savitalote2021@bolgger.com

बुधवार, २८ जून, २०२३

त्याच्या काळाभोर गालावर पावसाचे चिंब भिजणे पावसात..!!" प्रेमळ आठवणींचा संच...!

**** त्याचा माझा पाऊस  💕****


" त्याच्या काळाभोर गालावर पावसाचे चिंब भिजणे पावसात..!!"
  प्रेमळ आठवणींचा संच...!

✍️ सविता सूर्यकांता तुकाराम लोटे  

     आज राहून राहून एक आठवण मनात येतच आहे. पहिला पाऊस आणि त्याची माझी भेट ही नकळत झालेली.
       ....... पण पहिला पावसाच्या आगमनाने ती आठवण ताजी होते. स्वप्नाच्या मागे धावता धावता विसावा चा क्षण म्हणजे ती आठवण.
         पाऊस ओला चिंब झालेला. पाऊस त्याच्या अंगावर ओला चिंब झालेला. छत्रीचा झालेला चित्र विचित्र आकार आणि तो त्याच हसू..!! हातातली चप्पल शक्य तर आपण पायात घालतो पण ती त्याच्या हातात होती.
      आताही ते सर्व आठवले की ओठांवर हसू मात्र येते.😄😄😄🤣 आत्ताही बाहेर पाऊस चालू आहे. तसाच माझ्या मनातही.
               आठवणींचा पाऊस चालू आहे. पावसासोबतच्या खूप आठवणी मनात येत आहे पण पावसात भिजावे असे मात्र वाटत नाही. पावसाळी वातावरण खूप छान आहे. वातावरणातला गारवा मनाला आठवणींच्या पावसात घेऊन जात आहे. पण त्या आठवणीवर मर्यादा मात्र ढगाळलेल्या वातावरणात मीच माझी आवर घालत आहे.
       असो, ही आठवण काल-परवाची नाही तर कित्येक वर्षाची आहे. कदाचित तेव्हा प्रेम नावाच्या शब्दाशी संपर्कही आला नव्हता. तेव्हा तो आलेला अनुभव आणि पाऊस आणि आणि तो !!
       फक्त त्या क्षणाला प्रेम म्हणावे असे आज वाटून जाते. हातातली चप्पल पायात जाते, क्षणात.पण आत असलेले बालपण साचलेल्या पाण्याबरोबर चालूच असते.
           मातीने नाही; चिखलाने माखलेले कपडे आणि त्याच्या काळाभोर गालावर पावसाचे थेंब. 'आई मारेल',  या विचारात असलेली मी पण तो बिनधास्त होता मी हसत होते त्याच्या या बालपणावर बालपणातच बालपणावर हसणारे कदाचित मीच असेल..!
      आता मात्रा हसू येत आहे. ती आठवण आजही मनाला हसू आवरत नाही. ज्युनियर कॉलेजचे दिवस काहीशी मोठी झालेली पण बालपण न संपलेले ते दिवस पण तेव्हा वाटायचे आपण फार मोठे झालो. कारण कधी तसे न भिजलेली मी आणि तो मात्र त्या पावसात चिंब भिजून साचलेल्या पाण्याचा आस्वाद घेत.
        आई ओरडेल रागवेल याची तमा न बाळगता बिनधास्त बालपणाची मर्यादित रेषा ओलांडत मोठे झालेल्या भावनेसोबत आपल बालपण enjoy  करत होता.
       तसे कधीही करता आले नाही हा अनुभव घेताच आला नाही. हा अनुभव फक्त बघता आला. त्याची माझी पहिली भेट❤❤ त्याचे मोठे झालेल्या बालपणात आणि माझे बालपण कधी संपले कळलेच नाही आणि आजही कळत नाही.
       पाऊस "तो आणि मी"हा अनुभव फक्त आम्ही एक एकट्याने घेतला. तो पावसात भिजायचा मी फक्त बघत राहायचे. मी छत्रीच्या छायेमध्ये आणि तो खुल्या आकाशाच्या पाऊस भरल्या छायेमध्ये. तरी आम्ही पाऊस enjo6 करत होतो. मी न  भिजता आणि तो  भिजून..!!💔😄🤣

        माझ पहिल प्रेम पाऊस. दुसर प्रेम पुस्तक. तिसर प्रेम कदाचित तो!!........ आणि त्यानंतर कधीच कोणत्याच प्रेमात न पडलेली मी??
        पण अनुभव ती आठवण मनात इतक्या वर्षानंतरही तशीच ताजी टवटवीत आहे. आता जावे वाटत होते त्याच्यामागे. त्या पावसात भिजण्यासाठी. मी भिजले असते. मी माझे बालपण हरवले नसते. मी माझे मोठेपण हरवले नसते.
          पण म्हणतात, स्त्री म्हणजे अशी व्यक्ती ती कधीही तिच स्त्री पण हरवत नाही. निसर्गाने त्यासाठी तिला इतरांपासून थोडे वेगळे केले आहे. बालपण हरवलेले मोठ्यांची मोठेपणा आलेले तरीही मोठे झालेले आम्ही मुली. आठवणी खूप सुंदर असतात आणि अशा आठवणी तर खूपच सुंदर असतात.
          पाऊस तो आणि मी हे शब्द त्याच्या माझ्या नात्याला ओलावा देऊन जातो. माझे हसू त्याचे हसू त्याचे पुस्तके माझ्या हातात माझ्या छत्रीच्या छायेमध्ये आणि तो ओलाचिंब पावसात चिंब झालेला.
      आता वाटून जाते,तेही दिवस खूप सुंदर होते. मर्यादा होत्या. साधने कमी होते. आधुनिकतेची सुर लय नसलेले ते दिवस फक्त स्वप्नांच्या मागे धावणारे होते. आणि असे काही अनुभव, अशा काही आठवणी असे काही मित्र न झालेले कधीच.
         फक्त छत्रीत पुस्तके तेवढी सुरक्षित राहावी म्हणून. तोंड ओळख असलेले पण ते मित्र मैत्रिणी हे खूप सुंदर होत्या. कारण त्या मैत्रीत स्वार्थीपणा नव्हता. होती फक्त आपुलकी जिव्हाळा.
       प्रेम माझे त्याचे नाते असेच. कुणालाही माहीत नसलेले पण नात मात्र होते.
      माझ मोठेपणाच आणि त्याचे बालपणाचा.❤ हे नाते हे खूप विचित्र होते. खूप दिवस हे नात आमच्यात होत. पण एक दिवस हे नाते बदलले.
          मी लहान झाले आणि तो मोठा. मोठेपणाचे काय दुष्परिणाम असतात त्यानेही अनुभवले. मी अनुभवले होते तसेच आणि मी लहान झाले लहानपणाचे काय फायदे आणि नुकसान असतात तेही मी अनुभवले.
        गोरीपान असलेले मी, काळाभोर असलेला तो!! दोघांच्याही स्वभावात असलेला जमीन आभाळा एवढा फरक. तरीही आम्ही एक होते. कारण पाऊस मी आणि तो हे कॉम्बिनेशन आमच्या होते. 
         तो अनुभव आहे एकत्र अनुभवला होता. मी कोरडे राहून आणि तो ओला होऊन. पण भावना मात्र एकच होत्या. एकमेकाबद्दल आदर ....एकमेकाबद्दल अबोल प्रेम..... एकमेकाबद्दल सुरक्षिततेचे भावना. असे कितीतरी वाईट प्रसंगात तो दुरूनच का होईना एक आधार द्यायचा.
        एक अभिमानाची थाप द्यायचा. एक स्वाभिमानाची ओळख निर्माण करायचा. जेणेकरून तो माझ्यासोबत होता. ते दिवस एकटीच होते. ते दिवस फक्त त्याच्या सोबतीने त्याच्या अबोल प्रेमाने त्याच्या सुरक्षित देहबोलीने केलेला तो प्रवास आयुष्याच्या प्रत्येक एकटीच्या प्रवासात आजही आत्मविश्वास देत असतो.
         त्याचे एक शब्द आजही मला तितकाच गंभीर आणि शांत करून जातो. तो म्हणजे आयुष्यात आपण आहोत आपले आहे यापेक्षा ,"मी सर्वांसाठी आहे सर्व माझ्यासाठी आहे." हे वाक्य मनाला बळ देऊन जाते. 
       हे शब्द घाबरट आणि प्रत्येक समस्येपासून पळ काढणाऱ्या एका मुलीला सांगत होता. अबोल होऊन कधीच कुणाला हे प्रेम कळले  नाही, हेच विशेष. पण तो इतका मोठा प्रवास फक्त अबोल होऊन आम्ही अनुभवला होता.
         माझा प्रवास अभ्यासासोबत चालू झाला आणि त्याचा प्रवास जबाबदारीने. जबाबदारी काय असते हे त्याच्याकडून शिकले पण अभ्यास काय असतो हे मात्र तो शिकलाच नाही.
         प्रत्येक वेळी प्रत्येक प्रसंगात त्याने त्याचे बालपण मात्र सोडले नाही. मोठ्याची लहान झाली. मी एका क्षणानंतर लहान असलेली मी वयाने मोठीही झाले, मी एका काळानंतर.
        पण तो मात्र तसाच बालपणात रमणारा. इतके वर्ष झाल्यानंतर सुद्धा काही वर्षा आधीची आठवण ताजीच आहे. असाच बस स्टॉप वर  भिजताना परत पाहिले. तशीच हातात चप्पल तशीच छत्री तसेच चिखलाने माखलेले कपडे आणि तसाच काळाभोर गालावर पावसाचे  थेंब हसाव की रडावे  हेच कळत नव्हते. 
       कारण माझ पहिल प्रेम पाऊस असला तरी त्या पावसात भिजलेला तो व्यक्ती माझे पहिले प्रेम होते. त्याने त्याचं बालपण अजूनही जिवंत ठेवला आहे. आयुष्याच्या या रंगमंचावर कितीतरी अनुभवाला समोरे गेल्यानंतरही त्याने त्याच लहानपण जिवंत ठेवला आहे. आणि मी आजही तसेच कोरडे बालपण कधी निघून गेले कळलेच नाही.
         त्याच्यासाठी कधीतरी लहान झाले. कधीतरी मोठे झाले पण एकही शब्द न बोलता. तो मात्र बोलून गेला. मी लहान आहे अजूनही. मी रमतो माझ्या त्या आठवणींसोबत. कारण 
माझे पहिले प्रेम त्या छत्रीत असलेली कोरडे माझ्याच पुस्तकांचे ओझे घेऊन उभी असलेली ती माझ्याच वयाची पण काहीशी मोठी झालेली विचाराने.

