savitalote2021@bolgger.com

शनिवार, १७ एप्रिल, २०२१

एक प्रवास नसलेला नात्यांचा

   
एक प्रवास ....नसलेल्या नात्यांचा

      गणित नव्हते त्या क्षणाला 
      सहजता आणि सहजता शब्दसाखळीला
      डोळेझाक लखलखता प्रकाशातील    
      हिरव्या स्वप्नांची अपुला मधुर शब्दसुराला
सोनेरी किरण आणि एक अद्भुत शांतता मनाला एक नवीन नाते जुळून जाते आणि त्या सहज भाग घेताना वाट सुद्धा नाही की ती सहजता एक शब्दांमध्ये  जाऊन पोहचेल पण  झर्‍याला
 पाण्याची कमतरता नसते तशी चांगल्या व्यक्तीला सुद्धा नसते
     आपले सौंदर्य आपल्या व्यक्तिमत्त्वात असते त्याला किती शांत आणि वास्तविक ठेवायचे हे आपण ठरवीत असतो पण त्या काल्पनिक व्यक्तिमत्वाला खरेपणा पाहणारा दिसत नस तो पण त्या सहज शब्दांमध्ये कितीतरी गोष्टी सहज सांगून जातात ते व्यक्तिमत्त्व खरे असते.
   आकाशाला भिडलेले व्यक्तिमत्व आणि पर्वताच्या शिखरावर जाऊन पहाणार्‍या व्यक्तिमत्त्वाच्या पायात तिथे जाण्याचे स्वप्न सहज आणि सहज शब्द संगतीने सांगून जाणे ही कला त्या सहज पाणीदार सावळ्या रूपामध्ये दिसले  ती सहजता त्या क्षणांमध्ये आपल्या मध्ये असावी असे वाटत राहते
         ती शांतता मनातील असावी वा नवीन पायवाट शोधणाऱ्या व्यक्ती साठी असावी हे त्यावेळी जरी कळत नसले तरी ती वाट योग्य दिशेने साठी निर्मिती केलेली होती हे नक्की
         नयनांच्या स्वप्नाला इतरांच्या स्वप्नाचा    
         संगतीने सौंदर्य चढविले
         सोनेरी किरणांनी आणि हळव्या शब्दांनी 
         नवीन पायवाट नवीन दिशा नवीन सुर 
         पूर्णत्वाचे लावून लखलखत 
         शब्दांची माळ दिली इतरांना
हळव्या पावलाने मावळतीचे क्षण जवळ न देता उगवत्या शन्नांची पावले देताना शब्द जरी खूप वेगळे असले तरी कोमल भावविश्व कणखर आणि दिशा  घेऊन असलेली ती दिशा स्वतः किती वर्षे लागली असेल त्यात वैताग नाही त्यात गळणारी स्वप्न  कल्पना नाही वाळलले     
 पण आवाजाची साद नाही ते सर्व .
           दाटलेल्या त्याहून पावलांनी देऊन दिलेले दिशा असावी एखाद्या स्वप्नांची त्या दिशेला कणखरपणा असावा वाऱ्याच्या वेगाने जावे पण त्या दिशेसोबत!
         कोरड्या शब्दांची माळ नको त्याला ओलावा असावा सांजवेळी च्या हिवाळी दवबिंदू त्या क्षणाला फक्त आपण - आपले आणि फक्त आपल्यात असले तरी एक नवीन दिशा होती नवीन स्वप्नाचा हळुवार स्वप्नातील मधुर पांघरून होते नवीन पहाट स्वप्न देताना.

   स्वप्न सुरेल ...हळवे शब्द संगती सोबत
   स्वप्न सुरेल ...तळ्याकाठी पावलंसोबत 
   स्वप्न सुरेल...गुलमोहराच्या हसता रूपासोबत 
   स्वप्न सुरेल... गुणगुणत शब्दांसोबत
    स्वप्न  सुरेल...नवीन पाय वाटते सोबत

क्षितिज असावे पण ते मृगजळ नसावे स्वप्न असावे पण कोमेजलेली नसावे व्याकूळ 
नसावे पण उगवत्या सूर्यासारखे कोमल असावे स्वप्नाच्या मागे जायचे पण त्याला एक प्रवाह तयार करून एक प्रवास तयार करून नाजूक आणि मधुर शब्दांमध्ये.
          मैत्री असावी शब्दमधुरतेने 
          कोणत्याही वाटेवर सहज होणारी 
          उगवत्या किरणा सोबत आणि 
          पाण्यातील प्रतिबिंब सारखे स्वच्छ
                       सविता तुकाराम लोटे 


