savitalote2021@bolgger.com

सोमवार, ३१ मे, २०२१

सकारात्मक चारोळी Marathi kavita charolya mi ani mi

सकारात्मक चारोळी 
Marathi kavita charolya 



       ©️✍️🏻 सविता तुकाराम लोटे 

---------------++++--------------

मराठी चारोळी Marathi charolya

       Marathi  charolya 




 जिंकण्यासाठी ओळखावे लागतात 
 चित्रविचित्र चेह-यामागील सत्य अनावश्यक 

  कुठल्याही वेळी कुठल्या ही घटना प्रसंगात    जिंकतो आपण त्याच क्षणाला जीवनात


  ©️✍️सविता तुकाराम लोटे 


----------------------------------

******मोक्ष *****

****  मोक्ष ****

आयुष्य कोणत्याही आकाराचे 
असू द्या 
त्रिकोण चौकोन... 
आयुष्य जगा सकारात्मकतेने 
ताठमानेने स्वाभिमानाने 
नव्या पहाटेच्या सूर्याप्रमाणे 
तेजस्वी ....
मोक्षधामापर्यंत जाताना !

आयुष्य कोणताही आकाराचे 
असू द्या 
काटकोन चौरस वर्तुळ 
आयुष्य जगताना जगू द्या 
इतरांनाही सरळ मानेने  
स्वसंस्कारासोबत आदराने 
अप्पर शांती लाभू द्या
महानिर्वाणापर्यंत जाताना !

जगणे खूप सोपे आहे 
जगताना जगण्याची भाषा 
फक्त कठीण... 
केंद्रबिंदू असू द्या 
आपले सुक्ष्म विचारसुद्धा 
अंतिम सत्याचा सत्याकडे 
उत्तम कर्माचा हिशोबाकडे 
स्वतःच्या विचार संस्काराकडे 
आयुष्य कोणत्याही आकाराचे 
असू द्या      

काटकोन त्रिकोण चौकोन... 
वर्तुळ लघुकोन षटकोन...
अंतीम सत्य  
एकच मोक्ष!!!!
  

        ©️✍️सविता तुकाराम लोटे 




/////////********////////*******/////////


शनिवार, २९ मे, २०२१

तुला एक सांगू

****** तुला एक सांगू ******

नको वाटतो पाऊस 
आजही ...
आलेला पाऊस 
तू मला आवडत होतास 
खिडकीच्या काचेमधून बघताना 
चारही बाजूने बरसला ना 
वाटायचं 
मुक्त मी 
सुरेल आवाजात 
सुराने 

राहू दे!
आता याच आठवणीत 
मी म्हटलं ...
तुझ्यासारखी बरसेल मुक्त!
तु ही हटवादी ना? 
रडू दिले परत 
त्याच निराशेच्या कागदांवर 
माघार घेतली... 
लालबुंद झालेल्या नयनांनी 
पावलांनी 
चेहऱ्याने 
कोवळ्या गवतफुलांची झालेली 
आठवा परत 

आश्वासन 
घेऊन; आसवा संगे 
पण एक सांगू! 
तू आला की हसावसं वाटतं 
मनाला नक्की 
तुझ्या सारखे मुक्त 
बरसाव वाटतं 
नवीन आठवणींन सोबत 
तुझ्या बरोबर संवाद साधण्यासाठी 
पाऊस वेड्या ...
पावसाच्या आठवणीला 
आपलेसे करून,  
हसऱ्या बरसणाऱ्या सरी समोर!!!!

✍️©️सविता तुकाराम लोटे 

----------------------------------

शुक्रवार, २८ मे, २०२१

......रक्तांच्या थेंबात !!!

    (  28 May World Menstrual Hygiene Day)
      
       ✍️©️ savita Tukaram Lote

    ......रक्तांच्या थेंबात


स्त्रीच्या मनातील सहनशीलता 
वाढवणारी गोष्ट म्हणजे मासिक पाळी
 
अंधश्रद्धेच्या दौरखंडयात कशाला 
गुंफतात, स्त्रीत्वाचे ...अंतर्मन !!

