savitalote2021@bolgger.com

गुरुवार, १५ एप्रिल, २०२१

निरागस प्रेम

       निरागस प्रेम 
माझ्या मनातील
मनामध्ये तू आहे जशी
तसे मी तुझ्या मनात असावे 
माझ्या भावनेतील  
भावनेमध्ये तुझे 
नाव आहेत तसे 
तुझ्या भावनेतील भावनेमध्ये 
मी असावे
माझ्या डोळ्यातील 
प्रत्येक स्वप्नांमध्ये अस्तित्व 
तसे तुझ्या डोळ्यामधील 
प्रत्येक स्वप्नांमध्ये माझे
अस्तित्व असावे 
    सविता तुकाराम लोटे 

आयुष्य ...

      आयुष्य 
आयुष्य म्हणजे 
न सुटणार कोड असत
आयुष्य हे असच असत
दिवसानंतर रात्र 
सुखानंतर दुःख 
आयुष्य हे असतच असत 
न सुटणार कोड असत
आयुष्य हे असतच असत
सुख दुःखाच्या वाटेवर 
येणार स्वप्न असत
सकाळी पडलेले स्वप्न जस 
जीवनाच्या वाटेवर तरंगणार
आयुष्य असच असत 
                  सविता तुकाराम लोटे 

सावरेल तू

         सावरलेस तू 
मस्तीत चालले होते 
आयुष्याच्या वाटेवर येणारे 
अनुभव झेलत जखमी होत 
नाही दाखविले कुणा 
पण तू केव्हा वेदनेला 
आपलेसे केले कळलेच नाही 
तुझ्यासमोर मन कसे मोकळे 
होत गेले नकळत 
चुकीच्या वाटेवरून सावरले तू 
मनातील गहिऱ्या वेदनांना 
फुलात कधी परिवर्तन 
केले कळलेच नाही
  सविता तुकाराम लोटे 

पुन्हा भेटावेस तू

पुन्हा भेटावेस तू 
पुन्हा भेटावेस तू अशी इच्छा हदयी 
येऊन गेली 
या बंधिस्त मनाच्या स्मृती आठवणीत 
पुन्हा भेटावेस तू  
तेजकळया जुळवून माळरान गुंफीत 
केसात माळते तुझ्या हाताने 
मनाच्या आनंदात फुलावे
पुन्हा मिळून
पुन्हा भेटावेस तू
नयनी भाषेच्या सोबत 
शब्दविना सांगावे तू
तुझे शब्द 
पुन्हा भेटावेस तू 
मला माझे अस्तित्व सांगण्यासाठी 
येणावादळवाटे वरून सावरण्यासाठी 
  भेटावेस तू
    सविता तुकाराम लोटे 

भाव मनातील

           भाव मनातील
मनातील भावना व्यक्त 
करण्यासाठी शब्दही कमी पडतात 
जेव्हा वेदना देतात 
मनातील भाव 
कळतही नाही, 
जेव्हा मनात अस्पष्ट 
कल्पना असतात भविष्याच्या !!!
नकळत डोळे पाणावतात 
अश्रू येऊ न देण्याचा निश्चय 
करीत असले तरी 
चोरपावलाने येऊन जातात 
नकळत!
            सविता तुकाराम लोटे

वेडया जीवाला

       वेड्या जीवाला 
माझे तुझ्याकडे पाहणे 
हसरा चेहऱ्यावरील ते भाव 
कळलेच नाही 
कधी  काळीज चोरले 
सुखावलेल्या वेडा जीवाला
वेडा मनाला 
समजावीत होते 
तरी आठवणीच्या सुखात 
भिजवत होते 
सोकावलेल्या वेड्या जीवाला 
समजावीत होते...
              सविता तुकाराम लोटे 

अश्रू फुले

     अश्रुफूले 
अश्रूमधील भावना
तुला कळलिच नाही
अश्रू फक्त तु जाताना 
सांडत होते,पण.
त्यामागील.... 
भावना जाणले
तेव्हा 
त्याच अश्रुंची 
आनंदी फुले झाले 
          सविता तुकाराम लोटे  

बुधवार, १४ एप्रिल, २०२१

मला ही लिहिता येते

मला ही लिहिता येते 
मला ही लिहिता येते र ला र स ला स
पण रस्त्याच्या लगत वसलेली वस्तीस पाहिले की कळते जगण्याची भीषण वास्तव संघर्ष आणि जगण्या अन्नासाठी ची तडफड 

