात असतो... झाडावरील पक्षांचा किलबिलाट सुद्धा कमी होत जाते. क्षणाक्षणाला मन सांगत असते ही कातर वेळची संध्याकाळ काहीतरी घेऊन जात आहे. अंधाऱ्या सावल्या बरोबर आपली स्वतःची ही सावली आपल्यामध्ये येऊन जाते. कणाकणाला आपली असते अशा जरी दिवसभर भास होत असला तरी मात्र कातरवेळची रात्र पायातील काटे आपल्याला काढण्यासाठी बळ देत असते; रात्र....

         पायातील काटे काढताना रात्र बळ देत असली तरी मनाला तयार करावे लागते.. एक एक किरण गोळा करीत जगलेल्या आपल्या आयुष्यातील वादळ वा-यांना... वादळ वाऱ्याबरोबर उध्वस्त केलेल्या स्वप्नांना कधी ती रात्र आपल्या स्वप्नाची साक्षी होती .आवाज न करता येऊन गेलेली चुकून भरलेल्या आयुष्यात स्वप्न घायाळ करीत असतात. जुनं बदलत चाललेले असते पण रात्र घायाळ मनाला ओलेचिंब करीत असते भिजलेला प्रवास चालू असतो तरीही....
      रात्रीचा काळाभोर काळोखात रानावनात जाताना अशी पायवाट चांदणी चंद्राच्या साक्षीने शोधावे लागते तसे मन सुद्धा शोधत असते. झुलणाऱ्या फांदीला भिजलेल्या प्रवाशांना नवीन संकेत देण्याचा प्रयत्न करीत रात्रीच्या अंधारामध्ये फुलत असले  तरी दिवस उजाडेपर्यंत मनातील कुठल्याही कोपऱ्यात नामशेष होत असते.                  वाहत्या पाण्यावर झाडांच्या सावला नुसत्या थरथरत राहतात... पण पाणी जात असते. आपल्या शेवटच्या प्रवासाला. वाहत्या पाण्यातील तो तर खळखळाट मात्र जागे ठेवत असते रानाला. रानातील सजीव निर्जीव वस्तूंना त्यांनाही सोबत लागते. 
          अंधारमय रात्री वाहणाऱ्या पानाची स्वच्छ निर्मळ पाण्याच्या पण त्यांच्यासोबत सुद्धा असते. रात्र आपल्या जगासाठी रात्र बळ देत निर्मळ पाण्याच्या गोडवा बरोबर सुरक्षित सुद्धा तेथे हीच रात्र!
        थंडगार वाऱ्याबरोबर उमलत असतात रंगबिरंगी फुले.त्यांच्या सुहासाने सुगंधाने धरणी सप्तसुहासीत होते. जीवनातील प्रत्येक रंग 'रात्र ', मनसोक्त मनमोकळेपणाने जगत असले तरी विचारांचा धो धो वाहत जातो कुठेतरी आणि आपल्यामध्ये घेउन जाते. वाटेतील दगड मध्ये येणारे अडथळे तशी रात्र घेऊन येते. भावनांना 
भावनेबरोबर आपले मन मोकळे नाते निर्माण करते. जुन्या नवीन आठवणींना साता जन्माची नाते. 
           जीवनातील विविध नात्यांनी रंगून रात्र आपल्या जीवनाला अविभाज्य भाग बनला आहे. आपल्या मनाचा भावविश्व मध्ये  रांगते रात्र मन शांत असले तर रात्र हवीहवीशी वाटते .दिवसातील दुभंगलेले शांततेमध्ये एकत्रित गुंफीली जातात. 
        रात्र अंधारमय असली तरी नवीन दिशेला किरणमय ठरत असते .लहानपणी तील रात्र आठवण मनाला इतकी हवीहवीशी वाटते पण ती रात्र पुन्हा कधी न भेटण्यासाठी असते .अशा कितीतरी रात्री मनातील कोपऱ्यांमध्ये साठवून ठेवीत असतो. आपण आयुष्यातील पायलट म्हातारी होत असतांना बळ देत असते जीवनातील शेवटचा प्रवास सोपे करण्यासाठी जगण्यासाठी !
     'रात्र,' तुझ्या माझ्या मनातील भावना निशब्द सांगून जात असते. शब्दावाचुन मनाला घोर लावून जाते; मात्र त्यावेळी वैरीण वाटतं जीवनातील सुखदुःखाची गोळाबेरीज मांडताना.
      संपू नये असे सारखे वाटत असले तरी हातातील वाळूसारखी निघून जाते  ' ती' ,चांदण्याच्या प्रकाशात.
          निसर्ग ऋतूप्रमाणे जीवनाच्या वाटेवर भेटत असतात. असंख्य रात्री. प्रत्येक रात्र वेगवेगळे, नवीन भावविश्वात येणारी ,नवीन कल्पनांना आकार ,चित्रित करणारी ,अंधारमय वाटेवर दिवसाचे स्वप्न दाखविणारी ...
         आपण झोपेत असलो तरी ती जगत असते चांदण्याच्या उजाडलेला स्वप्न किनाऱ्या बरोबर धुंद होऊन अशा असंख्य रात्री असंख्य कल्पनांना अंधारमय वेळी आकार देत ... दिवसाचे आशामय स्वप्न देऊन.आशामय स्वप्न जगत असते .या रात्री मुळे दिवस मावळता हळूहळू सांज गारवा मनाला हवा हवा वाटतो मनी येऊन जाते त्या गार वारा आभाळातून खाली यावा आणि सोनेरी किरणाला मिठी मारावी.
      रात्र येत राहाते. नात्यांना नवीन अर्थ देण्यासाठी... आयुष्यातील वेगवेगळ्या रूपांना सुगंधित करण्यासाठी विणलेल्या स्वप्न जाळ्यां मधील कोडे सोडविण्यासाठी. सुगंधित फुलातील सुगंध फुलविण्यासाठी उत्कटपणे आपल्याला अनुभवायला मिळते ,एक रात्र..!
        