पुरुषप्रधान संस्कृती ही जन्म घेते 
वंशवेलीचे फुल होऊन याच विटाळात 

तू नको ; म्हणू विटाळ !
नवनिर्मिती जनक ती ...मातृत्वाची ओळख 

अस्तित्वा उभे आहे बिनधास्तपणे तेजस्वी 
काट्यांवर नवेपणाचे, महावारीच्या थेंबात 

अगणित थेंब चार दिवसात  विटाळाचे... 
महत्व कळू दे परंपरावादी...समाजव्यवस्थेला 

तिन्ही जगाचा स्वामी आई विना भिकारी 
या आईपणाची मोल विज्ञानवादी जगात पेर 

........ स्वाभिमानाने रक्तांच्या थेंबात !!!

        ©️✍️ सविता तुकाराम लोटे 



----@@@@@@@@@@@@@--------



google picture 
------@@@-@@-------@@@@@@-

मासिकपाळी

      28 मे आंतरराष्ट्रीय मासिक पाळीचे दिवस त्यानिमित्त मासिक पाळी विषयक जागृती निर्माण करणारी ही रचना

*******मासिक पाळी ******

सत्य 
अस्तित्वाच्या गणिताचे 
निसर्गचक्र मानवी 
अस्तित्वाचे ...
स्त्रीत्वाच्या एकांत, आकांत !
याच क्षणाच्या कुशीत 
सत्य ...
निसर्गचक्राचे ...
स्त्रीत्वाचे ...
आईपणाचे 
बाईपणाचे  ...
सन्मानाचे 
रक्ताच्या थेंबाचे ...
सत्य 
मानवी अस्तित्वाचे !!!!!
     

©️✍️ सविता तुकाराम लोटे 



 ✍️©️ Savita Tukaram Lote

-------------//////-----------------

 

बुधवार, २६ मे, २०२१

प्रवास

**********प्रवास *****

प्रवास 
क्षणांचा... 
प्रवास 
जीवन-मरण आतील 
वेळेचा ...
प्रवास 
प्रज्वलित सणांचा 
क्षणांचा ...
प्रवास 
कुठलाही अटी शिवाय 
झालेल्या...
स्वातंत्र्याच्या
प्रवास 
निखळ प्रेम 
सागराचा ...
प्रवास  
हसर्‍या क्षणांचा...

  ✍️©️सविता तुकाराम लोटे 

---------------------------------

ज्ञानाच्या शोधात












********* ज्ञानाच्या शोधात  *********

बुद्ध पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा


                ©️✍️सविता तुकाराम लोटे




     ✍️©️Savita Tukaram Lote 

*************************************

जीवनप्रवास






   ------जीवनप्रवास------

बुद्ध पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!!!

     (गौतम बुद्ध यांच्या जीवनावरील कविता)

              ✍️©️सविता तुकाराम लोटे



     ✍️©️Savita Tukaram Lote
  ////////////////////////////////////////

मंगळवार, २५ मे, २०२१

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बावीस प्रतिज्ञा आणि बौध्द धम्म - बहुजन हिताय बहुजन सुखाय




बावीस प्रतिज्ञा - बहुजन हिताय बहुजन सुखाय

        जो धर्म माणसाला कल्याण साधायला कारणीभूत होईल तोच खरा धर्म बुद्धधर्माचे अधिष्ठान हे जीवनात कल्याण साधायला अत्यंत आवश्यक आहे. भगवान  बुद्धाच्या  अंत होऊन 2500 वर्ष लोटले तरीही धम्मा अजूनही जिवंत आहे . बौद्ध धर्माचा पाया भगवान बुद्धाने सांगितले की ,"जगात सर्वत्र दुःख आहे 90% माणसे दुःखाने पिडलेली आहेत. दुःखाने पिडलेल्या त्या गरीब माणसांना मुक्त करणे हे बुद्धधम्माचे मुख्य कार्य आहे."
            डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, बुद्ध शिकवण बुद्ध धम्म संघ या त्रिरत्नावर आधारित आहे पंचशील अष्टांगिक मार्ग यावर आधारित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचशील त्रिशरण सोबत 22 प्रतिज्ञाची जोड देऊन बौद्ध धम्माची दीक्षा दिली. 

        डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, गौतम बुद्धांनी बुद्ध धम्माची व्याख्या," बहुजन हिताय बहुजन सुखाय;  लोकनुकंपाय, हिताय सुखाय, देवमनुस्सानम, आदिकल्याणम ,अंतिकल्याणम".

    बाबासाहेबांनी बुद्ध धम्म स्वीकारला मानवतावाद स्वीकारला बौद्ध धर्म स्वीकारताना बाबासाहेबांनी बौद्धिक कौशल्य पणाला लावून तर्कशुद्ध पद्धतीने बुद्धाच्या मानवी संस्काररुपी शिकवणीचा शोध घेतला ती शिकवण ते तत्वज्ञान पंचशील त्रिशरण स्वीकारले आणि सोबत 22 प्रतिज्ञा यांची निर्मिती करून हिंदू धर्माच्या गुलामगिरीपासून त्या करण्यासाठी बौद्ध धम्म अनुयायांसह स्वीकारला.

 1. मी ब्रह्म विष्णू आणि महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.

2. मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही त्यांची उपासना करणार नाही.

3. मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.

4. देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही.

5. बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे हा खोटा व खोडसाळ प्रचार होय असे मी मानतो.

6. मी श्राद्धपक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही. 

7.बौद्धधर्माचा विरोध विसंगत असे कोणतेच आचारकर्म मी करणार नाही.

8. कोणतेही क्रियाकर्म मी ब्राह्मणांच्या हातून करून घेणार नाही.

9. सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.

10. मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन. 

11. मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या दहा पारमिता पाळीन.

12. मी भगवंतांनी सांगितलेल्या दहा पारमिता पाळीन.

13. मी सर्व प्राणिमात्रांवर दया करीन व त्यांचे  लालन पालन करीन.

14. मी चोरी करणार नाही. 

15.मी व्यभिचार करणार नाही.

16. मी खोटे बोलणार नाही. 

17. मी दारु पिणार नाही.

18.  ज्ञान शील आणि करुणा या बौद्ध  धर्माच्या तीन तत्वांची सांगड मी माझे जीवन चालवीन.

19.  माझ्या जुन्या मनुष्यमात्राच्या असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बुद्धाचा धर्माचा स्वीकार करतो. 

20. तो सद्धधम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. 

21. माझा नवा जन्म होत आहे असे मी समजतो.

22. इतपर मी बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेन, अशी मी प्रतिज्ञा करतो.

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 22 प्रतिज्ञा देण्यामागचे त्यांची दूरदृष्टी स्पष्ट होते.  साहेब गौतम बुद्धाच्या म्हणण्याचा अर्थ स्पष्ट करताना म्हणतात ,"प्रत्येक प्रत्येक मनुष्याला विचार स्वतंत्र आहे पण त्या स्वातंत्र्याचा उपयोग त्याने सत्यशोधन करण्यात केला पाहिजे आणि सत्य म्हणजे तरी काय बरे सत्य हेच आहे की मनुष्याच्या पंचज्ञानेंद्रिय यांना आणि पंचकर्म इंद्रियांना हे सत्य पटले पाहिजे म्हणजे त्याचा स्वाद घेता आला पाहिजे त्याच्या अस्तित्वाबद्दल आपल्याला साक्ष पटवीत आली पाहिजे आणि असे हे सत्य म्हणजे ईश्वर होय."

बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या तीन भाग करता येतात.

