savitalote2021@bolgger.com

बुधवार, २८ एप्रिल, २०२१

मधाळलेली सांजसावली

मधाळलेली सांजसावली
      सकाळ नंतर संध्याकाळ आणि संध्याकाळ नंतर सकाळ हे चक्र रोजच येते आणि जाते.कधी कधी सकाळ सोबत आनंदाची पाखरे घेऊन भुरकून जातात. दुःखाचे सावट न विसरू देण्यासाठी कळत नकळत सुख सोबत दुःखही जखमेवर मलम लावीत समजावेत असते.
 स्वतःलाच हळुवारपणे कधीही न बहरून आलेल्या वेलीप्रमाणे पावसाचा गंध जसा चोहीकडे असते. धरती मिलननाने सुखावते. आपल्याला झुलायला, हसायला, फुलायला शिकविते आयुष्यभर. तो पाऊस सुद्धा कधी कधी दिसेनासा होतो तेव्हा काय परिस्थिती होत असेल कल्पनाही करता येत नाही. दाटून आलेल्या संध्याकाळी सोनेरी ऊनाबरोबर सांजसावलीच मधाळपणा मात्र मनात मन गुंफणारा काळजात घर करून बसणारा असते. डोळे आतुरलेले असतात सांजवेळच्या प्रतीक्षेत!
           मनात प्राजक्त मोगरा फुलला की मनसोक्त आभाळही सप्तसुर आठवणींनी चिंब होते. सांजसावली कुशीत शिरावे वाटतं सारे ओलावलेले क्षण घेऊन!
          मी आपल्या घराकडे परतत असताना अंधारमय सावली घेऊन सूर्य ही मावळण्याच्या बेतात असते. सतत वाहणारा गारवा आयुष्यातील आठवणींना सप्तगंगणात घेऊन जात असते. मनाची समाधी लागली की खिडकीबाहेर लाल केशरी बहरलेली गुलाब पाहून फुललेला गुलाबाचे पाने शब्द बनून सप्तसुरांचे सोबत साथ देत असतात. नवीन गगन भरारी घेऊन दिशाहीन झालेल्या सुरांना पुन्हा लागते. जमिनीवर आठवणीच्या काळाकुट्ट मातीवर ओढयाव्या लागतात रेघाटया आठवणींच्या आणि त्याचे  रेघाटयाबरोबर इवल्याशा मनाच्या रूप त्यावर जखम होते तर रेघोट्या ओढव्यासा वाटतात. 
     खाली मन दिशाहीन धावत असतं शब्द नी शब्द सोबत घेऊन पापण्या च्या कडेला आपलेपणाचा ओलावा ठेवून साक्षी असते वर्तुळ बाहेरील जगात जगताना एखादी किरण आपल्याकडे आलेले पाहून जीवन किती सुंदर असे वाटते पण पानझडी प्रमाणे गळून पडतात परत क्षणात या पुस्तकातील लाल गुलाबाच्या पाकळ्या पाहून मनातील जीवघेणा वेदना अधिकच जवळ येत असतात वर्तुळा बाहेरील जगात आणि पुन्हा वसंत बहरत असतो निशब्द.
      दिलेला वचनेच्या माळा गुंफीत असतात. गळाभोवती क्षणात स्वप्नमय रम्य निरागस वाटते ते क्षण जेव्हा दुःख सोबत आले होते कधी ही न येण्यासाठी पण पानगळती नंतर नवा क्षण येतच असतो तसाच क्षण सुद्धा आला 
        संघर्ष असतो स्वतःचे इतरांशी जीवनाच्या वाटेवर काटेच असतात हळुवार वेदना देण्यासाठी मूकपणे ओठावर न येण्यासाठी मधाळलेला सांजसावलीत मन आनंदाने नाचत असते  सुंदर स्वप्नाला पुन्हापुन्हा बनविण्यासाठी नवनवीन कल्पना फुलत असतात कुणालाही नकळत आनंद द्विगुणित होते वाटतं आयुष्याच्या कळ्या कळ्या फुलत रहावे. प्रकाशाचा सारख्या काटन च्या सहवासात प्रसन्न होणाऱ्या लाल केशरी गुलाब सारखे रहावे टवटवीत वाहणारा झरा सारखा घरट्यातल्या चिऊताईच्या बाळासारखं अखंड कुहू कुहू कोकिळे सारखं कमळासारखा हव्याहव्याशा वाटणाऱ्या गार वारा सारखे आणि पोपटी हिरव्या शालूघातलेल्या मायमाते सारखे हसत हसत फुलून घ्यावे स्वतः पण त्याला कुणाचीही दृष्ट नजर न लागावे.
          होईल तुझ्या न हे सगळं उत्तर नसतं दिलासा  नसते त्या क्षणाला आशा मात्र असते आणि मनात शब्द येऊन जातात
        काही क्षण जपायाचे असतात 
        स्वातीच्या दवबिंदू सारखे 
        काही क्षण विसरायचे असतात 
        आळवीचा पानासारखे
                          27.1.2006
         सविता तुकाराम लोटे 
---------------------------------

कातरवेळी

         
           आयुष्याची वाट चालत राहावी अशीच क्षितिजा परी क्षितीजापर्यंत जाण्याची मनात इच्छा आणि दुरवर दिसणारा काळाभोरआकाश कातरवेळी चाललेल्या पक्षांची धडपड घराकडे जाण्याची जिद्द त्यातून नवे बनविते सूर्य आकाशात प्रफुल्लित होऊन जातो. जरी ते अस्ताला जात असला तरी सूर्य बळ देत असते, जिद्द देत असते, तो पुन्हा आयुष्याच्या चुकला वळणावर सावरण्यासाठी आयुष्य जगण्यासाठी.
             भूतकाळ मनातील हळव्या क्षणांना बऱ्याच गोष्टीं ची व्यथा डोळ्यात दाटून येते या आणि पापण्या बाहेर पडायचं नाही मनाच्या कुंद कोंदणात तसेच राहायचे कायमचे पण  या हळुवारपणे येत असतात भूतकाळापासून बाहेर वर्तमानामध्ये!
        पाऊस पडून गेल्यावर म्हणायची नवचैतन्य झाले असते. झाडांच्या प्रत्येक पानावर थेंबांचे अस्तित्व असते. थंडागार वारांनी मनाची दारे ओलेचिंब झाले असते. भिजलेल्या मनाला शांत करण्यासाठी पुन्हा त्याला यावे...
     तरी मनातील गोड कडू आठवणी तशाच राहतात त्या नकोशा वाटणाऱ्या आठवणी सुद्धा मनातील कोपरा ओला चिंब करून ठेवतात. मनावर भल्यामोठ्या ढोकळा सारख्या आठवणी असे वाटते त्यांना संपून टाकावे पण अशावेळी  त्यांना अधिक उफाळा येत असते. 
        हळव्या क्षणा बरोबर आपले बरोबर वाटत असते. आज तक धरलेला अबोला मनाला  ओलाचिंब करून जाते. मनामध्ये विचारांचे वादळ निर्माण होते. अपयश अपयश आपले असते कि त्या क्षणाचे हेसुद्धा कळत नाही तरी अबोला सर्व मनातील भाव भावना क्षणात प्रगट करीत असतात; आपल्याही नकळत !
          आठवणींना संदर्भ देतांना मनात विचार येतो. मनसोक्त गुलाब फुलतो गुलमोहर फुलतो वाटसरूंना विसावा देत. अंगावर पावसाच्या सरी झेलत एकमेकांशी कुजबुजते पाने दवबिंदूचे मंजुळ गाणे अधिक जवळची का वाटत असते.
    मनातील असाह्य होणाऱ्या वेदना अबोल सोडून सांगावस असे वाटते असले तरी कशी खुले करावे. मनात नकळत विचार आला की त्याची हातात हात घेउन त्याला समजावे त्याचा अबोला कमी करण्याचा प्रयत्न करावा असे वाटत असताना, मनसोक्त हसावे त्यावेळी... त्याचे मनसोक्त हसणे त्याने दिलेल्या गवत फुलांवर हात फिरवीत आठवणी त्या आठवणी मनात दाटून येतात.
        माझ्या खुळ्या कल्पनावर हसणे हळूच रागवणं आणि अबोला धरला की त्या स्वप्नातील कल्पना समोर  उभा करणे त्याच्या कल्पनेमध्ये फक्त माझे अस्तित्व त्याच्या विचारात त्याच्या आयुष्यात फक्त माझे अस्तित्व मी मी आणि मी फक्त मी असायचे. कवितेमध्ये लिखाणामध्ये पण !!आमच्या साध्या संवादाला सुद्धा कवितेचे रूप यायचे कळत सुद्धा नव्हते.... त्यांनी प्रत्येक क्षण जपून ठेवला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात;पण...
    आशावाद आणि निराशावाद हेच एक कारण असावे त्याचे आशावादी असणे आणि माझी निराशावादी असणे हेच कारण त्याच्या माझ्यामध्ये आले असेल दोन विरोधी टोके एकत्र येण्याचा प्रयत्न करीत होते पण त्याला दुसऱ्या टोकाची नजर लागली म्हणजे माझी आणि तो तिथेच थांबला क्षण पुन्हा एकत्र न येण्यासाठी.
       चुकलेच माझे त्यावेळी पण तुला सावरता आले असते सावरले का नाहीस त्या  क्षणाला कवितेचे रूप का दिले नाहीस माझ्या अबोला माझ्यापासून दूर घेऊन जाईल असे वाटत सुद्धा नव्हते तुला कारण तुला भेटल्यानंतर तुझ्याविना आयुष्य असेल असे वाटत सुद्धा नव्हते भविष्यात फक्त तूच असावा तूच होता कल्पनेत  आणि विचारात.
        तुझं माझं नातं जगावेगळा. आजही तसाच दिसलास; माझ्या अबोलशब्दांना सामोर गेलास. तुझ्या भावना कळल्या तुझे पाणावलेले डोळे दिसले परत आशावाद दिसला याच कातरवेळी मावळतीच्या क्षणाला घट्ट मिठी मारली अबोला धरून .
      ...... रोज  येणाऱ्या कातरवेळेला कोण घट्ट मिठी मारेल .....माझ्या विचारांमध्ये तू असला तरी आज परिस्थिती वेगळी आहे तुझ्या त्या हळव्या क्षणांमध्ये भागीदार मात्र नाही मी त्यात शिरू पाहते आहे दुसरी कोणीतरी आणि तुही हळुवारपणे साद देता आहे तुझ्याही नकळत. पण सांगून गेले तुझ्या हातातील गवतफुलांची फुले सर्व काही त्याच कातरवेळी!!
             सविता तुकाराम लोटे 
---------_------------

स्वप्न सावली अस्तित्वात येते तेव्हा!!!

स्वप्नसावली अस्तित्वात येते तेव्हा!