                सविता तुकाराम लोटे 
----------------------------------
       
          

रविवार, २ मे, २०२१

अंधारलेल्या वणव्यात


-----अंधारलेल्या वणव्यात----

वणव्यात चालले होते 
वास्तवाच्या आणि समोर आलेच
सत्य... अंधारलेले
वाटेत थांबले मग 
जपुन टाकले 
भान ठेवून पावले 
श्वास रोखून...
तरी समोर आलेच 
सत्य ...अंधारलेले 
चेहऱ्यावर राग आला 
तरी डोके शांत ठेवले 
मन मोकळे नाही केले 
वेळ येऊच नाही दिली 
वाकले ...झुकले 
तरी समोर आलेच 
सत्य...अंधारलेले 
जपली नाती ...
तळहातातील मेहंदीसारखी...
जवळून आणि लांबूनही 
रक्ताळलेली क्षणापुरती 
निघाली; पश्चातापाचा साखळीमध्ये! 
पण जपून पाहिली
तरी समोर आलेच 
सत्य.... अंधारलेल्या वणव्यात
      सविता तुकाराम लोटे 
----------------------------------

शनिवार, १ मे, २०२१

प्रीत

------प्रीत -----
प्रीत माझी तुझी 
काही वेगळीच 
जीवनात फुललेली
आणि उजळलेली
प्रीत माझी तुझी 
हसऱ्या एकत्र क्षणांची 
न संपणारा शब्द साखळींची 
भरकटलेल्या स्वप्नांची
प्रीत माझी तुझी 
अबोल शब्द ओठांचे
मनमोकळा हदयाची 
भाषा.... आयुष्याची 
प्रीत माझी तुझी 
वचनबध्द मर्यादेची 
बघू जमतंय का? बोलण्याची 
आणि हळूच 
तुझ्या मिठीत शिरण्याची
प्रीत माझी तुझी
भिजलेल्या धूंद प्रेमाची 
आस देणाऱ्या जगण्याची 
उजळलेल्या स्वप्नांची 
प्रीत माझी तुझी 
   काही वेगळीच!!!
           सविता तुकाराम लोटे 
      -------------------------

सांज गेली

-------सांज गेली -------
सांज होती 
मी बसले होते 
सागर किनारी... तुझाच 
हात - हातात माझ्या 
...मोबाईल सोबत 
अलगद,
अश्रुधारा नयनात 
निशब्द, सगळ्या 
भांडकुदळ भावना 
आता 
जाणवू लागला 
वेदना ...सरसकट
वा-यांचा सोबतीने
मनापासून! 
पायाखालील 
वाळू...  सरकलेली 
अधिक सांज आली  
रुसलेल्या प्रेमाची 
हसणाऱ्या ओठांची
कोसळणाऱ्या लाटांची 
भिजलेल्या पापण्यांची
अलगद 
तुझे हात बाजूला करून 
अमावस्येच्या रात्रीसारखे 
मन हरवून.... 
दूर कुठेतरी बघत!
हात हातात घेऊन
हात सोड ना !
नको राहू दे 
मनात गुंतलेला... 
नेहमी स्वच्छ आठवणीसंग
पण; 
ढगाळलेले क्षण ठेवून ज्या
शांत लाटेसारखे... मुके 
आणि 
हळूच सांज गेली
हाता -हातात ठेऊन
मनमोकळा मनाने! 
      सविता तुकाराम लोटे 
    


---------------------------------

पैंजण



--------पैंजण------------- 
पायातील पैंजण वाटली नाही 
कधीच बेडी... भूमिका बदलला तरी 
सौंदर्यात भर टाकली जेव्हा तो 
बोलून गेला... पैंजण आवाज छान 
चुकला नजरेने पण हसऱ्या शब्दांनी 
गोंधळत... हलक्या आवाजात मोहून टाकले  चोहीकडे परिसर... मनातील श्रावण 
चालत राहा अशीच ...पैंजण आवाजात
पोहोचले शब्द... तुझे सुखात 
फॅशनच्या कोणत्याही रूपात ये 
माझ्यासमोर ...
प्रसिद्धीच्या कोणत्याही माध्यमातून ये माझ्याकडे...
मी ओळखेल! अनोळखी झालो तरी, गर्दीत 
पैंजण आवाज परिपूर्ण झालेल्या भूमिकेत 
पायातील पैंजण वाटली नाही 
कधीच बेडी... भूमिका बदला तरी 
कितीही
                   सविता तुकाराम लोटे 
-----------------------------