       त्या मुलीच्या अबोल प्रेमाची साक्ष हा पाऊस देत असतो. खूप वेळ निघून गेला, त्या आठवणीत आता मन जास्तच रमते.कारण ते दिवस आता परत येणे नाही आणि तो अनुभव आहे.
       कारण मला भिजायचे आहे त्याच्यासोबत!! त्या पावसात चिखलाने माखायचे आहे. पांढरा शुभ्र घातलेला ड्रेस मध्ये मला भिजायचे आहे. माझ्या पहिल्या प्रेमासोबत.त्याच्या पहिल्या प्रेमासोबत ..!!       त्याच्या- माझ्या त्या प्रत्येक अबोल क्षणांसोबत त्या काळा छत्रीच्या आत असलेली सुकलेली ड्रेसची त्या इस्त्रीच्या ड्रेस ला आता त्या पावसात त्याच्या त्या बालपणात भिजायचे आहे. 
        आता बालपण नाही. आता मोठेपण नाही. आता संघर्ष नाही. आता समस्या नाही. आता मर्यादा नाही.आता ते प्रेमही नाही.आता तो जिव्हाळाही नाही. आता तो आत्मविश्वासही नाही आणि आता ते हातात पुस्तके ही नाही.
         आता फक्त प्रवास आहे,उरला सुरलेला. आता फक्त प्रवास आहे येणाऱ्या प्रत्येक क्षणांसोबत. हसून जगायचे की रडून जगायचे हे ठरवणारा. आता फक्त आठवणी बालपणाच्या त्या कोरड्या वाटेवरच्या तरीही त्याने या सर्वांमध्ये त्याचे बालपण टिकून ठेवले.
       अजूनही हे मात्र आश्चर्यच आहे कारण असे बालपण टिकवणे ही एक कसरत असते. आयुष्याच्या जीवन प्रवासात. पण असो,.....!
         पाऊस आला की आठवण मात्र येते. पावसात सोबत मात्र असायचे कधीही एकटीचा प्रवास झाला नाही. अबोल का होईना त्या वयात मनाने प्रेम मात्र करून घेतले. पावसात भिजले. तो नसताना मनसोक्त रडून घेतले. त्या पावसात भिजून तो नसताना पावसाच्या प्रत्येक सरी सोबत मी त्याच्या प्रेमाची कबुली मात्र त्या पावसाला दिली.                एकट्या गुलाबाचे फुल फुलले पण वाळवंटात ते कधीही कुणाला दिसले नाही आणि कधीही कुणाला दिसू दिले नाही हे मात्र नक्की. हा प्रवास दोन्ही बाजूने होता. वाळवंटात फुललेल्या गुलाबासारखा कोरडा तो भिजला असला तरीही.                कोरडा आणि मी न भिजता ही कोरडी.ही आठवण प्रत्येक वेळी पहिला पाऊस पडला की येतो.  ह्या आठवणी सोबत पाऊस मनात रेंगाळत राहतो. आता पाऊस खिडकीतूनच बघते पण आकाशातील इंद्रधनुष्य सांगून जाते, तू कुठेही राहा कशी ही राहा काहीही कर तू खिडकीच्या आत रहा की तू खिडकीच्या बाहेर रहा तरीपण मी तुझ्यासोबत आहे.
          तुझ्यातील तुझ्या मधला पहिल्या प्रेमासोबत. कारण तो मी आहे. ही आठवण शब्द स्वरूपात कागदावर लिहिताना मनात एक गोष्ट सहज येऊन गेली.
     जर ही आठवण नसती तर आज हे शब्द कागदावर लिहिताना तो माझ्यासोबत असता. मी त्याच्या बालपणासोबत माझे हे बालपण अंगणातल्या त्या पावसाबरोबर अनुभवला असते. ओले चिंब होत..!
  सोबत ❤❤❤❤💕
         पण हा फक्त आलेला विचार होता. एक आठवण परत येऊन गेली. मी न भिजलेली तो भिजलेला तरीही मैत्रिणीचा बोलण्याचा सूर नेहमी माझ्याकडे असायचा. कारण तो सर्वांचा लाडका होता आणि मी मात्र त्याचे पुस्तक हातात घेऊन तो कधीही कुणालाही तो देत नव्हता. असा सर्वांचा लाडका नेहमी अबोल राहून दुरूनच त्यांच्या बोलण्याला प्रतिसाद देणारा. मात्र माझ्या- त्याच्या संवाद अबोलच राहिला. आत्मविश्वास मात्र त्याने भरभरून निर्माण करून दिला.
         पाऊस मी आणि तो आजही खिडकीबाहेरच्या पहिल्या पावसाच्या आगमनाचे स्वागत करताना त्या आठवणी ताज्या करत असाव्यात. कारण आता बालपण उरले नाही. मोठेपण उरले नाही. आता उरल्या फक्त आठवणी ओल्या चिंब नयनातला त्या अश्रूं सोबत.
         कधीतरी कुठेतरी तो भेटेल,मी भेटेल या आश्वासनासोबत. पहिल प्रेम पाऊस, दुसर प्रेम त्यात भिजणे तिसर प्रेम त्यात त्याला भिजताना बघणे, चौथे प्रेम त्यात आपण नसूनही त्याच्यासोबत भिजणे, पाचव प्रेम आता त्याच्या आठवणीत भिजणे आणि स्वतःला स्वतःच्या स्वतःसाठी त्याच्या प्रेमाची कबुली देऊन भिजणे.❤❤💕💕
        आठवणी खूप छान असतात अशा काही आठवणी जपून ठेवाव्या लागतात आणि अशा आठवणी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असतात. कधी त्या बोल असतात शब्दांसोबत असतात तर त्या कधी आठवणी अबोल असतात शब्द विना अव्यक्त प्रेमाच्या प्रेमामध्ये भिजलेला...!!❤❤💕🤣😄

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

      आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

******************************************************************************

शनिवार, १७ जून, २०२३

*** वास्तू ****


       निसर्गाने माणसाला व्यक्ती म्हणून एका कुटुंबामध्ये वास्तवाला दिले जाते. ते वास्तव म्हणजेच आपले घर असते.
        घर विटा माती सिमेंट छप्पर भिंतीचे असले तरी त्या घराला घरपण त्या घरातील व्यक्ती देत असतात. हेच घरपण त्या वास्तूचा आत्मा असतो.             या संदर्भातली वास्तू ही कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

    ****  वास्तू **** 

चार भिंती म्हणजे वास्तू 
वास्तूला अभिमान असतो 
त्या चार भिंतींचा 
तिथल्या माणसांचा आशीर्वाद असते 
ती वास्तू 
त्या माणसांची माणसाला माणूस 
म्हणून जगण्यासाठी हिम्मत देणारी 
जागा म्हणजे वास्तू 
वास्तु मनाला आत्मविश्वास देणारी 
खूप साऱ्या आठवणी 
जतन करून ठेवणारी 
कानाकोपरात माणसाचे 
अस्तित्व जपून ठेवणारी 
घरट्यातून पिल्लू उडून गेले तरी 
परतीची सर्वात जास्त वाट 
बघणारी वास्तूच असते 
अंगणातल्या हिरवळीला 
शोभा असते 
वास्तूचे मनमोकळ मनमुरात 
बसून माणसांचे 
वास्तू अनाथ बनवत नाही 
कुणालाही त्या चार भिंतीच्या 
आत स्वतःला मायेची उब 
देणारी वास्तूच असते...!!💕

✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
         आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

******************************************************************************

शुक्रवार, १६ जून, २०२३

**फूले *** "सुगंधित वाऱ्याबरोबर सुगंधहीन होण्यापर्यंतचा प्रवास"

   ***फूले ***

   "सुगंधित वाऱ्याबरोबर सुगंधहीन होण्यापर्यंतचा प्रवास"


         प्लास्टिकच्या फुलांना बागेतील फुलांचा सुगंधितपणा आला तर संस्कार या शब्दाला काहीच अर्थ उरला नसता. म्हणून प्लास्टिकचे फुले फेकून देतात आणि सुगंधी फुलांना परमेश्वराच्या चरणी अर्पण केले जाते, हा फरक असतो प्लास्टिकच्या फुलांमध्ये आणि सुगंधित फुलांमध्ये.
        संस्काराचेही तसेच वरवर कितीही चांगले स्वभाव दर्शन काही क्षणासाठी दिले जात असले तरी ते निरंतर टिकू शकत नाही. एक वेळ अशी येते की त्यासमोर स्वतःच्या संस्कारांना हरावे लागते.
       आज एक पोस्ट वाचताना त्यात लिहिले होते, घरंदाजपणा हा रक्तात असतो. हे जरी सत्य असले तरी घरंदाजपणा त्याच्या चांगल्या स्वभाव दर्शनामुळे दिसतो.हेही तितकेच खरे..!!
        म्हणून प्लास्टिकच्या फुलांना सुगंध येऊ शकत नाही. रूम फ्रेशनर किंवा इतर सुगंधित वस्तूच्या संपर्कात आल्याशिवाय तसेच संस्कार आहे.
        असो लहान तोंडी मोठा घास!!!!! या शब्दांसारखे माझे शब्द पण स्वतःच्या संस्कारांना प्लास्टिकच्या फुलासारखे करू नका आणि नसलेल्या संस्कारांना बागेतल्या फुलांसारखे सार्वजनिक करू नका.
         देखावा हा कधीतरीच बघितला जातो तो रोज रोज पाहिल्यास देखाव्यामध्ये काहीही रस नसतो. उरला सुरला चांगल्या गोष्टी सोबत आधी चांगल्या पद्धतीने स्वतःमध्ये जपून ठेवा. कारण पेरेल ते उगवेल हा निसर्ग नियम आहे. तसेच संस्काराचे आज जे तुम्ही आजूबाजूच्या परिस्थितीला दाखवाल तेच उद्या तीच परिस्थिती तुम्हाला दाखवेल.
          तेव्हा प्लास्टिकच्या फुलांचा आणि बागेतील फुलांचा यातील फरक करून सुद्धा तो करता येणार नाही. आधुनिकतेला जवळ करा पण इतकेही जवळ करू नका त्यामध्ये संस्कृती परंपरा सामाजिक नियम सामाजिक सहरचना आणि सामाजिक संरचनेचे वटवृक्ष याला कुठेही तडा जाणार नाही.
       इतके मात्र लक्षात ठेवा. कारण समाजातला प्रत्येक व्यक्ती हा या समाजाचा सहरचनेचा अविभाज्य भाग आहे आणि या नैसर्गिक गणिताला सुरळीत चालविण्याचे काम प्रत्येक व्यक्तीला करावे लागेल. म्हणून प्लास्टिकच्या फुलांना घराच्या बाहेर देखाव्यासाठी ठेवा आणि घरात बागेतील सुंदर सुगंधित फुलांना महत्त्व द्या...💕💕💕


✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
******************************************************************************


***flowers***


A Journey to Unscented with the Scented Wind"

         If plastic flowers had the fragrance of garden flowers, the word Sanskar would have no meaning.  So plastic flowers are thrown away and fragrant flowers are offered at the Lord's feet, this is the difference between plastic flowers and fragrant flowers.
           Sanskar too, no matter how good nature appears on the face of it for a moment, it cannot last forever.  There comes a time when one has to lose one's own sanskars in front of it.
 Reading a post today, it said,            homemaking is in the blood.  Although this is true, homeliness is seen through its good natured view. This is equally true..!!
      So plastic flowers cannot smell.  Without coming into contact with room fresheners or other scented items is also a ritual.
         Anyway, big grass with a small mouth!!!!!  My words like these but don't make your sanskars like a plastic flower and don't publicize non-sanskars like flowers in a garden.
       Appearance is seen once in a while, if you see it every day, there is no interest in appearance.  Retain Urla Sura within yourself first with good things.  Because what is sown is the law of nature.  Also, what you show to the surrounding situation today, the same situation will show you tomorrow.
       Then it cannot be done even by differentiating between plastic flowers and garden flowers.  
        Get close to modernity but not too close in that culture tradition social norms social cohesion and banyan tree of social structure will not be broken anywhere.
       But remember this much.  Because every person in the society is an integral part of the structure of this society and every person has to work to run this natural math smoothly.  So keep the plastic flowers for outdoor display and give importance to beautiful fragrant garden flowers at home...💕💕💕


 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

 The blog is my home of words.  I express my feelings in such a way that I can understand.  Welcome to this God threshold of Shabda Swaras.  If you have come to the threshold of God, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
 If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹

==========================================================

सोमवार, १२ जून, २०२३

** दगड ***

*** दगड ***

दगड मातीच्या रस्त्यावर 
चालताना पायात दगड 
येतीलच हे गृहीत धरूनच 
चालावे लागते 
पण दगडाची किंमत 
आपल्याला करावी लागते 
त्या दगडातून 
नवीन शिल्प तयार करायचे 
की फेकून द्यायचे 
दगडाला किंमत आपण  
देऊ तेच असेल 
म्हणून स्वतःला किती किंमत 
द्यायची हे सर्वात आधी 
स्वतः स्वतःला ठरवावे लागेल 
दगड मातीच्या रस्त्यावर 
चालताना 
पायात दगड येतीलच...!!

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .





*** stone ***

 Stone on dirt road
 Stones in feet while walking
 Assuming it will come
 have to walk
 But the price of the stone
 We have to
 From that stone
 Create a new sculpture
 Throw that away
 You are worth the stone
 It will be the same
 So how much do you value yourself?
 First of all to give
 You have to decide for yourself
 Stone on dirt road
 while walking
 There will be stones in the feet...!!

 ©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

*********************************************************************************************************************


शुक्रवार, ९ जून, २०२३

***डायरीतली ती कविता ***

      कविता ही कधी कधी एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी लिहीली जाते. विशेषता,प्रेमात!! ती कविता फक्त त्या व्यक्तीसाठी असते पण ज्या व्यक्तीसाठी लिहिली जाते त्या व्यक्तीने जर ती जपून ठेवली नाही तर समोरच्या व्यक्तीच्या काय भावना असतील या कवितेत लिहिण्याचा प्रयत्न.
         एक प्रेयसी कवी आहे. तिने तिच्या भावना तिच्या शब्दात कविते मार्फत तिच्या प्रियकरायला पोहोचविली पण त्याने कशा उपयोग केला हया कवितेचा हा आशय संदर्भ या कवितेचा आहे. 
      कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद...!!💔
 
**डायरीतली ती कविता ***

काल मला एक कविता 
कुणीतरी पाठवलेली 
ती माझीच होती 
माझ्या कवितेतला  
डायरीतली 
ते शब्द माझेच होते 
ती भावना माझीच होती 
कवितेचा सूरही माझाच होता 
कारण ते शब्द 
माझ्या भावनेचे होते 
माझ्या प्रेमाचे होते 
माझ्या त्या सुंदर क्षणांचे होते 
जिथे मन गुंतले होते 
जिथे शब्दांनी तुला 
साथ दिली होती 
पण आज कळले 
ते शब्द 
ती भावना 
माझे प्रियप्रेम 
माझ्या माझ्यातला असलेला तू 
इतर कुणासाठी 
तरी तितकाच प्रिय होता 
ज्यामध्ये तुझी वासना होती 
तुझा अहंकार होता 
माझे शब्द 
माझ्या भावना 
माझे प्रेम रद्दीतला कागदांसारखे 
केले ज्याला किंमत 
फक्त रद्दीचीच होती 
त्यावर लिहिले होते 
माझ्या प्रियकर 
माझी प्रियसी 
माझा जिवलग 
आणि माझी रद्दीतल्या 
कवितेची कविता 
जी तू केलेली होती 
आता डायरीतली ती कविता 
फाडून मीही कचरात टाकली 
ओलावलेल्या भावनांसोबत 
डोळे ओलावून....💔
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे



©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .


******************************************************************************

सोमवार, २९ मे, २०२३

काही अर्धवटच राहिले...💔💕!! ... नियतीचा डाव अर्धवटच!!

काही अर्धवटच राहिले...💔💕!!
       ... नियतीचा डाव अर्धवटच!!