मलाही लिहिता येते म ला म ग ला ग 
पण अंगावरची कपडे पाहिले फॅशन श्रीमंताची,कपडे म्हणायचे की चिंध्या... कपड्याच्या नावाखाली आणि रस्त्यावर फॅशनेबल फाटकी वस्त्रे 

मलाही लिहिता येते ट ला ट फ ला फ
पण इवल्याशा पायात बळ येईल का?शिक्षणाचे!  हसत-हसत जाईल का?
शाळा नावाच्या इमारतीमध्ये 
सावरेल का?आपले अंधारमय उघडे आयुष्य

मलाही लिहिता येते ध ला ध न ला न 
पण काय जगणं हे उघडावरले...गरिबीचे हसू की हसूच गरिबीचे श्रीमंतीचा शहरात लढायचे कुणाबरोबर आटलेल्या डोळ्यातील पाण्याबरोबर??

मलाही लिहिता येते ध ला ध छ ला छ 
पण थोपविता येणार का स्वच्छ भारताच्या नकाशात हरवलेले बालपण जगण्याची
आशा भिरकावून देणाऱ्या झोळीतील
अंधकार...

मलाही लिहिता येते ल ला ल श ला श 
पण त्यांच्यापर्यंत ही पोहोचेल का 
भारतीय संविधान,मूलभूत हक्क समानतेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि विचार
संपेल का विश्वासातील आशावाद जगण्याच्या सरणावरील मरणयातना 
टिपेल का उंच भरारी यशाची 
                         जीवनाच्या लढाईत 
मला ही लिहिता येते स ला स,म ला म आणि बरच काही 
                       सविता तुकाराम लोटे

जाळ

वलय

चिऊ

चिमणी

सावरावे त्याने

             सावरावे त्याने
सावरावे त्याने माझ्या मनाला 
कान डोळे तृप्त करावे प्रेमळ 
शब्दाने...
शहाण्यासारखे वागावे प्रश्न 
न विचारताच, उत्तरच प्रश्न 
असावे ...थंडगार पाण्यासारखे 
तडतड नसावी माझ्या चुकीला 
पावसाविना मातीला सुगंध यावा 
नवनिर्मितीचे... नाद न करता 
हसत भांडण शब्द विसरावे
सकाळी -सकाळी गुलाब द्यावा 
हसऱ्या नयनाने कधीतरीच 
चाकोरीबद्ध दैनंदिन सोडून 
रुसली कि सांगावे माझे 
हसत कायम तू माझी 
               यशमाळेत...
लपाछपीच्या संसार खेळात 
सावरावे त्याने
        सविता तुकाराम लोटे 

ती त्याच्यासाठी

    
 ती त्याच्यासाठी 

वळणावळणावर खुलते ती 
सहज सर्वकाही करते ती 
अशक्य शक्य करते ती 
अवघड ही सोप करते ती 
जीवनाचे गोंधळ सोडविते ती  
आणि मार्गदाता होते ती
इच्छेला सांभाळते ती 
परिस्थितीला बदल ती
गोंधळाला क्षमवते ती 
त्याचा आनंदात आनंदी असते ती
सर्वस्व पणाला लावते 
           ती त्याच्यासाठी

बाबाबासाहेब

बाबासाहेब 
आज नवी पहाट निळ्या रक्ताची 
अथांग सागराला कवेत घेण्याची
आम्ही गुलाम , बादशहा आजचे 
निळे आकाश होते फाटलेलेच 
आता लढाई आहे जिंकलेलीच
वादळ झुकले डोळ्यातील पाणीही सुकलेच 
लढाई जिंकता जिंकताच 
जातीपातीची समाजव्यवस्थाही हरलीच
शिका संघटित व्हा संघर्ष करा या मंत्रानीच 
आज गाथा तुझ्या जीवनप्रवासाची
आभाळाच्या सावलीची अडसर एकट्यानेच 
लढुन आम्हासाठी जिंकलीच 
पाण्यालाही खुले केले वादळाला पायदळीच तुडवून, साधे सोपे नसलेले आयुष्यही तूच 
केले कौतुकास्पद भवितव्याचे 
त्रिशुलाच्या टोकावर लेखणी संविधानाची अंधश्रद्धेच्या उपवासाला खाऊ पंचशीलचे ज्ञानसागरा मार्गदाता अंगणात बोधिवृक्षाच्या अभिमानाच्या.....
स्वाभिमानाच्या कोहिनूर तूच !!!
             सविता तुकाराम लोटे

