(A poem of four lines is called Charoli)
मनातील भावन संवेदना मनातील विचार संवेदना मनातील विचार आजूबाजूची परिस्थिती त्यातून मनात आलेले विचार मनातील चलबिचल मनातील प्रश्न अशा कितीतरी गोष्टी कमीत कमी शब्दात मांडण्याचे कविता प्रकार म्हणजे चारोळी होय.
कमी शब्दात पण प्रभावी शब्दरूपी संवेदना मनात घर करून भाव प्रकट करणारी एक प्रभावी माध्यम म्हणजे ( Charoli collection ) चारोळी संग्रह...!!!
चारोळी संग्रह विचारांचे आशा गर्भ अभिव्यक्ती निर्माण करणारा काव्यप्रकार. एक प्रभावी माध्यम शब्दांच्या बंधनात नसणारी एक सुरेखा आकृती चारोळी परिपूर्ण पणे चार ओळींच्या त्या शब्दसमूहाला एका भावनेची जोड देते आणि आपल्या भाव विश्वास घट्टपणे एक नाते पूर्णत्वास नेते.
नेमक्या शब्दात विषयाला मांडणे... लिखाण करण्याचा हा थोडासा प्रयत्न माझ्याकडून होत आहे. याआधी आलेल्या चारोळी संग्रहाला काव्यसंग्रहाला तुम्ही भरभरून प्रेम दिले. असेच प्रेम याही चारोळी संग्रहाला द्यावे.
सूचना असल्यास कळवावे. मन प्रसन्न होईल. तुमच्या भावना माझ्या भावनेसोबत जुळतात का हा बघण्याचा हा एक प्रयत्न. कारण आयुष्य हे विविध भावविश्वातून निर्माण होते. येणाऱ्या प्रत्येक क्षणाला चेहऱ्यावरचा चेहरा आपला समोर येत असते.
आपल्यासमोर प्रत्येक भाव विश्वातून संवाद साधला जातो कधी तो अबोल असतो तर कधी स्वार्थी याच सर्वाचा मेळ या चारोळी संग्रहात चार ओळीच्या शब्दसमूहात करण्याचा प्रयत्न आहे.
(In front of us, every emotion is communicated from the universe, sometimes it is abject and sometimes it is selfish. In this Charoli collection, an attempt is made to combine all these in four line phrases.)
सोशल मीडियाद्वारे वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे काम जागतिक माहितीचे केंद्र म्हणजे गुगल. या माध्यमातून वाचक मित्रमैत्रिणी पर्यंत हे माध्यम करीत आहे. आपल्यातील दुवा हा गुगल माहितीचे महाकेंद्र होय. सोशल मीडिया किंवा ब्लॉग यासारख्या यामुळे आज आपण त्या व्यक्तींपर्यंत पोहोचतं जिथे आपले छापील पुस्तकही पोहोचू शकत नाही म्हणून ऑनलाईन पद्धतीने चारोळी संग्रह काव्यसंग्रह किंवा काव्यरचना प्रकाशित करणे हे ठरवूनच या ब्लॉगची निर्मिती केलेली आहे.
तुम्हाला आवडल्यास तुम्ही माझा हा काव्यरचना शेअर करू शकतात. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा सर्वात स्वस्त आणि मस्त माध्यम आहे. ब्लॉगच्या या शब्दांच्या महोत्सव सोहळ्यात तुम्ही ही सहभागी व्हा. शब्दांची पेरणी माझी आहे आणि या उगवत्या पेरणीला धान्य स्वरूपात इतरांपर्यंत पोहोचण्याचे काम माझ्या त्या सर्व रसिक प्रेक्षकांना आहे.
(If you like you can share this poem of mine. It is the cheapest and coolest medium to reach maximum number of people. Be a part of this blog's festival of words. The sowing of words is mine, and it is the work of all my interested audiences to carry this sprouting seed to others in the form of grain.)
