savitalote2021@bolgger.com
गुरुवार, २० मे, २०२१
शब्द
बहिष्कृत चळवळ
.......फक्त
पेटलेल्या रक्तात
सोमवार, १७ मे, २०२१
धने Coriander
तो ....ती...
रविवार, १६ मे, २०२१
सावलीत
शुक्रवार, १४ मे, २०२१
छत्रपती शिवाजी महाराज इतिहास जमा झाले नाही इतिहासकार झाले......
छत्रपती शिवाजी महाराज इतिहास जमा झाले नाही इतिहासकार झाले......
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता सहिष्णू राजा स्वराज्य स्थापनेचा जनक आणि महाराष्ट्राच्या इतिहासावर महत्वपूर्ण योगदान देणारे आणि त्यांच्या धडाडीच्या युद्ध कौशल्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासावर नव्हे तर भारतीय इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उमटवलेला आहे.
मराठा राज्याचे संस्थापक आणि पहिले अभिषेक छत्रपती नावलौकिक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० मध्ये शिवनेरी दुर्ग येथे झाला. मराठी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी राजे भोसले एक सर्वसमावेशक सहिष्णू राजा म्हणून ओळखले जातात. छत्रपती यांनी त्यांच्या शिस्तबद्ध सैन्यांच्या आणि सुव्यवस्थित प्रशासकीय तुकड्यांच्या मदतीने एक पात्र व पूर्व आणि प्रशासन पुरवले.
छत्रपती महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी एक नवीन युद्धनीती विकसित केली. गनिमी कावाची! शिवाजी महाराजांनी अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून अतिशय संयमाने स्वराज्य स्थापन केले. त्यांच्या संघर्षशील जीवनामुळे त्यांना कुशल योद्धा मानले जातात. त्यांनी समाजातील सर्व जातीमधील लोकांना घेऊन त्यांचे नाव मावळ ठेवले त्यांच्या आई जिजाबाई मार्गदर्शक प्रेरणास्थान होत्या. त्यांचे संपूर्ण आयुष्य त्यागाने परिपूर्ण होते. कोणत्याही परिस्थितीत आई जिजाबाई यांनी संयम गमावला नाही त्यांनी आपल्या लहान मुलाला शिवाजीला चांगले संस्कार दिले.
जिजामाता यांनी आपल्या आयुष्यात आलेल्या खडतर प्रवासातून एक विलक्षण प्रतिभा त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती आणि त्या प्रतिभेचा सर्वतोपरी उपयोग त्यांनी शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज बनविण्यासाठी मोठे योगदान दिलेले आहे .
शिवाजी महाराजांच्या चरित्रावर त्यांचे आई-वडिलांचा मोठा प्रभाव आहे त्या काळातील सामाजिक संरचना आणि वातावरण बाल शिवाजींना योग्य पद्धतीने समजून सांगण्याचे काम त्यांनी केले. युद्ध अभ्यास राजनीति युद्धकौशल्य शिवाजी महाराजांना प्राथमिक मार्गदर्शन त्यांचे वडील शहाजीराजांकडून मिळाले तर परकीय सत्ता विरुद्ध योग्य पद्धतीने लढा करण्याकरिता आवश्यक असलेले शिस्तबद्ध शिक्षण माता जिजाबाई यांच्याकडून मिळाले.
आई जिजाबाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या आद्यगुरू होत्या. शहाजी महाराजांनी पुणे येथील जहागिरीचे कारभारी दादोजी कोंडदेव यांनी शिवाजींना युद्धकला राजनीति शास्त्र शिक्षण दिले.
स्वराज्य स्थापने मध्ये आई-वडिलांचे मार्गदर्शन आणि दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनामुळे योग्य दिशा छत्रपती शिवाजी महाराजांना मिळाले. संत तुकाराम महाराज यांचे महत्त्वपूर्ण अध्यात्मिक मार्गदर्शन शिवाजी महाराजांना लाभलेले आहे. शिवाजी महाराजांनी त्या काळात अनेक विद्वान साधुसंत पंडित यांचे उपदेश घेतले असे म्हटले जात असले तरी समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज यांचे गुरू-शिष्याचे नाते हे वेगळेच होते.
