savitalote2021@bolgger.com

रविवार, ९ मे, २०२१

माझी रमाई

------माझी रमाई ------
अपार कष्ट करुनी झिजली 
माय रमाई आम्हासाठीच
भिमाचा संसार प्रवास ओढीत
बौद्धिक- मानसिक शक्तीप्रतिमा... 
भिमाची!!!
आयुष्याचा प्रवास 
खडतर 
एका वस्त्रानिशी... सोबत; उपाशीपोटी 
काटेवरती चालती....
सुसंस्कृत माझी माय माऊली रमाई
सौभाग्य हाच तिचा दागिना 
ना शालुत नटली ना सोन्यात नटली 
हातात क्रांतीची मशाल घेऊन 
ज्ञानाची प्रकाशवाट दाविली 
संघर्षाची... जळती मशाल 
माझी माय माऊली रमाई
भुकेल्या वस्तीगृहातील खंबीर... 
प्रेरणाशक्ती तूच !
आणि भीमाची हृदय संवेदनाही तूच 
आम्हा सर्वांची कीर्तिवान माय माऊली 
माझी रमाई!!!
           ----सविता तुकाराम लोटे ---- 

शुक्रवार, ७ मे, २०२१

चारोळी कविता नजर रोखून

इथे थांबणार नाही विचार मंथन अनुत्तरीत 
किंचाळताही येत नाही फितूर झालेल्या 
क्षणांसाठी, एक वेगळीच लाट 
नजर रोखून ...आयुष्यातील!!
                           सविता तुकाराम लोटे

गुरुवार, ६ मे, २०२१

विसावा नाहीच

विसावा नाहीच 
पायांना आणि हातांना 
थांबवले; जरी दोन क्षण 
विसाव्यासाठी
मुक्त नाही, मेंदू...  
दिवसाचे तास जरी
पिंजऱ्याचे आयुष्य झाले 
मानवी वसाहतीचे 
तरी ...
विसावा नाहीच... कुठेच!
तरी चालले 
धुंदीत अपुला अभिमानाने 
वर्दीच्या रुबाबात 
विझलो तरी चालले 
....बेसावधपणे तरी 
विसावा नाहीस पावलांना 
ऑन ड्युटीतील
वर्दीतल्या माणुसकीला!!!
            सविता तुकाराम लोटे 
---------------/////////------------

फक्त चालत राहायचे

-----फक्त चालत राहायचे------
फक्त चालत राहायचे 
आपले घरटे सोडून 
आपल्या जीवनाचा 
श्वास वाचण्यासाठी 
मानव निर्मित तुफानी 
वादळाबरोबर संघर्ष 
करीत... 
येईल आपले घर 
मायेचे !
पावलांना 
सवय नसली तरी 
थांबणे नाही 
आता.... 
पुन्हा 
मुक्त उडण्यासाठी 
आनंदाने!
कदाचित 
अंगात शक्ती नसेल 
तरी 
नवीन आलेल्या 
संकटाला सामोर जाऊ 
पुन्हा... घरटे बांधू 
नवीन उमेदीने 
मौन होऊन जाऊ 
आपले घरटे सोडून 
परतीच्या सुखद 
आठवणींच्या स्वप्नहिंदोळ्यावर 
फक्त चालत राहायचे!!!
                सविता तुकाराम लोटे 
----------------------------------


मंगळवार, ४ मे, २०२१

तुझी सोबत हवी

----------तुझी सोबत हवी -
तुझी सोबत हवी 
भावनेच्या मोहरलेल्या 
स्तब्ध पावलांना 
चालविण्यासाठी..... 
अफाट सागर किनारी 
अडथळ्यांना मात करी 
ओळखीच्या खुणा रस्त्यावरी 
चाललेला; 
हातात हात 
बरोबर वळणावरील 
पाऊलठसावरी शांत!
अभिमानाने....
रेतीतील नाजूकपणाने
सुखद 
स्थिर.... 
फुललेल्या 
मनशांत
भरलेला शब्द साखळीने
तुझ्या पावलांची सोबत 
माझ्या पावलांच्या सोबतीला 
श्वास रोखून 
हात हातात ठेवून 
तुझी सोबत हवी
पाऊलखुणांवर !!!!
      सविता तुकाराम लोटे 
-------------------------

सोमवार, ३ मे, २०२१

एक रात्र

----------एक रात्र ----------

           संध्याकाळच्या कातरवेळी मधून रात्र हळूहळू उलगडत असते. जन्मापासून प्रत्येक व्यक्ती ही रात्र अनुभवत असते. त्या अनुभवातून आपले नाते साखळीसारखे गुंफत जात असते... जणू सुखदुःखांच्या नात्यात बरोबर आयुष्यात वेगवेगळ्या रूपाने आपल्याला भेटत असली तरी सावली प्रमाणे सोबत राहते. आपण जगत असतो; आपल्या आयुष्यातील जाळ्यामध्ये...
           सुकलेल्या फुलातून जसा सुगंध शोधता येत नाही पण हळुवार येणाऱ्या रात्र मधून स्मृतीची आठवणी मात्र सुगंधित होऊन जाते. रात्र जगायला शिकविते सूर्य ती तिच्या पलीकडे जाताना सांगत असतो. आयुष्याचे स्वप्नक्षितीचे... सोनेरी संध्याकाळ रात्री तू उलगडत जाते. कधी कधी रात्र आपला अनोळखी सुद्धा करून जाते. तेव्हा आपण आपल्याला शोधत असतो.                          काळ्याभोर रात्रीमध्ये असंख्य कल्पना जन्माला येतात; तेव्हा पण साथ देत असते. रात्र रात्रीच्या पावलांनी हळूहळू काळ्याभोर आभाळात उठलेल्या कल्पनांच्या वादळे मध्ये स्वतः गुंफत जात असते.
           रात्र होतांना निळा आभाळाला सोनेरी गडद तांबूस रंग सोडून जात असतो... झाडावरील पक्षांचा किलबिलाट सुद्धा कमी होत जाते. क्षणाक्षणाला मन सांगत असते ही कातर वेळची संध्याकाळ काहीतरी घेऊन जात आहे. अंधाऱ्या सावल्या बरोबर आपली स्वतःची ही सावली आपल्यामध्ये येऊन जाते. कणाकणाला आपली असते अशा जरी दिवसभर भास होत असला तरी मात्र कातरवेळची रात्र पायातील काटे आपल्याला काढण्यासाठी बळ देत असते; रात्र....