            समाजामध्ये अनेक प्रकारचे अनेक स्वभावाची माणसे राहत असतात. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात रेशीमबंध असते. काही ऋणानुबंध असतात. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर कुणीतरी येण्याची वाट पाहत असते. मनामध्ये एक आकार एक स्वप्न निर्माण होते. स्वप्नातील एक हलकीशी चाहूलही कशी मने फुलतात अंतःकरणाच्या कोवळ्या वेलीवर संदर्भातील भाव फुले स्वप्न फुले फुलून आनंदी करतात पण तेवढ्यात एक स्वप्न पूर्ण होऊन वास्तवाच्या जगात रमत असते तरी ते स्वप्न न विसरता ती काळी पांढरी सावली पाठलाग करीत असते ते भावफुल आणि स्वप्न फुल एका कोपऱ्यामध्ये पक्के  बसून राहते कुणाच्यातरी दिसण्याचे स्वप्न अस्तित्वाचा आणायचे ती काळी पांढरी सावली स्वतः स्वतः भोवती फिरत राहते.
      निळाभोर आकाशाखाली वावरू लागते आपल्या सोबत स्वप्न चिमणी पाखरांची ती चिवचिवाट मनाला स्पर्श करून जाते आणि डोळ्याभोवती उभी राहते ती काळी पांढरी   सावली हाताच्या ओंजळीमध्ये चांदणे गोळा करून देत असते ती सावली मने निशिगंधा सारखे फुले तसेच मनातील कोपरा न कोपरा त्या अबोल संभाषणा बरोबर चालत असते आणि अचानक डोळे सताड उघडे होतात आणि विचार करू लागते. 
         मनातील ती काळी पांढरी सावली होती की कल्पतरू होते ते! जसे काचेचा आरशाला मारला तर तुटून जाते प्रतिबिंब नष्ट होते तसे झाले.  मनातील शब्दाने खेळ खेळला सुसाट वादळाने झाडे मुळापासून उपटून टाकले तेव्हा झाडांनी काय करावे तसे केले त्या काळा पांढरा सावलीने माझे अस्तित्व नष्ट केलं रक्तबंबाळ केले मन सागराला!
         कोणतीही भावना त्यासमोर फिक्की पडत होती हृदयाच्या कोपरा न कोपरा त्या आठवणीने घायाळ झाला होता रक्ताच्या प्रत्येक थेंबाने वर ती सावली हक्क सांगत होती हेवा करीत होते मन मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होते. मन रिकामे झाल्यास ते बुद्धी विचार करीत नव्हते माझी व्यथा ऐकत नव्हते. 
           तुटलेल्या स्वप्नांची रडगाणी गोळा करीत होते. झडलेली सगळी पिवळी पाने अंतरंगातील व्यथा पापणी मध्ये साठवीत होती. दाट ढगातून मला  मिळत नव्हती ते खुल्या पापण्यान मधून कितीतरी वेळा त्या सावलीने देऊन दिले होते आणि दवबिंदू साठवीत होती हिरव्या हिरव्या तृणफूलातून स्पर्श करून जात होती पुन्हा तुटलेला काचेवरून मन बेभान नाचू लागले होते ती सावली ज्या वेळी अस्तित्वात माझ्या समोर आले तेव्हा आनंदाने भरून गेलेले मन अचानक घार पक्षी सारखे पडू लागले पाण्यातून मासाला बाहेर काढावे आणि जगाला लावावे त्याला या भूतलावर आपले वेगळे अस्तित्व निर्माण करायला लावावे त्याला जरी माहीत असले तरी त्याची जीवन नाही तेथे तसेच झाले.
        विचार करू लागले माणसांच्या गर्दीत हरवून गेले पुन्हा ती सावली मला आपल्याकडे खेचत असते. माझ्या स्वप्नातील काळी पांढरी सावली तेथे जशी मी त्याला पाहण्याचा प्रयत्न करीत होते तसेच आधी पाहात होते तशीच तेव्हाही केले पण ती सावली माझ्याकडे येत होते. सर्व भावांनी मध्ये आणि अगदी जवळ येऊन त्या भावनेला अर्थ देण्याचा प्रयत्न करीत होते पण तितकेच दूर जात होते भीतीने हदयात एक अनामिक निर्माण होत होती तिने कधी मला गुंतविले नव्हते.
           शरीरातील शक्ती नष्ट करीत भावनाशून्य करीत होते तरी वटवृक्षाप्रमाणे उभी होती एकटी संघर्ष करीत.
         24.1.2004
            सविता तुकाराम लोटे 
_---_------------------------


मंगळवार, २७ एप्रिल, २०२१

आठवण त्या हळव्या क्षणांची

 आठवण त्या हळव्या क्षणांची
  स्मृतीच्या त्या आठवणी
  मनी असावी सदा 
  त्याला सतत जोड असावी 
  प्रेमळ दोन शब्दाची
         आठवणींना उजाळा देण्यासाठी किती छान काव्यपंक्ती आहे आपल्या मनामध्ये आठवणीची जडणघडण परिपक्व होऊन बसलेली असते कुठे रिकामा वेळ मिळाला की सर्व काही डोळ्यासमोर येत राहते पावसाच्या सरी प्रमाणे!
          ओलेचिंब करून जाते अलगदपणे मनाच्या आठवणींचा पिंजरा खुला होऊन जातो नकळत आपल्याही जाणिवा अपयशाच्या.
      प्रेमात केव्हा आणि आणि कशी पडले तुझ्या विषय आकर्षण का निर्माण व्हावे माहित नाही तरी तुझ्याकडे झुकते माप सांभाळता आले नाही. तू आलास वादळी वारा प्रमाणे; जीवनात. ते मी स्वीकार केला नसला तरी आपल्यातील प्रेम निस्वार्थ करीत राहिल्या आणि अचानक का गेलास माहित नाही? एक प्रश्नचिन्ह देऊन गेलास.
     मनाच्या विशाल सागरामध्ये आठवणीचे रूपात थेंब थेंब साठवून ठेवले. अचानक एका पत्राने उजळा दिला त्या मांडलेल्या तुझ्या व्यथा प्रेमाबद्दलची आस्था, अस्तित्वाची जाणीव. तरीपण तुला माफ करणार नाही, मला हवी आहे तुझ्या मनातील प्रेम प्रेरणा साथ व्हवी होती
 जीवन वेली फुलविण्यासाठी. निघून गेलास वेदनेचा पाऊस देऊन.
          माझ्या अस्तित्वासाठी माझ्या ध्येयासाठी प्रेमाला मनाच्या खिडकीमध्ये कुलूप लावून ठेवले व त्या कुलपाची किल्ली कुठेतरी हरवून आला न उघडण्यासाठी. मनातील शब्द मनात न ठेवता उघड केले पत्राद्वारे. पण इतकी हिंमतवान नाही. तुझ्या प्रेमळ शब्दाची एक आठवणही प्रफुल्लित करून जाते मनाला शब्दांना भावनेच्या हिंदोळ्यावर प्रफुल्लित होऊन.
      माझ्या आठवणींवर हक्क आहे माझा तुझा नाही तू कितीही दूर राहिला तरी प्रेम तुझ्यावर कमी होणार नाही करीत आहे करीत राहणार आहे त्या आठवणींसोबत उजाळा देत
  प्रेमात जगायचं असतं 
  प्रेमात सर्व काही गमवायचं असते
  त्यात फक्त शब्दांची साथ असते 
  फुलांचा बहर असतो 
  तुझ्या माझ्या नात्यातील 
  रेशीम बंध असते
       15.10.2003
               सविता तुकाराम लोटे 
----------------------------------

आयुष्याच्या वळणावर


आयुष्याच्या वळणावर
       आयुष्याच्या वळणावर खूप माणसे भेटतात. कोणी चांगले तर कोणी वाईट कोणी स्वतःच्या मस्तीत गात राहतात. कुणी शांत कुणी अबोल !!!प्रत्येकाला जगण्याचा रंग निराळा असतो. तरी प्रत्येक ऋतूमध्ये मन फुलवीत असते. तसे रोज काहीतरी वेगळे जीवनात घडत असते. प्रत्येक वाटेवर एक नवे आव्हान असते. जीवन जगण्याची सुख-दुःखाच्या श्रृंखलामध्ये गुंफलेले
         आयुष्य एक चूक आयुष्याला वळण देऊन जाते. झालेले ते संभाषण कसे मदतीला येतात. न विसरण्यासाठी !! मदतीचा हात देऊनही, अलगदपणे बोलून निघून जाते. त्या वळणावरून परत न भेटण्यासाठी. जसे प्राजक्ताच्या फुलांनी फांदी पासून अलग व्हावे तसे हिरव्यागार पानांतून पिवळी पाने गळून पडावे. 
       नवीन आयुष्यासाठी मनात नसूनही आपण जात असतो. त्याच वाटेवर त्याला शोधण्यासाठी पापणी ओली चिंब होऊन नजर शोधते..... मनाच्या हळव्या वाटेवरून चालताना मग कुणाच्या तरी अंतरंगात शिरू पहाते वेध घेत कुणाच्या तरी दिसण्याचे. त्यांच्या कडे मन आकर्षित ; कुणीही नसताना. का असे विचार येत असतील मनात. प्रवास करताना मनात पुन्हा त्याच वाटेवर का फिरावे असे विचार मनात येताच दिसावा आणि त्याच्या नजरे मध्ये मैत्रिपूर्ण भाव पहिला भेटी प्रमाणे का नसावे निस्वार्थ. उदासवाणी स्वतःची आणि माझ्याशी अबोला,  शब्दाविना चालणारा संवाद आणि थोड्यावेळाने निघून जाणे ;त्याच वाटेवर एकटे  ठेवून, विरहाच्या वेदनेचे काटे देऊन!
 
पानगळ झाली उगवत्या सूर्याच्या साक्षीने
रणरणत्या तप्त दर्पण सत्याने
निशब्द अबोल धारदार शब्दविना 

        ज्या नाजूक वळणावर मदतीचा हात दिला निस्वार्थपणे तो व्यक्ती असा का बदलावा?  अशा कितीतरी प्रश्नांची गर्दी मनात आणि विचारांमध्ये येते. तो आता त्या वळणावर कधी दिसतच नाही; तरी मन माणसाच्या अफाट गर्दीत नेमके कोणाला शोधत असते त्याला की स्वतःच्या अस्तित्वाला... त्या वेळी  न बोलता येणाऱ्या थँक्यू साठी की एक चांगला मित्र म्हणून. एकटीच प्रश्नांचे उत्तरे देत राहते संपूर्ण प्रवासात. आणि वेळ गेली की पुन्हा होते आपले आयुष्य जगण्यासाठी तयार; भीतीला मनात ठेवून तो प्रसंग परत न येण्यासाठी!!
          पाण्याच्या लाटेप्रमाणे मीही पुढे चालते आहे वादळी वाऱ्याप्रमाणे पक्षाप्रमाणे निळ्या आभाळाच्या दिशेने एखाद्या मुळातून तोडलेल्या झाडाच्या खोडाला पुन्हा फांद्या फुटतात तसंच संघर्षाला अडचणींवर मात करीत.
           जगात तुझ्यासारखे दयाळू व्यक्ती खूप असतात. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेच आले मदतीचा हात देणारे.  काही बिनधास्तपणे मैत्री नात्या गुंफणारे कुठल्याही परिस्थितीला सामोर जाण्यासाठी हिम्मत देणारे , शक्ती देणारे शब्द देणारे नवीन वाटा देणारे नवीन मैत्रीपूर्ण भावविश्व निर्माण करणारे नवीन नाते त्याला कुठलीही अपेक्षेची झालर नसलेली फक्त प्रवासात सोबतीची वाट निर्माण करणारे, 'प्रवास माझा प्रवास माझ्या जाणिवेचा' माझ्या प्रवासाने शिकविले मला जग खूप सुंदर आहे. आजूबाजूने खूप सुंदर जग आहे तिथे जगावं लागतं जगू द्यावं लागत. 
            प्रत्येकांचे सुखदुःखाची वाटा वेगळ्या आहे विचार वेगळे आहे स्वप्न वेगळे आहे पायातली पाय वाट वेगळी... विचारांचे शब्द वेगळे आहे... शारीरिक हावभाव वेगळे आहे. सर्वकाही वेगवेगळे आहे विचारांच्या सावलीमध्ये कुणीही उन्हाचे चटके शब्द पावलांनी देत नाही. माझ्या प्रवासात मला ते मिळाले नाही कारण तुझ्यासारखे विचारांचे आपल्या आजूबाजूला माणसाच्या गर्दीत आपल्या प्रवासात एक सुरक्षित साखळी निर्माण केली. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेच तुझ्यासारखे मदतीचा हात देणारे आले .
            या प्रवासात कुणाबरोबरही एक वेगळं नातं निर्माण होऊ शकला नाही. तुझ्यासाठी असलेल्या भावना नव्हत्याच मुळी. माझा तुझा प्रवास असाच शब्दांच्या खेळ नसलेला, टाळत असलेला आपण आपल्याच आयुष्याच्या नवीन वाटेवर चालण्यासाठी चालू केलेला प्रवास एका अनोळखी व्यक्तीसाठी एका नवीन अनोळखी प्रवासासाठी थांबू शकत नव्हता. कळत आपल्याला ...वळत आपल्याला...पण आपली इच्छाशक्ती इतकी दांडगी असते की आपण ठरवलेल्या आयुष्याच्या नवीन प्रवासाच्या वाटेवर कुणाही अनोळखी व्यक्तीबरोबर अनोळखी प्रवास करणार नसतो. ते आपल्यासाठी आणि समोरच्या व्यक्ती साठी सुद्धा फायद्याचं नसतो म्हणून आपण आपला प्रवास वेगवेगळ्या... वेगवेगळ्या वाटेने... वेगवेगळ्या वेळाने आणि वेगवेगळ्या माणसाच्या गर्दीमध्ये केला. फक्त मनात काहीतरी आल्यामुळे दूर पळणारे आपण .पण तसं नसतं ! आयुष्य प्रत्येकासोबत जीवनात एक रेशीम बंध नसते कुणीतरी एखादीच व्यक्ती त्या रेशीमबंधनामध्ये  बांधले जातात. ते ही विश्वासाचा निर्मळ आणि स्वच्छ मनातील भावनांच्या आधाराने.