(मी आणि मी या ब्लॉग वरिलसर्व चित्र गुगल वरून घेण्यात आलेली आहे)

फुलपाखरू

फुलपाखरू 
          ...त्यांचा जन्म किती अडचणींना ,अडचणींना, संघर्षाला सामोर जाऊन होतो. त्याला नवरूप हे त्याच्या त्या संघर्षाची जन्म कहाणी असते. आयुष्य सुद्धा प्रत्येक व्यक्तीला त्या संघर्ष मधून जावे लागते. प्रत्येक वेळी अडचणीवर मात करून नवीन उमेदीने झालेले सर्वच मागे सारून त्याला आपला आयुष्यातील एक नवीन अनुभव म्हणून घ्यावा लागतो.
       फुलपाखरू नवीन जन्माने मनसोक्त संचार करतो तसेच आपल्या आयुष्यातील दिवस हा नवीन मनसोक्त आपल्या स्वप्ना वरील साचलेली धूळ नष्ट करीत हसत संचार करावे फुलपाखरू म्हणजे नवीन जीवन प्रवास ज्या जीवन प्रवासात नवीन रंग नवीन रूप नवीन क्षणाक्षणाला  आलेला अनुभव स्वतःच्या स्वबळावर काहीतरी निर्माण करण्याची शक्ती ताकत फुलपाखरू म्हणजे नाजूक निसर्ग रूपामध्ये शक्तिशाली होऊन स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारे .
       संचार असती चोहीकडे 
       फुललेल्या फुलात नवचैतन्य
       रंगीबिरंगी फुलाच्या सानिध्यात 
       हिरवळीत असती मैत्रीबंध
जीवन हे असेच रोज नवीन अनुभव घेताना फुलपाखरासारखी शक्तिशाली व्हावे मनातील स्वप्नांना शक्तीशाली विचारांनी पूर्ण करावे. जीवनात अडचणी येणारच पण त्यांना मात करून त्यावर आपल्या विचारांनी आपल्या स्वप्नातील स्वप्नावर मात करावी.
       आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला आपण आपले अस्तित्व कायम ठेवायचे पण त्यामुळे इतर दुखावले जाणार नाही याची दक्षता सुद्धा आपल्यालाच करावे लागेल फुलपाखरासारखे नवरुप घेऊन नवनिर्मिती करायचे स्वतःच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनसोक्त  करावे. 
       दर्पण आपली
       वलय आपली
       कलाकृती ही आपली 
       मनमोहकताही आपलीच 
       रंगीबिरंगी रंगांमध्ये सजले
       मुक्त स्वतंत्रही!!
                        सविता तुकाराम लोटे 
                        

शब्द शक्ति!!!


                                       शब्दशक्ती 
         दिवसाला शब्द असावे की 
          येणाऱ्या क्षणाला सोबत करावे की 
          क्षणाला हातात धरावे 
          शब्दांच्या फुललेल्या माळेमध्ये 
          शब्दांनाच शब्द करून
     खरंच शब्द किती महत्वपूर्ण करून जातात ज्या शब्दाने आपण इतरांची मने जिंकू शकतो त्याच शब्दाने मने तोडू शकतो. कुठेच नाही सहजता कुठेच नाही वाटते तिथेही नाही आणि असेही वाटते तेथेही नाही. 
       शब्द मनाला किती वेदना देतात आणि मनाला मनाला वेदना देणाऱ्या शब्दांची सतत सात असते काही शब्द जे मनाला बळ देणारे नक्की असतात... काही क्षण  त्या शब्दांसाठी असतात
           नक्कीच! शब्दांमध्ये शक्ती असते. पण ती शक्ती कशी वापरायची हे त्या क्षणामुळे आपल्याला कळते. खरंच आपण आपले शब्द मोजून मापून खर्च करू शकत नाही पण आपल्या व्यवहारांमध्ये ते दिसावे असे वाटत राहते.        शब्दाला जरी शक्ती असली तरी ती आपल्या वरील आपल्या क्षणाला ती साथ देत असते.
      शब्द हे आपले असतात शब्द हे आपल्यातील संस्काराचे प्रतीक असतात शब्द हे आपल्यातील हसूचे कारण असते... शब्द हे आपल्या यशाचे प्रतीक असते शब्द हे आपल्यातील आपल्या व्यक्तिमत्त्वाचे बळ असते. 
       म्हणून शब्द व्यवहारात वापरतांना स्वतःला सावरावे सहज... क्षणाला ...जवळ करीत ,"हसून"!!!
         शब्दशक्ति ही आपली शक्ति 
              संस्काराचे प्रतिक 
                 शब्दसावली ती !

