savitalote2021@bolgger.com

सोमवार, २४ मे, २०२१

गौतम बुद्ध आणि त्यांचे विचार




    गौतम बुद्ध आणि त्यांचे विचार

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात," मनाला सुसंस्कृत करणे हे मानवी अस्तित्वाचे सर्वश्रेष्ठ ध्येय असले पाहिजे. त्याप्रमाणे जीवनाचे तत्वज्ञान हे सरळ साधे सोपे असावे जीवनाचे मूलभूत नियम स्वातंत्र्य समता बंधुभाव यावर आधारित आहे ."
          गौतम बुद्धांनी बौद्ध  धम्मात मध्यम मार्गाचा वापर करून मानवतावाद संपूर्ण जगाला दिला. गौतम बुद्ध म्हणतात," पाणी जोराच्या लाटेने कदाचित झुडूप विखुरली जाऊ शकतात पण समुद्राची खोली हे मात्र शांत असते त्यामुळे शांत राहायला शिका."
  
         मानवी जीवनावर तीन गोष्टींचा प्रभाव पडतो धर्म कला संस्कृती ! बौद्ध धम्मात कला साहित्य आणि संस्कृती यांना अत्यंत महत्त्व आहे. या तीनही गोष्टी माणसाच्या भावना मन संवेदना तरल बनवत असते. 

         सत्याच्या शोधामुळे नवनिर्मिती होते.  ती अप्रतिम आणि सर्वश्रेष्ठ असते कलाकारांच्या आयुष्यापेक्षा त्यांच्या कलेला अधिक महत्त्व असते. धर्म आणि कला या दोघींची अभिव्यक्ती म्हणजे संस्कृती होय. जीवनातले सगळे चढ-उतार म्हणजे आपल्या निकोप वाढीसाठी लागणारे अनुभवाचे खतपाणी आहे. 
    ज्याला चांगलं मनुष्य होण्याची इच्छा आहे त्याने जीवनाचे काही तत्त्वे पाळली पाहिजे ही विशुद्धी मार्गाची शिकवण आहे .माणसाच्या चांगल्या आणि वाईट कृतीचे मोजमाप करण्याचे मानदंड म्हणजे  पंचशील   होय.

1. पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि
( मी जीवहिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो )

2. अदिन्नादाना वेरमणी सिक्खापदं समादियामि  ( मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो)

3. कामेसु विच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामि (मी कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त प्रतिज्ञा करतो.)

4. मुसावाद वेरमणि सिक्खापदं समादियामि (मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो)

5. सुरमेरय मज्ज पमाद्ट्ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामि 
( मादक तसेच इतर सर्व मोहात पडणाऱ्या वस्तूच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो.)
      मानवी व्यक्तिमत्व काया  वाचा मन या तीन घटकांनी बनलेले आहे.   
     

    भगवान बुद्धाने सदाचाराचा जो मार्ग सांगितला आहे यालाच अष्टांगिक मार्ग म्हणतात.

1. सम्यक दृष्टी 
2. सम्यक संकल्प 
3. सम्यक वाचा  
4. सम्यक कर्मांन्त 
5. सम्यक आजीविका 
6. सम्यक व्यायाम 
7. सम्यक स्मृती 
8. सम्यक समाधी

   भगवान बुद्ध म्हणतात ,अविद्येचा विनाश हा  सम्यक दृष्टीचा उद्देश आहे.आकांक्षा महत्वकांक्षा उदात्त आणि प्रशंसनीय असावी. बोलावे जे सत्य असे योग्य वर्तन. जगण्यापूर्ती मिळविण्याचे योग्य मार्ग. व्यायाम , मनाची सतत जागृती, चित्ताची एकाग्रता होय. जगात सर्व वस्तू  परिवर्तनशील आहेत अनित्य आहेत त्यामुळे माणसाने त्यांच्याविषयी आसक्ती ठेवता कामा नये. यास सत्य म्हणतात . गौतम बुद्धाने सम्यक साधने वर भर दिलेला आहे. कारण कुठलेही अवडंबर मन शांत घेऊ शकत नाही.  मनाला यातना मुक्त करू शकत नाही. आंतरिक शांती हीच मनाला परिपूर्ण शांती देत असते. अष्टांगिक मार्ग प्रेरणा मनामध्ये निर्माण करीत असते.

