savitalote2021@bolgger.com

शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

प्रकाश सत्यसारखे.....!!!!

माझे मन विचार बेधुन्द बेभान 
वाऱ्यासारखे वावरणारे आणि माझे 
मन खिडकीसारखे खुल्या 
प्रकाश सत्यसारखे.....!!!!!

           ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-*** प्रकाश सत्यसारखे.....!!!!  **

       अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!

/ परतीचा प्रवास /

/// परतीचा प्रवास ///

जीवघेणी होता परतीचा 
प्रवास माझा एकटीचाच 
निघता निघता शक्तीच 
पायातील पुन्हा 
पायवाटेकडे जातात... तुझ्याच 
नकोसा वाटतो 
ती परतीच्या प्रवासाची आठवण 
जगण्याच्या प्रवासामध्ये 
उदासवाणी करून जाते 
जागेपणी... गाढ झोपेतही 
परतीचा प्रवास 
आठवणी...!!
              ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- /// परतीचा प्रवास ///


           आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका ..!!

शुक्रवार, ६ ऑगस्ट, २०२१

आयुष्य जगताना

// आयुष्य जगताना //

आयुष्य जगताना 
फक्त आयुष्यच असावे 
आपल्या वाटेला त्यात 
कुणाचे रुसवे नको 
फुगणे नको 

आयुष्य जगताना 
फक्त असाव्यात आठवणी 
सुखद हसऱ्या फुलासारखे 
टवटवीत...

आयुष्य जगताना 
फक्त तळपायाखाली वेदनेचे 
काटे नसावे त्यात काही 
सुगंधाही असावा 
मोगऱ्याच्या फुलांचा !!

आयुष्य जगताना 
फक्त संघर्ष नको  
यावे मावळतीच्या सूर्याबरोबर 
उदयाच्या सूर्याची 
पहाट.....!! 
आयुष्य जगताना


       ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-**आयुष्य जगताना**

            अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!

गुरुवार, ५ ऑगस्ट, २०२१

खुपते मला

खुपते मला
माझ्या तुझ्यातील दुरावा 
खुपते मला 
तुझ्या नयनातील अश्रू
खुपते मला
माझ्या डोळ्यातील स्वप्न
तुझ्यासाठी असलेले
खुपते मला
माझ्या पायातील पैंजण
तू दिलेले
खुपते मला तुझ्याशिवाय 
आलेला दुरावा
खुपते मला ...!!


           ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-///  खुपते मला //

     अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा .आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you...!!!

************************************

पळसाला पाने तीनच



पळसाला पाने तीनच 

        जीवनातील सत्य समोर आली की कळते निसर्गाने सर्व गोष्टी कशा का निर्माण केले असेल. ऋतुचक्रनुसार फुले फुलतात, फळे येतात, पानगळ होते, परत पालवी येते.... श्रावण फुलते , चोहीकडे. हिरवेगार आणि हिरवेगार ....ऊन पाऊस थंडी निसर्ग नियम कसे तयार केले असेल; हे न समजणारे कोडे आहे.

          म्हणतात नियम हा न बदलण्यासाठी असते. कधीकधी तो बदलावा लागतो. निसर्ग आपला नियम बदलतो आणि मानवी स्वभाव मात्र न बदलणारा!! ' व्यक्ती तितक्या प्रवृत्ती',या म्हणण्यानुसार समाधिस्त होत राहते. वाट पाहत राहावे लागते... वेडी आशा मनाला असते.

        बदलेल... बदलेल कधीतरी बदलले पण तो ना बदलणार असतो. म्हणतात," पळसाला पाने तीनच", म्हणी नुसार..!!!

        मानवी प्रवृत्ती वेगवेगळे असते. भावना कल्पना विचार मनस्थिती भिन्न असतात. अभिव्यक्ती वेगळी असते... मानवी स्वभाव कधी न बदलणार असतो .सुखदुःखाच्या स्मृतीच्या गाभा प्रत्येक वेळी त्यांच्या सोबत असते. नव्या पालवे अंकुरतात तसे विचार मेंदूतून अंकुरित असतात. श्रावणात माळरानावर जसे फुले फूलता आणि वाऱ्यासोबत ते डोलत रहतात ते बहरलेले रान नवनवीन कल्पना निर्माण करीत असतात अगणित!!

          क्षण सृष्टीचे आपल्या समाजात आपल्या आयुष्यात ते देऊन जाते. घेणेदेणे या दोनही गोष्टी एकाच वेळी चालू असतं. प्रत्येक वेळी त्यांच्यासोबत असते... नव्याने शोध घेता घेता डोळे पापणीआड करून सत्य लपविले जाते. अचानक आलेल्या परिस्थितीकडे हळव्या क्षणाला स्वतःचे सामर्थ्य निर्माण करू पाहतात. अशी माणसे म्हणतातना ,"पळसाला पाने तीनच", !!

        मानसिकता कधीच बदलत नाही. सुखदुःखांच्या इतरांच्या मनाचा पालापाचोळा करीत असतो.  एरवी आपण चालून घेतो ....ही मानसिकता!  पण कधीकधी या अंधारलेल्या मानसिकतेमुळे कितीतरी लोकांचे स्वप्न विचार कल्पना नष्ट होतात. मनाचा कोंडवाडा होते... बोलता येत नाही आणि सांगताही येत नाही. शरीराला हळूहळू स्पर्शातून निघून जातात त्यांच्या बद्दलच्या हळूवार असलेल्या भावना विश्वास. पात्र नसलेली व्यक्ती होऊन जाते त्यावेळी आणि सामोरे ते एक सत्य ,'पळसाला पाने तीनच' असतात.

   मनाला यातना होत असताना माणूस स्वार्थी का होतो कळत नाही. सतत सतत तेच उगाळले जाते. मौन असले तरी गोजिरवाणे केले जाते. आवरताही  येत नाही सावरताही येत नाही. निवांत शांतता. उन्हाचा चटका मनाला नाही तर मेंदूला लागत असतो. सोसवते तेवढे सोसत राहायचे आणि पवित्र म्हणायचे हे ठरवले तरी कुठपर्यंत???

       प्रश्नांची उत्तरे मात्र मिळतच नाही. पळसाच्या पानासारखे. कडूलिंबू स्वभावाने कडू....त्याला गोड आंबट कोणत्याही प्रकारात शरीरात घेतले तरी कडूच. स्वभाव गुण बदलत नाही तसेच काही व्यक्तींचे!!!
                     स्वभावाला औषध नसते!!

          आयुष्य ही जवळपास तसेच आहे आयुष्यात ज्या झाडांवर कितीही फुले फळे पाने आली तरी पानगळ सहन करावेच लागते. आयुष्य आनंदी असावे असे सतत वाटत राहते. पण आयुष्यात अनुभव येत राहतात. अनुभव देत  राहतात... आनंद लुटत राहतात. सुखदुःखाच्या पळसाच्या पानातील सत्यसारखे.