शुक्रवार, ३० एप्रिल, २०२१

डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि कामगार विचार

        डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्त्री  कामगार विचार

          भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर एक थोर विचारवंत  शिक्षणतज्ञ , कायदेपंडित , संसदपटू  संपादक ,लेखक ,वकील, प्राध्यापक , समाज सुधारक , घटनाकार ,एक अभ्यासू आमदार  खासदार  अशा  पदांना भूषविलेले व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब ! त्यांच्या या कार्याची दखल सर्वांनीच घेतली.

         १९३६  साली स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. या पक्षाचे ध्येय धोरणे कुठल्याही जाती धर्मासाठी नव्हते तर कष्टकरी समाज वर्गासाठी होते. आर्थिक-सामाजिक राजकीय हक्कांसाठी होते. यातूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शोषित कामगारा विषयीची तळमळ लक्षात येते. १५ ऑगस्ट 1१९३६ धोरणाचे ध्येय धोरणे अतिशय साध्या पद्धतीने आणि सूक्ष्मसखोल विचार पद्धतीने मांडले.

         कष्टकरी समाज वर्ग सत्ता संपत्ती पासून वंचित होता वाटेल तसे राबविले जात होते त्यामानाने मोबदला मात्र अल्प द्यायचे बारा बलुतेदार पद्धती समाजमान्य होते दलित अस्पृश्यांची स्थिती दयनीय होती शोषित कष्टकरी कामगार वर्ग गुलामीचे जीवनमान जगत होते.            १८७३ मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाज चळवळीने पारंपारिक समाजात चौकट उद्ध्वस्त केले या चळवळीने समाजातील अस्पृश्यांचे जीवन शैली दाखवून दिले या चळवळीमुळे अस्पृश्य समाज वर्गाला  जीवन जगण्याची  नवीन पद्धत प्राप्त झाली जीवनाला धैर्य प्राप्त करून दिले रोजगार शिक्षण जगण्याचे सामाजिक मूल्य इत्यादी बळ दिले.

             डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ज्या जबाबदाऱ्या स्वीकारला त्या सर्व जबाबदाऱ्यांमध्ये  आपला ठसा उमटवलेला आहे १९४२ते १९४६ या काळात केंद्रीय श्रम व रोजगार ऊर्जामंत्री म्हणून कार्यरत असताना आपले मत रोख ठोक पद्धतीने मांडले ते म्हणतात," आता काळ बदलला आहे. सत्तेच्या व कायद्याच्या जोरावर कामगार वर्गाला दडपणे शक्य नाही. कामगार हा माणूस आहे. त्यांना मानवाचे हक्क मिळाले पाहिजेत. सध्या सरकार पुढे तीन प्रश्न  आहेत एक तडजोडीचा, कामगाराची निश्चित वेतन , कामगार मालक यांच्यातील सौहादपूर्ण संबंध कामगारांचे राहणीमान उंचावले पाहिजे. आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे. मी नेहमीच कामगार वर्गाच्या बाजूने उभा राहीन.” आपली कार्यपद्धती ही कामगारांच्या बाजूने आहे हे त्यांनी मांडले. 

     २९ मार्च १९४५ स्त्री कामगारांचे स्त्रियांसाठी प्रसूतीचा काळ विश्रांतीची तरतूद, रोख मदत करणे, चार आठवडे प्रसूती भत्ता मिळावा तसेच गैरहजर असताना पगारी सुट्ट्या मिळाव्यात. खाण कामगारांना शॉवर बॉथची योजना सुद्धा अंमलात आणली होती.

     डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खाण मजुरांसाठी आपले विचार भाषणातून  व कायद्यातून मांडताना दिसतात. स्त्री कामगार अन बद्दलची आत्मीयता त्यांच्या कौटुंबिक समस्या संसार विषयी चिंता त्यांच्या जीवनाचा उन्नतीचा मार्ग हा आर्थिक परिस्थिती सुधारेल तेव्हाच सुकर होईल.  

     बाबासाहेब यांनी १९४५ आली महागाई भत्ता निर्णयामुळे अर्थ मजूर मंत्री असताना बाबासाहेबांचे निर्णय हे कुठल्याही विशिष्ट जातीला समोर न ठेवता समाजातील सर्व जाती धर्मातील कामगारांच्या हितांचे असतील असे निर्णय घेतले स्वातंत्र्य समता बंधुभाव या सूत्रांनी बांधणारी भारतीय राज्यघटना दिली. देश एकसंघ ठेवला.

          ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे भारतीय कामगारांचे दोन शत्रू आहेत असे त्यांचे मत होते. कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करणे, मालक आणि कामगार यांच्यात औद्योगिक विवाद झाल्यास दोघात समेट घडवून आणण्यासाठी यंत्रणा निर्माण करणे, कामगार आणि मालक यांच्या कोणत्याही वाटाघाटीसाठी तरतूद करणे, वर्षातून किमान 240 दिवस काम, कामगारांना दिवसभरात आठ तास काम, नोकरीत असताना जर  कामगाराचं अपघात व मृत्यू झाला तर मालकांकडून कामगाराला नुकसान भरपाई देणे. असे मत त्यांनी दिल्ली येते जॉईंट लेबर कॉन्फरन्स(Joint Labour Conference 1942) मध्ये कायद्यात एकवाक्यता असावी असे मत व्यक्त केले.  

        त्यांनी स्त्री कामगारांना कायद्यान्वये रात्री काम करण्यासाठी बंदी , स्त्रियांना प्रसुती काळात भर पगारी सुट्टी, बारमाही कामगारांना हक्काची भरपगारी सुट्टी,सक्तीची तडजोड , लवादा हे तत्व कामगारांच्या न्यायासाठी कायमस्वरूपी केले. त्यांचे हक्क वेतन विमा आरोग्य संरक्षण कामाचे तास इ. 

आधुनिक समाजव्यवस्था बदलता आहे. जागतिककरण आले औद्योगीकरण सुरू झाले नवीन वसाहत वादाला शहरी-ग्रामीण भागाचा विकास होत आहे. ग्रामीण भागांचे शहरीकरण होत आहे शहर महानगरात परिवर्तित होत आहे; त्यामुळे सांस्कृतिक सामाजिक राजकीय शैक्षणिक आर्थिक यासर्व मध्ये बदल होत आहे. प्रगतीचे नवीन मार्ग खूले होत आहे.

       समाज भारतीय राज्यघटनेने दिलेले अधिकार मूलभूत तत्व समानता स्वातंत्र त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव आहे. लोकशाही ही आपली जीवनशैली बनवली आहे . बहुराष्ट्रीय कंपनी धोरणामुळे, वाढत चाललेल्या खाजगीकरणामुळे, नवीन समस्या निर्माण होत आहे. नवीन वसाहतवाद निर्माण होतो. साम्राज्यवाद निर्माण होत आहे. सांस्कृतिक दहशतवाद निर्माण होत आहे. माणसाच्या घामाची जागा आता यंत्राने घेतली आहे. श्रीमंत श्रीमंत तर गरीब हा अधिक गरीब होत आहे. सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक मूल्यांची घसरण होत आहे. भारतीय कामगार कायदे पुरेसे आहे पण समाधानकारक रीतीने योग्य पद्धतीने अंमलबजावणी केली जात नाही त्यामुळे जो कायदा कामगाराच्या फायद्याचा असतो तो निराशाजनक पद्धतीने पदरात पडताना दिसतो .

            सविता तुकाराम लोटे

---------------------------------

     


 

गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

सांजवेळ

-----------सांजवेळी----------------


        सांजवेळ... सांजवेळ परतीचा क्षण निळ्या निळ्या आकाशात सोनेरी झालर पसरलेली असते. आकाशातील सप्तरंग बरोबर वाऱ्याची झुळूक सुद्धा अंगाला रोमांचित करून जाते. सूर्य दूर पलीकडे जाताना दिसते. सुखदुःखची साक्षी असलेला सूर्यमित्र दुसऱ्या दिवसाला साथ देण्यासाठी आशावाद निर्माण करून परत भेटीचे आश्वासन देऊन जाते, सांजवेळ. 
         आकाशात पक्ष्यांच्या किलबिलाटात होत असते. पक्षी परतीचा वेळ असतो. आकाशातील रंगाबरोबर दिवसाचे सर्व अनुभव सांगत जात असावे जणू. दाही दिशा आपल्याशा वाटतात दिवसाचे चक्र संपून आकाशात मुक्त भरारी घेत परतात आपल्या घरट्याकडे.
           सकाळी टवटवीत फुललेला मनुष्यप्राणी सांजवेळी घरी जाताना विचार करीत असते. दिवसाचा सांजवेळ अशावेळी असते की यावेळी न दिवस न रात्र तरी पण मनाने आनंदाने फुललेले असते. दिवसभराच्या कष्टाची  चिन्ह  जरी चेहर्‍यावर दिसत असले तरी घरच्यांकडे  जाण्याची ओढ निराळीच असते.मनुष्यप्राणी परतात असते. सर्व हेवे-दावे सोडून.
      नवविवाहितांना अति ओढ असते. नववधूची नवजात मुल असेल तर त्याच्याबरोबर खेळण्याची ताई चिमणी पाखरांचे बालगीत त्यांचे बोबडे बोल मनाला घराकडे नेतअसतात. सांजवेळी सर्व विसरून परतिचे पाय घरटंकडे नेत असतात हीच सांजवेळ!
         दगड मातीची इमारत घर बनते जेव्हा त्यात आपली वाट पाहणारे माणसं असतात. इमारतीला घरपण येत असतं. आपल्या माणसां मुळे दिवसभर कष्ट करून थकलेल्या शरीराला विसावासाठी आपल्या माणसांसाठी घरी परततात असते. सांजवेळी पण घर जेव्हा इमारत असते. आपली माणसे नसतात तेव्हा संचार घरीच असतं. निळ्या आकाशाखाली त्याला साथ देत असते. हीच सांजवेळ सुखदुःखाची मूक साक्षीदार असते. हीच सांजवेळ वेळ प्रसंगी आधार देते, मित्र बनते नव्या स्वप्नांना आकार देते; क्षणभंगुर चिंता दूर करते सांजवेळ!!
        दिवसातल्या कोणत्याही वेळेपेक्षा सांजवेळ मधुर स्मृती घेऊन येतात. गतकाळातील आठवणींना सुर देण्याचे काम करते. आनंदाचे आगर आणि सुखाचे सागर कोणत्याही शब्दांनी वर्णन केले तरी सांजवेळेचे सौंदर्य पूर्णपणे चित्रित करता येत नाही. सांजवेळ विविध रंगांनी भरलेले असते.
           सांजवेळ आमच्या जीवनातील सत्य असते. रानावनातून गोठ्याकडे, आकाशातून घरट्याकडे, शेतातून घराकडे ,धाव घेणाऱ्या पाखरांना गाईंना आणि माणसांना सांजवेळ मातेप्रमाणे आपल्या कुशीत घेत आधुनिक जगात भावनाशून्य यंत्रेप्रमाणे धावणाऱ्या माणसाला स्वप्न फुलविण्यासाठी वेळ देत असते सांजवेळ...
      सांजवेळ सांजवेळ... जीवन कल्पनेला फुलवीत असते ही सांजवेळ.
                                20.2.2007
     
                  सविता तुकाराम लोटे 
----------------------------------

महाराष्ट्र दिन

          

             1 मे हा दिवस महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्र दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. महाराष्ट्र दिन म्हणजे संयुक्त मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. राज्य पूनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला देण्यास नाकारले होते.  मुंबईसह महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्वत्र सभा  घेण्यात आला होता.  महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा बोलणारे मुंबई-कोकण विदर्भ देश खानदेश मराठवाडा आणि आजही महाराष्ट्र बाहेर असलेले बेळगाव,डांग,निपाणी,कारवार,बिदर हे भाग अभिप्रेत होते.
           पण राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबईसह महाराष्ट्र देण्यास नकार दिला. त्या निर्णयाविरुद्ध महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक ,सांस्कृतिक ,वैचारिक ,साहित्यिक, कलावंत ,अभ्यासक,  मराठी भाषिक प्रेमी,  इतिहास प्रेमी, वृत्तपत्रकार  इत्यादी आणि महाराष्ट्रातील सर्व लहान मोठ्या संघटना आणि कर्मचारी संघटनेने आपापल्या सभांमधून निषेध नोंदविण्यात आला होता.

       21 नोव्हेंबर 1956 मध्ये फ्लोरा फांउटनच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यासाठी मोर्चे काढण्यात आला. त्यावेळी मोर्चावर लाठीचार्ज आणि गोळीबार करण्यात आला. त्या आंदोलनात 106 हुतात्मे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि मराठी माणसाच्या एकजुटीमुळे 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली गेली.


       1965 मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली. हाती मशाल घेतलेले क्रांतिवीर स्त्री-पुरुषांचा एक पुतळा उभारला गेला त्या पुतळ्याला हुतात्मा स्मारक म्हटले जाते आणि तेव्हापासून फ्लोरा फाउंटन असलेल्या चौकाला हुतात्मा चौक असे नाव देण्यात आले. 
           अखंड राहो सदा 
               हे शिवराष्ट्र 
        जयघोष करूया जय जय जय
             जय महाराष्ट्र

आज परिस्थिती बदललेली आहे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात आपण साजरा करीत असतो आणि करणार आहोत पण आपापल्या घरीच कोरोना संकटामुळे.
      सहकार्य करू या! आपल्या जगासाठी आपल्या देशासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या माणसांसाठी,आपल्या स्वतःसाठी सुरक्षित राहू या.
                  सविता तुकाराम लोटे 
----------------------------------
                           