छोटसं काम मात्र तुम्ही नक्की करा कारण तुम्ही आधारस्तंभ आहात ज्या दिशेने मी जात आहे त्या दिशेला सर्वोत्तम ठरविण्याचे. चारोळी काव्यसंग्रह काव्यरचना, काव्य प्रकार दोन ओळी सप्तपदी काव्यप्रकार हा खरच भावनेला कमी शब्दात कमी वेळेत आनंदाला विसावा देतात. मन प्रफुल्लित करून जाते तुम्ही सुद्धा यामध्ये सहभागी व्हा...!!
❤❤धन्यवाद❤❤
❤❤❤❤❤❤❤मनोगत
"ओल आसवांची कधीतरी हसरी, हा चारोळी संग्रह मी संग्रहित करून हर्ष उल्हासित मनाने माय माऊली वाचकांच्या हाती देत आहे. माझ्या अंतर्मनातून उमटलेल्या शब्दप्रतिभेतून साकार झालेली भावनांच्या शब्दातून वेचण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न आहे.
बाल्यावस्थेपासून संवाद स्वरूपात आपण कितीतरी व्यक्तींना भेटतो. प्रत्येकाशी आपले एक नवीन वेगळे नाते निर्माण होते. अनेक लोकांना भेटताना आपल्याला माहीत असते. त्या व्यक्तीबद्दल असलेले आपले नाते, नात्यांची ओळख व्हायला लागली की नाते वेगवेगळ्या नात्यांमध्ये परिवर्तित होते.
काही नाते अर्थपूर्ण असतात. काही नाते आपलेपणाचे असतात. काही नाते मनाला आनंद निखळ निषीम प्रेम असते. एक दिवस अशी व्यक्ती येते जी आपल्या आयुष्यात नंतर तेच आपले सर्वस्व होते आणि त्याच व्यक्तीला नंतर सर्वस्व म्हणून जीवन बदलून जाते. नवनवीन गोष्टींची सुरुवात होते. प्रत्यक्ष आनंदित जातो. परिपूर्णतेकडे जाते. रोजच्या घडणारा दिनक्रम त्याच्याही वाटेला येते. आतून मन हलवून जाते. मनात ओळी उमटतात, त्या हलक्याच कागदावर उठतात.
मन प्रसन्न होते. डोळ्यात नवीन स्वप्नांची चाहूल असते. आयुष्याला एक रंगीबेरंगी झालर ती भावना देते. कलाकार त्या भावनेला कधी रंगांच्या साह्याने कागदावर उमटते तर कधी शब्दांच्या माध्यमातून ती शब्दांसोबत कागदावर उमटते तर कोणी ते सुरांच्या स्वरूपात सप्तसुरांसोबत भावनेला एक नवीन सुरामध्ये गुंफतो तर कधी याच भावनेला मैफिलीत भाव घेऊन येतो अशी ही भावना ते म्हणजे प्रेम...💕
कधी कधी हेच प्रेम मनाला सर्वोच्च आनंद मिळून देतो. कधी कधी हेच प्रेम नयनांना आसवांची ओल देऊन कधीतरी हसूच्या सोबतीने तेही क्षण सुखांच्या आसवांना सोबत घालविले होते, " हे ते प्रेम 💕💕"
माणसाच्या मनाला हुरहुर लावून जाते नवीन स्वप्नाची नवीन आयुष्याची चाहूल लावून जाते. प्रेम मनाला कदाचित आयुष्यालाही कदाचित ह...... जगण्यासाठी एक नवीन पक्की पायवाट देते पण हे सर्व सर्वांच्याच वाटेला येते असे नाही.
त्यातून निर्माण होते निराशेचा सूर. या निराशेच्या महोत्सवाचा सोहळा ही कधी कधी काही लोक हा असा शब्दांच्या स्वरूपात मांडून जातात. कविता वाट पाहत राहते त्या प्रत्येक भावनेसोबत चालण्याचे त्याबरोबर तिला चालता येते.