भगवान बुद्धने  परिव्राजकांना दहा शील मार्ग समजावून सांगितले.शीलमार्ग म्हणजे गुणांचे पालन करणे होय

1.नीतिमत्ता 
2.दान 
3.उपेक्षा   
4.ऐहिक सुखाचा त्याग 
5.योग्य प्रयत्न 
6.शांती 
7.सत्य 
8.दृढनिश्चय 
9.दयाशीलता 
10.मैत्री (बंधुभाव)
 
        भगवान बुद्धाच्या या धम्मतत्वांचा ज्या परिव्राजकांनी पहिल्यांदा स्वीकार केला त्यांना पंचवर्गीय भिक्खू म्हणतात. भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन याच धम्माच्या तात्विक आधार आहे.
        बुद्धांनी रूढी परंपरा अंधविश्वास त्यांचे खंडन करून एक सहज सोपा मध्यम मार्ग सांगितला आहे.
    
     दुःख ही टाळता येण्याजोगे अजिबातच नाही पण त्यामध्ये किती रमून जायचे हे आपल्या हातात आहे त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुमचे तुम्हीच ठरवायचे
   तुम्ही जर योग्य दिशेने वाटचाल करत असेल तर चालत राहायला हवं त्या दिशेने गौतम बुद्ध म्हणतात.

    
       बुद्धाच्या रूपाने जगाचे वैचारिक क्षेत्र झाले बुद्धाच्या संपूर्ण तत्वज्ञानाला मानवतेची जोड आहे  सील बुद्धाचे नीतिशास्त्र आहे संमेक आजीविका बुद्धाचे अर्थशास्त्र आहे.
       बौद्ध धम्म जीवनातला प्रत्येक गोष्टी साठे गोष्टीसाठी प्रतिनिधित्व करतात मनाला विकसित करतात.
           बुद्ध धम्म मानवी मनाला जीवन जगण्यासाठी मार्गदाता बनते जीवनातील  सर्व वेदना भावना यांना प्रवाहित करते बुद्ध म्हणतात.        
          वेदना भावना संवेदना या मनाच्या सहचारिणी आहे तर मेंदू दृश्य स्वरूपाचे कार्य करते म्हणून मेंदू आणि मन यांना एकत्रित कार्य करण्याचे बळ हे बौद्ध तत्त्वज्ञान आपल्याला देते.               
       मानवाला मानव म्हणून जगण्याचे स्वतंत्र बुद्ध धम्माने दिले आणि आजही बुद्ध धम्म सर्व जगालातीच शिकवण देत आहे.
            आपला आयुष्य हे दुसऱ्याच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मन शांती मिळणार नाही आपल्याकडे आहे त्यामध्ये आनंदी राहा.
       
            बुध्दं सरणं गच्छामि
             धम्म सरणं गच्छामि
               संघ सरणं गच्छामि


     ✍️ सविता तुकाराम लोटे 


----------------------------------

 



    
   






मन शांत

-------मन शांत ------

मन शांत असेल 
असा क्षण नाही 
हृदयाला असेल ठाव 
आता ....

तो क्षण एखादी 
विचारांची शृंखला सतत 
शाश्वत ... अबोल 
उत्तरांच्या अपेक्षेने 

नवेपणाने सजलेले 
फुललेले पाकळीसारखे 
उमलत असलेले शब्द  
नयनातील शांत !!!

       सविता तुकाराम लोटे 



---------------------------------

रविवार, २३ मे, २०२१

सोबत



---------सोबत--------

                    ©️✍️सविता तुकाराम लोटे 



    -------------------------------





एकांत





----------एकांत--------

             ✍️©️सविता तुकाराम लोटे 





===========================

चिंब





------चिंब------

      ©️✍️सविता तुकाराम लोटे 



/////////////////////////////////////////////

हा वारा

       ----   हा वारा -------

हा वारा येते हळूच 
क्षणाक्षणाला सांगतो खूपच 
झाले आता झुरणे 

हा हळूच बोलतो कानात
सांगुन जातो गाल्याला 
स्पर्श करून संपले 
आता झुरणे ...अगणित

शांत क्षणाला येऊन- घेऊन 
अलगत भिरभिरता क्षणाला
ओलावा देऊन ... आनंदाचे थेंब 
अबोल शब्द ,
अगणित 

उत्तरामागे 
प्रश्नांचा वारा 
निरंतर अगणित
क्षणाक्षणाला!

