"क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
शिक्षणाची गंगोत्री...!!"
"Krantijyoti Savitribai Phule
Gangotri of education ... !! "
ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले पहिल्या महिला शिक्षिका, थोर समाजसेविका होत्या. सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या अतुलनीय योगदानाला शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली. ही क्रांती घडवून आणण्यासाठी शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सावित्रीबाई फुले यांना अनेक संघर्षाला सामोर जावे लागले आणि यश मिळविले.
आधुनिक समाजाची स्त्री चूल आणि मूल या कक्षेत न राहता भारतीय इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरांनी लिहावे अशी योगदान भारतीय इतिहासात आणि जागतिक स्तरावर महिला देत आहे. याचे सर्व श्रेय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना जाते. त्यांनी त्यांचे आयुष्य शिक्षण प्रसार, प्रचार आणि समाजसुधारणा करण्यात व्यतीत केले.
समाजव्यवस्थेला न जुमानता, समाजव्यवस्थेच्या परंपरेला न जुमानता, समाजव्यवस्थेच्या जातीपातीच्या व्यवस्थेला न जुमानता, समाजव्यवस्थेच्या कर्मकांडं विचारसरणीला न जुमानता सावित्रीबाई फुले यांनी स्त्री मुक्ती व स्त्री शिक्षणाचा पाया रचला. आणि एक इतिहास महिला शिक्षणाचा रचला.
स्त्रियांना शिकवणे व शिकणे धर्माला अनुसरून नव्हते तो तिथे गुन्हा मानला जात होता. अशा समाजाच्या विरुद्ध जाऊन सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा वारसा आपल्या ओंजळीत दिला.
सावित्रीबाई फुले यांचा जन्म
3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नैवेसे होते. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मी होते. सावित्रीबाई यांच्या विवाह नवव्या वर्षी 1840 मध्ये 13 वर्षाच्या ज्योतिराव फुले यांच्याशी झाला.
सावित्रीबाई फुले बद्दल महत्वपुर्ण माहिती –
Savitribai Phule Mahiti
1.नाव :-(Name) -सावित्रीबाई फुले
2.जन्म:-(Birthday)- 3 जानेवारी 1831
3.जन्मस्थान:-(Birthplace)- नायगांव जि. सातारा
4.मृत्यु :- (Death)-10 मार्च 1897
5.कार्य:-(Work)-भारतातील पहिली महिला शिक्षिका समाजसेविका
कवयित्रीअध्यापिका पहिली विद्याग्रहण
करणारी महिला
ज्योतिराव फुले हे रूढी,प्रथा,परंपरा, वंशवाद, कर्मकांड यांच्या विरुद्ध होते. कारण त्यांना लहानपणापासूनच जातिवाद याचे चटके बसलेले होते. ज्योतिराव फुले यांचे विचार आधुनिक होते.निसर्गाने सर्वांना सारखेच अधिकार आणि हक्क दिलेले आहे त्यामुळे सर्वांना समान संधी उपलब्ध व्हावी यासाठी सतत कार्य करीत होते. त्यांच्या या विचारांना सावित्रीबाई फुले यांनी सतत प्रोत्साहन दिले. त्यांच्यासोबत त्यांच्या या कार्यात सहभाग घेतला.
सामाजिक सुधारणेच्या पेटत्या ज्योतीला सावित्रीबाई फुले यांनी सतत प्रज्वलित करीत ठेवले व खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची ज्योत पेटून ठेवली.
1840 मध्ये ब्रिटिश अधिकाऱ्याची पत्नी मिस्सेलने पुण्यातील छबिलदासच्या वाड्यात मुलींसाठी सामान्य शाळा सुरू केली. ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना धूळपाटीवर गिरविले शब्द आता सावित्रीबाई शाळेत शिकत होत्या. शिक्षण घेत असताना सावित्रीबाईंनी गुलामगिरी विरुद्ध काम करणाऱ्या थाँमस क्लाक्सर्न यांचे जीवन चरित्र वाचले. त्यांच्या संघर्षमय प्रवासाची शोककथा छापली गेली होती. ती वाचताना त्यांच्या लक्षात आले की, समाज परिवर्तन करायचे असेल तर शिक्षण हे परिवर्तनाचे मजबूत साधन आहे.
शिक्षणामुळे सामाजिक रूढी प्रथा परंपरेला आळा घातला जाऊ शकते. अशिक्षित व्यक्तींना आपला हक्काबद्दल आणि अधिकार्यांवर बद्दल जाणीव निर्माण करून देऊ शकतो. त्यामुळे ते आपल्या हक्का प्रति संघर्ष करू शकतील. त्यामुळे त्यांनी शिक्षण हेच शस्त्र वापरले. त्यांच्या या पुस्तकामुळे सावित्रीबाईंच्या मनामध्ये शिक्षणाची तीव्र इच्छा जागृत केली नाही तर मुलींना शिक्षित करण्याचे स्वप्न देखील दिले.
सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण खऱ्या अर्थाने लग्नानंतरच चालू झाले. कारण ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाईंना प्रोत्साहन दिले. त्यांच्याकडून अभ्यास करून घेतला. लिहिण्यास प्रोत्साहन दिले. मग सामान्य शाळेतून तिसरी ते चौथी परीक्षा उत्तीर्ण केले. त्यानंतर त्यांनी अहमदनगर येथील मिस फरार संस्थेत प्रशिक्षण घेतले.
शिक्षणाचे माहेरघर म्हणजे पुणे मध्ये 3 जानेवारी 1848 रोजी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी मुलींची शाळा स्थापन केली. त्या शाळेत विविध जातीच्या 9 विद्यार्थिनी होत्या. एका वर्षातच त्यांच्या शिक्षणाच्या कार्याला वेग आला आणि त्यांनी नवीन 5 शाळा सुरू केला. त्यांच्या या कार्याला सरकार कडून गौरविण्यात आले.
सावित्रीबाई फुले यांचे कार्य काटेरी मुकुट चालणारे होते. पावलोपावली फक्त काटेच आणि काटेच..!! कारण 1848 मध्ये मुलींची शाळा काढणे आणि ते चालविणे सामाजिक व्यवस्थेविरुद्ध वाटचाल करणारी होती. त्या परिस्थितीचा त्या व्यवस्थेचा त्यांचा अडचणींचा आपण कल्पनाही करू शकत नाही. अशा परिस्थितीत सावित्रीबाई फुले यांनी स्वतः अभ्यास करून मुलींना शिकविले आणि आपले कार्य चालू ठेवले. मुलींना शिक्षणाची व्यवस्था करून दिली.
सावित्रीबाई फुले म्हणतात," वेळ विनाकारण व्यर्थ घालवू नका, जा आणि शिक्षण प्राप्त करा."
शिक्षण हे किती महत्वाचे आहे हे त्यांच्या कार्यावरून कळते. कारण या काळात सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे बोट धरले. तो काळ म्हणजे आजच्यासारखा नव्हता... त्यांनी अंगावर दगड धोंडे घेतले... चिखल माती,शेण घेतले. धर्म बुडाला जग बुडणार काल आला....अशा शब्दात त्यांना हिनवले. त्यांना त्यांच्या कार्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला गेला. तरीही सावित्रीबाई फुले यांनी हार मानली नाही आणि त्यांनी त्यांचे कार्य चालू ठेवले.
सावित्रीबाई फुले भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेच्या पहिल्या मुख्याध्यापिका होत्या, तशाच त्या पहिल्या शेतकरी शाळेच्या संस्थापक होत्या. महात्मा ज्योतिराव फुले हे भारतीय समाज सुधारणा चळवळीचे महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त् होते. ज्योतिराव फुले यांनी समाजातील विरोधकांकडे लक्ष न देता महिला आणि अस्पृश्य समाजाला शिक्षित करण्याचा प्रयत्न चालू ठेवला.
ज्योतिराव फुले हे सावित्रीबाई फुले यांचे मार्गदर्शन होते. गुरु होते.शिक्षक होते. ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना आपल्या कार्यात सुरुवातीपासूनच सहभाग करून घेतला. सावित्रीबाई फुले यांना एक ध्येय निश्चित केले; त्यानुसार सावित्रीबाई फुले यांचे कार्य चालू होते. सावित्रीबाई फुले यांनी महिलामुक्ती ,महिलाशिक्षण, विधवा पुनर्विवाह, स्पृश्य-अस्पृश्य स्त्रियांना शिक्षण देणे, अस्पृश्यता निर्मूलन आणि समाजातील इतर प्रथांविरुद्ध त्यांनी आवाज बुलंद केला.
(google ) सावित्रीबाई फुले इतक्यावरच थांबला नाही तर, त्यांनी एक मासिक सुद्धा काढले. त्यात त्या विविध विषयांवर लिहीत असे. सावित्रीबाई फुले या कवयित्री होत्या. आपल्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी त्यांनी काव्यफुले, बावनकशी, सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह लिहिले. त्यांचे काव्य हे समाजाला परिवर्तन करणारे होते.
सावित्रीबाई फुले यांचे कार्य म्हणजे जळत्या कोळशावर चालणे होते. सावित्रीबाई म्हणजे असे व्यक्तिमत्व आहे कि," अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारी एक क्रांती ज्योत आहे." ज्योतिराव फुलेंनी सामाजिक सुधारणेच्या जो दिवा पेटविला त्या दिव्याची सावित्री वात आहे.