1.  1 ते 8
2. 9 ते 18
3.19 ते 22

        त्या पद्धतीने वर्गीकरण करता येईल .पहिल्या भागातील प्रतिज्ञा मध्ये परंपरेने चालत आलेल्या रूढी प्रथा परंपरा आचार-विचार यापासून मुक्ती संबंधित आहे.
       दुसऱ्या भागात गौतम बुद्धाने दिलेल्या  शिकवणीवर आधारित आहे.
तर शेवटच्या चार प्रतिज्ञा बुद्धधम्माशी निगडित आहे बाबासाहेबांनी बुद्धाची शिकवण आचरणात आणण्यासाठी 22 प्रतिज्ञा पालन करण्याची प्रतिज्ञा आपल्या सर्वांना दिले आहे.
   
       बुद्धधर्म हा बहुजन बहुजन लोकांच्या हिताकरिता सुखाकरिता त्यांच्या वर प्रेम करण्या करीता आहे हा धर्म नुसता माणसांनी स्वीकारुन चालणार नाही देवांनी सुद्धा त्याचा स्वीकार करायला पाहिजे डॉ. आंबेडकर म्हणतात ,"ज्याप्रमाणे ऊस मुळात ही  गोड असतो मध्येही गोड असतो शेंड्यासही  गोड असतो त्याचप्रमाणे बुद्ध धर्म सुरवातीला ही कल्याणकारक आहे मधेही कल्याणकारक आहे आणि शेवटी ही कल्याणकारक आहे या धर्माच्या आदि मध्य अंत सर्वगोड हितकारक व कल्याणकारी असे आहेस." (संदर्भ - माझी आत्मकथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर)

      डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 22 प्रतिज्ञा मध्ये पंचशीलामधील पाच शील दिलेले आहे.  बाबासाहेबांच्या या प्रतिज्ञेचे पालन आपण सर्वांनी सर्वांगीण उन्नतीसाठी करावा असे त्यांचे मत होते पण आज परिस्थिती वेगळी आहे. 
   
  "धर्माची आवश्यकता गरिबांना हे पीडित पीडित लोकांना धर्म हवा असतो गरीब मनुष्य जीवनाचे मूळ आशेत आहे अशाच नष्ट झाली तर कसे होईल धर्म आशावादी बनविते पीडितांना संदेश देतो . काही घाबरू नकोस तुझी जीवन आशावादी होईल म्हणून गरीब पिडीत मनुष्य धर्मालाच एकूण राहतो," बाबासाहेब म्हणतात.
         म्हणून बाबासाहेबांनी दिलेल्या प्रतिज्ञा आपल्यासाठी आहे आपल्यातील आशावाद जागृत करण्यासाठी आहे बाबासाहेबांनी दिलेल्या प्रतिज्ञा आपल्या उन्नतीसाठी आहे कारण या प्रतिज्ञाचे पालन केल्यास आपण सर्व अंधारमय रूढी प्रथा परंपरा जातिभेद असमानता भेदभाव यापासून दूर राहू शकतो.

     22 प्रतिज्ञा मध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व मनुष्यमात्र समान आहे.समता स्थापन करणे हे आपले कर्तव्य आहे. पंचशीलाचे पालन करणे  ही आपली जबाबदारी आहे. मनुष्य उत्कर्षासाठी आणि मनुष्य मनुष्य म्हणून जगण्यासाठी बुद्ध धर्माची शिकवण अंगीकारणे हे पहिली आणि शेवटची पायरी आहे.  माझा नवा जन्म होत आहे असे मी समजतो जन्मः आयुष्यातील सर्वात सुखद सांग असतो आणि तोच सुखद क्षण प्रत्येक क्षणाला आयुष्यातील प्रत्येक टप्प्याला जीवनातील प्रत्येक जीवन क्रमामध्ये अनुभवाचा असेल तर बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञाचे आचरण करावे लागेल आणि ती सुरवात प्रत्येकाने स्वतःपासून करावे लागेल. भगवान बुद्धाने दिलेला अष्टांगिक मार्गाचा अवलंब करावा लागेल.  
        बौद्ध धम्म हा केवळ पोकळ धर्म नसून बौद्धिक चर्चा प्रत्यक्षशिकवणी आचार सखोल विचार अनुभव यावर आधारित आहे. बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा ही याच शिकवणीवर आधारित आहे. बाबासाहेबांनी या प्रतिज्ञा देताना आपली असलेली सामाजिक परिस्थिती विचार आणि असुरक्षित वातावरण रूढी प्रथा परंपरेला चिकटलेले समाजाला  नवरूप नवचैतन्य देण्यासाठी दिलेले आहे. बौद्ध धम्म हा आपल्या समोर कोणत्याही ब्राह्मण या पुरोहित सांगतो या पद्धतीने यायला नको म्हणून बाबासाहेबांनी साध्या-सरळ आणि प्रभावीपणे जगण्याचा मार्ग समाजापुढे 22 प्रतिज्ञा स्वरुपात आपल्या समोर ठेवले आहे.
  