       घरात तशी नेहमीपेक्षा थोडी घाईगडबड चालू होती. घरात छोटी पूजा आणि त्यानंतर गेट-टुगेदर असा छोटासा कार्यक्रम घ्यायचे ठरले. पूजा झाली. सगळी घाई गडबड थोडा वेळ का होईना थांबली.
       पूजा झाल्यानंतर महाराष्ट्रीयन पोशाख स्त्रियांनी परिधान करायचे ठरवले. त्यानुसार तयारही होत गेली. नऊवारी सोबत दागिन्यांची पेटी ही बाहेर निघाली.
        तिला कितीतरी वर्ष झाले होते या पेटीला हातच लागला नव्हता. अडगळीत एखादी वस्तू जशी ठेवावी तशी अलमारी मध्ये ती ठेवलेली होती. माहित नाही इतके वर्ष होऊन सुद्धा तिला कधी open केलीच नव्हती.
     पूजेच्या निमित्ताने आज ती बाहेर आली. क्षण कसे भराभर निघून जातात हे त्यावेळी कळले. दागिन्याची होश नसलेली तरी एक अनामिक ओढ त्या पेटीकडे होती.
      तसे पाहिले तर नवीन नऊवारी घातली होती. हातात कंगन, डोळ्यात काजळ, पायात पैंजण,गळ्यात सोनेरी दागिने, लिपस्टिक, सर्व काही होते तुझ्या आवडीची माझी अशी कधी आवडत नव्हती.
      सगळे तुझ्या आवडीचे..💕!! पायापासून केसात माळलेला गजरा पर्यंत सर्व काही तुझ्या आवडीचे. काही अस्तित्व आहे वेगळे असे कधी वाटलेच नव्हते. पण आज स्वतः स्वतःला आरशात बघताना काहीतरी कमी जाणवत होते.
          मी बघत होते सर्व काही त्यातले होते. तरीही काहीतरी रिकामे रिकामे वाटत होते. स्वतः स्वतःला आरशात बघताना पूर्णत्वाची जाणीव करून देत होती. सौंदर्याची पण काहीतरी कमी वाटत होते.               कपाळावर टिकली होती. डोळ्यात आय लाइनर... काजळ होते. ओठांवर लाली होती. खानवटीवर काळा तीळ होता;  काळा पेन्सिलने केलेला. गळ्यात एक- दोन  नाही  चांगले चार-पाच महाराष्ट्रीयन दागिने होते. नथ ही होती तिच्याच जागेवर...!!
       हातात बांगड्यांचा आवाज होता. पायात वाजणारे पैंजण होते. हाताला नेलपेंट होते. गोंदून घेतलेले नावही आज अधिकच जवळचे वाटत होते. सर्व काही होते.  तरीही काहीतरी खालीपण मात्र नक्की होते.
         डोळ्यातल्या अश्रूंना थांबवताच आले नाही. गळ्यात नव्हते ते मंगळसूत्र..... कपाळात नव्हते ते कुंकू ......पायातली जोडवी ही नव्हती .....हातातला हिरवा चुडा आपला नाही ही भावनाच किती दुःखमय होतील.
         मनाला रिकामा मनाला भरण्यासाठी सौंदर्याची भर घालत होती पण रिकाम्या मनाला  माहीत असावे हे सौंदर्य वरवरचे. बाईपण त्या काळा मन्यांनी... मन्यांनी सजलेली असते. जोडव्यांनी सजलेली असते.
        त्या कुंकवाने सजलेली असते. बाई पणाचे सौंदर्या त्यात असते. त्या दिवशी कळले तू होतास तेव्हा कधीही या सौंदर्याचा हेवा वाटला नाही. मॉडर्न जगाच्या मॉडेल फॅशनमध्ये स्वतःला इतक्या आधुनिक केले होते हे सौंदर्य म्हणजे वरवरचे हे सौंदर्य मध्ये रूढी परंपरा यामध्ये स्वतःला जखडून ठेवणारे वाटत होते.
        पण आता हे रिकामा - रिकामा सौंदर्यने डोळ्यांच्या अश्रूंना थांबू देत नव्हते. तुझा झालेला तो पहिला स्पर्श मनाला रोमांचित करून गेला. पण त्या आठवणी आता नको आहे. तू नसण्याची जाणीव आता नको आहे.
       कारण मनाने ते स्वीकारले आहे.जबाबदारीची जाणीव आहे. इतकी आहे की त्या जबाबदारी समोर हे सौंदर्य रिकामी रिकामी वाटत असले तरी जबाबदारी नावाचा एक दागिना सोबत आहे आणि तो 24 तास सोबत असतो.
          या जबाबदारीच्या दागिने समोर कुणाच्याही नावाच्या मंगळसूत्राला जागा नाही. जबाबदारी तू घेतलेली अर्धवट सोडून गेलेला....अ...  डावा हा जबाबदारीच्या नावाने संपूर्णपणे वाटेला आलेला.
         आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत या रिकाम्या सौंदर्याने पेलत राहील. काही क्षणासाठी वाटून जाते पण अर्धवट सोडलेला डाव हा कधीही पूर्ण होऊ शकत नाही. खेळामध्ये दुसरा कोणी आला तरी...?             कारण तो खेळ परत नव्याने चालू करावा लागतो. अनुभवाची शिदोरी इतकी मोठी असते त्या खेळातही कदाचित आधीचा अर्धवट डाव सतत समोर येत असावा.
        असो आज आरसा ही हसला.  गालावरच्या खळीला बघत. ओलावलेले नयन आणि हातातल्या बांगड्यांचा आवाज इतकेच फक्त सुंदर संगीत चालू होते....!
         आणि तुझा तो शेवटचा शब्द "जबाबदारीने वाग", बस तेच शब्द आज दागिना आहे. सौंदर्याला पूर्णत्वास नेण्यासाठी. सुखाची व्याख्या काय करावी माहिती नाही आणि दुःखाची व्याख्या काय करावी माहित नाही. कारण दोन्हीही आपापल्या परीने आयुष्यात येऊन गेले.. येत आहे.
        कुठेतरी वाचले होते मोर नाचतानाही रडतो आणि राजहंस मरतानाही हसतो म्हणजे सुख आणि दुःख याचे व्याख्याच करता येत नाही. आपलेच प्रतिबिंब आपला शत्रू असतो. दुःखात आपल्याला किती गुंतवून ठेवतो की कदाचित आपण त्या दुःखाच्या वर जाऊ शकत नाही आणि गेल्यास रूढी  प्रथा परंपरा या सर्व आहेत.
        परिवर्तन ही काळाची गरज आहे. परिवर्तन ही आपल्या प्रगतीची गरज आहे.  वर्तुळ हा गोल असतो पण तो काढण्यासाठी एक मध्यबिंदू काढावा लागतो. सुखदुःख ते मध्यबिंदू असते. शब्दांची रांगोळी खूप झाली. स्वतः स्वतःची आताची रांगोळी सजवावी लागले. रंगबेरंगी रंगांनी...!!
      गेलेली वेळ आणि क्षण परत येत नाही पण आता असलेला वेळ आणि क्षण आत्ता आपल्या जवळ आहे. तो हसून त्या परिवर्तनवादी आधुनिक पायऱ्यांवर चढायचे.  तिथे परिधान केलेले सौंदर्य रिकामे वाटणार नाही. त्या पायऱ्यांवर चढायच त्या पायऱ्यांवर कुणीही प्रश्न करणार नाही.
       आधुनिकतेच्या पायऱ्या अशावेळी वरदान ठरतात. आधुनिक फॅशन संस्कृती वरदान ठरते. त्या बुरसटलेल्या विचारसरणीवर ज्या आपण स्वतःच स्वतःभोवती गुंडाळून ठेवलेल्या असतात. आधुनिकता माणसाला प्रत्येक गोष्टीकडे नवीन पद्धतीने बघण्याचा दृष्टिकोन देतो. हा दृष्टिकोन त्या पायऱ्या आहेत, तिथे कोणीही बंदिस्त नाही.                    स्त्रियांच्या वाटेला हे बंदिस्त पण इतके आले आहेत की, त्यातून मार्ग काढत काढत आजची स्त्री आधुनिकतेच्या त्या पायऱ्यांवर चढली तिथे तिला मुक्त स्वातंत्र्य आहे. कधी - कधी मुक्त स्वातंत्र्य एक नवीन बंदिस्तपणा आपल्याला देत आहे का असेही वाटून जाते.
        आधुनिकतेच्या पायऱ्या स्त्रियांसाठी खरंच वरदान आहे आणि रुढी प्रथा परंपरा ज्या सार्वजनिक स्तरांवर महोत्सव पद्धतीने साजरे केले जातात त्यावेळी कदाचित स्त्रियांच्या मनात कुठेतरी न्यूगंडायची भावना त्यांच्याही नकळत निर्माण होऊन जाते.
        स्वतः स्वतःशी संवाद मग तो नकारात्मक असो या सकारात्मक पण कधी काही त्यांनीही या महोत्सवाचा भाग होता. हे मात्र विसरता येत नाही.         अर्धवट राहिलेला डाव परत मांडता येतो हे जरी खरे असले तरी," जबाबदारीचा दागिना", हे करू देत नाही. कारण ती स्त्री असते... स्त्री म्हणजे त्यागाची मायेची मातृत्वाची देणगी असते.                     जबाबदारीचा दागिना त्यामुळे अधिक जवळचा वाटतो.
        पेटीतली नऊवारी, दागिने, (तुटलेले )वाढलेले मंगळसूत्र, त्या दिवसाची कहाणी सांगून जाते तिथे डाव अर्धवट नियतीने ठेवलेला होता. कुंकवाची डबी ही तशीच भरलेली.... फोडलेल्या बांगड्यांचे काचेही तसेच संग्रहित ....त्या पेटीत!
         नऊवारी लग्नाची. कुंकवाची डब्बीही लग्नाची. फोडलेल्या बांगड्या ही लग्नाच्या. जबाबदारी मात्र आत्ताची. रिकामे पण ही आत्ताचे आणि जिवंतपणाही आताचाच. कारण त्यानंतर सुखाची वाट कोणती माहीतच नाही.
       नऊवारी जाळून टाकायला पाहिजे आणि असे कितीतरी विचार त्या क्षणाला येऊन गेले. 
वेळ होत होता, सजले ... आधुनिक पद्धतीने... मिरवले ..... आधुनिक पद्धतीने याच आधुनिक महामहोत्सवात एक स्त्री म्हणून! सजलेली नियतीने डाव अर्धवट ठेवला तरी काहीतरी विचार करूनच ठेवला असावा.
      वाईटतही चांगले असते हे सांगणारी आपली संस्कृती." झाले गेले निघून गेले आहे ते आपले आहे," या म्हणी प्रमाणे आधुनिकतेच्या पायऱ्यांवर एक एक पायरी चढत राहायचे आणि रिकामे मन नवीन गोष्टींमध्ये गुंतवून भरत राहायचे.
        हातातला बांगड्यांचे सुरेख संगीत मनाला प्रफुल्लीत करीत हळूच गालावर खळी पडली नवरीला मॅचिंग टिकली शोधत नाकात नथ घातली आधुनिक पद्धतीची हसत...!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

          ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹


लेख  स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
       कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आपल्या सूचना गोड- कडू दोन्हीही शब्दात नक्की कळवा आणि मनातील विचारांना शब्द द्या..!❤
        आजच्या लेखा संबंधीची माहिती तुम्हाला आवडली असल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका.माझे पेज कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. 

