savitalote2021@bolgger.com

सोमवार, १२ एप्रिल, २०२१

मनात तू

      मनात तू
सोडून आपल जग 
जगली ती वेळ तुझ्यासोबत 
आपले परके आणि परके आपले 
झाले सहजच.
मिरवली मी... श्रृंगार करुनी 
सांभाळत स्वप्नवेलींना 
जगता आले मात्र मनातून 
काही वेळा फेकताही आले ना
मनातील स्वप्न तुझ्यासोबत 
जीवनाचा प्रवाह बदलला आणि 
बदलले सर्व आपले परके 
तू ही बदला...मी ही बदलले...
प्रश्नही बदलले... एकटीचे !!
नवीन अगदी, मनातून 
उशीर झाला आता सर्व 
नात्याला... पोरगी झाले मी 
श्रृंगारहीन झाले मी...स्वप्नातील स्वप्नाने...तुझ्याबरोबर... 
भेटलास तू मज त्याचव्यवस्थेचा 
पुजारी...अशक्य आहे नवी भेट 
स्वच्छ पाण्याचा तळ गढूळ झाला 
आता...मनात तू... 
असला तरी दुखावलेल्या
                   प्रेमाने आता

             सविता तुकाराम लोटे

विरह

            विरह 
नेहमी विचारायचा अथांग सागराएवढे
प्रेम आहे का तुझ्यावर
पण कधी न बोलले पण आज बोलते 
माझं प्रेम आहे तुझ्यावर सागरापेक्षाही अथांग  प्रेम होते तुझ्यावर नभाएवढे 
माझे प्रेम होते तुझ्या...श्वासाएवढे 
श्रृंगारलेल्या माझ्या देहावर नसलेले 
तुझे प्रेम माझे होते उफानलेला लाटेसारखे नयनातील आसवांना लपविताना 
प्रेम लपविले...पण आता नको 
चंद्र गारवा लाटा श्वासही 
नकोसा वाटतो...
     तुझ्या विरहात!
                सविता तुकाराम लोटे 

रविवार, ११ एप्रिल, २०२१

सोबत

               सोबत

सोबत होतो, हातात हात नव्हता 
सोबत होतो, ओठांवर शब्द नव्हता 
सोबत होतो , पण ...नजर रस्त्यावरील                                            वर्दळीकडे 
सोबत होतो, पण लक्ष बॅगेतील मोबाईल
कडे आला तर? 
सोबत होतो, चहाच्या टपरीवर बिस्किट एकमेकांना देण्यात मात्र 
लक्ष्य एकमेकांच्या शब्दाविना संवादकडे  सोबत होतो, आभाळा एवढ्या प्रेमाने 
पण हसर्‍या ओठांनी अन 
बोलता डोळ्यांनी 
आजही,सोबत आहो...एकमेकांच्या आठवणीने 
आपआपल्या... भाव संवादामध्ये
         सविता तुकाराम लोटे

ज्योतिबा

         ज्योतिबा 
निद्रिस्त उपेक्षित समाजाला 
जागृत केले समानतेची वाट दिली 
निती हीच आपली संस्कृती 
विश्वकुटुंब हेच मानवी जीवनसत्य 
दाविली परिवर्तनाची वाट 
वैचारिक वारसातून 
पेटविली मशाल बहुजनांच्या उन्नतीसाठी उच्चवर्णीयांची मक्तेदारी तोडुनी 
अखंडातून...
ब्रीद होते स्त्री शिक्षणाचे 
सावली झाली सावित्री...
माती झाली धूळपाठ...
लेखणी झाली काठी...
मक्तेदारी तोडली उच्चवर्णीयांची 
बहुजन अज्ञान दारिद्रय वाचा दिली 
समूळ नष्ट करण्यासाठी विटाळवाच्या 
असामान्य कर्तुत्वाने अंधाराला उदयसूर्य 
दिला म्हणून आज महाराष्ट्र माझा 
फुले शाहू आंबेडकरांचा
        सविता तुकाराम लोटे 

शनिवार, १० एप्रिल, २०२१

झोपडी

         झोपडी 
चार भिंतीच्या झोपडीत 
कोपर्‍यात लावलेली मिणमिणत 
असलेली मेणबत्ती 
खुणावत होते प्रकाशाची चाहूल 
ज्ञान प्रकाशाकडे
वाट चालावी तशी उंबऱ्यावरील 
पाणी आत येऊ नये म्हणून 
शोधावी लागत होती त्याच
गटर नाल्यातील दगड विटा प्लास्टिक 
हातात बळ एकवटून 
ज्ञान प्रकाशाकडे जातांना!!!

