savitalote2021@bolgger.com

शुक्रवार, ११ जून, २०२१

शेवटचा किनाराही तूच **❤**

    **शेवटचा किनाराही तूच **❤**

विरहाच्या शेवटचा किनाराही तूच 
गालावरी खळीच्या हसूचे 
शेवटचे ❤❤हसूही तूच 
कोंदण सुखाचे हळूचं हृदयाचा 
आतल्या आत तूच 
उरलेल्या विरहाचे वादळ तूच 
आठवांच्या सावल्यांच्या हसूचे 
नाव तूच....❤
माझा पापण्यात ओलावा तूच 
व्याकुळतेने भावनेला वावर तूच 
नयनात साठविलेले 💔आसवे तूच  
जीवनाचा श्वासही तूच 
पूर्णत्वाच्या परीकल्पनेचा भास अजूनही तूच अंधाराने ग्रासलेला 💔💔घायाळ नजर तूच 
आनंदाच्या शेवटचा किनाराही तूच ❤❤
विरहाचा शेवटचा किनारही तूच!!!

           ©️✍️🏻सविता तुकाराम लोटे 

✍️©️savita Tukaram Lote
----------------------------------

गुरुवार, १० जून, २०२१

** पाऊस सुगंधा धारेवर **

***** पाऊस सुगंधा धारेवर ****

मातीचा सुगंध 
घेऊन आला 
चिंब भिजवाया  
मनाला !

स्पर्श होतास 
शहारे मनाला  
नजर अजूनही 
तुझ्या रूपावर रंगावर 

निशब्द झाले 
भांबावलेले शब्द सारे 
लाटेवर हलकासा स्पर्शाने 
झेलावे वाटते 

परत ...अंगावरी 
ओलाचिंब शिथिल
भावना  करुन... चिंब 
मनसोक्त उजेडात 

मातीचा सुगंध  
दरवळे चोहीकडे 
उजेड लाटेवरती 
मनातील सुगंध धारेवर 

      ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे




****×*****×*****×*****×*****×*****×

*** त्यानंतरचा,मधला प्रवास ***




       *** त्यानंतरचा,मधला प्रवास***


आयुष्यातील सुंदर क्षणापासून 
चालू झालेला प्रवास 
आयुष्याच्या अंतिम प्रवासापर्यंत;
मधला प्रवास सुखाचा 
त्यानंतरचा प्रवास यशाचा 
परत मधला प्रवास 
र्सौदर्याचा ऐश्वर्याचा, त्यानंतरचा 
प्रवास सुख-दुःखाच्या वाटाघाटीच्या 
त्यानंतरचा प्रवास शांत संयमाने 
चालण्याचा ...परत मधला प्रवास 
देऊन जाण्याचा !!
आयुष्य चक्र संपले की 
अंतिम प्रवास...
आठवणींचा फुलांचा!!!

    ©️✍️🏻 सविता तुकाराम लोटे 

    ©️✍️🏻Savita Tukaram Lote
------------------@@@@----------

Marathi Charolya poem in सकारात्मक चारोळी

Marathi  Charolya poem in सकारात्मक चारोळी 

माझे दोन मित्र 
पुस्तक....
.....ग्रीन टी



        ✍️🏻©️ सविता तुकाराम लोटे 

*************××××******************


Marathi Charolya poem in सकारात्मक चारोळी

Marathi  Charolya poem in सकारात्मक चारोळी 


        ©️✍️🏻 सविता तुकाराम लोटे 

---------------------------------

Marathi Charolya poem

Marathi  Charolya poem 

माझ पहिल
...प्रेम 
शेवटच 
प्रेम....