        कागदाची घडी चौपट करता-करता
        तुझ्या अबोलपणाची घडी चौपट करीत
        डोळ्यागत करपून टाकले रेशीम बंध
                           ..... नवभावनेचे

     तू कुठे भेटू नकोस कोणत्याही वळणावर तुझी माझी अनोळखी ओळख एखादा संभाषण करण्यासाठी परत आयुष्यातल्या एखाद्या वळणावर मदत करण्यासाठी जपुन ठेव अनोळखी ओळख!!!
       त्यावेळी विसरून जा ...कधीकाळी मनातील आतल्या आत करपून टाकलेले रेशीमबंध ....त्यावेळी विसरून जा माझ्या तुझ्यातील अबोलशब्द ...पण त्यावेळी सुद्धा विसरून जा माझं तुझं नातं. फक्त लक्षात ठेव आपल्यातील अनोळखी ओळख शब्दांची.

          गरज फक्त पाऊल उचलण्याची 
         आणि आयुष्याच्या वळणावर पुढे 
                          जाण्याची!
                                  10.10.2003
           सविता तुकाराम लोटे 
---------------------------------

रविवार, २५ एप्रिल, २०२१

नयन


       आयुष्यात काही प्रसंग काही क्षण असे येतात की आपलेच आपल्यापासून दूर होत जातात... आपण त्यांना समजून घेत नाही रंगांनी भरलेले जीवन बेरंग होत जातात.  जखमा सुगंधी होत जातं त्यात रमले की नयन सर्व सांगून जातात....“ का कोण जाणे‛, नयनांना आधीच माहीत असते; अश्रू कुठे यावे म्हणून!! काय झाले ते सांगून जावे नयनातील भाव.
         आयुष्य बदलून टाकतात सर्व सृष्टीला नयनांचा गडद मखमली अश्रू मध्ये वाहून नेतात. विहरनाच्या लहरी बहुदा नयनामुळे पुढचे आयुष्य सोपे करून देत असतात. 
     नजरेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत असलेल्या स्वप्नाला आकाशातून टपकावे तसे  वाहू लाग ते नयना त राहत नाही. पाहणारी नयन दृष्य वाहती राहते त्यापलीकडे काहीच दिसत नाही.
       नयनातील पाने तिला दुःख होते की आनंद कळत नाही. मंदावलेल्या नयनांमधून चेहऱ्यावरून अश्रु वाहु लागते. आकाशातून पहिल्या पावसाचे आगमन व्हावे ; जीवन मायेच्या प्रत्येक शब्दाला नयन साथ देत असते. जुन्या आठवणीची माळही अश्रू भरल्या नयनात
दिसत रहाते “आठवणीचा एक मात्र खरा साक्षीदार म्हणजे नयन.”
    चिमुटभर आठवणीने नयन कसे आपले मन सहज सांगून जातात. मनाचा थांगपत्ता लागू न देणारी मानवी प्रवृत्ती असते पण नयन त्याला खोटे ठरवून मनातील चलबिचल सांगून जातात. जेवढी आपली नयन शक्ती असेल तेवढच मनशक्ती असतात. 
    म्हणतात, नयन आपल्याला थेट समोर असणाऱ्या व्यक्ती कडील भाव समजावून सांगतो. आपल्यातील अभिमानाचे क्षणात नाहीसे होतात जेव्हा आपलेच मुले आपल्या समोर मनमुराद हसत असते त्याला बोलता येत नसले तरी त्याचे बोबडे बोल कळत नसले तरी, त्याचे नवीन शब्द कळत असते आपल्याला आलिंगन देताना सांगतो हसा.... खळखळून हसा!! मग ते नयन फसवते आपल्याला.
         हळवे झालेले नयन मग फसवत जाते जमिनीकडे आपले नयन अलगद जातात... त्यांच्या पायातील पैंजणाचे सूर नाद नयनातील भाषा सांगून जाते... त्याला खेळायचे असते त्याला नाचायच असते.... त्याला सर्व भाव सांगायचे असते.... त्यावेळी नयनांचे संदर्भ कळलेले नसते,'बालमन’ असावे लागते. आपण पाहतो खेळतो जाणून घेते पण खरच निस्वार्थ मन होत असते प्रश्नांचे उत्तर शोधताना स्वतः च सामावून जातो.  नयनांचे अश्रुचे संदर्भ चटकन  मनाला लागतात... असेच नयन आपल्याला आपल्यात समजावून घेतात.
        नयनांचे संदर्भ कळले नाही तर जीवनात काहीच शिल्लक नसते. नयनात पाणी साठवले की काहीच दिसेनासे होतात. गहिवरला मनाला नयन अश्रू चिंब भिजवून टाकतात. स्वप्न हि नयनात दिसत नाही धुंद मनाला नयन बंदिस्त करीत असतात. सप्तपदी चालताना नयनाला सांगू नये थांब... राहू द्यावे तसेच विरहाने मननयन आपले भाव सांगून जातात, असे का? ज्या नयनात मायेने   साठवून  ठेवलेली क्षणात वाहून जाते पण अश्रू मध्ये दुहेरी भावना असते.              पहिली म्हणजे सुखाची दुसरी भावना विरहाची असावी विरह म्हणजे आज तक जपून ठेवलेल्या मायला सोडून जायचे. सुख म्हणजे जीवनाची नवी सुरुवात स्त्रीधन मिळाले असते; स्त्री म्हणून संपूर्ण होण्याची तयारी झालेली असते.  ती आता फक्त मुलगी बहीण नसून कुणाची तरी पत्नी, सौ ,सून इतर सर्व नाती आलेली असते. नयन सर्व विचार ठेवू शकत नाही. फक्त वाहात राहते अलींगण  देताना.  नयनात आभाळ दाटलेलं असतं  कुणीच कुणाला न सांगता सर्व सांगून जातात.  प्रीतीचे फूल उमलत असतात.  नयन अश्रू गाणे गात असतात  नयन केविलवाणी झालेली असते. जीवनाची नवीन रंग ,गंध ,स्वप्न नवीन वाटत असते.नयनात क्षणाक्षणाला आभाळ दाटून जाते.
         कितीतरी क्षण जपून ठेवलेले नये आपल्याला मदत करीत असतात सुखात पाहणारे नयन दुःखात सर्व सीमारेषा तोडून वाहत राहते काही वेगळेच असतात दिवसाचे सर्व गणित मागे पडत जाते.  मेघ नयनात वाहू लागते. निळानभी जसे आपलेच मन असावे. सतत वाहत असते. मनातील भाव हृदयातील भाषा सहज इतरांना कळते नयनाला पूर आलेला असतो. मनातील भावनेचा वारा सतत वाहत असतो. मेंदी भरलेल्या हात जेव्हा कुणाच्या येण्याची वाट पाहत असते; पण काळोखच आला तर जीवनाचे फुल उमलतच नाही मनाला पूर येत  राहतो आणि नयनावाटे वाहात रहाते.
     अंधार दाटला की नयनातून अश्रू हरवले जातात. शब्दही बोलविले जात नाही. मन उदास होतात... मन चंदनासारखे जळत राहते. सुगंध देऊन! इंद्रधनुष्याचे रंग नयनातील जळलेल्या स्वप्नामध्ये राख होऊन जातत.  हदयाचे हुंकार नयनाला कळत नाही असे नव्हे? पण पण ते हुंकार नयन दाखवीत नाही. प्रीतीची हिरवेपण कोपलेले असते. लाभलेल्या प्रीतीला दीप नष्टच करीत नाही. नयन सतत सांगत असते... छाये प्रमाणे नियती सर्व नयनात सांगत असतात. तिथे फुला-फुलात क्षण मेघ करून टाकतात. निवांत पण कुठेच नसते. ना नयनात... ना अश्रू... ना नयनशब्दात ! दूर ठेवून आपण नयनाला वाहू देते त्याला काहीच अर्थ नसतो, वाटत हे उगीच येतात. सुखात आणि दुःखात! काहीच नसतानाही वाहत राहते. तेव्हा नयनाला विचारावे,“ का बाबा वाहतो उगाच !”
      मनातील वेदना नयनालाच कळत असते.
 मनपंखावर नव काही फुलत असते.निष्पाप जीव नयनाने सांगू जाते. कळत नसते ,नयनाला कळते कळत नसतं. हिरव्या मनाला हिरवेपण देत असते. मुक्तीचे गीतेही गात राहते. मनअंगणात फक्त फिगंरीसारखे फिरत राहते. नयन फुलात फुलून जाते. नयनात आभाळ साठले तरी त्याला अर्थ संदर्भ असतो.
   नयन... 
     नयन मनातील भाव 
     नयन हृदयातील शब्द 
     नयन सागर पाणी... 
     नयन प्रीतीचे फुल 
     नयन दुःखाची सीमारेषा 
     नयन काटेरी मुकुट 
     नयन शौर्याची गाथा... 
     नयन विरहाचे गाणे
     नयन शक्तीचे प्रेरणास्थान... 
     नयन निष्पाप मोती 
     नयन स्वप्नाची साक्षीदार
     नयन केशर गंध... 
     नयन पंखरुपी मनशब्द 
     नयन चिंब भिजलेले हदय 
     नयन जिवंतपणा... 
     नयन चांदणी रात्र 
     नयन प्राणप्रिय ज्योत... 
     नयन पावसाची पहिली सर 
       नयन... नयन आणि नयन फक्त नयन!!!
22.3.2008
              ( कॉफीराईट )
                       सविता तुकाराम लोटे 
(सर्व चित्र गुगल वरून घेण्यात आलेली आहे)
----------------------------------


         

