कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, त्या दुरुस्त केला जातील. त्यावर संशोधन केल्या जाईल. धन्यवाद......!!
***** बापमाणूस *****
नावातच सर्व काही आले
असे वाटते,
माझ्या बापाने आधी माणूस बसविले
कष्टाच्या जोरावर
जगण्याच्या महामंत्र दिला
गोरगरिबांच्या झोपडीला उजेडात
आणले ज्ञानाच्या मशाली
झोपडी झोपडी मध्ये पेटविला
जळलेल्या अंतकरणाला
जय - भीमचा नारा दिला
वळविले सर्व आयुष्य दीक्षाभूमीकडे स्वाभिमानासाठी झोपडीत
नवीन सूर्यप्रकाश दिसावा म्हणून
मानवतेच्या निर्मितीसाठी
तो माझ्या बाबाचा आणि माझ्या आज्याचाही बावाचा(वडील) बाप झाला म्हणून....!
मी माणसात आहे
बांधलेल्या सर्व भिंती तोडीत
न्याय हक्कासाठी लोकशाहीसाठी
उन्हाच्या चटक्यामध्ये श्रावणाची हिरवळ
......माझा बाप आहे
शब्द लिहिता येत नाही बाबासाहेब
हीच ती व्यक्ती ज्याच्यासाठी
उभेशब्द काव्य फुले कमी पडतात
रंजल्या गांजल्यांचा बाप होणे
सोपे नाही
आपल्या स्वतःच्या रक्ताची मुले
गेली तरी बाप माणूस थांबला नाही
आम्हा जगविण्यासाठी
नवा सूर्योदय करण्यासाठी
दीक्षा एक आरंभ नवयुगाच्या
नव उगवत्या भास्कराचा
शतकानुशतके अंधारातील स्वातंत्र्याचा
नवा आरंभ जगण्याचा
माझ्या बापाने पिंजऱ्यातून मुक्त केले
तो माझा बाप होता
ज्ञानाच्या मशालीत.....
मनात मेंदू आणि हातात देऊन
झोपडी - झोपडीत नवा आरंभ
निर्माण केला
नवा सूर्योदय विझू नये म्हणून
तो बाप माणूस होता...!!💕
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
--------------------------------------------------------------------------
This is the story of a father who came into our life as a God-man called Father and made the man in man a man. This is a small attempt to put poetry into words.
The poem is handwritten and composed. Don't forget to like and share if you like. Be sure to report any mistakes in the comment box, they will be corrected. It will be researched. Thank you......!!
***** BAP MANUS *****
Everything came in the name itself
it seems,
My father seated the man first
By hard work
Gave Mahamantra to live
In the hut of the poor
Brought torches of knowledge
The hut was set alight in the hut
To a burnt heart
Chanted Jai-Bhima
Turned all his life to Dikshabhumi hut for self-respect
For new sunshine to appear
For the creation of humanity
Because he became the father of my father and my grandmother too....!
I am in man
Break down all the walls that have been built
For democracy for justice
Greenery of Shravan in hot summer
......my father is
Words cannot be written, Babasaheb
This is the person for whom
The flowers of vertical poetry fall short
Being the father of Ranjlya Ganjalya
not easy
Children of our own blood
Even though the father was gone, the man did not stop
To keep us alive
To make a new sunrise
Initiation is a beginning of the New Age
Of the newly rising Bhaskara
Centuries of freedom in the dark
A new beginning to live
My father freed me from the cage
He was my father
In the torch of knowledge.....
With brain in mind and hand in hand
Shack - A new beginning in a shack
created
To prevent the new sunrise from fading
That father was a man...!!💕
©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote
Aware of your arrival, your reaction is yes. Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.
The blog is my home of words. The mind is happy while picking the flowers of poems, now you must visit the blog to pick those flowers. I express my feelings in such a way. Welcome to this human threshold of words. If you have come to this threshold, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹
--------------------------------------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा