savitalote2021@bolgger.com

शुक्रवार, २५ जून, २०२१

* स्वप्नांची माळ पावले *


*** स्वप्नांची माळ पावले *** 

माझ्या पावलागणिक एक सत्यच 
आकार घेत आहे माझ्या अस्तित्वाचे 

मी चालणार आहे तुफानी लाटेवर 
वारांच्या सोबत वेदनेच्या गावा बरोबर 

पायाखाली वाळू स्वप्नांना बळ 
देत सांगत आहे... चल पुढे बाळा
 
मागे फक्त पाऊलखुणा उरणारच 
आकृती सोबत त्याही आपल्याच
 
शांत  चल...ध्येयाला पूर्ण करण्यासाठी सावलीसोबत लाटेच्या शांत किनाऱ्यासाठी

एकटीचा प्रवास एकटीचा असतो 
सुखदुःखाच्या सत्य फेऱ्यात 

आपला महत्वाकांक्षेला कवेत घेण्यासाठी 
टाक एक एक पावले सोबत पूर्ण होण्यासाठी
 
स्वप्नाची माळ पावलागणिक

               ©️✍️🏻सविता तुकाराम लोटे

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  स्वप्नांची माळ पावले 🌹
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you


***************🌹🌹🌹🌹***********

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मासिक बाई पण

*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात  आधार फक्त वेदनेचाच असतो  पूर्णत्वाच्या विचाराने  बाईपण जगत असते  वेदनेचा काय घेऊन बसले  मासिक धर्म...