    गौतम बुद्ध म्हणतात," मुर्खाशी मैत्री करण्यापेक्षा एकटे राहणे हे कधीही शहाणपणाचे आहे ." किंवा" तुम्ही जर योग्य दिशेने वाटचाल करीत असाल तर चालत राहायला हवेत त्याच दिशेने". याप्रमाणे आपल्या आयुष्याला दुसऱ्या कोणत्याही अनिष्ट रूढी प्रथा परंपरा यांनी चिकटलेल्या विचारसरणी आपल्या मध्ये रुजू नये म्हणून बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा आपल्याला दिला.        आयुष्य हे दुसऱ्याच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मन शांती मिळणार नाही .आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी राहा असे गौतम बुद्ध म्हणतात .
          आपण अनेक वर्ष सामाजिक गुलामगिरी अनुभवली आहे त्या गुलामगिरीचे सर्व तत्त्व नियम बळजबरीने आपल्याकडून आचरणात आणून घेतले आहे या सर्वातून मुक्ती म्हणजे 22 प्रतिज्ञा होय...

         डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्धधम्माची दीक्षा देताना 22 प्रतिज्ञा दिल्या. आपल्या आयुष्याला एक नवीन मार्ग दिला. त्या समजून घ्यावा लागेल. आपल्या समोरच्या पिढीला त्यासाठी संस्कारित करावे लागेल. त्यांच्या बालमनावर त्या रुजवावे लागेल. कारण सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक जातिभेद अनिष्ट रूढी मनुवादी प्रवृत्ती संस्कृतीच्या नावावर लादली गेलेली गुलामगिरी यापासून मुक्तीचा मार्ग म्हणजे बौद्ध संस्कृती होय. कारण बौद्ध शिकवण ही क्रांतिकारी बदल घडवून आणते.
     
     डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिल्या या बौद्ध धर्माचे पालन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी 22 प्रतिज्ञांचे जोड दिली.

       बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा म्हणजे, बहुजन हिताय बहुजन सुखाय;  लोकनुकंपाय, हिताय सुखाय, देवमनुस्सानम, आदिकल्याणम ,अंतिकल्याणम," होय.


               ✍️सविता तुकाराम लोटे 

----------------------------------


      
     


  






        

प्रेम

-------  प्रेम  ------


प्रेम म्हणजे काय ?
भावना... 

भावना म्हणजे काय? 
संवेदना... 

संवेदना म्हणजे काय? 
मनातील भाव... 

मनातील भाव म्हणजे काय? 
ज्याला अंत 
नाही असा 
अनंत... 

ओमकारासारख!!!
     
      ✍️©️सविता तुकाराम लोटे 

---------------------------------


सोमवार, २४ मे, २०२१

गौतम बुद्ध आणि त्यांचे विचार




    गौतम बुद्ध आणि त्यांचे विचार

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात," मनाला सुसंस्कृत करणे हे मानवी अस्तित्वाचे सर्वश्रेष्ठ ध्येय असले पाहिजे. त्याप्रमाणे जीवनाचे तत्वज्ञान हे सरळ साधे सोपे असावे जीवनाचे मूलभूत नियम स्वातंत्र्य समता बंधुभाव यावर आधारित आहे ."
          गौतम बुद्धांनी बौद्ध  धम्मात मध्यम मार्गाचा वापर करून मानवतावाद संपूर्ण जगाला दिला. गौतम बुद्ध म्हणतात," पाणी जोराच्या लाटेने कदाचित झुडूप विखुरली जाऊ शकतात पण समुद्राची खोली हे मात्र शांत असते त्यामुळे शांत राहायला शिका."
  