बुधवार, २८ एप्रिल, २०२१

मधाळलेली सांजसावली

मधाळलेली सांजसावली
      सकाळ नंतर संध्याकाळ आणि संध्याकाळ नंतर सकाळ हे चक्र रोजच येते आणि जाते.कधी कधी सकाळ सोबत आनंदाची पाखरे घेऊन भुरकून जातात. दुःखाचे सावट न विसरू देण्यासाठी कळत नकळत सुख सोबत दुःखही जखमेवर मलम लावीत समजावेत असते.
 स्वतःलाच हळुवारपणे कधीही न बहरून आलेल्या वेलीप्रमाणे पावसाचा गंध जसा चोहीकडे असते. धरती मिलननाने सुखावते. आपल्याला झुलायला, हसायला, फुलायला शिकविते आयुष्यभर. तो पाऊस सुद्धा कधी कधी दिसेनासा होतो तेव्हा काय परिस्थिती होत असेल कल्पनाही करता येत नाही. दाटून आलेल्या संध्याकाळी सोनेरी ऊनाबरोबर सांजसावलीच मधाळपणा मात्र मनात मन गुंफणारा काळजात घर करून बसणारा असते. डोळे आतुरलेले असतात सांजवेळच्या प्रतीक्षेत!
           मनात प्राजक्त मोगरा फुलला की मनसोक्त आभाळही सप्तसुर आठवणींनी चिंब होते. सांजसावली कुशीत शिरावे वाटतं सारे ओलावलेले क्षण घेऊन!
          मी आपल्या घराकडे परतत असताना अंधारमय सावली घेऊन सूर्य ही मावळण्याच्या बेतात असते. सतत वाहणारा गारवा आयुष्यातील आठवणींना सप्तगंगणात घेऊन जात असते. मनाची समाधी लागली की खिडकीबाहेर लाल केशरी बहरलेली गुलाब पाहून फुललेला गुलाबाचे पाने शब्द बनून सप्तसुरांचे सोबत साथ देत असतात. नवीन गगन भरारी घेऊन दिशाहीन झालेल्या सुरांना पुन्हा लागते. जमिनीवर आठवणीच्या काळाकुट्ट मातीवर ओढयाव्या लागतात रेघाटया आठवणींच्या आणि त्याचे  रेघाटयाबरोबर इवल्याशा मनाच्या रूप त्यावर जखम होते तर रेघोट्या ओढव्यासा वाटतात. 
     खाली मन दिशाहीन धावत असतं शब्द नी शब्द सोबत घेऊन पापण्या च्या कडेला आपलेपणाचा ओलावा ठेवून साक्षी असते वर्तुळ बाहेरील जगात जगताना एखादी किरण आपल्याकडे आलेले पाहून जीवन किती सुंदर असे वाटते पण पानझडी प्रमाणे गळून पडतात परत क्षणात या पुस्तकातील लाल गुलाबाच्या पाकळ्या पाहून मनातील जीवघेणा वेदना अधिकच जवळ येत असतात वर्तुळा बाहेरील जगात आणि पुन्हा वसंत बहरत असतो निशब्द.
      दिलेला वचनेच्या माळा गुंफीत असतात. गळाभोवती क्षणात स्वप्नमय रम्य निरागस वाटते ते क्षण जेव्हा दुःख सोबत आले होते कधी ही न येण्यासाठी पण पानगळती नंतर नवा क्षण येतच असतो तसाच क्षण सुद्धा आला 
        संघर्ष असतो स्वतःचे इतरांशी जीवनाच्या वाटेवर काटेच असतात हळुवार वेदना देण्यासाठी मूकपणे ओठावर न येण्यासाठी मधाळलेला सांजसावलीत मन आनंदाने नाचत असते  सुंदर स्वप्नाला पुन्हापुन्हा बनविण्यासाठी नवनवीन कल्पना फुलत असतात कुणालाही नकळत आनंद द्विगुणित होते वाटतं आयुष्याच्या कळ्या कळ्या फुलत रहावे. प्रकाशाचा सारख्या काटन च्या सहवासात प्रसन्न होणाऱ्या लाल केशरी गुलाब सारखे रहावे टवटवीत वाहणारा झरा सारखा घरट्यातल्या चिऊताईच्या बाळासारखं अखंड कुहू कुहू कोकिळे सारखं कमळासारखा हव्याहव्याशा वाटणाऱ्या गार वारा सारखे आणि पोपटी हिरव्या शालूघातलेल्या मायमाते सारखे हसत हसत फुलून घ्यावे स्वतः पण त्याला कुणाचीही दृष्ट नजर न लागावे.
          होईल तुझ्या न हे सगळं उत्तर नसतं दिलासा  नसते त्या क्षणाला आशा मात्र असते आणि मनात शब्द येऊन जातात
        काही क्षण जपायाचे असतात 
        स्वातीच्या दवबिंदू सारखे 
        काही क्षण विसरायचे असतात 
        आळवीचा पानासारखे
                          27.1.2006
         सविता तुकाराम लोटे 
---------------------------------