अंधारीवाट

अंधारीवाट

         आपण सर्वच आयुष्यात 'अंधारीवाट', अनुभवत असतो. आयुष्याच्या टप्प्याटप्प्यावर ती पाय वाटेमध्ये येत असते. पहाटेच्या धुंकात आणि सांजेला  ती भेटत असते. डोळे मिटूनही ती आपल्याच सोबत असते. आपल्याबरोबर एक चेहरा उमटतो आणि सर्व जाणिवा जिवंत होतात मन जिवंत असते... मनातील भावना जिवंत असतात ...मानसिक गुंता जिवंत असते. डोळ्यातला आभाळ नकळत का होईना जिवंत असतात.बाहेरील आतील सर्वच गोष्टी जिवंत असतात. 
                  बरेचदा जीवनाच्या गर्दीमध्ये अंधारी वाट जिवंत असते. जा नयनात स्वप्न असतात त्याच्या डोळ्यात अंधारी वाट अनेक रूपात येतात .डोळ्यातील आभाळ अलगद तळहातावर आले की तीच वाट रस्ता सुद्धा दाखवित असते. मनाने कितीतरी गोष्टी सहज आत्मसात केलेल्या असतात. अंधारी वाट असली तरी मनाने ती आत्मसात केलेली असते.
         आयुष्याची पहिली संध्याकाळ काळ निर्जीव वस्तू बरोबर घालवि लि की आयुष्य किती सजीव आहे हे कळतं तेव्हा काही  काळा आपल्या प्रभावाने ते आपल्याला आपली करून टाकतात पण विचार बदलला की त्याही वाटेला जावे लागते कुठलीच अंधारी वाट गुढ कुणाचीच नसतात. कोमेजुन गेलेल्या वाटेची सुद्धा! खरंच अंधारीवाट असते का ? सहजासहजी अंधारीवाट आपले गणिते चुकवित असते का? अंधारेवाट म्हणजे मनातील अनैतिक विचार असावे... आणि येणाऱ्या उजळ आयुष्याची पाऊलवाट असेल.
               काळाची गरज असते. पाउलवाट शोधणे सुरमई जीवन निर्माण व्हावे यासाठी आवश्यक असते. पाऊलवाट जीवनाला रंगमय करीत असते .गंधमय करीत असते. सुरांची शब्दांची ओळख करीत असते फुल रोज फुलतात आणि नष्ट होतात हे कळू देते मग जीवनाचे अंधारी वाट आपल्याला काय देत असते ती देत असते.                 
                 जगण्यासाठी नवीन उमेद आपण आपल्या अस्तित्वाची राख होऊ न देता स्वाती नक्षत्राला पडलेल्या वसंत ऋतुचे स्वप्न...काल चक्रांची साखळी फिरविण्याचे ध्येय... शांत उभे राहून वाट पाहण्याचे सामर्थ्य. आपल्या पंखात ओलावा निर्माण करून बळ देत असतो... पण खरंच जीवनात अंधारीवाट असावी का? कळत नाही!
            पाऊल वाट आणि अंधारी वाट दोन्हीही आपल्या हातचे नसणारे क्षण....जे क्षण नियती आपल्याला देऊ करीत असते. ती काळानुरूप असते. ते क्षण आपण घेतात? की ते क्षणच आपला उपभोग घेतात की आपण आपल्याच वाटेवरील संध्याकाळी शोधत असतो कळत नाही.  
             अंधार वाटेच्या प्रत्येक पावलांनी आपल्याला जखमी केले ? अशावेळी मन केवळ पाऊलवाट नव्हे,  तर डोळ्यातील आभाळही आपले वाटते. तिला पण प्रेमळ असतो. ती आपल्याबरोबरच बहरण्यासाठी  आग्रह करीत असते. 
      अंधारीवाट आपण कमी केली की मन वसंत फुलतो. ते फुलले की कधीही केव्हाही फुलविता येते. मनाला फुले येते. मनाला फुलाची सवयच असतेच .पण प्रत्येक मनाला कुठे फूलता येत असते. मग फुलण्याची सवय नसणारी मने अस्वस्थ होत असतात. 
         मनापासून निघालेला विचार मनाला भरकटत नेत जातात. आणि निर्माण होतात पावलागणिक अंधारीवाट ती वेड लावून जाते न फुलण्याचे मन पाऊल वाट पाऊलवाट करीत असते. पण पावलागणिक एक अंधार शोधत असते. मग शोधून ही न मिळाल्यास अबोलपणा निर्माण करीत असते.
        आपल्या डोळ्यांच्या पाऊलवाटेवर आपलं मन शोधत असते. काहीच कोणाच्या हाती नसते हातात असते. अंधारी वाट आणि  पाऊलवाट जन्म घेतात त्यावेळी आशेची किरणे!
           हे न  संपणारे जीवन गाणे असते. संध्या रंगछटा आपल्या वाटतात. सकाळची रंगमय उजाळा आपले वाटतात. सार काही तेच आणि तसंच असतं... रोज! मग प्रत्येक संध्या रंग छटा पहिल्यांदा आल्या असे का वाटत असते ती पण त्याच वेगाने क्षणा त निर्माण होत असल्याने त्याच वेगाने आपले रूप  बदलावीत असते.   भुल पडणारी सांजरूप! 
            मनातील प्रश्नांना उलगडणारी श्याम रंगत पूर्णपणे समर्पणाचे ते क्षण कुठल्याही वाटेवर आठवते तरी ती अंधारी वाट असली की अधिक वाटत असते. तिने झपाटले की संपूर्ण जीवन सावळेरूप होत तर जाणार नाही ना असं सतत वाटत असते. त्याबरोबरच नवीन फुललेली मिळत असते. 
           सकाळचा सूर्य घेऊन नाजूक सौंदर्य ने फुललेली अंधारी वाट नाहीशी करणारी दिवसाला स्वप्नांच्या वेलीने वेढा घातलेला. कुणाचीतरी हळवीच चाहुल दाखवीत जाते. वाट दाखविली की अंधारी वाट नाहीशी होतात. कोमेजलेले मन फुलू लागते फुललेले मन जपून ठेवावे मन फुललेले फुलत राहते. ती नाहीशी होते अंधारी रात्री तेच मनाला शक्तिशाली बनवितात ...पण अशी शक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात येतच नाही असे नव्हे प्रत्येकाच्या जीवनात येत असते हेच खरे
       कारण अंधा-याला अंत असतो. समाप्ती असते. करपून गेलेले मन फुलून जाते. फुललेले मन हवेहवेसे वाटते. रंगावर प्रेम करावेसे वाटतात. स्वप्नाला ही अधिक पंख फुटतात. पंख आपलेसे वाटतात. मग कळतं आपल्यात शक्ती आहे त्यांना चिरून जाण्याची! पण ,एक नक्की; अंधारीवाट जाणले की पाऊलवाटेचा अर्थ कळतो.
            पणतीलाही अर्थ येतो. पतंगाचे समर्पण कळते. म्हणूनच युद्धानंतर जिंकण्याची काही वेगळीच मजा असते मन आनंदित आनंद होते मग त्यात चिंब भिजून गेले असावे.
     दि. 7.3.2008
               सविता तुकाराम लोटे 
(सर्व चित्रे गुगल वरून घेण्यात आलेले आहे)
      

शनिवार, २४ एप्रिल, २०२१

विश्वास




विश्वास 
गुंतला जातात त्या आठवणी 
धागे विणले  जातात स्मृतीत
बंधने अडकवली जातात स्वप्नात 
नवज्योति पांघरून येते 
मुक्तपणे विश्वासावर.... 
अन हुकूमशहा बनवते 
अविश्वासाने...
हळूच मुक्तपणे   
नात्यांच्या  गोतावळ्यात...
      विश्वास आयुष्याचा सुखद प्रवास विश्वास आयुष्याचा आधारस्तंभ विश्वास हळवी वाट  आपलेपणाची आणि जगण्याची वाट सुकर करण्‍याची.... विश्वासाला पाय असतात की नाही माहीत नाही पण विश्वासावर सर्व जग टिकलेले आहे.  विश्वास चुकीचा असेल तर कसा असेल? विश्वास म्हणजे जीवन... विश्वास म्हणजे आवाज...विश्वास म्हणजे आपले अस्तित्व...विश्वास म्हणजे धैर्य ...विश्वास म्हणजे आपलेपणा... विश्वास म्हणजे विश्व!
       पण खरंच हा विश्वास मान्य केला जातो का विश्वास ढासळण्यामागे तो व्यक्ती कारणीभूत नसतो तर त्याच्या आजूबाजूची माणसे; गोतावळा असतो. विश्वासात जिंकण्याची लढाई नसते. हळव्या क्षणाला विश्वासावर अवलंबून राहतो बेधुंदपणे!!  पण गोतावळा विश्वासाला कनभर थांबू शकते. विश्वास आसवांचा निरोप घेऊन पुसले जाते. विश्वास नको वाटत, चूक केली; क्षणात लक्षात येते. आता मात्र बदललेली परिस्थिती असते... अविश्वासाची उत्कटता इतकी असते की नकळत विचारात शून्यता येऊन जाते, मन पेटविले जाते. 

     विटांनी बांधावी घरे 
     विश्वासाने बांधावे मायेने 
     कल्पनेने बांधावे मनविकास 
     आणि अविश्वासाने बांधावे 
     आत्मविश्वास निरंतर!!!
      विश्वासाचा चेहरा ओळखावा 
      आयुष्याचे गाणे गातांना
           हो खरच विश्वासाचे चेहरे ओळखावे लागते मनात विश्वास फुले निर्माण करताना यादी याआधी आलेला अनुभव उलगडावा लागेल खात्री वाटत नाही. कुणावर विश्वास ठेवता येईल का? एकमेकांचे वैचारिक मतभेदांमुळे  वा भाषेमुळे मिटेल का? विश्वासातील आत्मविश्वास! पूर्णविराम येईल का? अविश्वासाने...गोतावळांच्या स्वार्थी प्रयत्नाने ! अविश्वासाचा वनवा पेटला ..मातीत चिखल झाला. डांबरी रस्ता अविश्वासाने गरम झाला मग आताकाय? झाले सर्व! तर काय? विश्वास अविश्वासाची लढाई सतत विचारात मेंदूत आणि श्वासात!
         तडजोड करायची ; अविश्वासा बरोबर? आयुष्य घृणेत घालवायचे अविश्वासाला आपल्यात ठेवून आत्मविश्वास नष्ट करायचा पावलोपावली खडकावर फक्त डोके द्यायचे आपला विश्वास आहे म्हणून....  नयनाला सतत पदर लावायचे आपल्या विश्वास आहे म्हणून ...पाठीवर सतरा ओझी घेऊन चालायचे आपला विश्वास आहे म्हणून. निखारे पेटतील कधीतरी या विश्वासावर;  त्या तेही आपल्याला हवे असलेले निखारे भेटतील का कि उदासपण, आतला गुंतलेले श्वास. वळणावळणावर आपल्याला तो विश्वास दाखवत राहील. 
          कालचा खेळ ...आजचा खेळ... उद्याचा खेळ... विश्वासाच्या उसन्या नात्यावर नावावर. अविश्वासाचा गोतावळा श्रावणी स्वरात! असे वाटून जाते ,विश्वास नसलेल्या व्यक्ती वर आपण मुक्त पणे शब्द सुमने कसे उधळू शकतो? अविश्वासाच्या गर्दीतही आपण ते सराईत ॲक्टर सारखे चेहऱ्यावर मेकअप कसा लावू शकतो. आसवे शब्द विचार शक्ती नात्यांच्या विश्वासाच्या दलाला बरोबर कसे संवाद शेअर करू शकतो. साऱ्या गाठी रंगहीन व्हावे गीताने बेसुर गुणगुणावे सागरी तुफान लाटेबरोबर. एकाच दमात... दाखवावी पायरी अविश्वासाची पण
हळूच,चुकून,रेंगाळत,एकांतात.
  चांदण्याच्या प्रकाशापेक्षा काजव्यांचा आधार घ्यावा वाटते.पहाटेच्या प्रकाशाचा अंदाज चुकला... मनातील सौंदर्याचा अंदाज चुकला... स्वतः केलेल्या संस्काराचा अंदाज चुकला ...भूतकाळातील आठवणी सोबत घेऊन, पहाट किरणांची चाहूल आपली वाटली; अलगद! स्पर्श... परत विश्वासाचा. 
       आयुष्याचे सारे गणित विश्वासावर प्रत्येक व्यक्ती कुणा ना कुणावर विश्वास ठेवत असतो, जिवापाड!! आणि त्याच भविष्य घडवीत असतो आणि त्यात हाच अविश्वासात परिवर्तित झाला तर वर्तमान खराब करून सोडतो. तुटलेल्या मनाला पापण्यांचा आधार तेवढा घ्यावा लागतो. घरटे उदास, पंख तुटलेले, शब्द नसलेले...आकाशात रिकामेपण मनात रिकामे ; सारे कसे कूर वणवा पेटलेला. दिशाहीन!
      विश्वास कस्तुरीमृगासारखा! नक्षत्र फुललेल्या पांढऱ्याशुभ्र रांगे सारख्या डोळ्यांनी वेचायचे आणि आतलं मनाने त्याला बिलगायचे. सह्याद्रीच्या कड्या जितके सत्य आहे तितकेच अविश्वासाची लढाई सुद्धा सत्य आहे भरलेल्या वादळांची गर्दी नेहमीच  हरविली जाते विश्वासाने.
     विश्वासाच्या मागे धावावे लागते अविश्वास मागे टाकत विश्वास हरवतो तर अविश्वास हरल्यानंतर जगण्याचे बळ देते अविश्वासाने काही पाने कोरी होतात पण विश्वासाने ते चांगल्या संस्काराचे दर्शन घडवीत असतात विझलेल्या क्षणांना ओले करण्याचे सामर्थ त्यात असते गळून पडलेल्या पानांचे भविष्य काय असे हे माहित आहे त्या पालापाचोळ्याचे एक अनामिक सुंदर असते त्यांची एक भाषा असते गळले काळाबरोबर पण जखमा त्यात होत नाही जखमेचे भय उरत नाही. सुखाच्या हव्या हव्यासाच्या रांगेमध्ये नसतात कारण त्यांना माहित आहे घेऊन ताजे येईल निसर्गचक्र. 
     कदाचित त्यांच्याही पेक्षा सुंदर रूपाने अलगद मिटतात. रान फुलवतात मिठीत घेतात हिरव्यागार शालूने गळलेल्या क्षणांना विसरून फक्त त्यांना देणे माहित असते वर्षानुवर्ष उरणे माहीतच नसते गळलेल्या पानांचे पालापाचोळा झाला तरी खताच्या रूपाच नवसंजीवनी देतात काळा मातेला विश्वासाने फसवत नाही ते गळलेले क्षण रूप आकाशाच्या निळाभोर छताखाली अगदी शेवटच्या क्षणापर्यंत विश्वास ठेवला जातो संकट असो वा नसो विश्वासू व्यक्तीवर अविश्वास दाखवू शकत नाही दुःख उरते दुःख सरते दुःख संपते दुःख नष्ट करते दुःख समाप्तीच्या वाटेवर जाते पण विश्वास घात हा कधी संपत नाही उरत नाही सरत नाही नष्ट होत नाही सरडासारखा रंग बदलत असतो चेहऱ्यावरची रेषही न बदलता किस्मत से कम या जादा नही मिलता या अविर्भावात शब्द साखळी शारीरिक हावभाव बहुदा त्यांना वाटत असेल मी तो नव्हेच पण हे विसरत जातात बहुधा अनेक गेले अनेक आले पण विश्वासघातेचा या वणव्यात कुणीही टिकू शकत नाही वादळ हरते अश्रू खोटे होतात वैभवाची श्रीमंती अधिक होत जाते शब्दांची वीण काळीज चिरत उनाड शब्द मनमोकळ्या पद्धतीने सर्वदूर जात असतात तसे मी तो नव्हे च्या भूमिकेत विश्वासघात सर्वदूर पसरवत असतो 
पणतीच्या उजेडातील साचलेल्या काजळा सारखा.
      विश्वास मोहक स्मित ...विश्वास उमलतो भविष्य...विश्वास शुभ्र चांदणे... विश्वास स्वप्न सु मनामध्ये चिंब भिजलेले क्षण विश्वास विझता दिवाचा प्रकाश विश्वास माय सावली सावली विश्वास मुक्त वाणी... विश्वास ओल्या मातीचा सुवास विश्वास रणरणत्या वाळवंटात पाणी विश्वास चिंब न्हाऊन गेलेले जीवन..... विश्वास सप्तरंग विश्वास भिजलेली रात्र आणि दिवस विश्वास बंधन विश्वास काळ्याभोर आकाशात ढगांची गर्दी शांत व उजेड लेली विश्वास पानावरील दवबिंदूची अस्तित्व विश्वास ऊन सावली खेळ.
         जन्मांतरीची गाठ असे
         अंधारातील पायवाटेवरती 
         सोबत;पत्त्यांचा खेळ 
          हातात मुक वाणी आणि 
             माणुसकीचे झरे
      विश्वास ज्याचा त्याचा! किंमत मात्र अविश्वास सहन करणाऱ्या व्यक्तीला करावा लागतो. अविश्वास म्हणजे दुःख अविश्वास म्हणजे न केलेल्या चुकीची शिक्षा आयुष्याच्या प्रत्येक पानावर काजळ ...जीवनाच्या प्रत्येक वाटेवर दगड काटे आणि अडचणी भूकंप पुस्तक आयुष्याचं अधांतरी पश्चातापाची सीडी ही अशीच वाटत राहते अविश्वास विश्वासघात दूर जात नाही.
   अमूल्य वेळ मात्र दूर जातो गमवलेले क्षण
स्वतःची असतात वेळ मात्र निघून गेलेली असते. जपून ठेवलेले नाते निरर्थक होऊन जाते ते कोणतेही असले तरी प्रत्येक क्षण आनंदी जगायचा असतो, पण ?परत प्रश्न!  आनंद आणि विश्वासघाती व्यक्तीबरोबर या जीवघेण्या प्रवासात जो व्यक्ती विश्वासघात सहन करतो त्यालाच माहित असते.विश्वासघाताचे गणित वजाबाकी गुणाकार भागाकार.
      सागराला माहीत नसते 
      त्याची विशालता आणि 
      उधानलेले रुप लाटांचे सौंदर्य 
      रंगमंचाला माहीत नसते  
      हदय जीवन असते कलाकारांचे 
      डोळ्यांच्या पापण्याला माहित नसते 
       पुसायला आलेल्या हातांचा 
        स्पर्श...
        झोपेचे सोंग घेऊन जगणाऱ्या 
        विचारांना माहित नसते 
        विश्वासाचे खरे सूत्र 
        अविश्वासाचे कटू सत्य
         आकारहीन शून्य 
          बेगडी...
           विश्वास अविश्वासाच्या या खेळामध्ये हरत कोण असेल तर तो निस्वार्थ व्यक्ती. मृत्यूलाही लाजवेल असे विश्वासघाती व्यक्ती असतात. विश्वास अलगत मनात रुजवून विश्वास घात करतात .भावनेचा हळव्या शब्दांचा स्वप्न वेलींचा चंचल मनाला स्वप्नाच्या महत्त्वाकांक्षेचा संधीसाधू लोक असतात. विश्वासघातातील त्यांचे रूप ओळखता आले पाहिजे आणि ते रूप स्वतः न होण्याच्या आटोकाट प्रयत्न मात्र करावा लागेल. स्व मनाचा आणि स्वसंस्काराचा गैरफायदा घेऊ घ्यायचे नाही . विश्वास कोणत्याही कुशीत असला तरी कारण विश्वास अविश्वासात फक्त बारीक रेखा असते  ती न दिसणारी! स्वावलंबी...स्वतःभोवती गुंफलेली.
         24.4.2021
           सविता तुकाराम लोटे 
      