         ©️✍️सविता तुकाराम लोटे 
----------------------------------

शनिवार, २२ मे, २०२१

एकांत


                 ✍️©️ सविता तुकाराम लोटे 
----------------------------------

चारोळी


         ✍️©️सविता तुकाराम लोटे 

----------------------------------

ढग





**********  ढग।  ***********

दाटून आलेले ढग माझ्यासमोर 
आकाशात आणि मनात सुद्धा 
जोरात वारा आला... गर्दी करून
मनात कोसळला अन ढगातून 

काळा मातीवर चिंब भिजून 
डोकावले मी परत 
भिजलेल्या माती रूपावर 
तर हळूवार येत असलेली 

हिरवळ मनाला बळ देऊन गेली 
थेंबाथेंबाने ओलेचिंब होऊन 
दाटुन आले परत आसमंत 
फुललेल्या सरीसोबत 

जोडीला पानांवर 
दवबिंदूचे रूप ठेवीत 
दाटून आलेले ढग 

माझ्यासमोर... 
आकाशात आणि मनात

     ©️ सविता तुकाराम लोटे ✍️
-----------------------//---------

          

मुक्तपणे

--------मुक्तपणे --------
             
               ©️ Savita TUkaram Lote

पंख फुटले कि झाले 
गगन भरारी घेण्यासाठी  
आपल्याच स्वप्नाला 
भरारी घेण्यासाठी 

उंच उंच जाताना 
पावले जमिनीवर ठेवावी 
असे वाटत होते पण 
पंख फुटले होते ना 
उंबरा ओलांडतान!!

मायेची सावली 
बंधने वाटली 
आकाश खुणावत 
होते ना स्वप्नांचे 
अहंकाराचे 
पंख फुटले होते ना 
संचार करण्यासाठी 

स्वातंत्र्याची... 
आपलीच परिभाषा 
मुक्तपणाचे आपलेच गणित 
संगीत बेसूर सुर 
पंख फुटले होते ना 

आपल्याही 
पायाला हाताला तोंडाला 
डोळ्यातील स्वप्नांना 
वेड लागले होते ना ....
स्वकर्तुत्वाच्या अहंकाराचे 
पंख फुटले होते ना 
मुक्तपणे
सावलीच्या छायेमध्ये!

     ✍️ सविता तुकाराम लोटे ©️

_---------------------------------

शुक्रवार, २१ मे, २०२१

सर


         ------सर -----
अवेळी आजही आला
झाडा पानांना भिजून गेला 
माझ्या मनाला भिजून गेला 
वाटत, जावे आता 
सोबतीला... 
पायात बळ आलेच 
नाही 
अंगावर सर झेलण्याचे 
कोसळणारा पाऊस 
कोसळत राहिला झाडांवर 
जमिनीवर आणि सोबत न भिजता 
कडेला नयनांच्या 
अबोल शब्दांच्या सोबतीला 
सप्तसुरांच्या सरीचा 
बेधुंद संगीतामध्ये!

   ✍️🏻 सविता तुकाराम लोटे 

  //////////////////////////////////

कुणीतरी असावं

कोणीतरी असावं आपलं ऐकणारा 
शब्दाला शब्द न देता हो ग 
हसतच हात हातात घेऊन 
बोलू का काही, ऐकणार... 
माझं 
म्हणून समजून सांगणार 
अधिकारवाणीने ...
कुणीतरी असावं आपल 
ऐकणार !!!

        ✍️ सविता तुकाराम लोटे 
-------------------------------
 

चारोळी

पाऊस

----पाऊस ----

यंदाचा पाऊस 
नको वाटतो 
आठवणीच्या बाजारात 
भिजणे 
नको वाटते 
ओल्या ऋतूचा 
सुगंधही 
नको वाटतो 
मनात रेंगाळत राहती 
ओला स्पर्श
अबोल 
क्षणांचा... 
नको वाटतो 

   सविता तुकाराम लोटे ✍️
----------------------------------

----ओघळणारा दवबिंदू ---

-------ओघळणारा दवबिंदू ---------

गुणा - गोविंदाने चालू आहे सर्व 
तुझे... पण माझे अजूनही 
घुटमळलेल्या क्षणात कैद  
त्यात हरवली माझी वाट 
आणि तुझी मिळालेले 

प्रत्येक क्षण माझा तुझा 
तुझा माझा आता वेगळा 
न राहिलेल्या अनामिक कल्पनेसारखा 
एकटा अनंत नसलेल्या रेषेप्रमाणे 
दोन बिंदू एकत्र येतात 

एका रेषेने पण 
हरवले आहे सर्व आता 
असलेला अनामिक आठवणींमध्ये 
तुझ्या; 

क्षणाचाही हिशोब शून्यात 
विरहात दाटलेल्या💔 मनाच्या 
कोपऱ्यात रुसलेल्या स्वप्नात 
ओघळणारा दवबिंदूत

     ✍️  सविता तुकाराम लोटे --

----------------------------------

देहबोली

        देहबोली 

काही शब्द आपले असतात 
काही अर्थ त्याचे असतात 
दोघांच्याही भाषेला, एक 
वलय असते 
आप - आपल्या प्रेमाची 
प्रेमात असेच होत राहते 
कधी शब्द तर कधी भावना 
कमी पडतात दोघांना 
बोलून जाते फक्त 
..........देहबोली!