        तुमची येण्याची जाणीव प्रतिक्रिया असतात. काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा...!!❤💕 धन्यवाद!!!!

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे  

         आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .


       If you liked today's accounting information don't forget to share and like. Make sure to let me know how you feel about my page in the comment box.

 You have a conscious reaction to come.  If you find any mistakes, please let me know in the comment box...!!❤💕 Thank you!!!!

    ©️®️✍️Savita Suryakanta Tukaram                Lote

 Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.


==========================================================





शुक्रवार, २६ मे, २०२३

काळोख

'काळोख', कविता स्वलिखित  व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
      काळोखातील अंधार प्रतिक आहे नवीन सूर्यप्रकाशाच्या. पण मला नेहमीच या काळोखायची भीती वाटत आली आहे. दूरचा प्रवास कशाच्या ना कशाच्या निमित्ताने   संध्याकाळी असला की अंधाराची चाहूलही न घेणारी कधीतरी त्या प्रवासात खिडकीतून बाहेर डोकावून बघते.
     फक्त चारही बाजूंनी काळी चद्दर पांघरूण निवांत झोपलेली संध्याकाळ दिसते. पण तोच आकाशातील त्यात चांदण्यांकडेही बोट दाखवित माझी अंधाराची भीती घालू पाहते.              आता प्रवास होतच नाही आणि हा अंधार आता कुठेतरी हवाहवासा वाटतो आहे. तो का? हे या कवितेतून मांडण्याचा हा प्रयत्न.
 त्या भाव विश्वातून या कवितेचा जन्म झालेला आहे अशा भावना प्रत्येकाच्या मनात येत असावी हे समजून हे चार शब्द लिहिण्याचा प्रयत्न आहे.
      आवडल्यस लाईक आणि शेअर करायला विसरू नका...!!
धन्यवाद..!!💕🌹

.... काळोख .....

आजचा प्रवास संध्याकाळच्या 
काळोखात चालू झालाच
कधीकाळी  हा प्रवास असाच चालू व्हायचा 
त्यात स्वप्न असायचे इच्छा असायची 
आकांक्षास्फूर्ती शक्ती असायची 

पण आजचा प्रवास काळोखातला 
दिशाहीन होता काळोखासोबत 
काळोखाच्या अंधाराची भीतीच वाटते 
कधीही काळोखात प्रवास न करणारी 
तेव्हा करायची; प्रवास 
आता मन रिकामं रिकाम होत आहे 

बस मध्ये बसल्यावर खिडकीचा काचेतून काळोखातील अंधाराची भेट झाली 
परत जुन्या आठवणी मनात घर करीत 
मन खिन्न करित गेले .....
पण अंधार बोलून गेला 
माझे स्वागत झाले!

बघ! आकाशातील ताऱ्यांकडे ढगाळलेल्या वातावरणात ही लख्ख प्रकाश देत आहे 
चंद्राचे अस्तित्व थोडे का होईना दिसत आहे काळोखातला अंधार सांगू पाहत होता आत्मविश्वासाने 

अंधारातील काळोखाची भीती घालवून घे 
त्यानंतर प्रकाशाची सुंदर रम्य पहाट 
अस्तित्वात येणार आहे स्वप्नांसाठी 
काळोखातील अंधाराला सोबत घेऊन 
प्रवास चालूच ठेव 

अंधाराच्या प्रवासाची अजूनही भीती वाटते आयुष्याच्या अंधाराच्या प्रवासापेक्षाही 
पण मी बघते आकाशाकडे त्यातील इवलाशा चांदणीकडे प्रकाशमय झालेला 
गडद ढगाळलेल्या वातावरणात 

प्रवास चालूच असतो 
काळोखातील अंधार हळूहळू 
त्या प्रवासाबरोबर कमी होत जाते 
पण मनातली भीती मात्र तशीच 
जागी 
काळोखाची अंधारासारखी...!!


©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
==========================================================

मंगळवार, २३ मे, २०२३

एक व्यक्ती ...... एकच व्यक्ती असतो...!!

   एक व्यक्ती
     ...... एकच व्यक्ती असतो...!!


             व्यक्ती येताना म्हणजे जन्म घेताना एकटा श्वास घेत येतो आणि जाताना एकटाच स्वतःचा श्वास बंद करून जातो...!! म्हणजे व्यक्ती काहीही घेऊन जात नाही आणि काहीही घेऊन येत नाही तरीही माणसांमध्ये इतका अहंकार घृणा दोष शत्रुत्व यासारख्या शब्दांना मनामध्ये इतके स्थान का दिले जाते हा प्रश्न येतो.
        खर तर हे शब्द स्वतःसाठी असावे त्या खालच्या पातळीवरच्या विचारसरणीचे व्यक्ती इतरांसाठी हे शब्द वापरतात. त्यावेळी वाटून जाते हे कोणत्या समाजाचे प्रतिनिधित्व करतात. ती स्वतःच्या अहंकाराचे स्वाभिमान नावाच्या एका गोड शब्दासोबत मान अपमान सन्मान यासारखे शब्द जोडून इतरांवर फक्त विंबवतात.
         असे व्यक्ती म्हणून किती चांगले असतात हे समाजाला माहित आहे. कारण सामाजिक सहरचनाच अशी आहे की, या व्यक्ती फक्त नकारात्मक विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतात असे नाही तर सकारात्मक विचारसरणीला गढूळ पाण्याने खराब करून टाकतात.
        ',वेळ प्रत्येकांची येते'', असे म्हणणाऱ्या त्या प्रत्येक सकारात्मक विचारसरणीच्या व्यक्तींना ही व्यक्ती कधीच का सापडत नाही. कदाचित त्यांना ती व्यक्ती सापडली असावी आणि म्हणून म्हणत असावे वेळ प्रत्येकाची येते.
         पण अशा व्यक्तींची वेळ कधीच येत नाही ही काळा दगडावरची पांढरी रेष आहे. कारण ही व्यक्ती कधी समाजाची नसते. ही व्यक्ती कधीच कोणत्याच व्यक्तीची एकनिष्ठ नसते. ही व्यक्ती कधीच स्वतः स्वतःची नसते.
         अहंकार नावाचा प्राणी हा फक्त स्वतःच्या स्वार्थी अहंकारी आणि स्वतः स्वतःशी युद्ध करीत असते. समोरच्या व्यक्तीला कसे कुठे कधी आणि कशा पद्धतीने आपल्या या विचारांच्या युद्धासोबत सत्यात उतरवता येईल आणि ती उतरवते सुद्धा...!        
         तिला कोणत्याही सामाजिक सहरचनेची जाणीव नसल्यामुळे आणि ही जाणीव घरातल्याच व्यक्तींनी कधी दिलेली नसल्यामुळे ही जाणीव म्हणजे संस्कार. ही जाणीव म्हणजे आपुलकी. ही जाणीव म्हणजे जिव्हाळा.  ही जाणीव म्हणजे कुटुंब ही जाणीव म्हणजे नात्यांची गुंफण. ही जाणीव म्हणजे त्यागाची भावना...!
        कुठेतरी वाचले होते या भावनेचे व्यक्ती हे फक्त स्वतःला आरशात बघण्यापेक्षा इतरांना पाण्यात बघतात. म्हणून या भावना मनात इतक्या घर करून राहतात की त्यातून त्या कधीही बाहेर पडू शकत नाही. पुनर्जन्मावर विश्वास ठेवला तर पुनर्जन्माच्या जन्मामध्ये सुद्धा या भावना घेऊन जातात आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यात स्वतःचा अहंकार  तितका जपून ठेवतात.
       पण एक सत्य हेही आहे, 'एक व्यक्ती एकच व्यक्ती असतो.' जाताना काहीही घेऊन जात नाही आणि येताना काहीही घेऊन येत नाही. अहंकार स्वार्थ घृणा शत्रुत्व मातीमोल असते. या माती मोल दागिन्यांना खजिन्याला सांभाळून ठेवण्यापेक्षा एक साधे व्यक्तिमत्व होऊन जगणे हे कधी चांगले असते.      
        साधेपणा हा त्याचा दोष असतो पण हा साधेपणा त्याचा आत्मविश्वास आणि शक्ती असते. कारण त्याला हे सत्य माहीत असते. एक व्यक्ती एकच व्यक्ती असतो.... दुसरी कार्बन काफी नसते.             
       जगताना प्रत्येक व्यक्तीने सामाजिक सहरचनेला जीवनाच्या जगण्याच्या प्रवासात मान्यता द्यावी आणि त्याचे पालन करावे. कारण एक व्यक्ती एकच व्यक्ती असतो. अंतिम प्रवासाच्या यात्रेमध्ये आणि कर्माचा गोळा बेरीज करताना.
       कुंडीत फुललेले रोपटे आणि मातीत फुललेले रोपटे यात जमीन आसमानाचा फरक आहे. हे सत्य उमगले की सूर्याचा प्रकाश सात्विक वाटतो आणि चंद्राचा प्रकाश आपला वाटतो.!!💕

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

-------------------------------------

a person
 ...... There is only one person...!!