         पायातील काटे काढताना रात्र बळ देत असली तरी मनाला तयार करावे लागते.. एक एक किरण गोळा करीत जगलेल्या आपल्या आयुष्यातील वादळ वा-यांना... वादळ वाऱ्याबरोबर उध्वस्त केलेल्या स्वप्नांना कधी ती रात्र आपल्या स्वप्नाची साक्षी होती .आवाज न करता येऊन गेलेली चुकून भरलेल्या आयुष्यात स्वप्न घायाळ करीत असतात. जुनं बदलत चाललेले असते पण रात्र घायाळ मनाला ओलेचिंब करीत असते भिजलेला प्रवास चालू असतो तरीही....
      रात्रीचा काळाभोर काळोखात रानावनात जाताना अशी पायवाट चांदणी चंद्राच्या साक्षीने शोधावे लागते तसे मन सुद्धा शोधत असते. झुलणाऱ्या फांदीला भिजलेल्या प्रवाशांना नवीन संकेत देण्याचा प्रयत्न करीत रात्रीच्या अंधारामध्ये फुलत असले  तरी दिवस उजाडेपर्यंत मनातील कुठल्याही कोपऱ्यात नामशेष होत असते.                  वाहत्या पाण्यावर झाडांच्या सावला नुसत्या थरथरत राहतात... पण पाणी जात असते. आपल्या शेवटच्या प्रवासाला. वाहत्या पाण्यातील तो तर खळखळाट मात्र जागे ठेवत असते रानाला. रानातील सजीव निर्जीव वस्तूंना त्यांनाही सोबत लागते. 
          अंधारमय रात्री वाहणाऱ्या पानाची स्वच्छ निर्मळ पाण्याच्या पण त्यांच्यासोबत सुद्धा असते. रात्र आपल्या जगासाठी रात्र बळ देत निर्मळ पाण्याच्या गोडवा बरोबर सुरक्षित सुद्धा तेथे हीच रात्र!
        थंडगार वाऱ्याबरोबर उमलत असतात रंगबिरंगी फुले.त्यांच्या सुहासाने सुगंधाने धरणी सप्तसुहासीत होते. जीवनातील प्रत्येक रंग 'रात्र ', मनसोक्त मनमोकळेपणाने जगत असले तरी विचारांचा धो धो वाहत जातो कुठेतरी आणि आपल्यामध्ये घेउन जाते. वाटेतील दगड मध्ये येणारे अडथळे तशी रात्र घेऊन येते. भावनांना 
भावनेबरोबर आपले मन मोकळे नाते निर्माण करते. जुन्या नवीन आठवणींना साता जन्माची नाते. 
           जीवनातील विविध नात्यांनी रंगून रात्र आपल्या जीवनाला अविभाज्य भाग बनला आहे. आपल्या मनाचा भावविश्व मध्ये  रांगते रात्र मन शांत असले तर रात्र हवीहवीशी वाटते .दिवसातील दुभंगलेले शांततेमध्ये एकत्रित गुंफीली जातात. 
        रात्र अंधारमय असली तरी नवीन दिशेला किरणमय ठरत असते .लहानपणी तील रात्र आठवण मनाला इतकी हवीहवीशी वाटते पण ती रात्र पुन्हा कधी न भेटण्यासाठी असते .अशा कितीतरी रात्री मनातील कोपऱ्यांमध्ये साठवून ठेवीत असतो. आपण आयुष्यातील पायलट म्हातारी होत असतांना बळ देत असते जीवनातील शेवटचा प्रवास सोपे करण्यासाठी जगण्यासाठी !
     'रात्र,' तुझ्या माझ्या मनातील भावना निशब्द सांगून जात असते. शब्दावाचुन मनाला घोर लावून जाते; मात्र त्यावेळी वैरीण वाटतं जीवनातील सुखदुःखाची गोळाबेरीज मांडताना.
      संपू नये असे सारखे वाटत असले तरी हातातील वाळूसारखी निघून जाते  ' ती' ,चांदण्याच्या प्रकाशात.
          निसर्ग ऋतूप्रमाणे जीवनाच्या वाटेवर भेटत असतात. असंख्य रात्री. प्रत्येक रात्र वेगवेगळे, नवीन भावविश्वात येणारी ,नवीन कल्पनांना आकार ,चित्रित करणारी ,अंधारमय वाटेवर दिवसाचे स्वप्न दाखविणारी ...
         आपण झोपेत असलो तरी ती जगत असते चांदण्याच्या उजाडलेला स्वप्न किनाऱ्या बरोबर धुंद होऊन अशा असंख्य रात्री असंख्य कल्पनांना अंधारमय वेळी आकार देत ... दिवसाचे आशामय स्वप्न देऊन.आशामय स्वप्न जगत असते .या रात्री मुळे दिवस मावळता हळूहळू सांज गारवा मनाला हवा हवा वाटतो मनी येऊन जाते त्या गार वारा आभाळातून खाली यावा आणि सोनेरी किरणाला मिठी मारावी.
      रात्र येत राहाते. नात्यांना नवीन अर्थ देण्यासाठी... आयुष्यातील वेगवेगळ्या रूपांना सुगंधित करण्यासाठी विणलेल्या स्वप्न जाळ्यां मधील कोडे सोडविण्यासाठी. सुगंधित फुलातील सुगंध फुलविण्यासाठी उत्कटपणे आपल्याला अनुभवायला मिळते ,एक रात्र..!
        
                सविता तुकाराम लोटे 
----------------------------------
       
          

रविवार, २ मे, २०२१

अंधारलेल्या वणव्यात


-----अंधारलेल्या वणव्यात----

वणव्यात चालले होते 
वास्तवाच्या आणि समोर आलेच
सत्य... अंधारलेले
वाटेत थांबले मग 
जपुन टाकले 
भान ठेवून पावले 
श्वास रोखून...
तरी समोर आलेच 
सत्य ...अंधारलेले 
चेहऱ्यावर राग आला 
तरी डोके शांत ठेवले 
मन मोकळे नाही केले 
वेळ येऊच नाही दिली 
वाकले ...झुकले 
तरी समोर आलेच 
सत्य...अंधारलेले 
जपली नाती ...
तळहातातील मेहंदीसारखी...
जवळून आणि लांबूनही 
रक्ताळलेली क्षणापुरती 
निघाली; पश्चातापाचा साखळीमध्ये! 
पण जपून पाहिली
तरी समोर आलेच 
सत्य.... अंधारलेल्या वणव्यात
      सविता तुकाराम लोटे 
----------------------------------

शनिवार, १ मे, २०२१

प्रीत

------प्रीत -----
प्रीत माझी तुझी 
काही वेगळीच 
जीवनात फुललेली
आणि उजळलेली
प्रीत माझी तुझी 
हसऱ्या एकत्र क्षणांची 
न संपणारा शब्द साखळींची 
भरकटलेल्या स्वप्नांची
प्रीत माझी तुझी 
अबोल शब्द ओठांचे
मनमोकळा हदयाची 
भाषा.... आयुष्याची 
प्रीत माझी तुझी 
वचनबध्द मर्यादेची 
बघू जमतंय का? बोलण्याची 
आणि हळूच 
तुझ्या मिठीत शिरण्याची
प्रीत माझी तुझी
भिजलेल्या धूंद प्रेमाची 
आस देणाऱ्या जगण्याची 
उजळलेल्या स्वप्नांची 
प्रीत माझी तुझी 
   काही वेगळीच!!!
           सविता तुकाराम लोटे 
      -------------------------

सांज गेली

-------सांज गेली -------
सांज होती 
मी बसले होते 
सागर किनारी... तुझाच 
हात - हातात माझ्या 
...मोबाईल सोबत 
अलगद,
अश्रुधारा नयनात 
निशब्द, सगळ्या 
भांडकुदळ भावना 
आता 
जाणवू लागला 
वेदना ...सरसकट
वा-यांचा सोबतीने
मनापासून! 
पायाखालील 
वाळू...  सरकलेली 
अधिक सांज आली  
रुसलेल्या प्रेमाची 
हसणाऱ्या ओठांची
कोसळणाऱ्या लाटांची 
भिजलेल्या पापण्यांची
अलगद 
तुझे हात बाजूला करून 
अमावस्येच्या रात्रीसारखे 
मन हरवून.... 
दूर कुठेतरी बघत!
हात हातात घेऊन
हात सोड ना !
नको राहू दे 
मनात गुंतलेला... 
नेहमी स्वच्छ आठवणीसंग
पण; 
ढगाळलेले क्षण ठेवून ज्या
शांत लाटेसारखे... मुके 
आणि 
हळूच सांज गेली
हाता -हातात ठेऊन
मनमोकळा मनाने! 
      सविता तुकाराम लोटे 
    


---------------------------------

पैंजण



--------पैंजण------------- 
पायातील पैंजण वाटली नाही 
कधीच बेडी... भूमिका बदलला तरी 
सौंदर्यात भर टाकली जेव्हा तो 
बोलून गेला... पैंजण आवाज छान 
चुकला नजरेने पण हसऱ्या शब्दांनी 
गोंधळत... हलक्या आवाजात मोहून टाकले  चोहीकडे परिसर... मनातील श्रावण 
चालत राहा अशीच ...पैंजण आवाजात
पोहोचले शब्द... तुझे सुखात 
फॅशनच्या कोणत्याही रूपात ये 
माझ्यासमोर ...
प्रसिद्धीच्या कोणत्याही माध्यमातून ये माझ्याकडे...
मी ओळखेल! अनोळखी झालो तरी, गर्दीत 
पैंजण आवाज परिपूर्ण झालेल्या भूमिकेत 
पायातील पैंजण वाटली नाही 
कधीच बेडी... भूमिका बदला तरी 
कितीही
                   सविता तुकाराम लोटे 
-----------------------------

शुक्रवार, ३० एप्रिल, २०२१

डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि कामगार विचार

        डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्त्री  कामगार विचार

          भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर एक थोर विचारवंत  शिक्षणतज्ञ , कायदेपंडित , संसदपटू  संपादक ,लेखक ,वकील, प्राध्यापक , समाज सुधारक , घटनाकार ,एक अभ्यासू आमदार  खासदार  अशा  पदांना भूषविलेले व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब ! त्यांच्या या कार्याची दखल सर्वांनीच घेतली.

         १९३६  साली स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. या पक्षाचे ध्येय धोरणे कुठल्याही जाती धर्मासाठी नव्हते तर कष्टकरी समाज वर्गासाठी होते. आर्थिक-सामाजिक राजकीय हक्कांसाठी होते. यातूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शोषित कामगारा विषयीची तळमळ लक्षात येते. १५ ऑगस्ट 1१९३६ धोरणाचे ध्येय धोरणे अतिशय साध्या पद्धतीने आणि सूक्ष्मसखोल विचार पद्धतीने मांडले.

         कष्टकरी समाज वर्ग सत्ता संपत्ती पासून वंचित होता वाटेल तसे राबविले जात होते त्यामानाने मोबदला मात्र अल्प द्यायचे बारा बलुतेदार पद्धती समाजमान्य होते दलित अस्पृश्यांची स्थिती दयनीय होती शोषित कष्टकरी कामगार वर्ग गुलामीचे जीवनमान जगत होते.            १८७३ मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाज चळवळीने पारंपारिक समाजात चौकट उद्ध्वस्त केले या चळवळीने समाजातील अस्पृश्यांचे जीवन शैली दाखवून दिले या चळवळीमुळे अस्पृश्य समाज वर्गाला  जीवन जगण्याची  नवीन पद्धत प्राप्त झाली जीवनाला धैर्य प्राप्त करून दिले रोजगार शिक्षण जगण्याचे सामाजिक मूल्य इत्यादी बळ दिले.

             डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ज्या जबाबदाऱ्या स्वीकारला त्या सर्व जबाबदाऱ्यांमध्ये  आपला ठसा उमटवलेला आहे १९४२ते १९४६ या काळात केंद्रीय श्रम व रोजगार ऊर्जामंत्री म्हणून कार्यरत असताना आपले मत रोख ठोक पद्धतीने मांडले ते म्हणतात," आता काळ बदलला आहे. सत्तेच्या व कायद्याच्या जोरावर कामगार वर्गाला दडपणे शक्य नाही. कामगार हा माणूस आहे. त्यांना मानवाचे हक्क मिळाले पाहिजेत. सध्या सरकार पुढे तीन प्रश्न  आहेत एक तडजोडीचा, कामगाराची निश्चित वेतन , कामगार मालक यांच्यातील सौहादपूर्ण संबंध कामगारांचे राहणीमान उंचावले पाहिजे. आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे. मी नेहमीच कामगार वर्गाच्या बाजूने उभा राहीन.” आपली कार्यपद्धती ही कामगारांच्या बाजूने आहे हे त्यांनी मांडले. 

     २९ मार्च १९४५ स्त्री कामगारांचे स्त्रियांसाठी प्रसूतीचा काळ विश्रांतीची तरतूद, रोख मदत करणे, चार आठवडे प्रसूती भत्ता मिळावा तसेच गैरहजर असताना पगारी सुट्ट्या मिळाव्यात. खाण कामगारांना शॉवर बॉथची योजना सुद्धा अंमलात आणली होती.

     डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खाण मजुरांसाठी आपले विचार भाषणातून  व कायद्यातून मांडताना दिसतात. स्त्री कामगार अन बद्दलची आत्मीयता त्यांच्या कौटुंबिक समस्या संसार विषयी चिंता त्यांच्या जीवनाचा उन्नतीचा मार्ग हा आर्थिक परिस्थिती सुधारेल तेव्हाच सुकर होईल.  

     बाबासाहेब यांनी १९४५ आली महागाई भत्ता निर्णयामुळे अर्थ मजूर मंत्री असताना बाबासाहेबांचे निर्णय हे कुठल्याही विशिष्ट जातीला समोर न ठेवता समाजातील सर्व जाती धर्मातील कामगारांच्या हितांचे असतील असे निर्णय घेतले स्वातंत्र्य समता बंधुभाव या सूत्रांनी बांधणारी भारतीय राज्यघटना दिली. देश एकसंघ ठेवला.

          ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे भारतीय कामगारांचे दोन शत्रू आहेत असे त्यांचे मत होते. कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करणे, मालक आणि कामगार यांच्यात औद्योगिक विवाद झाल्यास दोघात समेट घडवून आणण्यासाठी यंत्रणा निर्माण करणे, कामगार आणि मालक यांच्या कोणत्याही वाटाघाटीसाठी तरतूद करणे, वर्षातून किमान 240 दिवस काम, कामगारांना दिवसभरात आठ तास काम, नोकरीत असताना जर  कामगाराचं अपघात व मृत्यू झाला तर मालकांकडून कामगाराला नुकसान भरपाई देणे. असे मत त्यांनी दिल्ली येते जॉईंट लेबर कॉन्फरन्स(Joint Labour Conference 1942) मध्ये कायद्यात एकवाक्यता असावी असे मत व्यक्त केले.  

        त्यांनी स्त्री कामगारांना कायद्यान्वये रात्री काम करण्यासाठी बंदी , स्त्रियांना प्रसुती काळात भर पगारी सुट्टी, बारमाही कामगारांना हक्काची भरपगारी सुट्टी,सक्तीची तडजोड , लवादा हे तत्व कामगारांच्या न्यायासाठी कायमस्वरूपी केले. त्यांचे हक्क वेतन विमा आरोग्य संरक्षण कामाचे तास इ. 

आधुनिक समाजव्यवस्था बदलता आहे. जागतिककरण आले औद्योगीकरण सुरू झाले नवीन वसाहत वादाला शहरी-ग्रामीण भागाचा विकास होत आहे. ग्रामीण भागांचे शहरीकरण होत आहे शहर महानगरात परिवर्तित होत आहे; त्यामुळे सांस्कृतिक सामाजिक राजकीय शैक्षणिक आर्थिक यासर्व मध्ये बदल होत आहे. प्रगतीचे नवीन मार्ग खूले होत आहे.

       समाज भारतीय राज्यघटनेने दिलेले अधिकार मूलभूत तत्व समानता स्वातंत्र त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव आहे. लोकशाही ही आपली जीवनशैली बनवली आहे . बहुराष्ट्रीय कंपनी धोरणामुळे, वाढत चाललेल्या खाजगीकरणामुळे, नवीन समस्या निर्माण होत आहे. नवीन वसाहतवाद निर्माण होतो. साम्राज्यवाद निर्माण होत आहे. सांस्कृतिक दहशतवाद निर्माण होत आहे. माणसाच्या घामाची जागा आता यंत्राने घेतली आहे. श्रीमंत श्रीमंत तर गरीब हा अधिक गरीब होत आहे. सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक मूल्यांची घसरण होत आहे. भारतीय कामगार कायदे पुरेसे आहे पण समाधानकारक रीतीने योग्य पद्धतीने अंमलबजावणी केली जात नाही त्यामुळे जो कायदा कामगाराच्या फायद्याचा असतो तो निराशाजनक पद्धतीने पदरात पडताना दिसतो .

            सविता तुकाराम लोटे

---------------------------------

     


 

गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

सांजवेळ

-----------सांजवेळी----------------


        सांजवेळ... सांजवेळ परतीचा क्षण निळ्या निळ्या आकाशात सोनेरी झालर पसरलेली असते. आकाशातील सप्तरंग बरोबर वाऱ्याची झुळूक सुद्धा अंगाला रोमांचित करून जाते. सूर्य दूर पलीकडे जाताना दिसते. सुखदुःखची साक्षी असलेला सूर्यमित्र दुसऱ्या दिवसाला साथ देण्यासाठी आशावाद निर्माण करून परत भेटीचे आश्वासन देऊन जाते, सांजवेळ. 
         आकाशात पक्ष्यांच्या किलबिलाटात होत असते. पक्षी परतीचा वेळ असतो. आकाशातील रंगाबरोबर दिवसाचे सर्व अनुभव सांगत जात असावे जणू. दाही दिशा आपल्याशा वाटतात दिवसाचे चक्र संपून आकाशात मुक्त भरारी घेत परतात आपल्या घरट्याकडे.
           सकाळी टवटवीत फुललेला मनुष्यप्राणी सांजवेळी घरी जाताना विचार करीत असते. दिवसाचा सांजवेळ अशावेळी असते की यावेळी न दिवस न रात्र तरी पण मनाने आनंदाने फुललेले असते. दिवसभराच्या कष्टाची  चिन्ह  जरी चेहर्‍यावर दिसत असले तरी घरच्यांकडे  जाण्याची ओढ निराळीच असते.मनुष्यप्राणी परतात असते. सर्व हेवे-दावे सोडून.
      नवविवाहितांना अति ओढ असते. नववधूची नवजात मुल असेल तर त्याच्याबरोबर खेळण्याची ताई चिमणी पाखरांचे बालगीत त्यांचे बोबडे बोल मनाला घराकडे नेतअसतात. सांजवेळी सर्व विसरून परतिचे पाय घरटंकडे नेत असतात हीच सांजवेळ!
         दगड मातीची इमारत घर बनते जेव्हा त्यात आपली वाट पाहणारे माणसं असतात. इमारतीला घरपण येत असतं. आपल्या माणसां मुळे दिवसभर कष्ट करून थकलेल्या शरीराला विसावासाठी आपल्या माणसांसाठी घरी परततात असते. सांजवेळी पण घर जेव्हा इमारत असते. आपली माणसे नसतात तेव्हा संचार घरीच असतं. निळ्या आकाशाखाली त्याला साथ देत असते. हीच सांजवेळ सुखदुःखाची मूक साक्षीदार असते. हीच सांजवेळ वेळ प्रसंगी आधार देते, मित्र बनते नव्या स्वप्नांना आकार देते; क्षणभंगुर चिंता दूर करते सांजवेळ!!
        दिवसातल्या कोणत्याही वेळेपेक्षा सांजवेळ मधुर स्मृती घेऊन येतात. गतकाळातील आठवणींना सुर देण्याचे काम करते. आनंदाचे आगर आणि सुखाचे सागर कोणत्याही शब्दांनी वर्णन केले तरी सांजवेळेचे सौंदर्य पूर्णपणे चित्रित करता येत नाही. सांजवेळ विविध रंगांनी भरलेले असते.
           सांजवेळ आमच्या जीवनातील सत्य असते. रानावनातून गोठ्याकडे, आकाशातून घरट्याकडे, शेतातून घराकडे ,धाव घेणाऱ्या पाखरांना गाईंना आणि माणसांना सांजवेळ मातेप्रमाणे आपल्या कुशीत घेत आधुनिक जगात भावनाशून्य यंत्रेप्रमाणे धावणाऱ्या माणसाला स्वप्न फुलविण्यासाठी वेळ देत असते सांजवेळ...
      सांजवेळ सांजवेळ... जीवन कल्पनेला फुलवीत असते ही सांजवेळ.
                                20.2.2007
     