सतत वाटत राहते 
इच्छा-आकांक्षा नको 
पण त्याच आडवे येतात 
क्षणभंगुर सत्यसोबत 
अनगणित... 
लाल पिवळ्या फुलांनी फुललेल्या 
फुलांसोबत आणि नष्ट होतात 
मानवी प्रवृत्ती 
पळसाला पाने तीनच 
स्वभावासारखे 
लाखमोलाची शिकवण 
मानवी प्रवृत्तीची...


           कधी आनंद कधी दुःख कधी निराशेच्या वाटेवर चालताना एकटेपणाची भीती वाटली नाही... संघर्ष होता. प्रत्येकांच्या जीवनात असते. माहीत नसते तो कोणत्या वाटेवर आपल्याला घेऊन जात असतो. मनासारखे काही होत असते काही होत नाही... शब्दांना आपण आपले करतो पण इतरांच्या शब्दांचे काय?  सगळे कसे अचानक नवनवीन विरोधाभास असलेले शब्द कसे आले आयुष्यात.

          ऊन सावली झेलता झेलता अचानक महावादळ यावे चिखलासोबत तसे झाले. काही क्षणासाठी आयुष्य.... शब्दांचे नाते... शब्दांचे गाव... शब्दांचेच व्यक्तिमत्व... सुंदर अविचारी मानवी स्वभाव.... कदाचीत मानवी स्वभावाला पुसायला निघालेली पिढीजात जात !!! उत्तर सरळ असतात पण सरळपणा नसतो त्यांच्यामध्ये; पळस म्हणी जणू!! सहजच पण सहजतेल्या आपल्या स्वभावाने गुंतागुंत करीत राहतात.

         असंख्य शब्दांची माळा गुंफत शक्य नसलेल्या गोष्टी शक्य करत. त्या बदल्यात नाही, पळसाच्या पानासारख्या. सतत एकाच भूमिकेत कपाळावरील रेषाच्या भाग्यरेषा सोबत सुखद आणि इतरांसाठी दुखद. पळसाच्या पानासारखे! अलगद हातातून निसटून जातात इतरांची किमती लाखमोलाचे क्षण शब्द. ते कवडीमोल केले जातात.निर्णयाची अंमलबजावणी फक्त त्यांच्या वाटेवर कारण ते बदलू शकत नाही कुणासाठी.

           त्यांचे रक्त काळी झालेली असते जीभ. हृदयात पाणी आणि मेंदूत किडे सोयीनुसार. याच वणव्यात पेटविली जाते मनातील स्वप्न इतरांची.
 
    सैरभैर होते मन त्यावेळी हरवून जाते. विचारांची वाट आटले जातात. सर्व शब्द जागे असतात. फक्त हरवलेली वाट सुकलेली फुलपाकळी चिंब भिजलेले आसवे... वाळवंटाचे  जीवसृष्टी. कारण ते असतात पळसाचे पाने तीनच या स्वभाव धर्माची...!!!

       
         
           ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-***  पळसाला पाने तीनच ***

        अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!






************************************

बुधवार, ४ ऑगस्ट, २०२१

आठवते मला

.
//// आठवते मला ////

आठवते मला 
तुझे हसणे 
माझे हसणे 
कातरवेळी झालेली 
ती भेट 
आठवते मला 
निसर्गरम्य वातावरणामध्ये 
घालविलेले मनसोक्त 
क्षण 
आठवते मला 
ढगाळलेल्या मावळतीच्या 
सावलीसोबत 
विरह मतभेदाचे 
आठवते मला 
माझ्या तुझ्यातील रेशीमबंध 
आठवणींसोबत
            ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-***   आठवते मला ***

        अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!

////.....आठवते मला...////

                प्रेमाची व्याख्या करता येत नाही की तिला कोणत्याही शब्दात बांधूनी हि ठेवता येत नाही प्रेमात जगायला शिकत असतो जपायला शिकत असतो पण कधीकधी ते अंदाज चुकीचे ठरतात आणि सामोरे ते एक सत्य विरहाची या भावनेतून लिहिली गेलेली ही स्वरचित लिखित रचना आहे .आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

** आठवते मला...**

आठवते मला 
क्षणाक्षणाला 
वेळी-अवेळी आलेली 
तुझी आठवण 

आठवते मला 
अजूनही लपून छपून ते भेटणे 
तुझा हात माझ्या हातात 
तुझ्याही नकळत घेणे 

आठवते मला ...
तुझे ते हसणे  
माझ्या गालावरील लाली 
कोंडलेल्या मन भावनेशी 
संघर्ष करताना स्वतःला 
दूर करीत हसणे

आठवते मला ...
तुझ्या मिठीत न येता 
मिठीत असल्याचे भास 
गुलमोहरासारखे सदाफुलीसारखे 
टवटवीत असणे 
तुझे ते निखळ हसणे 

आठवते मला 
तुझ्या आठवणीत 
रातराणीसारखी सुगंधित फुलणे 
जसेच्या तसे तुझ्या शब्दांवर 
प्रेम करणे 
नयनात प्रेमअश्रू आणि तुझ्या सोबत 
असलेला क्षणांचे बांधलेले 
सुखाचे आलेख 

आठवते मला  
अजूनही नवीन काही लिहिण्यासाठी 
तू सांगत असायचा  
बेभान होऊन ऐकत असायचे 
ते शब्द... आत्मविश्वास होते  
निखळ प्रेमाचे
माझे -तुझे प्रेम सकाळच्या 
रम्य सुर्योदयासारखे  

आठवते मला...
पावलोपावली तुझ्या शब्दांच्या 
शब्दसाखळी सोबत मनसोक्त 
रमताना ..अंधार दाटून येतो 
ढगाळलेल्या वातावरणासारखा  
प्रत्येक स्तरावर आठवणींच्या 
उत्तर शोधत असते देणा-घेण्याचे
तुझ्या माझ्या प्रेमातील दुराव्याचे
आठवते मला...

             ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे 


©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- **** आठवते मला...****

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका ...!!!


*************************************

प्रयत्न

*** प्रयत्न ***

पुन्हा नवीन 
पहाट येण्यासाठी 
प्रयत्न सोडू नको 
उगाच डोळ्यात 
पाणी आले 
तरी 
वळून पाहू नको 
प्रयत्न सोडू नकोच 
जीवन प्रवासाचे..!!

       ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- **** प्रयत्न ****

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका!!! 

धमाल ऑलिंपिकची

*** धमाल ऑलिंपिकची ***

नजर रोखून पाहू 
आपल्या ध्येयांच्या 
कठोर अडचणींकडे... 
प्रवास आहे त्याच 
पावलांनावर!! 

सुवर्ण पदक जिंकण्याचे 
तिरंगा फडकविण्याचे 
स्वाभीमानाने खडतर प्रवासासाठी 
लढाई जिंकण्याची 
नजर रोखून !!!

         ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-***  धमाल ऑलिंपिकची **

             अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!!