         मानवी जीवनावर तीन गोष्टींचा प्रभाव पडतो धर्म कला संस्कृती ! बौद्ध धम्मात कला साहित्य आणि संस्कृती यांना अत्यंत महत्त्व आहे. या तीनही गोष्टी माणसाच्या भावना मन संवेदना तरल बनवत असते. 

         सत्याच्या शोधामुळे नवनिर्मिती होते.  ती अप्रतिम आणि सर्वश्रेष्ठ असते कलाकारांच्या आयुष्यापेक्षा त्यांच्या कलेला अधिक महत्त्व असते. धर्म आणि कला या दोघींची अभिव्यक्ती म्हणजे संस्कृती होय. जीवनातले सगळे चढ-उतार म्हणजे आपल्या निकोप वाढीसाठी लागणारे अनुभवाचे खतपाणी आहे. 
    ज्याला चांगलं मनुष्य होण्याची इच्छा आहे त्याने जीवनाचे काही तत्त्वे पाळली पाहिजे ही विशुद्धी मार्गाची शिकवण आहे .माणसाच्या चांगल्या आणि वाईट कृतीचे मोजमाप करण्याचे मानदंड म्हणजे  पंचशील   होय.

1. पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि
( मी जीवहिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो )

2. अदिन्नादाना वेरमणी सिक्खापदं समादियामि  ( मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो)

3. कामेसु विच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामि (मी कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त प्रतिज्ञा करतो.)

4. मुसावाद वेरमणि सिक्खापदं समादियामि (मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो)

5. सुरमेरय मज्ज पमाद्ट्ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामि 
( मादक तसेच इतर सर्व मोहात पडणाऱ्या वस्तूच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो.)
      मानवी व्यक्तिमत्व काया  वाचा मन या तीन घटकांनी बनलेले आहे.   
     

    भगवान बुद्धाने सदाचाराचा जो मार्ग सांगितला आहे यालाच अष्टांगिक मार्ग म्हणतात.

1. सम्यक दृष्टी 
2. सम्यक संकल्प 
3. सम्यक वाचा  
4. सम्यक कर्मांन्त 
5. सम्यक आजीविका 
6. सम्यक व्यायाम 
7. सम्यक स्मृती 
8. सम्यक समाधी

   भगवान बुद्ध म्हणतात ,अविद्येचा विनाश हा  सम्यक दृष्टीचा उद्देश आहे.आकांक्षा महत्वकांक्षा उदात्त आणि प्रशंसनीय असावी. बोलावे जे सत्य असे योग्य वर्तन. जगण्यापूर्ती मिळविण्याचे योग्य मार्ग. व्यायाम , मनाची सतत जागृती, चित्ताची एकाग्रता होय. जगात सर्व वस्तू  परिवर्तनशील आहेत अनित्य आहेत त्यामुळे माणसाने त्यांच्याविषयी आसक्ती ठेवता कामा नये. यास सत्य म्हणतात . गौतम बुद्धाने सम्यक साधने वर भर दिलेला आहे. कारण कुठलेही अवडंबर मन शांत घेऊ शकत नाही.  मनाला यातना मुक्त करू शकत नाही. आंतरिक शांती हीच मनाला परिपूर्ण शांती देत असते. अष्टांगिक मार्ग प्रेरणा मनामध्ये निर्माण करीत असते.