           ✍️🏻©️ Savita Tukaram Lote

*************************************

Marathi kavita /Charolya poem

Marathi  kavita /Charolya poem 

         ©️✍️🏻Savita Tukaram Lote


शब्दांची गुंफण आणि 
    मनातील भाव 
       याच वाटेवर 
         चालतात 
              blog

      ©️✍️ सविता तुकाराम लोटे 

*************************************

Marathi kavita /Charolya



   *****चारोळी Marathi  kavita /Charolya ******

यश अपयशाचे गुरुकिल्ली 
जगण्याची भाषा 
शिकविणारी गुरुकिल्ली 
आणि सर्व काही बंदही 
करणारी गुरुकिल्ली



               ©️✍️ सविता तुकाराम लोटे 

✍️©️savita tukaram lote

×*******×******×*******×********×**

Marathi kavita /Charolya poem

चारोळी 



          ✍️©️सविता तुकाराम लोटे 


---------------------------------

बुधवार, ९ जून, २०२१

सुगरण खोपा कविता निसर्गावरिल कविता/चारोळी ***


**** निसर्गावरिल कविता/चारोळी ***

     " Marathi  kavita /Charolya poem in Nature"

          निसर्ग जीवसृष्टी अनेक पक्षी त्यांच्या प्रजाती त्यांचे दैनंदिन जीवन वेगवेगळे असते. पक्ष्यांचे रंग, घरटे बनविण्याच्या पद्धती, विविध आहे. 

        सुगरण खोपा घरटे नवीन तंत्रज्ञानाला लाजवेल असे तंत्रज्ञान मला तुझी काळजी आकर्षक पद्धतीने घरटे तयार करतात.

          पक्ष्यांमध्ये सुगरण पक्षी त्यांच्या घरटे बनवण्याच्या पद्धती मुळे आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे.  त्यावर सुचलेल्या ह्या काही चारोळी /कविता आहे.

        सुगरणला बाया, विणकर, गवळण असेही म्हटले जाते. घरटे बनवण्यासाठी वेगवेगळे साहित्य वापरले जाते आणि सोबत खूप सारे स्वप्नही विणले जातात.

         सुगरण पक्षी आपल्या कलाकुसरीने घरटे बनवून संसार थाटतो.

         एक स्वप्न पूर्ण झाले की काही सुगरण गवळण परत दुसरा खोपा तयार करतात आणि परत प्रेमात पडतात.

         सुगरणला बाया, विणकर, गवळण असेही म्हटले जाते. घरटे बनवण्यासाठी वेगवेगळे साहित्य वापरले जाते आणि सोबत खूप सारे स्वप्नही विणले जातात त्यावरील कविता .

          सुगरण पक्षी आपल्या कलाकुसरीने घरटे बनवितो त्यावेळी निसर्ग आपले रूप बदलले  असते आणि सुगरण पक्षी आपल्या स्वप्नांना पूर्णत्व देण्यासाठी धडपड करीत असतो.

              (1)

निसर्ग सृष्टीचे रंग उधाळण 
पालवी नवे विणे सुगरण खोपा !!

खालून निमूळता जसा लांबबोगदा 
प्रेमळ स्वप्नाचे लटकलेला संसार !!


                   (2)

********  खोपा व्यभिचाराचा
*******


निमुळता घरट्याला प्रवेशद्वार 
काही क्षणात हर्ष सुखाचा 
निसर्ग पाऊलखुणा नवनिर्मितीची 
सोहळा चालू आनंदाचा 
खोप्यात....
पण गुलाम न राही 
काही गवळण... 
संसार अर्धवट सोडून 
नवे खोपे विणे फांदीवर 
मानवी प्रवृत्तीचे दर्शन घडे 
प्रेमात ..प्रेम व्यभिचाराचे 
खुलत राही पुरुषार्थ 
अहंकाराचा...
नवीन फांदीवर 
संसारा अर्धवट सोडलेला !!!! 

             (3)

*****  विणकर विणे ******

विणकर विणे खोपा फांदीवर 
नव अलंकार आकृती सोबत 
गवत कापूस केस असती 
                    गिलाव्यासोबत...  
स्वप्नांचामळा गोलाकार 
घरट्याला !!!
जुळवी नवस्वप्नांचा 
अलंकार 
सोबत विणे रंगांची 
उधळणं ...
गळा व पोटावर पिवळा 
विणकर विणे खोपा फांदीवर !!!!!