कातरवेळी

         
           आयुष्याची वाट चालत राहावी अशीच क्षितिजा परी क्षितीजापर्यंत जाण्याची मनात इच्छा आणि दुरवर दिसणारा काळाभोरआकाश कातरवेळी चाललेल्या पक्षांची धडपड घराकडे जाण्याची जिद्द त्यातून नवे बनविते सूर्य आकाशात प्रफुल्लित होऊन जातो. जरी ते अस्ताला जात असला तरी सूर्य बळ देत असते, जिद्द देत असते, तो पुन्हा आयुष्याच्या चुकला वळणावर सावरण्यासाठी आयुष्य जगण्यासाठी.
             भूतकाळ मनातील हळव्या क्षणांना बऱ्याच गोष्टीं ची व्यथा डोळ्यात दाटून येते या आणि पापण्या बाहेर पडायचं नाही मनाच्या कुंद कोंदणात तसेच राहायचे कायमचे पण  या हळुवारपणे येत असतात भूतकाळापासून बाहेर वर्तमानामध्ये!
        पाऊस पडून गेल्यावर म्हणायची नवचैतन्य झाले असते. झाडांच्या प्रत्येक पानावर थेंबांचे अस्तित्व असते. थंडागार वारांनी मनाची दारे ओलेचिंब झाले असते. भिजलेल्या मनाला शांत करण्यासाठी पुन्हा त्याला यावे...
     तरी मनातील गोड कडू आठवणी तशाच राहतात त्या नकोशा वाटणाऱ्या आठवणी सुद्धा मनातील कोपरा ओला चिंब करून ठेवतात. मनावर भल्यामोठ्या ढोकळा सारख्या आठवणी असे वाटते त्यांना संपून टाकावे पण अशावेळी  त्यांना अधिक उफाळा येत असते. 
        हळव्या क्षणा बरोबर आपले बरोबर वाटत असते. आज तक धरलेला अबोला मनाला  ओलाचिंब करून जाते. मनामध्ये विचारांचे वादळ निर्माण होते. अपयश अपयश आपले असते कि त्या क्षणाचे हेसुद्धा कळत नाही तरी अबोला सर्व मनातील भाव भावना क्षणात प्रगट करीत असतात; आपल्याही नकळत !
          आठवणींना संदर्भ देतांना मनात विचार येतो. मनसोक्त गुलाब फुलतो गुलमोहर फुलतो वाटसरूंना विसावा देत. अंगावर पावसाच्या सरी झेलत एकमेकांशी कुजबुजते पाने दवबिंदूचे मंजुळ गाणे अधिक जवळची का वाटत असते.
    मनातील असाह्य होणाऱ्या वेदना अबोल सोडून सांगावस असे वाटते असले तरी कशी खुले करावे. मनात नकळत विचार आला की त्याची हातात हात घेउन त्याला समजावे त्याचा अबोला कमी करण्याचा प्रयत्न करावा असे वाटत असताना, मनसोक्त हसावे त्यावेळी... त्याचे मनसोक्त हसणे त्याने दिलेल्या गवत फुलांवर हात फिरवीत आठवणी त्या आठवणी मनात दाटून येतात.
        माझ्या खुळ्या कल्पनावर हसणे हळूच रागवणं आणि अबोला धरला की त्या स्वप्नातील कल्पना समोर  उभा करणे त्याच्या कल्पनेमध्ये फक्त माझे अस्तित्व त्याच्या विचारात त्याच्या आयुष्यात फक्त माझे अस्तित्व मी मी आणि मी फक्त मी असायचे. कवितेमध्ये लिखाणामध्ये पण !!आमच्या साध्या संवादाला सुद्धा कवितेचे रूप यायचे कळत सुद्धा नव्हते.... त्यांनी प्रत्येक क्षण जपून ठेवला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात;पण...
    आशावाद आणि निराशावाद हेच एक कारण असावे त्याचे आशावादी असणे आणि माझी निराशावादी असणे हेच कारण त्याच्या माझ्यामध्ये आले असेल दोन विरोधी टोके एकत्र येण्याचा प्रयत्न करीत होते पण त्याला दुसऱ्या टोकाची नजर लागली म्हणजे माझी आणि तो तिथेच थांबला क्षण पुन्हा एकत्र न येण्यासाठी.
       चुकलेच माझे त्यावेळी पण तुला सावरता आले असते सावरले का नाहीस त्या  क्षणाला कवितेचे रूप का दिले नाहीस माझ्या अबोला माझ्यापासून दूर घेऊन जाईल असे वाटत सुद्धा नव्हते तुला कारण तुला भेटल्यानंतर तुझ्याविना आयुष्य असेल असे वाटत सुद्धा नव्हते भविष्यात फक्त तूच असावा तूच होता कल्पनेत  आणि विचारात.
        तुझं माझं नातं जगावेगळा. आजही तसाच दिसलास; माझ्या अबोलशब्दांना सामोर गेलास. तुझ्या भावना कळल्या तुझे पाणावलेले डोळे दिसले परत आशावाद दिसला याच कातरवेळी मावळतीच्या क्षणाला घट्ट मिठी मारली अबोला धरून .
      ...... रोज  येणाऱ्या कातरवेळेला कोण घट्ट मिठी मारेल .....माझ्या विचारांमध्ये तू असला तरी आज परिस्थिती वेगळी आहे तुझ्या त्या हळव्या क्षणांमध्ये भागीदार मात्र नाही मी त्यात शिरू पाहते आहे दुसरी कोणीतरी आणि तुही हळुवारपणे साद देता आहे तुझ्याही नकळत. पण सांगून गेले तुझ्या हातातील गवतफुलांची फुले सर्व काही त्याच कातरवेळी!!
             सविता तुकाराम लोटे 
---------_------------

स्वप्न सावली अस्तित्वात येते तेव्हा!!!

