savitalote2021@bolgger.com
सोमवार, २० नोव्हेंबर, २०२३
** निसर्गचक्र हे अविरत निरंतर फिरत राहते ****
****निसर्गचक्र हे अविरत निरंतर फिरत राहते ****
**** निसर्गचक्र हे अविरत निरंतर फिरत राहते ****✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
विचार खूप येतात. शब्द खूप येतात पण त्या शब्दांना योग्य विचारसरणीत मांडता येत नाही त्यावेळी शब्दांची मर्यादा कळते म्हणून थोर मोठे सांगून गेले, शब्दांना जपून वापरा. शब्दांना आपलेसे करा. जिंकणे आणि हारणे यासारखा कोणताच खेळ नाही कारण जिंकणे म्हणजे समाधान असेल तर समाधान कोणत्या गोष्टीचे आहे हे ही मनाला शब्दात सांगावे लागते.
हरणे म्हणजेच मनाला दुःख निर्माण करणे. दुःख होणे असे असेल तर तेही शब्दाने सांगावे लागते. एखाद्या गोष्टीला आपण कोणत्या बाजूने बघतो, खरंतर हेच महत्त्वाचे आहे. कोणताही व्यक्ती परिपूर्ण नसतो. निसर्ग तितका सोडल तर परिपूर्ण या जगात काहीच नाही म्हणून जिंकण्यासाठी आयुष्य जगू नका.
दुसऱ्याला हरवण्यासाठी आयुष्य जगू नका. आयुष्य हे त्या वर्तुळासारखा आहे. ते वर्तुळ 48 तास फक्त फिरत असते. आयुष्याची किंमत करा. माणूस जगताना मला मला मला मला इतरांना काय हा प्रश्न जर स्वतःला विचाराल तर इतरांमध्ये तुम्ही सुद्धा मोडता हे विसरू नका.
ज्या निसर्गाने तुम्हाला जीवनदान दिले आहे त्याच निसर्गाने इतरांना सुद्धा जीवनदान दिले आहे म्हणून आयुष्यात त्या गोष्टींना मागे सोडा जिथे अहंकार सर्वोच्च सीमा गाठते. आयुष्यात त्या गोष्टीला मागे सोडा, तिथे माणूस म्हणून जगू शकत नाही.
माणसाला माणूस म्हणून जगण्याचे सर्व अधिकार त्या निसर्गाने प्रत्येक सजीवाला दिलेले आहे म्हणून निसर्गचक्र हे क्रमानुसार चालते. निसर्गचक्र त्याच्या गतीनुसार चालते. निसर्गचक्र हा स्वयंभू आत्मनिर्भय आत्म अनुशासन आणि सत्वाला जाणारा असतो.
सत्य असत्य या परिक्रमामध्ये फिरण्यापेक्षा माणूस म्हणून जगण्याच्या परिक्रमे मध्ये स्वतःला फिरवत ठेवा. ज्यावेळी तुम्ही माणूस म्हणून जगता त्यावेळेस तुम्हाला समोरचा व्यक्ती माणुस दिसतो. म्हणून स्वतःला घडवितांना त्या गोष्टी आपल्यापासून दूर ठेवा, ज्या गोष्टीमुळे स्वतः आणि इतरांचे नुकसान होईल.
काल एक टोपली पाहिली त्या टोपलीत काहीच नव्हते ती टोपली होती विचारांची, ती टोपली होती शून्याची, ती टोपली होती महत्त्वकांक्षाची, ती टोपली होती अहंकाराची, ती टोपली होती रागीटपणाची,ती टोपली होती 'मी पणाची,' त्या टोपलीत काहीच शिल्लक राहत नाही. हे एक सत्य कळले ;कारण ती टोपली प्रत्येक जण स्वतः तयार करीत असतो म्हणून त्या टोपलीत काय ठेवायचे हे स्वतःलाच ठरवावे लागते.
ती टोपली खाली दिसली म्हणून नेहमी वाटते, आपल्याला चांगल माणूस बनावे लागेल. या जगाच्या त्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला चांगले माणूस बनावे लागेल. कारण तो क्षण आयुष्यात आल्यानंतर आपल्याला ती टोपली सुद्धा इथेच ठेवून जायचे आहे. जर ती टोपली आनंदाची समाधानाची संघर्षातून शिखर उभे करण्याची हसऱ्या चेहऱ्याची,हसऱ्या शब्दांची, हसऱ्या शब्दांची, हसऱ्या गाण्याची,असेल तर ती टोपली आठवणी कुणाच्या ना कुणाच्या राहीलच.
म्हणून आयुष्य समाधानाने जगा...!! कारण समाधानाची व्याख्या संकल्पना आपली स्वतः स्वतःची असते. निसर्गचक्र हे अविरत निरंतर फिरत राहते.
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०२३
**मुखवटा **
बुधवार, १५ नोव्हेंबर, २०२३
आता वाटेला यावे लागते..
शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०२३
*****जगणे राहून गेले*****Cease to Live ***
बुधवार, ८ नोव्हेंबर, २०२३
***दिवाळी प्रकाशज्योत अंधाराची **** Diwali Light of Darkness ***
बुधवार, १ नोव्हेंबर, २०२३
जीव माझाच #life is mine
शनिवार, २८ ऑक्टोबर, २०२३
मी फिदा होते
शनिवार, २१ ऑक्टोबर, २०२३
संध्याकाळची सावळबाधा
मंगळवार, १७ ऑक्टोबर, २०२३
**** गुलाबांच्या पाकळ्या ****
शनिवार, १४ ऑक्टोबर, २०२३
..... माझ्या भिमाईने ....
..... माझ्या भिमाईने ....
पहाटेच्या सूर्यप्रकाशाने
पावन झाली नागपूर दीक्षाभूमी
जनसागराने घेतली
वर्षानुवर्ष गुलामगिरीतून
मुक्त सूर्यप्रकाशाचा आस्वाद
14 ऑक्टोंबर या तारखेला
ऊर्जा स्त्रोत धर्मांतराचा
भिमाई माझी झाली
माझ्या मुक्तीची विश्वगाथा
पहाटेच्या सूर्यप्रकाशाच्या
साक्षीने नवी इतिहास
घडविला भारत भूमीच्या
पावन धरतीवर
गुलामाला गुलामीची जाण करून
मुक्त केले
माझ्या भिमाने
माझ्या बाबासाहेबांनी
क्रांतीची सावली झाले
विटाळलेल्या सावलीला
मुक्त केले घृणास्पद
जगण्याला धम्मचक्र दिले
रात्र रात्र जागून
माझ्या भिमाईने
माझ्या भिमाईने...!!❤
गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०२३
माहीत असते तरी💔***
**** चालते ****
मंगळवार, १५ ऑगस्ट, २०२३
***** शिकवायचे ***
शुक्रवार, २८ जुलै, २०२३
..गढूळ....
माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)
*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने अश्रूचे सोने झाले देहाचे मंदिर झाले सुकलेल्या शरीर...
-
थेंब विद्रोहाचा (काव्यसंग्रह) " संपला आहे माझ्यातला" Drops of Rebellion (Anthology) "I'm done" थेंब...
-
उजेडातील प्रकाश (काव्यसंग्रह) "एक विचारधारा समानतेची" Light in the Light (Anthology) "An Ideology of Equality"...
-
दीक्षा (काव्यसंग्रह) "एक आरंभ नव युगाचा" Deeksha " A beginning of the New Age" काव्यसंग्रह शीर्षक :- द...