शुक्रवार, २३ एप्रिल, २०२१

कटुता



कटुता 
    जे शब्द आपण आपल्यासाठी वापरत असतो ते शब्द इतरही वापरत असेल तर मनाला आनंद होतो. प्रत्येक व्यक्तीला ही भावना कुठेतरी व्हवी असते. हा शोध घेतल्याशिवाय मनुष्य जगू शकतो...सरळ सरळ झाले तर सर्व सत्य असते. भावना विरोधाभासाची असेल तर मनात इतरांबद्दल कटुता येत असते आणि पुढच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळत जातात.             ते जवळून ओळखतात त्यांनाही हे प्रश्न पडत असतात आयुष्याच्या कोणत्याही वेळी हे अशी कटुता येत असतात. आपल्याला हवे असते त्या वेळी ही कटुता आपल्या नशिबी नियतीने दाखविली तर जीवनच निरर्थक होत जात असते. आम्ही लांब पळतो स्वतःला वेगळे करतो... फक्त एकच विचार कटुता समाधान कुठेच नाही, ना मनात व न विचारात.
        साहजिकच आपण त्या गोष्टीचा विचार करीत असतो. एकमेकांवर आपण आग ओकत असतो मनातील विचाराने... ती व्यक्ती आले की विचारांची  समप्रमाणात वाटणी करणे अशक्य प्राय होत असते .मनात कुठे शांतता नसते. कोणत्याही प्रकाराने तिथे शांत निर्माण होत नाही. प्रत्येक क्षणाला अशांत मन घेऊन जगावे लागत असते .अशांत मनाला शांत करण्यासाठी समाधानाचे सूत्र हाती घ्यावे लागत असते.
      नको नको वाटणारे विचार आता नाहीशी होण्याच्या मार्गावर असते. माणूस मनातील विचार गर्दीमध्ये हरवत असतो. विचार गर्दी मांगे धावताना तर माणूस अधिकच मागे पडत जाते.
      मनातील विचार नक्कीच मनातील गाभ्यापर्यंत पोहोचत असते. त्यांच्या मनातील विचार अधिकच स्वच्छ होत जात असतात अनेक सुटलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळत जातात स्वतःच्या विचारांनी आपण सर्वच पाहत अस तो पण इतरांच्या नजरेतून पहातांना तेच भाव दिसले नाही तर कटूताला खतपाणी घालत असतो.                   विचारांची कटुता आणू नये म्हणून प्रयत्न चालूच असते निसर्गाने किती सौंदर्य आपल्याभोवती निर्माण करून दिलेली असताना माणसे इतरांच्या कटूताला खतपाणी घालत असतात. ते सौंदर्य प्रत्येकाला पाहता काय येत नाही ?पुन्हा त्याच गोष्टी ....आलेले विचार परत त्याच वळणावर घेऊन जाते. माळेतील जाई-जुईचा सुवास कुठेच नसतो, त्या विचारांमध्ये!
       स्वतःच्या नेमका विचार सापडला की मग जीवनाचे सूर सापडणे कठीण असते. माणूस एकटाच असते.  प्रत्येक, वेळी मनाने अन शरीराने. तितक्याच वेदना ही एकटाच असतात विश्वास ही एकटाच असतो. सत्य ही एकटेच असते ...स्वप्नही एकटेच असतात...विचारही एकटेच असते. 
          क्षणामागून क्षण गेले तरी क्षणाही एकटेच असते .मन उदास असले तरी ते एकटेच असते. कोणत्याही वेळी आपण आपल्याच एकटेपणाला सांभाळीत असतो. मायेची  चदर घेऊन! 
        हळव्या स्वप्नांची चाहूलही एकटीच असते अमृतमय शब्द ही एकटेच भेटत असतात त्याचे माझे अंतरही एकटेच असते त्याला प्रेमाचा गंध नसला तर! शीलही एकटाच असतो .... धुंद मनाला स्वैर करणारे सुद्धा एकटेच असते.
        सगळे एकटेच असत जाणेही एकटेच आणि येणेही एकटेच. मनातील प्रत्येक विचार कोरे करतानाही एकटेच असते आणि कटुता सहन करतानाही एकटाच मनुष्य असतो.
    तहानेने व्याकूळ झालेल्या जीवाला पाणी मिळाले नाही तर तो असाच जगत असतो. गतीमान मनाला सत्य सांगत राहाते.
     व्याकुळ मन; मनातल्या मनात! घाई नको. विचारांना स्वैर करण्याची. मनुष्याला नजर प्रतिभा निर्माण करण्याचे ती कुठलीही असो आपल्या जिवाला सरळ मार्गी करण्यासाठी सुद्धा प्रतिभा हवीच असते. इतरांकडे पाहतानाही प्रतिभा हवीच असते. त्या क्षणी पळत सुटावे मनाने त्याची प्रतिभा पाहून!
      शब्द अर्थहीन कधीच नसतात त्याला अर्थ असतोच तिथं मनाच्या सगळ्या विचारांना विराम मिळत असतो समजून घेतलं तर ब रे आणि कटुता घेऊन समजून घेतले तर त्याला अर्थच नसतो आपण आपले गाणे गात राहायचे प्रकाश असो वा तिमिर असो.... अर्थहीन शब्द असले तरी रस्ता कुठेतरी शोधायचा इतर असतोही वा नसतोही. हातातली शब्दशक्ती वापरायची गाणे गात राहयाचे. इतरांनी निर्माण केलेले आणि प्रयत्न करायचे आपण स्वतः ते निर्माण करण्याचे! 
    खरच माहित नाही कटुता आहेत या शब्दाला साद देत असेल.शब्दाची देवाण-घेवाण झालीच नाही तर आपण पळवाट शोधत असतो. सगळे अंधारमय होत जाते. निर्णयाला मागे सोडत जाते. निर्माण केलेली नाती शब्द कटुता मुळे नाहीसे होत जातात. 
        सगळं हातात असताना सुटत जात असतात आपल्याला पेलणारे शब्दही आपली साद सोडून देत असतात अंधारलेल्या शब्दांना काहीच दिसत नाहीत आखून बांधलेल्या शब्दाला अमर्याद आकार येऊन हरवून जातात मनात भाव निर्माण करीत नाही बोलाय ची गरज उरलेली नसते. प्रत्येक क्षणी एक परीक्षा देत असतात.... प्रत्येक क्षणी जीवन- मरणाच्या यातने मधून जावे लागते.
    सामान्य माणूस म्हणूनच; इतरांना आपली कटुता दाखवित असावे... मनाला समाधान मिळावे म्हणून बाहेरच्या जगा मध्ये सौंदर्यशी त्यांचा काही संबंध नसतो. सरळ प्रश्नांला नेहमी निराळी शब्दरचना व्हवी असते आजवर ज्यांनी फक्त इतरांना कमी लेखण्याचे काम केले त्यांना शब्दरचना कशाला आणि शब्द प्रतिभा कशाला.        दिवस जात असतात ते कळत नाही. कोणत्या पद्धतीने संपले ते विसरता येत नाही. विसरण्यासाठी ही भूतकाळाला सोबत घेऊन जावे लागते. आपण प्रेम करीत असतो त्याच गोष्टीवर कंटाळलेल्या अवस्थेपर्यंत... इतरांच्या लक्षात येतपर्यंत गुंडाळून घेत असते.स्वतःला इतरांबद्दल कटुतामुळे जिव्हाळाच निर्माण होत नाही. एका गरजेसाठी मनशांतीसाठी कटुता नको असते. 
       माणसाच्या प्रत्येक विचारामागे वागण्यामागे काहीतरी कारणे असतात त्याचा शोध न घेता नुसती त्याला नावे ठेवली जातात. गैरसमज पसरविले जातात जमेल तिथे विषय काढले जातात. आम्ही कसे जमविले तुम्हाला ना का करता येत नाही अशी वाक्य बोलविले जातात. इतरांनी कसे जगावे हे सतत सांगितले जातात.
        ते विसरत असतात त्यांच्यामध्ये आणि समोरच्या व्यक्ती मध्ये किती अंतर असते!!!!!
    आम्ही जगतो  चांगुलपणासाठी तुम्ही जगता इतरांबद्दल कटुता निर्माण करण्यासाठी....   स्वखुशीने. इतरांसाठी उभी केलेली ही गोष्ट खऱ्या अर्थाने त्यांना जगण्यासाठी असते तेव्हा मागे वळून पाहताच त्यात भर घालीत असतात. गरज नसताना शब्दाची माळ  विणली जातात. शब्दांपेक्षा कृती अधिक गडद असते. त्यांचे हिशोब स्वतः पुरते असतात. संपलेला विषयाला खतपाणी घालण्यासाठी असतात.
        आयुष्याचे गणितीय उत्तरे मिळून नसतात. सगळीच गणिते चुकतात असेही नव्हे... आयुष्याची उत्तरे आपण कटुता का शोधत असतो?  हा प्रश्न अवाक्य करुन सोडतो प्रश्नांची उत्तरे मी स्वतःलाच विचारीत जाते. प्रश्न उत्तरे सांभाळायचं ठरवलं तर मन कुठे ही स्थिर होत नाही एक वेळेला एकच साथ येतात. विचारांची शिदोरी आपली असते. आयुष्यभर नियती बरोबर राहिले तर काही देत नाही. जसे सावलीमुळे त्यांच्यासोबत इतर वृक्षवेल होत नाही. सुख दुःख तसेच असावे. 
     कटुता आयुष्य संपवीत नाही आयुष्याला नवीन अर्थ देत असतो.
            दि  5.3.2008
                सविता तुकाराम लोटे 
(चित्र गुगल वरून घेण्यात आले आहे
__---------------__--------------
    