*************************************

मंगळवार, ३ ऑगस्ट, २०२१

** आरसा मनाचा **

              मनाचा आरसा आपल्याला सकारात्मक शैलीमध्ये जगण्याचे सामर्थ्य देते. आरसा मानचा !!! कविता स्वलिखित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

*** आरसा मनाचा ***

आरसा मनाचा 
सांगतो मला 
आरसा मनाचा 
हे ही दिवस जातील 
प्रतिबिंब येईल 
सुखद सावलीचे  
हसऱ्या नयनाचे 

आरसा मनाचा 
सांगतो मला 
झाले गेले विसरून 
जाऊ अंतर्मन परत 
प्रफुल्लित करू 
सांगतो मला 

आरसा मनाचा
सकारात्मक शब्दांचा 
सकारात्मक भावनेचा 
स्पष्ट प्रतिबिंब 
माझ्याच मनाचा
आरसा मनाचा...!!!


             ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-*** आरसा मनाचा ***


       अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you!!!


*************************************

सोमवार, २ ऑगस्ट, २०२१

खरंच कुठे चुकतंय का...

*** खरंच कुठे चुकतंय का...***

स्वतःला विचारता विचारता 
प्रश्न पडतात 
खरंच कुठे चुकतंय का 
नम्रतेने प्रश्न करते 

मी स्वतः आत्मपरीक्षण 
करावे का? की सोडून 
द्यावे नशिबाच्या हवाली..!!
उत्तरांच्या अपेक्षेने; 

खटकते मला 
खरंच कुठे चुकतंय का 
फक्त आभास आहे 
चुकण्याचा 

आभास आहे 
प्रश्नांचा की... 
आभास आहे 
सत्याचा स्वतः स्वतःला 

विचारते 
खरंच कुठे चुकतंय का 
आपण आपल्याकडून जास्तच 
अपेक्षा करतो का?

बहुतेक हेच 
खरंच चुकतया..!!

                    ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- *** खरंच कुठे चुकतंय का...****

        आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका..!!!


---------------------------------- 

मी तुझ्यावर प्रेम करते

   ***  मी तुझ्यावर प्रेम करते ****

मी तुझ्यावर प्रेम करते 
कारण आठवणीच्या 
महापुरात स्वतःला सावरता 
सावरता माझ प्रेम...
माझ्या आयुष्याच्या प्रत्येक 
वेळी वरचढ होत 
जाते... 
म्हणून मी 
तुझ्यावर प्रेम करते 
आयुष्याच्या शेवटच्या 
क्षणापर्यंत... आणि त्यानंतरही !!

          ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-*** मी तुझ्यावर प्रेम करते ***

          अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!



*************************************

संस्काराचे


जुन्या संस्काराचे पायेमुळे 
खोल असतात 
ते दिसायला कुरूप होते 
स्वार्थी माणसांना... 
असे असले तरी 
संस्कार असतात 
ते ...
खानदानीपणाचे !!!

                ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-*** संस्काराचे ***

       अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you...!!

*************************************

रुपी

सांभाळणारे हदय 
रक्ताळलेले स्वप्न एकटेच 
असतात... न समजलेल्या 
भावना रुपी व्यक्तीला !!

                  
                    ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-*** रुपी***

        अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!


----------------------------------

रविवार, १ ऑगस्ट, २०२१

सुख शांती

आवरलेले मन कधीही चांगले 
कारण ते बेभान घेऊन जाते 
इतरांचेही आणि स्वतःचीही 
सुख शांती...!!




             ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-***  सुख शांती  ***

       अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!!

*************************************

शनिवार, ३१ जुलै, २०२१

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

***  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ***

साहित्यरत्न झाले 
दीड दिवसाच्या शिक्षणाने 
आयुष्यभर पेरले त्याच दीड 
दिवसाचे ज्ञान शब्दसंपत्तीने 

रूपवादी श्रृंगारवादी साहित्याच्या 
शब्दांना चालविले धारदार 
शब्दतलवार शोषितांच्या अन्यायाची 
गुलाम न आम्ही अन्यायाची 

परंपरेची संस्कृतीची द्या फेकून 
जातीयतेला, डोक्यामधील अंधश्रद्धेला 
वादळ केले त्यासाठी बंडखोरी 
तू उठ सांगून लढा दिला... 
एकजुटीसाठी !
शोषितांच्या न्यायासाठी 

नैराश्य  न मनी कसली 
उठून उभे नायक त्यांचे वास्तव 
जातीवादी संघर्षाचे निर्मिती 
नव वास्तव जगाचे 
महाकाव्य रचले मानवी संघर्षाचे 
अनमोल वाणीतून व्यथा मांडली 
जातवास्तवाची 

पण संघर्ष निळा रक्ताचा 
स्वाभिमानाचा अभिमानाचा 
माणूस म्हणून जगण्याचा 
दौलत परी आम्हा कवडीमोल 
तरी वारसा आम्ही भीमरायाचे 

जग बदल सांगून गेले भीमराव 
सांगत पावले टाकीत 
एक एक चालत राहिले 
तळ हातावरील रेषा पुसत 

आम्ही भिमाचे वाघ! बदलून 
टाकू विषमतेचे वटवृक्ष  
लिहित राहिले तुम्ही शब्द लढाऊ
संघर्षही केला कष्टकरी 
शोषित कामगार यांच्या न्यायासाठी 

जे जे दिसले 
जे जे अनुभवले 
ते ते शब्दबद्ध करीत राहिले 
मानवतेच्या कल्याणासाठी 
समानतेच्या लाटेसाठी 
माणूस म्हणून जगण्यासाठी..!!!

               
               ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-***लोकशाहीर अण्णाभाऊ साठे **

          अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!!

----------------------------------

आनंद

     **** आनंद ****

मायेचा स्पर्श व्हावा 
मनाच्या डोहात आनंदाचा 
उरल्या-सुरल्या सुखाच्या 
भावनेच्या लाटांवर 
सुगंधित व्हावे नवतारे 
आनंदाचे 

अतृप्त संदर्भ सागर आनंदाला 
मनाच्या डोहामध्ये बहरणाऱ्या 
कोमल भावनेला हसऱ्या 
फुलांसोबत सदैव बहरावे 
आनंदाचे फुल मायेच्या स्पर्शाने 

प्रसन्न हसऱ्या... 
सावलीसोबत ...!!
हर्ष अंतरंग 
सहवासातील आनंदी 

खडतर चैतन्याच्या प्रवासात 
अंतर्बाह्य स्पर्शुन जावा 
आनंद...!! 
अबोल सही पण जावा 
चक्क मायेच्या स्पर्शाने 

जीवन आनंदमय होवे 
रम्य ती सुवर्ण सकाळ 
जी भेटेल मला आनंदमय 
माझ्या परिकल्पनेची सुगंधीत 
मायेच्या स्पर्शाने 
अंतरंग...!!!!!
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-*** आनंद ***

       अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you!!!!!


===========================

** लोकशाहीर अण्णाभाऊ साठे **

      ////  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ////





          अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा आणि चालना देणारे ठरले आहे अण्णाभाऊ साठे मानवतावादी लेखक होते. मुक्ती हा त्यांचा ध्यास होता. दलित शोषित पीडितांच्या शोषण संपविण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला त्यांचे साहित्य परिवर्तनवादी होते.

