डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्त्री कामगार विचार
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर एक थोर विचारवंत शिक्षणतज्ञ , कायदेपंडित , संसदपटू संपादक ,लेखक ,वकील, प्राध्यापक , समाज सुधारक , घटनाकार ,एक अभ्यासू आमदार खासदार अशा पदांना भूषविलेले व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब ! त्यांच्या या कार्याची दखल सर्वांनीच घेतली.
१९३६ साली स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. या पक्षाचे ध्येय धोरणे कुठल्याही जाती धर्मासाठी नव्हते तर कष्टकरी समाज वर्गासाठी होते. आर्थिक-सामाजिक राजकीय हक्कांसाठी होते. यातूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शोषित कामगारा विषयीची तळमळ लक्षात येते. १५ ऑगस्ट 1१९३६ धोरणाचे ध्येय धोरणे अतिशय साध्या पद्धतीने आणि सूक्ष्मसखोल विचार पद्धतीने मांडले.
कष्टकरी समाज वर्ग सत्ता संपत्ती पासून वंचित होता वाटेल तसे राबविले जात होते त्यामानाने मोबदला मात्र अल्प द्यायचे बारा बलुतेदार पद्धती समाजमान्य होते दलित अस्पृश्यांची स्थिती दयनीय होती शोषित कष्टकरी कामगार वर्ग गुलामीचे जीवनमान जगत होते. १८७३ मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाज चळवळीने पारंपारिक समाजात चौकट उद्ध्वस्त केले या चळवळीने समाजातील अस्पृश्यांचे जीवन शैली दाखवून दिले या चळवळीमुळे अस्पृश्य समाज वर्गाला जीवन जगण्याची नवीन पद्धत प्राप्त झाली जीवनाला धैर्य प्राप्त करून दिले रोजगार शिक्षण जगण्याचे सामाजिक मूल्य इत्यादी बळ दिले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ज्या जबाबदाऱ्या स्वीकारला त्या सर्व जबाबदाऱ्यांमध्ये आपला ठसा उमटवलेला आहे १९४२ते १९४६ या काळात केंद्रीय श्रम व रोजगार ऊर्जामंत्री म्हणून कार्यरत असताना आपले मत रोख ठोक पद्धतीने मांडले ते म्हणतात," आता काळ बदलला आहे. सत्तेच्या व कायद्याच्या जोरावर कामगार वर्गाला दडपणे शक्य नाही. कामगार हा माणूस आहे. त्यांना मानवाचे हक्क मिळाले पाहिजेत. सध्या सरकार पुढे तीन प्रश्न आहेत एक तडजोडीचा, कामगाराची निश्चित वेतन , कामगार मालक यांच्यातील सौहादपूर्ण संबंध कामगारांचे राहणीमान उंचावले पाहिजे. आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे. मी नेहमीच कामगार वर्गाच्या बाजूने उभा राहीन.” आपली कार्यपद्धती ही कामगारांच्या बाजूने आहे हे त्यांनी मांडले.
२९ मार्च १९४५ स्त्री कामगारांचे स्त्रियांसाठी प्रसूतीचा काळ विश्रांतीची तरतूद, रोख मदत करणे, चार आठवडे प्रसूती भत्ता मिळावा तसेच गैरहजर असताना पगारी सुट्ट्या मिळाव्यात. खाण कामगारांना शॉवर बॉथची योजना सुद्धा अंमलात आणली होती.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खाण मजुरांसाठी आपले विचार भाषणातून व कायद्यातून मांडताना दिसतात. स्त्री कामगार अन बद्दलची आत्मीयता त्यांच्या कौटुंबिक समस्या संसार विषयी चिंता त्यांच्या जीवनाचा उन्नतीचा मार्ग हा आर्थिक परिस्थिती सुधारेल तेव्हाच सुकर होईल.
बाबासाहेब यांनी १९४५ आली महागाई भत्ता निर्णयामुळे अर्थ मजूर मंत्री असताना बाबासाहेबांचे निर्णय हे कुठल्याही विशिष्ट जातीला समोर न ठेवता समाजातील सर्व जाती धर्मातील कामगारांच्या हितांचे असतील असे निर्णय घेतले स्वातंत्र्य समता बंधुभाव या सूत्रांनी बांधणारी भारतीय राज्यघटना दिली. देश एकसंघ ठेवला.
ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे भारतीय कामगारांचे दोन शत्रू आहेत असे त्यांचे मत होते. कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करणे, मालक आणि कामगार यांच्यात औद्योगिक विवाद झाल्यास दोघात समेट घडवून आणण्यासाठी यंत्रणा निर्माण करणे, कामगार आणि मालक यांच्या कोणत्याही वाटाघाटीसाठी तरतूद करणे, वर्षातून किमान 240 दिवस काम, कामगारांना दिवसभरात आठ तास काम, नोकरीत असताना जर कामगाराचं अपघात व मृत्यू झाला तर मालकांकडून कामगाराला नुकसान भरपाई देणे. असे मत त्यांनी दिल्ली येते जॉईंट लेबर कॉन्फरन्स(Joint Labour Conference 1942) मध्ये कायद्यात एकवाक्यता असावी असे मत व्यक्त केले.
त्यांनी स्त्री कामगारांना कायद्यान्वये रात्री काम करण्यासाठी बंदी , स्त्रियांना प्रसुती काळात भर पगारी सुट्टी, बारमाही कामगारांना हक्काची भरपगारी सुट्टी,सक्तीची तडजोड , लवादा हे तत्व कामगारांच्या न्यायासाठी कायमस्वरूपी केले. त्यांचे हक्क वेतन विमा आरोग्य संरक्षण कामाचे तास इ.
आधुनिक समाजव्यवस्था बदलता आहे. जागतिककरण आले औद्योगीकरण सुरू झाले नवीन वसाहत वादाला शहरी-ग्रामीण भागाचा विकास होत आहे. ग्रामीण भागांचे शहरीकरण होत आहे शहर महानगरात परिवर्तित होत आहे; त्यामुळे सांस्कृतिक सामाजिक राजकीय शैक्षणिक आर्थिक यासर्व मध्ये बदल होत आहे. प्रगतीचे नवीन मार्ग खूले होत आहे.समाज भारतीय राज्यघटनेने दिलेले अधिकार मूलभूत तत्व समानता स्वातंत्र त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव आहे. लोकशाही ही आपली जीवनशैली बनवली आहे . बहुराष्ट्रीय कंपनी धोरणामुळे, वाढत चाललेल्या खाजगीकरणामुळे, नवीन समस्या निर्माण होत आहे. नवीन वसाहतवाद निर्माण होतो. साम्राज्यवाद निर्माण होत आहे. सांस्कृतिक दहशतवाद निर्माण होत आहे. माणसाच्या घामाची जागा आता यंत्राने घेतली आहे. श्रीमंत श्रीमंत तर गरीब हा अधिक गरीब होत आहे. सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक मूल्यांची घसरण होत आहे. भारतीय कामगार कायदे पुरेसे आहे पण समाधानकारक रीतीने योग्य पद्धतीने अंमलबजावणी केली जात नाही त्यामुळे जो कायदा कामगाराच्या फायद्याचा असतो तो निराशाजनक पद्धतीने पदरात पडताना दिसतो .
सविता तुकाराम लोटे
---------------------------------