        When a person comes i.e. when he is born he breathes alone and when he goes away he stops his own breath...!!  It means that a person does not carry anything and does not bring anything, yet the question arises as to why words such as ego, hatred, dosha, enmity are given so much space in the mind of people.
        In fact, low-level thinking people use these words for others when they should be for themselves.  At that time it is divided which society it represents.  She only imposes on others by adding words like maan shamara samman with a sweet word called self respect of her ego.
       Society knows how good such people are.  Because the social structure is such that these individuals not only represent negative thinking but also muddy the positive thinking.
 
      Why all those positive minded people who say, ``time comes to everyone'' never find this person.  Maybe they have found that person and therefore say time comes to everyone.
       But the time of such persons never comes is a white line on a black stone.  Because this person never belongs to society.  This person is never loyal to anyone.  This person is never himself.
        The creature called ego is only its own selfish ego and is at war with itself.  How, where, when and how to make the other person come true with this war of your thoughts and it also makes it come true...!
      Since she is not aware of any social structure and has never been given this awareness by the family members, this awareness is Sanskar.  This awareness is attachment.  This awareness is intimacy.  This consciousness is family, this consciousness is the interweaving of relationships.  This awareness is the feeling of sacrifice...!
           A person with a sense of having been saved somewhere sees others in the water rather than just looking at themselves in the mirror.  So these feelings stay in the mind so much that it can never come out of it.  If one believes in reincarnation, one carries these feelings even in the birth of the reincarnation and preserves one's ego in the cycle of birth and death.
        But there is also a truth, 'A person is only one person.'  Nothing is carried on the way and nothing is brought on the way.  Ego, selfishness, hatred, enmity are worthless.  Sometimes it is better to live as a simple person than to treasure these earthen jewels.
          Simplicity is his fault but this simplicity is his confidence and strength.  Because he knows this truth.  A person is only a person.... Another carbon is not enough.
       While living, every person should accept and follow the social structure in the journey of life.  Because one person is only one person.  In the pilgrimage of the final journey and summing up the sum of karma.
        There is a world of difference between potted plants and soil-grown plants.  The truth has emerged that the light of the sun feels sattvik and the light of the moon feels ours.!!💕

 ©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote

 Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.
--------------------------------------------------------------------------


सोमवार, २२ मे, २०२३

काही हरकत नाही

     कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. एक प्रियसी आपल्या सोडून गेलेल्या प्रियकरा सोबतचा हा संवाद तिच्या एकांतात ती आपल्या मनासोबत संवाद साधत आहे काही हरकत नाही पण जिथे ज्या व्यक्तीसाठी तू गेलेला आहे त्या व्यक्तीशी तरी प्रामाणिक राहा कारण ती माझ्यासारखी नसावी या भावविश्वातून ही कविता शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न धन्यवाद.. !💔💔

...काही हरकत नाही ....

मला वाटायचे विपरीत परिस्थितीतही 
आपण सोबतच असू पण आता नाही 
काही हरकत नाही

सौंदर्याची परिसीमा काय असते 
माहीत नसतानाही ती संकल्पना 
रुजविली फुलविली मनात 
आता त्या शब्दांना किंमत नाही 
काही हरकत नाही 

असू दे 
गेलेली वेळ परत येणार नाही 
गेलेले क्षण परत येणार नाही 
स्वप्नाची धूळ माती झाली तरी 
काही हरकत नाही 

पण एक सांगते 
तुझ्यासोबत असण्याच्या सवयीने 
आता मनाने हरकत मात्र घेतली 
एकांताच्या सवयीची असलेली 
आता मात्र एकटीच्या प्रवासाने 
हरकत मात्र घेतली 
हरकत मात्र घेतली 

सांगायचे राहूनच गेले 
अंगणातला चाफाही एकटाच असतो 
गुलमोहर उन्हाच्या कडक उने सोबत हसत
पावसाचा प्रवासही थेंबान पासून सुरू होतो 
उन्हामुळे जमिनीला भेगा पडलेला जमिनीचाही प्रवास त्या थेंबामुळे पूर्वपदावर येतो 

तसच एकही हरकत न घेता 
तू जा पण एक लक्षात ठेव 
हरकत घेतली नाही म्हणून कोणीही 
हरकत घेणार नाही असे नाही 
प्रामाणिक राहा हरकत न घेतलेला 
व्यक्तीसाठी ज्या व्यक्तीसोबत 

तिथे निवांत रहा 
तिथे निवांत रहा  
काही हरकत नाही 
काही हरकत नाही...!💔

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

==========================================================

The poem is handwritten and composed.  Don't forget to like and share if you like.  This dialogue of a lover with her departed lover is in her solitude she is communicating with her mind no problem but be honest with the person you are gone for because she must not be like me thanks for this attempt to articulate this poem.. !💔💔

...no problem ....

 Even in the opposite situation I thought
 We will be together but not now
 No problem

 What is the limit of beauty?
 Even without knowing that concept
 Rooted in the mind
 Now those words have no value
 No problem

 let it be
 The past will not come back
 Past moments will not come back
 Even if the dream turns to dust
 No problem

 But one says
 In the habit of being with you
 But now the mind objected
 A solitary habit
 But now by traveling alone
 Objection was taken
 Objection was taken

 Needless to say
 Even the chafa in the courtyard is alone
 Gulmohar laughs with the heat of the sun
 Rain's journey also starts from Themban
 Due to the sun, even the ground cracked due to the sun will return to its original condition

 Without any objection
 You go but remember one thing
 No one minded
 It's not that they won't mind
 Be honest, never mind
 For the person with whom

 Stay calm there
 Stay calm there
 No problem
 No problem...!💔

 ©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote


Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.

==========================================================

 

शनिवार, १३ मे, २०२३

** गुलकंद **

           प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या संकल्पना ही वेगवेगळी असते. अशीच एक प्रेमाची भाषा  कवितेमध्ये शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न.                 आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वरचित  व स्वलिखित आहे.

** गुलकंद **

 अजून तरी  गुलकंद प्रेमाचा 
व्हायचाच आहे 
प्रतीक्षा त्या गुलकंदाची 
चवीला गोड की  कडवट असू द्या 
कसाही? प्रेमाचा गुलकंद व्हायला हवा 

कदाचित आता होईल 
चवीला गोडच असेल 
त्याच्या चेहऱ्यावरची लाली 
चोर नजरेने शोधणारी नकळत नजर 
ओठावरील हसू...,
 सांगू पाहत आहे 
गुलकंद होणार प्रेमाचा 
लाल भडक गुलाबाच्या साक्षीने 

खरतर काचेची भरणी 
खूप दिवस झाले रिकामीच आहे
 तिच्यात काही भरावे असे 
काही हातात आलेच नाही 
हातात यावा तो गुलाबाचा गुच्छ 
आणि मनसोक्त एक एक पाकळी 
करीत भरावी भरणी 
पण प्रेमाचा गुलकंद होण्यासाठी 
वेळ लागतो मने
पण ती वेळ आली आहे 
 प्रेमाचा गुलकंद होण्याची 💕!!

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

    ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
      कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
       कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आपल्या सूचना गोड- कडू दोन्हीही शब्दात नक्की कळवा आणि मनातील विचारांना शब्द द्या..!❤                   तुमची येण्याची जाणीव प्रतिक्रिया असतात. काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा...!!❤💕 धन्यवाद!!!!

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे  

         आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .


       If you liked today's accounting information don't forget to share and like. Make sure to let me know how you feel about my page in the comment box.

 You have a conscious reaction to come.  If you find any mistakes, please let me know in the comment box...!!❤💕 Thank you!!!!

    ©️®️✍️Savita Suryakanta Tukaram                Lote

 Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.



 =================================================  ==



गुरुवार, ११ मे, २०२३

अच्छा सुनो ना

अच्छा सुनो ना 
हर शाम  हर शाम देर से आना जरुरी है 
डर लगता है ना जाने एक दिन भूल 
तो नही जाओगे 
 सुनो ना, सुनते रहा करो..
 कभी कभी शायरी हमारे लिए भी किया करो 
पर जल्दी आया करो  हर शाम ...।।

✍️©️®️सविता सूर्यकांत तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .



==========================================================


बुधवार, ३ मे, २०२३

** शून्य *** " शून्य होता यायला पाहिजे"

*** शून्य ***

     " शून्य होता यायला पाहिजे"
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

     शून्य एक पायवाट असते. एखाद्या चुकलेल्या प्रवासाची परत सुरुवात असते. आत्मपरिक्षण करताना वाटते की, सुरुवात कुठे कुठून कशी करायची पण उत्तर तर त्याच शून्य जवळ असते. शून्य मागे लावावा समोर शून्याला किंमत मात्र असतेच.
         शून्य पुष्कळ वेळा काळोखात सूर्य प्रकाशासारखा सोबत असतो. आयुष्याला प्रकाशित करीत असते. मन भरून आले की आभाळासारखे बरसून जाते पण ओलेचिंब करीत नवीन पालवीना नवीन उम्मीद देत.

