❤❤प्रेम हे❤❤
प्रेम माझे त्याचे प्रेमळ
प्रेम माझे त्याचे नात्यापलीकडील
प्रेम माझे त्याचे शब्दअलिकडील
प्रेम माझे त्याचे श्वासातील
प्रेम व्यक्त करताना खरंच शब्द कमी पडतात पण असे का होत असेल,प्रेमाची व्याख्या करता येत नाही. हे जरी नक्की असले तरी प्रेमाला कुठल्याही शब्दात हि बांधता येत नाही. कारण प्रेमाला कोणीही कोणत्याही प्रकारच्या बंधनातील मर्यादित भूमिकेत ठेवू शकत नाही.
प्रेम हे प्रेम असते. मग ते कुणाच्याही प्रेमभावनेतील असो..!! मनातील प्रेम व्यक्त करताना प्रेम शब्दांपेक्षाही सोबत त्याची तिची सोबत इतकेच महत्त्वाचे आहे.
प्रेम प्रियकर-प्रेयसीतील मनातील असेल तर ते कसे रुजत असेल... फुलत असेल.... बहरत असेल आणि मनात अंकुराचे रोपटा कसे निर्माण होत असेल. त्या भावना,त्या संवेदना आणि ते शब्द कसे मनात येत असेल खरच प्रेम ही भावना खूप सुंदर आहे. सुंदर असावी!!
म्हणूनच तर नाटक, कथा, कादंबरी ,टीव्ही मालिका मध्ये प्रेम फुलताना आणि व्यक्त करताना शब्दापेक्षा जास्त भावनेला महत्त्व देतात.
दोन व्यक्ती प्रेम करताना नेहमी त्यांचे प्रेम भांडणातून फुलताना दाखविले जाते. सतत शब्दाला शब्द दाखविले जातात. असे प्रसंग निर्माण केले जातात, की नायक -नायिका फक्त संघर्षमय वादासाठी त्यामध्ये असतात.
क्षणाक्षणाला शब्दांची रांगोळी तिखट करीत ,कधी गोड... नात्यांची सुरुवात त्यांच्या मनात होते हे कळत सुद्धा नाही. त्या दोन्ही व्यक्तींना आणि जसजसे दिवस जातात तस तसे प्रेमळ नात्यांची नवीन रंगबिरंगी रांगोळी तयार केली जाते. त्यांच्याही नकळत गुंतलेल्या मनाला त्यांच्यासोबत खूप सुंदर क्षण पुरविले जाते.
खरच खरे आयुष्य सिद्ध असे होत असेल का माहित नाही. पण खऱ्या आयुष्यात प्रेम हे प्रेमाने फुलताना पाहिले. त्या प्रेमाला फुलविताना इतरांना नकारात्मक भूमिकेत नेत्यांनाच पहिले माझे प्रेम प्रेम इतरांचे प्रेम म्हणजे........ माहित नाही. शब्दाला नको इथे लिहिणे अशा पद्धतीने ते इतरांचे प्रेम व्यक्त करतात पण प्रेम हे प्रेम आहे मग ते आपले असो वा इतरांचे.
कारण प्रेम फुलविण्यासाठी खुप शब्दांना फुलविले असते. प्रेम दोन व्यक्ती मधील त्या भावनेवर आधारित असते ते एका क्षणाला एका वेळेला आणि एकाच भावनेतून पाहिले आणि त्यांना त्याच भावनेतून मनापर्यंत पोहोचविले जाते. नंतर प्रवास चालू होतो त्या प्रेमळ नात्यांचा त्याला प्रेम ही संकल्पना असते.
प्रेमात व युद्धात सर्व सारखे म्हणणारे आता फक्त युद्ध तेवढे दिसत असतात. ना प्रेम मनाला आपल्या भावना फक्त एकाच व्यक्तीला माहित असावे आणि इतर सर्व नकारात्मक भूमिकेत असतात.आपल्या शब्दांना शब्द एकसारखे मिळाले की ते सर्व आपले असतात. जर एखादे शब्द नकारात्मक भूमिकेत असेल तर ती व्यक्ती आपल्या विरुद्ध बाजूने आहे असे समज शब्दांची रांगोळी त्या व्यक्तीसाठी सर्वदूर पसरविले जाते. त्या प्रेमळ व्यक्ती कडून...!!!
असो,माझा कधीही प्रेम या संकल्पनेशी आलेला नाही. पण आज सहज नाटकातील प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतीमुळे हे सर्व मनात येऊन गेले. पण खरच प्रेम फुलविताना किती कष्ट करावे लागतात. हे मात्र कळले खऱ्या आयुष्यात सुद्धा असेच असते.
प्रेम व्यक्त करताना शब्द खूप येतात मिठीत माझ्या तू असावी आणि एका क्षणी ते क्षण आयुष्यात येत असेल. त्यावेळी खरंच,मर्यादित संस्कारावर पाणी ओतले जात असतील आणि प्रेमासमोर खरंच कधीही दिसत नसतील. त्या क्षणाला संस्काराची सुरेख सुंदर आणि आपलेपणाची रांगोळी.
ओठांची भाषा आता स्पर्शात् व्यक्त केली जात असते नजरेची भाषा आता नजर चोरली जात नाही. त्या भाषेला परत इतर कुठल्यातरी भाषेचा संदर्भ दिला जात. हातातील हात आता नको.... शब्दांची बांधाबांध नको आणि आता त्या जागी इतर कुठल्यातरी अनोळखी पण ओळखीच्या शरीर स्पर्शाने घेतलेली असते.