                   (4)

"Marathi Charolya poem in Nature"
     
खोपा विणे गोलाकार सोबत गिलावा 
मातीचा मुलायम कापसासोबत 

अंडी देई सुगरण मातृत्वाचे दान
मिळे नवीन संसार खोप्या फांदीवरती

                   (5)

     सुगरण खोपा कलाकुसरीतील 
     ठेवनिचा जसा नवीन तंत्रज्ञानाचा 

     मोजमापेतील फांदीवर झुलतो  
     विण गुंफीत आपल्याच धुंदीत



    ©️✍️सविता तुकाराम लोटे 

                ©️✍️savita Tukaram Lote


---------------------------------- 

*** खोपा व्यभिचाराचा ***


निसर्गावरिल कविता  

            Marathi kavita poem in Nature"

          निसर्ग जीवसृष्टी अनेक पक्षी त्यांच्या प्रजाती त्यांचे दैनंदिन जीवन वेगवेगळे असते. पक्ष्यांचे रंग, घरटे बनविण्याच्या पद्धती, विविध आहे. 

          पक्ष्यांमध्ये सुगरण पक्षी त्यांच्या घरटे बनवण्याच्या पद्धती मुळे आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे.  त्यावर सुचलेल्या ह्या काही चारोळी आहे.

        सुगरणला बाया, विणकर, गवळण असेही म्हटले जाते. घरटे बनवण्यासाठी वेगवेगळे साहित्य वापरले जाते आणि सोबत खूप सारे स्वप्नही विणले जातात.

         एक स्वप्न पूर्ण झाले की काही सुगरण गवळण परत दुसरा खोपा तयार करतात आणि परत प्रेमात पडतात त्यावर सुचलेली ही कविता.




********  खोपा व्यभिचाराचा
*******

निमुळता घरट्याला प्रवेशद्वार 
काही क्षणात हर्ष सुखाचा 
निसर्ग पाऊलखुणा नवनिर्मितीची 
सोहळा चालू आनंदाचा 
खोप्यात....
पण गुलाम न राही 
काही गवळण... 
संसार अर्धवट सोडून 
नवे खोपे विणे फांदीवर 
मानवी प्रवृत्तीचे दर्शन घडे 
प्रेमात ..प्रेम व्यभिचाराचे 
खुलत राही पुरुषार्थ 
अहंकाराचा...
नवीन फांदीवर 
संसारा अर्धवट सोडलेला !!!! 


©️✍️🏻सविता तुकाराम लोटे ×*****


        ©️✍️savita Tukaram Lote
----------------------------------

मंगळवार, ८ जून, २०२१

लटकलेला संसार

निसर्गावरिल चारोळी  

            Marathi Charolya poem in Nature"

          निसर्ग जीवसृष्टी अनेक पक्षी त्यांच्या प्रजाती त्यांचे दैनंदिन जीवन वेगवेगळे असते. पक्ष्यांचे रंग, घरटे बनविण्याच्या पद्धती, विविध आहे. 

          पक्ष्यांमध्ये सुगरण पक्षी त्यांच्या घरटे बनवण्याच्या पद्धती मुळे आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे.  त्यावर सुचलेल्या ह्या काही चारोळी आहे.

        सुगरण पक्षी आपल्या कलाकुसरीने घरटे बनवितो त्यावेळी निसर्ग आपले रूप बदलले  असते आणि सुगरण पक्षी आपल्या स्वप्नांना पूर्णत्व देण्यासाठी धडपड करीत असतो... त्यावरील चारोळी.



निसर्ग सृष्टीचे रंग उधाळण 
पालवी नवे विणे सुगरण खोपा !!

खालून निमूळता जसा लांबबोगदा 
प्रेमळ स्वप्नाचे लटकलेला संसार !!