                  सविता तुकाराम लोटे 
----------------------------------

महाराष्ट्र दिन

          

             1 मे हा दिवस महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्र दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. महाराष्ट्र दिन म्हणजे संयुक्त मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. राज्य पूनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला देण्यास नाकारले होते.  मुंबईसह महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्वत्र सभा  घेण्यात आला होता.  महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा बोलणारे मुंबई-कोकण विदर्भ देश खानदेश मराठवाडा आणि आजही महाराष्ट्र बाहेर असलेले बेळगाव,डांग,निपाणी,कारवार,बिदर हे भाग अभिप्रेत होते.
           पण राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबईसह महाराष्ट्र देण्यास नकार दिला. त्या निर्णयाविरुद्ध महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक ,सांस्कृतिक ,वैचारिक ,साहित्यिक, कलावंत ,अभ्यासक,  मराठी भाषिक प्रेमी,  इतिहास प्रेमी, वृत्तपत्रकार  इत्यादी आणि महाराष्ट्रातील सर्व लहान मोठ्या संघटना आणि कर्मचारी संघटनेने आपापल्या सभांमधून निषेध नोंदविण्यात आला होता.

       21 नोव्हेंबर 1956 मध्ये फ्लोरा फांउटनच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यासाठी मोर्चे काढण्यात आला. त्यावेळी मोर्चावर लाठीचार्ज आणि गोळीबार करण्यात आला. त्या आंदोलनात 106 हुतात्मे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि मराठी माणसाच्या एकजुटीमुळे 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली गेली.


       1965 मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली. हाती मशाल घेतलेले क्रांतिवीर स्त्री-पुरुषांचा एक पुतळा उभारला गेला त्या पुतळ्याला हुतात्मा स्मारक म्हटले जाते आणि तेव्हापासून फ्लोरा फाउंटन असलेल्या चौकाला हुतात्मा चौक असे नाव देण्यात आले. 
           अखंड राहो सदा 
               हे शिवराष्ट्र 
        जयघोष करूया जय जय जय
             जय महाराष्ट्र

आज परिस्थिती बदललेली आहे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात आपण साजरा करीत असतो आणि करणार आहोत पण आपापल्या घरीच कोरोना संकटामुळे.
      सहकार्य करू या! आपल्या जगासाठी आपल्या देशासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या माणसांसाठी,आपल्या स्वतःसाठी सुरक्षित राहू या.
                  सविता तुकाराम लोटे 
----------------------------------
                           

बुधवार, २८ एप्रिल, २०२१

मधाळलेली सांजसावली

मधाळलेली सांजसावली
      सकाळ नंतर संध्याकाळ आणि संध्याकाळ नंतर सकाळ हे चक्र रोजच येते आणि जाते.कधी कधी सकाळ सोबत आनंदाची पाखरे घेऊन भुरकून जातात. दुःखाचे सावट न विसरू देण्यासाठी कळत नकळत सुख सोबत दुःखही जखमेवर मलम लावीत समजावेत असते.
 स्वतःलाच हळुवारपणे कधीही न बहरून आलेल्या वेलीप्रमाणे पावसाचा गंध जसा चोहीकडे असते. धरती मिलननाने सुखावते. आपल्याला झुलायला, हसायला, फुलायला शिकविते आयुष्यभर. तो पाऊस सुद्धा कधी कधी दिसेनासा होतो तेव्हा काय परिस्थिती होत असेल कल्पनाही करता येत नाही. दाटून आलेल्या संध्याकाळी सोनेरी ऊनाबरोबर सांजसावलीच मधाळपणा मात्र मनात मन गुंफणारा काळजात घर करून बसणारा असते. डोळे आतुरलेले असतात सांजवेळच्या प्रतीक्षेत!
           मनात प्राजक्त मोगरा फुलला की मनसोक्त आभाळही सप्तसुर आठवणींनी चिंब होते. सांजसावली कुशीत शिरावे वाटतं सारे ओलावलेले क्षण घेऊन!
          मी आपल्या घराकडे परतत असताना अंधारमय सावली घेऊन सूर्य ही मावळण्याच्या बेतात असते. सतत वाहणारा गारवा आयुष्यातील आठवणींना सप्तगंगणात घेऊन जात असते. मनाची समाधी लागली की खिडकीबाहेर लाल केशरी बहरलेली गुलाब पाहून फुललेला गुलाबाचे पाने शब्द बनून सप्तसुरांचे सोबत साथ देत असतात. नवीन गगन भरारी घेऊन दिशाहीन झालेल्या सुरांना पुन्हा लागते. जमिनीवर आठवणीच्या काळाकुट्ट मातीवर ओढयाव्या लागतात रेघाटया आठवणींच्या आणि त्याचे  रेघाटयाबरोबर इवल्याशा मनाच्या रूप त्यावर जखम होते तर रेघोट्या ओढव्यासा वाटतात. 
     खाली मन दिशाहीन धावत असतं शब्द नी शब्द सोबत घेऊन पापण्या च्या कडेला आपलेपणाचा ओलावा ठेवून साक्षी असते वर्तुळ बाहेरील जगात जगताना एखादी किरण आपल्याकडे आलेले पाहून जीवन किती सुंदर असे वाटते पण पानझडी प्रमाणे गळून पडतात परत क्षणात या पुस्तकातील लाल गुलाबाच्या पाकळ्या पाहून मनातील जीवघेणा वेदना अधिकच जवळ येत असतात वर्तुळा बाहेरील जगात आणि पुन्हा वसंत बहरत असतो निशब्द.
      दिलेला वचनेच्या माळा गुंफीत असतात. गळाभोवती क्षणात स्वप्नमय रम्य निरागस वाटते ते क्षण जेव्हा दुःख सोबत आले होते कधी ही न येण्यासाठी पण पानगळती नंतर नवा क्षण येतच असतो तसाच क्षण सुद्धा आला 
        संघर्ष असतो स्वतःचे इतरांशी जीवनाच्या वाटेवर काटेच असतात हळुवार वेदना देण्यासाठी मूकपणे ओठावर न येण्यासाठी मधाळलेला सांजसावलीत मन आनंदाने नाचत असते  सुंदर स्वप्नाला पुन्हापुन्हा बनविण्यासाठी नवनवीन कल्पना फुलत असतात कुणालाही नकळत आनंद द्विगुणित होते वाटतं आयुष्याच्या कळ्या कळ्या फुलत रहावे. प्रकाशाचा सारख्या काटन च्या सहवासात प्रसन्न होणाऱ्या लाल केशरी गुलाब सारखे रहावे टवटवीत वाहणारा झरा सारखा घरट्यातल्या चिऊताईच्या बाळासारखं अखंड कुहू कुहू कोकिळे सारखं कमळासारखा हव्याहव्याशा वाटणाऱ्या गार वारा सारखे आणि पोपटी हिरव्या शालूघातलेल्या मायमाते सारखे हसत हसत फुलून घ्यावे स्वतः पण त्याला कुणाचीही दृष्ट नजर न लागावे.
          होईल तुझ्या न हे सगळं उत्तर नसतं दिलासा  नसते त्या क्षणाला आशा मात्र असते आणि मनात शब्द येऊन जातात
        काही क्षण जपायाचे असतात 
        स्वातीच्या दवबिंदू सारखे 
        काही क्षण विसरायचे असतात 
        आळवीचा पानासारखे
                          27.1.2006
         सविता तुकाराम लोटे 
---------------------------------