कॉपीराईट

 mi ani mi कॉपीराईट Savita Tukaram lote

गुरुवार, २२ एप्रिल, २०२१

नवं-प्रफुल्लीत

नवं प्रफुल्लित 

    मनातली गाणं आणि बाहेरील गाणं (म्हणजे तोंडाची बडबड त्याला सूर नाही की ताल नाही तरी म्हणायचे गाण) तसे बाहेरील गाणं यात किती फरक दिसतो. मनातील गाणं मनाला आनंद देतो मनाला वेडेपिसे करून टाकतो. आनंदाने मन प्रफुल्लीत होत जाते. कधीही न विचार केलेले सगळे कसे करून टाकते.
          नवं उमलत जाते. जुने पुसत जाते नव फुलताना कितीतरी वेळ उमलत राहतो. गालावरील हसू पाणावलेले हसरे नयन, लाजेने लाल झालेले गाल! मखमली पडद्याने नवं फुलविण्यासाठी तयार झालेली... मनातील गर्दीतल्या कोप-यान कोप-या फुलविण्यासाठी तयार झालेला. तरी पण त्यावर सतत रागाने आपले सामर्थ्य निर्माण करून ठेवलेल्या 
त्याला सुद्धा लाजेचे रंग येतो. नवं प्रफुल्लित फुलतांना!!
        नवं प्रफुल्लीत फुलताना मनातील भाव कुठेच जात नाही. शब्दांची सोनेरी सर्व कुंपणे बाजूला सारून हळुवारपणे फुलू देतो. मनाला आणि नकळत गाणं ओठाबाहेर निघून जाते, कसेही... क्षणोनीक्षण आरशात पाहतांना आपल्याच आपण नवीन वाटत असतो पापण्याआड डोळे दडलेल्या असतात. 
        आरशात पाहताना  हळुवारपणे आपण आपले विचार नाहीसे करीत असतो क्षणात प्रफुल्लतेचे स्वप्न फुलवीत असतो मनाला चिवचिवाट आवडत असते. अंगणातील मस्ती करणारे मुलांचे शब्द आपले असते. मनातील मातीत मिसळून हिरवळीचा लांबचलांब वाटा मनात तयार होतात. ती थंडगार न वाटता रोमँटिक वाटत असतं. मनातील भावगंध चिंब भिजलेली असते.
        खरंच आपण फुलवीत नसताना तेव्हाही फुलत असतं टेकडीवरील मंदिर सुद्धा कधी आपले वाटत. सगळं नवं वाटत असते रोज येणारे नव वाटत असते ध्यानीमनी नसताना भेटणारी व्यक्ती नवीन वाटत असते नवं आणि नवं फुलताना असलेली वस्तू आणि नसलेली वस्तू यात फरक नसतो. हवेतील गारवा ते करू देत नाही. 
       मावळतीचा सूर्य ही मनाला आनंदीआनंद करून देतो. मग काचेवरील पाण्याचे थेंब खाली येताना आपल्या आपले वाटते,' आठवणी थेंब   वाटतात', ते'..... नवं फुलत असतांना आपल्यालाच पायातील पैंजण काढून वाजवीत राहणे.  तसे सतत करत राहणे.
       आवाज मनाला प्रफुल्लित करीत असते. पायातील पैंजण बेडी म्हणणारे मन आता मनाला हवे हवे असते. क्षण सामोर जातांना ते क्षण मात्र ओंजळीत साठविलेले असतात. सांजवेळेची कातरवेळ हवी हवी असते. क्षण फुल होऊन नाचू लागतात😀 नवंप्रफुल्लित  फुलतांना.
      क्षण मोकळ्या आकाशाखाली फिरत राहते आपणच आपल्याला विसरत असतो. थांबलेल्या क्षणाला... कधीही सोडून घ्यावे वाटतच नाही पण का द्यावे सोडून? नयनातील पाऊस थेंब होऊन वाहत राहते. नयनावाटे  निघून जाताना पावसाचे थेंब ओंजळीत तोलून त्यांचे मोती ते अलगद ओंजळीत घेऊन नवं फुलत राहत. ते का निघाले कळत नाही. दाटलेली नयनांना सांगावे, हे आपलेच आहे तरी साठवून ठेव. फुलणार आहे 'नेहमी',वेळ लागत असला तरी!
      नवं फुलत असते. नव्हो नवं फूलवावे लागते. मनात प्रत्येक क्षण उमलत असतात मनावरील रांगोळीमध्ये रंगबिरंगी रंग भरले जाणार आहे. भिजलेल्या नयन आपले असले तरी मोती आपले नसते. नकळत आलेले पाणी सुद्धा आपले नसते. नवं सर्व फुलत असतांना आपले असते. 
          मुद्दाम राखून ठेवलेले क्षण आपले असतात. उमलते क्षण आपले असतो...क्षणात माया दाटून आलेली आपले असतात. नयनातील ढगाळ आभार आपले असतात. डोळ्याभोवती आलेले आपले असतात कुठल्याशा एका क्षणाला फुलले म्हणजे सर्व जुने होतात नव्हे!!  कुणाचीही नजर चुकवून  फुलविता येत नाही. नवं फुलत असते. रंग गंध नाद स्पर्शसोबत!
      नवं फुलवित -फुलवीत मनाला फुलवावे लागत नाही. सहज फुलवीत राहावे .पुन्हा शब्दांचे जाळे विणावे. उगवत असेल तर उगवू द्यावे. सर्व दिशा फुलवीत असते. अश्रूंची सर नवं प्रफुल्लित फुलवीत असते फुलवीत रहावे...नवं प्रफुल्लीत फुलतांना!!!!!😀😀😀😀
                     सविता तुकाराम लोटे 
            16.2.2008
(सर्व चित्र गुगल वरून घेण्यात आलेल्या आहे)
 

विरह

           भर वेगाने जीवनाची गाडी चालू राहते... ती गाडी आपल्यामध्ये एक चौकट  घालून  घेतात त्याच चौकटीमध्ये आयुष्याच्या शेवटचा टप्पा गाठावा लागत असतो . 
      अगदी श्वास  घेता आला नाही तरी अगदी प्रदीर्घ चौकट आपल्या भोवती गुंफली जातात. दिशा सोनेरी असतात की काटेरी कळत नाही. चौकट आपल्यालाच मागे ओढीत असते की पायांमधील शक्ती नाहीशी होतात . पुन्हा खेळ वादळ वारा वार्‍याशी. पुन्हा वणवा शब्दांशी ... पुन्हा नवीन खेळ मांडण्यासाठी धडपड आता जायचे कुठे?  सांजवारा गार गार येऊन  तेजेमय हळुवार फुंकर घालून जाते.

   अशा दिवसात कोणाला यायचे असेल तर ती येत नाही!  एक तर आपणच आपणच आपल्या मध्ये गुंतून जात असतो स्मृतीचे अंकुर आपल्यामध्ये गारवा निर्माण होऊ देत नाही ...'नवीन', विरह! 
            दुपार नको असते...  ते संध्याकाळ नको असते... ती नको असते पण का मनातील विरह नको नको म्हणते पर्यंत खुदकन हसवले जाते. जीवनात वादळी वार्‍यानांबरोबर वातावरणच का येत असतात. हृदयाने स्वप्न पाहिले...ते तुटल्यानंतर मन थरथरले. किती समजावे लागत आहे.  विचार मन बंदिस्त करीत आहे. विचारांमध्ये गुंतवून जाता आहे...तू निघून गेला...विचारामध्ये एकच मी काय साध्य केले... आणि मी काय वजा केले ... वजा तर जीवनाचे सुखद क्षण पण साध्य काय केले? गळून पडलेले स्वप्न ...मिटलेले डोळे आणि पाषाणा सारखे हदय!
     जीवनात वेळेने अशी परिस्थिती आणून ठेवली की त्यातून बाहेरही जाता येत नाही.त्या सोबत राहता ही येत नाही. जीवनात अंधारालाही ओळखता येत नाही असे क्षण विरहाने दिले. 
तहानलेल्या जीवाला ना पाणी आणि ना ओलावा ...अंधाराची सांजवेळी मनाला छळत असते.हेच विचारही नकोसे वाटत असतात समोर जनसागरा किनारी असला तरी वाळवंट मला साचलेले असते. सांजवारा ही नको वाटतं मावळतीचे क्षण वार्‍यासवे पळविले जात नाही मनाची दारे बंद केली जातात.विरहला... नाही? त्या सुखद आठवणी सोडून जातात! अवती भोवती गर्दी असतानाही मन एकटे असते.  सुकलेल्या कळ्या फुलांचे निश्वास टाकीत असते एकटे शांत!
अशातच विरहाचे चटके जास्त जाणवतात.
            विरह मनाला उजेड दाखवितच नाही तो मनाला त्या त्या गोष्टी घेऊन जात असते. एकही क्षण  तेथे गेल्याशिवाय दिवस जातच नाही. पहिली भेट मनाला छळत राहते.मनाचे सारे संदर्भ वेगळे होत  जातात . पण मनाला कुठे कळते सारेच संदर्भ! मागे पडत जाणारे संदर्भ. मागे पडत जाणारे संदर्भ. प्रत्येक क्षण समोर येतानी मन उरात भरून येतो... 
      मन गुंतत जातात .कुठेतरी नाही हळव्या क्षणांचे हिशोब मांडले जातात.तेव्हा असंख्य आठवणी ओळखीच्या वाटताना जुनेच चेहरे आपले वाटत नाही.
            वेळ कधीच कुणासाठी थांबत नसतो... विरह मनाला सोसावा लागतो. वेळ निघून गेल्यावर तो थांबेल असे समजायचे. विचार... फक्त काही वेळासाठी असतो. प्रत्येक क्षण प्रेम शोधत असते.
       जीवनात निर्माण करण्यासाठी पण कृष्णालाही राधेचा विरह सहन करावा लागला.
मीरा हे कृष्णाच्या प्रेमासाठी झुरत राहिली... 
       एक  पत्नीव्रत पती रामाला ही सीता चा विरह सहन करावाच लागला. सीतेच्या जीवनात सुख आले आणि नियतीने विरह लिहून दिला.               विरहात सारेच गळून जात नाही त्यामागे सर्वच सुखही असावे. हळुवार आपल्यामधील नयनाचे शब्द जपून ठेवले जातात. मनातील विरह मनात ठेवून आयुष्य घालविले. प्रेम काय असते...विरह काय असते... त्यांच्याकडे पाहिल्यावर कळत.
         मनातील थंडी नाहीशी होते. मनातील फुल नाहीसे होते. मनातील फुल नाहीसे होते. मनातील शब्द होतात .मनातील रिमझिम नाहीशी होते.वसंत वसंत राहत नाही. रेती वरील पाऊल खुणा, खुणा  राहत नाही. बागेतील आठवणी बागेत राहत नाही. 
          पायातील पैंजण रुणुझुणू  वाजत नाही. पावसाचे पाणी मनाला छळत असते .आपलेच घर आपले राहत नाही. फुलातील सुगंध सुगंधहीन होत जातात. भिंतीवर फक्त सुखद आठवणीचे संदर्भ उरलेले असतात. पण निस्तब्ध. उजेडाला अंधार नाहीसा करतो. ओलाव्याशी आपले नाते जुळविण्यासाठी अति ओलावा निर्माण करावा लागते. फक्त विरहाचे रंग नष्ट करण्यासाठी .
          क्षणात भास होतात तुझे रंगमय सूर आले पण ते क्षणिक भास असतात....त्या स्मृतीचा प्रवास मनात दाटून येतात. मन विरहाच्या वेदनेने असह्य कळा येतात. कळा शक्ती नाहीशी करतात खुणा पुसलेल्या असलेल्या असतात तू नाहीसे झालेला. 
         विरह मनाला रिकामा होऊ देत नाही. आसवांच्या सागरी फक्त नाते जुळविले जातात. विरहाचा किनारा गाठेपर्यंत हातातून वेळ निघून गेलेला असतो प्रीतीचे रंग नाहीसे झालेले असतात नात्यांची गुंफण हातात नसते. धुंद झालेली हवा झालेली हवा गारवा देतच नाही. हळवेपण मनातील अंतरंगातले दुवे नाहीसे होऊच देत नाही.
       एका फुलावर स्थिर झालेले मन आता एकरूप होऊच देत नाही. मनातील वाळवंटाचे जग अधिक वाळवंटी करून जातात . कितीतरी हिवाळे आले तरी प्रेमाची अनुभूती मिळणार नाही. अंकुरलेल्या मातीला माझा स्पर्श होणार नाही आणि झालास तर प्रेम फुलणार नाही. त्यात फक्त विरह निर्माण होईल. ओंजळीत आसवांचे घर आणि मनात सुखद आठवणीचे घर...दोघेही  आपली सीमारेषा सांभाळून जगत आहे जगत आहे ! त्यांचे लाड पुरवीत आहे .
          फाटलेल्या मनाला आसवांचे रंग चढवत आहे,भरवेगाने!
                     दि. 27.3.2008
            सविता तुकाराम लोटे 
(सर्व चित्रे हे गुगल वरून घेण्यात आलेली आहे)