     शून्य मध्ये जी ताकद आहे ती अमर्यादित आहे. तर शून्य अपेक्षाभंगातून बाहेर काढते. शून्य जबाबदारीची जाणीव करून देते. शून्य झाले की कुणीही आपला फायदा घेत नाही. कदाचित त्यांना माहीत असते, आपल्यातील ते शून्य!!
       कारण ते शून्य होण्यापर्यंतचा प्रवास फक्त त्यांच्यामुळे झालेला असतो. शून्य परिस्थितीमुळे आपल्या वाटेला आलेले असते. शून्य अपयशाच्या अपेक्षाभंगाने व अति सर्व काही सुरळीत चालू असतानाही हे शून्य वाटेला येते.
      शून्य खडतर प्रवासातून घेऊन जाते. शून्य खडतड प्रवास अधिक अनुभवातून आयुष्य सुंदर करते. आयुष्य फुलविते.
       नवनवीन वाटा मोकळा करीत असते. मेहनतीला कुठेच मर्यादा नसते. यश पडदा असते. अपयश पडदा समोर असते. शून्य निरोपाला कधीच येत नाही.
       बदल हा शून्यातून होत असतो आणि आयुष्याला लांब चकचकित करून आपल्यालाही वेळेनुसार परिस्थितीनुसार शून्य होण्यास भाग पाडते.
      शून्य एखाद्या रोपट्यासारखे आहे. यशाच्या पायऱ्या चढल्यावर शून्य वाटेला आल्यावर काय होऊ शकते याची कल्पना मात्र करू शकत नाही तरीपण ते शून्य आपलापर्यंत येत असताना आपण इतके कसे शून्य होतो; याचा विचार मात्र शून्य झाल्यावर कळते.
   खरे सांगायचे तर, रोपट्याला आज फळ दिसते. ते अनेक दिवसापासून लावल्यामुळे ते फळाफुलांना येते. तसेच कदाचित शून्य असावे. आपण फक्त त्याकडे दुर्लक्ष करीत असतो. तर नवीन रोपट्याला खत पाणी द्यावेच लागेल.                 आपल्या परीने...!! कारण फळांची अपेक्षा आपली असते. ते शून्य आपल्या वाटेला आलेले असते. ते फळाचे रोपटे आपण लावले का असेना पण परिस्थितीने वेळेने मनाच्या झालेल्या वाटणीने आणि आणि आणि...... स्वार्थी झालेल्या मनाने ते रोपटे दुसऱ्याच्या अंगणात गेलेले असते.
            फळे आपल्याला हवी असते शून्य झाले तरी मातीत बी रुजवायची असते. एक दिवस येईल आपलाच फळांचा. एक दिवस येईल आपला श्रीमंत आनंदाचा. शून्य मन होऊन पायऱ्यांवर पायऱ्या चढताना मागे फक्त आपल्या पायांची ठसे आकृती रूपात साठविलेले असेल.  इतरांना शून्य होऊन पाहण्यासाठी...!

शून्याचा निरोप 
जीवन कधीच घेत नाही 
शून्य जीवन फुलविते 
सुरुवातीला 
शून्य कमकुवत 
असतेच 
पण शून्य कुठे 
लागेल याला अधिक 
किंमत असते
शून्य वाटेवरचा 
शून्य होत नाही 
शून्य हसरा 
मोकळा प्रवासाचा 
साक्षीदार होतो ...!❤

      शून्य चेहऱ्यावर दिसत नाही. शून्य मनात असते आणि हे शून्य प्रत्येकाच्याच मनात असते. हे आपण दाखविले तर त्याचा बाजार होतो. चर्चा होते. मनसोक्त आणि न दाखविल्यास झाकली मूठ सव्वालाखाची म्हणत नसलेल्या झाडांची फळे बाजारात सजविले जातात.
     असो, हेच शून्य जीवनाला ताकत हिम्मत आणि जगण्याची कला शिकविते. हे मात्र नक्की ढगाळ वातावरणात पाऊस येईलच असे नाही तसेच शून्य शून्य कितीही कोणीही पेरले तरी जर शून्य मनात नसेलच तर शून्य कधीच उगवत नाही.
          कर्म त्या शून्यासोबत आपल्या सोबत असते. कर्म हे कधीही विसरू देत नाही.  आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर कर्म आपले पाठ सोडत नाही. शून्य होऊन जगता यायला पाहिजे.
      कारण शून्याच्या पाठीमागे जबाबदारीची ढाल आणि तलवार असते. शून्याच्या पाठीमागे अश्रूंचा महापूर असतो. तो कधीही कुणालाही दिसत नाही. जो कोणी शून्य होऊन जगतो फक्त त्याच व्यक्तीला या महापुरात वाहून जावे लागते.       
       डाळिंबा सारखी लाल झालेला नजरेला नजर भेटले की, आत्मविश्वासाने सकारात्मक पद्धतीने जगावे लागते.त्याला कळत्या पण शून्य होत आहो तरीही त्याला आत्मविश्वासाने जगावे लागते.
        त्या व्यक्तीच्या विश्वासासाठी तो शून्य झालेला असतो. म्हणून शून्य होऊन जगता यायला पाहिजे. शून्य ही अशी पायवाट आहे, तिथे जगण्याची कला शिकविली जाते तरीही ती शिकल्या जात नाही. कारण तो शून्य होत असतो फक्त त्याला जबाबदारी तितका शब्द माहीत असतो.
 
     ©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

--------------------------------------------------------------------------


*** zero ***

 "Must be zero"
 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

 Zero is a path.  A lost journey begins again.  While introspecting, one thinks, where to start, but the answer is always close to zero.  Zero should be placed behind but zero in front has a price.
 Zero often accompanies darkness like sunlight.  Illuminates life.  When the mind is full, it rains like the sky, but it wets and gives new hope to the new palavi.

 The power that exists in the void is unlimited.  So zero takes it out of expectation.  Zero sense of responsibility.  When it becomes zero, no one takes advantage of it.  Maybe they know, that void of us!!

Because the journey to zero is only because of them.  Zero circumstances come our way.  It comes with zero failure expectations and zero failure even when everything is running smoothly.
 Zero takes you through a tough journey.  Zero bumpy journey makes life beautiful with more experience.  Life blooms.
 New paths are being paved.  There is no limit to hard work.  Success is a curtain.  Failure is in front of the curtain.  A null message never occurs.
 Change comes from nothingness and makes life long and makes us become nothing in time.
 Zero is like a plant.  While climbing the ladder of success, we cannot imagine what can happen when we come to zero, but when that zero comes to us, how do we become so zero;  But this thought becomes known when it becomes zero.
 


To be honest, the plant can see the fruit today.  Since it has been planted for several days, it comes to fruition.  Also probably zero.  We are just ignoring it.  So the new plant needs to be fertilized and watered.  By yourself...!!  Because we expect fruits.  That zero is coming your way.  Even if we have planted those fruit trees, but due to circumstances, time, division of mind and and and... selfish mind, those saplings have gone to someone else's yard.
 Even if we want fruits, we want to plant seeds in the soil.  One day our own fruits will come.  One day your rich happiness will come.  As you mindlessly climb the stairs, only your footprints will be stored behind.  To see others become nothing...!

 Farewell to Zero
 Life never takes
 Zero life blooms
 Initially
 zero weak
 There is
 But where zero
 More will be needed
 There is a price
 Zero path
 does not become zero
 zero smile
 Free travel
 Witness...!❤


Zero does not appear on the face.  Zero is in the mind and this zero is in everyone's mind.  If we show this, it becomes a market.  There was a discussion.  Fruits of trees not called zakali muth savvalakhachi are garnished in the market if desired and not shown.
 However, this is what teaches zero life strength, courage and the art of survival.  However, it does not necessarily rain in cloudy weather, and no matter how much one sows zero zero, if zero is not in the mind, zero never grows.
 Karma accompanies us with that void.  Karma never lets you forget it.  Karma never leaves your back at any stage of life.  One should be able to live as zero.
Because behind zero is the shield and sword of responsibility.  Behind zero there is a deluge of tears.  He is never seen by anyone.  Only one who lives in nothingness has to be swept away in this deluge.
 When he meets eyes red as a pomegranate, he has to live in a positive manner with confidence.
 It is void for that person's faith.  Therefore, one should be able to live as zero.  Zero is such a path, where the art of survival is taught yet unlearned.  Because he is becoming zero, only he knows the word responsibility.

 ©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote

 Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.


=========================================!==!======!!!!!!!!=====
 

** कटू पण सत्य विचारधारा एक ***

*** कटू पण सत्य विचारधारा एक *** 


शून्यहीन व्यक्तीला एक सत्य कधीच 
कळत नाही सत्य लफविता येते. 
सत्य अपशब्दांमध्ये झाकल्या जाऊ शकते. 
पण कर्म हे सत्य कधीच विसरत नाही.
कर्म आपले फळ योग्य वेळी योग्य पद्धतीने आपल्या वाटेला देऊन जाते.
 कटू पण सत्य विचारधारा एक..!! 

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे


***************************************


*** Bitter but true ideology one ***


 A zeroless person is never a truth
 The truth can be hidden without understanding.
 Truth can be covered in slander.
 But Karma never forgets this truth.
 Karma pays its way at the right time in the right way.
 A bitter but true ideology..!!

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote




==========================================================

सोमवार, १ मे, २०२३

......फार झाले तुझे.....

.......फार झाले तुझे..... 

आता फार झाले 
असा जवळ असताना 
लांबच लांब असतो विचाराने 
जगण्याच्या या पायवाटेवर 

आता फार झाले तुझे 
सावलीची ही ओळख नसावी 
इतका लांब आहेस तू 
वेदनेच्या या महाजाळ्यात 

तुझे असणे 
नसण्यासारखेच आहे 
तुझे शब्द आणि माझे शब्द एकच 
 पण विटाळ मात्र साताजन्मांचा 
फार झाले तुझे आता 

आता फार झाले तुझे 
हातावरची मेहंदी रंगहीन होत आहे 
पुसट झालेल्या रेषासारखे 
तळपायातली बोटे ही आता थांबली आहे 
त्या विशेषणासाठी 
पायातले पैंजण घुंगरू असले तरी  
आवाज हीन  झाले आहे 

आता फार झाले तुझे- माझे 
आता प्रवास नवीन चालू करावा  
वाटतो थांबणे आता फार झाले 
माझे सोडावेच लागेल शेवटी 
जिंकलास आहे तू  
हरवले कुणास माहित नाही 
तुझे फार झाले आता 
असा जवळ असताना 
लांबच लांब  असणे

✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 
        कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर नोंदवा. धन्यवाद...!!!