संत तुकाराम महाराजांनी शिवाजीराजांना कर्मयोगाचे पुरस्कर्ता समर्थ रामदास यांच्याकडे पाठविले असेही मानले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभारामध्ये दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदास यांच्या मार्गदर्शनाला मानाचे स्थान दिलेले आहे.
शिवाजी महाराजांनी आदिलशहाच्या ताब्यात असलेला तोरणगड इ स सोळाशे सत्तेचाळीस मध्ये जिंकला आणि खऱ्या अर्थाने स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. पुणे प्रांतावर आपले नियंत्रण मिळावे यासाठी त्यांनी कोंढाणा सिंहगड पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून घेतले. सोबत तोरणगड सामोरे मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याचे नाव रायगड असे ठेवले. शिवाजी महाराजांच्या विजय माळ्याला आळा घालण्यासाठी आदिलशहाने शहाजीराजांना अटक केली आणि सोबतच फत्तेखान सरदाराला शिवाजी महाराजांवर हल्ला करण्यास पाठविले.
शिवाजीराजांनी पुरंदरवर फत्तेखानचा पराभव करून बाजी पासलकर पळून जाणाऱ्या फत्तेखानच्या पाठलागावर पाठविले बाजी पासलकर यांनी सासवड पर्यत नेले आणि सासवडजवळ झालेल्या त्या लढाईत पासलकर यांचा मृत्यू झाला
शिवाजीराजांनी मुघल बादशहा शाहाजहान यास त्यांच्या दख्खनचा सुभेदारकरवि पत्र पाठवून शहाजीराजा सकट त्यांच्या चाकरीत जाण्याची इच्छा प्रकट केली. त्याचा परिणाम म्हणून शाहाजहानाने आदिलशहावर दबाव आणला आणि शहाजीराजांची सुटका झाली परंतु त्यासाठी शिवाजीराजांना कोंढाणा किल्ला सोबत शहाजीराजांना बंगळूर शहर आणि कंदर्पीचा किल्ला आदिलशहाला द्यावा लागला
१६५६ मध्ये शिवाजी महाराजांनी रायरीचा किल्ला जिंकला आणि कोकण भागात स्वराज्याचा विस्तार झाला.१६५६ ते १६५९ या कालावधीत पश्चिम घाट आणि कोकणातील ४० किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांनी विजय मिळविला.
वडिलांकडून २००० सैनिकांच्या छोटा तुकडी पासून एक लाख सैनिकांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले होते. महाराजांनी किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक नवीन किल्ले ही उभारले.
अफजल खानचा प्रकरण
आदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले शिवाजी महाराज जिंकत आल्यामुळे त्यांना थांबविण्यासाठी आदिलशहाने आपला एका सरदार अफजलखानाला मोठ्या सैन्यासह मोहिमेला पाठविले अफजलखान वाईजवळ आला तेव्हा शिवाजी महाराजांनी प्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरवले तहाची बोलणी सुरू झाली.
अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी निशस्त्र मोजक्याच सैन्यासोबत बोलणीसाठी यावे असा आग्रह होता महाराजांनी त्याच्या या मागणीला समर्थन देऊन भेटण्यास तयार झाले शिवाजी महाराजांना कल्पना होती की यात काही दगाफटका होऊ शकतो म्हणून त्यांनी सावधानी म्हणून बिचवाचिलखात दडविला... या प्रसंगाचे खूप सुंदर वर्णन पोवाडा मध्ये शाहीर अदन्यातदास यांनी केले आहे.
प्रतापगडाच्या पायथ्याशी खान...
आला बेगुमान नाही त्याला जाण
शिवाजी राजाच्या करामतिची
त्याशी नाही जाणीव शक्तिची
करील काय कल्पना युक्तीची हा जी ....
महाराजानी निरोप घेतला...
अन दंडवत घातला भवानीला
तसाच आई जिजाऊला
वकुत ह्यो वंगळ त्यों कसला
पाणी आल आईच्या डोळ्याला
अन लागला रडायला
अहो हे हे हे सरदार तर रडतीलच
पण हत्ती घोडे शिव ना चार्याला
अन गाई बघा लागल्या हम्बराया
असला बेहुद वकुत आला
दुश्मनाच्या गोटामधी चालला मराठ्याचा राजा
अहो राजा हो दाजी र जी जी
खानाच्या भेटीसाठी...
