झाडांला फुले फुलतात आणि आपल्या जीवनातील त्यांच्या वाट्याला आलेले सर्व कर्तव्य पार पाडतात. निसर्गाने प्रत्येकाला आपली काही जबाबदारी दिली आहे. तसेच फुलांनाही.... मला फुले जिथे-जिथे दिसले त्या मनविश्वातून सुचलेल्या ह्या ओळी.
ही कविता स्वरचितआहे आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.
***** जाणे *****
त्यांचे जाणे
कुणी देवाच्या पायाशी
तर कुणी
सरणावरील व्यक्तीच्या पायाशी
तर कुणी
मंदिराच्या सजावटीसाठी
तर कुणी
आवडत्या व्यक्तीच्या हातातून
आवडत्या व्यक्तीच्या हातात
तर कुणी
त्या झाडांच्या पायाशी
स्वतःचे अस्तित्वनष्ट करतात
दुसरे फुलावे म्हणून
स्वतःच्या निरोपाच्या वेळी
निसर्गाच्या नवनिर्मितीच्या चक्रव्यूहासाठी
समर्पण स्वतःचे करीत !
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- *** जाणे ***
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा
Thank you
----------------------------------