    ©️✍️🏻सविता तुकाराम लोटे 





***✍️🏻©️ Savita Tukaram Lote***


++++++++--------------++++++++

विणकर विणे

निसर्गावरिल कविता  

            Marathi kavita poem in Nature"

          निसर्ग जीवसृष्टी अनेक पक्षी त्यांच्या प्रजाती त्यांचे दैनंदिन जीवन वेगवेगळे असते. पक्ष्यांचे रंग, घरटे बनविण्याच्या पद्धती, विविध आहे. 

          पक्ष्यांमध्ये सुगरण पक्षी त्यांच्या घरटे बनवण्याच्या पद्धती मुळे आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे.  त्यावर सुचलेल्या ह्या काही चारोळी आहे.

        सुगरणला बाया, विणकर, गवळण असेही म्हटले जाते. घरटे बनवण्यासाठी वेगवेगळे साहित्य वापरले जाते आणि सोबत खूप सारे स्वप्नही विणले जातात त्यावरील कविता .



*****  विणकर विणे ******

विणकर विणे खोपा फांदीवर 
नव अलंकार आकृती सोबत 
गवत कापूस केस असती 
                    गिलाव्यासोबत...  
स्वप्नांचामळा गोलाकार 
घरट्याला !!!
जुळवी नवस्वप्नांचा 
अलंकार 
सोबत विणे रंगांची 
उधळणं ...
गळा व पोटावर पिवळा 
विणकर विणे खोपा फांदीवर !!!!!


          ***  ©️✍️🏻 सविता तुकाराम लोटे ***



*****✍️🏻©️Savita Tukaram  Lote ****

----------------------------------

*** दान ***सुगरण खोपा

××*******************************××


निसर्गावरिल चारोळी  

            Marathi Charolya poem in Nature"

          निसर्ग जीवसृष्टी अनेक पक्षी त्यांच्या प्रजाती त्यांचे दैनंदिन जीवन वेगवेगळे असते. पक्ष्यांचे रंग, घरटे बनविण्याच्या पद्धती, विविध आहे. 

          पक्ष्यांमध्ये सुगरण पक्षी त्यांच्या घरटे बनवण्याच्या पद्धती मुळे आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे.  त्यावर सुचलेल्या ह्या काही चारोळी आहे.

        सुगरण पक्षी आपल्या कलाकुसरीने घरटे बनवून संसार थाटतो त्यावरील चारोळी.


"Marathi Charolya poem in Nature"
      
×*×**×*******×*****×*****×*****×*×

खोपा विणे गोलाकार सोबत गिलावा 
मातीचा मुलायम कापसासोबत 

अंडी देई सुगरण मातृत्वाचे दान
मिळे नवीन संसार खोप्या फांदीवरती


  

                    ✍️©️सविता तुकाराम लोटे 

✍️🏻©️savita tukaram lote

----------------------------------



सुगरण खोपा चारोळी

" निसर्गावरिल चारोळी  
            Marathi Charolya poem in Nature"

          निसर्ग जीवसृष्टी अनेक पक्षी त्यांच्या प्रजाती त्यांचे दैनंदिन जीवन वेगवेगळे असते. पक्ष्यांचे रंग, घरटे बनविण्याच्या पद्धती, विविध आहे.
       पक्ष्यांमध्ये सुगरण पक्षी त्यांच्या घरटे बनवण्याच्या पद्धती मुळे आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे.  त्यावर सुचलेल्या ह्या काही चारोळी आहे.




     सुगरण खोपा कलाकुसरीतील 
     ठेवनिचा जसा नवीन तंत्रज्ञानाचा 

     मोजमापेतील फांदीवर झुलतो  
     विण गुंफीत आपल्याच धुंदीत

    ©️✍️सविता तुकाराम लोटे 

*******@@@@@@@*************

***** मैत्री ******

--------------------------------------------------------------------

***  Happy friendship Day Poems in Marathi ... जागतिक मित्र दिवस ***



**************  मैत्री  *************

कुठलाही स्वार्थशिवाय निर्माण झालेले 
नवीन नाते... मैत्री! 

सूर्याचा प्रकाश ऊन -सावलीच्या खेळात 
फुललेले नव्याने जीवन... मैत्री !!