सावित्रीबाईची प्रत्येक वाट ही कष्टांनी संघर्ष यांनी भरलेली आहे. सावित्रीबाई मुलींना म्हणतात," अंधार कितीही असो प्रकाशाची वाट येणारच असते आणि ती आणण्यासाठी संघर्षाच्या पायर्या चढल्याशिवाय विकासाचे बीज पेरता येणार नाही. म्हणून शिक्षण घ्या स्वतः मध्ये बदल करायचा असेल तर सर्वप्रथम शिक्षण घेणे फार महत्वाचे आहे." सावित्रीबाई फुले म्हणतात," ज्ञानाशिवाय आपण प्राणी बनतो म्हणून निष्क्रिय बसू नका जा शिक्षण घ्या".
सावित्रीबाईंनी निवडलेल्या मार्गामध्ये फुले नव्हे तर काटेरी वाटचालच होती. पावलोपावली त्यांना त्याच्या काटेरी रस्त्यांवरून चालावे लागत होते. तरी त्या हरला नाही. आनंदाने त्या मार्गावर चालत राहिला आणि स्त्री शिक्षणाची दारे सर्वदूर खुली करून दिली.
समाजाचा विरोध असून शेणाचा मारा सोसणारी शाळेची पायरी चढून शाळेची दारे कायमची उघडी करून देणारी शिक्षणाचे बीज मातीत पेरून सर्वदूर पसरून अभ्यासाचा धडा गिरविणारी सावित्रीबाई फुले यांनी समाजाच्या इतर प्रथांवर सुद्धा कार्य केले.
सावित्रीबाई फुले यांचे कार्य म्हणजे अशा समाज व्यवस्थेविरुद्ध बंड होता,तिथे स्त्री गुलाम होती. अनेक प्रथा-परंपरा त्यांच्यावर लादल्या गेल्या होत्या. अशा समाजव्यवस्थेत सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे धडे घेत इतर स्त्रियांनाही शिक्षणाचे धडे दिले.
समाजामधील बालजठर विवाह आणि अशा इतर प्रथेविरुद्ध समाज प्रबोधन करण्यास सुरुवात त्यांनी केली. त्याकाळात विधवा पुनर्विवाह नव्हता त्यामुळे बालजठर विवाह पद्धतीमुळे लहान मुली विधवा होत असे. त्या सती जात नसत.अशा मुलींचे केशवपण करून त्यांना कुरूप बनविण्यात येत असे. तरी त्यांच्यासमोर खूप समस्या होत्या. त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोण काही पुरुषी मानसिकतेचा वेगळा होता. त्यातूनच त्यांना गर्भधारणा होत असे आणि इतर अशा अनेक समस्यांना त्यांना समोर जावे लागत असे.
त्याकरिता 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाने आपले कार्य करताना अशा स्त्रियांना मदत केली. त्या निराधार होत्या. शरीर विक्री करणाऱ्या स्त्रियांसाठी मदतीचा हात दिला. आश्रय दिला. दवाखाने काढले. समाजातील अशा अनेक स्त्रिया कोणत्या ना प्रथेचा बळी पडलेल्या होत्या. अशा स्त्रियांना ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्या संस्थेत आधार दिला.
ज्योतिराव फुले यांच्या निधनानंतर सावित्रीबाई यांनी या चळवळीचे नेतृत्व केले.1893 रोजी सत्यशोधक परिषदेचे अध्यक्ष पद सावित्रीबाई फुले यांनी भूषविले. आपल्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून आपले कार्य पुढे नेले.
सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिराव फुले यांच्या निधनानंतरही त्यांचे कार्य चालू ठेवले.समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य आणि आपल्या जबाबदाऱ्या त्या पूर्ण करीत राहिल्या.
1897 मध्ये पुण्यात प्लेगची साथ सुरू झाली. त्यात त्यांचा मुलगा डॉ. यशवंत सोबत सावित्रीबाईंनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता प्लेग रुग्णांची सेवा करीत होत्या आणि त्यांना सुद्धा या आजाराची लागण झाली. (Savitribai Phule Death)
10 मार्च 1897 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सावित्रीबाई फुले यांनी जे कार्य ज्योतिराव फुले यांच्यासोबत चालू केले ते कार्य त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत चालूच ठेवले. सावित्रीबाई फुले यांचे कार्य भारतीय इतिहासातच नव्हे तर जागतिक इतिहासात सुद्धा सुवर्ण अक्षरांनी लिहावे असेच आहे. समाजाप्रती त्यांचे योगदान अवर्णनीय आहे.
सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्दल लिहिताना शब्दही कमी पडतात माझे तरी मी काही कवितेच्या ओळी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
सावित्री म्हणजे
सावित्रीबाई फुले म्हणजे संघर्षाची लाट
सावित्रीबाई फुले म्हणजे प्रकाशाची वात सावित्रीबाई फुले म्हणजे खुले शिक्षणाचे दार सावित्रीबाई फुले म्हणजे मुक्तीचे खुले विचार सावित्रीबाई फुले म्हणजे वाहती नदी शिक्षणाची....