मंगळवार, २० एप्रिल, २०२१

प्रश्न

प्रश्न
एक एक प्रश्नचिन्ह 
उभे आवासून
वास्तवतेत  
कागदाची घडी करावी 
तशी चौपट होत जाते
प्रश्नचिन्हची साखळी 
आवासून
अपेक्षांचे डोंगर 
वसंताचा बहर 
आसवांची मनगळती
आठवफुलांची तक्रार 
गुरफटून टाकतात
मानगुटीला
प्रश्न चिन्हांची शांत जळत
असलेले सहवेदना 
आणि सूर्योदयाच्या 
किरणाचा
प्रश्नासह...
आवासून!! 
   सविता तुकाराम लोटे 


अचानक आज

अचानक आज 

अचानक आज 
आभाळ भरून आले
मातीला सुगंध आला 
कोमेजलेली झाडे वेली 
करू लागली नृत्य 
वाऱ्याच्या हळुवार 
स्पर्श सोबत 
     अचानक आज!!
            सविता तुकाराम लोटे 

आज अवेळी

       आज अवेळी 
आज अवेळी का असे झाले 
आकाशातील सूर्यकिरणे ही 
मनसोक्त घरात येऊन गेलीत नाही
चुकले का रे माझे
की, 
सूर्यकिरणे ही दिले नाही 
आज अवेळी का असे झाले 
दाटून आलेल्या सांजवेळी 
सोनेरी ऊन दिली नाहीत 
की हसरी सूर्यकिरणे दिली नाहीत 
आज अवेळी का असे झाले 
गतकाळातील जीवघेणा आठवणी  
हदयात माझ्या  दाटून येती 
असे काय झाले आज अवेळी
       सविता तुकाराम लोटे 
             

मी कोण

मी कोण 

दिवेलागण झाली
आणि कुणी नसताना घरात 
उफाळून येतात आठवणी 
मन सैरभैर होते 
विझलेल्या स्वप्नाची 
राखरांगोळी पाहताना 
अजून टवटवीत आहेत 
माझ्या मनातील
स्वप्न फुलांची राख 
मूक पापणीत आसवांचा संगे 
विझलेल्या स्वप्नात काय 
माझी चुक की नियतीची 
न निळे मज उत्तर 
विझलेल्या स्वप्नाच्या राखरांगोळी 
तुफानी लाटांशी लढण्याची 
हिम्मत असली तरी 
ते एक स्वप्नच 
अजूनही बंदिस्त आहे 
प्रगत समाजाची स्त्री 
स्वप्नांची राखरांगोळी डोळ्यांनी 
बघत 
अश्रू संगे 
           सविता तुकाराम लोटे 

उंबरठा ओलांडताना

उंबरठा ओलांडतांना 

उंबरठा ओलांडताना
बाईमाणसाने विसरून जावे 
बालपणातील भातुकलीचा खेळ 
राजा राणीचे स्वप्न फुले 
जीवनातील सुखद आठवणी 
उंबरठा ओलांडताना... 
धुंद भावना क्षणात 
वाऱ्यासंगे देऊन घ्यावा रेशीमबंध
मेघ दाटूनी आल्यावर 
गंधलहरी पसराव्यात
तसे उंबरठा ओलांडताना 
बाई माणसाने विसरून जावे 
मृगजळाच्या लहरी, 
जीवनातील!!
         सविता तुकाराम लोटे 


भीम माझा कसा होता

भीम माझा कसा होता 

काय सांगू तुम्हाला 
भीम माझा कसा होता 
अज्ञानी दगडाला ज्ञानगंगेच्या प्रवाहामध्ये 
नेणारा महाझरा होता
भीम माझा कसा होता 
चंद्राची शीतलता, सूर्याची प्रखरता 
समानतेचा वारा होता 
भीम माझा कसा होता
भुकेलेला अन्न देणारा महाशक्तिमान होता 
भीम माझा कसा होता 
रूढी प्रथा परंपरेला मूठमाती देणारा 
नवविश्व निर्माता होता 
भीम माझा कसा होता
भारताला संविधान देणारा 
महाज्ञानसाठा होता 
भीम माझा कसा होता 
मनुवादी विचारवंतांना जागेपणी 
पडलेले स्वप्न होता 
भीम माझा  बुद्ध कबीर फुले 
यांच्या विचारांना पुर्वलोकन करणारा 
महान विचारवंत होता
भिम माझा प्रज्ञेचे शिखर होता
भीम माझा ज्ञानाचा महासागर होता 
भीम माझा दीनदलित समाजाला 
बुद्ध धम्माकडे नेणारा सूर्य होता 
भीम माझा असा होता
     सविता तुकाराम लोटे 

दीक्षाभूमी

        दीक्षाभूमी 

दीक्षाभूमी 
तुझ्या पहिल्याच भेटीत
हसली आणि 
टिपूर चांदणे 
झाले उन्हाचे
माझ्या शब्दांनी
सजवली 
काव्यरूपात ...

तुझ्या हसतमुख 
चेहऱ्याने प्राजक्ताचा
पसरविला गंध 
सृष्टीत 

तुझ्या हसण्याने 
अनामिक नाते 
निर्माण केले 
हृदयी ...

अखंड वाहत 
होता धारा 
तू हात दिलास 
आणि 
धाराचे फुल झाले
नयनी

मी ही हसले 
तू ही हसली
आम्हासंगे
कोवळ्या टिपूर चांदण्यातमध्ये!!
     सविता तुकाराम लोटे 

बळी

        बळी 
अजूनही तळहातावरील 
मेंदीच्या सुगंध दरवळत 
हळदीचा रंगही पिवळाच
हिरवा चुडा पायातील जोडवी
सांगत आहेत तीची कहाणी
किती सोसले असेल 
त्या नाजुक देहाने
गोरेपान शरीर झाले आहे 
अंधारातील गुढ रहस्य
काय झाले असेल 
हत्या की आत्महत्या हे ही 
कळत नाही तिच्याकडे पाहून 
चेहऱ्यावरील हसरी मुद्रा 
काहीच सांगत नाही 
तरीही पण सांगून जाती
मेहंदी भरल्या हातावरील खुणा 
हळदी भरल्या अंगाची व्यथा 
फुडलेल्या चुडयांची कहानी 
आणि काळयाक्षार जोडव्यांनी
न बोलता सांगून दिले 
पुन्हा एक बळी स्त्रीचा 
न संपणाऱ्या प्रथेसाठी!!!!
            सविता तुकाराम लोटे 

सोमवार, १९ एप्रिल, २०२१

पुन्हा भेटावेस तू

पुन्हा भेटावेस तू 

पुन्हा भेटावेस तू
अशी इच्छा हृदयी
येऊन गेली
या बंदिस्त मनाच्या स्मृतीआठवणीत

पुन्हा भेटावेस तू 
तेच कळया जुळवून माळरान गुंफीत 
केसात माळावे तुझ्या हाताने 
मनाच्या आनंदात फुलावे 
पुन्हा मिळून 

पुन्हा भेटावेस तू 
नयनी भाषेच्या सोबत 
शब्दविना सांगावे तू 
तुझे शब्द 

पुन्हा भेटावेस तू 
मला माझे अस्तित्व सांगण्यासाठी 
येणाऱ्या वादळ वाटेवरून सावरण्यासाठी भेटावेस तू!
           सविता तुकाराम लोटे 

सुकलेले शब्द

सुकलेले शब्द 

ओंजळभरच सूकलेले शब्द
गोळा करता करता 
सुकलेलेच शब्द 
पूजा करीत राहिले 
सुकलेल्या शब्दगंधाची
नकळत 
त्यांच्याही
गंध दरवळू लागला 
दहादिशा सुगंधित 
करून माळ गुंफीत पुन्हा 
ओंजळभर सुकलेले शब्दांची
                  सविता तुकाराम लोटे 

भीती


भीती 
तहानेने व्याकूळ
आत्महत्या करीत आहेत 
शेतकरी समाज
दया न येती
सरकार अभिमानाने सांगती
कृषिप्रधान देश आमुचा 
परी भीती मनात 
काय? 
आम्ही कृषिप्रधान 
दोन वेळच्या जेवणासाठी 
करावी लागते रात्र-दिवस 
कष्ट डोंगराएवढे दुःख 
मनात ठेवून जाता आहे 
प्राणज्योत संपवून 
भीती वाटते मनी
असेच चालले तर 
आम्ही कसे सांगू
कृषिप्रधान देशवासी ! 
आम्ही 
        सविता तुकाराम लोटे 

वणवा पेटला

        वणवा पेटला 
वणवा पेटला... 
उगवता सूर्यासारखा 
वणवा पेटला ...
हिरवा गर्द रानफुलांच्या अंताचा 
वणवा पेटला...
अस्तित्वाच्या पालापाचोळ्याचा 
वणवा पेटला...
निसर्गरम्य अद्भुत 
श्रीमंतीचा!
       सविता तुकाराम लोटे 

निशब्द

     निशब्द  

वाईटपणाचा सीमा 
गाठल्या 
गहिवरून 
असंख्य संवेदना सोसण्याची 
बेसावध प्रयत्न आपोआपच 
वलय 
फरक करून 
अनपेक्षित 
मनमोकळा शब्द 
भेटण्यासाठी ...
मिळवायचे होते 
वास्तव सुंदर 
सदाफुलीसारखे 
टवटवीत,
पण मौनच!
अस्वस्थ कल्लोळ सावलीचा
टवटवीत फुललेला 
अबोल ...
शब्दांच्या घागरी
मूक.... 
घमेंडखोर...
कळायचाही आधी
अंत... 
तळ्याकाठावरिल भ्रमासारखे 
गहिवरून 
निशब्द!!!
          सविता तुकाराम लोटे 
----------------------------------

प्रश्न

प्रश्न 
एक एक प्रश्नचिन्ह 
उभे राहतात 
आवासून...

वास्तवतेत  
कागदाची घडी करावी 
तशी चौपट होत जात
प्रश्न चिन्हांची साखळी 
आवासून...

अपेक्षांचे डोंगर 
वसंताचा बहर 
आसवांची मनगळती
आठवफुलांची तक्रार  
गुरफटून टाकतात
आवासून...