                              सविता तुकाराम लोटे 
     -------------------------------

शुक्रवार, १६ एप्रिल, २०२१

फुलांचे सामर्थ


फुलांचे सामर्थ्य
       फुलांचे सामर्थ्य अनुभवासाठी फुलच व्हावे लागत नाही तर त्यासाठी फुलाची कोमलता आणि त्यांच्या सारखेच जडत्व सुद्धा घ्यावी लागते ते जसा स्त्रियांच्या केसातील सौंदर्य वाढविते तसाच ते मंदिरातील देवत्वाचे देवपण म्हणजे जगातील  कोणत्याही क्षणी आणि कोणत्याही घटनेसाठी वापरू शकतो 
    फुलांमध्ये सुगंधीपणा  असतो पण ते त्यापासून दूर राहू शकत नाही त्याच्या त्या सुगंधी सौंदर्यावर आपले सौंदर्य फुल होते त्याच्या सौंदर्यावर आपले मन टवटवीत होते हसरे होते पाऊल प्रत्येक क्षणी सुगंधी होते 
       कुठे ती मनाला फिरू देत नाही त्यांना आपल्या जवळी असलेले सर्व चांगल्या गोष्टी देऊन जाते आणि काट्यांचे घाव स्वतःजवळ ठेवतात जखमा स्वजवळ ठेवून चेहर्‍यावर हसु देऊन जातो . आपले आयुष्य दुसऱ्याला आनंदी देण्यासाठी असावे त्याला पाहतांना थोडे सामर्थ्य आपण आपल्याजवळ सुद्धा निर्माण करावे पण जखमांना दुर करीत फुलांसारखे मनात सामर्थ्य निर्माण करून वादळातही काट्यांना दूर करीत सत्याच्या गणितावर चालत. 
        आपल्यातील सामर्थ्य आपल्यातील फुल्लत्व आपल्यातील नाजूकपणा काट्यांना मागे सारत इतरांच्या नाजूक शब्द साखळी ने निर्माण करीत.
          फुलांची कोमलता अनुभवावी 
          सत्याच्या गणितावर आणि 
          स्वतःच्या नाजूक शब्द सामर्थ्यांने 
           फुलांची सामर्थ्य अनुभवण्यासाठीच !
                      सविता तुकाराम लोटे 

ओंजळ

     ओंजळ

         क्षणी फुललेल्या ओंजळीत भरतांना मनात किती आनंद आनंद होत असतो आणि तोच क्षण मनासारखं नसताना ओंजळीत भरतांना मनाला आनंद होईलच असे नाही. 
       ओंजळ आपली... पण ती किती भरलेली आणि किती रिक्त हे माहीत नसते. 
         ओंजाळ म्हणजे आपल्या दोन्ही हाताची एकत्र आलेली एक प्रतिक्रिया पण ती येते तेव्हा भरपूर काही आपल्या त्यामध्ये ओंजळी मध्ये येते त्याला किती मोकळे सोडायचे की जणू जपून ठेवायचे हे त्या क्षणावर अवलंबून  असते.                        वाकलेल्या त्या क्षणाला ओंजळीत
 ठेवण्यापेक्षा आनंदी क्षणाला सांजवेळी सुद्धा आपल्या ओंजळीत ठेवावे मनाला ते कळू सुध्दा न देता! मूक भावनेने आणि ओल्या श्वासाने व फुललेल्या स्वरबद्ध संगीताने.
                              सविता तुकाराम लोटे

प्रिये


   प्रिये
आकाशातील चमकते चांदणे 
तुझ्याकरिता तोडून आणणे 
चांदण्याचा गजरा केसात माळीन 
स्वप्न तुला दाखविणार नाही 
जे जीवनात उतरत नाहीत 
माझ्या मला मर्यादा माहित आहे
तरीपण 
जीवनाच्या प्रत्येक वाटेवर 
साथ मात्र देईल 
हाताने मोकळा केसात 
लाल गुलाबाचे फुल माळीन
                    माझी प्रिये!!
    सविता तुकाराम लोटे 