    सविता तुकाराम लोटे 

गुढीपाडवा

          

       गुुुुढीपाडवा 
पानगळ झाली... नव पालवी आली 
चैत्र फुलले...नवी उषा आली
नवगुढी दारात असती... निसर्गरूप फुलवित
अतूट नाती...
माणुसकीची पानाफुलांचे चैत्र पावलीशी अंगणात सजली सप्तरंगांची मनमोहक रांगोळी 
सजले दारातील कुंड्यातली झाडे अन 
नव रूपाने सजली गच्चीतली बगीचे 
सजली दऱ्याखोऱ्यातील जंगले नव रूपाने 
करुया संकल्प या दिनी नव्या ऋतूत 
नव्या आयुष्याची उभारू या दारी आपुला 
करोना महामारीचा नष्ट समूळ करुनी 
संकल्प नव माणुसकीची व्याख्या...निर्माण करूया विजयपताकाची उभारूया गुढी!!!

          सविता तुकाराम लोटे 

येता-जाता असंच

येता-जाता असंच 

चिंब भिजावे 
येता-जाता असंच 
पावसाच्या सरी बरोबर
हवी हवीशी वाटती 
ती सर 
मनआठवणीने भरलेले, 
असले... 
की... 
मात्र 
आठवणीतल्या ओळखीचे असावे!!
चिंब भिजून टाकतात 
अनोळखी...
होत...
आडोशात सौंदर्याला 
उनाड उध्वस्त मन आठवणी 
अशीच येता जाता 
गोड हसर्‍या सरी 
चाहूल उद्ध्वस्त स्वप्नाची 
नयन चिंब भिजलेले...
गुपित मनातल्या 
आत सरीसारखी...
मातीचा चिखल...
पायदळी...
चूकलेल्या शून्य सारखे ...
येता-जाता असंच 
हिशोब चिंब भिजण्याचे 
मृगजळाची साद मात्र 
आकाशाच्या मुक्त सरीला 
चुकले करुनी आता... 
येता-जाता असंच 
आडोशातील सौंदर्याला 
उद्धवस्त उनाड
सरी येता - जाता असंच!
     
        सविता तुकाराम लोटे 

शुक्रवार, ९ एप्रिल, २०२१

प्रिये

प्रिये

प्रिये
माझं तुझं नातं 
अगदी निराळा 
माझं हो तुझं नाही 
तुझ्या ओठात पुटपुटणं 
अन, 
माझ्या डोळ्यांनी रागावन 
माझ्या मनातील शब्द 
तुझ्या ओठी...अन उगीच भांडण? 
कोणत्याही शब्दावरन
वेडेपणा आहे ...
असं बोलल की,  
गुलाबी होण...
परत ओठात कुजबुजणे 
नजर चोरत उगीच 
शब्दाला वजन देत 
आशावादी होण ...
प्रिये
अबोल प्रेम असत ग! 
असं बोलल की,
नीरव शांतता 
शब्दांविना क्षणभर !
परत बोलणं ...
युद्धपातळीवर...
प्रिये 
कंगाल मी!!!
एकसुरी वादळी पावसात 
अबोल मी... 
निशब्द सुरात
प्रिये  
माझं तुझं नातं निराळ...

   सविता तुकाराम लोटे 

आधार घ्यावा

      आधार घ्यावा 
स्वप्नाच्या मागे धावतांना 
आधार घ्यावा स्वप्नकिरणाचा
आपणच आपल्याला द्यावे
पणती सारखे जीवन !
स्वप्नाच्या मागे धावताना 
आधार घ्यावा स्वप्न फुलांचे 
पुन्हा द्यावे मी पणाचे मोती 
स्वप्नाच्या मागे धावतांना 
आधार घ्यावा काजव्यांचा

  सविता तुकाराम लोटे 

अश्रू

       अश्रू 
गोरेपाण जगात जगताना 
लपवावे लागतात नेहमी  
क्षितिजापलिकडे असलेल्या जगात  जगण्यापेक्षा
क्षितिजा अलीकडे जगात जगावे लागते 
पणतीलाही जळावे लागते 
भविष्यातील अंधाराला घेऊन
 हसत हसत मरावे लागते 
                           अश्रुंच्या संगे 
गोरेपाण जगात जगताना 
लपवावे लागते नेहमी 
तरीही, 
सुखा:सोबत असते तेच 
आणि 
दुःखा:सोबत (बरोबर )तेच 
आयुष्याच्या जमा - खर्च करतांना 
शिल्लकही तोच राहतो 
आणि हिच्याही तोच असतो 
गोरेपान जगात जगतांना