कातरवेळी

         
           आयुष्याची वाट चालत राहावी अशीच क्षितिजा परी क्षितीजापर्यंत जाण्याची मनात इच्छा आणि दुरवर दिसणारा काळाभोरआकाश कातरवेळी चाललेल्या पक्षांची धडपड घराकडे जाण्याची जिद्द त्यातून नवे बनविते सूर्य आकाशात प्रफुल्लित होऊन जातो. जरी ते अस्ताला जात असला तरी सूर्य बळ देत असते, जिद्द देत असते, तो पुन्हा आयुष्याच्या चुकला वळणावर सावरण्यासाठी आयुष्य जगण्यासाठी.
             भूतकाळ मनातील हळव्या क्षणांना बऱ्याच गोष्टीं ची व्यथा डोळ्यात दाटून येते या आणि पापण्या बाहेर पडायचं नाही मनाच्या कुंद कोंदणात तसेच राहायचे कायमचे पण  या हळुवारपणे येत असतात भूतकाळापासून बाहेर वर्तमानामध्ये!
        पाऊस पडून गेल्यावर म्हणायची नवचैतन्य झाले असते. झाडांच्या प्रत्येक पानावर थेंबांचे अस्तित्व असते. थंडागार वारांनी मनाची दारे ओलेचिंब झाले असते. भिजलेल्या मनाला शांत करण्यासाठी पुन्हा त्याला यावे...
     तरी मनातील गोड कडू आठवणी तशाच राहतात त्या नकोशा वाटणाऱ्या आठवणी सुद्धा मनातील कोपरा ओला चिंब करून ठेवतात. मनावर भल्यामोठ्या ढोकळा सारख्या आठवणी असे वाटते त्यांना संपून टाकावे पण अशावेळी  त्यांना अधिक उफाळा येत असते. 
        हळव्या क्षणा बरोबर आपले बरोबर वाटत असते. आज तक धरलेला अबोला मनाला  ओलाचिंब करून जाते. मनामध्ये विचारांचे वादळ निर्माण होते. अपयश अपयश आपले असते कि त्या क्षणाचे हेसुद्धा कळत नाही तरी अबोला सर्व मनातील भाव भावना क्षणात प्रगट करीत असतात; आपल्याही नकळत !
          आठवणींना संदर्भ देतांना मनात विचार येतो. मनसोक्त गुलाब फुलतो गुलमोहर फुलतो वाटसरूंना विसावा देत. अंगावर पावसाच्या सरी झेलत एकमेकांशी कुजबुजते पाने दवबिंदूचे मंजुळ गाणे अधिक जवळची का वाटत असते.
    मनातील असाह्य होणाऱ्या वेदना अबोल सोडून सांगावस असे वाटते असले तरी कशी खुले करावे. मनात नकळत विचार आला की त्याची हातात हात घेउन त्याला समजावे त्याचा अबोला कमी करण्याचा प्रयत्न करावा असे वाटत असताना, मनसोक्त हसावे त्यावेळी... त्याचे मनसोक्त हसणे त्याने दिलेल्या गवत फुलांवर हात फिरवीत आठवणी त्या आठवणी मनात दाटून येतात.
        माझ्या खुळ्या कल्पनावर हसणे हळूच रागवणं आणि अबोला धरला की त्या स्वप्नातील कल्पना समोर  उभा करणे त्याच्या कल्पनेमध्ये फक्त माझे अस्तित्व त्याच्या विचारात त्याच्या आयुष्यात फक्त माझे अस्तित्व मी मी आणि मी फक्त मी असायचे. कवितेमध्ये लिखाणामध्ये पण !!आमच्या साध्या संवादाला सुद्धा कवितेचे रूप यायचे कळत सुद्धा नव्हते.... त्यांनी प्रत्येक क्षण जपून ठेवला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात;पण...
    आशावाद आणि निराशावाद हेच एक कारण असावे त्याचे आशावादी असणे आणि माझी निराशावादी असणे हेच कारण त्याच्या माझ्यामध्ये आले असेल दोन विरोधी टोके एकत्र येण्याचा प्रयत्न करीत होते पण त्याला दुसऱ्या टोकाची नजर लागली म्हणजे माझी आणि तो तिथेच थांबला क्षण पुन्हा एकत्र न येण्यासाठी.
       चुकलेच माझे त्यावेळी पण तुला सावरता आले असते सावरले का नाहीस त्या  क्षणाला कवितेचे रूप का दिले नाहीस माझ्या अबोला माझ्यापासून दूर घेऊन जाईल असे वाटत सुद्धा नव्हते तुला कारण तुला भेटल्यानंतर तुझ्याविना आयुष्य असेल असे वाटत सुद्धा नव्हते भविष्यात फक्त तूच असावा तूच होता कल्पनेत  आणि विचारात.
        तुझं माझं नातं जगावेगळा. आजही तसाच दिसलास; माझ्या अबोलशब्दांना सामोर गेलास. तुझ्या भावना कळल्या तुझे पाणावलेले डोळे दिसले परत आशावाद दिसला याच कातरवेळी मावळतीच्या क्षणाला घट्ट मिठी मारली अबोला धरून .
      ...... रोज  येणाऱ्या कातरवेळेला कोण घट्ट मिठी मारेल .....माझ्या विचारांमध्ये तू असला तरी आज परिस्थिती वेगळी आहे तुझ्या त्या हळव्या क्षणांमध्ये भागीदार मात्र नाही मी त्यात शिरू पाहते आहे दुसरी कोणीतरी आणि तुही हळुवारपणे साद देता आहे तुझ्याही नकळत. पण सांगून गेले तुझ्या हातातील गवतफुलांची फुले सर्व काही त्याच कातरवेळी!!
             सविता तुकाराम लोटे 
---------_------------

स्वप्न सावली अस्तित्वात येते तेव्हा!!!

स्वप्नसावली अस्तित्वात येते तेव्हा!

            समाजामध्ये अनेक प्रकारचे अनेक स्वभावाची माणसे राहत असतात. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात रेशीमबंध असते. काही ऋणानुबंध असतात. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर कुणीतरी येण्याची वाट पाहत असते. मनामध्ये एक आकार एक स्वप्न निर्माण होते. स्वप्नातील एक हलकीशी चाहूलही कशी मने फुलतात अंतःकरणाच्या कोवळ्या वेलीवर संदर्भातील भाव फुले स्वप्न फुले फुलून आनंदी करतात पण तेवढ्यात एक स्वप्न पूर्ण होऊन वास्तवाच्या जगात रमत असते तरी ते स्वप्न न विसरता ती काळी पांढरी सावली पाठलाग करीत असते ते भावफुल आणि स्वप्न फुल एका कोपऱ्यामध्ये पक्के  बसून राहते कुणाच्यातरी दिसण्याचे स्वप्न अस्तित्वाचा आणायचे ती काळी पांढरी सावली स्वतः स्वतः भोवती फिरत राहते.
      निळाभोर आकाशाखाली वावरू लागते आपल्या सोबत स्वप्न चिमणी पाखरांची ती चिवचिवाट मनाला स्पर्श करून जाते आणि डोळ्याभोवती उभी राहते ती काळी पांढरी   सावली हाताच्या ओंजळीमध्ये चांदणे गोळा करून देत असते ती सावली मने निशिगंधा सारखे फुले तसेच मनातील कोपरा न कोपरा त्या अबोल संभाषणा बरोबर चालत असते आणि अचानक डोळे सताड उघडे होतात आणि विचार करू लागते. 
         मनातील ती काळी पांढरी सावली होती की कल्पतरू होते ते! जसे काचेचा आरशाला मारला तर तुटून जाते प्रतिबिंब नष्ट होते तसे झाले.  मनातील शब्दाने खेळ खेळला सुसाट वादळाने झाडे मुळापासून उपटून टाकले तेव्हा झाडांनी काय करावे तसे केले त्या काळा पांढरा सावलीने माझे अस्तित्व नष्ट केलं रक्तबंबाळ केले मन सागराला!
         कोणतीही भावना त्यासमोर फिक्की पडत होती हृदयाच्या कोपरा न कोपरा त्या आठवणीने घायाळ झाला होता रक्ताच्या प्रत्येक थेंबाने वर ती सावली हक्क सांगत होती हेवा करीत होते मन मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होते. मन रिकामे झाल्यास ते बुद्धी विचार करीत नव्हते माझी व्यथा ऐकत नव्हते. 
           तुटलेल्या स्वप्नांची रडगाणी गोळा करीत होते. झडलेली सगळी पिवळी पाने अंतरंगातील व्यथा पापणी मध्ये साठवीत होती. दाट ढगातून मला  मिळत नव्हती ते खुल्या पापण्यान मधून कितीतरी वेळा त्या सावलीने देऊन दिले होते आणि दवबिंदू साठवीत होती हिरव्या हिरव्या तृणफूलातून स्पर्श करून जात होती पुन्हा तुटलेला काचेवरून मन बेभान नाचू लागले होते ती सावली ज्या वेळी अस्तित्वात माझ्या समोर आले तेव्हा आनंदाने भरून गेलेले मन अचानक घार पक्षी सारखे पडू लागले पाण्यातून मासाला बाहेर काढावे आणि जगाला लावावे त्याला या भूतलावर आपले वेगळे अस्तित्व निर्माण करायला लावावे त्याला जरी माहीत असले तरी त्याची जीवन नाही तेथे तसेच झाले.
        विचार करू लागले माणसांच्या गर्दीत हरवून गेले पुन्हा ती सावली मला आपल्याकडे खेचत असते. माझ्या स्वप्नातील काळी पांढरी सावली तेथे जशी मी त्याला पाहण्याचा प्रयत्न करीत होते तसेच आधी पाहात होते तशीच तेव्हाही केले पण ती सावली माझ्याकडे येत होते. सर्व भावांनी मध्ये आणि अगदी जवळ येऊन त्या भावनेला अर्थ देण्याचा प्रयत्न करीत होते पण तितकेच दूर जात होते भीतीने हदयात एक अनामिक निर्माण होत होती तिने कधी मला गुंतविले नव्हते.
           शरीरातील शक्ती नष्ट करीत भावनाशून्य करीत होते तरी वटवृक्षाप्रमाणे उभी होती एकटी संघर्ष करीत.
         24.1.2004
            सविता तुकाराम लोटे 
_---_------------------------