महाराजानी एक शानदार शामियाना उभारला होता
भेटीसाठी छान उभारीला
नक्षीदार शामियान्याला
अन अशा ह्या शामियान्यात
खान डौलत डुलत आला
सय्यद बंडा त्याच्या संगतीला
शिवबाच्या संगतील महाला
म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा
राजाला पाहून खान म्हणतो
आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग
शामियान्याला
खान हाक मारितो हसरी
रोखून नजर गहिरी
जी र जी...
पण आपला राजा
काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता
राजा गोर पहात त्याची न्यारी
चाल चित्याची सावध भारी
जी र जी जी
खानाला राजाला आलिंगन दिल
अन दगा केला
खान दाबी मानी मान्याला
कट्यारीचा वार त्यान केला
गर खरा आवाज झाला
चिलाखत व्हत अंगाला
खानाचा वार फुका गेला
खान यडबडला
इतक्यात महाराजांनी
पोटामधी पिसवा ढकलला
वाघनखांचा मारा केला
हे टरटरा फाडल पोटाला
हे तडा गेला खानाचा कोथळा माहेराला
जी र जी
जी बाहिर आला जी र
प्रतापगडाचे युद्ध जाहले
रक्त सांडले पाप सारे गेले
पावन केला कृष्णेचा घाट
लावली गुलामीची हो वाट
मराठे शाहीचा मांडला थाट हो जी जी.....
२८ डिसेंबर १६५९ मध्ये शिवाजी महाराजांनी कोल्हापूर नजीक पन्हाळाला कुठे पोहोचले आणि या सुमारास अदिलशाही सरदार रुस्तमजान मिरजेपाशी पोहोचला. शिवाजी महाराजांच्या ५००० सैनिकांनी १०,००० सैनिकांबरोबर लढा दिला आणि कोल्हापूरचा सारा प्रदेश महाराजांच्या ताब्यात आला. अफझलखानच्या मृत्यूमुळे चिडलेल्या आदिलशहाने त्याचा सेनापती सिद्दी जौहर याला इ. स. १६६० हल्ला करण्यासाठी पाठविले ही बातमी कळताच राजे पन्हाळगडावर गेले त्यांनी गडाला वेढा घातला.
खूप दिवस झाले तरी कधी वेढा उठण्याचे कोणती लक्षणे दिसत नव्हती. म्हणून शिवाजी महाराजांचे विश्वासू पराक्रमी सरदार बाजी प्रभू देशपांडे यांच्या आग्रही विनंतीला मान देऊन छत्रपती महाराज विशाल गडावर रवाना झाले. पण त्यामध्ये सरदार बाजी यांनी प्राणांची बाजी मारली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ही बातमी मनाला चटका लावून गेली ज्या घोडखिंडीत लढले स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले त्या घोडखिंडीचे नाव शिवरायांनी पावनखिंड केले. बाजीप्रभूंच्या बलिदानाने पावन झालेली ती पावनखिंड अशा शब्दात छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजीप्रभूंच्या बलिदानाला स्वराज्याच्या इतिहासात अजरामर केले.
मुगल साम्राज्य बलाढ्य होते औरंगजेब हा अतिशय कठोर आणि कडवा मुघल बादशहा होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य विस्ताराला वेसण घालण्यासाठी शाहिस्तेखानाला इ. स. १६६३ मुघल साम्राज्याच्या नर्मदा नदी पलीकडे राज्यविस्तार थांबविण्यासाठी मोहिमेस पाठवेल त्यावेळी सुद्धा महाराजांनी स्वतःच्या चातुर्य कौशल्याने कमीतकमी सैनिकांमध्ये त्याला धूळ चाखली.
इ. स. १६६५ औरंगजेबाने सेनापती मिर्झाराजे जयसिंह याला प्रचंड सैन्यासह शिवाजी महाराजांच्या सैन्यावर आक्रमण करण्यात आले शिवाजीराजांचा प्रतिकार थिटा पडला आणि निर्णायक लढाई नंतर पुरंदराचा तह झाला तहानुसार तेवीस किल्ले द्यावे लागले बरोबर स्वतः आग्रा तेथे पुत्र संभाजी या सह हजर होण्याची कबुली करावे लागेल.