       ---  सविता तुकाराम लोटे ---

--------------------------------------------------------------------

-----यात्रा-----

-------यात्रा-------

दुःखाच्या आकाशात धावून धावून 
थकलेल्या जीवा... 
थोडा मागे पहा 

सापडेल वाट सुखाच्या धावपट्टीची  
गगन भरारी घेण्यासाठी 
फक्त चालत राहा 

सहनशीलतेच्या कसोटीवर 
वेगवान होऊन कधीकधी 
शांत संयमाने भरारी घे! 

आत्मविश्वासाने तोल सांभाळत 
पाय असू दे जमिनीवर 
कमळासारखे चिखलात राहूनही 

बोलके हो मनसोक्त 
उडण्यासाठी सुखाच्या पायरीवर 
जीवन प्रवासाच्या यात्रेत!!

        सविता तुकाराम लोटे 
----------------------------------

सौंदर्य

सौंदर्याची कौतुक 
करता करता कळलेच 
नाही, शब्दात चंद्र चांदण्याची 
उपमा आली कधी 

नयनातील अश्रू तुझ्या 
कोणत्याही उपमा शिवाय 
हृदयाला घाव करीत राहिले 
एकत्र गुंफीत राहिले 

सौंदर्याच्या या भाषेला निरर्थक 
घायाळ होऊन!!!

  //////// सविता तुकाराम लोटे /////

----------------------------------

गुरुवार, २० मे, २०२१

❤❤❤❤--प्रेम --❤❤❤❤

❤❤❤❤---प्रेम---❤❤❤❤❤

प्रेम 
अबोल भाषा 
प्रेम 
❤❤माझे तुझे शब्द 
प्रेम 
हसणे 
प्रेम 
सौंदर्य मनाचे 
प्रेम 
कल्पनेच्या वेळेचे भान ❤❤
प्रेम 
जरा वाहता 
प्रेम 
चिंब भिजणे 
प्रेम 
जाणीव सोबतीची 
प्रेम 
❤गुंफण जीवनाची 
प्रेम 
विनाकारण हसू 
प्रेम 
चोरटी नजर हदयाची ❤
प्रेम 
खुलते आरसा 
मनातील भावविश्वाचा 
प्रेम 
सुंदर स्तब्ध जाणिवेचे 
प्रेम 
विसरून जाण्याचा... 
स्वतःलाच 
प्रेम 
❤खळखळ हसण्याचे 
प्रेम 
गालावरी लालीच्या 
हसरा खळीचे 
प्रेम 
बोलक्या नयनाचे 
प्रेम 
निरोप आपलाच
आपल्याला ❤
तुझ्या सोबतीने 
प्रेम 
उगाचच अबोल 
होण्याचे 
प्रेम ❤❤❤
कवितेला शब्द देण्याचे 
नजर भरून शब्द 
शोधण्याचे मनातील 
तळाशी मुके होण्याचे 
प्रेम ❤
विरहाचे 
प्रेम 
आपुलकीच्या नात्यांची 
प्रेम 
समर्पणाच्या भाषेचे 
❤❤❤❤प्रेम प्रेम प्रेम 
    
          --- सविता तुकाराम लोटे ---

/////////////////////////////////////////////

फरक फक्त इतकाच

मला माहित आहे 
तुला माहित आहे 
माझ्या पायाखाली जमीन आहे 
तुझ्या पायाखालीही जमीन आहे 

माझ्या डोक्यावर आकाश आहे 
तुझ्या डोक्यावर ही आकाश आहे 
पण ! तुला हे माहित आहे का? 

अनिष्ट रूढी परंपरेच्या नावावर 
बांधलेले  मडके, खराटे...
ओंजळभर स्वच्छ 
पाण्यासाठी.....झालेला सत्याग्रह 

मला माहित आहे 
तुला माहित आहे 
माझ्या तुझ्या पायाखाली जमीन आहे 
डोक्यावर आकाश आहे 

पण तुला माहित नाही 
माझ्या पायाखाली जमीन ...आकाश 
यासाठी कितीतरी 
पिढ्या गुलामगिरीची.... 
हुकूमशहा प्रवृत्तीची ठरली आहे 
बळी.... 

मला माहित आहे 
तुलाही माहित आहे 
तुझ्या माझ्या पायाखाली 
एकच जमीन आहे 
फरक फक्त इतकाच 

माझा तुझ्यातला
.....त्यासाठी करावा लागला नाही 
तुला,  कधीही संघर्ष!!!
      

          सविता तुकाराम लोटे 
----------------------------------
         

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...