     सविता तुकाराम लोटे 

प्रेम कोणीही कुणावरही करावे

प्रेम कोणीही कुणावरही करावे 

प्रेम कोणीही कोणावरही करावे 
आईने मुलावर करावे 
भावाने बहिणीवर करावे 
प्रेम कुणीही कुणावरही करावे 
लेकरांनी मातेवर करावे 
मातेने लेकरावर करावे
 प्रेम कोणीही कुणावरही करावे 
नातवाने वृद्ध आजी-आजोबांवर करावे 
प्रेम कोणीही कुणावरही करावे 
जनतेने राज्यावर करावे 
राज्याने देशावर करावे 
देशाने जगावर करावे 
प्रेम कोणीही कुणावरही करावे 
माणसाने माणुसकी वर करावे 
सत्याने विश्वासावर करावे
 प्रेम कोणीही कुणावरही करावे 
नवऱ्याने बायकोवर करावे 
प्रेयसीने प्रियकरावर करावे 
धर्माने संस्कृतीवर करावे 
श्रद्धेने आपुलकीवर करावे 
प्रेम कोणीही कुणावरही करावे

             ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

आपणच आपल्याला

आपणच आपल्याला 

आपणच आपल्याला 
द्यावी शिक्षण 
आणि त्या शिक्षेबद्दल 
विचार करता करता 
हजार वेळा मरावे
 स्वतःच्या चुकीबद्दल 
कबुली द्यावी 
स्वतःच्या मनाशीच 
आपल्याच आपल्या चुकीबद्दल 
आपणच आपल्याला
 द्यावे सप्तसूर
 वाऱ्याबरोबर खेळण्यासाठी 
जपावी पायवाट कुठली तरी 
दूर देशाची जपतांना 
आपणच आपल्याला 
द्यावीत शिक्षा
     सविता तुकाराम लोटे

गुरुवार, ८ एप्रिल, २०२१

जात

जात 
जात होती बाहेर 
अडाणी -अशिक्षीत होती ती 
पोट भरण्यासाठी करावे लागे कष्ट.... 
तेव्हा एक वाली आला
त्याने दिला एक मंत्र
शिका-संघटीत व्हा! 
तेव्हा झाला समाज एक
अडाणी अशिक्षित ती
आज सुशिक्षित संस्कृत
जात होती बाहेर ती
समाजात आली ती
तिने दाखविला आपल्या
मंत्राचा मोठेपणा 
आज आहे ती
         सुसंस्कृत शिक्षित 
         एक आदर्श जात

सविता तुकाराम लोटे

बुध्द

बुध्द                                                 
बुद्धाने पेरली समानतेची शिकवण 
बुद्धाने फुलविली बंधुत्वाचे बन
बुद्धाने पेटविली अंधविश्वासची दोर 
बुद्धाने निर्माण केला शीलवान माणूस 
बुद्धाने फुलविली मानवता वाळवंटात 
बुद्धाने जागे केले बोधिवृक्षास                  
बुद्धाने दिला मार्ग मोक्षप्राप्तीचा 
पणती सारखे झिजून अंधाराला प्रकाशाकडे 
नेणारा मार्ग दाखविला बुद्धाने 
जीवनाला अर्थगाणे दिले बुद्ध धम्माने

                          सविता तुकाराम लोटे

बाबासाहेब

बाबासाहेब एक संपूर्ण गणित 
ना वजाबाकी ना गुणाकारात
ना बेरीज ना भागाकारात
फक्त आहे संविधानात
लोकशाहीत ...
माणूसकीत ...
 प्रत्येक व्यक्तीचा
जीवनप्रवासाच्या वाटेवरती