मंगळवार, २७ एप्रिल, २०२१

आठवण त्या हळव्या क्षणांची

 आठवण त्या हळव्या क्षणांची
  स्मृतीच्या त्या आठवणी
  मनी असावी सदा 
  त्याला सतत जोड असावी 
  प्रेमळ दोन शब्दाची
         आठवणींना उजाळा देण्यासाठी किती छान काव्यपंक्ती आहे आपल्या मनामध्ये आठवणीची जडणघडण परिपक्व होऊन बसलेली असते कुठे रिकामा वेळ मिळाला की सर्व काही डोळ्यासमोर येत राहते पावसाच्या सरी प्रमाणे!
          ओलेचिंब करून जाते अलगदपणे मनाच्या आठवणींचा पिंजरा खुला होऊन जातो नकळत आपल्याही जाणिवा अपयशाच्या.
      प्रेमात केव्हा आणि आणि कशी पडले तुझ्या विषय आकर्षण का निर्माण व्हावे माहित नाही तरी तुझ्याकडे झुकते माप सांभाळता आले नाही. तू आलास वादळी वारा प्रमाणे; जीवनात. ते मी स्वीकार केला नसला तरी आपल्यातील प्रेम निस्वार्थ करीत राहिल्या आणि अचानक का गेलास माहित नाही? एक प्रश्नचिन्ह देऊन गेलास.
     मनाच्या विशाल सागरामध्ये आठवणीचे रूपात थेंब थेंब साठवून ठेवले. अचानक एका पत्राने उजळा दिला त्या मांडलेल्या तुझ्या व्यथा प्रेमाबद्दलची आस्था, अस्तित्वाची जाणीव. तरीपण तुला माफ करणार नाही, मला हवी आहे तुझ्या मनातील प्रेम प्रेरणा साथ व्हवी होती
 जीवन वेली फुलविण्यासाठी. निघून गेलास वेदनेचा पाऊस देऊन.
          माझ्या अस्तित्वासाठी माझ्या ध्येयासाठी प्रेमाला मनाच्या खिडकीमध्ये कुलूप लावून ठेवले व त्या कुलपाची किल्ली कुठेतरी हरवून आला न उघडण्यासाठी. मनातील शब्द मनात न ठेवता उघड केले पत्राद्वारे. पण इतकी हिंमतवान नाही. तुझ्या प्रेमळ शब्दाची एक आठवणही प्रफुल्लित करून जाते मनाला शब्दांना भावनेच्या हिंदोळ्यावर प्रफुल्लित होऊन.
      माझ्या आठवणींवर हक्क आहे माझा तुझा नाही तू कितीही दूर राहिला तरी प्रेम तुझ्यावर कमी होणार नाही करीत आहे करीत राहणार आहे त्या आठवणींसोबत उजाळा देत
  प्रेमात जगायचं असतं 
  प्रेमात सर्व काही गमवायचं असते
  त्यात फक्त शब्दांची साथ असते 
  फुलांचा बहर असतो 
  तुझ्या माझ्या नात्यातील 
  रेशीम बंध असते
       15.10.2003
               सविता तुकाराम लोटे 
----------------------------------

आयुष्याच्या वळणावर


आयुष्याच्या वळणावर
       आयुष्याच्या वळणावर खूप माणसे भेटतात. कोणी चांगले तर कोणी वाईट कोणी स्वतःच्या मस्तीत गात राहतात. कुणी शांत कुणी अबोल !!!प्रत्येकाला जगण्याचा रंग निराळा असतो. तरी प्रत्येक ऋतूमध्ये मन फुलवीत असते. तसे रोज काहीतरी वेगळे जीवनात घडत असते. प्रत्येक वाटेवर एक नवे आव्हान असते. जीवन जगण्याची सुख-दुःखाच्या श्रृंखलामध्ये गुंफलेले
         आयुष्य एक चूक आयुष्याला वळण देऊन जाते. झालेले ते संभाषण कसे मदतीला येतात. न विसरण्यासाठी !! मदतीचा हात देऊनही, अलगदपणे बोलून निघून जाते. त्या वळणावरून परत न भेटण्यासाठी. जसे प्राजक्ताच्या फुलांनी फांदी पासून अलग व्हावे तसे हिरव्यागार पानांतून पिवळी पाने गळून पडावे. 
       नवीन आयुष्यासाठी मनात नसूनही आपण जात असतो. त्याच वाटेवर त्याला शोधण्यासाठी पापणी ओली चिंब होऊन नजर शोधते..... मनाच्या हळव्या वाटेवरून चालताना मग कुणाच्या तरी अंतरंगात शिरू पहाते वेध घेत कुणाच्या तरी दिसण्याचे. त्यांच्या कडे मन आकर्षित ; कुणीही नसताना. का असे विचार येत असतील मनात. प्रवास करताना मनात पुन्हा त्याच वाटेवर का फिरावे असे विचार मनात येताच दिसावा आणि त्याच्या नजरे मध्ये मैत्रिपूर्ण भाव पहिला भेटी प्रमाणे का नसावे निस्वार्थ. उदासवाणी स्वतःची आणि माझ्याशी अबोला,  शब्दाविना चालणारा संवाद आणि थोड्यावेळाने निघून जाणे ;त्याच वाटेवर एकटे  ठेवून, विरहाच्या वेदनेचे काटे देऊन!
 
पानगळ झाली उगवत्या सूर्याच्या साक्षीने
रणरणत्या तप्त दर्पण सत्याने
निशब्द अबोल धारदार शब्दविना 

        ज्या नाजूक वळणावर मदतीचा हात दिला निस्वार्थपणे तो व्यक्ती असा का बदलावा?  अशा कितीतरी प्रश्नांची गर्दी मनात आणि विचारांमध्ये येते. तो आता त्या वळणावर कधी दिसतच नाही; तरी मन माणसाच्या अफाट गर्दीत नेमके कोणाला शोधत असते त्याला की स्वतःच्या अस्तित्वाला... त्या वेळी  न बोलता येणाऱ्या थँक्यू साठी की एक चांगला मित्र म्हणून. एकटीच प्रश्नांचे उत्तरे देत राहते संपूर्ण प्रवासात. आणि वेळ गेली की पुन्हा होते आपले आयुष्य जगण्यासाठी तयार; भीतीला मनात ठेवून तो प्रसंग परत न येण्यासाठी!!
          पाण्याच्या लाटेप्रमाणे मीही पुढे चालते आहे वादळी वाऱ्याप्रमाणे पक्षाप्रमाणे निळ्या आभाळाच्या दिशेने एखाद्या मुळातून तोडलेल्या झाडाच्या खोडाला पुन्हा फांद्या फुटतात तसंच संघर्षाला अडचणींवर मात करीत.
           जगात तुझ्यासारखे दयाळू व्यक्ती खूप असतात. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेच आले मदतीचा हात देणारे.  काही बिनधास्तपणे मैत्री नात्या गुंफणारे कुठल्याही परिस्थितीला सामोर जाण्यासाठी हिम्मत देणारे , शक्ती देणारे शब्द देणारे नवीन वाटा देणारे नवीन मैत्रीपूर्ण भावविश्व निर्माण करणारे नवीन नाते त्याला कुठलीही अपेक्षेची झालर नसलेली फक्त प्रवासात सोबतीची वाट निर्माण करणारे, 'प्रवास माझा प्रवास माझ्या जाणिवेचा' माझ्या प्रवासाने शिकविले मला जग खूप सुंदर आहे. आजूबाजूने खूप सुंदर जग आहे तिथे जगावं लागतं जगू द्यावं लागत. 
            प्रत्येकांचे सुखदुःखाची वाटा वेगळ्या आहे विचार वेगळे आहे स्वप्न वेगळे आहे पायातली पाय वाट वेगळी... विचारांचे शब्द वेगळे आहे... शारीरिक हावभाव वेगळे आहे. सर्वकाही वेगवेगळे आहे विचारांच्या सावलीमध्ये कुणीही उन्हाचे चटके शब्द पावलांनी देत नाही. माझ्या प्रवासात मला ते मिळाले नाही कारण तुझ्यासारखे विचारांचे आपल्या आजूबाजूला माणसाच्या गर्दीत आपल्या प्रवासात एक सुरक्षित साखळी निर्माण केली. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेच तुझ्यासारखे मदतीचा हात देणारे आले .
            या प्रवासात कुणाबरोबरही एक वेगळं नातं निर्माण होऊ शकला नाही. तुझ्यासाठी असलेल्या भावना नव्हत्याच मुळी. माझा तुझा प्रवास असाच शब्दांच्या खेळ नसलेला, टाळत असलेला आपण आपल्याच आयुष्याच्या नवीन वाटेवर चालण्यासाठी चालू केलेला प्रवास एका अनोळखी व्यक्तीसाठी एका नवीन अनोळखी प्रवासासाठी थांबू शकत नव्हता. कळत आपल्याला ...वळत आपल्याला...पण आपली इच्छाशक्ती इतकी दांडगी असते की आपण ठरवलेल्या आयुष्याच्या नवीन प्रवासाच्या वाटेवर कुणाही अनोळखी व्यक्तीबरोबर अनोळखी प्रवास करणार नसतो. ते आपल्यासाठी आणि समोरच्या व्यक्ती साठी सुद्धा फायद्याचं नसतो म्हणून आपण आपला प्रवास वेगवेगळ्या... वेगवेगळ्या वाटेने... वेगवेगळ्या वेळाने आणि वेगवेगळ्या माणसाच्या गर्दीमध्ये केला. फक्त मनात काहीतरी आल्यामुळे दूर पळणारे आपण .पण तसं नसतं ! आयुष्य प्रत्येकासोबत जीवनात एक रेशीम बंध नसते कुणीतरी एखादीच व्यक्ती त्या रेशीमबंधनामध्ये  बांधले जातात. ते ही विश्वासाचा निर्मळ आणि स्वच्छ मनातील भावनांच्या आधाराने.