        मराठी साहित्य रूपवादी रंजनपर आधारलेले होते.आर्थिक-सामाजिक बांधिलकी मानणारे समाजपरिवर्तनाचे शस्त्र हाती घेऊन लेखन करणारे साहित्य सर्वसामान्य माणसा विषयीचे आंतरिक तळमळ त्यांच्या सुख-दुःखाचे चित्रण करणारी ओढ, वाचकाच्या मनाला भुरळ घालत असे अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य होते.

            वाचनीयता हे त्यांच्या साहित्याचे महत्त्वपूर्ण अंग आहे. कामगार कष्टकऱ्यांच्या चळवळीचे लोकशाहीर होते. 1960 च्या दशकापर्यंत म्हणजेच दलित आंबेडकरी प्रगत साहित्याच्या उगमापर्यंत उपेक्षाच आली. दलित शोषित कष्टकरी जीवन वास्तव आपल्या लेखणीतून त्यांनी मांडले. प्रस्थापित समाज व्यवस्थेवर संस्कृतीवर त्यांनी त्यांचे लेखन गाण्यातून मांडले.

          साहित्य हे परिवर्तनाचे महत्वपूर्ण अंग आहे आणि या साहित्याचा उपयोग करून शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सर्वसामान्यांपर्यंत रुजविण्याचे महत्वपूर्ण काम त्यांनी केले. त्यांनी "लालबावटा", कला पथकाचे कार्यक्रम सादर केले. विशिष्ट पद्धतीने सादर केलेला पद्धतीमुळे लोक त्यांच्याकडे प्रेरित झाले.

         अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. हे गाव सांगली जिल्ह्यात आहे. त्यांच्या आईचे नाव "वालुबाई "वडिलांचे नाव "भाऊराव"  होते. एक अस्‍पृश्‍य मांग समाजात जन्म झालेला होता . त्यावेळी या जातीला गुन्हेगारांचे जात म्हणून ओळखले जात असे. गावात कुठेही चोरी झाली की सर्वप्रथम यांच्या वस्तीवर हल्लाबोल केला जात असे. 

         अण्णाभाऊ साठे यांचे प्राथमिक शिक्षण दीड दिवसाचे होते. कारण त्याकाळात सामाजिक व्यवस्था जातीभेदावर आधारित होती. ते शाळेत गेल्यानंतर तेथे सवर्णद्वारे होणाऱ्या भेद भावामुळे त्यांना शाळा सोडावी लागली. या कारणाने त्यांचे शिक्षण अक्षर ओळख सुद्धा नसणारी होती. त्याच अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मध्ये मोलाचे योगदान दिले. 

          अण्णाभाऊ साठे यांच्या डोळ्यात एक चमक होती. आवाजात उबदारपणा होता; थेट हृदयापर्यंत त्यांचा आवाज भिडत असे. अण्णाभाऊ साठे यांनी कामगार चळवळीमध्ये भाग घेऊन त्यांचे मुद्दे मांडले ते मांडण्यासाठी त्यांनी  लिहिणे, गाणे, नाटक करणे इत्यादी आधार घेतला. अण्णाभाऊ साठे जेव्हा बोलण्यासाठी उभे राहत तेव्हा अगदी मोठ्या गर्दीतही शांतता पसरत असे. त्यांची लोकप्रियता जनमाणसात खूप होती.  


            अण्णाभाऊ साठे मार्क्सवादी दृष्टिकोनातून श्रीमंत आणि गरीब यांच्यातला मोठा फरक त्यांनी पहायला. जातीवादाने अस्पृश्यतेच्या स्पष्टीकरण करताना त्यांनी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण येते.  सामाजिक न्यायासाठी सामाजिक क्रांती होणे आवश्यक आहे असे मानतात.

     मराठी साहित्य  विश्वाची शिखर अस्पृश्य आणि देशातील चातुर्य वर्णव्यवस्थेतील सर्वात गरीब समजल्या जाणाऱ्या जातींपैकी एका जातीमध्ये ( मातंग )त्यांचा जन्म झाला होता. कायमचा व्यवसाय नव्हता पोट भरण्यासाठी त्यांना सणाच्या वेळी ड्रम वाजवणे  नृत्य करणे गाणे गाऊन लोकांचे मनोरंजन करणे विणकाम करणे यातून आर्थिक उत्पन्न मिळत असे. कोणतेही कष्टाचे काम करून पैसे मिळवावे लागत असे. जातीने अस्पृश्य असल्यामुळे त्यांना गावात राहण्यास मनाई होती म्हणून गावाबाहेर राहत होते.

        शहरी समाजव्यवस्था आणि उच्चभ्रू लोकांमध्ये असणाऱ्या साहित्यात ग्रामीण भागातील दलित शोषित कष्टकरी महिला जातिभेद इत्यादी साहित्य लिहिले. समाजातील अशा प्रश्नांवर भाष्य केले त्यावर कुणीही काहीही लिहिले गेले नव्हते. 

          अण्णाभाऊ साठे यांनी ग्रामीण भागातील झोपडपट्टीतील  एखाद्या विशिष्ट भागातील दीनदलित शोषित आदिवासी व गुन्हेगार स्तरावरील जनतेच्या जीवनाचे चित्र त्यांनी त्यांच्या साहित्यात होऊ लागले. मराठी कादंबरीचा केंद्र नागरी समाज होता. त्यांच्या साहित्यामुळे ती जागा ग्रामीण भागातील निम्मेवर्गाकडे सरकू लागली . त्यांचे साहित्य हे सखोल अध्ययनातून आणि सखोल आकलन होत असे.

         
        अण्णाभाऊ साठे यांचे लेखन विनोदी नव्हते ते गंभीर लेखक होते त्यांनी जे अनुभवले ते शब्दबद्ध करीत. जीवनातील अतिशय क्रूर सत्य त्यांनी त्यांच्या साहित्यामध्ये मांडले ते सत्य त्यांच्या साहित्याचा आत्मा होता.   तेच साहित्याचे वैशिष्ट्ये सुद्धा आहे. म्हणून त्यावेळी साहित्य क्षेत्रात त्यांना एक वेगळी ओळख निर्माण झाली. त्यांच्या प्रतिभेला नवीन ओळख प्राप्त झाली. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य म्हणजे एक प्रकारे अन्यायाविरुद्ध बंड करणारा नायक आणि नायिका यांचे दर्शन... त्यांच्या साहित्यातून समाजापुढे मांडले जाते.

          अण्णाभाऊ साठे यांनी आपली प्रतिभा तमाशाद्वारे दाखविण्याची संधी मिळाली. तमाशामध्ये कोणतेही वाद्य ते वाजवीत असे. सतत नवनवीन शिकण्याच्या जिद्दीमुळे एका रात्री तमाशाचे नायक बनतात आणि तिथूनच त्यांच्या जीवनाला एक नवीन कलाटणी मिळते.काही दिवसानंतर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या  दोन तमाशातील मित्रांसोबत १९४४  मध्ये लाल बटवा कलापथक  सुरू केले. क्रांतिकारी कार्यक्रम सादर केले जाता. त्याच काळात देश स्वातंत्र्याची चळवळ मोठ्या जागृत झालेली होती.

