बावीस प्रतिज्ञा - बहुजन हिताय बहुजन सुखाय
जो धर्म माणसाला कल्याण साधायला कारणीभूत होईल तोच खरा धर्म बुद्धधर्माचे अधिष्ठान हे जीवनात कल्याण साधायला अत्यंत आवश्यक आहे. भगवान बुद्धाच्या अंत होऊन 2500 वर्ष लोटले तरीही धम्मा अजूनही जिवंत आहे . बौद्ध धर्माचा पाया भगवान बुद्धाने सांगितले की ,"जगात सर्वत्र दुःख आहे 90% माणसे दुःखाने पिडलेली आहेत. दुःखाने पिडलेल्या त्या गरीब माणसांना मुक्त करणे हे बुद्धधम्माचे मुख्य कार्य आहे."
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, बुद्ध शिकवण बुद्ध धम्म संघ या त्रिरत्नावर आधारित आहे पंचशील अष्टांगिक मार्ग यावर आधारित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचशील त्रिशरण सोबत 22 प्रतिज्ञाची जोड देऊन बौद्ध धम्माची दीक्षा दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, गौतम बुद्धांनी बुद्ध धम्माची व्याख्या," बहुजन हिताय बहुजन सुखाय; लोकनुकंपाय, हिताय सुखाय, देवमनुस्सानम, आदिकल्याणम ,अंतिकल्याणम".
बाबासाहेबांनी बुद्ध धम्म स्वीकारला मानवतावाद स्वीकारला बौद्ध धर्म स्वीकारताना बाबासाहेबांनी बौद्धिक कौशल्य पणाला लावून तर्कशुद्ध पद्धतीने बुद्धाच्या मानवी संस्काररुपी शिकवणीचा शोध घेतला ती शिकवण ते तत्वज्ञान पंचशील त्रिशरण स्वीकारले आणि सोबत 22 प्रतिज्ञा यांची निर्मिती करून हिंदू धर्माच्या गुलामगिरीपासून त्या करण्यासाठी बौद्ध धम्म अनुयायांसह स्वीकारला.
1. मी ब्रह्म विष्णू आणि महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
2. मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही त्यांची उपासना करणार नाही.
3. मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
4. देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही.
5. बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे हा खोटा व खोडसाळ प्रचार होय असे मी मानतो.
6. मी श्राद्धपक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही.
7.बौद्धधर्माचा विरोध विसंगत असे कोणतेच आचारकर्म मी करणार नाही.
8. कोणतेही क्रियाकर्म मी ब्राह्मणांच्या हातून करून घेणार नाही.
9. सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.
10. मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.
11. मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या दहा पारमिता पाळीन.
12. मी भगवंतांनी सांगितलेल्या दहा पारमिता पाळीन.
13. मी सर्व प्राणिमात्रांवर दया करीन व त्यांचे लालन पालन करीन.
14. मी चोरी करणार नाही.
15.मी व्यभिचार करणार नाही.
16. मी खोटे बोलणार नाही.
17. मी दारु पिणार नाही.
18. ज्ञान शील आणि करुणा या बौद्ध धर्माच्या तीन तत्वांची सांगड मी माझे जीवन चालवीन.
19. माझ्या जुन्या मनुष्यमात्राच्या असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बुद्धाचा धर्माचा स्वीकार करतो.
20. तो सद्धधम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
21. माझा नवा जन्म होत आहे असे मी समजतो.
22. इतपर मी बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेन, अशी मी प्रतिज्ञा करतो.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 22 प्रतिज्ञा देण्यामागचे त्यांची दूरदृष्टी स्पष्ट होते. साहेब गौतम बुद्धाच्या म्हणण्याचा अर्थ स्पष्ट करताना म्हणतात ,"प्रत्येक प्रत्येक मनुष्याला विचार स्वतंत्र आहे पण त्या स्वातंत्र्याचा उपयोग त्याने सत्यशोधन करण्यात केला पाहिजे आणि सत्य म्हणजे तरी काय बरे सत्य हेच आहे की मनुष्याच्या पंचज्ञानेंद्रिय यांना आणि पंचकर्म इंद्रियांना हे सत्य पटले पाहिजे म्हणजे त्याचा स्वाद घेता आला पाहिजे त्याच्या अस्तित्वाबद्दल आपल्याला साक्ष पटवीत आली पाहिजे आणि असे हे सत्य म्हणजे ईश्वर होय."
बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या तीन भाग करता येतात.
1. 1 ते 8
2. 9 ते 18
3.19 ते 22
त्या पद्धतीने वर्गीकरण करता येईल .पहिल्या भागातील प्रतिज्ञा मध्ये परंपरेने चालत आलेल्या रूढी प्रथा परंपरा आचार-विचार यापासून मुक्ती संबंधित आहे.
दुसऱ्या भागात गौतम बुद्धाने दिलेल्या शिकवणीवर आधारित आहे.
तर शेवटच्या चार प्रतिज्ञा बुद्धधम्माशी निगडित आहे बाबासाहेबांनी बुद्धाची शिकवण आचरणात आणण्यासाठी 22 प्रतिज्ञा पालन करण्याची प्रतिज्ञा आपल्या सर्वांना दिले आहे.