भगवान बुद्धने  परिव्राजकांना दहा शील मार्ग समजावून सांगितले.शीलमार्ग म्हणजे गुणांचे पालन करणे होय

1.नीतिमत्ता 
2.दान 
3.उपेक्षा   
4.ऐहिक सुखाचा त्याग 
5.योग्य प्रयत्न 
6.शांती 
7.सत्य 
8.दृढनिश्चय 
9.दयाशीलता 
10.मैत्री (बंधुभाव)
 
        भगवान बुद्धाच्या या धम्मतत्वांचा ज्या परिव्राजकांनी पहिल्यांदा स्वीकार केला त्यांना पंचवर्गीय भिक्खू म्हणतात. भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन याच धम्माच्या तात्विक आधार आहे.
        बुद्धांनी रूढी परंपरा अंधविश्वास त्यांचे खंडन करून एक सहज सोपा मध्यम मार्ग सांगितला आहे.
    
     दुःख ही टाळता येण्याजोगे अजिबातच नाही पण त्यामध्ये किती रमून जायचे हे आपल्या हातात आहे त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुमचे तुम्हीच ठरवायचे
   तुम्ही जर योग्य दिशेने वाटचाल करत असेल तर चालत राहायला हवं त्या दिशेने गौतम बुद्ध म्हणतात.

    
       बुद्धाच्या रूपाने जगाचे वैचारिक क्षेत्र झाले बुद्धाच्या संपूर्ण तत्वज्ञानाला मानवतेची जोड आहे  सील बुद्धाचे नीतिशास्त्र आहे संमेक आजीविका बुद्धाचे अर्थशास्त्र आहे.
       बौद्ध धम्म जीवनातला प्रत्येक गोष्टी साठे गोष्टीसाठी प्रतिनिधित्व करतात मनाला विकसित करतात.
           बुद्ध धम्म मानवी मनाला जीवन जगण्यासाठी मार्गदाता बनते जीवनातील  सर्व वेदना भावना यांना प्रवाहित करते बुद्ध म्हणतात.        
          वेदना भावना संवेदना या मनाच्या सहचारिणी आहे तर मेंदू दृश्य स्वरूपाचे कार्य करते म्हणून मेंदू आणि मन यांना एकत्रित कार्य करण्याचे बळ हे बौद्ध तत्त्वज्ञान आपल्याला देते.               
       मानवाला मानव म्हणून जगण्याचे स्वतंत्र बुद्ध धम्माने दिले आणि आजही बुद्ध धम्म सर्व जगालातीच शिकवण देत आहे.
            आपला आयुष्य हे दुसऱ्याच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मन शांती मिळणार नाही आपल्याकडे आहे त्यामध्ये आनंदी राहा.
       
            बुध्दं सरणं गच्छामि
             धम्म सरणं गच्छामि
               संघ सरणं गच्छामि


     ✍️ सविता तुकाराम लोटे 


----------------------------------

 



    
   






मन शांत

-------मन शांत ------

मन शांत असेल 
असा क्षण नाही 
हृदयाला असेल ठाव 
आता ....

तो क्षण एखादी 
विचारांची शृंखला सतत 
शाश्वत ... अबोल 
उत्तरांच्या अपेक्षेने 

नवेपणाने सजलेले 
फुललेले पाकळीसारखे 
उमलत असलेले शब्द  
नयनातील शांत !!!

       सविता तुकाराम लोटे 



---------------------------------

रविवार, २३ मे, २०२१

सोबत



---------सोबत--------

                    ©️✍️सविता तुकाराम लोटे 



    -------------------------------





एकांत





----------एकांत--------

             ✍️©️सविता तुकाराम लोटे 





===========================

चिंब





------चिंब------

      ©️✍️सविता तुकाराम लोटे 



/////////////////////////////////////////////

हा वारा

       ----   हा वारा -------

हा वारा येते हळूच 
क्षणाक्षणाला सांगतो खूपच 
झाले आता झुरणे 

हा हळूच बोलतो कानात
सांगुन जातो गाल्याला 
स्पर्श करून संपले 
आता झुरणे ...अगणित

शांत क्षणाला येऊन- घेऊन 
अलगत भिरभिरता क्षणाला
ओलावा देऊन ... आनंदाचे थेंब 
अबोल शब्द ,
अगणित 

उत्तरामागे 
प्रश्नांचा वारा 
निरंतर अगणित
क्षणाक्षणाला!

         ©️✍️सविता तुकाराम लोटे 
----------------------------------

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...