          तमाशा हे जनतेसोबत संवाद साधण्याचे महत्वपूर्ण माध्यम होते. अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या कलामंचद्वारे  समाजातील शोषित कष्टकरी मजूर कामगार सामाजिक जाती भेद यातील प्रश्न इत्यादी समाज व्यवस्थेवरील वर्णन यांचे दुःख  जगासमोर आणले. लोकांना त्यांनी स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून दिले. त्यासाठी जनजागृती केली. कामगारांचे प्रश्न त्यांनी चर्चेचे केले. त्या कारणाने कामगारांमध्ये अधिकच लोकप्रिय झाले. त्यांना त्यांच्या हक्कासाठी लढण्यासाठी प्रेरित केले. 

        अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्रातील गावा गावात पोहोचले. त्यांच्या कलामंच याद्वारे सादर केलेली कला म्हणजे समाजातील दुर्लक्षित झालेल्या समाजाचे प्रतिनिधित्व होते म्हणून लोक त्यांना लोक शाहीर अण्णा भाऊ साठे आणि लोकशाहीर म्हणू लागले.  अशातच तमाशा वर बंदी घालण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांनी हार न मानता लोकगीतातून सामाजिक प्रश्न कामगारांचे प्रश्न मांडण्याचे काम अविरत चालू ठेवले


            कामगार कष्टकऱ्यांच्या चळवळीचे लोकशाहीर झाले त्यांचे साहित्य वाचकाच्या मनाला भुरळ घालणारे होते. 1960 च्या दशकापर्यंत म्हणजेच दलित आंबेडकरी प्रगत साहित्याच्या चळवळीच्या उगमापर्यंत उपेक्षाच आली दलित शोषित कष्टकरी जीवन वास्तव आपल्या लेखनातून मांडले आणि प्रस्थापित समाज व्यवस्थेवर संस्कृतीवर लेखन गाण्यातून आसूड ओढले. 


    जग बदल घालुनी घाव या मधून अण्णाभाऊ साठे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या बद्दल आपले मत व्यक्त केले. गुलामगिरीच्या चिखलात आम्हाला काढले आणि नवीन महाराष्ट्र निर्माण केला. बाबासाहेबांचे लढाऊ विचारच अस्पृश्य समाजाला अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतात. अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा ही कादंबरी आपल्या समुदायाला पूर्णपणे भूकमारी पासून वाचविण्यासाठी ग्रामीण रूढीवादी प्रणाली व ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध विद्रोह करणाऱ्या नायक फकीरा मधून चित्रीत केले.

       अण्णाभाऊ साठे यांनी माझी मैना गावावर राहिली यामधून तात्कालीन राजकारण समाजकारण कृषी जीवन संस्कृती अलंकार दंतकथा अर्थकारण अशा सार्‍यांचे प्रतिबिंब त्यामधून रेखाटले आहे. म्हणून आजही अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य सदाहरित आणि कलातीत बनलेले आहे. अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मध्ये मोलाचे योगदान दिले. त्यांची लेखणी जितके दलित श्रमिक कष्टकरी समाजासाठी चालली तितकीच ती महाराष्ट्रातील संयुक्त चळवळीच्या लढ्यासाठी सुद्धा चालली. त्या काळातील परिस्थिती त्यांनी 'माझी मैना गावाराहिली', यामधून रेखाटलेली आहे...


         वैजयंता या कादंबरीच्या प्रस्तावनेत अण्णाभाऊ साठे म्हणतात ,"जो कलावंत जनतेची कदर करतो त्याचीच कदर जनता करते हे मी प्रथम शिकून नंतर लेखन करीत असतो माझा माझ्या देशावर जनतेवर नि तिच्या संघर्षावर आढळ विश्वास आहे."

           
          जे मी स्वतः जगलो आहे पाहिले आहे. व अनुभवले आहे तेच मी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सामाजिक,राजकीय आर्थिक,धार्मिक, कौटुंबिक समस्यांना वाचा देण्याचे कामे माझ्या साहित्यातून करिता आहो तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील आंबेडकरी जलसाची जन प्रबोधनाची क्रांतिकारी परंपरा नव्या लोकनाटकातून पुढे नेली.

          अण्णाभाऊ साठे यांच्या अंगी जन्मजात प्रतिभा होते. त्यामुळे त्यांना एखाद्या भूमिकेचे ताबडतोब अचूक व सखोल आकलन होत असे. त्यांचे संवाद तर्कसंगत व ओघवते असत. अण्णाभाऊ साठे नि तमाशा कलेला लोकनाटकात रूपांतरित करून नवजीवन दिले. लोकप्रियता आदर मिळवून दिला... समृद्धी मिळवून देले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बेळगाव कारवार सीमावाद आणि गोवा मुक्ती आंदोलन या आंदोलनात हिरारीने भाग घेणाऱ्या समितीमध्ये त्यांनी त्यांचे महत्वपूर्ण योगदान दिले.

            अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबऱ्या त्यांचे गुणात्मक दृष्ट्या विचार करत साहसाचे
चित्रण करणारा कादंबऱ्या करणारा होता महिलांच्या समस्या पर्यंत कादंबऱ्याचा क्रम लागतो. 

        अण्णाभाऊ साठे यांनी मराठी भाषेत 35 कादंबऱ्या लिहिला. 1959 मध्ये फकीरा,  गुलाम, चंदन, चिखलातील कमळ, 1945 मध्ये चित्रा, रूपा, वारणेचा वाघ, वैजयंता, पाझर, मथुरा, 1963 मध्ये माकडीचा माळ, रत्ना, रानगंगा, वैर ,टिळा लावतो मी रक्ताचा (आवडी) इत्यादी कादंबऱ्या लिहिल्या. 
   
          अण्णाभाऊ साठे यांनी कथासंग्रह चिरानगरची भुतं, नवती, निखारा,तारा, जिवंत काडतूस, देशभक्त घोटाळे फरारी इत्यादी लिहिल्या गेल्या आहे. अण्णाभाऊ साठे यांनी कादंबरी आणि लघुकथा यांच्या व्यतिरिक्त नाटक, पटकथा ,मराठी पोवाडे, रशियातील भ्रमंती आणि गाणी लिहिलेली आहे.   1961 मध्ये राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळला.  लघुकथा संग्रह 15 आहे त्यांच्या कादंबऱ्यांचे अनेक भारतीय भाषांमध्ये भाषांतरित केल्या गेले आहे. 

          अण्णाभाऊ साठे रशियाच्या इंडो सोव्हिएत कल्चरल सोसायटीच्या निमंत्रणावरुन ते 1961 गेले तेथील अनुभवावर आधारित माझा रशियाचा प्रवास हे पुस्तक लिहिले.


      अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य जनसामान्यांच्या भाषेत होते. बोलीभाषेत होते. त्यामुळे त्यांचे लेखन जनसामान्यांच्या हृदयापर्यंत पोहोचले. वैशिष्ट्यपूर्ण मांडणी सुंदर व आकर्षक कलाकृती त्यांच्या साहित्याला लाभलेला अपार लोकप्रियतेचे गणित आहे. त्यांच्या या भाषाशैली मध्ये आहे कारण त्यांनी सर्वसामान्य  लोकांचे प्रश्न त्यांच्याच भाषेत लेखन केल्यामुळे ते अधिकच आपलेसे वाटले.

           अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य खऱ्या अर्थाने एक इतिहास आहे ती कोणतेही काल्पनिक गोष्ट नसून  त्या काळातील लोकांचे प्रश्न आहे. विकासातील अडथळे समस्या आहे. उपाशीपोटी जगण्याचे दुःख आणि त्यातही गुलाम समाजव्यवस्थेतील आपलपोटी जातीयवादी स्वार्थी माणुसकीला काळीमा फासणाऱ्या संस्कृती परंपरेच्या नावाखाली अन्याय अत्याचार करणाऱ्या माणसाविरुद्धची लढाई आहे. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्याचे सामर्थ त्यांच्यातील अन्यायाविरुद्ध आवाज समर्थपणे मांडण्याची एक कला आहे. एक व्यासपीठ आहे आणि या व्यासपीठाचे समर्थपणे योग्य पद्धतीने उपयोग करून सामाजिक प्रश्न मांडले.

           अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या एकूण कादंबऱ्या पैकी पूर्णपणे कादंबऱ्या ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या, कादंबऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. ग्रामीण जीवनाचे त्यांच्या विविध पैलूंचा सह अतिशय समर्थ व प्रामाणिक चित्रण हे या कादंबऱ्यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.  तसेच त्यांच्या साहित्यामध्ये व्यक्तिरेखा सामाजिक मूल्य देशाचे स्वातंत्र्य महिलांचे शील पुरुषांचा स्वाभिमान हे मूल्य जपणारी आहे. 

             अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीला अनुसरून दलित कार्याकडे वळले. त्यांचे साहित्य दलित व कामगारांच्या जीवनातील अनुभवांना लिहिण्यासाठी वापरले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे लढाऊ आणि विमोचक विचारांचे संस्कार त्यांच्या मनावर खोलवर रुजले होते. अण्णाभाऊ साठे यांनी अनेक सामाजिक प्रश्नांना शब्द दिले. एका विशिष्ट वर्तुळात राहून त्यांनी त्या समाजाचे जीवन चित्रण रेखाटले. श्रद्धा अंधश्रद्धेच्या पलीकडेही एक जग आहे आणि ते आम्ही जगतो आहे. 

        माणूस म्हणून नाकारलेल्या समाजाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. त्या अधिकारासाठी त्यांनी बंडखोरी करून लेखणीला धारधार तलवारीसारखी वापरली. समाज परिवर्तन हे फक्त हातात तलवार घेऊन होऊ शकत नाही हे सत्य त्यांनी जाणले आणि त्यासाठी एकच शस्त्र हाती घेतले ते म्हणजे लेखणी !!!

         अक्षर ओळख नसणारे अण्णाभाऊ साठे यांनी मानवतावादी लेखन करून समाजाला एक नवीन शिकवण दिली. प्रतिभा कोणत्याही चाकोरीबद्ध समाजव्यवस्थेचा भाग असू शकत नाही. रूपवादी रंजकवादी साहित्याला त्यांनी अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या नायकाच्या भूमिकेत मांडणी करून साहित्याला नवीन वळण दिले. खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ साठे यांचे लिखाण मानवतावादी आहे. त्यांचे साहित्य दुःखी पिडीत शोषित समाज महिला स्वातंत्र्य आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे हे सांगणारे आहे.

            १९५८  मध्ये बॉम्बे मध्ये स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात आपल्या उद्घाटन भाषणात ,'अण्णाभासाठे' म्हणतात," पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे."

      
             अण्णाभाऊ साठे दलित समाजाचे 
  प्रतीक बनलेले आहेत.  १ ऑगस्ट 2001 रोजी भारतीय पोस्टाने ४ ₹ च्या खास टपाल तिकिटावर अण्णाभाऊ साठे यांचे चित्र ठेवलेले आहे. शताब्दी वर्षाच्या निमित्ताने  १ ऑगस्ट  २०१९ रोजी हे टपाल तिकीट वितरित करण्यात आले. पुण्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाने कुर्ला मध्ये एका उड्डाणपूल यास अनेक इमारतींना त्यांचे नाव देण्यात आलेले आहे.

             अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य सर्वसामान्य लोकांपासून ते सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक धार्मिक श्रद्धा अंधश्रद्धा महिला स्वातंत्र्य कष्टकरी दलित सामाजिक  प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या अन्यायकारक प्रवृत्तीविरुद्ध आणि अस्पृश्य समाजातील जिवंतपणा हा नरकयातने पेक्षाही नरक आहे. हे सांगणारे वाटते त्यांनी जे भोगले ते लिहिले जे दिसले ते लिहिले त्यांच्या वाटेला जे आले ते लिहिले त्यांची लेखणी तलवार होती.अन्यायाविरूद्धची अण्णाभाऊ साठे सर्वसामान्य माणूस विषयीची आंतरिक तळमळ त्यांनी त्यांच्या भाषेत जगासमोर मांडला. 

        जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव.... या शब्दातून अण्णाभाऊ साठे यांच्या चळवळी बद्दलचे विचार समाजापुढे मांडतात अशा या थोर देशभक्त, समाजसेवक मानवतावादी लेखक साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे निधन १८ जुलै १९६९ रोजी मुंबई येथे झाले.

                  ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-**लोकशाहीर अण्णाभाऊ साठे **

        अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you !!!!!


*************************************

सोमवार, २६ जुलै, २०२१

** शब्द माझे -त्याचे **

***** शब्द माझे -त्याचे *******

भावनेच्या भरात मनात शब्द 
येतात जीवनाची साक्ष देत 
रमून जातात शब्द आठवणींमध्ये 

शब्दांच्या मधुर कल्पनेमध्ये 
डोळ्यातले भाव सांभाळून 
हरवती जीवनातील सत्य आजचे 
शब्द लिहिले जातात 

आयुष्याचे तुटलेल्या धाग्याला 
परत शब्दाने बांधून 
पण रुसली जातात सुकून 
गेलेल्या कोऱ्या आठवांसोबत 

शब्दपाकळी हसरी 
परत शब्दांच्या सोबत खेळ 
चालूच कोऱ्या पांढराशुभ्र कागदांवर 
अबोल आसवांच्या संग

मनशब्दाला उतरविताच येत नाही
आयुष्याच्या ; रिकामा क्षणांमध्ये 
अडकलेल्या शब्दांना 
शब्द सावरतात अशा क्षणासोबत 

माझे त्याचे प्रेम 
शब्द ओंजळीत घेत सांभाळत 
शब्दमिठीत मला घेत 
सदा फुलविण्यासाठी 

मनशब्दाला आपलेसे करीत 
शब्दांच्या साक्षीने....!!


               ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- ***** शब्द माझे -त्याचे ****

          आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thanks!!!! 