सोमवार, १२ एप्रिल, २०२१

ओढ

           ओढ
अधीर पाऊल चालत 
थांबले काही क्षणात 
मागे वळून पाहतांना वेळ थांबली 
मनात एक अनामिक ओढ 
कुणास ठाऊक, डोळ्यातून वाहत आहे 
वेड्यागत दिशाहीन फिरवीत आहे  
मनात एक अनामिक ओढ 
अस्वस्थ आठवणीचा जुन्या शाली 
नतमस्तक आहे घड्याळ्याच्या काटयावरती
जुने प्रहार नवीन वेळ आणि 
न फुललेले तक्रार विना उसंत
मनात एक अनामिक ओढीत
पैंजण आवाज तो आपलाच पावलांचा 
सोबत नियतीचा घड्याळीचा डाव 
मनात एक अनामिक ओढ
         सविता तुकाराम लोटे 

मनात तू

      मनात तू
सोडून आपल जग 
जगली ती वेळ तुझ्यासोबत 
आपले परके आणि परके आपले 
झाले सहजच.
मिरवली मी... श्रृंगार करुनी 
सांभाळत स्वप्नवेलींना 
जगता आले मात्र मनातून 
काही वेळा फेकताही आले ना
मनातील स्वप्न तुझ्यासोबत 
जीवनाचा प्रवाह बदलला आणि 
बदलले सर्व आपले परके 
तू ही बदला...मी ही बदलले...
प्रश्नही बदलले... एकटीचे !!
नवीन अगदी, मनातून 
उशीर झाला आता सर्व 
नात्याला... पोरगी झाले मी 
श्रृंगारहीन झाले मी...स्वप्नातील स्वप्नाने...तुझ्याबरोबर... 
भेटलास तू मज त्याचव्यवस्थेचा 
पुजारी...अशक्य आहे नवी भेट 
स्वच्छ पाण्याचा तळ गढूळ झाला 
आता...मनात तू... 
असला तरी दुखावलेल्या
                   प्रेमाने आता

             सविता तुकाराम लोटे

विरह

            विरह 
नेहमी विचारायचा अथांग सागराएवढे
प्रेम आहे का तुझ्यावर
पण कधी न बोलले पण आज बोलते 
माझं प्रेम आहे तुझ्यावर सागरापेक्षाही अथांग  प्रेम होते तुझ्यावर नभाएवढे 
माझे प्रेम होते तुझ्या...श्वासाएवढे 
श्रृंगारलेल्या माझ्या देहावर नसलेले 
तुझे प्रेम माझे होते उफानलेला लाटेसारखे नयनातील आसवांना लपविताना 
प्रेम लपविले...पण आता नको 
चंद्र गारवा लाटा श्वासही 
नकोसा वाटतो...
     तुझ्या विरहात!
                सविता तुकाराम लोटे 

रविवार, ११ एप्रिल, २०२१

सोबत

               सोबत

सोबत होतो, हातात हात नव्हता 
सोबत होतो, ओठांवर शब्द नव्हता 
सोबत होतो , पण ...नजर रस्त्यावरील                                            वर्दळीकडे 
सोबत होतो, पण लक्ष बॅगेतील मोबाईल
कडे आला तर? 
सोबत होतो, चहाच्या टपरीवर बिस्किट एकमेकांना देण्यात मात्र 
लक्ष्य एकमेकांच्या शब्दाविना संवादकडे  सोबत होतो, आभाळा एवढ्या प्रेमाने 
पण हसर्‍या ओठांनी अन 
बोलता डोळ्यांनी 
आजही,सोबत आहो...एकमेकांच्या आठवणीने 
आपआपल्या... भाव संवादामध्ये
         सविता तुकाराम लोटे

ज्योतिबा

         ज्योतिबा 
निद्रिस्त उपेक्षित समाजाला 
जागृत केले समानतेची वाट दिली 
निती हीच आपली संस्कृती 
विश्वकुटुंब हेच मानवी जीवनसत्य 
दाविली परिवर्तनाची वाट 
वैचारिक वारसातून 
पेटविली मशाल बहुजनांच्या उन्नतीसाठी उच्चवर्णीयांची मक्तेदारी तोडुनी 
अखंडातून...
ब्रीद होते स्त्री शिक्षणाचे 
सावली झाली सावित्री...
माती झाली धूळपाठ...
लेखणी झाली काठी...
मक्तेदारी तोडली उच्चवर्णीयांची 
बहुजन अज्ञान दारिद्रय वाचा दिली 
समूळ नष्ट करण्यासाठी विटाळवाच्या 
असामान्य कर्तुत्वाने अंधाराला उदयसूर्य 
दिला म्हणून आज महाराष्ट्र माझा 
फुले शाहू आंबेडकरांचा
        सविता तुकाराम लोटे 

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...