        कागदाची घडी चौपट करता-करता
        तुझ्या अबोलपणाची घडी चौपट करीत
        डोळ्यागत करपून टाकले रेशीम बंध
                           ..... नवभावनेचे

     तू कुठे भेटू नकोस कोणत्याही वळणावर तुझी माझी अनोळखी ओळख एखादा संभाषण करण्यासाठी परत आयुष्यातल्या एखाद्या वळणावर मदत करण्यासाठी जपुन ठेव अनोळखी ओळख!!!
       त्यावेळी विसरून जा ...कधीकाळी मनातील आतल्या आत करपून टाकलेले रेशीमबंध ....त्यावेळी विसरून जा माझ्या तुझ्यातील अबोलशब्द ...पण त्यावेळी सुद्धा विसरून जा माझं तुझं नातं. फक्त लक्षात ठेव आपल्यातील अनोळखी ओळख शब्दांची.

          गरज फक्त पाऊल उचलण्याची 
         आणि आयुष्याच्या वळणावर पुढे 
                          जाण्याची!
                                  10.10.2003
           सविता तुकाराम लोटे 
---------------------------------

रविवार, २५ एप्रिल, २०२१

नयन


       आयुष्यात काही प्रसंग काही क्षण असे येतात की आपलेच आपल्यापासून दूर होत जातात... आपण त्यांना समजून घेत नाही रंगांनी भरलेले जीवन बेरंग होत जातात.  जखमा सुगंधी होत जातं त्यात रमले की नयन सर्व सांगून जातात....“ का कोण जाणे‛, नयनांना आधीच माहीत असते; अश्रू कुठे यावे म्हणून!! काय झाले ते सांगून जावे नयनातील भाव.
         आयुष्य बदलून टाकतात सर्व सृष्टीला नयनांचा गडद मखमली अश्रू मध्ये वाहून नेतात. विहरनाच्या लहरी बहुदा नयनामुळे पुढचे आयुष्य सोपे करून देत असतात. 
     नजरेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत असलेल्या स्वप्नाला आकाशातून टपकावे तसे  वाहू लाग ते नयना त राहत नाही. पाहणारी नयन दृष्य वाहती राहते त्यापलीकडे काहीच दिसत नाही.
       नयनातील पाने तिला दुःख होते की आनंद कळत नाही. मंदावलेल्या नयनांमधून चेहऱ्यावरून अश्रु वाहु लागते. आकाशातून पहिल्या पावसाचे आगमन व्हावे ; जीवन मायेच्या प्रत्येक शब्दाला नयन साथ देत असते. जुन्या आठवणीची माळही अश्रू भरल्या नयनात
दिसत रहाते “आठवणीचा एक मात्र खरा साक्षीदार म्हणजे नयन.”
    चिमुटभर आठवणीने नयन कसे आपले मन सहज सांगून जातात. मनाचा थांगपत्ता लागू न देणारी मानवी प्रवृत्ती असते पण नयन त्याला खोटे ठरवून मनातील चलबिचल सांगून जातात. जेवढी आपली नयन शक्ती असेल तेवढच मनशक्ती असतात. 
    म्हणतात, नयन आपल्याला थेट समोर असणाऱ्या व्यक्ती कडील भाव समजावून सांगतो. आपल्यातील अभिमानाचे क्षणात नाहीसे होतात जेव्हा आपलेच मुले आपल्या समोर मनमुराद हसत असते त्याला बोलता येत नसले तरी त्याचे बोबडे बोल कळत नसले तरी, त्याचे नवीन शब्द कळत असते आपल्याला आलिंगन देताना सांगतो हसा.... खळखळून हसा!! मग ते नयन फसवते आपल्याला.
         हळवे झालेले नयन मग फसवत जाते जमिनीकडे आपले नयन अलगद जातात... त्यांच्या पायातील पैंजणाचे सूर नाद नयनातील भाषा सांगून जाते... त्याला खेळायचे असते त्याला नाचायच असते.... त्याला सर्व भाव सांगायचे असते.... त्यावेळी नयनांचे संदर्भ कळलेले नसते,'बालमन’ असावे लागते. आपण पाहतो खेळतो जाणून घेते पण खरच निस्वार्थ मन होत असते प्रश्नांचे उत्तर शोधताना स्वतः च सामावून जातो.  नयनांचे अश्रुचे संदर्भ चटकन  मनाला लागतात... असेच नयन आपल्याला आपल्यात समजावून घेतात.
        नयनांचे संदर्भ कळले नाही तर जीवनात काहीच शिल्लक नसते. नयनात पाणी साठवले की काहीच दिसेनासे होतात. गहिवरला मनाला नयन अश्रू चिंब भिजवून टाकतात. स्वप्न हि नयनात दिसत नाही धुंद मनाला नयन बंदिस्त करीत असतात. सप्तपदी चालताना नयनाला सांगू नये थांब... राहू द्यावे तसेच विरहाने मननयन आपले भाव सांगून जातात, असे का? ज्या नयनात मायेने   साठवून  ठेवलेली क्षणात वाहून जाते पण अश्रू मध्ये दुहेरी भावना असते.              पहिली म्हणजे सुखाची दुसरी भावना विरहाची असावी विरह म्हणजे आज तक जपून ठेवलेल्या मायला सोडून जायचे. सुख म्हणजे जीवनाची नवी सुरुवात स्त्रीधन मिळाले असते; स्त्री म्हणून संपूर्ण होण्याची तयारी झालेली असते.  ती आता फक्त मुलगी बहीण नसून कुणाची तरी पत्नी, सौ ,सून इतर सर्व नाती आलेली असते. नयन सर्व विचार ठेवू शकत नाही. फक्त वाहात राहते अलींगण  देताना.  नयनात आभाळ दाटलेलं असतं  कुणीच कुणाला न सांगता सर्व सांगून जातात.  प्रीतीचे फूल उमलत असतात.  नयन अश्रू गाणे गात असतात  नयन केविलवाणी झालेली असते. जीवनाची नवीन रंग ,गंध ,स्वप्न नवीन वाटत असते.नयनात क्षणाक्षणाला आभाळ दाटून जाते.
         कितीतरी क्षण जपून ठेवलेले नये आपल्याला मदत करीत असतात सुखात पाहणारे नयन दुःखात सर्व सीमारेषा तोडून वाहत राहते काही वेगळेच असतात दिवसाचे सर्व गणित मागे पडत जाते.  मेघ नयनात वाहू लागते. निळानभी जसे आपलेच मन असावे. सतत वाहत असते. मनातील भाव हृदयातील भाषा सहज इतरांना कळते नयनाला पूर आलेला असतो. मनातील भावनेचा वारा सतत वाहत असतो. मेंदी भरलेल्या हात जेव्हा कुणाच्या येण्याची वाट पाहत असते; पण काळोखच आला तर जीवनाचे फुल उमलतच नाही मनाला पूर येत  राहतो आणि नयनावाटे वाहात रहाते.
     अंधार दाटला की नयनातून अश्रू हरवले जातात. शब्दही बोलविले जात नाही. मन उदास होतात... मन चंदनासारखे जळत राहते. सुगंध देऊन! इंद्रधनुष्याचे रंग नयनातील जळलेल्या स्वप्नामध्ये राख होऊन जातत.  हदयाचे हुंकार नयनाला कळत नाही असे नव्हे? पण पण ते हुंकार नयन दाखवीत नाही. प्रीतीची हिरवेपण कोपलेले असते. लाभलेल्या प्रीतीला दीप नष्टच करीत नाही. नयन सतत सांगत असते... छाये प्रमाणे नियती सर्व नयनात सांगत असतात. तिथे फुला-फुलात क्षण मेघ करून टाकतात. निवांत पण कुठेच नसते. ना नयनात... ना अश्रू... ना नयनशब्दात ! दूर ठेवून आपण नयनाला वाहू देते त्याला काहीच अर्थ नसतो, वाटत हे उगीच येतात. सुखात आणि दुःखात! काहीच नसतानाही वाहत राहते. तेव्हा नयनाला विचारावे,“ का बाबा वाहतो उगाच !”
      मनातील वेदना नयनालाच कळत असते.
 मनपंखावर नव काही फुलत असते.निष्पाप जीव नयनाने सांगू जाते. कळत नसते ,नयनाला कळते कळत नसतं. हिरव्या मनाला हिरवेपण देत असते. मुक्तीचे गीतेही गात राहते. मनअंगणात फक्त फिगंरीसारखे फिरत राहते. नयन फुलात फुलून जाते. नयनात आभाळ साठले तरी त्याला अर्थ संदर्भ असतो.
   नयन... 
     नयन मनातील भाव 
     नयन हृदयातील शब्द 
     नयन सागर पाणी... 
     नयन प्रीतीचे फुल 
     नयन दुःखाची सीमारेषा 
     नयन काटेरी मुकुट 
     नयन शौर्याची गाथा... 
     नयन विरहाचे गाणे
     नयन शक्तीचे प्रेरणास्थान... 
     नयन निष्पाप मोती 
     नयन स्वप्नाची साक्षीदार
     नयन केशर गंध... 
     नयन पंखरुपी मनशब्द 
     नयन चिंब भिजलेले हदय 
     नयन जिवंतपणा... 
     नयन चांदणी रात्र 
     नयन प्राणप्रिय ज्योत... 
     नयन पावसाची पहिली सर 
       नयन... नयन आणि नयन फक्त नयन!!!
22.3.2008
              ( कॉफीराईट )
                       सविता तुकाराम लोटे 
(सर्व चित्र गुगल वरून घेण्यात आलेली आहे)
----------------------------------