स्वप्नसावली अस्तित्वात येते तेव्हा!

            समाजामध्ये अनेक प्रकारचे अनेक स्वभावाची माणसे राहत असतात. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात रेशीमबंध असते. काही ऋणानुबंध असतात. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर कुणीतरी येण्याची वाट पाहत असते. मनामध्ये एक आकार एक स्वप्न निर्माण होते. स्वप्नातील एक हलकीशी चाहूलही कशी मने फुलतात अंतःकरणाच्या कोवळ्या वेलीवर संदर्भातील भाव फुले स्वप्न फुले फुलून आनंदी करतात पण तेवढ्यात एक स्वप्न पूर्ण होऊन वास्तवाच्या जगात रमत असते तरी ते स्वप्न न विसरता ती काळी पांढरी सावली पाठलाग करीत असते ते भावफुल आणि स्वप्न फुल एका कोपऱ्यामध्ये पक्के  बसून राहते कुणाच्यातरी दिसण्याचे स्वप्न अस्तित्वाचा आणायचे ती काळी पांढरी सावली स्वतः स्वतः भोवती फिरत राहते.
      निळाभोर आकाशाखाली वावरू लागते आपल्या सोबत स्वप्न चिमणी पाखरांची ती चिवचिवाट मनाला स्पर्श करून जाते आणि डोळ्याभोवती उभी राहते ती काळी पांढरी   सावली हाताच्या ओंजळीमध्ये चांदणे गोळा करून देत असते ती सावली मने निशिगंधा सारखे फुले तसेच मनातील कोपरा न कोपरा त्या अबोल संभाषणा बरोबर चालत असते आणि अचानक डोळे सताड उघडे होतात आणि विचार करू लागते. 
         मनातील ती काळी पांढरी सावली होती की कल्पतरू होते ते! जसे काचेचा आरशाला मारला तर तुटून जाते प्रतिबिंब नष्ट होते तसे झाले.  मनातील शब्दाने खेळ खेळला सुसाट वादळाने झाडे मुळापासून उपटून टाकले तेव्हा झाडांनी काय करावे तसे केले त्या काळा पांढरा सावलीने माझे अस्तित्व नष्ट केलं रक्तबंबाळ केले मन सागराला!
         कोणतीही भावना त्यासमोर फिक्की पडत होती हृदयाच्या कोपरा न कोपरा त्या आठवणीने घायाळ झाला होता रक्ताच्या प्रत्येक थेंबाने वर ती सावली हक्क सांगत होती हेवा करीत होते मन मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होते. मन रिकामे झाल्यास ते बुद्धी विचार करीत नव्हते माझी व्यथा ऐकत नव्हते. 
           तुटलेल्या स्वप्नांची रडगाणी गोळा करीत होते. झडलेली सगळी पिवळी पाने अंतरंगातील व्यथा पापणी मध्ये साठवीत होती. दाट ढगातून मला  मिळत नव्हती ते खुल्या पापण्यान मधून कितीतरी वेळा त्या सावलीने देऊन दिले होते आणि दवबिंदू साठवीत होती हिरव्या हिरव्या तृणफूलातून स्पर्श करून जात होती पुन्हा तुटलेला काचेवरून मन बेभान नाचू लागले होते ती सावली ज्या वेळी अस्तित्वात माझ्या समोर आले तेव्हा आनंदाने भरून गेलेले मन अचानक घार पक्षी सारखे पडू लागले पाण्यातून मासाला बाहेर काढावे आणि जगाला लावावे त्याला या भूतलावर आपले वेगळे अस्तित्व निर्माण करायला लावावे त्याला जरी माहीत असले तरी त्याची जीवन नाही तेथे तसेच झाले.
        विचार करू लागले माणसांच्या गर्दीत हरवून गेले पुन्हा ती सावली मला आपल्याकडे खेचत असते. माझ्या स्वप्नातील काळी पांढरी सावली तेथे जशी मी त्याला पाहण्याचा प्रयत्न करीत होते तसेच आधी पाहात होते तशीच तेव्हाही केले पण ती सावली माझ्याकडे येत होते. सर्व भावांनी मध्ये आणि अगदी जवळ येऊन त्या भावनेला अर्थ देण्याचा प्रयत्न करीत होते पण तितकेच दूर जात होते भीतीने हदयात एक अनामिक निर्माण होत होती तिने कधी मला गुंतविले नव्हते.
           शरीरातील शक्ती नष्ट करीत भावनाशून्य करीत होते तरी वटवृक्षाप्रमाणे उभी होती एकटी संघर्ष करीत.
         24.1.2004
            सविता तुकाराम लोटे 
_---_------------------------


माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...