इ. स १६६६ मध्ये औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आग्रा येथे नजरकैदेत ठेवले त्यातूनही आपल्या हुशारीने आणि चातुर्याने आपली सुटका करून घेतली.
छत्रपती शिवाजी महाराजांकडे असंख्य सैनिक होते. जमिनी होत्या धन धन दौलत होते. लष्कर नौदल होते. महाराज अनेक गोष्टींवर स्वामित्व गाजवत असले तरी त्या काळातील मुगल साम्राज्यसाठी ते फक्त जमीदार होते. राजा छत्रपती किंवा सम्राट नव्हते त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोर जावे लागले.
कायदेशीर मान्यता नसल्यामुळे अनेक पेचप्रसंग निर्माण होत असे. अशातच भर म्हणजे काही मराठा सरदारांमध्ये महाराजांविषयी मत्सराची भावना निर्माण होत. त्यांनाही आळा घालावा लागत असे.
स्वराज्याला कायदेशीर मान्यता मिळवून देण्यासाठी राज्यभिषेक आवश्यकता होता पण त्यातही खूप अडचणी होत्या कारण प्राचीन काळात क्षत्रिय वर्णातील व्यक्तीचा राजा वा अभिषेक केला जात असे पण शिवाजी हे भोसले होते म्हणून क्षत्रिय गणले जात नव्हते हे कारण समोर ठेवून त्या काळातील काही समाजकंटकांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला बंडखोरी केली अनेक समस्या निर्माण केल्या आणि सामाजिक परिस्थिती त्यांच्याविरुद्ध नेण्याचे परिपूर्ण प्रयत्न त्यांनी केला अशा सर्व अडचणींवर मात करत अखेर गागाभट्ट यांनी पुरोहित म्हणून जबाबदारी स्वीकारले.
६ जून १६७४ रोजी शिवाजीराजांना रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला .सोहळ्यासाठी 32 मण सोन्याचे सिंहासन बनवले गेले होते. 11000 ब्राम्हण व्यतिरिक्त एक लाख लोक रायगडावर उपस्थित होते. चार महिने राहण्याची व्यवस्था पाहुण्यांची केले गेले होते. देश-विदेशातील साडेचार हजार राजांना निमंत्रणे गेले होते. सव्वा मण सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण केली.
राज्याभिषेकाच्या दिवशी पहाटे उठून मंत्रोच्चार सुरू झाला आणि संपूर्ण परिसर या अलौकिक सोहळ्याचा साक्षीदार बनला. शिवराज की जय... शिवराज की जय .....शिवराज की जय.... या घोषणा आसमंत भरून गेला. मुख्य पुरोहितांनी राजांच्या डोक्यावर मोत्यांचे झालर ठेवत; शिवछत्रपती म्हणून आशीर्वाद दिला. शिवाजी, "छत्रपती शिवाजी महाराज झाले". छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवराई चलन जाहीर केले.
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर समज-गैरसमज निर्माण झाले एकामागे एक संकटांना सामोरे जावे लागत होते. त्यातील सर्वात मोठी घटना म्हणजे आई जिजाबाई यांचा मृत्यू होय म्हणून काही पुरोहिताने छत्रपती शिवाजी महाराजांना राज्यभिषेकामध्ये उणिवा असू शकतात म्हणून दुसरा राज्याभिषेक करून घेतला अगदी साध्या पद्धतीने.
पहाटेच्या पहिल्या सुर्यकिरणांचे तेज
वटवृक्षा सारखी विशालता
सह्याद्री सारखे कणखर
आंब्याच्या मोहरासारखा
नव सुगंध... लढाऊ कीर्तीचा
साक्षीदार झाला रायगड
कीर्ती मोठी लोकी तीनही
संकटे तळपायातील धूळ समान
स्वाभिमानाचा ...पराक्रमाची
विजय यात्रा .... वाघाच्या छव्याला!!!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कठोर ध्येयनिष्ठा आणि आत्मविश्वासाच्या बळावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी कधी ही श्रद्धेला अंधश्रद्धेची जोड दिली नाही.