असो, नवीन भावना प्रेम फुलविल्यानंतर व्यक्त होत असते. खरंच शब्दाला कुठेही स्थान नसते. शब्द उणे होतात आणि जिंकतात दोन व्यक्ती... दोन मन ...दोन भावांना ...दोनच भावविश्वातील भावना..... प्रेमळ नात्यातील प्रेमळ क्षण अनुभवताना..!!!
खरच प्रेम खूप काही अनुभव देऊन जातात. आणि हे प्रेम शब्दांच्या बांधाबांधीपर्यंत न येता तुटले जातात. त्यावेळी त्या विरहाची कल्पना ही कदाचित करता येत नाही म्हणून अमर प्रेमाची उदाहरणे आपल्यासमोर येत असतात.
नाटकातील प्रेम प्रेम व्यक्त करण्याची नवीन पद्धत असावी. प्रेमाला मर्यादा नाही. प्रेमाला शब्द नाही आणि भूमिका ही नाही. प्रेम, प्रेम आहे! तुमच आमचं सेम आहे.
फक्त इतकंच म्हणावे लागेल, कारण प्रेम ही भावना व्यक्त करण्यासाठी कोणत्याही शब्दांना परिपूर्णता लाभलेली नाही किंवा कोणत्याही अनामिक ओढीला पूर्णत्वाला नेण्यासाठी लागणारी परिपूर्ण शक्ती लाभलेली नाही. प्रेम लिहिताना कोणीही मला प्रेम संपूर्णपणे मिळाले आणि ते मिळाले असे छातीठोकपणे सांगत नाही.
कारण प्रेम क्षणाक्षणाने फुलते.... क्षणाक्षणाने व्यक्त होते..... क्षणाक्षणाने अव्यक्त होते.... म्हणून कथा कादंबरी नाटक सिरीयल या माध्यमात वेगवेगळे प्रेम चित्रीत केले जाते ,मांडले जाते.
प्रेम माझे तुझे शब्दांच्या सोबतीने
प्रेम माझे तुझे शब्दांच्या साक्षीने
प्रेम माझे तुझे ओठांच्या शब्दांनी
प्रेम माझे तुझे स्पर्शाच्या भावनेने..!!💓
✍️©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- ❤❤प्रेम हे❤❤
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नेका.
----------------------------------
❤❤❤ Love ❤❤❤
Love me his love
My love is beyond his relationship
Love is my last word
Love in my breath
Words really fall short when expressing love but why this is happening, love cannot be defined. Even if this is true, love cannot be bound in any word. Because no one can put love in a limited role in any kind of bondage.
Love is love. So be it in anyone's love .. !! When expressing love in the heart, love is just as important as words.
If love is in the heart of the lover, how can it be rooted ... blossoming ... blossoming and how can a seedling be formed in the mind. Those feelings, those sensations and how those words come to mind, really this feeling of love is very beautiful. Must be beautiful !!
That is why in dramas, stories, novels, TV series, love is more important than words.
When two people are in love, their love is always shown to blossom from quarrel. Words are constantly shown. Occasions are created in which the hero-heroine is in it only for the sake of conflict.
Making rangoli of words moment by moment, sometimes sweet ... I don't even know that the beginning of the relationship was in their mind. A new colorful rangoli is made for both the person and the loving relationship as the days go by. The mind that is unknowingly involved with them is provided with very beautiful moments with them.
It is unknown at this time what he will do after leaving the post. But in real life, love blossoms with love. While cultivating that love, the leaders first saw others in a negative role. My love is the love of others. I don't know. They express the love of others in such a way that they do not want to write the word here, but love is love, whether it is ours or others'.
Because a lot of words are used to make love blossom. Love is based on that feeling between two people, it is seen from one moment to the same time and from the same feeling and it is conveyed to the mind through the same feeling. Then there is the concept of love.
Those who say the same thing in love and war now only see war. Only one person should know your feelings for love and all others are in a negative role. If a word has a negative connotation, then the perception that the person is on the opposite side of the word spreads rangoli for that person.
Anyway, my love never came with this concept. But today it all came to mind because of the easy way of expressing love in a play. But it really takes a lot of hard work to make love blossom. But it is also known in real life.
Words come a lot when expressing love. You should be in my arms and at some point that moment will come in life. At that time, water would be poured on the limited samskaras and they would never really appear in front of love. At that moment, the beautiful and intimate rangoli of Samskara.
The language of the lips is now expressed in touch, the language of the eyes is no longer stolen. That language is being referred back to some other language. No more hand in hand .... no more words and now in that place some other unfamiliar but familiar body is taken by touch.
Anyway, new feelings are expressed after love blossoms. Indeed the word has no place anywhere. Words are missing and two people win ... two minds ... two brothers ... only two feelings in the universe ..... while experiencing a loving moment in a loving relationship .. !!!
Really love goes through a lot of experiences. And these loves are broken without coming to terms. At that time, it is impossible to imagine that separation, so examples of immortal love come before us.
There should be a new way of expressing love in a play. Love has no limits. Love has no words and no role. Love is love! You are our bean.
Suffice it to say, because love has not acquired the perfection of any word to express this feeling, or the absolute power required to bring any anonymous passion to perfection. While writing love, no one dares to say that I got love completely and got it.
Because love blossoms moment by moment .... is expressed moment by moment ..... is unexpressed moment by moment ....
My love with your words
Love me by witnessing your words
Love me with the words of your lips
My love for your touch .. !!
✍️©️®️Savita Tukaram Lote
✍️©️®️Savita Tukaramji Lote
Title: - Love
Awareness of your arrival is your reaction. Be sure to leave your feedback in the comment box and don't forget to like and share.
----------------------------------