सावित्रीबाई फुले म्हणजे आत्मविश्वास आमचा....
सावित्रीबाई फुले म्हणजे संघर्षाची यशोगाथा सावित्रीबाई फुले म्हणजे आदर्श आमचा सावित्रीबाई फुले म्हणजे
शिक्षणाची गंगोत्री..!!!
सावित्रीबाई फुले त्यांच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने अनेक पुरस्कार दिले गेले आहे.
1. 1995 पासून 3 जानेवारी हा दिवस "बालिकादिन", म्हणून साजरा केला जातो. 2. 2015 मध्ये महाराष्ट्र सरकारने पुणे विद्यापीठाचे नाव,"सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ "असे ठेवले.
3. 3 जानेवारी 2017 रोजी त्यांच्या 186 व्या जन्मदिनानिमित्त गुगल डूडल करून गुगल ने त्यांना अभिवादन केले.
4. 10 मार्च 1998 ला भारत सरकारने सावित्रीबाई फुले त्यांच्या
सामाजिक आणि शैक्षणिक योगदानाचे महत्व अधोरेखित करीत दोन रुपयाचे डाक तिकीट जारी दिले.
5. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना जाहीर केली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या अतुल्य अशा योगदानाला कोणीही विसरू शकत नाही. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी 19 व्या शतकात महिलांच्या शिक्षण व सक्षमीकरणालामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्या स्वतःची शिक्षित झाल्या आणि इतर स्त्रियांनाही शिक्षण दिले त्यांची गणना साक्षर महिलांमध्ये केली जात असे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्यांच्यामुळे आज महिला शिक्षण घेत आहे. शिक्षित आधुनिक समाजाची इमारत सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी रचली. आज ती इमारत इतकी मोठी झाली आहे की, या इमारतीखाली तळागाळातील खेडोपाड्यातील विकासाच्या प्रवाहापासून दूर असलेली जनता सुद्धा यामध्ये समाविष्ट होत आहे.
सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शाळा काढली नसती तर, आधुनिक शिक्षणाचे वटवृक्ष इतक्या लवकर इतके मोठे झाले नसते. सावित्रीबाई फुले म्हणजे एक आदर्श महिला शिक्षण सक्षमीकरणाच्या पायवाटेवरील चमचमता तारा होय.
आधुनिक स्त्री चूल आणि मूल यामध्ये मर्यादित न राहता आधुनिक स्त्री ने घराबाहेर पडून आपले स्वतंत्र व्यक्तिमत्व,नवीन ओळख निर्माण करीत आहे. फक्त आपल्या मर्यादित क्षेत्रामध्ये न राहता जागतिक पातळीवर सुद्धा आपल्या देशाचे नाव उज्वल करीत आहे. हे सर्व आज आधुनिक स्त्री-स्वातंत्र्य अनुभवत आहे ते फक्त " सावित्रीबाई फुले,"यांच्या संघर्षमय जीवन प्रवासाचा प्रवासातील फुलांनी भरलेली पायवाट आहे. जी सावित्रीबाई फुले यांनी काटेरी रस्त्यांवरून चालल्या त्या समोरील....!!
म्हणून स्वातंत्र्याचा दुरुपयोग करू नका. कारण हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सावित्रीबाई फुले यांना अंगावर चिखल माती शेण झेलावे लागले. शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आहे. जनसामान्यांमध्ये रुजविण्याचे काम सावित्रीबाईंनी केले. त्यांच्या या कार्याला मानाचा मुजरा..!!
सावित्रीबाई फुले लढली म्हणूनच आम्ही घडलो. हे सर्व महिला वर्गांनी लक्षात ठेवावे. कारण कुणालाही जळत्या दिव्याची वात होता येत नाही. ती सावित्रीबाई फुले झाला. घरोघरी शिक्षणाचे बीज आणि महत्त्व समजून घ्या. ते रोपटे प्रत्येकांच्या घरात लावा. मुलगी वाचली तर समाजव्यवस्था जिवंत राहील. म्हणून मुलीला जगू द्या..!! त्यांनाही हे जग बघण्याचा अधिकार आहे.
कारण सावित्रीच्या लेकी प्रत्येक घरातील अंगणात गुण्यागोविंदाने समाजव्यवस्थेत वावरली पाहिजे म्हणून मुलीला जगू द्या..!!!
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
विषय:- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
शिक्षणाची गंगोत्री...!!"
"Krantijyoti Savitribai Phule
Gangotri of education ... !! "
सावित्रीबाई फुले यांचा लेख आवडला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद..!!
🌷 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