त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासामध्ये आजच्या भाषेत ( विज्ञान ) नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे शब्द मंतरलेले होते पण ते कोणत्याही तंत्रविद्येच्या उपयोग न करता तर आत्मविश्वासाच्या बळावर! स्वराज्य हे स्वप्न साकार करण्यासाठीच.
परिस्थितीचे योग्य नियोजन आणि चातुर्य कौशल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राज्यव्याप्ती पश्चिम महाराष्ट्र कोकण सह्याद्रीच्या डोंगर रांगा पासून नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र खानदेशापासून दक्षिण भारतात तंजावर पर्यंत केली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सामान्य रयतेची व्यवस्था केली.
राज्यातला शेतकरी सुखी तरच स्वराज्य सुखी म्हणून शेतकऱ्यांनी शेतीचे योग्य नियोजन करावे यासाठी महाराजांनी शेतकऱ्यांना नवीन शेती कल्पना दिल्या. राजाश्रय दिला. योग्य नियोजन करून घेतले .शूर सरदारांची फौजा उभी केली. सामाजिक, राजकीय ,शैक्षणिक, सांस्कृतिक ,धार्मिक ,आर्थिक अशा अनेक व्यवस्थांना पाठिंबा दिला. स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ता छत्रपती शिवाजी महाराज होते. खचलेला रयतेला त्यांनी स्वाभिमानाचा स्वराज्य निष्ठेचा स्वतःच्या पराक्रम जागृत केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या संघर्षशील जीवनशैलीमुळे कुशल योद्धा होते. त्यांनी सर्व जाती धर्मातील लोकांना घेऊन स्वराज्य स्थापन केले.
मावळा स्थापन केला. संघटित केले. सह्याद्रीला नवजात बाळासारखे कुशीत घेतले..... नवीन किल्ले बांधले. नवीन युद्धकौशल्य युद्धअभ्यास नवीन राजकारण राजनीति निर्माण केली. मराठीला राजभाषा केली सोबत संस्कृतला स्थान दिले.
छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजा झाले "स्वयंघोषित राजा न होता लोक घोषित छत्रपती बनले."
शौर्य पराक्रम ,उत्कृष्ट योद्धा, सहिष्णू राजा उत्कृष्ट शासनकर्ते, शिस्तबद्ध, सुनियोजित प्रशासकीय आराखडा तयार करणारा गमीनी कावाची शैली निर्माण करणारा भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा नायक ...मावळ निर्माण करणारा युद्धअभ्यास.....हिंदवी स्वराज्याचे संस्थापक.....बुद्धिनिष्ठ, आत्मविश्वास ,ध्येयवादी, आदर्श शासन निर्माता 3 एप्रिल 1680 या रोजी विषबाधेमुळे आपल्याला या जगातून सोडून गेले .
छत्रपती शिवाजी महाराजांनी खचलेल्या मनाला नवचैतन्य निर्माण केले. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून जनतेच्या मनात जागृती निर्माण केली. या सर्व गोष्टी त्यांनी अवघ्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा हाच स्वाभिमान आत्मविश्वास आजही महाराष्ट्राला मराठी माणसाला प्रेरणा देते.
सर्व संकटांना अडचणींना सामोर जाण्यासाठी आणि संकटावर मात करण्यासाठी एक पाऊल सतत सामोरे जाण्याची उर्मी मनामध्ये निर्माण करते .....छत्रपती शिवाजी महाराज!!!!
छत्रपती इतिहास जमा झाले नाही
छत्रपती इतिहासकार झाले...
जय भवानीची हाक
आणि जय शिवराय
जय शिवराय ....जय शिवराय!!!!
सविता तुकाराम लोटे
-------------@@@@@@@------
सत्य
रविवार, ९ मे, २०२१
नकोच प्रतिक्रिया रिमझिम
माझी रमाई
शुक्रवार, ७ मे, २०२१
चारोळी कविता नजर रोखून
गुरुवार, ६ मे, २०२१
विसावा नाहीच
फक्त चालत राहायचे
मंगळवार, ४ मे, २०२१
तुझी सोबत हवी
सोमवार, ३ मे, २०२१
एक रात्र
रविवार, २ मे, २०२१
अंधारलेल्या वणव्यात
शनिवार, १ मे, २०२१
प्रीत
सांज गेली
पैंजण
शुक्रवार, ३० एप्रिल, २०२१
डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि कामगार विचार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्त्री कामगार विचार
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर एक थोर विचारवंत शिक्षणतज्ञ , कायदेपंडित , संसदपटू संपादक ,लेखक ,वकील, प्राध्यापक , समाज सुधारक , घटनाकार ,एक अभ्यासू आमदार खासदार अशा पदांना भूषविलेले व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब ! त्यांच्या या कार्याची दखल सर्वांनीच घेतली.