बुद्धधर्म हा बहुजन बहुजन लोकांच्या हिताकरिता सुखाकरिता त्यांच्या वर प्रेम करण्या करीता आहे हा धर्म नुसता माणसांनी स्वीकारुन चालणार नाही देवांनी सुद्धा त्याचा स्वीकार करायला पाहिजे डॉ. आंबेडकर म्हणतात ,"ज्याप्रमाणे ऊस मुळात ही गोड असतो मध्येही गोड असतो शेंड्यासही गोड असतो त्याचप्रमाणे बुद्ध धर्म सुरवातीला ही कल्याणकारक आहे मधेही कल्याणकारक आहे आणि शेवटी ही कल्याणकारक आहे या धर्माच्या आदि मध्य अंत सर्वगोड हितकारक व कल्याणकारी असे आहेस." (संदर्भ - माझी आत्मकथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 22 प्रतिज्ञा मध्ये पंचशीलामधील पाच शील दिलेले आहे. बाबासाहेबांच्या या प्रतिज्ञेचे पालन आपण सर्वांनी सर्वांगीण उन्नतीसाठी करावा असे त्यांचे मत होते पण आज परिस्थिती वेगळी आहे.
"धर्माची आवश्यकता गरिबांना हे पीडित पीडित लोकांना धर्म हवा असतो गरीब मनुष्य जीवनाचे मूळ आशेत आहे अशाच नष्ट झाली तर कसे होईल धर्म आशावादी बनविते पीडितांना संदेश देतो . काही घाबरू नकोस तुझी जीवन आशावादी होईल म्हणून गरीब पिडीत मनुष्य धर्मालाच एकूण राहतो," बाबासाहेब म्हणतात.
म्हणून बाबासाहेबांनी दिलेल्या प्रतिज्ञा आपल्यासाठी आहे आपल्यातील आशावाद जागृत करण्यासाठी आहे बाबासाहेबांनी दिलेल्या प्रतिज्ञा आपल्या उन्नतीसाठी आहे कारण या प्रतिज्ञाचे पालन केल्यास आपण सर्व अंधारमय रूढी प्रथा परंपरा जातिभेद असमानता भेदभाव यापासून दूर राहू शकतो.
22 प्रतिज्ञा मध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व मनुष्यमात्र समान आहे.समता स्थापन करणे हे आपले कर्तव्य आहे. पंचशीलाचे पालन करणे ही आपली जबाबदारी आहे. मनुष्य उत्कर्षासाठी आणि मनुष्य मनुष्य म्हणून जगण्यासाठी बुद्ध धर्माची शिकवण अंगीकारणे हे पहिली आणि शेवटची पायरी आहे. माझा नवा जन्म होत आहे असे मी समजतो जन्मः आयुष्यातील सर्वात सुखद सांग असतो आणि तोच सुखद क्षण प्रत्येक क्षणाला आयुष्यातील प्रत्येक टप्प्याला जीवनातील प्रत्येक जीवन क्रमामध्ये अनुभवाचा असेल तर बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञाचे आचरण करावे लागेल आणि ती सुरवात प्रत्येकाने स्वतःपासून करावे लागेल. भगवान बुद्धाने दिलेला अष्टांगिक मार्गाचा अवलंब करावा लागेल.
बौद्ध धम्म हा केवळ पोकळ धर्म नसून बौद्धिक चर्चा प्रत्यक्षशिकवणी आचार सखोल विचार अनुभव यावर आधारित आहे. बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा ही याच शिकवणीवर आधारित आहे. बाबासाहेबांनी या प्रतिज्ञा देताना आपली असलेली सामाजिक परिस्थिती विचार आणि असुरक्षित वातावरण रूढी प्रथा परंपरेला चिकटलेले समाजाला नवरूप नवचैतन्य देण्यासाठी दिलेले आहे. बौद्ध धम्म हा आपल्या समोर कोणत्याही ब्राह्मण या पुरोहित सांगतो या पद्धतीने यायला नको म्हणून बाबासाहेबांनी साध्या-सरळ आणि प्रभावीपणे जगण्याचा मार्ग समाजापुढे 22 प्रतिज्ञा स्वरुपात आपल्या समोर ठेवले आहे.
गौतम बुद्ध म्हणतात," मुर्खाशी मैत्री करण्यापेक्षा एकटे राहणे हे कधीही शहाणपणाचे आहे ." किंवा" तुम्ही जर योग्य दिशेने वाटचाल करीत असाल तर चालत राहायला हवेत त्याच दिशेने". याप्रमाणे आपल्या आयुष्याला दुसऱ्या कोणत्याही अनिष्ट रूढी प्रथा परंपरा यांनी चिकटलेल्या विचारसरणी आपल्या मध्ये रुजू नये म्हणून बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा आपल्याला दिला. आयुष्य हे दुसऱ्याच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मन शांती मिळणार नाही .आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी राहा असे गौतम बुद्ध म्हणतात .
आपण अनेक वर्ष सामाजिक गुलामगिरी अनुभवली आहे त्या गुलामगिरीचे सर्व तत्त्व नियम बळजबरीने आपल्याकडून आचरणात आणून घेतले आहे या सर्वातून मुक्ती म्हणजे 22 प्रतिज्ञा होय...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्धधम्माची दीक्षा देताना 22 प्रतिज्ञा दिल्या. आपल्या आयुष्याला एक नवीन मार्ग दिला. त्या समजून घ्यावा लागेल. आपल्या समोरच्या पिढीला त्यासाठी संस्कारित करावे लागेल. त्यांच्या बालमनावर त्या रुजवावे लागेल. कारण सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक जातिभेद अनिष्ट रूढी मनुवादी प्रवृत्ती संस्कृतीच्या नावावर लादली गेलेली गुलामगिरी यापासून मुक्तीचा मार्ग म्हणजे बौद्ध संस्कृती होय. कारण बौद्ध शिकवण ही क्रांतिकारी बदल घडवून आणते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिल्या या बौद्ध धर्माचे पालन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी 22 प्रतिज्ञांचे जोड दिली.
बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा म्हणजे, बहुजन हिताय बहुजन सुखाय; लोकनुकंपाय, हिताय सुखाय, देवमनुस्सानम, आदिकल्याणम ,अंतिकल्याणम," होय.
✍️सविता तुकाराम लोटे
----------------------------------