प्रेमबिम

      
     प्रेमबिम 
मनाला धमकावून सांगत असते 
प्रेमबिम करायचं नसतं 
तरीही मन झुकत असते तिकडे 
डोळे शोधत असते त्याला 
त्याच्या चेहऱ्यावरील शांतमुद्रा 
पाहण्यासाठी..... 
तरीही,
मनाला धमकावीत असते 
प्रेम बिम करायचे नसते
प्रेम बिम करायचे नसते
       सविता तुकाराम लोटे 

गणपती

            गणपती 
गणपती गणपती 
आलास आमच्या घरोघरी 
नैवेद्याला मोदक आणि फक्त मोदक 
वाजत गाजत आला 
गणपती आला 
कुठे तर अडीच दिवसाचा 
तर कुठे अकरा दिवसाच्या 
सर्वकाही तुझ्यासाठी 
आला गणपती  
गणपती तुझे नाव अनेक
पण नावात आहे तुझे रूप 
राहतो आमच्या घरी 
जसजसे दिवस जातात 
तसतशी होते जीव घालमेल 
असाच येते तो दिवस 
तुझ्या जाण्याचा 
मन असते बेचैन 
पण मनाला माहित असते 
गणपती बाप्पा मोरया 
पुढच्या वर्षी लवकर या!

प्रेमाचा दिवस

       प्रेमाचा दिवस 
आयुष्यातील प्रेम दिवस तो
मनातील भावना व्यक्त करते तो
प्रियकर प्रियसीला देतो लाल फुल
त्यातच असते त्याचे प्रेम 
प्रेम तर नयनात असते 
फुल तर ते प्रतीक असते 
रुसलेल्या प्रियसीला व्यक्त 
करण्यासाठी असतो
तो दिवस 
आपल्यालाही कुणी द्यावे फुल 
अशीच आशा असते मनी 
तो दिवस म्हणजे प्रियकरांच्या
आनंदाचा दिवस
      सविता तुकाराम लोटे 

आठवण

        आठवण 
रातकिड्यांचा आवाजात 
आकाशात चमकणारे तारे 
अंगाला मोहून टाकणारा वारा 
आणि अशातच तू आली 
तुझ्या शृंगारानी झाले प्रफुल्लित 
तुझ्या केसातील मोगरा 
आनंदून गेला माझ्या मनाला 
तेव्हा आली मनी आठवण 
गेलेली तू दूर 
माझ्यापासून ....
मी सावरत होते स्वतःला 
तरी माझी एक वेडी 
आशा
होती
तू गेली असली तरी 
तुझे प्रेम माझ्याजवळी होते

गुरुवार, १५ एप्रिल, २०२१

निरागस प्रेम

       निरागस प्रेम 
माझ्या मनातील
मनामध्ये तू आहे जशी
तसे मी तुझ्या मनात असावे 
माझ्या भावनेतील  
भावनेमध्ये तुझे 
नाव आहेत तसे 
तुझ्या भावनेतील भावनेमध्ये 
मी असावे
माझ्या डोळ्यातील 
प्रत्येक स्वप्नांमध्ये अस्तित्व 
तसे तुझ्या डोळ्यामधील 
प्रत्येक स्वप्नांमध्ये माझे
अस्तित्व असावे 
    सविता तुकाराम लोटे 

आयुष्य ...

      आयुष्य 
आयुष्य म्हणजे 
न सुटणार कोड असत
आयुष्य हे असच असत
दिवसानंतर रात्र 
सुखानंतर दुःख 
आयुष्य हे असतच असत 
न सुटणार कोड असत
आयुष्य हे असतच असत
सुख दुःखाच्या वाटेवर 
येणार स्वप्न असत
सकाळी पडलेले स्वप्न जस 
जीवनाच्या वाटेवर तरंगणार
आयुष्य असच असत 
                  सविता तुकाराम लोटे 

सावरेल तू

         सावरलेस तू 
मस्तीत चालले होते 
आयुष्याच्या वाटेवर येणारे 
अनुभव झेलत जखमी होत 
नाही दाखविले कुणा 
पण तू केव्हा वेदनेला 
आपलेसे केले कळलेच नाही 
तुझ्यासमोर मन कसे मोकळे 
होत गेले नकळत 
चुकीच्या वाटेवरून सावरले तू 
मनातील गहिऱ्या वेदनांना 
फुलात कधी परिवर्तन 
केले कळलेच नाही
  सविता तुकाराम लोटे 