म्हणून मी नेहमीच म्हणते, कविता ही वाचण्याची गोष्ट नाही,कविता ही समजून घेण्याची गोष्ट नाही, कविता ही मनावर उमटवलेली ती गोष्ट आहे ती गोष्ट प्रत्येकांच्याच मनावर उमटलेली असते. कधी ती जास्त असते. कधी ती कमी असते. इतका तो काय फरक. "ओल आसवांची", प्रेम चारोळी संग्रह या चारोळी संग्रह आपल्याला विविध भावनांचे दर्शन होईल. त्या भावना नवनवीन गोष्टींची सुरुवात असेल पण अंत नाही. काही चारोळ्या निराशावादी देखील वाटेल . काही खूप प्रेमाने भरलेल्या वाटेल. काही जगण्याचा मार्ग सांगतील तर काय मन तुटलेल्या काचेसारखे झाल्यासारखे वाटेल पण याही भावना जेव्हा कविता आपल्याला सापडते तेव्हाच आपल्यातील कविताही सापडते. हे सापडणे त्या भावविश्वातून गेल्यावरच होते, असे नाही...!💔
कधी कधी कमेंट बॉक्समध्ये विचारतात , तुम्हाला कविता सुचतात कशा ?तुम्ही त्या भाव विश्वातून त्या संवाद यात्रेतून जाता का ?तर तसे नाही! कविता कधी सुचत नाही ती येते ती येणे म्हणजे आपली प्रतिभा होय.
ही प्रतिभा प्रत्येकांजवळच असते फक्त त्याला पॉलिश करावे लागते. कोळशाच्या खाणी मध्ये हिरा मिळतो तसेच भावविश्वातील भावनेमध्ये शब्द दडलेले असतात ते एका योग्य पद्धतीने कागदावर उमटले की त्याची कविता होते. चारोळी होते. जगण्याचा मार्ग होतो. आनंदाचे लय लूट होते.
भावना आणि आठवणी ह्या एकत्र आल्या की आयुष्य मस्त चालू राहते. आयुष्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे जोपासलेली कला आणि ती कोणतीही असू शकते. या जोपासलेला कलेतून खूप काही सापडते. त्याचा शोध घेण्यासाठी सर्वात आधी आपल्यातील त्या कलेला शोधावे लागेल तो शोध आज उद्या पूर्ण होईल असे नाही.
त्या शोधासाठी आयुष्याचे ते अनमोल क्षण द्यावे लागतात; ते कदाचित देण्यासाठी काही व्यक्ती तयार नसतात आणि मी ते क्षण या प्रतिभेसाठी दिले आहे. म्हणून कविता सुचत नाही कविता येते ती सर्वोत्तम असते असे नाही पण ते येते.
हेच परिपूर्ण असते माझ्यासाठी...!!💕 माझ्या त्या प्रतिभेसाठी...!!💕" ओल आसवांचे", कधीतरी हसरे हा चारोळी आयुष्याला विसावाचे क्षण देणार आहे. विचारांचा बंद फुटतो. जवळच्या पानावर शब्द कोरले जातात. कधी हा आधारस्तंभ होतो तर कधी हा खोट्यांच्या दुनियेत खोटांचा बाजार मांडलेला आयुष्याचा विसावा चा क्षण असतो. ज्यावेळी हा क्षण येतो खऱ्या प्रेमाची अनुभूती आपल्याला येते. प्रेम नक्की काय असते हे शोधणारे शोध घेत राहतात. खरं प्रेमाचे अनुभूती अनुभवण्यासाठी स्वतःला इतके बदलतात की त्यांना कधीच खोट्यांच्या बाजारात खऱ्या प्रेमाची चाहूल लागत नाही.