         

अंधारीवाट

अंधारीवाट

         आपण सर्वच आयुष्यात 'अंधारीवाट', अनुभवत असतो. आयुष्याच्या टप्प्याटप्प्यावर ती पाय वाटेमध्ये येत असते. पहाटेच्या धुंकात आणि सांजेला  ती भेटत असते. डोळे मिटूनही ती आपल्याच सोबत असते. आपल्याबरोबर एक चेहरा उमटतो आणि सर्व जाणिवा जिवंत होतात मन जिवंत असते... मनातील भावना जिवंत असतात ...मानसिक गुंता जिवंत असते. डोळ्यातला आभाळ नकळत का होईना जिवंत असतात.बाहेरील आतील सर्वच गोष्टी जिवंत असतात. 
                  बरेचदा जीवनाच्या गर्दीमध्ये अंधारी वाट जिवंत असते. जा नयनात स्वप्न असतात त्याच्या डोळ्यात अंधारी वाट अनेक रूपात येतात .डोळ्यातील आभाळ अलगद तळहातावर आले की तीच वाट रस्ता सुद्धा दाखवित असते. मनाने कितीतरी गोष्टी सहज आत्मसात केलेल्या असतात. अंधारी वाट असली तरी मनाने ती आत्मसात केलेली असते.
         आयुष्याची पहिली संध्याकाळ काळ निर्जीव वस्तू बरोबर घालवि लि की आयुष्य किती सजीव आहे हे कळतं तेव्हा काही  काळा आपल्या प्रभावाने ते आपल्याला आपली करून टाकतात पण विचार बदलला की त्याही वाटेला जावे लागते कुठलीच अंधारी वाट गुढ कुणाचीच नसतात. कोमेजुन गेलेल्या वाटेची सुद्धा! खरंच अंधारीवाट असते का ? सहजासहजी अंधारीवाट आपले गणिते चुकवित असते का? अंधारेवाट म्हणजे मनातील अनैतिक विचार असावे... आणि येणाऱ्या उजळ आयुष्याची पाऊलवाट असेल.
               काळाची गरज असते. पाउलवाट शोधणे सुरमई जीवन निर्माण व्हावे यासाठी आवश्यक असते. पाऊलवाट जीवनाला रंगमय करीत असते .गंधमय करीत असते. सुरांची शब्दांची ओळख करीत असते फुल रोज फुलतात आणि नष्ट होतात हे कळू देते मग जीवनाचे अंधारी वाट आपल्याला काय देत असते ती देत असते.                 
                 जगण्यासाठी नवीन उमेद आपण आपल्या अस्तित्वाची राख होऊ न देता स्वाती नक्षत्राला पडलेल्या वसंत ऋतुचे स्वप्न...काल चक्रांची साखळी फिरविण्याचे ध्येय... शांत उभे राहून वाट पाहण्याचे सामर्थ्य. आपल्या पंखात ओलावा निर्माण करून बळ देत असतो... पण खरंच जीवनात अंधारीवाट असावी का? कळत नाही!
            पाऊल वाट आणि अंधारी वाट दोन्हीही आपल्या हातचे नसणारे क्षण....जे क्षण नियती आपल्याला देऊ करीत असते. ती काळानुरूप असते. ते क्षण आपण घेतात? की ते क्षणच आपला उपभोग घेतात की आपण आपल्याच वाटेवरील संध्याकाळी शोधत असतो कळत नाही.  
             अंधार वाटेच्या प्रत्येक पावलांनी आपल्याला जखमी केले ? अशावेळी मन केवळ पाऊलवाट नव्हे,  तर डोळ्यातील आभाळही आपले वाटते. तिला पण प्रेमळ असतो. ती आपल्याबरोबरच बहरण्यासाठी  आग्रह करीत असते. 
      अंधारीवाट आपण कमी केली की मन वसंत फुलतो. ते फुलले की कधीही केव्हाही फुलविता येते. मनाला फुले येते. मनाला फुलाची सवयच असतेच .पण प्रत्येक मनाला कुठे फूलता येत असते. मग फुलण्याची सवय नसणारी मने अस्वस्थ होत असतात. 
         मनापासून निघालेला विचार मनाला भरकटत नेत जातात. आणि निर्माण होतात पावलागणिक अंधारीवाट ती वेड लावून जाते न फुलण्याचे मन पाऊल वाट पाऊलवाट करीत असते. पण पावलागणिक एक अंधार शोधत असते. मग शोधून ही न मिळाल्यास अबोलपणा निर्माण करीत असते.
        आपल्या डोळ्यांच्या पाऊलवाटेवर आपलं मन शोधत असते. काहीच कोणाच्या हाती नसते हातात असते. अंधारी वाट आणि  पाऊलवाट जन्म घेतात त्यावेळी आशेची किरणे!
           हे न  संपणारे जीवन गाणे असते. संध्या रंगछटा आपल्या वाटतात. सकाळची रंगमय उजाळा आपले वाटतात. सार काही तेच आणि तसंच असतं... रोज! मग प्रत्येक संध्या रंग छटा पहिल्यांदा आल्या असे का वाटत असते ती पण त्याच वेगाने क्षणा त निर्माण होत असल्याने त्याच वेगाने आपले रूप  बदलावीत असते.   भुल पडणारी सांजरूप! 
            मनातील प्रश्नांना उलगडणारी श्याम रंगत पूर्णपणे समर्पणाचे ते क्षण कुठल्याही वाटेवर आठवते तरी ती अंधारी वाट असली की अधिक वाटत असते. तिने झपाटले की संपूर्ण जीवन सावळेरूप होत तर जाणार नाही ना असं सतत वाटत असते. त्याबरोबरच नवीन फुललेली मिळत असते. 
           सकाळचा सूर्य घेऊन नाजूक सौंदर्य ने फुललेली अंधारी वाट नाहीशी करणारी दिवसाला स्वप्नांच्या वेलीने वेढा घातलेला. कुणाचीतरी हळवीच चाहुल दाखवीत जाते. वाट दाखविली की अंधारी वाट नाहीशी होतात. कोमेजलेले मन फुलू लागते फुललेले मन जपून ठेवावे मन फुललेले फुलत राहते. ती नाहीशी होते अंधारी रात्री तेच मनाला शक्तिशाली बनवितात ...पण अशी शक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात येतच नाही असे नव्हे प्रत्येकाच्या जीवनात येत असते हेच खरे
       कारण अंधा-याला अंत असतो. समाप्ती असते. करपून गेलेले मन फुलून जाते. फुललेले मन हवेहवेसे वाटते. रंगावर प्रेम करावेसे वाटतात. स्वप्नाला ही अधिक पंख फुटतात. पंख आपलेसे वाटतात. मग कळतं आपल्यात शक्ती आहे त्यांना चिरून जाण्याची! पण ,एक नक्की; अंधारीवाट जाणले की पाऊलवाटेचा अर्थ कळतो.
            पणतीलाही अर्थ येतो. पतंगाचे समर्पण कळते. म्हणूनच युद्धानंतर जिंकण्याची काही वेगळीच मजा असते मन आनंदित आनंद होते मग त्यात चिंब भिजून गेले असावे.
     दि. 7.3.2008
               सविता तुकाराम लोटे 
(सर्व चित्रे गुगल वरून घेण्यात आलेले आहे)
      

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...