===========================

रविवार, २५ जुलै, २०२१

** समजूतदारपणा **

             मानवी आयुष्यात अशी कितीतरी नाती असतात. त्यात सतत आपल्याला समजून घेण्याच्या भूमिकेत वावरावे लागते पण हा समजूतदार पणा कधीकधी चुकीच्या अर्थाने घेतला जातो.... त्या भावनेतून लिहिली गेलेली ही कविता.  ही कविता स्वरचित आहे

**  समजूतदारपणा **

नको अपेक्षा करू 
माझ्याकडून समजूतदारपणाची 
मन ओरडत आहे 
गहिऱ्या वेदनेच्या डोहात 

वळसा घातलेल्या नौकेसारखे 
तरंग उठतात लहान मोठे 
वेदना अंती होईल असे 
सतत वाटत राहते 

पण मनस्थिती हुकुम 
गाजवीत आहे 
खोल डोहातील भोवऱ्यात 
सातत्याने... 

ओंजळीत शिल्लक आहे फक्त 
काजळ राखआठवणींची  
पैलतीर गाठताना 
वर्षानुवर्ष 

नियंत्रण नाही आता 
समजूतदारपणाचे 
अपेक्षा वाढल्या आहे माझ्या 
माझ्याकडून प्रवास नयनातील 
आसवांकडून 

म्हणूनच 
नको;
अपेक्षा करू ....
समजूतदारपणाची माझ्याकडून !!!

           ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- *****  समजूतदारपणा *****

             आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
Thank you !!!!!!! 


************************************



शब्द

            "शब्द", शब्द हा एक शब्द नसून आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा महत्वपूर्ण शब्द आहे.... मला समजलेला शब्दाचा अर्थ शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कविता स्वरचित स्वलिखित आहे.

*****   शब्द  *****

शब्द 
भावना 
शब्द अडकलेल्या 
       स्वप्नांची मोकळीक 
शब्द  गोड 
शब्द खेळरचना 
       आपुलकीची 
शब्द प्रेम 
शब्द माया
शब्द कोऱ्या पानांवरील 
       सुंदरस्वप्न 
शब्द गोड 
शब्द हिरवळ 
शब्द सुकलेल्या 
      आयुष्यात हसरे फुल 
शब्द खोलवर 
       रुतलेल्या भावनांची 
       आसवे 
शब्द मनशांती 
शब्द तलवारीवरील 
       धार 
शब्द जीवनाचे 
       सार्थक 
शब्द कौतुकास्पद 
शब्द भक्ती 
शब्द मानवी 
       सुमधुर 
       अस्तित्वाचे गीत !!

               ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-***  शब्द ***

          अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you !!



*************************************



शनिवार, २४ जुलै, २०२१

विणलेला धागा

                देह व्यापार करणाऱ्या बाजाराच्या स्त्रियांच्या हतबल झालेल्या, पोटासाठी  व्यभिचारांचा बाजारात बसलेल्या शोषित स्त्रियांच्या भावविश्वातून घेतलेली ही भावना. कविता स्वरचित आहे.

******   विणलेला धागा    ******
माणसांच्या चेहऱ्यावरील 
अनोळखी भाव 
अनोळख्या हसूबरोबर 
अनोळख्या बाजारात 
विणलेल्या धाग्यात 

रंग बदले भाव बदले 
सावली मात्र एकच 
मुखवट्याआड चढवलेली 
अदृश्य भावना 
प्रतिबिंब त्यात जपलेली 

उत्तरांशिवाय 
अनोळख्या बाजारात 
विणलेल्या धाग्यात 

जुनीच ओळखीची माणसे 
नवीन गिफ्ट पेपर  परिधान
व्यभिचारांचा  बाजारात
सुगंध देहबोलींचा 
पांढराशुभ्र रातराणी 
दरवळत, दिशाहीन 
भावनेच्या ...दिशाहीन बाजार 
टिचभर पोटासाठी 
सौंदर्य चढविलेल्या 
अनोळखी बाजारात 
विणलेल्या धाग्यात 

सुटलेला भटकत चाललेला 
जीवनाचा तुटलेला धागा 
अनोळखी बाजारात 
विणलेला धागा 

            ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे


 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- विणलेला धागा    


             आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. 

*************************************

गुरुवार, २२ जुलै, २०२१

बोधिसत्व झाला तुम्ही !!!!

          गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारित स्वरचित स्वलिखित कविता आहे.

*****  बोधिसत्व झाला तुम्ही *****

जीवनातील सर्व चढ-उतार 
पार करीत जगविजेता🏆
झालास मार्गदाता झालास 
मानवी संसारात 

पाण्यातून जहाज प्रवास करते 
वळसा घालते किनारा गाठते 
तसे तुमचे जीवन 
मोहमायातून मुक्त 

तुम्ही झालास शांतिदूत 
क्षणभंगुर मानवी स्वार्थी 
व्यवहारवादी जगात 
मानव कल्याणासाठी 

सोडले सर्व सुख संपत्ती 
क्षणभंगुर झालेले सर्व नाते 
मार्गदाता मोक्षदाता होण्याचा 
प्रवासात ...✍️🏻

मानवी संसारात झालास 
तुम्ही माणुसकीच्या भाग्यविधाता 
सोसले तुम्ही मनावर अखंडवार 
वाट चुकलेला माणसांच्या व्यवहारात 

जन्म,दुःख,मृत्यू यातना
चिंतामुक्ती त्यातून वाट 
काढणाऱ्या तत्वज्ञान अंगीकार 
करून दिली आम्हास 
✍️🏻शिकवण  समानतेची

अमर्यादित संघर्ष यात्रेतून 
चालताना न थकता न दमता 
शांती अहिंसेची आचारसहिता घेऊन
बोधिसत्व झालास तुम्ही ....
बोधिसत्व झाला तुम्ही !!!!


                ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-***बोधिसत्व झाला तुम्ही  ***

        अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका 
Thank you !!!

*************************************
 


// बाबाबासाहेब तुम्ही //

       

   /////   बाबासाहेब  /////

बाबासाहेब तुम्ही क्रांती 
समानतेची सदैव 
सूर्य तेजाच्या किरणांची 

बाबासाहेब तुम्ही वादळ 
विषमतेच्या ✍️लढाईत प्रेरणास्त्रोत 
क्रांतीची मशाल 
जीवन कला शिकविणारी 

बाबासाहेब तुम्ही बीजे 
पेरली शिक्षणाची 
अंधश्रद्धेच्या गाण्यात 
श्रद्धेचे गाणे ✍️🏻सुरासहित 
आदर्श विकासाचा 
अवघड परिस्थितीत 
दिले आम्हा प्रोत्साहन 
ताठ मानेने जगण्याची 

बाबासाहेब तुम्ही प्रकाशाची 
ज्योत आशा-आकांक्षा 
इच्छा पूर्ण करणारे वटवृक्ष 

बाबासाहेब तुम्ही 
शिक्षणाची,समानतेची✍️🏻,न्यायाची 
संघर्षाची यशोगाथा 
भारतीय संविधानापर्यंत आणि 
आजपर्यंतच्या प्रवासाची 

बाबासाहेब तुम्ही दाखविला 
मार्ग बुद्ध धम्माचा... 
बुद्ध शिकवण झाली 
मार्गदाता आयुष्याची !!!


             ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  ///   बाबासाहेब  /////

             अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you!!!




*************************************

सोमवार, १९ जुलै, २०२१

ओरखडा




            ** ओरखडा **

आयुष्यात कितीही ओरखडे झेलायचे 
कुठे थांबेल का, हे सर्वच

अंत आहे का याला 
मर्यादेच्या अविरत साखळीमध्ये 

पोहताना लहान बदकाचा तंरग
लहान असेल पण खरंच 

त्याला त्या तरंगाशी काही 
संबंध असतो 

शर्यत फक्त  जाण्याची 
अडथळ्यांच्या मार्गातील मार्ग 

होण्याचा ओरखडा तर असेलच 
गुणधर्माचा मन  बदलण्यांचा 

आसुसलेल्या माणुसकीची 
प्रखरता।   शीतलतेची  

रेखाटताना हळुवार जपली 
जाणार ओरखडांचा जखमा 

वात्सल्याच्या मायने भरेल का 
बदललेल्या दृष्टीला 

आनंदाच्या ओरखडा मिळेल का !!
आयुष्यात आनंद ओरखडा 

तयार होईल कधीतरी 
मनाच्या  ओरखडाला औषध 

मिळेल का 
समानतेची न्यायाची .....

माणुसकीच्या भिंतीच्या 
ओरखडांची !!


     ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-***   ओरखडा ***

       अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा .आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you!!

----------------------------------

** मौन **

         आपल्या आजूबाजूने अशा कितीतरी घटना घडत असतात.  त्या घडू नये अस वाटत राहते. एक घटना पावसामुळे कोसळलेल्या इमारती... त्यात झालेले नुकसान ... त्यावर सुचलेली ही कविता,
"मौन".


*****  मौन *****

मौन राहावे असे सतत 
वाटत राहते पण राहताच 
येत नाही मनात अनेक 
प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी 

वाहत्या पाण्यासारखे व्हावे 
खोल दरीसारखे व्हावे
घडलेल्या चुकांना शोधत 
बाळगावी शांतता मनात 
अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी 

आश्वासनाची जाहिरनामे आठवतात खोदलेल्या खोल विहिरीसारखी
ताजेपणाने गर्दींच्या माणसात 
हरवलेल्या माणुसकीची 
शांत व्हावे मौन व्हावे 
असे सतत वाटते 
पण 

चोहीकडे अशांतता पसरलेली 
नव्याकोऱ्या संघर्षाची गाथा 
दैनंदिन उघडझाप पापण्यांची 
अश्रूंचा... मृत्यूचा आणि भ्रष्टाचाराच्या तांडवात...
 
गुढ साखळीमध्ये गुंफलेला 
तरी मौन बाळगावे वाटते 
पण माणूसकीचा हदयाला  
मौन बाळगताच येत नाही 
विकासाच्या वटवृक्षाला 
मुळापासून घाव घालतांना 
बघून मौन !


           ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-***  मौन ***

       अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका!!
Thank you.


----------------------------------

आशा


जिथे आशा संपते 
त्या क्षणापासून चालू होतो 
सकारात्मकतेचा प्रवास परत 
हृदयापासून !!!






✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-***   आशा ***

     अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.  आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you!!


*************************************




चाबी


हृदयाची चाबी 
कुणाजवळही देऊ नये 
ती आपल्या स्वाभिमानाची 
गुरुकिल्ली असते !!


               ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-***  चाबी  ***

     अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.  आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका...
Thank you.



----------------------------------

शांतता


चुकीच्या गोष्टीचे समर्थन 
करता करता चिखल कधी होतो 
माहित नाही आनंदाचा शांततेचा 
आणि समाधानाचा टाकाऊ शब्दांनी !!


           ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- ***  शांतता ***

   अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you!!


===========================

शनिवार, १७ जुलै, २०२१

अखंड









हृदयातील Life line चालूच 
          असते तिथे....प्रेमाचा झरा 
          वाहू द्या! अखंड.


       ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-***  अखंड  **

अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका
Thank you

शक्तीशाली


समोरचा कितीही
शक्तिशाली असो
लहानपण आपलेसे करतात 
त्या शक्तीला !!!

         ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-***   शक्तीशाली **

   अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you!!

शुक्रवार, १६ जुलै, २०२१

माझे रस्ते

////   माझे रस्ते  ////

रोज नव्याने हा पाऊस 
मला नव्याने भेटतो 
चिंब भिजलेल्या शब्दांसोबत 
नव्याने शब्द भिजलेले देतो 
कागदावर ✍️उतरतांना 

नव्याने लिहितो गारवा शब्दांचा 
भाव भावनांचा सरबत्तीमध्ये 
पाऊस भरे नवीन अक्षरे 
कोऱ्या कागदांवर✍️🏻

आठवणीचे चित्र सोबत धारा 
बाहेरील पाऊस💚 झाडा-पानांवर 
हसते मी नव्याने नयनातील 
पावसासोबत कोसळणार्‍या 
धारेसोबत... 

माझे रस्ते हुंदके होतात 
शुभ्र दुःखांच्या सरीवर चालताना 
पाणी पाणी झालेल्या वातावरण 
पहाटेच्या शुभ्र गावा पोहोचेपर्यंत 
...हा पाऊस💦 हसूनच म्हणतो 

माझे रस्ते तुझे रस्ते एकच 
होतात रोज नव्याने 
चिंब भिजताना....
शुभ्र सकाळच्या सुखाद 
गारव्यात💕💕💕!!!!!!

             ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- ***   माझे रस्ते  ***

           अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you !!

** प्रश्नचिन्ह **




       ***  प्रश्नचिन्ह ****

उमजले प्रश्न 
एक-एक शांत होऊन 
अनेक दिवसांनी 

      दिवस शांत जातात 
      मनातील प्रश्नांसोबत 
      अंदाज बदलले जातात 

इंद्रधनुष्यासारखे बदलत 
होरपळलेली उत्तरे प्रश्नांची 
जपत जावे कुठवर 

       कळत नाही 
       खेळ चालूच; परत 
       प्रश्नचिन्हांचा ????

निखारे उत्तरांची 
आवासूनच शांत
प्रश्नचिन्हांसोबतच

                ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  *** प्रश्नचिन्ह ***

       अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you  !!!!


*************************************

** थांबलेला किनारा **

**** थांबलेला किनारा ****

शब्दही थांबलेले आहे 
मन ही थांबलेले आहे 
विचार फक्त चालूच 

अबोल संवादसोबतच
दिशाहीन शब्दांनाही 
थांबवावे लागत असते 

कधी कधी बेभान न होण्यासाठी 
आतुर झालेल्या विचार भावनेला 
फक्त आवर घालायचे आहे 

संवाद अबोल करीत 
शब्दही थांबलेले आहे  
म्हणूनच
 
मन ही थांबलेले आहे 
आणि शब्दही..... 
थांबलेल्या किनाऱ्यासारखे !!


              ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-**  थांबलेला किनारा **

      आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका 



===========================

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...