न सांगता न बोलता अवघड सत्य 
सहज सांगणे... मैत्री !!!

विश्वासाच्या नात्याला जवळीक मनाची 
हरवलेल्या वाटेवर पायवाट... मैत्री !!!!

मायेचा हात सत्याची जाणीव करून देणारी  अलगद मनमोकळी जीवनजागा... मैत्री 
                  .....................मैत्री मैत्री!!

      *** ✍️©️ सविता तुकाराम लोटे ***


     **  ✍️©️savita tukaram lote** 


---------------------------------
----------------------------------

रविवार, ६ जून, २०२१

******प्रयत्न ****












      ***********प्रयत्न*********

          ✍️©️सविता तुकाराम लोटे 



     ©️✍️🏻 savita Tukaram Lote

**********@@@@@@@@************

******पानगळ होईल****

*****पानगळ होईल****

    दुःखामध्ये स्वतःला हरवून न जाता दुःखाचे पानगळ होईल सुखासाठी या आशयाची ही कविता,'पानगळ होईल'...


   ©️✍️🏻सविता तुकाराम लोटे 



     ©️✍️savita Tukaram Lote

-------------@@@@@@-----------




शनिवार, ५ जून, २०२१

वेदनेचा बांधा

@@@@@@वेदनेचा बांधा...@@@@@@

वेदनेचा बांधा फुटताना 
असं कधी कधी होतं 
मनातील चुका आपल्या 
वाटतच नाही !

कमी पडतात शब्द 
कमी पडतात अक्षरे 
कमी पडतात सर्वच भावना 
वेदनेचा व्यथा मांडताना ....

ओंजळीत बांधू ठेवते 
सुटतच जाते शब्दविना 
घुसमटत घोटात वेदनेच्या 
ओझे मनावर ठेवत !!

विनाकारण झाले दुःखांचे 
ओझे चुका नसताना 
सुखाची वाट गेली राहूनच 
वेदनेचा बांधा फुटताना!!!


****✍️©️ सविता तुकाराम लोटे ****




-----✍️🏻©️Savita Tukaram Lote -----


*************************************

शुक्रवार, ४ जून, २०२१

जंगलात

........World Environment Day......

"जागतिक पर्यावरण दिनाच्या हरित शुभेच्छा"    

      माणसाने झाडे तोडली त्या जागेवर आपली वस्ती तयार केली पण जंगलातील प्राणी स्वतःच्या हक्काच्या जागेपासून वंचित राहिले त्या प्राण्यांचे मनोगत या कवितेत व्यक्त करण्याचा हा प्रयत्न
केलेले आहे....

           *** जंगलात ***** 

तोडली जंगले 
झाली ओसाड 
माणसांच्या गर्दीत 
आले वनजीव

झाली शिकार 
कोंबड्या कुत्र्यांची मांजरांची 
माणसांची सोबत 
विचारांची 

सिमेंटच्या जंगलात  
वावर आता 
भक्षक आणि माणसांच्या 
हातात हात न घेता 
आपल्या जीवाचा प्राण ज्योतीचा!! 

सांगे आम्हा   
आम्ही असेच राहतो 
हातात हात घेऊन 
जंगलात...

आम्हाचा हक्काच्या जागेवर 
लचके तोडली जातात 
आम्हांचीही बंदुकीच्या जोरावर 
दडलेले जीव आम्ही 
निसर्ग माझा सखा  

पण तुम्ही तोडली 
निसर्गसंपत्ती आम्ही 
तोडू तुम्हाची प्राणज्योत 

आम्हाचा प्राणज्योतीसाठी 
असे नाही ...
आम्ही पोटभरू 
जाऊ आम्हाचा वस्तीत 
ओसाड...
तोडलेल्या जंगलात !!!!

✍️©️सविता तुकाराम लोटे 
        
*** ©️✍️🏻Savita Tukaram Lote***
 


***********@@@@@@@@@************

World Environment Day.......

----------------------------------

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...