      सविता तुकाराम लोटे

म्हातारी

म्हातारी
विझत चाललेल्या दिव्याकडे पाहून 
आजी विचारे नातवाला 
सांग बाळा दोष कुणाचा?
माझ्या म्हातारपणाच्या , की
हाता-पायावरील लोंबकळणाऱ्या मासाचे 
संग बाळा दोष कुणाचा 
चेहऱ्यावरील वाटत चालेला सुरकुत्यांचे 
वाटेवरच्या पाउलखुणा दिसेंनासा
झाल्या आहे रे बाळा!
त्यात काय माझा दोष 
पाणावलेल्या डोळ्यांनी 
विचारे बाळाला 
बाळ,
देशील का रे मला आधार 
तळहातावरील जखमे प्रमाणे
मायेच्या पदराखाली ठेवशील 
का रे मला 
लटलट कापणाऱ्या पायाची 
काठी होशील का,रे 
माझ्या बाळा 
विझत चाललेल्या दिव्याकडे पाहून 
आजी विचारे नातवाला...

    सविता तुकाराम लोटे

मुली

मुली 
जन्म घे तू
कुणाच्याही पाठीमागे
बहीण म्हणून 
ताई म्हणून 
युगाची प्रगती म्हणून 
मुली
जन्म घे तू
जिजाऊ म्हणून 
सावित्री रमाई म्हणून
महाकाली सरस्वती म्हणून 
मुली 
जन्म घे तू
हातात पाळण्याची दोरी घेऊन
बंदिवान दिशा तोडून 
सभ्यतेची शिकवण घेऊन
मुली
जन्म घे तू 
पाय खेचणारा 
या समाजव्यवस्थेत
भारतीय संस्कृतीची उत्तराधिकारी म्हणून
मुली
 जन्म घे तू
शिक्षणाची दारे स्वबळावर उघडून 
रखरखत्या निखाऱ्यावर पावले ठेवीत
लेक होय सावित्रीची
मुली 
जन्म घे तू
बंधनातून मुक्त होऊन 
संस्काराचे धडे घेत 
जुनाट चालीरीतींना मोडून 
नवयुगाची पाऊलखुणा ठेवत 
संस्काराची झालर होऊन 
मुली 
जन्म घे तू
ज्ञानेश्वराची मुक्ताई म्हणून 
ज्योतिबाची सावित्री म्हणून 
भिमाची रमाई म्हणून 
झाशीची राणी म्हणून
संस्कार सभ्यतेची नवयुगाचे प्रगतीची दारे होऊन 
मुली 
जन्म घे तू
कुणाच्याही पाठीमागे 
पण 
प्रगतीचे वारे वाहू दे 
स्वतःकडे संरक्षणाकडे आणि समाजाकडे

सविता तुकाराम लोटे

पाण्याच्या नित्यलिला

पाण्याच्या नित्यलीला 

अनंत लीला, अनंत रुपे
या पाण्याच्या नित्यलिला 
चिमुकले थेंब डोलती
फुले पानाच्या संगे
दवबिंदू घेऊन येई
गुलाबी हिरवळी मध्ये 
संथ वाहते घेऊनी 
आभाळातील भाव 
देती नवजीवन जगी 
सुख स्वप्नांच्या सोबती 
कधी सुखी घरा येई
कधी दुःखांच्या संगे
घेऊन जाई सप्तसागरा
क्षितीजाच्या पलिकडे 
या पाण्याचे काही 
न कळे 
कधी नयनी अश्रूफुलांच्या 
संगे

       सविता तुकाराम लोटे

उबंराबाहेरील प्राजक्ता

उंबराबाहेरील प्राजक्ता

अंगणात प्राजक्त हळूवार 
खेळत होती 
आणि मी पाहत होती
तो हसरा खेळ 
हळुवार 
हृदयातील झुरणे 
प्राजक्तालाही कळले असेल
 हळूवार मनाने 
अलगद अव्यक्त झालेल्या 
भिजल्या पापण्यातील क्षण 
आठवांसहित
 बहरलेला नाजूक नक्षीक्षणांची 
प्राजक्ताला हळूवार आतून 
उंबराबाहेरील प्राजक्ताला 

     सविता तुकाराम लोटे

हेवा

हेवा 
नकळत येते 
तुझी आठवण 
तुझे ते शब्द 
फिरत राहते
हसणे बोलणे 
आणि नकळत 
दाखविणे हक्क 
मनातील भाव 
चेहऱ्यावर दाखविणे 
क्षणभर थांबणे 
हसणे जाणे 
काहीच न ठेवता 
मनात फक्त आठवणी 
दाटून येते 
आणि पुन्हा परतते 
त्याच क्षणाला
   
         सविता तुकाराम लोटे

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...