पुन्हा भेटावेस तू

पुन्हा भेटावेस तू 
पुन्हा भेटावेस तू अशी इच्छा हदयी 
येऊन गेली 
या बंधिस्त मनाच्या स्मृती आठवणीत 
पुन्हा भेटावेस तू  
तेजकळया जुळवून माळरान गुंफीत 
केसात माळते तुझ्या हाताने 
मनाच्या आनंदात फुलावे
पुन्हा मिळून
पुन्हा भेटावेस तू
नयनी भाषेच्या सोबत 
शब्दविना सांगावे तू
तुझे शब्द 
पुन्हा भेटावेस तू 
मला माझे अस्तित्व सांगण्यासाठी 
येणावादळवाटे वरून सावरण्यासाठी 
  भेटावेस तू
    सविता तुकाराम लोटे 

भाव मनातील

           भाव मनातील
मनातील भावना व्यक्त 
करण्यासाठी शब्दही कमी पडतात 
जेव्हा वेदना देतात 
मनातील भाव 
कळतही नाही, 
जेव्हा मनात अस्पष्ट 
कल्पना असतात भविष्याच्या !!!
नकळत डोळे पाणावतात 
अश्रू येऊ न देण्याचा निश्चय 
करीत असले तरी 
चोरपावलाने येऊन जातात 
नकळत!
            सविता तुकाराम लोटे

वेडया जीवाला

       वेड्या जीवाला 
माझे तुझ्याकडे पाहणे 
हसरा चेहऱ्यावरील ते भाव 
कळलेच नाही 
कधी  काळीज चोरले 
सुखावलेल्या वेडा जीवाला
वेडा मनाला 
समजावीत होते 
तरी आठवणीच्या सुखात 
भिजवत होते 
सोकावलेल्या वेड्या जीवाला 
समजावीत होते...
              सविता तुकाराम लोटे 

अश्रू फुले

     अश्रुफूले 
अश्रूमधील भावना
तुला कळलिच नाही
अश्रू फक्त तु जाताना 
सांडत होते,पण.
त्यामागील.... 
भावना जाणले
तेव्हा 
त्याच अश्रुंची 
आनंदी फुले झाले 
          सविता तुकाराम लोटे  

बुधवार, १४ एप्रिल, २०२१

मला ही लिहिता येते

मला ही लिहिता येते 
मला ही लिहिता येते र ला र स ला स
पण रस्त्याच्या लगत वसलेली वस्तीस पाहिले की कळते जगण्याची भीषण वास्तव संघर्ष आणि जगण्या अन्नासाठी ची तडफड 

मलाही लिहिता येते म ला म ग ला ग 
पण अंगावरची कपडे पाहिले फॅशन श्रीमंताची,कपडे म्हणायचे की चिंध्या... कपड्याच्या नावाखाली आणि रस्त्यावर फॅशनेबल फाटकी वस्त्रे 

मलाही लिहिता येते ट ला ट फ ला फ
पण इवल्याशा पायात बळ येईल का?शिक्षणाचे!  हसत-हसत जाईल का?
शाळा नावाच्या इमारतीमध्ये 
सावरेल का?आपले अंधारमय उघडे आयुष्य

मलाही लिहिता येते ध ला ध न ला न 
पण काय जगणं हे उघडावरले...गरिबीचे हसू की हसूच गरिबीचे श्रीमंतीचा शहरात लढायचे कुणाबरोबर आटलेल्या डोळ्यातील पाण्याबरोबर??

मलाही लिहिता येते ध ला ध छ ला छ 
पण थोपविता येणार का स्वच्छ भारताच्या नकाशात हरवलेले बालपण जगण्याची
आशा भिरकावून देणाऱ्या झोळीतील
अंधकार...

मलाही लिहिता येते ल ला ल श ला श 
पण त्यांच्यापर्यंत ही पोहोचेल का 
भारतीय संविधान,मूलभूत हक्क समानतेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि विचार
संपेल का विश्वासातील आशावाद जगण्याच्या सरणावरील मरणयातना 
टिपेल का उंच भरारी यशाची 
                         जीवनाच्या लढाईत 
मला ही लिहिता येते स ला स,म ला म आणि बरच काही 
                       सविता तुकाराम लोटे

जाळ

वलय

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...