******************************************************************************

शनिवार, २९ एप्रिल, २०२३

पाणी

        डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्यासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि पाणी सर्वांसाठी खुले केले.
        पाणी हा शब्द कशा पद्धतीने वापरला जातो. हा अनुभव शब्दबद्ध करण्याचा छोटासा प्रयत्न.
       आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्या दुरुस्त केल्या जातील.

 **** पाणी ****

गेटच्या आवाजाने बाहेर गेली एक स्त्री होती 
कुंकवाने माथ्याला सजवून माहित नाही तिच्यात आकर्षण होते अनोळखी 
पोट तिडकेने पाण्याचा धर्म मागत होती 
पाणीच ते पाण्याचा धर्म करावा  
फ्रिज मधील पाण्याची बाटली दिली  

तिच्या हातात, तिला ओंजळ करू दिली 
नाही तिच्या हाताची माहित आहे 
पाण्याचा धर्म ; बाबासाहेबांनी याच पाणाच्या धर्मासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला  
याच पाण्यासाठी रक्ताच्या नद्या वाहिल्या होत्या 
अन्न पायदळी तुडविले गेले होते 
डोके फुटली गेली होती 
याच पाण्याच्या धर्मासाठी 

 तिच्या हातात पाणी दिले काहीसे प्रश्नचिन्ह चेहऱ्यावर घेऊन पाण्याचा घोट पोटात  
परत ती तिच्याच भूमिकेत कुंकू हळद दे 
नारळ अगरबत्ती कापूर दे वाह 
तुज हे होईल तुझ ते होईल  
अंधश्रद्धेची टोपली समोर मांडली मांडत राहिली तिच्या शब्दात भविष्याच्या कल्पना भूतकाळाच्या गणिताबरोबर आकडेमोड करीत 

आकर्षण मला त्या काळाभोर चेहऱ्यावर फासलेला त्या लाल रंगाचे त्याने ती सांगू 
पाहत होती माझे भविष्य 
तिला साधी कल्पनाही नसावी या पाण्याच्या धर्मासाठी कधीकाळी बाबासाहेबांनी सत्याग्रह केला याच पाण्यासाठी बाबासाहेबांनी वणवण रस्त्याच्या कडेला प्रत्येकाला पाण्याचा धर्म मिळावा म्हणून आणि... 

तिला हवी होती भविष्याची माझ्या सुखी स्वप्नांची ओंजळ तिला माहितही नव्हते तिचे भविष्य दोन क्षणानंतरचे ती सांगत होती  पुनर्जन्माची कहाणी भविष्याचे सुखद स्वप्न तिच्या अंधश्रद्धेवर माझी श्रद्धा वरचढ होती कारण मी बाबासाहेबांची लेक होती 
अधिकार कर्तव्य माझ्या जबाबदाऱ्या आणि संविधान, ती प्रत ! तिथे स्त्री म्हणून मिळालेला हक्क 

माझी श्रद्धा सांगू पाहत होती 
तिच्या अंधश्रद्धेला हा माळवट पासून भिकाऱ्याचे देण घेऊ नको 
ही अंधश्रद्धा सांभाळून तुझी समोरची पिढी अंधकारमय करू नकोस 
तू ही अंधश्रद्धा सांभाळून गुलामगिरीत जाऊ नकोस 
बाबासाहेबांनी अहोरात्र अभ्यासाच्या साक्षीने काढलेल्या आजच्या या जगण्याला श्रद्धा तिच्या अंधश्रद्धेवर मात करत होती 

मनातच हळूच हसले  
मी तुला अन्नाचे दान वाढते 
एखादी बाबासाहेबांचे पुस्तक देते
मी तुला डब्यात असलेले दाळ तांदूळ गहू बाजरी माझ्याच ऐपतीप्रमाणे सेरभर का होईना पण 

तिची अंधश्रद्धा तिथेच हळद-कुंकवात नारळ कापूर धूपात हसाव की रडाव या प्रश्नातच माझ्या भविष्याचे गणित तिने मांडून टाकले या वेळेत तिच्या अंधश्रद्धेला बळी न पडता मोठ्या आवाजाने अन्न नको असेल तर जा 
या शब्दात बोलू तिला ताटा बाय-बाय केला 

पण ती ही कुठे श्रद्धेला बळी पडणारी होती 
परत पाण्याचा घोट घेत रस्त्याच्या कडेला उभी राहून त्याच पाण्याने कुंकवाला भिजवत कपाळावर लावत नवीन घरी नवीन शब्दांची रांगोळी दाराच्या झेंडाकडे बघत 
अभिमानाने बोलू लागली धर्म कर पाण्याचा तीही बाहेर आली तिने धर्म केला पाण्याचा 
पोळी भाजीचा पण ती ही तिच्याही अंधश्रद्धेला फसली नाही 
परत हसू आले समाधानचे 
तिच्या अंधश्रद्धे समोर कोणताच झेंडा फसत नाही कोणताच रंग फसत नाही 
कोणताच भावना फसत नाही 
श्रद्धा इतकी महत्त्वाची  

कदाचित वाचला असेल बाबासाहेब 
तिलाही माहीत असेल संविधान 
कदाचित तिलाही माहित असेल 
अंधश्रद्धेच्या टोपलीतल्या सत्याची परिकल्पना कदाचित तिलाही माहीत असेल 
बाबासाहेबांचे चवदार तळ्याचा सत्याग्रह 
ती वणवण .....
'पाण्याचा धर्म कर ग बाय ',या शब्दाचा अर्थ तिलाही माहित असेल 
पाण्याचा धर्म कर ग बाय...!!   
या शब्दाचा अर्थ !

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

--------------------------------------------------------------------------



गुरुवार, २७ एप्रिल, २०२३

चारोळी मराठी

चला तर मग फिरून येऊ या 
आपल्याच मनातील निवांत 
स्वप्नांची वाट 
आपल्यासोबत एकांतात

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

चारोळी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. शेअर्स आणि लाईक करायला विसरु नका धन्यवाद



============================!!

रविवार, २३ एप्रिल, २०२३

** पुनर्जन्म **

** पुनर्जन्म **

जगणे ठरलेले आहे मरणाचा वाटेवर 
भोगून जावे आत्ताच पुनर्जन्माची वाट नाही 

कोण कोणास ठाऊक फुलाची संधी अजूनही रक्ताळलेल्या मनात आहे फाटल्या नशिबातील 

जगाच्या वाटेवर उणे फार झाले आता 
हृदयात गाणे मैफिलीचे फार झाले आता 

प्याले नको सुखाचे प्याले नको हिरवळीचे आता जरुरी जगण्याची वाट आता फाटक्या रस्त्याची 

गाथा गाथा खोल मनाच्या दरीची पुन्हा 
न जिंकणे आता जीवनाचा सुगंधी पाकळ्यात

जगणे ठरलेले आहे मरणाच्या वाटेवर 
भोगून जावे आत्ताच पुनर्जन्माची वाट नाही


✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
      कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
       कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आपल्या सूचना गोड- कडू दोन्हीही शब्दात नक्की कळवा आणि मनातील विचारांना शब्द द्या..!❤

        आजच्या लेखा संबंधीची माहिती तुम्हाला आवडली असल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका.माझे पेज कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. 

        तुमची येण्याची जाणीव प्रतिक्रिया असतात. काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा...!!❤💕 धन्यवाद!!!!


       If you liked today's accounting information don't forget to share and like. Make sure to let me know how you feel about my page in the comment box.

 You have a conscious reaction to come.  If you find any mistakes, please let me know in the comment box...!!❤💕 Thank you!!!!

    ©️®️✍️Savita Suryakanta Tukaram                Lote

 Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.


==========================================================


शुक्रवार, २१ एप्रिल, २०२३

चारोळी कविता

चुकीच्या नात्याला कितीही वेळ दिला 
तरी शेवटी सुरुवात 
चुकीचीच होती हे कळतेच 
एका क्षणानंतर एका पावलावर

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

    आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

=============================


Any amount of time given to the wrong relationship
 But finally the beginning
 As soon as we know that it was wrong
 A moment later on a step

 ✍️ ©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

         Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.



=============================

गुरुवार, २० एप्रिल, २०२३

चारोळी (प्रेम चारोळी )

उन्हाळ्यात पाऊस आणि पावसात 
तू आणि मी  झालेल्या 
अवकाळी पावसात स्वप्न रंगीबेरंगी 
दाहकता कमी असलेली 

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .



-------------------------------------



रविवार, १६ एप्रिल, २०२३

चारोळी

स्वभाव गोड किंवा तिखट कोणताही असला तरी माणुसकीच्या नियमांचे उल्लंघन कुणी करू नये  प्रत्येक वेळी समोरची व्यक्ती गोडच असेल असे 
नाही आणि तिखट असेल तर कचरा त्या क्षणांचा

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

=============================

दोन ओळी कविता (चारोळी)

कधी एकटाच चालून बघ यशाच्या पायऱ्या अगदी            जवळ असतील वाट बघत


✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

          आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .


-------------------------------------

 Sometimes walking alone, the steps      to success are waiting for you

✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

 Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.



==========================================================


माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...