/// प्रतिभा काव्यमिलन ///
माझी तुझी भेट कदाचित जन्मानेच झाली असावी. तु माझ्यात रुचत गेला आणि मी तुला माझ्यात रुजविता गेली. माझ्या- तुझ्या सागर प्रेमात शब्द एक एक पायरीने !! तू माझा मी तुझी म्हटले तर अबोल प्रेम आपल्या सोबत. शब्द वाहते, लाजत - मुरडत रंगीबिरंगी शब्दांसोबत..!!
साथ माझे दे तू
माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत
झरा वाहू दे प्रेमाच्या
असाच काव्यप्रतिभेने
समर्थ बनव मला तुझ्या
सोबत राहण्यासाठी
सदैव तुझ्या ..
अंतर्मनात.......!!
सुंदरतेने नटलेले काव्य फुलवीत.... मिलन शब्द स्पर्शाने. प्रेम भावनेने फुललेल्या भावमनाला नव्याने ओळखत होत होती. तुझे माझे मिलन प्रेम कवितेने. प्रेमाचा बंधनला लाजूनच पानावर उमटत असे.
फुलवित असे बंद दाराआड एकटेपणात.आपले मिलन नवीन काव्यरूपात. नवनिर्मितीची नवीन काव्य मनाला प्रफुल्लित करीत असे. त्यातून फुललेले काव्य आनंद मनाच्या खोल नवीन नात्यात रुजविता असे. तुझे माझे मिलन नवकाव्याची... रम्यदुनिया.
आपण आपलेच असतो त्यावेळी गोंधळ फक्त अवेळी आलेल्या शब्दांचा.काव्य प्रवाह चालू... स्वतः स्वतःच्या मनाशी आणि स्वतःच्या भावनेवर आवर घालत प्रीत मिलनाचा नवीन काव्य शब्दांवर. मला तुझ्या मिठीत घेत नवीन सहवासात भूतकाळातील चित्रीकरण अंधुक करीत जातो; वर्तमानात जगण्यासाठी!!!
नवीन सहवासात नवीन मिलनात घट्ट नवाप्रकाशासारखे. गुंजत राहते ते शब्द तुझ्या माझ्या मिलन काव्याचे. तू सांगतो, बघ स्मृतीच्या आठवणीतील कविता फक्त मनोरंजनासाठी मन समाधानाचे रंजकवादी सौंदर्यशास्त्राने नटलेले आता सोडते वाट थोडीतरी बाजूला ठेवून ती वाट जुन्या मिलनाची...
माझी तुझी शब्दमैत्री
आनंदाने फुलवत राहू
मूके शब्दही बोलते करू
मिलनाने जपू सुगंध
आपल्यातील शुद्ध प्रतिभेचा
स्पर्श मखमली डायरीतील
पानांचा...
भान ठेवून चिंब भिजून
आपल्याच मिलनात
रोजच भेटीने..!!
हरवलेल्या क्षणांना हातात पकडून ठेव पण सहज काव्यासाठी. तुझी - माझी भेट प्रेमकाव्य फुलली. आता हरव ती वाट. सामाजिक बांधिलकी जपत फुलवू नवीन मिलन काव्यरूपात नवीन शब्दात नवीन काव्य शैलीत नवीन विषयांना काव्यप्रतिभेला नवनिर्मिती करू तुझ्या-माझ्या मिलनाने.
नको वाट बघू कोणाचीही, मनाचा झरा वाहू देऊ.... आपल्या मिलनाने. प्रीत फुलं फुलवून नवीन काव्य मिलनात. थोड्या वेगळ्या स्वरूपात..!! माझ्या तुझ्यातील प्रेमाने. मी तुझी प्रतिभा तू माझे शब्द... करून.
नवीन इंद्रधनुष्याच्या रंगाप्रमाणे नवनिर्मिती काव्यमिलनाने. भाष्य करू प्रश्नांवर समस्यांवर अन्यायांवर विकासाच्या नावाने चाललेल्या भ्रष्टाचारानंवर आणि सामाजिक असंतोषवर.
काव्य शब्द मिलन करून माझ्या तुझ्या प्रतिभेने तुझ्या-माझ्या सोबतीने शब्दाच्या साक्षीने डायरीच्या पानाच्या फुलवू आपले मिलन घट्ट मिठीत तुझे असणे माझे असणे म्हणजे तुझ्या माझ्या मनस्पर्शाने शब्द स्पर्शाने आत्म्याला मंत्रमुग्ध करू काव्य नवनिर्मितीच्या घट्ट मिलन स्पर्शाने..!!
माझा आत्मा तू
तुझी आत्मा मी
विश्वासघाताचे मिलन न मिळो
आपल्यास आपल्याच काव्यप्रतिभेने
तन मनावर राज्य करू
माझ्या तुझ्या शब्द मिलनाने
सोबतीला आपले मित्र
घट्ट मिलनमिठीत....
पेन पेन्सिल डायरी
पुस्तके..!!!!