savitalote2021@bolgger.com

शुक्रवार, २५ जून, २०२१

* बेडी *


             रूढी प्रथा परंपरा यांच्या नावावर अजूनही स्त्रियांना त्याच मनुवादी संस्कृतीकडे नेण्याचा प्रयत्न केला जातो पण आजची स्त्री त्या संस्कृतीतील काही चांगले विचार प्रथा आपल्यामध्ये आत्मसात करून विकास गणितामध्ये आपले योगदान देत आहे त्यावर सुचलेली ही कविता. कविता स्वलिखित आहे.


***  बेडी  ***

पायातील बेडी 
आज नको 
पायात बळ आहे 
आत्मविश्वासाचा... 
कारण मी सबला 
आहे 
आजच्या प्रगतीची 
दाहीदिशा ...
खुला असलेल्या 
संस्कृतीची ...
परंपरा अजूनही 
जपता आहे... योग्य 
संस्कृतीची रूढी प्रथेची 
स्त्रीत्वाची !
मी अर्धांगिनी आहे 
प्रगतीच्या प्रत्येक 
विकासगणिताची 
मी सबला आहे 
विचारांची... 
संस्कृतीची ...
प्रगतीचे खुल्या स्वप्नांची 

            ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे


 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-   * बेडी  *
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you


*************************************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मासिक बाई पण

*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात  आधार फक्त वेदनेचाच असतो  पूर्णत्वाच्या विचाराने  बाईपण जगत असते  वेदनेचा काय घेऊन बसले  मासिक धर्म...