मानगुटीला 
प्रश्न चिन्हांची शांत जळत 
असलेली सहवेदना 
सूर्यास्त सूर्योदयाच्या 
पहिल्या किरणांच्या
उत्तर साखळीने

       सविता तुकाराम लोटे 



हळवा शब्द

      


  हळवा शब्द   
          रुणझुण आवाज न करता आपले बालपण निघून जावे आणि कधी लहानपणाला निरोप घेतो हे सुद्धा कळत नाही. हळव्या नयनांमध्ये मोठी स्वप्न जागा घेतात.
      सोबत नवीन विश्वामध्ये मध्ये पाय ठेवण्याचा पंख्याला नवीन विश्वामध्ये उडविण्यासाठी बळ निर्माण करणाऱ्या आजच्या नवीन विश्वासाचे नवीन पंख घेतात. पाखरांना आकाश बेधुंद उडण्यासाठी नवीन पंखाला शक्ती देतात.
      नवीन सितीज निर्माण करून देतात. आपले पालक वाऱ्याच्या झुळकीने सारखा शब्दाला वादळ आपले पंख तुटू न देण्यासाठी तळ हाता सारखे जगतात मायेने पालक.
         जगु द्यावे त्यांना नवीन विश्वास 
         पाठीशी स्तंभ म्हणून आणि मुक्तपणे

                       सविता तुकाराम लोटे 
----------------------------------

प्रवास

    
प्रवास  
         मनातील विचारांना घेऊन जातो पण आपला प्रवास कुठे घेऊन जातो तर आपल्या मनातील प्रवास आपल्या माणसाजवळ घेऊन जातो ते शब्दात सांगू शकत नाही आजूबाजूला असलेल्या प्रवासांचे मन सुद्धा तसेच असते.                 कारण ते सुद्धा आपल्या मनात आपला प्रवास करीत असतं येणाऱ्या शब्दांना येणाऱ्या अनुभवाला मोकळी वाट देऊन जातात आणि ते ऐकताना आपला प्रवास पूर्ण झाला हे सुद्धा कळत नाही मनाला त्यांचा एक अनुभव नवीन अनुभव साठी तयार करीत.
          आपला प्रवास अंड करीत अविरत चाललेला त्यांचा प्रवास आपला प्रवास मनातला धावण्याचे सामर्थ्य आनंद देत चालू असतो हसत हसत आणि हसतच
    शब्दांच्या चिंब प्रवासात 
    भिजून मनातील कोपरा  
    करीत नवीन पाऊल वाट जुळवत
                 सविता तुकाराम लोटे 
-------------------@-----------

रविवार, १८ एप्रिल, २०२१

नकळत आलेले क्षण

        नकळत आलेले क्षण
 संध्याकाळ दाटून आले असेच  
वाटतांनाच, सोनेरी क्षणानी आलेच 
नव्या वाटा ,घेऊन वळणावरती 
फुललेल्या नजरेने आणि शब्दावरती 

       मृगजळाचा त्याच्या मागे धावत आहे आपले मन असे वाटत असताना त्या एका क्षणांनी किती मागे घेऊन गेले आपल्या मनाला. स्वप्नामध्ये रंग भरत क्षणापर्यंत वाट पाहत असताना क्षणात मागे जावे लागले का?कळत नाही. पण मागे गेले त्या क्षणाला ते क्षण सहज आपल्या जवळ आले असे वाटत नसले तरी क्षणासाठी मन तयार होते असेही  वाटत नाही. काही दिवसांमध्ये ते फक्त मृगजळ वाटत होते पण? ती पहाट नवीन क्षण घेऊन येईल. फुललेला शब्द मधुर रुपेरी क्षणांनी गुलाबाचे तेज घेऊन!
     खरच तो क्षण काय होत्या. त्या क्षणाला कोणते नाव घ्यायचे आणि द्यावे? चित्रांनी भरलेले आट चित्रकृती सारखे ते सर्व होते. चित्रात काही रंग भरता येतात आणि कधीही त्याला नवीन रूप देता येते तसेच काही तो क्षण होता. एखाद्या गोष्टीसाठी किती संघर्ष करावा लागतो... पण हे संघर्ष कशासाठी आहे हे सुद्धा माहित नसताना.... आणि तो संघर्ष कुणा बरोबर आहे हेसुद्धा माहीत नसताना. फक्त संघर्ष असतो आणि त्यासाठी सर्व शब्द एकत्र करावे लागते पण का? कळत नाही.
        प्रत्येक वेळी प्रश्न ....आणि प्रश्न? इतरांच्या शब्दांना महत्व देता -देता आपण किती मागे जात असतो. आपले स्वप्न...आपली महत्वकांक्षा ...आपले अस्तित्व ....आपले शब्द...आपली प्रसन्न....आपले निरागस प्रेमळ भावना...आपला हसत-खेळत स्वभाव... साधे-सरळ वाटत असणारे चेहरे किती गोष्टी करून जातात
    आलेले क्षण नकळत , आलेल्या पाकळ एकत्र येत होत्या. सोनेरी शब्दांनी आणि मोहक क्षणांनी. ते काय होते त्यावेळी सुद्धा कळले नाही आणि आता सुद्धाकळत नाही. पण तो क्षण माझ्यातील स्वप्नांना एक पाऊल समोर घेऊन जाणारा नक्की होता.
क्षणक्षणानी फुललेला गुलाब
क्षणात आपले रूप दाखवीत गुलाब 
काट्यांची साद देत फुलतो 
सोनेरी निळ्याभोर जलाशयात 
       वादळ येथील चमचमणा-या विजा येतील . वारंवार तरंगत राहील नयनामध्ये स्वप्नाचा ओघ पाणीदार नयनात!  वारंवार येतील. आसवांचे  काटे गढूळ पाण्यातील साचलेला संघर्षाचे वावर येतील. विक्राळ रूप घेऊन इतरांच्या मनातील भावना व मनाला घायाळ करणारे शब्द वारंवार येतील. सगळीकडे चाकोरीबद्ध शब्दांचा समूह आणि देतील शब्दाच्या प्रवाहामध्ये घायाळ करीत पण त्यानंतर सुद्धा येते.
        ...आलेले क्षण नकळत मनाला फुलविणारे . नवे रूप नवे स्वप्न नवे चांदण्याचे गाणे
व नवे गुणगुणत शब्दाची साद.
वारंवार येतील फुललेल्या क्षणाबरोबर स्वप्नामध्ये बळ देण्यासाठी काट्यातून फुलेरा फुलेल नवीन शब्दांच्या नवीन प्रवाहाच नवीन अस्तित्वातील सोनेरी  क्षणाचा नवीन पालवी आसवांच्या सोबत पण ते स्वप्नातील रंग भरलेल्या ग्रीष्माच्या निखाऱ्यात  निघाल्यावर सावलीतील विसावा मध्ये फुललेल्या माळरानातील इवलेसे रोपटा सारखे नजरा देतील नवीन सोनेरी किरण आणि उगवत्या सूर्यासारखे नवीन स्वप्न.
   नव्याच वाटा मृद हिरवळ पायवाटेमध्ये वळतील नजर. त्या वाटेवर व शब्द सुरांमध्ये नव्या वाटा नवीन स्वप्न नवीन उमेद नवीन नाते नवीन गुलमोहर आणि नवीन चौकट.
     मनसोक्त त्या वळणावर चालताना चौकट सुद्धा गुंफत आहे गुलमोहर फुले पण त्याला उन्हाचे चटके करावेच लागते. मिटलेल्या पापणीत स्वप्नांचा ओघ आला तरी त्याबरोबर आले आलेली नवीन पायवाट मयुर स्पर्शाने फुललेला त्या क्षणाला नाजूक शब्दांनी आणि कुंपणात राहूनच पण स्वतंत्रपणे. येणारी जबाबदारीसुद्धा चोर पावलांनी आली.
       नयन भिजले नाही असे झाले नाही पण हा प्रवाह वाटतो इतका साधा व सरळ सुद्धा नाही आणि नव्हता इतरांना पहातांना वाटतं इतका या प्रवासासाठी किती बदल करावे लागेल इतरांना माहीत नाही कारण माझे स्वप्न माझी महत्वकांक्षा माझी दिशा ही वेगळी होती पण मी बदलत गेले माझ्यातील स्वप्नांना पुर्ण करण्यासाठी.
    बदलता स्वभावा बदलले शब्द  बदलले विचार बदलले जुने शब्द आणि वैतागलेले चित्र आणि बदलले मनातील पांघरलेला तुटलेल्या स्वप्नांना हळू पावलांनी आणि शब्दांनी अन फुललेल्या चेहर्‍यानी.
        तरी होत राहिले त्याविरुद्ध पण कणखर आवाज आणि मधुर शब्दांनी सर्व शक्य होते ते त्या क्षणाने कळून आले अजूनही त्या क्षणांची वाट पाहत राहील. ते क्षणच आपल्यासाठी नवीन बदल विचारांमध्ये नवीन स्वप्न नवीन पायवाट नवीन महत्वकांक्षा व नवीन सूर देतात फुललेल्या त्या चेहऱ्यामध्ये आणि फुललेल्या त्या हसरा सावळ्या रूपा चे नवे गाणे आणि नवे सूर सापडतात.
       हळुवार पावलांनी आणि दाटीवाटीने भरलेल्या सोनेरी पावलांनी.
    खरंच वाटतं त्या क्षणासाठी तयार नव्हतो पण तोषण एका चौकटीमध्ये गोळा  करून ठेव ला आणि ते पाहताना वाटतं जगत आहोत आपणास रेशन हसरे नयन हसरे धावते शब्द आणि उगवलेलं नवीन दिवसाचा सूर्यप्रकाशा सारखे।          वेलांटी वळणावर  मुक्त मनानी
      इंद्रधनुष्य घेऊन  आलेच.  क्षण 
      निळाशार टोपी मध्ये आणि 
             उपरन मधून 
           नवे सूर... नवे शब्द ....नवे गाणे...
                      सविता तुकाराम लोटे 
-----@@@@---------@@@@@-----







बदलता काळ


बदलता काळ 
      दिशा बदलतात शब्द बदलतात भावना बदलतात. आयुष्य हे एक घनदाट जंगल आहे . त्यात पाऊल ठेवले की त्या गुंताला आपण जीवनाचा त्या बदलत्या  क्षणा बरोबर पाठलाग करीत असतो ....विचार कशाचा ? तर बदलत्या काळाचा !
थांबलेले शब्द परत ऐकू 
येतानी दिसतात...
थांबलेले शब्द परत ऐकून 
क्षणभर थांबलेल्या... लपंडावाचा 
त्या सहज आकृती वणव्यात!
         मनाची सारी आकृती ही सहज बदलत जाते जेव्हा वाटत राहते सर्व सरळ आणि गुंता सुटत जात आहे तेव्हा ,पण खरच सौम्यपणा हा त्या भेटणाऱ्या धारदार आकृतीमध्ये असते त्या घनदाट जंगलामध्ये हे ते नातच जपणाऱ्या त्या खोल मनाला माहीत असते. नदीच्या पाण्याला प्रवाह असतो तसे नात्याला सुद्धा पण त्या प्रवाहाला पूर्णत्व गुंफलेल्या क्षणांसोबत असावे. वरवर पाहता संवेदना हा त्या खुल्या फुललेल्या कळी असावी.
        जमवत गेलेल्या संवेदना खुल्या असाव्या विचित्र रांगोळी नक्षत्रांचे असावे असे वाटताना काळोखाला मधुर घंटानादाने नाहीसे करावे आणि बदललेल्या त्या काळाला मंत्रमुग्ध होईपर्यंत स्वप्नातील रांगोळीमध्ये गुंफत जावे असे वाटत राहते पण बदललेले शब्द..क्षण... रांगोळी...घंटानाद ....परत बदलते.
       विश्वास आपुलकी अद्भुत नवीन बदलत्या काळाबरोबर.
                         सविता तुकाराम लोटे 
----------///////////////------------

एक फांदी

एक फांदी 


          दवबिंदू  पाणी नसते पण त्याला ओलावा असतो त्या ओलाव्याने ओलेपणाचा भास असतो. आभास हे आपल्या भावनेवर अवलंबून असते सगळी पहाट झाली त्या शांत न व किरणांच्या साक्षीने उगवत असते नवरुप घेऊन पण तो ओलावा दिवस सरता सरता कमी होत जातो आणि उतारता उतारता तो हो ओलावा आपले अस्तित्व आपले जग परत शुभ्र पहाट घेऊन येते.  
           ओसरणार्‍या धुक्यात काय शोधायचे असते माहित नाही पण ते शुभ्रपहाट काहीतरी नवीन काही आपल्याला देऊन जाते. नवीन स्वप्न ओंजळीत भरतांना आत्मविश्वास आणि नवीन स्वप्न मनात रूजवितांना शक्ति!  
      सगळं हवं तसं होत नसते हे खरे, असेल. एक ओंजळ ज्या जमत राहतात नवविश्वासाचे स्वप्न पहाटेच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताना पहाट कितीही धुक्यात भरलेली असलेली असली तरी धुक्यातून  साक्षीने ती मनाला ओलावा देत  राहते.
      नाजूक हळुवार ...अमर्याद 
झुलत्या फांदीवर  आपले संपूर्ण हलत्या स्वप्नांचे हलते सामर्थ्य सुवर्ण स्वप्नाने आपल्या डोळ्यात साठवित असतो एका फांदीवर आपले सामर्थ्य दाखवित अस तो पण खरंच त्या एका फांदीवर सामर्थ्य असते की ते भ्रम असते डोळ्याचे निर्जीव भावआपल्याला दिसतात त्या निर्जीव ओलावा त्या दवबिंदुं सारखे नसतात एका फांदीवरून प्रवास होऊ शकत नाही जणू ते प्रवास एका चौकटीत लागू नये त्याला दवबिंदू च्या ओलावा असावा जरी वसंताचा बहर नसला तरी!
          एका फांदीवर चौकट न करता!!!

         सविता तुकाराम लोटे 

----------------------------------

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...