शब्द आणि शब्द सुचलेला प्रत्येक शब्द हा प्रेमभंग आकडे नेणारा असतो आणि एक स्त्री ज्यावेळी एका पुरुषावर प्रेम करते त्यावेळी ते सर्वस्व आपले मानून करते किंवा एक पुरुष एका स्त्रीवर प्रेम करते त्यावेळी त्याच्या आयुष्याची त्या आठवणींना गोळा करण्याची पद्धत असते. तिथे आपोआपच आयुष्य फुलत जाते. हा प्रेम चारोळी संग्रह याच भावविश्वास आठवण आणि भावना यामध्ये गुंतलेला आहे.
(The Prem Charoli Collection is involved in this belief, memory and emotion.)
Let us spoil it with joy of words....
तो आनंदाने लुटून घेऊया शब्दांच्या माध्यमातून माझ्या प्रतिभेला मी या शब्दाच्या माध्यमातून खऱ्या प्रेमाची आणि खोट्या प्रेमाची किंमत काय असते. हे प्रत्येक व्यक्तीला कळावे हा उद्देश प्रेम हे कधीच खोटं नसते. समोरचा व्यक्ती खोटा असू शकतो.असत्य असू शकतो. समोरच्या व्यक्तीचे प्रेम खोटे असू शकते.
प्रेमाला विसावा मिळाला पूर्णविराम मिळाला त्यानंतर त्या व्यक्तीच्या भावना काय असतात त्या भावनेची अनुभूती काय असते त्या व्यक्तीला माहीत नसते पण विचारांचा बंध फुटतो आणि आपण एक अशा विश्वात स्वतःला घेऊन जातो की तिथून बाहेर येणे महाकठीण असते. कविता चारोळी संग्रहाला भरभरून प्रेम दा.... 💕चला कविता वाट पाहते तुमची तुमच्या शब्दांचे तुमच्या भावनेशी जुळून घेण्याची.
खऱ्या प्रेमाची खऱ्या शब्दांचे खऱ्या भावनेसी.
प्रेम हे खूप सुंदर भावना आहे पण ती भावना खरी असावी. विचारांच्या पानावर प्रेम जसे कळले जसे दिसले जसे सुचले जसे पचले शब्दांच्या महोत्सव सोहळ्यात मांडण्याचा प्रयत्न.
चला तर, एका सुंदर प्रवासाला सुरुवात करूया...! प्रेमाचा पान मात्र अमर असते. ते कुठेही कधीही जात नाही. ते आपल्या जवळ असते. आपल्या सुंदर प्रवासाला सुंदर बनविण्यासाठी चला तर या प्रवासाला."ओल आसवांची".....कधीतरी हसरी... 💕 या प्रेम चारोळी संग्रह सोबत.
एक गोष्ट राहून - राहून माझ्या मनात हे सर्व लिहिताना येत आहे की, खरंच कागदांवर उमटलेल्या भावना डोळ्यात अश्रू का आणून जातात आणि त्या सर्व वेळ दुःखदच असतात असे नाही पण त्या खूप सुखाच्या क्षणाला हे आसवांची ओल गालांवर आपले अस्तित्व देऊन जातात. खूप काही सापडते कदाचित त्यामध्ये शोधावा लागत नाही.
अर्थ त्याला म्हणून या प्रेम चारोळी संग्रह "ओला आसवांची,"कधीतरी हसरी"हे नाव दिलेले आहे. खऱ्या प्रेमाची खरी अनुभूती आणि खोट्या प्रेमाची खोटी अनुभूती आणि त्याच भाव विश्वातून पूर्णत्वास आलेला हा चारोळी संग्रह. तुम्ही दिलेल्या आधीच्या माझ्या सर्व काव्यरचनेला भरभरून प्रतिसाद त्यासाठी धन्यवाद💕💕💕
शोध माझा माझ्याशीच आहे. कधी तो पूर्णविराम सारखा तर कधी विसावा सारखा तर कधी जगण्याच्या पायवाटेला काट्यांचे पायवाट करणारा.
चला इथेच थांबू आणि सुरुवात करू एका सुंदर प्रवासाला आपल्यातील प्रेम संवादाशी...!!💕
******************************************************************************