१९३६ साली स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. या पक्षाचे ध्येय धोरणे कुठल्याही जाती धर्मासाठी नव्हते तर कष्टकरी समाज वर्गासाठी होते. आर्थिक-सामाजिक राजकीय हक्कांसाठी होते. यातूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शोषित कामगारा विषयीची तळमळ लक्षात येते. १५ ऑगस्ट 1१९३६ धोरणाचे ध्येय धोरणे अतिशय साध्या पद्धतीने आणि सूक्ष्मसखोल विचार पद्धतीने मांडले.
कष्टकरी समाज वर्ग सत्ता संपत्ती पासून वंचित होता वाटेल तसे राबविले जात होते त्यामानाने मोबदला मात्र अल्प द्यायचे बारा बलुतेदार पद्धती समाजमान्य होते दलित अस्पृश्यांची स्थिती दयनीय होती शोषित कष्टकरी कामगार वर्ग गुलामीचे जीवनमान जगत होते. १८७३ मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाज चळवळीने पारंपारिक समाजात चौकट उद्ध्वस्त केले या चळवळीने समाजातील अस्पृश्यांचे जीवन शैली दाखवून दिले या चळवळीमुळे अस्पृश्य समाज वर्गाला जीवन जगण्याची नवीन पद्धत प्राप्त झाली जीवनाला धैर्य प्राप्त करून दिले रोजगार शिक्षण जगण्याचे सामाजिक मूल्य इत्यादी बळ दिले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ज्या जबाबदाऱ्या स्वीकारला त्या सर्व जबाबदाऱ्यांमध्ये आपला ठसा उमटवलेला आहे १९४२ते १९४६ या काळात केंद्रीय श्रम व रोजगार ऊर्जामंत्री म्हणून कार्यरत असताना आपले मत रोख ठोक पद्धतीने मांडले ते म्हणतात," आता काळ बदलला आहे. सत्तेच्या व कायद्याच्या जोरावर कामगार वर्गाला दडपणे शक्य नाही. कामगार हा माणूस आहे. त्यांना मानवाचे हक्क मिळाले पाहिजेत. सध्या सरकार पुढे तीन प्रश्न आहेत एक तडजोडीचा, कामगाराची निश्चित वेतन , कामगार मालक यांच्यातील सौहादपूर्ण संबंध कामगारांचे राहणीमान उंचावले पाहिजे. आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे. मी नेहमीच कामगार वर्गाच्या बाजूने उभा राहीन.” आपली कार्यपद्धती ही कामगारांच्या बाजूने आहे हे त्यांनी मांडले.
२९ मार्च १९४५ स्त्री कामगारांचे स्त्रियांसाठी प्रसूतीचा काळ विश्रांतीची तरतूद, रोख मदत करणे, चार आठवडे प्रसूती भत्ता मिळावा तसेच गैरहजर असताना पगारी सुट्ट्या मिळाव्यात. खाण कामगारांना शॉवर बॉथची योजना सुद्धा अंमलात आणली होती.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खाण मजुरांसाठी आपले विचार भाषणातून व कायद्यातून मांडताना दिसतात. स्त्री कामगार अन बद्दलची आत्मीयता त्यांच्या कौटुंबिक समस्या संसार विषयी चिंता त्यांच्या जीवनाचा उन्नतीचा मार्ग हा आर्थिक परिस्थिती सुधारेल तेव्हाच सुकर होईल.
बाबासाहेब यांनी १९४५ आली महागाई भत्ता निर्णयामुळे अर्थ मजूर मंत्री असताना बाबासाहेबांचे निर्णय हे कुठल्याही विशिष्ट जातीला समोर न ठेवता समाजातील सर्व जाती धर्मातील कामगारांच्या हितांचे असतील असे निर्णय घेतले स्वातंत्र्य समता बंधुभाव या सूत्रांनी बांधणारी भारतीय राज्यघटना दिली. देश एकसंघ ठेवला.
ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे भारतीय कामगारांचे दोन शत्रू आहेत असे त्यांचे मत होते. कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करणे, मालक आणि कामगार यांच्यात औद्योगिक विवाद झाल्यास दोघात समेट घडवून आणण्यासाठी यंत्रणा निर्माण करणे, कामगार आणि मालक यांच्या कोणत्याही वाटाघाटीसाठी तरतूद करणे, वर्षातून किमान 240 दिवस काम, कामगारांना दिवसभरात आठ तास काम, नोकरीत असताना जर कामगाराचं अपघात व मृत्यू झाला तर मालकांकडून कामगाराला नुकसान भरपाई देणे. असे मत त्यांनी दिल्ली येते जॉईंट लेबर कॉन्फरन्स(Joint Labour Conference 1942) मध्ये कायद्यात एकवाक्यता असावी असे मत व्यक्त केले.
त्यांनी स्त्री कामगारांना कायद्यान्वये रात्री काम करण्यासाठी बंदी , स्त्रियांना प्रसुती काळात भर पगारी सुट्टी, बारमाही कामगारांना हक्काची भरपगारी सुट्टी,सक्तीची तडजोड , लवादा हे तत्व कामगारांच्या न्यायासाठी कायमस्वरूपी केले. त्यांचे हक्क वेतन विमा आरोग्य संरक्षण कामाचे तास इ.
आधुनिक समाजव्यवस्था बदलता आहे. जागतिककरण आले औद्योगीकरण सुरू झाले नवीन वसाहत वादाला शहरी-ग्रामीण भागाचा विकास होत आहे. ग्रामीण भागांचे शहरीकरण होत आहे शहर महानगरात परिवर्तित होत आहे; त्यामुळे सांस्कृतिक सामाजिक राजकीय शैक्षणिक आर्थिक यासर्व मध्ये बदल होत आहे. प्रगतीचे नवीन मार्ग खूले होत आहे.समाज भारतीय राज्यघटनेने दिलेले अधिकार मूलभूत तत्व समानता स्वातंत्र त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव आहे. लोकशाही ही आपली जीवनशैली बनवली आहे . बहुराष्ट्रीय कंपनी धोरणामुळे, वाढत चाललेल्या खाजगीकरणामुळे, नवीन समस्या निर्माण होत आहे. नवीन वसाहतवाद निर्माण होतो. साम्राज्यवाद निर्माण होत आहे. सांस्कृतिक दहशतवाद निर्माण होत आहे. माणसाच्या घामाची जागा आता यंत्राने घेतली आहे. श्रीमंत श्रीमंत तर गरीब हा अधिक गरीब होत आहे. सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक मूल्यांची घसरण होत आहे. भारतीय कामगार कायदे पुरेसे आहे पण समाधानकारक रीतीने योग्य पद्धतीने अंमलबजावणी केली जात नाही त्यामुळे जो कायदा कामगाराच्या फायद्याचा असतो तो निराशाजनक पद्धतीने पदरात पडताना दिसतो .
सविता तुकाराम लोटे
---------------------------------
गुरुवार, २९ एप्रिल, २०२१
सांजवेळ
महाराष्ट्र दिन
बुधवार, २८ एप्रिल, २०२१
मधाळलेली सांजसावली
कातरवेळी
स्वप्न सावली अस्तित्वात येते तेव्हा!!!
मंगळवार, २७ एप्रिल, २०२१
आठवण त्या हळव्या क्षणांची
आयुष्याच्या वळणावर
माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)
*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने अश्रूचे सोने झाले देहाचे मंदिर झाले सुकलेल्या शरीर...
-
थेंब विद्रोहाचा (काव्यसंग्रह) " संपला आहे माझ्यातला" Drops of Rebellion (Anthology) "I'm done" थेंब...
-
उजेडातील प्रकाश (काव्यसंग्रह) "एक विचारधारा समानतेची" Light in the Light (Anthology) "An Ideology of Equality"...
-
दीक्षा (काव्यसंग्रह) "एक आरंभ नव युगाचा" Deeksha " A beginning of the New Age" काव्यसंग्रह शीर्षक :- द...